Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरला दिले ८० सहस्र कोटींचे अर्थसाहाय्य

देशभरात सर्वत्र असे आर्थिक साहाय्य हवे ! केवळ काश्मीरमध्ये 
दिलेल्या आर्थिक साहाय्याचा लाभ किती हिंदूंना होणार ?
    श्रीनगर, ७ नोव्हेंबर - कडक बंदोबस्तात येथील शेर-ए-काश्मीर मैदानावर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ८० सहस्र कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली. या सभेसाठी काश्मीरमध्ये आलेल्या मोदी यांना फुटीरतावादी आणि कट्टरतावादी यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. या सभेचा अपक्ष आमदार रशीद यांनी आकाशात काळे झेंडे सोडून विरोध दर्शवला.
    सभेत मोदी म्हणाले, सब का साथ सब का विकास हेच केंद्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशातील कुठलाही भाग विकासामध्ये मागे राहिला, तर शासनाचे हे उद्दिष्ट साध्य होणार नाही. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीनगरमध्ये सर्वत्र संचारबंदीसदृश वातावरण होते. शहरातील प्रमुख ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभेच्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती. शहरातील भ्रमणध्वनीवरील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. या सभेला आरंभ होण्यापूर्वी आमदार रशीद त्यांच्या समर्थकांसह काळे फुगे आकाशात सोडले आणि त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या. पोलिसांनी रशीद यांच्यासह त्यांच्या समर्थकांना कह्यात घेतले.

परळी येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग वैजनाथ येथे सोमयागांतील तिसर्‍या वाजपेय सोमयागास प्रारंभ

वाजपेय सोमयागाचे निरीक्षण आणि शास्त्रीय संशोधन करण्यासाठी अनेक संशोधक येणार !
      परळी - वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल सुवृष्टी व्हावी आणि आपत्काळाचे निवारण व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील श्री योगराज वेद विज्ञान आश्रमाच्या वतीने अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या चैतन्यमय मार्गदर्शनाखाली सौमिक सुवृष्टी योजनेतील २५ सोमयागांचे नियोजन केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांसहित इतर स्थानीही होणार्‍या या सोमयागांतील तिसर्‍या वाजपेय सोमयागास (शरद ऋतूत होणार्‍या सोमयागास वाजपेय सोमयाग म्हणतात.

ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे निधन

अरुण रामतीर्थकर
      सोलापूर - ज्येष्ठ पत्रकार अरुण रंगनाथ रामतीर्थकर (वय ६६ वर्षे) यांचे ६ नोव्हेंबरला रात्री ९.१५ वाजता येथील अश्‍विनी रुग्णालयात निधन झाले. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांची फुफ्फुसे कमकुवत झाली होती. दोन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ७ नोव्हेंबरला सकाळी ७ ते १० या वेळेत ओंकार सोसायटी, मजरेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सकाळी ११ वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सनातनचे साधक श्री. तिवारी, सौ. राजश्री तिवारी आणि श्रीमती साखरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

ठाणे-कल्याण-डोंबिवली पट्ट्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

      ठाणे - ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुंब्रा या पट्ट्यात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या चोर्‍यांच्या मुळाशी याच परिसरात बेकायदा वस्त्यांमध्ये राहणार्‍या इराणी नागरिकांच्या टोळ्या असल्याचे उघड झाले आहे.
     कुटुंबातील लहानग्यांनी वाहने चोरायची, तरुणांनी त्यावर स्वार होऊन सुसाट वेगात महिलांच्या गळ्यातील दागिने खेचायचे आणि अटक झाली की, घरातील महिलेने कोर्ट-कचेर्‍याचे दायित्व खांद्यावर घ्यायचे.

इंदिरानगरमध्ये (जिल्हा नाशिक) धर्मांधाकडून तलवार कह्यात

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे !
     इंदिरानगर - इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ नोव्हेंबर या रात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये एक ठिकाणाहून तलवार कह्यात घेण्यात आली असून, यादीवरील बारापैकी सात गुन्हेगार घरी आढळून आले. इंदिरानगर येथील वडाळागाव, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, पिंगूळबाग, साठेनगर, आलिशान सोसायटी, झीनतनगर, भारतनगर, गणेशनगर, शिवाजीवाडीसह परिसरात गुरुवारी रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

हिंदुत्वाचा शिलेदार : श्री. अरुण रामतीर्थकरकाका !

वाटचाल केली राष्ट्रोत्थानासाठी, हाती मशाल हिंदुत्वाची ।
शरपंजरी अवस्थेतही तळपे लेखणी त्यांची ॥
धारदार शब्दरूपी शस्त्राने करिती राष्ट्र अन् धर्मद्रोह्यांवर वार ।
राजकारणाचे पितळ उघडे पाडून अभ्यासपूर्ण लेखांतून उसळे राष्ट्र-धर्मप्रेमाची तलवार ॥
प्रतिकूलतेतही दिसली तळमळ सनातन प्रभातला लेख देण्याची ।
संवेदनशील घटनांना निवडून दिशा देती राष्ट्र-धर्मावरील मळभ दूर करण्याची ॥
रामतीर्थकरकाकांच्या माध्यमातून हिंदुत्वाचे निष्ठावान रूप लाभले सनातन प्रभातला ।
जाज्ज्वल्य विचारांच्या रूपात सदा स्मरणात ठेवू हिंदुत्वाच्या भरभक्कम शिलेदाराला ॥
- सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेलअसात्त्विक आणि विकत मिळणारे तमोगुणी खाद्यपदार्थ टाळून घरी बनवलेले सात्त्विक खाद्यपदार्थ आणि फराळ ग्रहण करा !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण

  • गायकवाड यांच्या अधिवक्त्यांनी सादर केलेल्या अर्जावर १७ नोव्हेंबरला सुनावणी, तर न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ
  • महत्त्वाचे म्हणणे मांडण्यासाठी समीर गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित करावे ! - समीर गायकवाड यांच्या अधिवक्त्यांची अर्जाद्वारे मागणी 

रामतीर्थकरकाका : प्रखर विचारांची मशाल !

    'मी दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई आवृत्तीची सेवा करत असतांना दोन आदरणीय ज्येष्ठ पत्रकारांशी माझा जवळचा संबंध आला. एक मुंबईतील श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी आणि दुसरे सोलापूरचे अरुण रामतीर्थकरकाका. काकांना भेटावे, अशी इच्छा मनात निर्माण झाली होती. ती मुंबई आवृत्तीच्या १२ व्या वर्धापनदिनी पूर्ण झाली. काकांना जेव्हा पाहिले, तेव्हा 'परखड शब्दात लिखाण करणारे आणि कणखर आवाजाचे हेच ते काका ?', असा प्रश्नच मला पडला. काका शारीरिकदृष्ट्या पुष्कळ विकलांग होते. काका आश्रमात आल्यावर त्यांना चाकांच्या खुर्चीने (व्हीलचेअरने) फिरवून मी प्रत्येक विभागाची आणि राष्ट्र-धर्म विषयीच्या कार्याची माहिती दिली. या वेळी काकांनी काही प्रश्नही साधकांना विचारले आणि जिज्ञासूपणे माहिती जाणून घेतली. काका काही वेळा चालण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा मी त्यांचा हात धरून आधार देण्याचा प्रयत्न करायचो; पण काका तेव्हा आधार न घेता स्वत:च चालण्याचा प्रयत्न करायचे. त्यांंचा पाठीचा कणा वाकला होता; पण विचारांचा कणा मात्र ताठ होता. तो कधीच कोणापुढे वाकू दिला नाही. वर्धापनदिनाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या वेळी रामतीर्थकरकाका दीपप्रज्वलन करायला आधार न घेताच उठले आणि त्यांनी दीपप्रज्वलन केले. ते पाहून सोहळ्याला उपस्थित असलेल्या वाचकांनी आणि हितचिंतकांनी आश्चर्य व्यक्त केले.

दीपावलीतील सणांमागील अध्यात्मशास्त्र

दीपावलीच्या निमित्ताने राष्ट्र आणि धर्म प्रेम वाढवूया !
    'दीपावली हा शब्द दीप+आवली (ओळ), असा बनला आहे. 'दीप' या शब्दाचा खरा अर्थ 'तेल आणि वात यांची ज्योत'. 'तमसो मा ज्योतिर्गमय', म्हणजे 'अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा', अशी वेदांची आज्ञा आहे. सुखसमृद्धीचे प्रतीक असलेली व्यष्टीतील दिवाळी आतापर्यंत आपण उत्साहाने साजरी करत आलो. आज व्यष्टीतून बाहेर म्हणजे समष्टीत डोकावून पाहिले तर अन्याय, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, सामाजिक विषमता आदी दुष्प्रवृत्तींरूपी रज-तमाचा अंधार दिसून येतो. आपला समाज, राष्ट्र आणि धर्म हे या अंधारात खितपत पडले आहेत. त्यांना अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याची आवश्यकता आहे.'
आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन)  आणि  कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशी दिवाळीत न धरता, 'दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे', असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत.

दीपावली कशी साजरी कराल ?

१. दीपावली शुभचिंतन
    दीपावली म्हणजे शरद ऋतूतील आश्विन मासातील शेवटचे दिवस आणि कार्तिक मासातील प्रतिपदा, द्वितीया अन् पंचमी या सम्मुच्चयाने येणारा सणांचा समूह. दीपावली म्हणून दीपोत्सव करून आनंद प्रकट केला जातो. या प्रत्येक दिवसाचे काय वैशिष्ट्य आहे, ते पाहिल्याशिवाय खरा दीपोत्सव होणार नाही.
प.पू. पांडे महाराजांनी भगवत्प्राप्तीच्या संदर्भात दीपावलीचा अर्थ स्पष्ट करणे
    प.पू. पांडे महाराज मला म्हणाले,  "प.पू. डॉक्टरांनी अज्ञान आणि अंधःकार दूर केला आहे. तुझा दिवा पेटला आहे. आता हे दिवे असेच लावत रहाणे, दिव्यांची ओळ करणे, म्हणजेच दीपावली ! तसे तुला व्हायचे आहे. अज्ञानाचा अंधःकार दूर करून ज्ञान मिळणे, ज्ञानप्राप्ती होणे, भगवत्प्राप्तीचा आनंद मिळवणे म्हणजे दिवाळी ! हिंदु धर्मातील प्रत्येक सण असेच प्रतीकाचे स्वरूप म्हणून आपण साजरे करतो. तसे तुला 'ज्योतसे ज्योत जगावो', या आरतीप्रमाणे प्रतिदिन दिवाळी साजरी करायची आहे."
- कु. दीपाली मतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सनातन आणि अरुण रामतीर्थकर

    वर्ष २००५ पासून ते सनातनच्या संपर्कात होते. वर्ष २००८ पासून त्यांनी दैनिक सनातन प्रभातचे वाचन चालू केले. सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव, हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभा, प्रांतीय हिंदू अधिवेशन यांसह अन्य काही छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतून रामतीर्थकर यांनी हिंदुत्वाविषयी मार्गदर्शन केले होते. शेवटच्या काळात रुग्णालयात सनातनचे साधक त्यांना भेटायला गेलेे, तेव्हाही ते म्हणाले, "माझ्या डोक्यात राष्ट्र-धर्माचे विचार आहेत. ते लिहिले पाहिजेत."
तत्त्वनिष्ठ आणि बाणेदार पत्रकार !
    अनेक घटना-प्रसंगांच्या आणि हिंदूंच्या प्रश्नांच्या अभ्यासानंतर हिंदूंवर अन्याय होत आहे, असे लक्षात आल्यावर ते हिंदुत्ववादी पत्रकार झाले. तेव्हा त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. स्थानिक राजकीय नेत्यांकडून त्रास झाले; परंतु त्यांनी त्याला जुमानले नाही. पत्रकारितेच्या एका नोकरीतून त्यांना बाहेर पडावे लागले, तरी त्यांनी ध्येय सोडले नाही.

तुळशी विवाह

१. तिथी
     हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.
२. पूजन
     श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.
३. वैशिष्ट्ये
    तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करतात.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ सण, धार्मिक उत्सव आणि व्रते)
    तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो. या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी-विवाह असे म्हणतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी-विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येत असतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळावा, यासाठी तुळशी-विवाह हा मुहूर्त कालातच करावा. - एक विद्वान (२०.११.२००४)
(पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण एक विद्वान, गुरुतत्त्व आदी नावांनीही
प्रसिद्ध आहे.)

जे लहान मुलांना कळते, ते सामान्यांना का कळत नाही ?

     गोव्यामध्ये दिवाळीच्या काळात नरकासुर स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजिक केल्या जातात. या कालावधीत अनेक गैरप्रकारही होतात. गोव्यामध्ये नरकासुर दहनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेली अनेक वर्षे सनातनचे साधक या स्पर्धांसंदर्भात सनदशीर मार्गाने प्रबोधन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर हे चित्र प्रसिद्ध करत आहोत.
    गोवा येथील बालसाधक कु. रूदिन वालावलकर याने हे चित्र रेखाटले आहे. या चित्रात नरकासुर स्पर्धेमध्ये लोकांकडून पैसे घेऊन मौजमजा करणारी काही गुंडप्रवृत्तीची मुले दाखवली आहेत. ती मुले मोठ्या आवाजात गाणी लावून ध्वनीप्रदूषण करत आहेत, तसेच त्यांच्या या कृतीचे समर्थन करत राजकारणी त्यांना पारितोषिक देण्याची घोषणा करत आहेत. चित्रातील दुसर्‍या भागात; म्हणजेच ईश्‍वरी राज्यात मात्र हे चित्र पालटलेले दिसते. श्रीकृष्ण बालसाधकांना घेऊन नामजप, प्रार्थना या शस्त्रांच्या आधारे नरकासुराचा वध करत आहे. नरकासुराचा वध झाल्यामुळे वातावरणात सर्वत्र आनंद प्रक्षेपित होऊन असल्याचे चित्रातील झाडे आणि पक्षी यांवरून दिसून येते. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे असुरांच्या राज्यात नरकासुर प्रचंड मोठा दाखवला आहे आणि श्रीकृष्णाचे तेथे अस्तित्वच दाखवलेले नाही, तर ईश्‍वरी राज्यातील चित्रात श्रीकृष्ण प्रधान, तर नरकासुर अगदी नावापुरताच दाखवला आहे.

वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

१. हिंदूंच्या सणांत शिरलेल्या विकृती ! 
१ अ. हिंदूंच्या सणांतून वाढत असलेले उपद्रवमूल्य ! : कर्णकटू आवाजाच्या फटाक्यांची गल्लोगल्ली आतषबाजी करणार्‍यांनी दिवाळीच्या काळात भयनिर्मिती केली आहे. 
१ आ. सणाला उपद्रवकारक स्वरूप येणे, ही धनदांडग्यांच्या काळ्या पैशांमुळे निर्माण झालेली विकृती ! : आपण म्हणजे समाज, असे मानणार्‍या धनदांडग्यांच्या काळ्या पैशांच्या संस्कृतीसमोर मध्यमवर्गाने शरणागती पत्करल्याने अलीकडे अधिकाधिक लोकांना उपद्रव देऊन सण साजरे करणे, ही रीतच बनली आहे. अवैध संपत्तीची उणीव नसलेल्यांनी गणेश चतुर्थी आणि दिवाळी हे सण अधिकाधिक लोकांच्या डोळ्यांत भरतील, अशा प्रकारे साजरे करण्याची स्पर्धा आरंभली. साहजिकच या सणांच्या आनंदाचे आविष्कार अधिक उपद्रवकारक स्वरूप घेऊ लागले.

अरुण रामतीर्थकर यांचे दैनिक सनातन प्रभातच्या धर्मकार्यातील योगदान स्मरणात राहील !

दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई आवृत्तीच्या तपपूर्ती सोहळ्यात मार्गदर्शन करतांना श्री. अरुण रामतीर्थकर, शेजारी सनातन प्रभातच्या प्रतिनिधी सौ. रूपाली वर्तक (वर्ष २०१२)
   
 'समाजवादी, निधर्मी आणि व्यावसायिक पत्रकारितेच्या सध्याच्या काळात प्रखर हिंदुत्ववादी पत्रकारांची वानवा आहे. अरुण रामतीर्थकरकाका केवळ हिंदुत्ववादी पत्रकार नव्हते, तर हिंदुत्ववादी असूनही त्यांची तत्त्वनिष्ठा कोणत्याही पक्षाशी किंवा संघटनेशी बांधील नव्हती आणि त्यामुळेच ती अधिकाधिक सत्यान्वेषी राहिली अन् त्यामुळेच कि काय रामतीर्थकरकाकांना सनातन प्रभातची सत्याचा पुरस्कार करणारी पत्रकारिता भावली. अत्यंत विनम्रता आणि मोकळेपणा हे रामतीर्थकरकाकांचे वैशिष्ट्य होते. त्यांना सनातनच्या साधकांविषयी विश्वास आणि आपलेपणा वाटत असे. त्यामुळे त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती. काकांशी कधी लेख पाठवण्याच्या संदर्भात संपर्क येई, तेव्हा 'मी कोणी ज्येष्ठ पत्रकार आ'हे, असे त्यांच्या बोलण्यातून कधीच जाणवले नाही. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला त्यांचे लेख देतांना ते छापण्याच्या संदर्भात पूर्णतः मोकळीक दिली होती. कधी जागेअभावी एखादे-दुसरे वाक्य काढावे लागले, तरीही त्यांची काही तक्रार नसे.

हिंदूंनो, केवळ आकर्षक दिसण्याच्या हव्यासापोटी बाजारातील चित्र-विचित्र आकारांतील, तसेच चिनी बनावटीचे रज-तम गुणांनी भारित आकाशकंदिल आणण्यापेक्षा धर्मशास्त्रदृष्ट्या योग्य असलेले आकाशकंदिलच आणून दीपावलीच्या सणाचा खर्‍या अर्थाने लाभ करून घ्या !


उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !

    दीपावली साजरी करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली दीपावली साजरी करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह आहे !

असहिष्णुतेचा बागुलबुवा करत देशाची निंदा करू नका ! - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर

  • पुरस्कार वापसीच्या विरोधात देहलीत विशाल मोर्चा  
  • मोर्च्यात सहस्रो नागरिक सहभागी !
      नवी देहली - भारत असहिष्णू झाला आहे, असा कांगावा करत राष्ट्रीय पुरस्कार परत करणार्‍यांना भारत आजही सहिष्णु देशच आहे, हे आम्हाला सांगायचे आहे. आपापली मते मांडण्याचा, विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र देशाची निंदानालस्ती करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते श्री. अनुपम खेर यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले. पुरस्कार वापसीच्या विरोधात खेर यांच्या नेतृत्वाखाली विशाल मोर्च्याचे (मार्च फॉर इंडिया) आयोजन करण्यात आले होते.

दीपोत्सव विशेषांक

दीपावलीच्या शुभदिनी चला दीप लावूया द्वारी ।
आत्मिक विकासाचे शिक्षण देऊया विद्यालयांतूनी ।
अशी आदर्श घडेल भावी पिढी या राष्ट्रातूनी ।
मग या भारतभूमीस वैभव लाभेल पुन्हा फिरूनी ॥

श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक आणि सर्वसाधारण चित्र, तसेच सनातन-निर्मित चित्र यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पष्ट करणारी अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूलभागी गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर लगेच हाताचे दर्शन घ्यावे.
श्रद्धाळू हिंदू प्रतिदिन सकाळी करदर्शन करतांना हा श्‍लोक म्हणत श्री लक्ष्मीदेवीचे स्मरण करतात. अनेकांच्या घरात श्री लक्ष्मीदेवीचे चित्र किंवा मूर्ती यांचे नित्य पूजन केले जाते. दिवाळीत श्री लक्ष्मीपूजन करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. पूजेतील श्री लक्ष्मीदेवीचे चित्र सात्त्विक असेल, तर उपासकाला श्री लक्ष्मीतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो. पेठेत (बाजारात) लक्ष्मीदेवीची विविध प्रकारची चित्रे आढळतात. येथे ३ प्रकारच्या श्री लक्ष्मीदेवीच्या चित्रांचा त्यांच्या भोवतीच्या वायूमंडलावर कसा परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. या चाचणीतून देवतांची चित्रे शास्त्रानुसार असण्याचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येईल.
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही, तसेच तो आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्द प्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच ती खरी वाटते.

नरकचतुर्दशीच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमावर झालेल्या आक्रमणाला १ वर्ष पूर्ण !

साधकांवर प्राणघातक आक्रमण होऊन एक वर्ष होऊनही पोलिसांना समाजकंटकांवर
कारवाई करण्यास आणि त्यांच्या सनातनद्वेषी कारवाया रोखण्यास यश आले नाही !
आक्रमणांचे असे किती वर्धापनदिन झाल्यानंतर पोलीस या 
समाजकंटकांच्या विरोधात कृती करणार आहेत ?
     गेली काही वर्षे सनातनद्वेष्ट्यांकडून सनातनला लक्ष्य केले जात आहे. सनातनच्या आश्रमावर झालेले आक्रमण असो अथवा साधकांना शिवीगाळ करण्याचा, आश्रमासमोरून सनातन बॉम्ब असे ओरडत जाण्याचा प्रकार असो ! मडगाव स्फोटप्रकरणी खोट्या आरोपांखाली अटक केलेल्या सनातनच्या साधकांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होऊनदेखील सनातनद्वेष्ट्यांनी डोळ्यांवर झापडे लावून सनातनला विरोध करणे अन् हिंदुत्वाच्या कार्याला खीळ बसवण्याचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत किंबहुना दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांचे आरोप करून त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

कृष्णाप्रतीच्या उत्कट भावामुळे सनातनच्या साधिकांनी विविध रंगांसह भावाचे रंग भरून रेखाटलेल्या सुंदर आणि सात्त्विक रांगोळ्या !

पाना-फुलांच्या सुंदर रांगोळ्या काढतांना डावीकडे
कु. वृषाली कुंभार आणि कु. दीपाली मतकर
कु. वृषाली कुंभार आणि कु. दीपाली मतकर यांनी काढलेल्या मनमोहक अन्
भाव जागृत करणार्‍या रांगोळ्या, तसेच त्यांच्याभोवती केलेली पाना-फुलांची सजावट

दीपावली

    दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली म्हणजे दीप + आवली. म्हणजे दिव्यांची रांग किंवा ओळ. हा दिव्यांचा उत्सव जे अंतःकरणपूर्वक साजरा करतात, त्यांना अपमृत्यू येत नाही, अशी समजूत आहे. एखाद्याचे चांगले झाले, तर त्याचे अभिनंदन करतांना मग आता काय दिवाळीच दिवाळी असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा हे वचन आपल्या मोठेपणाच्या कल्पना कोणत्या सणाशी निगडित आहेत, ते दाखवते. जीवनेच्छा वर्धिष्णु करणार्‍या प्रेरणा देणार्‍या या दीपावलीच्या निमित्ताने देव, देश अन् धर्म यांचे आपल्या प्रत्येकाच्या हृदयातील स्थान वृद्धींगत करूया !

आकाशकंदिल

    हा दिव्यांच्या आराशीचाच एक भाग आहे. आश्‍विन शुक्ल पक्ष एकादशी ते कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीपर्यंत घराच्या बाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्याला आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधी पुढीलप्रमाणे असतो. घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमळ काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात उंचीचा खांब पुरावा. तो वस्त्र, पताका, अष्टघंटा आणि कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृती दीप (कंदिल) करून अडकवावा. त्या दीपात (कंदिलात) मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूति, दामोदर, धर्मराज, प्रजापति, पितर आणि प्रेत यांना उद्देशून लावावेत. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
दामोदराय नभसि तुलायां दोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ॥
अर्थ : श्रेष्ठ असा परमेश्‍वर जो दामोदर, त्याला हा ज्योतीसह दीप अर्पण करतो. त्या तेजस्वी अनंताला मी नमस्कार करतो. याचे फल लक्ष्मीप्राप्ती हे आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीयत्व दर्शवणारे सर्वव्यापी कार्य !

अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी कार्यरत अलौकिक विभूती !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (संस्थापक, सनातन संस्था)
     शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी साधकांना काळानुसार योग्य साधना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे साधकांसाठी मोक्षगुरु आहेत. केवळ अध्यात्मावरच नव्हे, तर धर्म, कला, भाषा, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी सर्वांगीण विषयांवर विपुल ग्रंथलिखाण करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ज्ञानगुरु आहेत. अनेक हिंदु धर्मीय, हिंदुत्ववादी, धर्मप्रसारक आणि संत यांना ते धर्मगुरु वाटतात. हिंदु राष्ट्राचा सर्वप्रथम उद्घोष केल्याने राष्ट्रप्रेमींना ते राष्ट्रगुरु वाटतात. त्यांच्याकडून देश-विदेशांतील विभिन्न पंथियांना अमूल्य मार्गदर्शन लाभत असल्याने ते एका अर्थी जगद्गुरु ठरतात.
     अशा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काही धर्मविरोधक, बुद्धीप्रामाण्यवादी आणि नास्तिक मंडळी अपप्रचार करतात,

यज्ञस्थळाच्या सात्त्विकतेचा सोमयागातील प्रवर्ग्य विधीतील ज्वाळांवर होणारा परिणाम !

देवतांचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणारी रांगोळी काढून आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या !

    सनातन हिंदु संस्कृतीत रांगोळीचे एक आगळे वेगळे आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामागे शुद्ध शास्त्रीय दृष्टीकोन आहे. रांगोळीतील नक्षी, आकार, शुभचिन्हे यांनुसार त्यातून प्रक्षेपित होणारी स्पंदने पालटतात. त्याचप्रमाणे रांगोळीच्या जागेनुसारही तिच्यातून त्रिगुणांचे प्रमाण पालटते. रांगोळी काढतांना देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक आकारांच्या साहाय्याने रांगोळ्या काढल्यास त्या ठिकाणी त्या त्या देवतेचे तत्त्वही आकृष्ट होते. या बरोबरच रांगोळी काढणार्‍या व्यक्तीचा भाव जास्त असल्यास त्या रांगोळीतील सात्त्विकता आणि चैतन्य यांचे प्रमाण तर वाढतेच; पण त्याचबरोबर आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक शक्तीचे प्रक्षेपणही त्या रांगोळीतून होते. इतकेच नव्हे, तर अशा सात्त्विक रांगोळ्यांतून आनंद आणि शांती यांचेही प्रक्षेपण होते अन् त्याचा लाभ तेथील व्यक्तींनाही होतो. येथे देवतांचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्यांची काही उदहारणे देत आहोत.
सनातनची ग्रंथसंपदा SanatanShop.com वर उपलब्ध !

दीपावलीच्या मंगल प्रसंगी काढावयाच्या रांगोळ्या

 ११ ठिपके, ११ ओळी
 १३ ते ७ ठिपके
 संदर्भ : सनातनचा ग्रंथ सात्त्विक रांगोळ्या

श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ हानीकारक आहे, तर सनातन-निर्मित (शास्त्रानुसार बनवलेले) चित्र पुष्कळ लाभदायक आहे, हे दर्शवणारी पिप छायाचित्रे !

सनातन-निर्मित चित्र
 सूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूलभूत प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १) करतांना छायाचित्रातील पटल, तसेच चित्र यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

नरकासुर प्रतिमादहनाच्या प्रथेसंबंधीची स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करा !

  • नरकासुर स्पर्धांसाठी पारितोषिके प्रायोजित न करणे, नरकासुराऐवजी श्रीकृष्ण प्रतिमा स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्तेजन देणे.
  • आपले समव्यावसायिक आणि मित्रमंडळी यांना नरकासुराऐवजी श्रीकृष्णाला महत्त्व देण्याविषयी समजावून सांगणे 
  • रात्रभर ध्वनीप्रदूषणामुळे होणारा त्रास, वाहतुकीतील अडथळा, महिलांची छेडछाड यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करणे 

नरकासुर प्रतिमादहन प्रथेविषयी वस्तूनिष्ठ विचार करा !

     देव आणि मानव यांना त्रास देणार्‍या अन् सोळा सहस्र उपवर राजकन्यांना विवाहाच्या लालसेने कारागृहात डांबणार्‍या नरकासुराला श्रीकृष्णाने आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या दिवशी ठार मारून सर्वांना आनंदी केले. या तिथीला जो अभ्यंगस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होणार नाही, असा वर श्रीकृष्णाने दिला; म्हणून या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. गोवा आणि नजीकच्या भागांत या दिवशी नरकासुर प्रतिमादहनाची प्रथा आहे.

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्र कर्जबाजारी असतांना फटाके वाजवणे, हा राष्ट्रद्रोहच !
     राष्ट्राला अब्जावधी रुपयांचे कर्ज असतांना आणि ४० टक्के जनता दारिद्य्रात होरपळून निघत असतांना फटाके वाजवणे, हा राष्ट्रद्रोहच होय.

हिंदू तेजा जाग रे !


Jago ! : Diwalime Devataonke chitra honewale Patakhe na fode. Is bare me apne parijanokabhi prabhodan kare !
                                     Devataonka vidamban rokhkar Dharmaraksha kare !
जागो ! : दिवालीमें देवताआेंके चित्र होनेवाले पटाखें न फोडे. इस बारे में अपने परिजनोंका भी प्रबोधन करें !
                                                देवताआका विडंबन रोखकर धर्मरक्षा करें !

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !

साधकांना महत्त्वाची सूचना
     सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर अवैध कारवायांत गुंतलेली अथवा राष्ट्रविरोधी संघटना असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा अथवा सनातनच्या कार्यात रस असल्याचा देखावा करून सनातनचे आश्रम, सेवाकेंद्र किंवा साधकांच्या निवासस्थानी येऊ शकतात आणि काही आक्षेपार्ह वस्तू तेथे ठेवून जाऊन पोलिसांकडे तक्रार करू शकतात. यामुळे संस्था आणि साधक अडचणीत येऊ शकतात.

साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आत्मज्योत जागृत करा अन् खर्‍या दीपावलीचा आनंद मिळवा !

प.पू. परशराम पांडे
     आज आपण केवळ नवीन वस्त्रे परिधान करणे, गोडधोड खाणे, दीप लावून आरास करणे, फटाके वाजवणे, अशी औपचारिक दृष्टीने दीपावली साजरी करतो. त्यामुळे तेवढ्यापुरता आनंद मिळतो; परंतु तो नेहमीसाठी टिकून रहात नाही. चिरंतन आनंद मिळवण्यासाठी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आत्मज्योत जागृत करणे अन् त्या आत्मज्योतीने समाजातील दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, हा दीपावलीचा खरा अर्थ आहे. दीपावली सणाविषयी प.पू. पांडे महाराज यांनी साधनेच्या दृष्टीकोनातून केलेले अमूल्य मार्गदर्शन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर देत आहोत.

साधकांना सूचना !

पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी सणांच्या दिवशी भमणभाषवरून शुभेच्छा देणे टाळा !
     दिवाळी, गणेश चतुर्थी, होळी आदी सणांच्या वेळी हिंदू त्यांचे आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक यांना भ्रमणभाषवर शुभेच्छा देतात किंवा शुभेच्छा देणारे लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) पाठवतात. भ्रमणभाष आस्थापने हिंदूंच्या सणांचे दिवस ब्लॅक आऊट डे म्हणून पाळत असल्यामुळे या दिवशी भ्रमणभाष आस्थापनांच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या प्लॅनच्या सुविधा आणि सूट यांचा लाभ मिळत नाही.

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांनी अमावास्या आहे.
प्रारंभ - आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.११.२०१५) रात्री ९.२३ वाजता
समाप्ती - आश्‍विन अमावास्या (११.११.२०१५) रात्री ११.१७ वाजता

पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी सणांच्या दिवशी भ्रमणभाषवरून शुभेच्छा देणे टाळा !

साधकांना सूचना !
     दिवाळी, गणेश चतुर्थी, होळी आदी सणांच्या वेळी हिंदू त्यांचे आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक यांना भ्रमणभाषवर शुभेच्छा देतात किंवा लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) पाठवतात. भ्रमणभाष आस्थापने हिंदूंच्या सणांचे दिवस ब्लॅक आऊट डे म्हणून पाळत असल्यामुळे या दिवशी आस्थापनांच्या वतीने घोषित केलेल्या प्लॅनच्या सुविधा आणि सूट यांचा लाभ मिळत नाही.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व !
    सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण चित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय !          
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भाव आणि भावना यांत काय भेद आहे ?

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
॥ हरि ॐ तत्सत् ॥
     भाव ही चित्ताची एक अवस्था आहे. गुण आणि गुणी यांच्या संयोगस्वरूपात जी चित्ताची एकाग्रस्थिती निर्माण होते, तिला भाव म्हणता येईल आणि भावना हा मनाच्या स्तरावरील वृत्तीचा प्रकार.

अज्ञानी धर्मद्रोही आणि बुद्धीप्रामाण्यवादी !

परात्पर गुरु डॉ. आठवले
सनातनवर बंदी आणा, अशी मागणी धर्मद्रोही आणि बुद्धीप्रामाण्यवादी गेली ८ वर्षे अधून मधून करत आहेत. ते साधना करत नसल्यामुळे त्यांना कालमहात्म्य, सूक्ष्म जगत, भगवंताची कृपा इत्यादी गोष्टी कळत नाहीत. देव भक्तांचे रक्षण करतो आणि भक्तांना छळणार्‍यांना धडा शिकवतो, ही प्राथमिक माहितीही त्यांना नसते. पृथ्वीवरील घटना क्षुल्लक आहेत. खरे युद्ध देव आणि असुर यांच्यात असते अन् प्रत्येक युद्धात देवच जिंकतात, हेही त्यांना ज्ञात नसते. त्यांना साधना करून भगवंताची कृपा अनुभवण्याची बुद्धी होवो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.९.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

नरकचतुर्दशीची पहाट !

     देशभर प्रचंड उत्साहात साजरा होणारा दिवाळी सण दोन दिवसांवर आला आहे. हा सण साजरा होण्यातील बाज आणि उत्साह पाहून अमेरिकेने तो संसदपातळीवर साजरा करण्यास आरंभ केला. त्यापाठोपाठ इंग्लंडनेही तशाच स्वरूपात दिवाळी सण साजरा करण्याचे ठरवले. आणखी काही देश दिवाळी साजरी करण्यासाठी उत्सुक असल्याची चाहूल मागच्या दिवाळी सणाच्या वेळी लागली होती. या दिवाळीला त्याविषयीचे खरे चित्र उघड होईल. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, असे या सणाचे वर्णन केले गेलेले असल्यामुळे कुणी बिगरहिंदूंनी तो साजरा केला, तर त्यात कुणाला आश्‍चर्य वाटणार नाही. येथे बिगरहिंदूंनी म्हटल्यामुळे कुणी साम्यवादी किंवा निधर्मी पुढे येऊन म्हणेल की, कुणी काय करावे आणि कशाचा आनंद लुटायचा, हे कुणी शिकवायची आवश्यकता नाही. प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍यांच्या मर्यादा आम्ही ओळखून आहोत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn