Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !आज नरकचतुर्दशी

(म्हणे) भारताकडून नेपाळचा भाग लाटण्याचा डाव !

नेपाळचे साम्यवादी उपपंतप्रधान मैनाली यांचा भारतावर गंभीर आरोप !
      काठमांडू (नेपाळ) - नेपाळच्या हद्दीत असलेल्या सखल भागावर नियंत्रण घेण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप नेपाळचे उपपंतप्रधान सी.पी. मैनाली यांनी केला आहे. (नेपाळच्या साम्यवादी शासनाची मुजोरी ! आजवर नेपाळच्या एकाही शासनाने असा आरोप केलेला नाही. साम्यवादी शासन सत्तेवर आल्यावरच असा कांगावा केला जात आहे. यावरून नेपाळच्या साम्यवादी शासनाचा बोलाविता धनी कोण, हे भारतीय राज्यकर्त्यांनी जाणून घ्यायला हवे ! - संपादक) ते पुढे म्हणाले, मधेशी लोकांना (नेपाळच्या दक्षिण भागातील मैदानी प्रदेशात रहाणारे लोक) नेपाळमध्ये आतापर्यंत सर्वाधिक हक्क मिळाले आहेत.

हिंदुत्वच भाजपला विजय मिळवून देईल !

बिहारच्या निकालानंतर डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा भाजपला सल्ला
    नवी देहली - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभवाची नामुष्की सहन करावी लागल्यावर देशात चोहोबाजूंनी भाजपवर टीका होत आहे. भाजपला नेमक्या कुठल्या कारणांमुळे पराभव सहन करावा लागला, याचा उहापोह सध्या सर्वत्र चालू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सांगितले की, हिंदुत्वाचे सूत्रच भाजपला पुन्हा विजय मिळवून देऊ शकते.
     डॉ. स्वामी यांनी या उनषंगाने काही ट्विट्सही केले.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या कारावासाला सोनिया गांधी कारणीभूत ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

      जोधपूर (राजस्थान) - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर लावलेले सर्व आरोप निराधार आहेत. हे संपूर्ण प्रकरणच फोल आहे. काही काळानंतर हे सत्य समाजासमोर येणारच आहे आणि न्यायालयातही ते सिद्ध होईल. बापू गुजरात राज्यात घरवापसीच्या कार्यक्रमांद्वारे आमिषांना बळी पडून धर्मांतर केलेल्यांचे शुद्धीकरण करायचे. यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांना पोटशूळ उठला. त्यांनी सोनिया गांधींना गळ घातली आणि गांधींच्या आदेशावरून या खोट्या प्रकरणात बापूंना गोवण्यात आले आहे,

अग्नि-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

     नवी देहली - लाँग रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-४ ची ओडिशा येथील समुद्रकिनार्‍यावर चाचणी घेण्यात आली. या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची क्षमता ४ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करण्याची

(म्हणे) काँग्रेस संघाला केवळ पराजित करणार नाही, तर नेस्तनाबूत करील !

जनतेने घरी बसवलेल्या काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा भ्रम
      नवी देहली - बिहार निवडणुकीत भाजपच्या पराजयानंतर उकळ्या फुटलेल्या काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. ते म्हणाले, हा तर आरंभ आहे. हा पराभव संघ आणि भाजप यांच्या समाजात फूट पाडण्याच्या कार्यक्रमाचाच परिणाम आहे. काँग्रेस पक्ष संघाला केवळ पराजित करणार नाही, तर संपूर्ण नेस्तनाबूत करील.

सनातनवर बंदी आणणे अयोग्य ! - गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

सनातन संस्थेवर नाहक बंदीची मागणी करून तिची अपकीर्ती 
करणारे धर्मद्रोही आणि पुरोगामी (अधोगामी) हे जाणतील का ?
      पंढरपूर - गोव्यामध्ये सनातन संस्थेचा मुख्य आश्रम असून आम्हाला आजपर्यंत तेथे कोणतेही आक्षेपार्ह कार्य आढळून आलेलेे नाही. कोणा एका व्यक्तीच्या चुकीसाठी संपूर्ण संस्थेवर बंदी आणणे योग्य नाही, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवला. भाजपची सत्ता असलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेऊन १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त श्री. पार्सेकर यांनी कुटुंबियांसमवेत विठोबा-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

तमिळनाडू समुद्रकिनार्‍यावर रोआनु वादळाचे सावट

      चेन्नई - येथील समुद्रकिनार्‍याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तमिळनाडूच्या समुद्रकिनार्‍यावर २४ घंट्यांच्या आत रोआनु हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांच्या किनार्‍यालगत ढगांची दाटी झाली असून, जोरदार वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर समुद्रात अतिउंच लाटा उसळणार असल्याने किनारी भागात सतर्क रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

धर्मनिरपेक्षता टिकवणे, हे केवळ हिंदूंचेच दायित्व नाही ! - शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज

देहली येथील तृतीय हिंदु संसद
तृतीय हिंदु संसदेत उपस्थित संत-महंत आणि हिंदुत्ववादी
     नवी देहली - देशात धर्मनिरपेक्ष, सहिष्णुतेचे वातावरण टिकवून ठेवणे हे केवळ हिंदूंचे दायित्व आहे, या भ्रमात कुणीही राहू नये. देशात रहाणार्‍या सर्व धर्मांच्या नागरिकांनी हे दायित्व स्वीकारायला हवे. हिंदूंनी सहिष्णु रहायचे आणि अन्य धर्मियांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करायचे, हे आता चालणार नाही. हिंदु समाज असहिष्णु झाल्याचा कांगावा करणार्‍यांनी हे समजून घ्यावे की, ज्या दिवशी हिंदु समाज खरोखर असहिष्णु होईल, त्या दिवशी सर्वांचेच अस्तित्व धोक्यात येईल, असे ठाम प्रतिपादन शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी केले.

कुवैतमध्ये सत्यनारायणाची पूजा करणार्‍या ११ भारतियांना अटक

      कुवैत - येथील एका सभागृहात सत्यनारायणाची पूजा केल्याच्या कारणावरून येथील पोलिसांनी ११ भारतीय हिंदूंना अटक केली. अटक केलेले सर्व जण हे कर्नाटक राज्याचे रहिवासी आहेत. या सर्वांना अटक होऊन १५ दिवसांहून अधिक काळ लोटला असून तेथील अधिकारी भारतीय दूतावासाला कोणत्याही प्रकारे साहाय्य करत नसल्याचे कर्नाटकातील उडुप्पी-चिकमंगळुरू मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे यांनी सांगितले.

चेहरा उजळवण्याचा दावा करणार्‍या एका भारतीय आस्थापनाला १५ लक्ष रुपयांचा दंड

जनतेला खोटे दावे करून फसवणारी आस्थापने !
     देहली, ९ नोव्हेंबर - चेहरा उजळवण्याची क्रीम सिद्ध करणार्‍या एका भारतीय आस्थापनाने ४ आठवड्यांत चेहर्‍याचा रंग गोरा होण्याचा दावा केला होता. हा दावा खोटा ठरल्यामुळे एका २० वर्षीय युवकाने त्या आस्थापनाच्या विरोधात ३ वर्षांपूर्वी ग्राहक न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय देतांना त्या आस्थापनाला फसवणूक केल्याप्रकरणी १५ लक्ष रुपयांचा आर्थिक दंड सुनावला आहे. (खोटे दावे करून फसवणार्‍या आस्थापनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार्‍या युवकाचे अभिनंदन ! - संपादक)

चिनी फटाक्यांच्या आयातीमुळे देशी उद्योजकांना १ सहस्र कोटी रुपयांचा फटका

केवळ माहिती पुरवण्यापेक्षा अशा प्रकारे चिनी फटाके आयात करणार्‍यांवर कठोर कारवाई करा. 
अशा व्यावसायिकांची व्यवसाय करण्याची अनुज्ञप्ती रहित करा !
     लक्ष्मणपुरी (लखनौ), ९ नोव्हेंबर - देशाच्या आयात धोरणानुसार फटाके आयात करण्यावर बंदी आहे. चिनी फटाक्यांवर बंदी आणूनही त्यांची विक्री होत असल्यामुळे देशी फटाके बाजारपेठेस १ सहस्र कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती अ‍ॅसोचेमने (दि असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स) दिली आहे. (मुळात देशातील कोट्यवधी जनता अर्धपोटी जीवन जगत असतांना फटाक्यांवर कोट्यवधी रुपये उडवणे अयोग्य आहे. त्यामुळे विनाशकारी आणि वातावरण प्रदूषित करणार्‍या फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी घालायला हवी. त्यातही भारताला सतत पाण्यात पहाणार्‍या चीनच्या उत्पादकांचे फटाके विकत घेणे, म्हणजे एकप्रकारे शत्रूच्या आर्थिक भरभराटीस कारणीभूत ठरण्यासारखे आहे. चिनी फटाके घेणारे एकप्रकारे देशालाच धोका पोहोचवत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे ! - संपादक)

करदात्यांनी दूरध्वनी किंवा ई-मेल यांवरून वैयक्तिक माहिती पुरवू नये ! - आयकर खाते

      नवी देहली - भारतातील करदात्यांनी दूरध्वनी किंवा ई-मेल यांवरून वैयक्तिक माहिती पुरवू नये, अशी सूचना आयकर खात्याने केली आहे. कुणी अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याविषयी तक्रार नोंद करावी. आयकर परतावा अर्ज भरण्याचा कार्यकाळ नुकताच आटोपला असून अशा वेळी काही हॅकर्स आणि घोटाळेबाज करदात्यांकडून माहिती मिळवतात आणि त्या माहितीच्या आधारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडतात. आयकर खात्याकडून दूरध्वनी किंवा ई-मेल यांद्वारे करदात्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जात नाही. त्यामुळे कोणी अशी माहिती मागितली असल्यास ती देऊ नये, असे आयकर खात्याच्या अधिकार्‍याने सांगितले.

औषधांच्या मानवी चाचण्यांत गत ४ वर्षांत २ सहस्र २०९ व्यक्तींचा मृत्यू

यांना हत्या का म्हणू नये ? या सहस्रो व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत 
ठरलेल्या उत्तरदायींना कठोर शासन करा !
     इंदूर - विविध औषधनिर्मिती करणार्‍या उत्पादकांकडून नवीन औषधांची निर्मिती झाल्यावर ती बाजारात आणण्यापूर्वी त्यांची एकदा चाचणी घेण्यात येते. ही चाचणी प्राणी अथवा मानव यांच्यावर करण्यात येते. वर्ष २०११ ते ऑक्टोबर २०१५ पर्यंत अशा प्रकारे केलेल्या चाचण्यांत देशात २ सहस्र २०९ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली भारतीय औषध महासंचालनालयाच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. (यांना औषधनिर्मितीचे आस्थापन म्हणावे कि विषनिर्मितीचे ? सध्याच्या आधुनिक युगात औषधातून माणूस दगावू शकतो, हे चाचणी करण्यापूर्वीच का लक्षात येत नाही ? यातून कोणताही अपाय न करणार्‍या आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येते ! - संपादक)

बिहार निवडणुकीविषयी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेला अंदाज (एक्झिट पोल) १०० टक्के चुकला !

ही आहे वृत्तवाहिन्यांची (अ)विश्‍वासार्हता !
     बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआला) २४३ पैकी १२०, तर राजद-जनता दल महाआघाडीला ११५ मिळतील, असा अंदाज (एक्झिट पोल) बहुतांश वृत्तवाहिन्यांनी निवडणूक निकालापूर्वी वर्तवला होता; मात्र प्रत्यक्षात जनता दल महाआघाडीने १७८ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले,

नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगीदेवीचे मंदिर १ मास बंद ठेवण्याचा प्रस्ताव

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या संदर्भात असा विचार
 करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग धजावला असता का ?
      नाशिक - साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील सप्तशृंगीदेवीचे मंदिर गडावरून दरडी कोसळण्यापासून रोखण्यासाठी करावयाच्या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देवी संस्थान, ग्रामपंचायत आणि तहसीलदार कार्यालय यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

काळ्या पैशांविषयी दिलेल्या माहितीचा केंद्रशासनाने पूर्ण उपयोग करून घेतला नाही ! - एच्एस्बीसी बँकेचे माहितगार

     नवी देहली - एच्एस्बीसी बँकेचे माजी कर्मचारी हर्व्ह फाल्सियानी यांनी जिनिव्हा येथील एच्एस्बीसी बँकेच्या खात्यांत असलेल्या ६२८ भारतियांच्या काळ्या पैशाविषयीची माहिती उघड केली होती; मात्र दिलेल्या माहितीचा केंद्रशासनाने पूर्ण उपयोग करून घेतला नाही, अशी खंत फाल्सियानी यांनी व्यक्त केली आहे. 
      आप पक्षाचे माजी पदाधिकारी अधिवक्ता प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या स्वराज्य अभियान या सेवाभावी संस्थेशी स्काईप या संगणकीय प्रणालीद्वारे संभाषण साधतांना हर्व्ह फाल्सियानी यांनी उपरोक्त माहिती दिली. फाल्सियानी म्हणाले, काळ्या पैशाची माहिती देणार्‍यास भारतात संरक्षण मिळत नाही. उलट त्याला अटक करून त्याचा छळ केला जातो. त्यांनी दिलेली अधिक माहिती अधिवक्ता प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष अन्वेषण यंत्रणेचे अध्यक्ष न्या. एम्.बी. शाह यांना दिली आहे. अधिवक्ता प्रशांत भूषण यांच्या मते केंद्रशासनाने विदेशात असलेल्या एकूण काळ्या पैशाच्या केवळ १ टक्क्यापेक्षाही अल्प रकमेचा शोध लावला आहे. केंद्रशासनाने नुकताच पारित केलेला काळ्या पैशाविरुद्धचा कायदा अत्यंत निरुपयोगी आहे. खरेतर त्याचा लाभ काळा पैसा असणार्‍या लोकांनाच अधिक होत आहे, असे अधिवक्ता प्रशांत भूषण म्हणाले.

६० टक्के मुसलमान महिलांना मिळतो एकतर्फी घटस्फोट

कथित स्त्रीमुक्तीवाली मंडळी आता गप्प का ?
      नवी देहली - एकाच वेळी तलाक (घटस्फोट) हा शब्द तीन वेळा उच्चारून ६० टक्के मुसलमान महिलांना त्यांच्या पतीकडून एकतर्फी घटस्फोट मिळत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात आढळून आली आहे. या घटस्फोटित महिलांना त्यांचे नातेवाईक, स्थानिक काझी, लघुसंदेश अथवा संगणकीय पत्र यांच्या माध्यमातून ही माहिती कळवत असल्याचे समोर आले आहे. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. (कथित स्त्रीमुक्तीवाली मंडळी मौखिक घटस्फोट देण्याच्या पद्धतीविषयी काहीच का बोलत नाही ? मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या ही बंधने वाटणार्‍या कथित स्त्रीमुक्तीवाल्यांना बुरखा पद्धत, बहुपत्नीत्व, तीन वेळा तलाक शब्द उच्चारून महिलेला घटस्फोट देणे हे मुक्त वातावरणाचे लक्षण वाटते का ? - संपादक)

बांगलादेशमध्ये तस्करी होणार्‍या २६ गायी सीमासुरक्षा दलाने कह्यात घेतल्या

गायींची तस्करी करणार्‍यांना कठोर शासन करा. तरच पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करणार नाही !
    शिलाँग (मेघालय) - मेघालय राज्यातील जिल्ह्यातील बांगलादेश सीमेवर भारतातून तस्करी होणार्‍या २६ गायी सीमासुरक्षा दलाने कह्यात घेतल्या. या गायींची किंमत अंदाजे ४ लाख रुपये असून त्या बेटोली या गावातून बांगलादेश सीमेपलीकडे नेण्यात येत होत्या. भारत-बांगलादेश सीमेवर घडणार्‍या अपराधांवर कडक लक्ष ठेवण्याची मोहीम सीमा सुरक्षा दलाने हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गतच या गायी सापडल्याचे सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या आठवड्यात सीमा सुरक्षा दलाने मेघालय सीमेवरून बांगलादेशात नेण्यात येणार्‍या १०३ गायी, ७९५ दारूच्या बाटल्या आणि ३२ लाख रुपये किमतीचे अवैध साहित्य हस्तगत केले होते.

भारताच्या उत्तर-पूर्व भागाला जिहादी आतंकवाद्यांकडून धोका ! - पोलीस महासंचालक, आसाम

केवळ भौतिक विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा देशाच्या सुरक्षेकडेही 
सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, ही जनतेची अपेक्षा !
     गौहत्ती (आसाम) - आसाम राज्याचे पोलीस महासंचालक खगेन शर्मा यांच्या मते भारताच्या उत्तर-पूर्व भागाला स्थानिक आतंकवाद्यांपेक्षा देशाबाहेरील जिहादी आतंकवाद्यांकडून अधिक धोका उद्भवू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने राज्याच्या केलेल्या टेहळणीवरून सुरक्षा यंत्रणांच्या ही बाब लक्षात आली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. शर्मा हे संयुक्त सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी गजराज कॉर्प्सच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीसाठी आले होते. या प्रसंगी आसामचे मुख्य सचिव व्ही.के. पिपेरासेनिया, सैन्याचे ले.जनरल सरथ चंद, गृह आयुक्त एल्.एस्. चान्गासन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विचारवंतांना काँग्रेसच्या काळात पुरस्कार देण्यात आले असल्याने त्यांनी ते काँग्रेसलाच परत करावेत ! - मनेका गांधी

पुरस्कार वापसी करणार्‍यांना सणसणीत चपराक !
      पुणे - कोणत्याही व्यक्तीला पुरस्कार देण्यास देशातील जनतेची मान्यता असते. एक मंत्री किंवा शासन पुरस्कार देत नाही. देशातील लोक पुरस्कारासाठी नावे सुचवतात. शासन त्या नावांचा विचार करून पुरस्कार देते, म्हणजेच हे पुरस्कार देशाने दिलेले असतात; मात्र विचारवंतांनी पुरस्कार परत केल्यामुळे शासनाचा नव्हे, तर देशाच्या जनतेचा अपमान होतो. विचारवंतांना देण्यात आलेले पुरस्कार हे काँग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे त्यांनी ते पुरस्कार काँग्रेसलाच परत करावेत, असे प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास कल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केले.

बेळगाव येथे ५०० रुपयांच्या ३ लक्ष ६४ सहस्र रुपयांच्या खोट्या नोटा नेणार्‍या ७ धर्मांधांना अटक

खोट्या नोटांद्वारे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू 
पहाणार्‍या धर्मांधांना कठोर शासन करणे आवश्यक !
     बेळगाव - येथे खोट्या नोटा विकण्यासाठी नेणार्‍या ७ धर्मांधांना ६ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली. तयीम मुल्ला, बुडन यरगट्टी, सयीफ माडीवाले, जिब्रान बेपारी, बदुद्दिन मुल्ला, मतीन तांबिटकर अशी त्यांची नावे असून त्यात एका अल्पवयीन धर्मांधाचाही समावेश आहे. या सर्वांकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या ३ लक्ष ६४ सहस्र रुपये किमतीच्या खोट्या नोटा, चारचाकी, दुचाकी आणि ७ भ्रमणभाष संच कह्यात घेतले आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळीजवळ ही कारवाई करण्यात आली.

खासदारांची वेतनवाढ करण्यापूर्वी त्यांचा इतिहास तपासा ! - पॅट्रियट फोरम्ची मागणी

जनतेला गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेले लोकप्रतिनिधी 
लाभणे, हे लोकराज्याचे दारूण अपयशच होय !
      नवी देहली - खासदारांच्या वेतनवाढीआधी त्यांचा इतिहास तपासावा, अशी मागणी पॅट्रियट फोरम् या राष्ट्रभक्तांच्या संघटनेने केली आहे. खासदारांच्या वाढीव वेतनाची मागणी विचारार्थ घेण्यासाठी एक समिती नेमण्याचा विचार केंद्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लोकसभेचे माजी महासचिव (सेक्रेटरी जनरल) श्री. सुभाष कश्यप यांनी पॅट्रियट फोरम्चे संयोजक तथा गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक श्री. डी.सी. नाथ

मिरज शहरात २२ हून अधिक ठिकाणी उत्साहात सामूहिक गोपूजनाचा कार्यक्रम !

      मिरज - भारतीय संस्कृतीतील गायीचे महत्त्व सर्वांना समजावे, समाजात गायींप्रती आस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने येथील सर्व गोरक्षक आणि श्रीशिवप्रतिष्ठानची गोरक्षा समिती यांच्या पुढाकाराने शहरात २२ हून अधिक ठिकाणी वसुबारसच्या या दिवशी सामूहिक गोपूजनाचा कार्यक्रम पार पडला. श्री सरपंच हरबा तालीम, श्री संभा तालीम, डॉ. भोसले दवाखान्यासमोर-मंगळवार पेठ, वेताळनगर, महाबली मंडळ, नदीवेस माळी गल्ली, धनगर गल्ली-शेतकरी चौक, शिवनेरी चौक, शिवतीर्थ, रेवणी गल्ली, नागोबा कट्टा-वखार भाग अशा जवळपास प्रत्येक चौकात महिलांना पूजेसाठी गायी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

दीपावलीच्या निमित्ताने चिनी वस्तूंचे भारतीय बाजारपेठेवर आक्रमण !

      सांगली - वर्ष १९६२ मध्ये चीनने भारतावर थेट आक्रमण करून भूभाग जिंकला. जवळजवळ ५० वर्षांनंतर चीनला भारतावर थेट आक्रमण करण्याची आवश्यकता नसून बाजारपेठेतील अनेक वस्तूंचा भाग चिनी वस्तूंनी गिळंकृत केला आहे. दीपावलीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून तेच पहावयास मिळत आहेत. चिनी कंदील, चिनी पणत्या, चिनी विद्युत दिवे सर्वत्र दिसतात. चिनी वस्तू आकर्षक आणि स्वस्त असल्याने त्यांच्यासमोर भारतीय वस्तू टिकाव धरू शकत नाहीत.

वसुबारसच्या दिवशी तुळजापूर नगरपरिषदेने आयोजित केलेला गायींचा लिलाव 'जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थे'ने रोखला !

मोकाट गायींचा लिलाव आयोजित करणार्‍या तुळजापूर 
नगरपरिषद प्रशासनावर भाजप शासनाने कठोर कारवाई करावी, ही गोप्रेमींची अपेक्षा ! 
     तुळजापूर, ९ नोव्हेंबर - तुळजापूर नगरपरिषदेने ७ नोव्हेंबर म्हणजेच वसुबारसेच्या दिवशी मोकाट गायींचा लिलाव आयोजित केला होता. गोमातेला कसायांच्या स्वाधीन करण्याचा घाट येथील 'जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थे'ने जाणून त्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी हा लिलाव रहित करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे केली. त्यामुळे हा लिलाव प्रशासनाला रहित करावा लागला. (गायींचा जाहीर लिलाव रोखून गोरक्षणाचे कार्य करणार्‍या 'जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थे'चे अभिनंदन ! - संपादक) 

व्यक्तीस्वातंत्र्यवाले या संदर्भात काही बोलत का नाहीत ?

      महिलांची छेडछाड आणि पाठलाग करण्याचा प्रकार हा महिलांच्या शारीरिक अन् मानसिक छळाचाच भाग आहे. असा प्रकार महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि जगण्याच्या अधिकारावरही गदा आणणारा आहे. - सुशील बाला डगर, देहली महानगर दंडाधिकारी.


महाराष्ट्रात १ लक्ष बोगस सहकारी संस्था ! - सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील

     सांगली, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - भाजप-सेना शासन सत्तेवर आल्यावर आम्ही राज्यातील सहकारी संस्थांचे सर्र्वेेक्षण चालू केले. यात राज्यात जवळपास १ लक्ष बोगस सहकारी संस्था असल्याचे आम्हाला आढळून आले आहे. यातील ७० सहस्र संस्थांवर तर शिक्कामोर्तबच झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शासनाच्या आघाडीच्या काळात राजकीय लाभांसाठी वेगवेगळी कारणे पुढे करत या संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. या संस्थांची नोंदणी आम्ही रहित करणार आहोत, अशी धक्कादायक माहिती राज्याचे सहकारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर चालू असलेल्या चौकशीसाठी काही कालमर्यादा ठरवण्यात आली आहे का, असे विचारले असता श्री. पाटील म्हणाले, "आपल्याकडे प्रत्येक कारवाईत फाटे फुटतात. मग ती प्रशासकीय असो वा न्यायालयीन. न्यायालयीन प्रक्रियेत किती काळ लागेल, हे आपण सांगू शकत नाही; मात्र त्यांच्यावर कार्यवाही चालू आहे." 

९० खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पात्रता निकषांप्रमाणे सुविधा नाहीत

पूर्तता न करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !
पूर्तता पूर्ण करण्यासाठी तीन मासांची मुदत
      मुंबई - राज्यातील ३६६ अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयांपैकी ९० खासगी महाविद्यालयांकडे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या केंद्रीय नियामक संस्थेने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांप्रमाणे पुरेशा शैक्षणिक आणि भौतिक सुविधा नसल्याचे आढळून आले आहे. या संस्थांना तीन मासांच्या आत पात्रता निकषांची पूर्तता करण्याची मुदत देण्यात आली आहे.

कुख्यात गुंड छोटा राजनचे नाव वर्ष २०१४ पर्यंत मतदारसूचीत समाविष्ट होते ! - गुन्हे अन्वेषण विभाग

वर्ष २०१५ मध्ये निवडणूक आयोगाकडून नाव रहित 
 असा अक्षम्य निष्काळजीपणा करणारे शासकीय 
अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ! 
     मुंबई - २९ वर्षे फरार असलेला कुख्यात गुंड राजेंद्र सदाशिव निकाळजे उपाख्य छोटा राजन याचा मतदानाचा हक्क अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम होता, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या कुर्ला मतदारसंघातील सूचीत अन्य तीन भावांसमवेत त्याचे नाव होते. याविषयी पोलिसांनी कळवल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याचे नाव रहित केले आहे. 

गुन्हे शाखेच्या ३ खंडणीखोर पोलिसांना अटक

पोलीसच खंडणी मागत असतील, तर खंडणीखोरांच्या टोळ्यांना पकडणार कोण ? 
     कल्याण - डाळीच्या व्यापार्‍याकडून २५ लक्ष रुपयांची खंडणी मागणारे गुन्हे शाखेचे सुनील गुजर, संजय सपकाळ, नीलेश वंजारी या ३ पोलीस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

देवतांच्या फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी पोलीस आणि फटाके विक्रेते यांना निवेदने !

पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
पुणे - देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके उडवल्याने होणारी विटंबना थांबवण्यासाठी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एस्.ए. मुजावर यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदेश कदम यांनी निवेदन दिले. या वेळी मुजावर यांनी फटाके विक्रीकेंद्रांना अनुमती देताना हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी न ठेवण्याची अट घालण्याचे मान्य केले.

श्री विठ्ठल मंदिरास अर्पण साड्या आणि खण यांच्या विक्रीतून ८ लक्ष रुपयांचे उत्पन्न

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने या उत्पन्नाचा विनियोग सत्पात्री किंवा भक्तांसाठी करावा !
      पंढरपूर - येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने उत्पन्न वाढवण्यासाठी दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर श्री रुक्मिणी मातेला ओटीच्या रूपात आलेल्या साड्या-खणांची विक्री चालू केली होती. संत श्री तुकाराम भवनामध्ये १ ते ४ नोव्हेंबरपर्यंत ही विक्री आयोजित केली होती. त्याला महिला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या विक्रीतून मंदिर समितीला सुमारे ८ लक्ष २४ सहस्र ३०० रुपयांचे उत्पन्न मिळाले.

पंढरपूर नगरपरिषदेतील साहाय्यक रचनाकाराला ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ९ नोव्हेंबर (वार्ता.) - बांधकाम परवाना देण्यासाठी ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना येथील नगरपरिषदेतील साहाय्यक रचनाकार एस्.आर्. कुलकर्णी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मठाच्या बांधकामाच्या परवान्यासाठी तक्रारदारांनी नगरपालिकेकडे विहीत नमुन्यात अर्ज केला होता. परवाना देण्यासाठी रचनाकार कुलकर्णी यांनी ५० सहस्र रुपयांची लाच मागितली. तडजोड करत ४० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याला पकडले. (अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शासन करावे. - संपादक)

महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

शेतीचे पाणी बंद करण्याची शक्यता 
 या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजना तत्परतेने कराव्यात ! 

            दुष्काळाची भीषणता ! 
     पुणे, ९ नोव्हेंबर - यंदाच्या वर्षी पाऊस अल्प पडल्याने पिण्याच्या पाण्याची स्थिती भयावह निर्माण झाली आहे. गेल्या काही मासांतील पाणी वापरामुळे राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. पुढील पावसाळयापर्यंत म्हणजेच आणखी ८ मास हा पाणीसाठा वापरावा लागणार आहे. पावसाळयानंतर शेती आणि पिण्याचे पाणी यांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे पाणीसाठा ५१ प्रतिशत इतकाच शिल्लक राहिला आहे. याचा परिणाम म्हणून मराठवाड्यासह पुणे आणि नाशिक विभागातील शेतीचे पाणी बंद करण्याची शक्यता आहे.
     एकूण पाणीसाठ्याची स्थिती पहाता जनतेच्या पाण्याची तहान भागू शकेल कि नाही, याविषयी शंका आहे.

हिंजवडी (पुणे) येथे वाहतूक पोलिसाला मारहाण करणार्‍या दोघांना अटक

पोलिसांवरील आक्रमणांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून नागरिकांमध्ये पोलिसांचे 
भय संपल्याचेच ते दर्शक आहे. यासाठी गृह विभाग कोणती उपाययोजना करणार आहे ?
      पिंपरी - वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने गाडी बाजूला घेण्यास सांगितले; म्हणून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून त्याच्या अंगावर गाडी घालणार्‍या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांची नावे शशिकांत गोरख साखरे आणि अक्षय नामदेव साखरे अशी आहेत. ही घटना ६ नोव्हेंबरच्या रात्री ७ वाजता घडली. या प्रकरणी पोलीस नाईक प्रशांत बंडू राऊत यांनी तक्रार दिली आहे.

सांबरा (जिल्हा बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वादग्रस्त छायाचित्र पाठवणार्‍या तरुणाला हिंदु धर्माभिमान्यांकडून चोप !

छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबनेविषयी जागृत असणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन 
     बेळगाव, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराज यांचे वादग्रस्त छायाचित्र काढून 'व्हॉट्स अ‍ॅप'वर 'पोस्ट' करणार्‍या तरुणाला हिंदु धर्माभिमान्यांनी चोप दिल्याने ७ नोव्हेंबर या दिवशी सांबरा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी गावात शांतता समितीची स्थापना करून शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर तणाव निवळला. ( हिंदूंनो, अशीच जागरूकता प्रत्येक वेळी दाखवल्यास अशा प्रकारे विटंबना करण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही ! - संपादक) 

४ सहस्र रुपयांची लाच घेतांना धर्मांध गट शिक्षणाधिकार्‍याला अटक

      रामनाथ (अलिबाग) - म्हसळा पंचायत समितीचा गट शिक्षणाधिकारी इस्माईल अहमद जालगावकर या धर्मांधास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना ७ नोव्हेंबरला पकडले. एका शिक्षिकेच्या पदवीच्या नोंदीसाठी त्याने तिच्याकडे ४ सहस्र रुपये मागितले होते.

घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असणारे माजी आमदार सुरेश जैन यांना दिवाळीसाठी सशर्त रजा संमत

     धुळे - जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी आमदार सुरेश जैन यांना दिवाळीनिमित्त घरी पूजा करण्यासाठी जाण्यास न्यायालयाने सशर्त अनुमती दिली आहे. जैन यांच्यासह राजा मयूर, जगन्नाथ वाणी या संशयितांचा रजेचा अर्जही न्यायालयाने सशर्त संमत केला आहे. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सुरेश जैन आणि जगन्नाथ वाणी यांना धुळे शहर न सोडता त्यांच्या धुळेस्थित घरातच पूजा करण्याला अनुमती देण्यात आली आहे. पूजेसाठी घरी जातांना सोबत पोलिसांना घेऊन जावे, अशीही अट विशेष न्यायाधीश आर्.आर्. कदम यांनी घातली आहे.

फटाक्यांच्या धुरातील अतीसूक्ष्म कण मोजणार्‍या अभ्यासात फटाक्यांद्वारे सर्वांत अधिक प्रदूषण

आता कुठे आहेत तथाकथित पर्यावरणवादी ?मानवाच्या शरिरावर 
विपरीत परिणाम करणार्‍या अशा फटाक्यांवर शासनाने बंदी घालावी, ही अपेक्षा ! 
     पुणे, ९ नोव्हेंबर - फटाके जळतांना त्यातून बाहेर पडणार्‍या अतीसूक्ष्मकणांविषयी पुण्यातील 'चेस्ट रिसर्च फाउंडेशनने' (सीआरएफने) केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ७ नोव्हेंबर या दिवशी समोर आले. या अभ्यासात दिवाळीत वापरण्यात येणार्‍या फटाक्यांच्या प्रकारातील 'सापगोळी' सर्वांत प्रदूषणकारी, त्यानंतर लवंगी फटाक्यांची साखळी (लड) आणि पेटवण्याची वायर या फटाक्यांचा क्रमांक लागला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

जिहादी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय !
     भारताच्या उत्तर-पूर्व भागाला स्थानिक आतंकवाद्यांपेक्षाही देशाबाहेरील जिहादी आतंकवाद्यांकडून अधिक धोका उद्भवू शकतो, अशी चिंता आसाम राज्याचे पोलीस महासंचालक खगेन शर्मा यांनी व्यक्त केली आहे.


हिंदू तेजा जाग रे !


जागो !
उत्तर-पूर्व भारत को देश के बाहर के जिहादी आतंकीयों से धोका है ! - पुलिस महासंचालक, आसाम - हिन्दु राष्ट्र की स्थापना ही जिहादी आतंक रोकने का एकमात्र उपाय है !
Jago !
North-East Bharatko deshke baharke jihadi atankiyonse dhoka hai ! - D.I.G., Asam - Hindu Rashtraki sthapnahi Jihadi atank rokneka ekmatra upay hai !

प्रदूषण करणार्‍यांनाच दोषी ठरवणार ! - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

     नाशिक - प्रदूषण करणारेच आता दोषी ठरणार आहेत, असा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एम्पीसीबीने) घेतला आहे. हरित लवादाच्या निर्देशानुसार मंडळाने पर्यावरण कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीचा कृती आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यात 'पोल्यूटर टू पे' या तत्त्वाला अधिक प्राधान्य दिले आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांना महापौरपदाची संधी

     कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना-भाजप यांच्यात युती झाल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक श्री. राजेंद्र देवळेकर यांना महापौरपदाचा मान मिळणार आहे. उपमहापौरपद भाजपचा असेल. 

शिवसेनेच्या निवेदनावर पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

गांधी उद्यानात फटाके विक्रीसाठी अनुमती दिल्याचे प्रकरण
निवेदन देतांना मध्यभागी श्री. चंद्रकांत पाटील
आणि शेजारी श्री. आनंद रजपूत (उजवीकडे)
सांगली, ९ नोव्हेंबर (वार्ता.) - मिरज शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी केवळ दोनच उद्याने शिल्लक आहेत. एक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि दुसरे गांधी उद्यान. याचा कोणताही विचार न करता महापालिका प्रशासनाने फटाके विक्रेत्यांना विक्रीसाठी गांधी उद्यानाची जागा दिली आहे. शिवाय येथे एखाद्या फटाके दुकानास आग लागल्यास अग्निशमन गाडीही आता जाऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. या संदर्भात निवेदन देऊनही महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने शिवसेनेचे उत्सव समितीप्रमुख श्री. आनंद रजपूत यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन दिले. यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ जिल्ह्याधिकार्‍यांना बोलावून घेऊन संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. 

श्री लक्ष्मी पूजाविधी

श्री लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने...
१. आचमन 
आचमन : पुढील ३ नावे उच्चारल्यावर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातात घेऊन प्राशन करावे. - १. श्री केशवाय नमः २. श्री नारायणाय नमः ३. श्री माधवाय नमः । ४. श्री गोविंदाय नमः (या नावाने हातावर पाणी घेऊन खाली ताम्हणात सोडावे. त्यानंतर हात जोडून पुढील नावे अनुक्रमे उच्चारावी आणि प्रार्थना करावी.) ५. श्री विष्णवे नमः ६. श्री मधुसूदनाय नमः ७. श्री त्रिविक्रमाय नमः, ८. श्री वामनाय नमः ९. श्री श्रीधराय नमः १०. श्री हृषीकेशाय नमः ११. श्री पद्मनाभाय नमः १२. श्री दामोदराय नमः १३. श्री संकर्षणाय नमः १४. श्री वासुदेवाय नमः १५. श्री प्रद्मुम्नाय नमः १६. श्री अनिरुद्धाय नमः १७. श्री पुरुषोत्तमाय नमः १८. श्री अधोक्षजाय नमः १९. श्री नारसिंहाय नमः २०. श्री अच्युताय नमः २१. श्री जनार्दनाय नमः २२. श्री उपेंद्राय नमः २३. श्री हरये नमः २४. श्री श्रीकृष्णाय नमः । श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः । अविघ्नमस्तु ।

अहंकार आणि गुरुद्रोह यांमुळे रसातळाला गेलेला बैजू बावरा यांचा शिष्य गोपाल !

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
    बैजू बावरा यांचा शिष्य गोपाळ याने बैजूची प्रसन्नता मिळवणे, बैजूनी गोपाळला केलेला उपेदश आणि शेवटी गोपालने गायकांना आव्हान देणे आणि पराभूत झालेल्या गायकांचा शिरच्छेद करणे, आदी माहिती काल पाहिली. आज पुढील भाग पाहूया !
६. बैजूला गोपालच्या कुकर्मांविषयी कळल्यावर अतिशय दुःख होणे आणि शिष्याची समजूत घालण्यासाठी त्याच्याकडे जाणे : बैजूला गोपालच्या या कुकर्मांविषयी लवकर कळले नाही. कित्येक गायकांचे शिर धडावेगळे झाले, कित्येक अबला विधवा झाल्या, त्यांची मुले दारोदारच्या ठोकरा खाण्यासाठी विवश झाली, त्या वेळी कोठे फिरत फिरत ही वार्ता बैजूच्या कानावर पडली. त्याला अतिशय दुःख झाले की, या दुष्टाने माझ्या विद्येचा उपयोग अहंकार पोसण्यासाठी केला ! मी सांगितले होते की, ही संगीताची विद्या अहंकार पोसण्यासाठी मुळीच नाही. शेवटी तो आपल्या शिष्याची समजूत घालण्यासाठी कित्येक मैलांचा प्रवास करत पायीपायी चालत, जिथे गोपाल नायक मोठ्या थाटामाटाने रहात होता, तिथे पोहोचला.

विधान मागे घेणार्‍या राजकारण्यांवर विश्‍वास ठेवता येईल का ?

      अभिनेता शाहरुख खान चित्रपटांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवतात, तरीही भारत असहिष्णु आहे, असे त्यांना वाटते. भारत संयुक्त राष्ट्रांचा स्थायी सदस्य बनण्याचा प्रयत्न करत आहे आणि पाकिस्तानसह सर्व भारतविरोधी शक्ती कटकारस्थान रचत आहेत. असहिष्णुतेविषयीचे शाहरुखचे वक्तव्य हे भारतविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळणारे आहे. शाहरुखचे तन भारतात असले, तरी त्याचे मन मात्र पाकिस्तानात आहे,

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाच्या वतीने आगामी काळात बारा ज्योतिर्लिंगासह अन्य ठिकाणी होणारे सोमयाग

       याशिवाय १४ ते २० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत वाजपेय सोमयाग आणि २१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत बृहस्पतीसव सोमयाग होणार आहेत, तसेच ८ ते १३ मार्च २०१६, १९ ते २४ मार्च, ३ ते ८ एप्रिल, १८ ते २३ एप्रिल, ५ ते १० मे, २० ते २५ मे २०१६ या काळातही यज्ञ होणार आहेत. केदारनाथ, श्रीकाशीविश्‍वेश्‍वर, भिमाशंकर, श्री नागेश्‍वर (द्वारका) श्रीशैल्यम्, श्रीरामेश्‍वरम्, जगन्नाथपुरी, रांची येथील यज्ञाची ठिकाणे अद्याप निश्‍चित व्हायची बाकी आहेत. 

वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल सुवृष्टी आणि आपत्काळ निवारण व्हावे, यासाठी सौमिक सुवृष्टी योजनेतील सोमयागांचे आयोजन

असा विचार आणि त्या संदर्भातील कृती एकतरी राजकारणी करू शकतो का ?
प.पू. नाना काळेगुरुजी
     वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल सुवृष्टी आणि आपत्काळ निवारण व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाच्या वतीने अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या चैतन्यमय मार्गदर्शनाखाली सौमिक सुवृष्टी योजनेत २५ सोमयागांचे नियोजन केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांसहित इतर स्थानीही होणार्‍या या सोमयागांतील तिसर्‍या वाजपेय सोमयागाला महाराष्ट्रातील परळी येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग वैजनाथ येथे ७ नोव्हेंबरला आरंभ झाला. या सोमयागाची सांगता १२ नोव्हेंबरला होणार आहे. शरद ऋतूत होणार्‍या सोमयागास वाजपेय सोमयाग म्हणतात. वाज म्हणजे अन्न आणि पेय म्हणजे जल असा वाजपेय या शब्दाचा अर्थ आहे.

अभ्यासाची गोडी हवी !

राज्यात सध्या इयत्ता ९ वीमध्ये अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे; कारण इयत्ता ८ वी पर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे उत्तीर्ण होणार, याची निश्‍चिती असल्याने विद्यार्थी अभ्यासच करत नाहीत. याचा परिणाम म्हणून इयत्ता ९ वीत आल्यावर त्यांना अभ्यास करणे अवघड जाते. त्यामुळे त्या इयत्तेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक म्हणजे ८.९ टक्के इतके आहे. अनेक विद्यार्थी इयत्ता ९ वीनंतर शाळा सोडून देतात. अनुत्तीर्ण होणार्‍यांची ही संख्या अल्प करण्यासाठी शिक्षण विभागाने एक आदर्श प्रतिकृती (मॉडेल) सिद्ध केली आहे. त्यामध्ये शिक्षण विभाग जलदगतीने शिकणे याचा विचार करत आहे. 

पाककडून भारताला धोका, असे म्हणण्याचे धाडस किती भारतीय नेत्यांमध्ये आहे ?

     भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुसलमान आणि पाकिस्तान यांच्या विरोधात आहेत. मोदी यांच्यापासून या दोघांनाही धोका आहे. - जनरल परवेझ मुशर्रफ, पाकचे माजी अध्यक्ष

असे लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य देतील का ?

      ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात तीन नगरसेवकांचे पद रहित केले आहे. पद रहित झालेल्यांपैकी मनसेचे शैलेश पाटील यांनी स्वतःच्या रहात्या जागेवर, तर शिवसेनेचे राम येगडे यांनी पत्नीच्या नावे अनधिकृत बांधकाम केले आहे.

हिंदुस्थानला जन्मभूमी मानणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार तारक फताह

      तारक फताह पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा निवासी आंतरराष्ट्रीय ख्यातनाम पत्रकार आहेत, तसेच अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. ते स्वत:ला हिंदु वंशपरंपरेतील मानतात. एवढेच नव्हे, तर गर्वाने म्हणतात की, ते मूळत: भारतीय आहेत. फताह म्हणतात, हिंदुस्थान माझी पायाभूत जन्मभूमी आहे, तोच माझा देश आहे. माझी पाकिस्तानी ओळख विसरण्यास अथवा परत करण्यास कोणती पद्धत असेल, तर ती परत करण्यास मी तयार आहे. मी माझ्या मातेला कसे विसरू शकतो ? आम्ही तर दाराशुकोहचे संतान आहोत. आम्ही त्या पंजाबची मुले आहोत, जेथील अत्यंत मोठ्या नेत्याची एका मोठ्या व्यक्तीने हत्या केली, त्याचे नाव होते औरंगजेब ! हिंदुस्थानच्या मुसलमानांना एक पर्याय आहे, ते दाराशुकोहचे अनुयायी आहेत कि औरंगजेबचे ?
- श्री. तारक फताह (साप्ताहिक वीरवाणी, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३) 
      पर्जन्ययागाचा लाभ केवळ पर्जन्यवृष्टी होत नसल्यास ती व्हावी, यासाठी जसा होतो, तसाच अतीवृष्टी होत असल्यास ती थांबावी यासाठीही होतो. तशी मंत्रांची योजना ऋषिमुनींनी केलेली आहे.

एका संतांनी सांगितलेला हरवलेली वस्तू मिळण्याचा जप कोणाला विचारायचा ? या विचारांत असतांना केवळ १० मिनिटे त्या संतांचे नाव घेतल्याने गाडीचे महत्त्वाचे मूळ कागदपत्र सापडणे

     २१.७.२०१५ या दिवशी घराच्या मांडणीत ठेवलेले गाडीचे महत्त्वाचे मूळ कागदपत्र त्याच मांडणीत ४ - ५ वेळा शोधूनही सापडत नव्हते. एका संतांनी सांगितलेल्या एका मंत्राने हरवलेली वस्तू सापडते, हे मला ज्ञात होते; परंतु तो मंत्रजप कोणाला विचारायचा ? या विचारात असतांनाच माझ्याकडून अंदाजे १० मिनिटे त्याच संतांचे नाव सतत म्हटले गेले. असे म्हणत असतांना ते कागदपत्र जेथे ठेवले होते, तेथे दिसले; म्हणून मी उठून त्या मांडणीत बघितले, तर ते कागदपत्र तेथेच होते. यासाठी श्रीकृष्णचरणी कोटी कोटी कृतज्ञता !
- श्रीकृष्णचरणी, श्री. कृष्णा आय्या, पुणे

सौ. रंजना गडेकर आणि कु. कल्याणी गांगण यांनी शत्रूसंहारक यज्ञाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

     १.११.२०१५ या दिवशी सप्तर्षी जीव नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या रामनाथी आश्रमात शत्रूसंहारक यज्ञ करण्यात आला. त्याचे साधिकांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण पुढे देत आहे.
सौ. रंजना गडेकर

१. लिंबांच्या साहाय्याने वाईट शक्ती हवनकुंडात खेचली जाऊन ती क्षीण होत असल्याचे जाणवणे
: यज्ञात २७ लिंबे वापरण्यात आली होती. लिंबे अर्धी कापून त्यांचा रस काढण्यात आला आणि तो आश्रमातील प.पू. डॉक्टरांच्या खोलीत अन् आश्रम परिसरात शिंपडण्यात आला. लिंबांची साले यज्ञात आहुतीसाठी वापरण्यात आली. लिंबांच्या साहाय्याने वाईट शक्ती हवनकुंडात खेचली जाऊन ती क्षीण होत आहे, असे जाणवले.
२. यज्ञातील धुरात असलेल्या लाल कणांतून शस्त्रास्त्रे सुटत असल्याचे जाणवणे : यज्ञकुंडातून निघत असलेल्या धुरात लाल कण दिसत होते. ते मारक कण वातावरणात सर्वत्र पसरून त्यातून शस्त्रास्त्रे सुटत असल्याचे जाणवले.

गोवा शासनाचा धरसोडपणा !

दबाव निर्माण केल्यासच शासन ऐकते, हे लक्षात घ्या !
      गोव्यातील मांडवी नदीतील चारपैकी ३ कॅसिनोंना मांडवीतच ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कॅसिनो जहाजांच्या अनुज्ञप्त्यांचे नूतनीकरण गृहखात्याने केले आहे. १४ ऑगस्ट २०१३ या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कॅसिनो जहाजे मांडवीबाहेर नेण्याचे ठरले होते. त्यानुसार हे कॅसिनो नदीबाहेर नेण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार नवीन ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न झाला;

सनातन संस्था आहे एक अद्भुत धुलाईयंत्र ।

सौ. अंजली जोशी
सनातन संस्था आहे ।
एक अद्भुत धुलाईयंत्र ॥
विश्‍वात कुणासही नसे ।
अवगत विकसित तंत्र ॥ १ ॥
विज्ञान-निर्मित धुलाईयंत्रात ।
केवळ निघतात मातीचे डाग ॥
मात्र सनातन धुलाईयंत्रात ।
स्वच्छ होतात अहं-दोषांचे डाग ॥ २ ॥

अहंरूपी चिखल असे जन्मोजन्मीचा ।
न चाले प्रयोग साध्या साबणाचा ॥
घालून प्रक्रियारूपी साबणचुरा ।
अन् संतवाणीची जलधारा ।
फिरविती यंत्रात गरागरा ॥ ३ ॥

कलियुगात देवावर त्याचे देवपण सिद्ध करून दाखवण्याची वेळ आहे !

    
श्री. राम होनप
काही जण वैज्ञानिक उपकरणांद्वारे ईश्‍वराची सकारात्मक ऊर्जा किंवा ईश्‍वरी शक्ती अस्तित्वात आहे, याविषयी विविध प्रयोगांद्वारे संशोधन करतात. याचा उद्देश बुद्धीजीवी वर्गाने ईश्‍वराचे अस्तित्व मान्य करून साधनेला लागावे. असे संशोधन करण्याची प्रेरणा देणारा देवच आहे. त्यामुळे कलियुगात देवावर त्याचे देवपण सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वाटते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०१५)

     अखंड भारताच्या स्वप्नपूर्तीचे कार्य भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राने साकार करावे. - ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे (परमार्थ महाधन, वर्ष १ ले, अंक पहिला)

मिरज आश्रमातील साधिका श्रीमती शोभा चांदणे यांना आलेल्या अनुभूती

१. सूर्यातून लाल आणि पिवळे गोळे, तसेच चैतन्याचे कण बाहेर पडत असल्याचे दिसणे : २६.४.२०१५ या दिवशी सकाळी ६.३० वाजता मी सकाळचा व्यायाम म्हणून आश्रमाच्या आगाशीत फिरत होते. त्या वेळी माझे लक्ष उगवत्या सूर्याकडे गेले. सूर्याचा रंग तांबडा होता. काही वेळाने तांबड्या रंगाच्या ठिकाणी पांढरा गोळा दिसू लागला. त्या पांढर्‍या गोळ्यातून लाल आणि पिवळे गोळे, तसेच चैतन्याचे कणही बाहेर पडत आहेत, असे मला दिसले.

कोरेगांव, सातारा येथील सभेत प.पू. डॉक्टरांचे झालेले प्रथम दर्शन आणि जीवनाला संपूर्ण कलाटणी देणारे ईश्‍वरी नियोजन !

श्री. अविनाश जाधव
     साधनेतील आरंभीच्या काही वर्षांची आलेली आठवण अकस्मात् आध्यात्मिक त्रासामुळे येणार्‍या थकव्यात वाढ झाली; म्हणून दुपारी मी झोपलो होतो. त्या वेळी साधनेतील आरंभीच्या काही वर्षांची आठवण होऊन देवाने आपल्या साधनेत टिकवून ठेवल्याने कृतज्ञता वाटली.
१. प.पू. डॉक्टरांच्या सभेला जाण्याचा निश्‍चय करणे
     कोरेगाव येथे मे १९९९ मध्ये प.पू. डॉक्टरांची सभा होती. सभेच्या प्रसारानिमित्त लहान मुलांची नामजप फेरी सभेच्या आदल्या दिवशी काढण्यात आली. त्या दिवशी मनात विचार येऊन गेला की, आपण या सभेला जायचे. त्या वेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते.

कु. कुशावर्ता माळी हिचे भाव व्यक्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले पत्र

कु. कुशावर्ता माळी
     चांगदेवांची साधना होती. माझी तर साधनाच नाही. त्यामुळे काय लिहू ? कसे लिहू ?

    पण माझे भाग्य एवढे की, मला मुक्ताईला नव्हे, तर मुक्ताईला मुक्त करणार्‍या देवाला पत्र लिहायला मिळाले.
- तुमची,
कु. कुशावर्ता माळी (३०.१०.२०१५)

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची नाशिक येथील कु. वैभवी सूर्यवंशी (वय ५ वर्षे) !

कु. वैभवी सूर्यवंशी
१. सात्त्विकतेची आवड
      वैभवीला परकर पोलके घालायला, तसेच वेणी दुमडून घालायला आवडते.
२. वैभवीचा नामजप एका लयीत होतो.
३. आध्यात्मिक उपायांविषयीची सतर्कता
     घरात त्रास वाढले असतांना ती आम्हाला नामजप आणि उपाय यांची आठवण करून देते.
४. सेवेसाठी जातांना आईला त्रास न देणे

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांवर ताल धरून नाचणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ओजस सत्यजित लिमकर (वय १ वर्ष) !

     प्रयाग येथील बालसाधक चि. ओजस सत्यजित लिमकर याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. रामरक्षा, भजने आणि काकड आरती चालू असतांना हालचाल करून प्रतिसाद देणे : मी गरोदर असतांना रामरक्षा लावल्यावर बाळ पुष्कळ हालचाल करायचे. त्याच्या जन्माच्या आधी रामनवमी होती. त्या वेळी आठवडाभर राममंदिरात काकड आरती, भजने असे कार्यकम चालू होते.

हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यातील धर्मप्रसारांतर्गत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक यांना सेवेची अमूल्य संधी !
१. अर्धकुंभमेळ्याचे महत्त्व
     उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे प्रत्येक १२ वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. या १२ वर्षांच्या कालावधीत ६ वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार येथील अर्धकुंभपर्वातील यात्रेचे फळ मोक्ष देणारे असते, असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याप्रमाणे या अर्धकुंभमेळ्यातही लक्षावधी भाविक यात्राविधी आणि गंगास्नान करतात. अर्धकुंभमेळ्यातील विशेष पर्वकाळांना गंगास्नानाचे महत्त्व असल्याने त्या वेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
     विज्ञाननिष्ठेच्या गोष्टी सांगणार्‍या बुद्धीखोरांना वेड्याच्या इस्पितळात पाठवा ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ७.१०.२०१०)

आली दिवाळी हिंदु जनांची ।

श्रीमती रजनी नगरकर
आली दिवाळी हिंदु जनांची ।
करूया साजरी कृष्णनामाची ॥ १ ॥
पहिला दिवस एकादशीचा ।
चालू करूया नामाची अखंडता ॥ २ ॥
दुसरा दिवा वसुबारसेचा ।
करूया निश्‍चय गोमाता
वाचवण्याचा ॥ ३ ॥
तिसरा दिवस धनत्रयोदशीचा ।
पूजा करूया धनाची ॥ ४ ॥

स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आधी केल्यास काही महिन्यांनी नामजप करणे सुलभ होईल !

 
(परात्पर गुरु) डॉ. आठवले
    भक्तीमार्गातील सर्वच जण सांगतात, नाम घ्या; पण बहुतेकांना ते जमत नाही; कारण त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांची साधना होत नाही. नामजप होण्यासाठी त्यांनी आधी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. ते झाल्यावर नामजप सहजतेने होऊ शकतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१०.२०१५)

साधकांनो, वक्तृत्वकलेपेक्षा वाणीत चैतन्य असणे महत्त्वाचे, हे लक्षात घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     हल्ली सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्तेे यांना विविध व्यासपिठांवर वक्ते म्हणून बोलावण्यात येते आणि दूरचित्रवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती घेण्यात येतात. कार्यक्रमानंतर साधक आणि कार्यकर्ते यांची आपसात चर्चा होते की, कोण किती छान बोलले ? त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, वक्तृत्वकला मानसिक स्तरावरची आहे. त्यामुळे तिचा परिणाम अल्प काळ टिकतो. यामुळेच सभा गाजवणार्‍या राजकारण्यांचा प्रभाव उपस्थितांवर तात्कालिकच होतो.
     याउलट वक्तृत्वकला नसली, तरीही संतांच्या वाणीत असलेल्या चैतन्यामुळे त्यांच्या वाणीचा परिणाम ऐकणार्‍यांवर होऊन ते हळूहळू साधना करू लागतात आणि आयुष्यभर साधना करून जीवनाचे सार्थक करतात.

सेवेची तीव्र तळमळ असलेली आणि उत्कट भावामुळे पंचांग वितरण करतांना जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया, ही अनुभूती सतत घेणारी कु. राजश्री सुरवसे !

कु. राजश्री सुरवसे
     सेलू, परभणी येथील साधिका कु. राजश्री सखाराम सुरवसे यांनी ध्येय ठेवून पंचांगांचे वितरण केले. झोकून देऊन सेवा करतांना येणार्‍या अडचणी आणि वेळोवेळी देवाने दिलेल्या आश्‍चर्यकारक वाटणार्‍या अनुभूती पुढे देत आहोत. यातून तळमळ असेल, तर देव कशा प्रकारे साहाय्य करतो आणि कठीण वाटणारी गोष्ट कशी लीलया पूर्ण होते, हे लक्षात येते.
     सेवेची तळमळ आणि भाव असला, तर श्रीकृष्ण कसे प्रत्येक क्षणी साहाय्य करतो, याची उदाहरणे कु. राजश्री सुरवसे हिने येथे दिली आहेत. सर्वांमध्येच तिच्याप्रमाणे सेवेची तळमळ आणि भाव निर्माण झाला, तर त्यांची प्रगती होईल आणि हिंदु राष्ट्राची स्थापनाही होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.८.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.११.२०१५) रात्री ९.२३ वाजता
समाप्ती - आश्‍विन अमावास्या (११.११.२०१५) रात्री ११.१७ वाजता
उद्या अमावास्या आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
     दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
अमृत आणि विष अमृतको जहरका डर होता है ।
भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते;

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना काहीतरी करा, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥ या गटात येतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.११.२०१५ )
बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

असत्याचा विजय तात्पुरताच !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      सत्य हे स्वयंप्रकाशी असते. कलियुगात असत्याचा विजय होतो, असे वाटले, तरी नित्य हे लक्षात ठेवावे की, हा विजय तात्पुरता असतो ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शिवसेना बिहारींना आवडली !

संपादकीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारींसाठी बाहरी होते. त्यामुळेच बिहारच्या निवडणुकीत भाजपला मतदारांनी झिडकारले, असा अंदाज राजकीय विश्‍लेषक लावत आहेत; पण खरेच असे होते का ? कारण बिहारमध्ये प्रथमच निवडणूक लढवणार्‍या शिवसेनेने २ लाखांहून अधिक अशी आश्‍चर्यकारक मते मिळवली आहेत. शिवसेनेला मिळालेल्या मतांचा आकडा हा राष्ट्रवादी काँग्रेसला ७८ सहस्र ११८ मते आणि एम्.आय.एम्.ला ६९ सहस्र ३७१ मते या पक्षांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे. बिहार निवडणुकीच्या आधी सर्वच प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्ष यांनी शिवसेनेच्या विरोधात आघाडी उघडली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn