Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे हा शासनाचा प्राधान्यक्रमाचा विषय ! - पंतप्रधान

यास कालमर्यादाही निश्चित करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 
पंतप्रधानांकडून आर्य चाणक्य यांच्या शिकवणुकीचा उल्लेख
पंतप्रधान मोदी यांनी या वेळी आर्य चाणक्य यांच्या 'भ्रष्ट अधिकार्योंची बेहिशोबी संपत्ती राज्यकर्त्याने जप्त करावी', या शिकवणुकीचा उल्लेख केला.
नवी देहली - भ्रष्टाचार हे देशासमोरील मोठे आव्हान असून त्याचे समूळ उच्चाटन करणे हा शासनाचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), राज्यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि गुप्तचर विभाग यांच्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते.
मोदी पुढे म्हणाले, 
१. आमचे शासन सत्तेवर येताच आम्ही काळे धन भारतात परत आणण्यासाठी तत्परतेने विशेष तपास पथक (एस्आयटी) स्थापन केले. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईत शासन कोणतीही तडजोड करणार नाही.

नाताळनिमित्त तेलंगण शासन ख्रिस्त्यांना कपडे वाटणार !

नाताळ राज्यस्तरावर साजरा करणार
ख्रिस्तीधार्जिण्या तेलंगण शासनाने असा उपक्रम कधी हिंदूंच्या सणांच्या 
वेळी केला आहे का ? कि तेलंगणमध्ये हिंदूच नाहीत ?
भाग्यनगर - नाताळनिमित्त ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा निर्णय तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. नाताळ हा सण राज्यस्तरावर साजरा करण्याचाही आदेश राव यांनी दिला आहे. नाताळनिमित्त तेलंगणमधील २ लाख ख्रिस्ती नागरिकांना कपडे वाटण्यात येणार आहेत. राव यांच्या आदेशाची कार्यवाही होण्यासाठी त्यांनी स्वत: राज्यातील वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन उपक्रमाचा आढावा घेतला. २० डिसेंबर या दिवशी राव  स्वत: ख्रिस्त्यांना कपडे वाटप करणार आहेत. राज्यात १९० ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सर्व ख्रिस्त्यांना शासनाकडून जेवणही देण्यात येणार आहे.

७ ते २३ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन !

  मुंबई - नागपूर येथे होणार्या विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज ७ ते २३ डिसेंबर २०१५ या कालावधीत चालवण्यात येणार आहे, असे विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत १७ नोव्हेंबर या दिवशी निश्चित करण्यात आले. 

६ मासांत रॉबर्ट वडेरा यांना कारागृहात पाठवू ! - मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा

हरियाणातील भूमी घोटाळा प्रकरण
जिंद (हरियाणा) - काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळे लवकरच उघड केले जातील. तसेच पुढील ६ मासांत रॉबर्ट वडेरा यांना कारागृहात पाठवू, असे हरियाणाचे मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. एका महाविद्यालयीन कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेचे पैसे खाणार्याांना सोडणार नाही. अशा भ्रष्टाचार्यांकडून पैसे वसूल करून ते विकासकामांसाठी वापरण्यात येतील. रॉबर्ट वडेरा यांच्यावरील भूमी गैरव्यवहाराच्या आरोपांविषयी चौकशी करत असलेल्या ढिंगरा समितीचा अहवाल पुढील ६ मासांत येणार आहे. त्यानंतर वडेरा यांच्या विरोधात सर्व पुरावे एकत्र करून कारवाई करण्यात येईल, असेही खट्टर यांनी सांगितले.

उल्फा संघटनेचा आतंकवादी चेतियाला ५ दिवसांची कोठडी

आतंकवादग्रस्त भारत !
गौहत्ती - आसाममधील युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या आतंकवादी संघटनेचा नेता अनुप चेतिया यास न्यायालयाने ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. चेतियाला नुकतेच बांगलादेश शासनाने भारताच्या स्वाधीन केले आहे. चेतियाला मार्च १९९१मध्ये अटक करण्यात आली होती; मात्र आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्व्र सैकिया यांनी त्याची कारागृहातून मुक्तता केल्यानंतर त्याने भारतातून पलायन केले होते. बांगलादेशने चेतियाला २१ डिसेंबर १९९७ या दिवशी अवैध पारपत्र वापरून घुसखोरी केल्याच्या प्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि परकीय चलन हस्तगत करण्यात आले होते. गेल्या १८ वर्षांपासून तो बांगलादेशच्या कारागृहात होता. आसाममध्ये पोलिसांची हत्या, अपहरण, खंडणी, बनावट नोटा आणणे अशा अनेक गुन्ह्यांत भारताला तो हवा होता. बांगलादेशने गेल्या आठवड्यात त्याला भारताच्या स्वाधीन केले. सीबीआयने त्याला कह्यात घेतल्यानंतर गौहत्तीतील न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदवण्याच्या पोलिसांच्या मागणीला न्यायालयाची अनुमती

मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ च्या (२६/११ च्या) मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील 'मास्टरमाईंड' म्हटला जाणारा आणि सध्या अमेरिकेच्या कह्यात असलेला लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी डेव्हिड (कोलमन) हेडली याला या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. या हेडलीची साक्ष नोंदवण्याच्या पोलिसांच्या मागणीला न्यायालयाने अनुमती दिली आहे. 

कर्मचार्‍यांना १५ टक्के वेतनवाढीची शिफारस

सातवा वेतन आयोग
    नवी देहली - सातवा वेतन आयोग १९ नोव्हेंबरला आपला अहवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयोगाने १५ टक्के वेतनवाढीची शिफारस केली आहे. त्याचा लाभ ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५५ लाख सेवानिवृत्त यांना होईल. केंद्रशासनाने या आयोगाच्या सर्वच्या सर्व शिफारसी स्वीकारल्या, तर देशाच्या तिजोरीवर २५ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.

झारखंडमध्ये आता गायींनाही मिळणार ओळखपत्रे

गोतस्करी रोखण्याच्या दृष्टीने कणखर पाऊल !
     रायपूर (झारखंड), १८ नोव्हेंबर - भारतात प्रत्येकाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी ज्याप्रमाणे आधारकार्ड बनवण्यात आली, त्याचप्रमाणे झारखंडमध्ये आता गायींनाही १२ आकडी स्वतंत्र क्रमांक असलेली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. ही ओळखपत्रे गायींच्या कानाजवळ बसवण्यात येणार असून त्यावर गायीचे छायाचित्र, अंदाजे वय, रंग आणि मालकाचे नाव असेल. केंद्रशासनाच्या कृषी मंत्रालयाच्या सूचनांनुसार ही ओळखपत्रे दिली जाणार आहेत. या ओळखपत्रांमुळे गोतस्करीवर नियंत्रण येईल, तसेच गायीची जात (ब्रीड) आणि तिची दूध उत्पादनाची आकडेवारीही (डाटा) उपलब्ध होण्यास साहाय्य होणार आहे.

बांगलादेशमध्ये ख्रिस्ती पाद्रीवर गोळीबार

* पाद्री इटलीचा नागरिक !
* मुसलमान कट्टरपंथियांवर संशयाची सुई !
     ढाका - बांगलादेशमधील दिनाजरपूर येथे अज्ञात आक्रमणकर्त्यांनी एका ख्रिस्ती पाद्य्रावर दुचाकीवरून येऊन गोळीबार केला. यात पाद्री गंभीर घायाळ झाले असून त्यांना त्वरित रुग्णालयात हालवण्यात आले. पाद्री मूळ इटलीचे नागरिक आहेत. याच वर्षी २८ सप्टेंबरला ढाका येथील अतीमहनीय राजकीय व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या भागात इटलीच्याच एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पाद्रीवर मुसलमान कट्टरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नायजेरियात शक्तीशाली बॉम्बस्फोट

३२ ठार, तर ८० गंभीर घायाळ
     योला (नायजेरिया) - उत्तर-पूर्व नायजेरियातील अदामावा राज्याची राजधानी असलेल्या योला शहरातील एका फळ बाजारात १७ नोव्हेंबरला स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. त्यात ३२ जण ठार झाले, तर ८० जण गंभीर घायाळ झाले. घटनास्थळावर त्वरित पोहोचलेल्या सुरक्षा यंत्रणेने बचावकार्य चालू केले. या आक्रमणाचे दायित्व अजून कुणीही स्वीकारलेले नाही; पण संपूर्ण जगासाठी धोकादायक बनलेल्या आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेशी हातमिळवणी केलेल्या बोको हरम या आतंकवादी संघटनेने हे आक्रमण केले असल्याचा संशय नायजेरियाच्या रेड क्रॉस आणि नॅशनल इमरजन्सी मॅनेजमेंट एजंसी (नेमा) या संस्थांनी व्यक्त केला आहे.

हिंदूंच्या भावना दुखावत असल्यास गोहत्या थांबली पाहिजे ! - फारूख अब्दुल्ला

हा सल्ला अब्दुल्ला त्यांच्या काश्मीरमधील भावंडांना देतील का ?
श्रीनगर - गोहत्या केल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील, तर गोहत्या थांबल्या पाहिजेत, असे प्रतिपादन काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे प्रमुख तथा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले. अब्दुल्ला यांच्या हिंदूंचे समर्थन करणारे वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देशद्रोही आसिया हिच्या मुसक्या आवळा !

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेची परखड मागणी
शासनाने आता तरी तत्परतेने देशद्रोह्यांविरुद्ध कारवाई करावी, ही अपेक्षा !
मुंबई - हिंदुस्थानात राहून पाकड्यांचे गुणगान करणार्या अशा देशद्रोह्यांना एकतर तुरुंगात तरी डांबायला हवे किंवा पाकिस्तानात तरी हाकलून द्यायला हवे; मात्र या दोन्हींपैकी काहीच होत नाही. सातत्याने हिंदुस्थानविरोधी कारवाया करूनही आसियावर आणि तिच्या 'दुख्तरन-ए-मिल्लत' संघटनेवर कठोर कारवाई होत नसल्यामुळेच कश्मीरमध्ये देशद्रोह्यांचे पीक वाढीस लागले आहे. देशद्रोही आसियाच्या मुसक्या आवळायला हव्यात. ती पुन:पुन्हा हिंदुस्थान सरकारला आव्हान देत आहे, असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून करण्यात आला आहे. 

केरळमध्ये किस ऑफ लव्ह मोहीम राबवणार्‍या दाम्पत्याला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक

     तिरुअनंतपुरम् - केरळमध्ये स्वैराचारी आणि अश्‍लील अशी किस ऑफ लव्ह मोहीम चालू करणार्‍या दाम्पत्याला केरळ पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक केली. राज्यात सामाजिक संकेतस्थळाचा उपयोग करून राहुल पशूपलन आणि त्याची पत्नी रश्मी नायर हे दोघे वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती राज्याच्या सायबर विभागाने गोळा केली होती.

महाविद्यालयामध्ये मुलामुलींनी एकत्र बसू नये ! - केरळचे शिक्षणमंत्री अब्दू रब्ब

     तिरुअनंतपुरम, १८ नोव्हेंबर - कोझीकोड येथील फारूख महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी काही मुलींसोबत बसल्याने त्याला महाविद्यालयामधून निलंबित करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर केरळचे शिक्षणमंत्री पीके अब्दू रब्ब यांनी सांगितले की, मुलामुलींनी महाविद्यालयामध्ये शेजारीशेजारी वा एकत्र बसण्याची काहीएक आवश्यकता नाही.

ब्रिटनमधील शाळांमधील ख्रिस्ती प्रार्थनासभा बंद करण्याची सूचना

प्रार्थनासभेमुळे अन्य धर्मियांच्या मनात पक्षपाताची भावना निर्माण होण्याची शक्यता व्यक्त !
     ब्रिटन, १८ नोव्हेंबर - येथील शाळांमध्ये चालू असलेली प्रार्थनासभा बंद करण्याची सूचना आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज रिसर्च कौन्सिलने केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे. याविषयी कारण देतांना त्या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, शाळांमध्ये केली जाणारी प्रार्थना ही ख्रिस्ती धर्माशी संबंधित असून त्यामुळे अन्य धर्मियांविषयी पक्षपाती भूमिका घेतली जात आहे, असे त्यांना वाटण्याची शक्यता आहे.

रशियन एअरलाइन्सचे विमान आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनीच पाडल्याचे उघड

     मॉस्को - रशियन एअरलाइन्सचे एअरबस ए-३२१ हे विमान इजिप्तच्या सिनई भागामध्ये ३१ ऑक्टोबर या दिवशी कोसळले होते. त्यामध्ये विमानातील सर्व २२४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आय.एस्.आय.एस्.ने या घटनेचे दायित्व स्वीकारले होते; परंतु रशियाच्या संरक्षण अधिकार्‍यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला होता. आता हे विमान आतंकवाद्यांनी पाडले होते, याला स्वतः रशियानेच दुजोरा दिला आहे. एका बॉम्बच्या साहाय्याने ते विमान हवेतच उडवून देण्यात आले होते, अशी माहिती रशियाचे संरक्षणप्रमुख अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना एका बैठकीमध्ये दिली.

हाजीअली दर्ग्यात महिलांना अनुमती देण्याचा वाद सामोपचाराने सोडवा ! - उच्च न्यायालय

सध्याचे युग असहिष्णुतेचे असल्याची न्यायालयाची टिप्पणी !
मुंबई - वरळी येथील हाजीअली दर्ग्यात महिलांना अनुमती देण्याचा वाद सामोपचाराने सोडवा, असा सल्ला दोन्ही पक्षकारांना मुंबई उच्च न्यायालयाने १७ नोव्हेंबर या दिवशी दिला. महिलांना हाजीअली दर्ग्याच्या मजारपर्यंत जाण्यास हाजी अली न्यासाने बंदी घातली आहे. त्याविरोधात डॉ. नूरजहां साफिया नियाझ यांनी अधिवक्ता सागर राणे यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपिठाने वरील सल्ला दिल्ला. काही दिवसांपूर्वी या संदर्भात हाजी अली न्यासाने 'मजारजवळ अधिक गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊ नये आणि महिलांचे शीलरक्षण व्हावे यासाठीच निर्णय घेतला', असा युक्तीवाद केला होता. सध्या असे वातावरण आहे की, प्रत्येक गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. प्रत्येक गोष्टीचा वा भूमिकेचा विपर्यास केला जात आहे. धार्मिक सूत्र आले की, लोक अतिसंवेदनशील होतात. सध्याचे युगच असहिष्णुतेचे बनलेले आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने हाजी अली दर्ग्याच्या वादाच्या अनुषंगाने नोंदवले.

मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य देशद्रोही ! - नायडू

नवी देहली - काँग्रेस नेते मणिशंकर यांनी पाकविषयी केलेले वक्तव्य निंदनीय आणि देशद्रोही आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. अय्यर यांनी पाकच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना, 'केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासन हटवल्यानंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्री होऊ शकते', असे वक्तव्य केले होते. अय्यर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतांना नायडू पुढे म्हणाले, "अय्यर यांच्या वक्तव्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासनाला उलथवून टाकण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते."

समीर गायकवाड यांच्या अधिवक्त्यांनी प्रविष्ट केलेला अर्ज न्यायालयाकडून अमान्य !

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण
२१ नोव्हेंबरला समीर गायकवाड न्यायालयात म्हणणे मांडण्याची शक्यता !
कोल्हापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी श्री. समीर गायकवाड यांना अत्यंत महत्त्वाची माहिती द्यावयाची असल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित करणे महत्त्वाचे आहे, असा श्री. समीर गायकवाड यांच्या अधिवक्त्यांनी केलेला अर्ज आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर्.डी. डांगे यांनी अमान्य केला आहे. यापूर्वी श्री. समीर गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते त्या वेळीच त्यांना गोपनीय माहिती देता आली असती. त्यामुळे आता या अर्जाचा विचार करता येणार नाही, असे कारण न्यायालयाने देऊन हा अर्ज फेटाळला आहे. वास्तविक २१ नोव्हेंबर या दिवशी श्री. गायकवाड यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार आहे. त्या दिवशी त्यांना न्यायालयात उपस्थित केल्यानंतर ते गोपनीय माहिती न्यायालयात सांगतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी (पुणे) येथे अधिकोषाची रक्कम लुटण्याचा प्रयत्न फसला

पिंपरी, १८ नोव्हेंबर - येथील थरमॅक्स चौकातील ठाणे जनता सहकारी बँकेच्या (टीजेएस्बी) चिंचवड-संभाजीनगर शाखेतील रक्कम लुटण्याचा प्रकार घडला. ही घटना १७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २.१५ वाजता घडली आहे. त्या चोरीसाठी आलेल्या चोरट्याने सुरक्षारक्षकांवर गोळीबार करत सुमारे ५० लक्ष रुपये रक्कम असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षारक्षकांनी अधिकोष लुटण्याचा डाव उधळून लावला. यात सुरक्षारक्षक कपिल रॉय हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या चोरीच्या वेळी आरोपी टोणपे याने वापरलेल्या दुचाकी वाहनाच्या क्रमांकावरून वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या वेळी त्याच्याकडून एक पिस्तूलही शासनाधीन करण्यात आले आहे.

अमेरिकेत शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत २९ टक्क्यांनी वाढ

३५ वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी संख्येची नोंद
 विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षण घेऊनही भारताला भेडसावणार्‍या 
 समस्या वाढतच आहेत. मग अशा शिक्षणाचा देशाला काय उपयोग ? ही स्थिती 
पालटण्यासाठी आणि भारताचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धत राबवणेच आवश्यक आहे ! 
     मुंबई - वर्ष २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २९ टक्क्यांनी वाढली आहे. या शैक्षणिक वर्षात १ लाख ३२ सहस्र ८८८ भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असून गेल्या ३५ वर्षांतील ही सर्वोच्च विद्यार्थी संख्या नोंदवण्यात आली आहे. ही माहिती ओपन डोअर अहवालातून समोर आली आहे. मुंबईतील अमेरिकन दूतवासातील कौन्सिल जनरल थॉमस वायदा, माइक एवन्स आणि रायन परेरा आदींनी ही माहिती पत्रकारांना दिली. 

पुणे शहरातील हॉटेल कोहिनूरमधून ३७ लक्ष रक्कम तिजोरीसह चोरीस

  • एकाच दिवशी पुण्यात चोरीच्या दोन मोठ्या घटना घडणे, हे गुन्हेगारांसाठी रान मोकळे असल्याचेच द्योतक !
  • राज्यात दिवसाढवळ्या अधिकोष लुटण्याच्या घटना वाढणे, हे चिंताजनक आहे. ते रोखण्यासाठी गृह विभागाने तातडीने उपाययोजना काढून प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
  • असुरक्षित पुणे !
पुणे, १८ नोव्हेंबर - येथील डेक्कन परिसरात असलेल्या हॉटेल कोहिनूरमधील तळमजल्यातील खोलीचे कुलूप तोडून चोरट्याने ३७ लक्ष २५ सहस्र रुपयांची रक्कम तिजोरीसह चोरून नेली. ही घटना १७ नोव्हेंबर या दिवशी सकाळी उघडकीस आली. या चोरीमागे माहीतगार व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेलचे लेखनिक राजेश सतीश तिखे यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गेल्या ६ मासांपासून जमा झालेली ही रक्कम हॉटेलच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात येणार होती.

पवना नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश

     पिंपरी, १८ नोव्हेंबर - येथील पवना नदीतील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. नदीत थेट रसायनयुक्त पाणी मिसळणार्‍या बेबडओहोळ (मावळ) औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठवावा, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. 

के.ई.एम्. रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत ९७ कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप ! - महानगरपालिका माजी अतिरिक्त आयुक्त

या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाईची अपेक्षा ! 
     मुंबई - के.ई.एम्. रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत ९७ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त आय.सी. सिसोदिया यांनी केला होता. याचा आधार घेत मार्डने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. 

पत्नी, सासरे यांची हत्या करून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकाची आत्महत्या

     अकोला - केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआर्पीएफ्) एका सैनिकाने कौटुंबिक वादातून १६ नोव्हेंबर या दिवशी स्वतःजवळील बंदुकीतून पत्नी आणि सासरे यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. छगन प्रल्हाद जाधव (वय ४५ वर्षे) असे आत्महत्या करणार्‍या सैनिकाचे नाव आहे. ते छत्तीसगढमध्ये कार्यरत होते. (सैनिकांकडून असे होणे अपेक्षित नाही. - संपादक) 

नाशिक येथे पोलिसांकडून सायकलवरून पहारा

वेगवान दुचाकीवरून चोर्‍या करून जाणार्‍या 
चोरांना सायकलवरून पहारा देणारे पोलीस कसे काय पकडणार ? 
     नाशिक - येथील नाशिकरोड परिसरातील नागरिकांशी सुसंवाद वाढावा, रस्त्यावरील आणि अन्य गुन्ह्यांच्या संदर्भात त्यांच्यात सतर्कता यावी, यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सायकलवरून पहारा घालण्यास प्रारंभ केला आहे. या वेळी नागरिकांनाही या उपक्रमाची माहिती देण्यात आली. आता पोलिसांकडून येथील सौभाग्यनगर, शिवाजीनगर, जेलरोड, देवळालीगाव बाजार, उपनगर, तरण तलाव, गुलमोहर कॉलनी आदी भागात सायकलवरून पहारा घालण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा सायकलस्वार पोलीस दिवसा आणि रात्री पहारा घालणार असून त्यांना नव्या सायकली देण्यात आल्या आहेत. (सध्याच्या काळातील वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप पहाता सायकली नव्हे, तर पोलिसांकडे दुचाकीच असणे आवश्यक आहे ! - संपादक)

३६ हिंदु तरुणांच्या जामीन अर्जावर २४ नोव्हेंबरला सुनावणी !

लोंढा आणि खानापूर येथील दंगलीचे प्रकरण
बेळगाव, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - लोंढा आणि खानापूर येथे झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ३६ हिंदु तरुणांच्या जामीन अर्जावर २४ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. लोंढा येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी दगडफेक झाल्यानंतर त्याचे पडसाद खानापूर येथे उमटले होते. त्यानंतर खानापूर पोलिसांनी या निष्पाप हिंदु तरुणांवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक केली होती. यामधील काही जणांचा जामीन अर्ज खानापूर येथील जेएम्एफ्सी न्यायालयाने फेटाळला होता. यामुळे येथील मुख्य जिल्हा सत्र न्यायालयात या सर्वांनी जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला आहे.

नंदुरबार येथील गावांत वीजेअभावी भ्रमणभाष प्रभारणासाठी १० किलोमीटरची पायपीट

स्वातंत्र्यानंतर ६ दशके होऊनही वीजेची सुविधा मिळू न शकणे, याहून दुसरे दुर्दैव कुठले ? 
     नंदुरबार - सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील जवळपास ७० पेक्षा अधिक गावे आणि १ सहस्रांहून अधिक पाड्यांपर्यंत रस्ते आणि अन्य सुविधा उपलब्ध नाहीत; मात्र असे असतांना काही मध्यवर्ती गावांपर्यंत भ्रमणभाषचे 'टॉवर' पोहोचले आहेत. त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात भ्रमणभाषचा वापर करत आहेत; मात्र वीजेअभावी भ्रमणभाष प्रभारित करण्याची (चार्जिंगला लावण्याची) सोय नसल्याने त्यांना किमान १० किलोमीटर अंतर चालत यावे लागते. भ्रमणभाष प्रभारित करण्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. प्रत्येक भ्रमणभाषसाठी १० ते १५ रुपये आकारले जातात; मात्र भ्रमणभाष प्रभारित करण्यासाठी गावांमधून ते गोळा करून आणणे आणि ते पुन्हा घेऊन जाणे यात प्रत्येकाचा दिवस जातो.

सोळशी (जिल्हा सातारा) येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

     सातारा, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सोळशी येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी सोळशी येथील प.पू. तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज, श्री शनैश्‍वर सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक कदम, स्वागताध्यक्ष श्री. बाळासाहेब सोळस्कर, संमेलनाचे निमंत्रक आणि हिंदु महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दत्ता सणस, शिवसेनेचे श्री. हणमंतराव वाघ, श्री. बाळासाहेब यादव, सौ. प्रमिला कुलकर्णी उपस्थित होत्या.

प्रवाशांशी भांडल्यामुळे रेल्वेकडून तिकीट लिपिक महिलेचे निलंबन

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट खिडकीवर एक महिला तिकीट आरक्षण लिपिक आणि प्रवासी यांच्यात झालेल्या भांडणाची चित्रफीत सामाजिक संकेतस्थळांवर वेगाने पसरली आणि रेल्वेने स्वत:हून या महिला कर्मचार्‍यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली.
१. लांब पल्ल्याच्या गाडीचे अनारक्षित तिकीट काढण्यासाठी दोन प्रवासी तिकीट खिडकीवर गेले. त्या वेळी खिडकीवर असलेली महिला तिकीट आरक्षण लिपिक जमा झालेले पैसे मोजत होती.

नाशिक येथे बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढले !

     नाशिक - शहरात पाकीटमारी, चोर्‍या, दरोडे आणि हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत बालगुन्हेगारांचा समावेश वाढत आहे. किशोर सुधारालयातून बाहेर पडणारी मुले पुन्हा गुन्हेगारीकडेच वळत आहेत, असे मत पोलिसांनी नोंदवले आहे. 

राज्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या साहाय्यासाठी ४ सहस्र २ कोटी रुपयांचे मागणीपत्र केंद्र शासनाला सादर - एकनाथ खडसे

  • लोकहो, दिवसेंदिवस वाढणार्‍या भीषण पाणीटंचाईला तुम्ही कसे सामोरे जाणार आहात ?
  • केंद्रीय पथकाचा दुष्काळी गावांचा पाहणी दौरा रहित
  • एप्रिल २०१६ पर्यंत १० सहस्र ६१५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
मुंबई - राज्यातील १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून या गावांच्या साहाय्यासाठी ४ सहस्र २ कोटी रुपयांचे मागणीपत्र केंद्रशासनाला सादर करण्यात आले आहे. १८ ऑक्टोबरपासून केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असून दुष्काळ घोषित केलेल्या भागाची पाहणी ते करणार असल्याची माहिती महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी म्हटले होतेे; पण या पथकाचा हा दौरा सध्या रहित झाल्याचे समजते. (हा दौरा रहित होणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ! - संपादक) हे पथक संभाजीनगरपासून पाहणीला प्रारंभ करणार होते. त्यानंतर येत्या १५ दिवसांत या संदर्भात बैठक होऊन निर्णय घेण्यात येणार होता; मात्र आता पथकाचा पाहणी दौराच रहित झाल्याने निर्णय प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

नवा शैक्षणिक मसुदा रहित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई - लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या शैक्षणिक मसुद्याविषयी चर्चा करून त्यातील काही सूत्रांवर आक्षेप घेतला. त्या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मसुद्यातील त्रुटी लक्षात आल्या असून हा मसुदा रहित करत आहे, असे सांगितले.
    नव्या शैक्षणिक धोरणात ६ घंट्यांची शाळा ८ घंटे करणे, दलित, आदिवासी, अपंगांच्या शैक्षणिक सवलती रहित करणे, प्राथमिक शिक्षण मातृभाषेत द्यावे, अशा तरतुदी केल्या होत्या. या तरतुदींना श्री. पाटील यांनी आक्षेप घेतला होता. तसेच शाळांचे घंटे वाढवण्याविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांसह अनेकांनी आक्षेप घेतला होता.

शेतकरी मरतांना कुठे होती सहिष्णुता ? - सदाभाऊ खोत

     पुणे, १८ नोव्हेंबर - सहिष्णुता धोक्यात आली म्हणता, मग शेतकरी आणि त्यांची पोरेबाळे मरतांना कुठे गेली होती सहिष्णुता, त्या वेळी पुरस्कार का परत केले गेले नाहीत, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सदाभाऊ खोत यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार श्री. राजू शेट्टी यांसह अन्य उपस्थित होते. (सदाभाऊ खोत यांच्या प्रश्‍नावर कथित पुरोगामी साहित्यिक आणि अन्य काय उत्तर देणार आहेत ? - संपादक

पोलिसांकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न ; १०६ जणांना कह्यात घेऊन सुटका !

हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या वतीने मोर्चा 
बेळगाव येथील कथित थडग्याचे प्रकरण 
     बेळगाव, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - खंजर गल्ली येथील कथित थडगे हटवण्याच्या मागणीसाठी १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११.१५ वाजता येथे विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि भाजप यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले; मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी १०६ कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. या आंदोलनात ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांविषयी हिंदुत्ववाद्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटणार्‍यांना तेलंगण 
शासनाच्या या निर्णयाविषयी काय म्हणायचे आहे ? 
     नाताळनिमित्त तेलंगणमधील २ लाख ख्रिस्ती नागरिकांना कपडे वाटण्याचा निर्णय तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतला आहेे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सर्व ख्रिस्त्यांना शासनाकडून जेवणही देण्यात येणार आहे.

आपल्याला हिंदु राष्ट्र म्हणवून घेतांना लाज वाटेल, असा इतिहास रचला गेला ! - शरद पोंक्षे

  • सर्वच इतिहासप्रेमी, हिंदू आणि भारतीय संघटित झाल्यासच इतिहासाचे सत्य स्वरूप समाजासमोर येईल !
  • संस्कृत भाषेस तडीपार करण्यात आले
संभाजीनगर, १८ नोव्हेंबर - देश आणि राज्य यांविषयीचा इतिहास हा ब्रिटिशांच्या दृष्टीने शिकवला गेला. तो मुळातच चुकीचा आहे आणि तसाच आजही शिकवला जातो. आपल्याला हिंदु राष्ट्र म्हणवून घेतांना लाज वाटेल, अशा पद्धतीत इतिहास रचला गेला, असे प्रतिपादन अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक श्री. शरद पोंक्षे यांनी केले. येथील संत एकनाथ रंगमंदिरात १६ नोव्हेंबर या दिवशी स्वतंत्रते भगवती सामाजिक संस्थेच्या उपक्रमात क्रांतिकारकांच्या आठवणी आणि सावरकरांचे विचार या विषयावर ते बोलत होते.

३० नोव्हेंबरपूर्वी कोल्हापूर पथकरमुक्त - सार्वजनिक बांधकाममंत्री

कोल्हापूर - ३० नोव्हेंबरपूर्वी कोल्हापूर पथकरमुक्त करण्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. कोल्हापुरातील सर्व पथकर बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ३० नोव्हेंबरच्या आत नगर विकास विभाग या संदर्भातील अधिसूचना जाहीर करेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
     पथकर नाके बंद झाल्यानंतर आयआर्बी आस्थापनाला किती आणि कशी रक्कम द्यायची यावर शासनामध्ये चर्चा चालू आहे. न्यायालयात शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती मिळू नये, यासाठी सर्व गोष्टी शासन पडताळून पहाणार आहे.

महाराष्ट्रात खासदारनिधीच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्षाची निर्मिती

याचाच अर्थ इतकी वर्षे खासदारनिधीचा विनियोग अयोग्य प्रकारे होत होता 
आणि त्यावर शासनाचे कोणतेच नियंत्रण नव्हते, असा घ्यायचा का ?
    मुंबई, १८ नोव्हेंबर - स्थानिक नागरिकांच्या आवश्यकतेनुसार खासदारांना मतदारसंघात विविध विकासकामे करण्यासाठी प्रतिवर्षी ५ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीमध्ये वेळोवेळी वाढही करण्यात येते. या वाढीव निधीमुळे लोकोपयोगी कामांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे या योजनेची प्रभावी कार्यवाही आणि त्यावर नियंत्रण करण्यासाठी केंद्रशासनाच्या शिफारसीनुसार राज्यात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे. त्यासाठी तात्पुरती ४ पदे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Christmaske avsarpar Telangana shasan karodo 
rupaye kharch kar 2 lakh christiyonko kapde bategi ! 
  Nidharmivadka danka bajanevalonka ispar akshep kyo nahi ? 

जागो ! : 
ख्रिसमस के अवसर पर तेलंगण शासन करोडो
 रुपये खर्च कर २ लाख ख्रिस्तीयों को कपडे बाटेगी ! 
 निधर्मिवाद का डंका बजानेवालों का इस पर आक्षेप क्यों नही ?

दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आवाजामुळे पुणे शहरातील ध्वनीप्रदूषणामध्ये वाढ

आता कुठे आहेत तथाकथित पर्यावरणवादी ? फटाक्यांमुळे 
ध्वनीप्रदूषण वाढत असल्यामुळे शासनाने त्यावर बंदी घालावी, ही अपेक्षा !
पुणे, १८ नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून दिवाळीतील श्री लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या तीन दिवशी शहरातील १४ भागांमधील आवाजाच्या पातळीची पाहणी करण्यात आली. गेल्या काही वर्षांत फटाके उडवण्याचे प्रमाण अल्प जरी झाले असले, तरी फटाक्यांचा आवाज वाढून ध्वनीप्रदूषण वाढल्याचे महामंडळाच्या अहवालावरून दिसत आहे.

मुलांमध्ये लहान वयातच हिंसाचारी वृत्ती का निर्माण होते ?

आजच्या बालपिढीच्या सुसंस्कारांवरच उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य असेल !
     लहान मुलांच्या हिंसक कारवायांची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत; परंतु स्वतः आत्महत्या करणे किंवा कुणाची हत्या करणे, याची बिजे कळत-नकळत घर, शाळा आणि आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतही अनेकदा दडलेली असतात. तेव्हा या अजाण जिवांना समजून घेणारा अवकाश घर आणि शाळा यांमध्येच मिळायला हवा ! शिक्षणाचे दायित्व मुलांना लिहिते-वाचते करण्यापलीकडेही असते. एक उत्तरदायी नागरिक बनवणे, जगामध्ये रहाण्यासाठी योग्य बनवणे, हेही शिक्षणाचे सर्वमान्य ध्येय आहे. शाळांमधून मुलांच्या मनातील दायित्वाची जाणीव जोपासण्याचे काम कुटुंबांच्या सहकार्याने झाले पाहिजे. घर आणि शाळा ही मुलांवर सुसंस्कार करणारी महत्त्वाची माध्यमे आहेत. गैरवर्तणूक घडल्यानंतरच्या प्रयत्नांपेक्षा गैरवर्तन घडू नये, यासाठी प्रयत्न करणेे महत्त्वाचे आहे. वैयक्तिक समुपदेशनापलीकडे सामूहिक समुपदेशन आणि व्यवहारज्ञान यांकडे शाळांनी लक्ष देणे आवश्यक आहे. चांगल्या वागण्याविषयी बौद्धिक, शपथा, आणाभाका, भावनिकता या बाळबोध प्रयत्नांच्या पुढे शास्त्रशुद्ध मार्गांनी जाणे अपेक्षित आहे.

उपनगरीय रेल्वेच्या दरात वाढ

मुंबई - रेल्वे प्रवाशांना आता उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी (लोकल) अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वेने न्यूनतम तिकीट ५ रुपयांवरून थेट १० रुपये केले आहे. केवळ दुसर्‍या वर्गासाठीच्या तिकिटांसाठी ही तिकीटवाढ असेल. २० नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशी याविषयी नाखुष आहेत.

इंटरनेटच्या जगातील आय.एस्.आय.एस्.चे नाव पुसून टाकण्याचे ध्येय !

हॅकर्स ग्रुप अ‍ॅनॉनिमसची आय.एस्.आय.एस्. विरुद्ध सायबर युद्धाची घोषणा
देहली, १८ नोव्हेंबर - आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना जगभरात नवे सदस्य जोडणे आणि युवकांमध्ये संघटनेविषयी ओढ निर्माण करणे, यांसाठी हिंसक ध्वनीचित्रफिती आणि छायाचित्रे यांचा इंटरनेटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर वापर करते. त्यासाठी प्रामुख्याने ट्विटर आणि यू ट्यूब या सामाजिक संकेतस्थळांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या संघटनेचे इंटरनेटच्या जगातील नाव पुसून टाकण्याचे ध्येय ठेवल्याचे अ‍ॅनोनिमस या मान्यताप्राप्त हॅकर्स समुहाने स्पष्ट केले आहे. इंटरनेट हे या आतंकवादी संघटनेसाठी तिच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. आता याच माध्यमातून आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात युद्ध पुकारले असल्याची, तसेच या संघटनेला इंटरनेट जगतातून उखडून फेकण्याची घोषणा अ‍ॅनोनिमस या जगप्रसिद्ध हॅकर्स संघटनेने केली आहे.
संदर्भ - माझा पेपर

पाश्‍चात्त्य राष्ट्रांत दूरचित्रवाणीमुळे निर्माण झालेली भयावह स्थिती !

१. दूरचित्रवाणी हे तरुण पिढीत अनैतिक लैंगिक व्यवहाराचे लोण 
जलद गतीने वाढवणारे माध्यम ठरणे
     पाश्‍चात्त्य राष्ट्रांत दूरचित्रवाणीमुळे एवढी भयावह स्थिती निर्माण झाली आहे की, माणसाची नीतीमत्ता, बुद्धीमत्ता, शहाणपण, समजूतदारपणा, शिस्त सारे संपुष्टात येत आहे, अशी साधार भीती वाटत आहे. दूरचित्रवाणी हे प्रचाराचे, शिक्षणाचे जेवढे प्रभावी साधन आहे, त्यापेक्षाही भयानक हिंसाचार, मद्यपिपासा, कामवासना, निरर्थक जडवाद घराघरांतून, समाजातून जलद गतीने वाढवणारे माध्यम ठरत आहे. अनैतिक लैंगिक व्यवहाराचे लोण तर त्यांनी तरुण पिढीत एवढे सोडले आहे की, शासनाने शीघ्र नोंद घेतली नाही, तर वाढती गुन्हेगारी कुणालाही बंद करता येणार नाही.

राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढणारा अवघ्या १६ वर्षांचा आदर्श वीर अभिमन्यू !

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांचे महायुद्ध चालू होते. द्रोणाचार्य कौरव सैन्याचे सेनापती होते. त्यांनी सैन्याची रचना चक्रव्यूह पद्धतीने केली होती. चक्रव्यूह भेदण्याची कला तिघांनाच ज्ञात होती. श्रीकृष्ण, अर्जुन आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. अर्जुन त्या दिवशी दुसरीकडे युद्धात गुंतला होता. श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता; म्हणून तो अर्जुनासह होता. युधिष्ठिरासमोर मोठा पेच होता, चक्रव्यूह फोडला पाहिजे. कौरवांचा पराभव केला पाहिजे आणि अभिमन्यूविना चक्रव्यूह फोडणारा दुसरा कोणी तेथे नव्हता; पण अभिमन्यू हा अवघा १६ वर्षांचा कुमार होता. त्याला पाठवणे योग्य होईल काय ? युधिष्ठिराने त्याला आशीर्वाद दिला. अभिमन्यू गदा, धनुष्यबाण घेऊन कौरवांच्या सैन्यावर तुटून पडला. त्याने अनेक विरांना ठार केले. अखेर चक्रव्यूह फोडून तो आत घुसला; परंतु त्याच्या मागोमाग इतर पांडव सैनिक जाऊ शकले नाहीत.

अमेरिका-पाकिस्तान, चीन-पाकिस्तान यांच्यात भारतद्वेषातून मैत्री आणि भारतावर दादागिरी !

संरक्षणसिद्धतेत शस्त्रास्त्रांना अतिशय महत्त्व द्यावे, संरक्षणाविषयी कोणतीही तडजोड होता कामा नये, 
याचे प्रतिबिंब म्हणजे १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि त्यातील भारताचा दणदणीत विजय !
     संरक्षणसिद्धतेत शस्त्रास्त्रांना अतिशय महत्त्व असते. वर्ष १९६२ च्या पराभवाने भारताला हा धडा दिला. त्या धड्यामुळे शस्त्रास्त्रांना न्यून लेखणे बंद झाले आणि भारताची सार्वभौमता टिकवायची अन् शत्रूराष्ट्रांना खणखणीत उत्तर द्यायचे, तर संरक्षणाविषयी कोणतीही तडजोड होता कामा नये, हे सर्वांनाच पटले. त्याचे प्रतिबिंब वर्ष १९७१ च्या युद्धात पडले आणि भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून दणदणीत विजय मिळवला

चित्रपटसृष्टीमागील वासनांधता

   सध्याच्या काळात चित्रपटांतील अभिनेत्रींप्रमाणे आपणही चित्रपटांत काम करून जगप्रसिद्धी मिळवावी, अशी सुप्त इच्छा अनेक मुलींच्या मनात असते. त्यासाठी केवळ व्यासपिठाची आवश्यकता असते. मुलींची नेमकी हीच इच्छा जाणून काही वासनांध त्यांना चित्रपटात काम करण्याचे आमिष दाखवतात. येथे वासनांध अशासाठी कारण मुंबईतील एका १५ वर्षीय कोवळ्या मुलीला अशा प्रकारचे खोटे आमिष दाखवून गुजरातला नेण्यात आले आणि तिला तेथे सामूहिक बलात्काराला सामोरे जावे लागले. तिने नकार दिल्याने तिला गोळी देऊन बेशुद्ध करण्यात आले. दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आल्यावर तिला तिच्यावर झालेल्या अत्याचारांचे चित्रीकरण (व्हिडिओ क्लिप) दाखवून पैशांसाठी धमकावले आणि ७० सहस्र रुपये अन् दागिने बळकावण्यात आले. एका क्षणात चित्रपटात काम करण्याच्या स्वप्नांचा चुराडा आणि झाली ती शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फसवणूक ! यात त्या निष्पाप आणि कोवळ्या वयातील मुलीची चूक काय ? तर ती चित्रपटात काम करण्याच्या आमिषाला सिद्ध झाली ! 

हिंदूंनो, टिपूची जयंती साजरी करणारे आणि त्याचाच आदर्श समोर ठेवून कृती करणारे कर्नाटक राज्याचे काँग्रेस शासन !

श्री. चेतन हरिहर
    हिंदूूंनो, असा एक मुसलमान क्रूर राजा ज्याने लाखो हिंदूंना मारलेले आहे, कित्येक देवळे पाडून मशिदी निर्माण केल्या आहेत, तर कित्येक देवळे पूर्णपणे नष्ट करून टाकली आहेत. इतकेच नव्हे, तर त्याने कित्येक हिंदूंचे बळाने धर्मांतर केले आहे. हे आपल्याला ठाऊकच आहे; पण टिपूच्या वंशजांनी या सर्व गोष्टी लपवून केवळ त्याने इंग्रजांसमवेत युद्ध केले असे सांगून त्याचे शेर-ए-म्हैसूर अशा प्रकारे उदात्तीकरण केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कर्नाटकचे मुख्यमंत्री अशा हिंदूद्वेषी सुलतानाची जयंती साजरी करत आहे, हे एक प्रकारे लज्जास्पद आहे. मुख्यमंत्री स्वतः हिंदु असूनसुद्धा असे करतात; म्हणजे एक प्रकारे बुद्धी भ्रष्ट झाली असेल, असे आपण म्हणू शकतो. हा तर आता आरंभ आहे, आपण आताच जागे झालो नाही किंवा त्याच्या विरोधात कृती केली नाही, तर पुढच्या काळात काय होऊ शकते, याचे भयानक चित्र मी तुमच्यासमोर ठेवत आहे.

गोमातेची सेवा, गोपालन आणि गोसंरक्षण करणारा राज्यकर्ता हवा !

गोपाष्टमीनिमित्त...
श्री. श्रीकांत भट
    कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी होय. या दिवसाला गोपाष्टमी असेही म्हणतात. आजच्या तिथीचे महत्त्व वेगळेच असते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने गायी चरण्यासाठी वनात नेण्यास प्रारंभ केला होता. म्हणून ही गोपाष्टमी आम्हा हिंदु धर्मियांसाठी महत्त्वपूर्ण ठरते. सर्व विश्‍वाची माता असणार्‍या गोमातांचे रक्षण, गोसंगोपन आणि गोसंवर्धन करण्याचा संकल्प सर्व हिंदूंनी करून गोमातेचे आशीर्वाद घेण्याचा हा दिवस !
गोमातेचा होणारा अपमान हे देशाच्या अधोगतीचे कारण !
     सुजलाम् सुफलाम् असणार्‍या आणि एकेकाळी सोन्याचा धूर निघत असणार्‍या आमच्या भारतमातेची अधोगती होण्याचे मुख्य कारण आहे, भारतात नियमित होणारा गोमातेचा अपमान. जोपर्यंत भारतभूमीवर गोमातेचे रक्त सांडत राहील, तोपर्यंत भारताचा उत्कर्ष होणे शक्यच नाही; म्हणून राज्यकर्त्यांनो आता तरी डोळे उघडा ! भारत पुन्हा महासत्ता, बलशाली, सुसंपन्न आणि सुसंस्कारीत व्हावा असे वाटत असेल, तर सर्वांनी मिळून संघटितपणे गोमातेची सेवा करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

ब्रिटिशांनी बुडवलेल्या अनौपचारिक शिक्षणपद्धतीचे पुनरुरज्जीवन झाल्यास भारत देश जगासमोर आदर्श राहील !

      आमची प्राचीन आचार्य कुलाची शिक्षणव्यवस्था नष्ट करून ब्रिटिशांनी आम्हाला बौद्धिक गुलामगिरीत जखडून ठेवले. बहुजन समाजाच्या अडाणीपणाची नेहमीकरता दूरव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे देशाचा विलक्षण शक्तीक्षय झाला. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रच्छन्न, अप्रच्छन्न ब्राह्मणद्वेषाला विलक्षण उत्तेजन मिळाले आणि ब्राह्मण अपराधगंडाने पछाडला. इंग्रजी छायेच्या ब्राह्मणांच्या मनात ब्राह्मण्याविषयी तिटकारा निर्माण झाला. आधुनिक ब्राह्मण समाज प्रमाणाबाहेर पाश्‍चात्त्य विद्यांच्या मागे लागला. खरे सांगायचे, तर ब्राह्मण वर्ग अडाणी राहिला असता, तर देशाची जी विलक्षण सांस्कृतिक हानी झाली, ती झाली नसती.

स्वामी विवेकानंदाचे तेजस्वी विचार !

१. निधर्मी राजनीती नव्हे, धर्म हाच भारताचा प्राण आहे ! 
     स्वामी विवेकानंद यांनी शंभर वर्षांपूर्वी बजावले होते की, राजनीती नव्हे, तर धर्म हाच या देशाचा प्राण आहे; त्याला सोडाल, तर या राष्ट्राला कोणीही वाचवू शकणार नाही आणि त्याला घट्ट पकडून रहाल, तर कोणीही या राष्ट्रच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही.
२. भारत ही अध्यात्माची भूमी असल्याने भारतीय पाश्‍चात्त्यांच्या तुलनेतच समाधानी असणे 
     भारत ही अध्यात्माची भूमी आहे. येथील दरिद्री लोकांच्या मुखावर दिसणारे समाधान पश्‍चिमेतील श्रीमंतांच्या जीवनात दिसत नाही.

शत्रूराष्ट्र युद्धनीती म्हणून करत असलेल्या चर्चेच्या गुर्‍हाळात न अडकता आपला भारताने सुरक्षित ठेेवण्यासाठी सर्व उपाय कार्यवाहीत करावेत !

      वर्ल्ड ट्रेड सेंटरवर इस्लामी आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यानंतर, अमेरिकेने तात्काळ सैनिकी कारवाईने अफगाणिस्तान बेचिराख केला. भारताने पाकिस्तानी आतंकवादी शक्तीवर प्रतिआक्रमण करू नये; म्हणून पाक त्याला चर्चेच्या गुर्‍हाळात अडकवत आहे. तिबेटचा घास गिळून पचवल्यावर, चीनही भारताला चर्चेची अफू घेण्यास सांगत आहे. अमेरिका आणि चीन वेगवेगळ्या कारणांसाठी पाकिस्तानला सर्व प्रकारे साहाय्य करत आले आहेत. हेतू एकच, त्या देशांचा मित्र असलेल्या, त्या देशांना उपयुक्त ठरणार्‍या पाकिस्तानला हिंदुस्थानी प्रत्याघातापासून वाचवणे. त्यासाठी चर्चेच्या गुर्‍हाळात भारताला अडकवून, भारताची प्रत्याघाताची नीती संपवणे, हाच एकमेव हेतू आहे; म्हणून भारताने चर्चेच्या मृगजळामागे न लागता, आपला हिंदुस्थान सुरक्षित ठेेवण्यासाठी सर्व उपाय कार्यवाहीत आणावेत. - विक्रम सावरकर, (संदर्भ : प्रज्वलंत, २६ जानेवारी विशेषांक २००२)

रत्नागिरीतील सौ. अनुपमा परांजपे आणि श्री. प्रभाकर सुपल अन् लोटे (खेड) येथील श्री. ज्ञानदेव पाटील यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

डावीकडून सौ. अनुपमा परांजपे, पू. जयराम जोशीआजोबा (यांनी सर्वांचा 
सत्कार केला ) श्री. प्रभाकर सुपल आणि श्री. ज्ञानदेव पाटील
     रत्नागिरी - येथील दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात सनातनचे पू. जयराम जोशीआजोबा यांच्यासमवेत झालेल्या साधकांच्या नामजपाच्या सत्रानंतर ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रत्नागिरी जिल्हासेविका कु. दीपाली मतकर यांनी सर्व साधकांना आनंदवार्ता दिली. रत्नागिरीतील सौ. अनुपमा परांजपे आणि श्री. प्रभाकर सुपल, तर लोटे (खेड) येथील श्री. ज्ञानदेव पाटील यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले आहेत, असे कु. दीपाली मतकर यांनी घोषित केल्यानंतर सर्व साधकांना भगवंत कृपेची प्रचीती मिळाली.

तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणारे श्री. ज्ञानदेव पाटील (वय ५५ वर्षे) !

१. सेवेची तळमळ
अ. श्री. ज्ञानदेव पाटीलकाका (वय ५५ वर्षे) हे गेल्या २० वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यांच्याकडे चिपळूण विभागाची दैनिक सनातन प्रभात आणि प्रसार यांची सेवा असून ते पुष्कळ तळमळीने सेवा करतात. कुणाची सेवा करण्याची सिद्धता नसल्यास ते त्याला सेवा करण्यासाठी उद्युक्त करतात. गुरु आपल्यावर इतकी कृपा करत आहेत, तर आपण न्यून पडायला नको, असे ते सांगतात.
आ. काका बर्‍याचदा नोकरीवर रात्रपाळी करूनही दिवसभर सेवेला वेळ देतात.

शारीरिक त्रासावर मात करून परिपूर्ण सेवा करणार्‍या सौ. अनुपमा परांजपे (वय ७२ वर्षे) !

      रत्नागिरी येथील सौ. अनुपमा चिदंबर परांजपे आणि त्यांचे पती यांनी प.पू. कलावतीआईंकडून अनुग्रह घेतला आहे. मागील २ वर्षांपासून सौ. अनुपमा परांजपे सनातनच्या संपर्कात आहेत. त्यांचा उजवा हात काही कारणाने दुखावला आहे. त्यामुळे त्यांची कामाची गती अल्प असते; पण या अडचणीवर मात करून त्या घरातील सर्व कामे आणि सेवा करतात.

नामजप करत असलेल्या ठिकाणी पिवळा रंग दिसणे

(पू.) सौ. मालिनी  देसाई
     एके दिवशी सकाळपासून काहीतरी वाईट घडणार आहे, असे वाटून मनाला दुःख होत होते. त्यानंतर दुपारी रामनाथी आश्रमातील एका साधिकेने एक नामजप करण्याचा निरोप दिला. तेव्हापासून लगेचच मनाला चांगले वाटू लागले. खोलीत ज्या ठिकाणी बसून आम्ही दोघे जप करत होतो, तेथे पूर्ण पिवळा प्रकाश दिसत होता.

व्यष्टी आणि समष्टी साधनेनुसार देवघरातील देवांची संख्या

परात्पर गुरु डॉ. आठवले
     व्यष्टी साधनेत साधक अनेक देवांकडून एका देवाकडे येतो, तर समष्टी साधनेत अनेक देव साहाय्य करतात; म्हणून कार्यानुमेय अनेक संतांनी दिलेल्या देवतांच्या मूर्ती आणि वस्तू माझ्या खोलीतील देवघरात आणि आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवल्या आहेत. देवतांच्या हातातही अनेक आयुधे असतात. तसेच हे आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१०.२०१५)


स्थिर, विनम्र आणि अंगभूत सेवावृत्तीमुळे सार्‍यांना साहाय्य करण्यास सदैव तत्पर असलेले कन्याकुमारी येथील श्री. त्यागराजन् (वय ५२ वर्षे) यांनी प्राप्त केला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

श्री. त्यागराजन्जी
     ९.४.२०१५ या दिवशी कन्याकुमारी जिल्ह्यातील थिकननकोडू नावाच्या छोट्याशा गावात पहिल्यांदाच हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेथील प्रखर धर्माभिमानी श्री. त्यागराजन्जी (५२ वर्षे) यांची तीव्र तळमळ आणि त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न यांमुळे ही सभा यशस्वीरित्या पार पडली. सभेच्या कालावधीत सेवेत सहभागी असलेल्या चेन्नई येथील सर्व साधकांना श्री. त्यागराजन्जी यांच्यातील अनेक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

उतारवयातही झोकून देऊन सेवा करणारे रत्नागिरी येथील श्री. प्रभाकर सुपल (वय ६६ वर्षे) !

     रत्नागिरी येथील सनातनचे साधक श्री. प्रभाकर सुपलकाका (वय ६६ वर्षे) मागील १७ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते झोकून देऊन सेवा करतात. त्यांच्याकडे सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचा जिल्हा साठा आहे.

सायंकाळचा सुंदर प्रकाश पाहून चि. मुकुलला पुष्कळ आनंद होणे आणि सर्व साधकांना त्या वातावरणाचा अनुभव घेण्यास सांगितल्यावर मुकुलला देवाचे विचार ग्रहण करता आल्याचे ध्यानी येणे

चि. मुकुल प्रभू
     २७.९.२०१५ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता आम्ही खोलीबाहेर आलो. तेव्हा बाहेर पुष्कळ छान प्रकाश पडला होता. तो प्रकाश पाहिल्यानंतर मुकुलला (वय ४ वर्षे) पुष्कळ आनंद झाला. तो म्हणाला, आई, किती सुंदर प्रकाश आहे. एका संतांनी पहायला सांगितले आहे. नंतर १० मिनिटांनी आश्रमात उद्घोषणा करण्यात आली की, साधकांनी बाहेरील वातावरण पाहून घ्यावे. त्या वेळी जाणवले की, मुकुलने देवाचेच विचार ग्रहण केले होते.

साधनेची तळमळ आणि देवावर श्रद्धा असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. सुप्रिया माथूर !

सौ. सुप्रिया माथूर
१. वेळेचे गांभीर्य असणे
      सुप्रियाताईला अनेक शारीरिक त्रास असूनही ती सतत सेवा करत असते. सेवा झाल्यावरही विश्रांती न घेता ती स्वतःचा नामजप पूर्ण करण्याला प्राधान्य देते.
२. साधनेची तळमळ
     ताईला तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्यातही आपण कशी तळमळीने साधना करू शकतो ?, असा प्रयत्न ती करत असते. त्या आध्यात्मिक स्तरावरच्या त्रासावर मात करते ती केवळ त्या तळमळीमुळेच !
३. तत्त्वनिष्ठता
     ताई इतरांच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगते.

ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी बालसाधिका कु. मनुश्री साने (वय ११ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

१. आरतीच्या वेळी ध्यानमंदिरातील देवता डोक्यावरून हात फिरवत असून
 शरिरातील त्रासदायक शक्ती नष्ट होत असल्याचे जाणवणे
 
 कु. मनुश्री साने
    २७.७.२०१५ या दिवशी सायंकाळी ध्यानमंदिरात आरती चालू असतांना माझ्या मनात विचार आला, श्रीरामबाप्पा, हनुमान, दुर्गादेवी, श्रीकृष्ण या सर्व देवता माझ्या डोक्यावर हात फिरवत आहेत आणि माझ्यातील त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे. नंतर प.पू. भक्तराज महाराजांची आरती चालू झाली. तेव्हा सगळे देव प.पू. भक्तराज महाराजांमध्ये विलीन झाले आहेत. प.पू. महाराज माझ्या डोक्यावर हात फिरवून माझे लाड करत आहेत,

यजमानांच्या आजारपणात ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून कठीण प्रसंगावर मात करणार्‍या पणजी येथील सौ. शीला अशोक नाईक !

  
सौ. शीला अशोक नाईक
   कुटुंबात कोणी आजारी असल्यास त्याची सेवा कशी करायची आणि तेव्हा आपला दृष्टीकोन कसा असला पाहिजे, याचा आदर्श सौ. शीला अशोक नाईक यांनी सर्वांपुढे ठेवला आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले      माझे यजमान श्री. अशोक नाईक हे गेल्या १५ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. प्रारंभी ते नामजप करत असत आणि सत्संगात जात असत. नंतर ते चिंबल येथे दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभातचे वितरण करायचे. गुरुपौर्णिमेची प्रसाराची सेवा करणे इत्यादी सेवा ते मनापासून साधना म्हणून करत.
     गेल्या ३ वर्षांपासून त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे.

भावाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजल्यावर गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने त्या प्रसंगात स्थिर रहाता येणे आणि भावाचे सर्व विधी व्यवस्थित पार पडणे

     १६.३.२०१५ या दिवशी मला दूरभाषवरून माझ्या लहान भावाचा (श्री. शैलेश तानाजी गोरे, वय १९ वर्षे) अपघात झाल्याचे समजले. त्यानंतर मी लगेच धाराशिव येथे घरी गेलो. घरी पोचल्यावर अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. त्या वेळी माझी गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांना सतत प्रार्थना होत होती. त्यामुळे या कठीण प्रसंगातही मला स्थिर रहाता आले आणि तेथील तामसिक वातावरणाचाही मला त्रास झाला नाही. तसेच त्या १० दिवसांत प्रतिदिन घरातील सर्व नातेवाइकांकडून श्री गुरुदेव दत्त हा नामजप होत होता. सर्व विधी व्यवस्थित पार पडले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
साम्यवादाची निरर्थकता !
'सर्वांना एकवेळ सारखे पैसे देता येतील; पण शारीरिक प्रकृती, स्वभाव, बुद्धीमत्ता इत्यादी सर्वांना समान देता येईल का ? असे आहे, तर 'साम्यवाद', या शब्दात काही अर्थ आहे का ?' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०१५)

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मानवी जन्म पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतो; म्हणून जीवनात सुविचाराची साथ ठेवून जन्माचे सार्थक करावे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान 
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको 
रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं । 
भावार्थ : 'आनेवालेको कहना नहीं' मधे 'कहना' हे 'विचारणे' या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला 'तू जन्माला का आलास ?' असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. 'जानेवालेको', म्हणजे मृत्यू पावणार्‍याला 'रोकना नहीं', म्हणजे आपण थांबवू शकत नाही. 'पूछे बिगर रहना नहीं', म्हणजे 'तू खरोखर कोण आहेस ?' हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

पाकची निषेधार्ह नीती !

काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी सार्वमत हाच एकमेव पर्याय आहे, असे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणतात. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्या असिया अद्राबी यांना लिहिलेल्या पत्रात शरीफ यांनी हा उल्लेख केला आहे. अर्थात् त्याला काही अर्थ नाही. पाकचे हे तुणतुणे वर्ष १९४७ च्या फाळणीपासून चालू आहे. काश्मीरचे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी तत्कालीन संस्थानिक राजा हरिसिंह यांनी विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केली होती, या वास्तवाकडे पाकने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. भारताच्या कोणत्याच प्रस्तावाला किंवा विनंतीला सकारात्मक प्रतिसाद न देणे, हे पाकचे आजपर्यंतचे धोरण जगाला ठाऊक आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याच्या सूत्रावर पाक ठाम असण्याचे कारण उघड आहे. आज काश्मीरमध्ये हिंदू नावालाही नाहीत. त्याचा पद्धतशीर आरंभ वर्ष १९८९च्या अखेरीस राज्यातील सर्व हिंदूंना राज्याबाहेर हाकलून देण्यापासून झाला.

एक भोंगळ मागणी !

  गोव्यातील दाबोळी विमानतळाला सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे नाव दिले जावे, अशी मागणी गोवा कन्नड महासंघाने केली आहे. महासंघाच्या नावावरून तो शेजारच्या कर्नाटक राज्यातून स्थलांतरित झालेल्या किंवा तिकडून आलेल्या कन्नड भाषिकांचा संघ असावा, अशी अटकळ बांधता येते. गोव्यात राहूनही गोव्याचा इतिहास ठाऊक नसणे किंवा इतिहासाचे विकृतीकरण करणे, या दोन गोष्टींपैकी एका गोष्टींमुळे महासंघाच्या तोंडून असे काहीतरी अभद्र वदले गेले. काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील विमानतळाला टिपू सुलतानाचे नाव देण्याची मागणी पुढे रेटली गेली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn