Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आता अरुंधती रॉय पुरस्कार परत करणार !

काश्मीरमधील फुटीरतावादाचे समर्थन करणार्‍या देशद्रोही अरुंधती रॉय यांना तेथील जिहादी आतंकवादामुळे साडेचार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागल्याची घटना ही असहिष्णुता वाटणार नाही, हे लक्षात घ्या !
नवी देहली - अल्पसंख्यांकांवरील आक्रमणे, विचारवंतांच्या हत्या, गोमांस बंदी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवरील निर्बंध अशी कारणे पुढे करत काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान करणार्‍या लेखिका अरुंधती रॉय यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. (काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग नाही, असे बरळणार्‍या रॉय यांनी पुरस्कार परत करणे, म्हणजे काही विशेष नाही. मुळात अशी देशद्रोही विचारसरणी असणार्‍या लेखिकेला पुरस्कार कसा मिळाला, हाच जनतेला पडलेला प्रश्‍न आहे. - संपादक) रॉय म्हणाल्या, पुरस्कार वापसीची चळवळ म्हणजे एकप्रकारचे राजकारणच आहे.(बरे झाले, अरुंधतीबाईंनी पुरस्कारवापसीची चळवळ हे राजकारण असल्याचे स्वतःच सांगून टाकले. - संपादक) त्याचा भाग होत असल्याचा मला अभिमान वाटतो. सध्या देशात जे चालू आहे, त्याची मला लाज वाटते. (काश्मीरमधील अल्पसंख्यांक अर्थात् हिंदूंवर होणारी आक्रमणे, पाकिस्तानकडून केली जाणारी घुसखोरी यांची अरुंधतीबाईंना लाज वाटल्याचे कधी ऐकिवात नाही. निवडक गोष्टींचीच लाज वाटून घेणे, हा दुटप्पीपणा नाही, तर दुसरे काय आहे ? - संपादक)

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम्.के. नारायणन् यांच्यावर तमिळ समर्थकाने चप्पल भिरकावली !

दीड लाख तमिळी नागरिकांच्या संहाराला उत्तरदायी असल्याचा आरोप !
नवी देहली - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले एम्.के. नारायणन् यांच्यावर येथील एका तमिळी नागरिकाने चप्पल भिरकावली. तमिळी शरणार्थिंच्या समस्यांवर आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात ही घटना घडली. प्रभाकरन् असे चप्पल भिरकावणार्‍या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्यास त्वरित अटक केली. तो पुडुकोट्टाई येथील रहिवासी आहे. या घटनेत नारायणन् यांना कोणतीही इजा झाली नाही. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना घडल्यानंतर नारायणन् हसत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. येथील संगीत आकादमीत या चर्चासत्राचा कार्यक्रम चालू होता. तमिळ समर्थक संघटनांनी नारायणन् यांना विरोध करण्याचे आवाहन केले होते.

निवडणुकीनंतरच्या अंदाजात बिहारमध्ये रालोआला २४३ पैकी १२० जागा

    पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारमध्ये ५ नोव्हेंेबरला पार पडलेल्या विधानसभेच्या अंतिम टप्प्याच्या मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीनंतरचे अंदाज (एक्झिट पोल) वर्तवले आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) एकूण २४३ पैकी १२० जागा, तर राजद, जनता दल आदींची असलेल्या महाआघाडीला ११५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी बिहारमध्ये महाआघाडीचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तवला आहे. या निवडणुकीची मतमोजणी ८ नोव्हेंबरला होणार आहे.

व्हॅटीकनमध्ये चालत असलेली कुकृत्ये हेरांकडून उघडकीस !

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या व्हॅटीकनमध्येच जर अशी स्थिती असेल, तर त्यांच्या इतर धार्मिक ठिकाणांची काय अवस्था असेल, याचा विचारच न केलेला बरा !
व्हॅटीकन (रोम) - व्हॅटीकनमध्ये एका माजी कर्मचार्‍याने हेरगिरी करून तेथील कुकृत्ये उघडकीस आणली आहेत. विशेष म्हणजे या हेरगिरीत स्वत: पोप यांच्या वैयक्तिक दूरध्वनीवरील संभाषणही ध्वनीत केले गेले आहे. या हेरगिरीवर आधारित लिहिलेल्या पुस्तकांत अनेक कुकृत्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हेरगिरी करणारे फ्रांसेस्का चौकी आणि ल्युसिओ अँजेल व्हालेजो यांना व्हॅटीकन पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले आहे. याआधी पोप यांच्या आचार्‍याला काही गुपिते उघड केल्यामुळे कारावासाची शिक्षा झाली होती.

असहिष्णुतेच्या विरोधात काँग्रेसने बोलणे हास्यास्पद ! - व्यंकय्या नायडू, केंद्रीय शहर विकासमंत्री

     नवी देहली - लेखक, साहित्यिक यांच्या पुरस्कारवापसीवर भारतीय जनता पक्षाने कठोर टीका केली आहे. कथित असहिष्णुतेच्या गप्पा मारणारी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष आणीबाणीच्या काळात व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असतांना मूग गिळून का गप्प बसले होते, असा खणखणीत प्रश्‍न भाजपचे शहर विकासमंत्री तथा नेते व्यंकय्या नायडू यांनी विचारला. पत्रकार परिषदेत नायडू यांनी काँग्रेसने कथित असहिष्णुतेच्या विरोधात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटणे म्हणजे सर्वांत मोठा विनोद असल्याची टीका केली.

(म्हणे) समाजात दुफळी माजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे !

देशाच्या फाळणीला कारणीभूत असणार्‍या आणि देशावर सर्वाधिक काळ सत्तेत असतांना केवळ 
जात-धर्मावर आधारित राजकारण करून देशाच्या एकसंधतेला बाधा आणणार्‍या काँग्रेसच्या 
अध्यक्षांना भाजप शासनावर बोलण्याचा काय अधिकार ?
सोनिया गांधी यांचा कांगावा !
     नवी देहली, ५ नोव्हेंबर - सध्या देशात घडणार्‍या दुःखद घटना सूत्रबद्ध रणनीतीचा भाग असून, समाजात दुफळी माजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. काही संघटना, शासनाशी संबंधित व्यक्ती आणि शासनामधील मंत्री देशातील बहुरंगी संस्कृती आणि सिद्धांत यांच्यावर आक्रमण करत आहेत. राष्ट्रपतींनी यावर आपले मत प्रदर्शन केले आहे; पण पंतप्रधान मात्र मौन पाळून या घटनांना पाठिंबा दर्शवत आहेत. या प्रकरणी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. 

बनावट चलनामुळे भारताच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए)

     कोलकाता - सीमेपलीकडून होणार्‍या बनावट नोटांच्या तस्करीमुळे भारताच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत आहे. बांगलादेश आणि बंगाल येथील काही आतंकवादी बनावट नोटांची तस्करी करून त्या चलनात आणत आहेत, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयएने) आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. एन्आयएने बराकत अली या आरोपीच्या विरोधात भारत-बांगलादेशच्या सीमेपलीकडून बनावट नोटा भारतात आणणार्‍या टोळीच्या आतंकवादी कटात सामील असल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या बनावट नोटा भारतात चलनात आणल्या जातात आणि त्यामुळे भारताच्या आर्थिक स्थिरतेची हानी होते. ६ मे २०१५ मध्ये गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीमा सुरक्षा दलाने भारत-बांगलादेश सीमेजवळ १ सहस्र आणि ५०० रुपयांच्या ८ सहस्र ९१५ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणी बराकत अली याला अटक करण्यात आली होती, तर त्याचे दोन साथीदार पळून गेले होते. या बनावट नोटा प्रकरणात आतंकवाद्यांची मोठी टोळी सामील असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवले होते. बंगालच्या सीमेजवळील आणि बांगलादेशमधील काही आतंकवादी बनावट नोटा तस्करीच्या कटात सामील असल्याचे एन्आयएने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या रशिया दौर्‍यात क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेसाठी वाटाघाटी

     नवी देहली - रशियाच्या दौर्‍यावर असलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारतासाठी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आणि अणूपाणबुडी घेण्यासाठी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांशी वाटाघाटी केल्या. दोन्ही देशांतील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्याच्या करारावर या वेळी स्वाक्षर्‍या झाल्या. 

दाऊदच्या पाकिस्तानातील घराला पाकिस्तानी लष्कराचे संरक्षण

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, हे भारताने जाणावे !
     नवी देहली - कुख्यात गुंड छोटा राजनला अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून गुन्हेगारी जगतातील गुंड दाऊद इब्राहिमला सुरक्षा पुरवण्यात येत आहे. पाकिस्तानने दाऊदच्या कराची आणि इस्लामाबाद येथील निवासस्थानाच्या बाहेर लष्काराचे कमांडो तैनात केले आहेत. वर्ष १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी दाऊद भारताला हवा आहे. 

बांगलादेशात तीन ब्लॉगर्सवर प्राणघातक आक्रमण

     ढाका - बांगलादेशात अहमेदूर रशीद तुतुल (वय ४३ वर्षे), रणदीपम बसू (वय ५० वर्षे), तारीक रहिम (वय ३० वर्षे) या ३ ब्लॉगर्सवर अज्ञात आक्रमणकर्त्यांनी प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात हे तिघेही जण गंभीर घायाळ झाले असून उपचारार्थ त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे. त्यातील तुतुल यांची प्रकृती चिंताजनक आहे. शुधाश्‍वर प्रकाशनाच्या कार्यालयानजीक हे आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांनी या तिघांना गोळ्या झाडल्या, तसचे चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला. नंतर आक्रमणकर्ते पळून गेले. बांगलादेशमध्ये चालू वर्षी ४ ब्लॉगर्सची हत्या झाली आहे.

केरळने नाकारलेल्या संस्कृत चित्रपटाची गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

केरळ शासनाचा हिंदुद्वेष ! देववाणी संस्कृतचे महत्त्व निधर्म्यांना (अधर्म्यांना) काय कळणार ?
नवी देहली - प्रियमानसम् या संस्कृत चित्रपटाद्वारे हिंदुत्वाचे उदात्तीकरण होत असल्याचा कांगावा करत केरळ शासन आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो नाकारला गेला. तथापि गोव्यात २० नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फीचा) प्रारंभच मुळी प्रियमानसम् हा चित्रपट दाखवून करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. विनोद मानकारा यांनी या निर्णयाविषयी आनंद व्यक्त केला आहे. हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय म्हणजे भारताच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेल्या संस्कृत भाषेचा बहुमान आहे. इतकी वर्षे संस्कृत भाषेची हेळसांड करण्यात आली; मात्र आता तिला उर्जितावस्था प्राप्त होत आहे, याचा आनंद होत आहे, असे श्री. मानकारा म्हणाले.

५४ नगरसेवक आठवी पास आणि २६ नगरसेवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे !

अल्पशिक्षित आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले लोकप्रतिनिधी 
निवडून येणे, हे लोकराज्याचे अपयश नव्हे का ?
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक
     ठाणे, ५ नोव्हेंबर - कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून गेलेल्या १२० पैकी ५४ नगरसेवकांचे शिक्षण हे आठवीपेक्षाही अल्प आहे, तर २६ नगरसेवकांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस या संस्थांनी केलेल्या पाहणीतून उघड झाली आहे. यासाठी त्यांनी नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जातील माहितीचा आधार घेतला. १२० पैकी ३ नगरसेवक अशिक्षित आहेत.

अभिनेते शाहरूख खान, अजय देवगण आणि गोविंदा यांना नोटीस

अशा अभिनेत्यांचा आदर्श भावी पिढी ठेवणार का ?
पान मसाल्याचे विज्ञापन केल्याचे प्रकरण
    मुंबई - गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू किंवा पान मसाला या उत्पादनांवर बंदी असून त्या उत्पादनांची विज्ञापने करणार्‍या कलाकारांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून नोटिसा पाठवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पान मसाल्याचे विज्ञापन केल्याच्या प्रकरणी अभिनेते शाहरूख खान, अजय देवगण आणि गोविंदा यांना अन्न आणि औषध प्रशासनाने नोटीस बजावली आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून राज्यात गुटखा आणि तत्सम उत्पादनांवर बंदी आहे. असे असूनही काही कलाकार अशा उत्पादनांचे विज्ञापन करतात. त्यामुळेच शासनाने हे पाऊल उचलले आहे. (अशा पदार्थांचे विज्ञापन करण्यासह ती उत्पादितच होणार नाहीत, अशी व्यवस्था शासनाने करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

फटाक्यांद्वारे होणारे देवतांचे विडंबन आणि प्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगण, कर्नाटक आणि ओडिशा येथे प्रशासनाला निवेदन सादर !

फटाक्यांच्या विरोधात समितीची राष्ट्रव्यापी मोहीम
राऊरकेला, ओडिशा येथे देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर बंदी घालण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी
     राऊरकेला, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - फटाक्यांच्या वेष्टनावर असलेल्या श्रीलक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आदि देवतांची, तसेच सुभाषचंद्र बोस, भगतसिंह अशा क्रांतीकारकांची चित्रे छापल्याने त्यांचा घोर अनादर होतो. अशा स्थितीत धार्मिक भावना दुखावल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होतो. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणही निर्माण होते. कोट्यवधी रुपयांचे फटाके फोडल्यांमुळे राष्ट्रीय संपत्तीची हानीही होते. देशात कोट्यवधी लोकांना एक वेळचे जेवण मिळणेही दुर्लभ असतांना फटाके फोडून कोट्यवधी रुपये नष्ट करणे हे देशहीताच्या विरोधी आहे; म्हणून देवता आणि राष्ट्रभक्त यांची चित्रे छापून त्यांचा अवमान करणारी त्याचबरोबर प्रदूषण निर्माण करणार्‍या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीद्वारे येथील अतिरीक्त जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत त्यांचे स्वीय सचिव श्रीमती निभा भट्टाचार्यजी यांनी हे निवेदन स्वीकारले.

फटाक्यांवर देवतांची चित्रे छापण्यापासून रोखण्याची हळियाळ, कर्नाटक येथील हिंदुत्ववाद्यांची मागणी

     हळियाळ, ५ नोव्हेंबर - दिवाळीच्या वेळी फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. त्या वेळी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असेलेले फटाकेही फोडले जातात. त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. असे करणे हे भारतीय दंडसंहिता परिच्छेद २९५ (अ)नुसार अपराध आहे, तसेच केंद्रशासनाच्या व्यापार चिन्हे कायदा १९९९ यातील परिच्छेद ९ (२) (बी) अनुसार व्यापारी उत्पादनावर धार्मिक चिन्हे तसेच चित्रे छापणे हा अपराध आहे. त्यामुळे अशा फटाक्यांवर देवतांची चित्रे छापणे रोखावे, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हळियाळचे तहसीलदार श्री. विद्याधर गुळगुळी आणि पोलीस उपनिरीक्षक ई.सी. संपतकुमार यांना देण्यात आले. हे निवेदन ४ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. विठोबा माळ्सेकर, शंकर रेणके, प्रसाद हुण्सवाडकर, अनील मुतनाळ, अप्पाजी शहापूरकर, संतोष घटकांबळे, पद्मा आणि पूजा धूळी, प्रकाश गिरी, मल्लेशी हुरकड्ली, तसेच इतर संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

फटाक्यांद्वारे होणारे देवतांचे विडंबन रोखण्याविषयी लक्ष घालणार असल्याचे भाग्यनगर, तेलंगण येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

    भाग्यनगर (हैदराबाद) - फटाक्यांद्वारे होणारे हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीने भाग्यनगरचे जिल्हाधिकारी श्री. राहुल बोज्जा यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. फटाक्यांच्या वेस्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे छापली जातात. हे फटाके फोडल्यानंतर देवतांच्या चित्रांच्या चिंध्या होतात. त्यामुळे हिंदूंच्या देवतांची विटंबना होते, हे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी , मी उद्योग खात्याला या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगेन, असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चंद्र मोगेर, श्री. मोहन गौडा, पू. बापूजी आश्रमाचे श्री. नागपाल, श्री. भार्गव आणि श्री. प्रसन्ना उपस्थित होते.

फटाक्यांच्या माध्यमातून देवतांचे होणारे विडंबन रोखणे, हे शासनाचे दायित्व ! - श्री. गोपी किशन, जिल्हाप्रमुख, शिवसेना

इंदूर (तेलंगण) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन
पत्रकार परिषदेत डावीकडून डॉ. विशाल, श्री. संजय पुरोहित,
श्री. कोंडा अशन्न, श्री. नेला तुकाराम, श्री. गोपी किशन, अधिवक्ता शरद चंद्रा
      निजामाबाद, ५ नोव्हेंबर - देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्यामुळे त्या माध्यमातून देवतांचा अवमान होतो. याविषयी निवेदन देऊनही शासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे शासन आम्हा हिंदुत्ववाद्यांना ते विडंबन थांबवण्यासाठी उद्युक्त करत आहे. डेन्मार्क येथे महंमद पैगंबर यांच्या अवमानाच्या विरोधात केंद्रशासन पाठिंबा देते; परंतु या देशात देवतांचा अवमान केल्यावर केंद्रशासन गप्प रहाते. असे चालणार नसून फटाक्यांच्या माध्यमातून देवतांचे होणारे विडंबन रोखणे, हे शासनाचे दायित्व आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे खणखणीत प्रतिपादन येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. गोपी किशन यांनी केले.

जगभरातील शक्तीशाली व्यक्तींच्या सूचीत पंतप्रधान मोदी ९ व्या स्थानावर !

    न्यूयॉर्क - जगभरातील शक्तीशाली व्यक्तींच्या सूचीतील सर्वोच्च १० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील शक्तीशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी हे ९ व्या स्थानावर आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सर्वांत शक्तीशाली व्यक्तीमत्त्व म्हणून प्रथम क्रमांकावर आहेत.
    फोर्ब्स मासिकाने वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जगभरातील शक्तीशाली व्यक्तींच्या सूचित मोदी १४व्या स्थानावर होते. यंदाच्या वर्षी घोषित केलेल्या सूचीत मोदी यांनी ९ व्या स्थानी झेप घेतली आहे. शक्तीशाली व्यक्तींच्या सूचित जर्मन चॅन्सलर अँगेला मार्कल दुसर्‍या, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा तिसर्‍या, पोप फ्रान्सिस चौथ्या आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग पाचव्या स्थानावर आहेत. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे शासन चालवणे सोपी गोष्ट नाही. मोदी यांनी विकासाचे उद्दिष्ट लक्षात ठेवून विरोधकांवर अंकुश ठेवायला हवा, असे फोर्ब्सने म्हटले आहे. (मोदी यांनी काय करायला हवे आणि काय नको, हे फोर्ब्सने सांगण्याची आवश्यकता नाही. असे सांगून एक प्रकारे भारताच्या राजकारणात करण्यात येणारी ढवळाढवळ शासनाने वेळीच रोखावी ! - संपादक)

शासनाने जप्त केलेल्या डाळीची १०० रुपये दराने विक्री

      मुंबई - शासनाने विविध ठिकाणी धाडी टाकून जप्त केलेल्या डाळीची १०० रुपये दराने विक्री काही ठिकाणी चालू केली आहे. भाजपचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री श्री. गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. त्याप्रमाणे भाजपने ठिकठिकाणी वितरण केंद्रेही उभारली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून डाळीचे दर अल्प करण्याचे आश्‍वासन घेतले होते.

सनातन संस्थेच्या आश्रमातील सेवाधर्म कौतुकास्पद ! - प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये

पुणे येथील संत प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये यांचे देवद, पनवेल येथील आश्रमात शुभागमन ! 

शाल आणि श्रीफळ देऊन प.पू. आबांचा सन्मान
करतांना प.पू. पांडे महाराज, उजवीकडे सौ. मंगला उपाध्ये
परिचय 
     प.पू. आबा उपाध्ये हे सर्वांच्या कल्याणार्थ सतत उपासनेत मग्न असतात. त्यांचे गुरु सत्यलोकनिवासी प.पू. सदानंद स्वामी यांच्याशी त्यांचे सतत अनुसंधान असते. 
प.पू. आबा उपाध्ये यांचे आश्‍वासक उद्गार ! 
     आम्हाला कधीही अडचण आली, काही संकट आले, तर प.पू. आबा म्हणतात, "काही होणार नाही. देवतांचा आशीर्वाद आणि आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत." त्यांचे हे शब्द आम्हाला आश्‍वस्त करतात, या शब्दांत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांचे गुणवर्णन केले होते.

रक्कम आणि मौल्यवान वस्तू पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात न ठेवता राष्ट्रीयीकृत बँका अथवा कोषागार येथे ठेवावा ! - उच्च न्यायालय

पोलीस कर्मचार्‍याने १५ लाख रुपये गहाळ केल्याचे प्रकरण
पोलीसच चोर होत असल्याने न्यायालयाला
असे आदेश द्यावे लागणे, हे राज्यासाठी चिंताजनक !
     पुणे - नागपूर येथील पोलीस ठाण्यात कह्यात घेतलेले १५ लाख रुपये पोलीस कर्मचार्‍याने गहाळ केले असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेली रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात न ठेवता राष्ट्रीयीकृत बँका अथवा कोषागार येथे ठेवाव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र शासनाने कुठलेही आदेश न काढल्याने पोलीस संभ्रमावस्थेत आहेत. राज्याचे कायदा-सुव्यवस्था विभागाचे विशेष महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी राज्यातील सर्व पोलीस दलांशी पत्र्यव्यवहार केला असून शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर त्याची माहिती तत्काळ देण्यात येईल, असे सांगितले आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विजयी नगरसेवकांमध्ये २४ टक्के नगरसेवकांवर गुन्हे प्रविष्ट ! - प्रतिज्ञापत्र विश्‍लेषणात एडीआर्चा निष्कर्ष

हे लोकशाहीचे अपयश नव्हे का ?
    कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - महानगरपालिकेच्या निकालानंतर येथील सभागृहातील ७५ उमेदवारांमध्ये गुन्हेगारी प्रकरणे प्रविष्ट असलेले १८ आणि गंभीर स्वरूपांचे गुन्हे प्रविष्ट असलेले १० उमेदवार आहेत. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर्) यांनी ८१ उमेदवारांपैकी ७५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्‍लेषण केल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. गुन्हेगारी प्रकरणे प्रविष्ट असलेल्या उमेदवारांचे प्रमाण २४ टक्के आहे. (गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकांना निवडून दिल्यानंतर कशावरून ते पुन्हा गुन्हे करणार नाहीत ? त्यांच्याकडून विकासांच्या कामांची अपेक्षा करता येईल का ? यासाठी स्वच्छ प्रतिमेचे नगरसेवकच हवेत ! - संपादक) २७ उमेदवार अतिश्रीमंत आहेत. ४३ उमेदवारांचे बारावी अथवा त्यापेक्षा अल्प शिक्षण झाले आहे. प्रतिज्ञापत्रात १० उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट असल्याचे घोषित केले आहे.

९६ लाखांच्या रकमेची पोलिसांकडूनच लूट

  • पोलीसच चोर झालेले असतील, तर जनतेने कुणाकडे जावे ?
  • राज्यातील वाढते अराजक रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, हीच जनतेची अपेक्षा !
     पुणे, ५ नोव्हेंबर - मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी येथेे हडपसर पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक गिरीधर यादव आणि कर्मचारी गणेश मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक अविनाश देवकर आणि रवींद्र माने यांनी वासन आय केअर या रुग्णालयाची ९६ लक्ष रुपयांची रक्कम लुटली. या प्रकरणी यादव यांच्यासह चौघा जणांवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्याकडील रक्कम कह्यात घेण्यात आली आहे.         
     दिवाळीनिमित्त कर्मचार्‍यांना बोनस देण्यासाठी अधिकोषातून काढलेले ९६ लक्ष रुपये इनोव्हा गाडीच्या डिक्कीत ठेवण्यात आले होते. यादव, मोरे यांनी वाहनचालकाला मारहाण करून त्या पैशांची पिशवी कह्यात घेतली. तुमच्याकडे गाडीत हत्यारे सापडली असून तुमच्यावर कारवाई होईल, असा दम भरत वाहनचालकाला मांजरी पोलीस चौकीत नेऊन त्याची उलटसुलट तपासणी चालू केली. पहाटेच्या वेळी वाहनचालकाला सोडून दिल्यानंतर त्याने रुग्णालयाच्या अधिकार्‍यांना भेटून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर संबंधितांना अटक करण्यात आली.

कैद्याच्या नातेवाइकाकडून ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना वैद्यकीय अधिकार्‍याला अटक

    कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील कळंबा कारागृहातील कैद्याच्या वैद्यकीय उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी कैद्याच्या नातेवाइकांकडून ५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कळंबा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ मधील डॉ. दीपक लादे  यांना ४ नोव्हेंबर या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. खुनाच्या गुन्ह्यातील एक आरोपी सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. लादे याने २० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. आरोपीच्या भावाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

शाहरूख खान आणि हाफीज सईद यांची भाषा एकसारखीच ! - खासदार योगी आदित्यनाथ

शाहरूख खानचे चित्रपट न पहाण्याचे हिंदूंना आवाहन ! 
     नवी देहली - चित्रपट अभिनेते शाहरूख खान आणि मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जिहादी आतंकवादी हाफीज सईद यांची भाषा एकसारखीच आहे, अशी टीका भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी येथे केली. ते पुढे म्हणाले, "हिंदूंनी शाहरूख खान यांचे चित्रपट पाहिले नाहीत, तर तो रस्त्यावर भटकत राहील. डाव्या विचारसरणीचे लेखक आणि कलाकार देशविरोधी शक्तींना जाऊन मिळाले आहेत. ते आतंकवादाची भाषा करू लागले आहेत." अभिनेते शाहरूख खान यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या दिवशी देशातील वाढत्या असहिष्णुतेविषयी टीका केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावरच सर्व बाजूंनी टीकेचा भडीमार होत आहे.

जाणून घ्या दीपावलीचे धर्मशास्त्र !

दैनिक सनातन प्रभातचा 
रंगीत 
'दीपावली विशेषांक' !
      प्रसिद्धी दिनांक : ८ नोव्हेंबर २०१५ 
      मूल्य : ५ रूपये पृष्ठे : १० 
      या अंकात वाचा... 
  • १. दिवाळीतील सणांमागील अध्यात्मशास्त्र 
  • २. अंगाला उटणे लावण्याची पद्धत 
  • ३. नरकासुर प्रतिमादहन आणि फटाक्यांचे प्रदूषण नकोच ! 
  • ४. विविध सात्त्विक रांगोळ्यांच्या रंगीत कलाकृती ! 
  • ५. आकाशकंदिल खरेदी करतांना हे लक्षात घ्या ! 
त्वरा करा ! आपली प्रत आजच राखून ठेवा ! 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ नोव्हेंबर 
या दिवशी दुपारी ३.३० पर्यंत 'ईआरपी प्रणाली'त भरावी !

(म्हणे) 'सनातन संस्थेचे लोक महिलांना 'इमोशनल ब्लॅकमेल' करून आश्रमात घेऊन जातात !'

सनातनच्या साधिकांनी पत्रकार परिषद घेऊन 
खुलासा करूनही सनातनद्वेषाचा कंड न शमलेले श्रीमंत कोकाटे ! 
     पुणे, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे लोक महिलांना भावनिकदृष्ट्या गुंतवून (इमोशनल ब्लॅकमेल करून) सनातनच्या आश्रमांमध्ये घेऊन जातात. (सनातन संस्थेमध्ये अनेक उच्चविद्याविभूषित महिला स्वयंस्फूर्तीने राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या प्रेरणेतून सेवा करतात. केवळ सनातनद्वेषातूनच अशा दिशाभूल करणारा विखारी प्रसार केला जात आहे. मनमानी आरोप करून कोकाटेंसारखी मंडळी सनातनद्वेषाची हौस भागवून घेत आहेत, हेच खरे ! बेछूट आरोप करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. - संपादक) राष्ट्रसेवा समूहाच्या वतीने जिजाऊ रथयात्रा आणि संविधान जनजागृती यात्रा या उपक्रमांच्या अंतर्गत कोंढवे-धावडे येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

दक्षिण चिनी महासागरात जहाजे पाठवण्यास आम्ही मुक्त ! - भारताने चीनला खडसवले

दक्षिण चिनी महासागरातील चीनच्या दादागिरीच्या विरोधात भारतानेही दंड थोपटले 
     नवी देहली - दक्षिण चिनी महासागरातील चीनच्या दादागिरीच्या विरोधात अमेरिकेच्या पाठोपाठ आता भारतानेही दंड थोपटले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनने या महासागरात जहाजे पाठवून दादागिरी चालवली आहे. या दादागिरीच्या विरोधात अमेरिकेने सर्वप्रथम आवाज उठवला. त्यापाठोपाठ आता भारतानेही 'दक्षिण चीन सागरात जहाज पाठवण्यास आणि उड्डाण करण्यास आम्ही मुक्त आहोत', अशा शब्दांत चीनला चेतावणी दिली आहे. भारताचा ५५ टक्केे सागरी व्यवहार याच मार्गाने होतो. 

पुणे येथील बालभारतीमध्ये ओली मेजवानी !

    विद्येच्या माहेरघरात पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कार्यालयात कर्मचार्‍यांनी अशा प्रकारची मेजवानी करणे, हे लज्जास्पद ! या प्रकरणी शिक्षण विभाग याची सखोल चौकशी करून त्या मद्यपी कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करेल का ?
    पुणे, ५ नोव्हेंबर- येथील सेनापती बापट रस्ता येथे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळाचे (बालभारती) कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या भांडार आणि वितरण विभागामध्ये दिवाळीचे सानुग्रह अनुदान (बोनस) मिळाले, म्हणून कामावर असणार्‍या ५ कर्मचार्‍यांनी मद्य मेजवानी साजरी केल्याचा अपप्रकार उघडकीस आला. हा अपप्रकार ४ नोव्हेंबर या दिवशी दुपारी घडला. एका दक्ष नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यामुळे ही घटना कळली. माहिती दिल्यानंतर गस्त घालणारे पोलीस कर्मचारी आणि पत्रकार पोहोचण्याआधी ओल्या मेजवानीचे पुरावे नष्ट करून मद्य प्यायलेले अधिकारी आणि कर्मचारी हे तेथून पसार झाले. याविषयी बालभारतीचे भांडार विभागातील अधिकारी, विधी अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता असा कुठलाही अनुचित प्रकार घडलाच नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या मद्य मेजवानीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

कागलमधील मुसलमान व्यक्तीचा भूमीवर दावा; महानगरपालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

बेळगाव येथील कथित थडग्याचे प्रकरण
    बेळगाव, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटची भूमी महानगरपालिकेच्या मालकीची असल्याने यावर तिचे नियंत्रण असल्याचा निकाल तालुका दंडाधिकार्‍यांनी दिला होता. त्यानंतर कथित थडग्याविषयी कारवाई करण्याची सिद्धता महापालिकेने केली; मात्र आता कथित थडग्याच्या भूमीसह संपूर्ण भूमीवर कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील चिखली गावातील रहिवासी गौस नबिशाह मकानदार मलंग फकीर यांनी दावा केला आहे. त्यांनी याविषयी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तसे निवेदन दिले आहे.
१. थडग्याची भूमी महापालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल तालुका दंडाधिकार्‍यांनी दिल्यानंतर त्याच रात्री खडक गल्ली येथे दगडफेक होऊन नवा वाद निर्माण झाला होता.

संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार शब्द न वगळणार्‍या १२ संस्थांच्या विश्‍वस्तांवर धर्मादाय सहआयुक्तांकडून निलंबनाची कारवाई

    पुणे, ५ नोव्हेंबर - संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार शब्द न वगळणार्‍या १२ संस्थांच्या १०० हून अधिक विश्‍वस्तांवर निलंबनाची कारवाई केली आहे. धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी याविषयीचे आदेश नुकतेच दिले आहेत. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असून यामुळे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली अधिकार्‍यांना दमबाजी करणार्‍या कथित कार्यकर्त्यांना वचक बसणार आहे.
    धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नोंदणी करणार्‍या विश्‍वस्त संस्थेचा भ्रष्टाचार निर्मूलन हा उद्देश असू शकत नाही. भ्रष्टाचार रोखणे, हे शासनाचे काम असते, असे सांगत धर्मादाय सहआयुक्त डिगे यांनी भ्रष्टाचार शब्द असलेल्या संस्थांनी त्यांच्या नावात पालट करावा, याविषयी नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानुसार काही संस्थानी त्यांच्या नावात पालटही केला; परंतु ज्या संस्थांनी नावातून भ्रष्टाचार शब्द वगळला नाही, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत विश्‍वस्तांना निलंबित करण्याचा आदेश डिगे यांनी दिला आहे. या कालावधीत प्रशासक म्हणून धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्रातील ३ सहस्र ८३९ कि.मी. लांबीच्या राज्यमहामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार !

    मुंबई - महाराष्ट्रातील ३ सहस्र ८३९ कि.मी. लांबीच्या राज्यमहामार्गांचें राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय परिवहनमंत्री श्री. नितीन गडकरी, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. चंद्रकात पाटील आणि ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातल्या रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रशासनच पुढाकार घेणार आहे.

केवळ हिंदु महासभा या राजकीय पक्षाचीच हिंदु राष्ट्राची मागणी ! - श्री. विद्याधर नारगोलकर, पुणे

     वर्तमानस्थितीमध्ये हिंदु महासभा या पक्षाचे विचार अनन्य आहेत, हे मान्य करावेच लागेल. तसेच भारतातील केवळ या पक्षाच्या घटनेत हिंदु शब्द असून हिंदु राष्ट्राची त्यांची मागणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका बैठकीत सांगितले आहे, तुम्ही हिंदु राष्ट्राची पाटी खांद्यावर घेऊन निष्ठेने उभे रहा. एक दिवस असा येईल की, हिंदूंसाठी लढणारी ती हिंदु महासभा कुठे आहे, असे विचारत लोक येतील आणि तो दिवस आता दूर नाही.

बारा सहस्र मतदारांनी नोटा पर्याय वापरला

     मुंबई - मतदार सूचीतील एकाही उमेदवाराला मतदान द्यायचे नसेल, तर मतदान यंत्रात मतदाराला नकाराधिकार दर्शवण्यासाठी 'नोटा' नावाची कळ (बटण) उपलब्ध आहे. या कळीचा वापर करून मतदार उमेदवाराला मत न देता नकाराधिकाराचा वापर करू शकतो. 

फलक प्रसिद्धीकरता

निधर्म्यांचा हिंदुद्वेष जाणा ! 
     हिंदुत्वाचे उदात्तीकरण होत असल्याचा कांगावा करत केरळ शासन आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रियमानसम् हा संस्कृत भाषेतील चित्रपट नाकारण्यात आला होता.

जिल्हास्तरावर विडंबनात्मक फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी प्रयत्न करू ! - निवासी उपजिल्हाधिकारी

फटाक्यांच्या माध्यमातून होणारी देवता
आणि क्रांतीकारक यांची विटंबना रोखण्याची चळवळ
निवासी उपजिल्हाधिकारी (उजवीकडे)
श्री.एस्.आर्. बर्गे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
    कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके उडवल्याने होणारी त्यांची विटंबना रोखण्याच्या संदर्भात येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री.एस्.आर्.बर्गे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले.
     या वेळी श्री. बर्गे यांनी जिल्हास्तरावर विडंबनात्मक फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख सर्वश्री राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, प्रीतम पवार, किरण दुसे, सनातन संस्थेचे अनिल कुलकर्णी आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके आढळल्यास कठोर कारवाई ! - निवासी उपजिल्हाधिकारी

    सांगली, ५ नोव्हेंबर (वार्ता.) - एकूणच फटाक्यांच्या संदर्भात प्रशासनाने अनुज्ञप्ती नूतनीकरण करतांना घाऊक फटाके विक्रेत्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेली फटाके विक्री होऊ नयेत यांसाठी जिल्हा प्रशासनाने एक शिक्का केला असून तो प्रत्येकाच्या अनुज्ञप्तीवर मारण्यात येत आहे. अशा फटाक्यांची विक्री करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने फटाके विक्रेत्यांना दिल्या आहेत. त्यातूनही असे फटाके विक्रीसाठी आढळल्यास उपलब्ध तरतुदी आणि कायदे यांनुसार अशी विक्री करणार्‍या फटाके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.

यवतमाळ येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देवतांची चित्रे असणार्‍या फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी निवेदन

     यवतमाळ - फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवण्यासाठी २ नोव्हेंबर या दिवशी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदनाची नोंद घेत संबंधित साहाय्यक अधिकार्‍यांना अधिसूचना पाठवण्याचे आदेश दिले आणि तशा प्रकारच्या फटाके विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याचे आश्‍वासनही दिले. या वेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. मनोज औदार्य, सनातन संस्थेचे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 keral Shasanne Film Festivalme 'Priyamanasam' ye Sanskrit film nahi dhikhai ! 
- Devvani Sanskritka mahatva in nidharmiyonko kya samajhega ! 

जागो ! 
 केरल शासनने फिल्म फेस्टिव्हलमें 'प्रियमानसम्' यह संस्कृत फिल्म नही दिखायी ! 
- देववाणी संस्कृतका महत्त्व इन निधर्मीयोंको क्या समझेगा !

बारामती येथे पोलीस, प्रशासन आणि फटाके विक्रेत्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाक्यांच्या विरोधात निवेदन

     बारामती (जिल्हा पुणे), ५ नोव्हेंबर (वार्ता.) - दिवाळीत फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवण्याविषयी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ नोव्हेंबर या दिवशी निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तथा जन माहिती अधिकारी श्री. पाटील, नायब तहसीलदार श्री. अनिल ठोंबरे, तसेच पोलीस निरिक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार श्री. ठोंबरे या वेळी म्हणाले की, 'शॉप अ‍ॅक्ट'नुसार सर्व विक्रेत्यांना देवतांची चित्रे असलेले फटाके विकू नयेत, याविषयीच्या सूचना परवाने देतांना देण्यात आल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवड भागामध्ये अवैध फटाके विक्री केंद्रांना ऊत !

याविषयी प्रशासन कोणती कारवाई करणार आहे ?
    पिंपरी - अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी अनेक ठिकाणी फटाक्यांच्या विक्रीची अवैध दुकाने चालू झाली आहेत. फटाक्यांच्या विक्रीसाठी अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित पोलीस ठाण्याची अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर येथील मुख्य केंद्रात अर्ज विक्रीची सुविधा होती. साधारणपणे १९ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत १२७ जणांनी अर्ज घेतले. कागदपत्रांची पडताळणी करून आतापर्यंत ११२ जणांना फटाके विक्रीची अनुज्ञप्ती (परवाना) दिली आहे. पिंपरीगाव, चिंचवडगाव, काळेवाडी या भागातील मुख्य रस्त्यांवर, तसेच आकुर्डी, निगडी, सांगवी, वाकड, थेरगाव या भागांत प्रत्यक्षात १ सहस्रांहून अधिक दुकानांतून अवैधरीत्या फटाका विक्री चालू असल्याचे दिसून आले. ही अवैध दुकाने आणि त्याद्वारे होणार्‍या विक्रीवर कारवाई करण्याकडे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन डोळेझाक करत आहेत. (सोयीस्कररित्या करण्यात येणारी डोळेझाक ही विक्रेता आणि प्रशासन यांच्यामध्ये काही काळेबेरे असल्याचा संशय निर्माण करते. - संपादक)

धोकादायक फटाके विक्री रोखण्याची राष्ट्रीय नागरी आणि पर्यावरण संरक्षण संस्थेची मागणी

    नगर - फटाका स्फोटक असल्याने असुरक्षित आणि अवैधपणे, तसेच धोकादायक स्थितीतील फटाके विक्री रोखण्याची मागणी राष्ट्रीय नागरी आणि पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्थेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. संस्थेचे जिल्हा निरीक्षक विनोद काकडे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना याविषयी निवेदन दिले आहे. या निवेदनात पुढील सूत्रे दिली आहेत.
१. दिवाळी साजरी करण्यासाठी सर्रासपणे फटाक्यांचा वापर केला जातो. या स्फोटक पदार्थांची विक्री करतांना ते हाताळण्यासाठी शासनाने नियम ठरवून दिले आहेत; मात्र  अनेक विक्रेते हे नियम पाळत नाहीत.
२. सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांची विक्री करतात. रस्त्याजवळ, तसेच नागरी वस्तीच्या जवळ फटाक्यांची दुकाने लावतात. त्यामुळे आपत्ती ओढवण्याची शक्यता असते.
३. अनेक विक्रेते कुठल्याही प्रकारची अनुज्ञप्ती (परवाना) न घेता विक्री करतात. त्यामुळे प्रशासनाने याची नोंद घेणे आवश्यक आहे.

बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले !

    मुंबई - मुंबईजवळच्या अरबी समुद्रात बेपत्ता झालेल्या पवनहंस आस्थापनाच्या हेलिकॉप्टरचे काही अवशेष तटरक्षक दलाला आढळून आले आहेत. मात्र या हेलिकॉप्टरमधील वैमानिकांचा अजूनही शोध लागलेला नाही. सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शोध पथकाला समुद्रात हेलिकॉप्टरचा दरवाजा आणि अन्य अवशेष मिळाले आहेत.
    हे हेलिकॉप्टर ४ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास दक्षिण मुंबईहून ८० सागरी मैलांवर समुद्रात कोसळले होते. त्यामध्ये हेलिकॉप्टरमधील दोन वैमानिक बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर नौदलाने तातडीने शोधकार्य चालू केले होते. ई. सॅम्युअल आणि टी.के. गुहा अशी बेपत्ता वैमानिकांची नावे आहेत. पवनहंसचे हेलिकॉप्टर रात्रीचे सरावकार्य करीत होते. हेलिकॉप्टरमध्ये कोणी प्रवासी नव्हते.

दूरचित्रवाणीसारख्या माध्यमांमुळे अजाणत्या वयातील प्रेमप्रकरणांचे वाढलेले प्रमाण आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम

१. एकतर्फी प्रेमातून मुलींवर आक्रमण करण्याचे प्रमाण मुंबई परिसरातच वाढणे
      गेल्या तेरा-चौदा वर्षांत मुंबई परिसरातच एकतर्फी प्रेमातून मुलींवर आक्रमण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वर्ष १९९० मध्ये उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील या दहावीच्या विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रावर जाळून मारण्याची अमानुष घटना घडल्यानंतर वर्ष १९९२ मध्ये बोरिवलीतील गोखले महाविद्यालयाजवळ गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी परीक्षेला जात असतांना तिच्यावर चाकूआक्रमण करण्याचा प्रयत्न दोन तरुणांनी केला होता. त्यानंतर मुंबईकरांना हेलावून, हादरवून गेली, ती मुंबई सेंट्रल येथे विद्या प्रभुदेसाई हिची अमानुष हत्या. भरदिवसा तिला रस्त्यात जाळण्यात आले होते. त्याच वर्षी कांदिवलीच्या एका गुजराती तरुणीवर तिच्या नातेवाईक तरुणाने आम्ल (अ‍ॅसिड) फेकले होते.

भारतियांची अहिंसावादी मानसिकता पालटण्याची आवश्यकता !

     पंतप्रधानाचे संरक्षण सल्लागार अजित डोवल यांनी त्यांच्या भाषणात प्रतिहल्ला आपल्या वजनानुसार असावा. तो वजनापेक्षा अधिक असू नये, तसेच वजनापेक्षा अल्प असू नये, असे म्हटले. भारताची प्रकृती आपल्या वजनापेक्षा अल्प शक्तीचा हल्ला करावयाचा, अशी आहे. आमच्या मताप्रमाणे तशी प्रवृत्ती होण्याचे कारण शासकीय वर्गाच्या मनावर हिंसा आणि सैन्य यांची आवश्यकता नाही, आशियात सत्ता स्पर्धा नाही, आम्ही सर्व जगाशी मित्रत्वाचे संबंध ठेवू इच्छितो, या अव्यवहारी तत्त्वांचे दडपण आहे. डोव्हल यांच्या मते, ही परिस्थिती पालटण्याची वेळ आली आहे. भारतियांच्या मनात पाकिस्तानशी लढाई चालू झाली की, काश्मीरचा प्रश्‍न तो देश युनोत उपस्थित करील आणि अण्वस्त्रांचा उपयोग करील, ही भीती आहे. ही थोड्या प्रमाणात खरी आहे; पण एकदा एका भारतीय नेत्याने म्हटले होते की, अणूबॉम्बचा पाकिस्तानने वापर केला, तर भारताला मोठा चटका बसेल; पण भारताच्या प्रतिहल्ल्याने पाकिस्तानचे अस्तित्व संपेल. (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१५)

प्रचारकी थाटात काम करणार्‍या स्त्रीस्वातंत्र्यवाल्या संघटनांनी स्त्रियांना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देणे आवश्यक !

     अनेक स्त्री-संघटना प्रचारकी थाटाचे काम करतात. प्रत्यक्ष कृती करतांना दिसत नाहीत. केवळ परिसंवाद आणि पोकळ चर्चा करून काही निष्पन्न होणार नाही. स्त्रीस्वातंत्र्यवाल्या संघटनांनी स्त्रियांना काही प्रशिक्षण देऊन ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे.
     पालकांनीही घरातूनच नैतिक मूल्यांची जोपासना केली पाहिजे. बाह्यसौंदर्य महत्त्वाचे न मानता बुद्धी आणि मन यांचे सौंदर्य पालकांनी मुलींना समजावून दिले पाहिजे. मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला पाहिजे. 
- लीना ओक-मॅथ्यू, मार्शल आर्ट प्रशिक्षक, डोंबिवली, मुंबई (संदर्भ : साप्ताहिक विवेक, १५ मे २००५)

स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांचे कायदा आणि सुव्यवस्था यांकडे दुर्लक्ष, हे क्रांतीचे प्रमुख कारण !

     इंग्रजी राजवटीत कुणीही काठीला सोने लावून काशीपासून रामेश्‍वरपर्यंत प्रवास करू शकायचा; पण आता स्वराज्यातील नेतृत्व करणार्‍या लोकांनी अहिंसा, शांतता, समाजवादी समाजरचना, आणीबाणी, भूदान, वर्गयुद्ध या मुद्यांवर चर्चा, भाषणे, ठराव या गोष्टींना महत्त्व देऊन शांतता आणि सुव्यवस्था यांकडे दुर्लक्ष केले. देशातील परिस्थिती अराजकाच्या सीमेपर्यंत घसरू दिली. आता कुणाही सद्गृहस्थाला घरातील सोने या खोलीतून दुसर्‍या खोलीत नेण्यास भीती वाटते. त्याला वाटते, याच वेळी दरोडेखोर घरावर आक्रमण करतील आणि त्याला ठार मारून सोने घेऊन पळून जातील, असे प्रसंग घडत आहेत नि त्याच्या वार्ता वृत्तपत्रात येत असतात. देशात लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य आहे, याचा ढोल वाजवला जातो; मात्र अशा परिस्थितीतूनच क्रांती होते.
(संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१५)

हिंदूंच्या मुळावर उठलेली हिंदूंची सद्गुणविकृती !

१. मनुष्यजातीच्या घातास कारणीभूत ठरलेला गुण दुर्गुणच !
     सद्गुणविकृती हा शब्दप्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु समाजाच्या दोषांचे सार्थ वर्णन करण्यासाठी योजला आहे. वस्तुतः माणसाची माणुसकी म्हणून सांगण्यात येणारे सर्व सद्गुण ते केवळ गुण असतात. कोणताही एक गुण सर्व परिस्थितीत सद्गुणच असतो, असे नाही. व्यवहारात कोणताही गुण हा जेव्हा मनुष्यजातीच्या हितास उपकारक ठरतो, तेव्हा तितक्याच मर्यादेपर्यंत तो सद्गुण समजला गेला पाहिजे.
     जेथून तोच गुण मनुष्यजातीच्या घातास किंवा अधःपातास कारणीभूत होतो, तेथून त्या गुणाचे दुर्गुणात रूपांतर होते. त्या परिस्थितीत तो त्याज्य ठरतो; म्हणूनच देश, काल, पात्राच्या विवेकाची कसोटी आवश्यक ठरते.

खर्‍या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच !

  • दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
  • विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणार्‍या गोष्टी 
     परीक्षा संपून आता शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा आणि विद्यार्थ्यांना सद्गुण, राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व कळावे, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत. पुढील गोष्टीतून मौल्यवान रत्नांपेक्षा सद्गुणी वृत्तीचे महत्त्व लक्षात येईल. 
१. राजाने भक्त पुरंदरदासांना प्रतिदिन दोन मुठी तांदूळ हिरे मिसळून देणे आणि पुरंदरदासांच्या 
पत्नीने तांदूळ निवडतांना हिरे वेचून कचरापेटीत टाकून देणे
     एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले ,महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते.

हे साहित्यिक कि निधर्म्यांची प्यादी ?

श्री. विक्रम भावे
     गेल्या काही दिवसांपासून अनेक पुरोगामी साहित्यिक आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते येत आहेत. त्यात आता संशोधकांनीही पुरस्कारवापसीची फॅशन अंगीकारली असल्याचे समजते. आजवर कित्येक अणू शस्त्रज्ञांचे गूढ मृत्यू झाले; पण संशोधकांना लोकशाही आणि देशहित धोक्यात आल्यासारखे कधीच वाटले नाही ?
१. पुरस्कारवापसी म्हणजे प्रसिद्धीची भाबडी आशा
     देशातील लोकशाही धोक्यात असून त्याचा निषेध करण्यासाठी काही साहित्यिक आपापले पुरस्कार परत करत असल्याची वृत्ते गेले काही दिवस वाचनात येत आहेत. अर्थात् ही वृत्ते तेवढी वाचनात आली; पण खरंच पुरस्कार परत केल्याचे विश्‍वसनीय वृत्त अजूनही वाचायला मिळालेले नाही. अर्थात् पुरस्कारप्राप्तीच्या वेळी जी प्रसिद्धी मिळाली, तशी परत न मिळाल्याने निदान पुरस्कार परत करण्याच्या नावाखाली तरी प्रसिद्धी मिळेल, अशी भाबडी आशाही असावी. पुरस्कारातील प्रमाणपत्र परत केले; म्हणजे पुरस्कार परत केला, असे म्हणता येत नाही. स्मृतीचिन्ह, मानधन (शाल विरून गेली आणि नारळ साहित्यिकांनी खाल्ला असेल, असे गृहित धरू) या सर्व गोष्टीही परत करण्याची साहित्यिकांची सिद्धता आहे का ? तसे नसेल; तर मात्र हा प्रसिद्धीचा स्टंटच म्हटला पाहिजे.

अधर्मी व्यक्तीरेखांचे उदात्तीकरण नको !

     इस समय रावण भी हो जाये, तो बहुत है । रावण बनना भी कहा आसान है ? रावण मे अहंकार था, तो पश्‍चात्ताप भी था । रावण में वासना थी, तो संयम भी था । रावण मे सीता के अपहरण की ताकत थी, तो बिना सहमती परस्त्री को स्पर्श न करने का संकल्प था । सीता जीवित मिली, ये राम की ताकत थी, पर सीता पवित्र मिली, ये रावण की मर्यादा थी । राम.., तुम्हारे युग का रावण अच्छा था, दस के दस चेहरे, सब बाहर रखता था .. यांसारखे लिखाण सामाजिक संकेतस्थळांवर सध्या फिरत आहे.

भारतभूमीच्या उत्कर्षासाठी चाणक्यनीतीचे अनन्यसाधारण महत्त्व

१. भारतभूमीच्या उत्कर्षासाठी आजही चाणक्य, शुकाचार्य यांची राजनीती अनुसरावी लागणे
     भारत आणि भारतियता जगावी, अशी उत्कट इच्छा असेल, तर भारतीय राजनीती, जी बृहस्पती, शुकाचार्य, कामंदक, चाणक्य, रामचंद्रपंत अमात्य यांनी अनुसरली आणि राष्ट्रे उभी केली, जोरदार तेजस्वी बनवली, ऐश्‍वर्याच्या शिगेला नेली, तीच नीती आज आम्हाला या भारतभूमीचा उत्कर्ष हवा असेल, तर अनुसरावी लागेल.

सामर्थ्यशाली पितृशाही बरी !

     प्रत्येक आक्रमकापुढे शरणागती पत्करणार्‍या लोकशाहीपेक्षा शक्तीशाली नि सामर्थ्यवान हुकमशाही मी पत्करीन. त्यामुळे देश समर्थ होऊन रणांगणांत उभा राहील. 
- स्वातंत्र्यवीर सावरकर (पुणे येथील १५ जानेवारी १९६१ चे भाषण) (संदर्भ : प्रज्वलंत, २६ फेब्रुवारी २००१)
     इतर देशांत जीवनाची सुखे भोगण्याकरता प्रसंगी आपल्याहून दुर्बलांची पिळवणूकही करत स्त्री-पुरुष अंधपणे स्वत:ला झोकून देतात; याउलट या भूमीतील स्त्री-पुरुष देहभान हरपून आत्मशोधार्थ स्वत:ला झोकून देतात ! - स्वामी विवेकानंद

...तर ही सर्व पापेच होत ! - श्री. विद्याधर नारगोलकर, पुणे

        सध्या संगीत आणि कला राष्ट्रांच्या सीमा भेदत असल्याने गदारोळ चालू आहे; पण येथे हे लक्षात घ्यायला हवे....
मातृभूमीचे आक्रंदन चालू असतांना संगीत श्रवणाचा । 
उन्मत्तांकडून अपमानित होत असतांना तत्त्वज्ञान विचारांचा । 
संस्कृतीच्या विनाशाचे भेसूर चित्र दिसत असतांना चित्रकलेचा अधिकार । 
ही सर्व पापे आहेत ॥

काँग्रेसच्या सर्व पंतप्रधानांनी देशाची हानीच केली !

     काँग्रेस पक्ष आणि नेहरूंपासून त्या पक्षाचे सर्व पंतप्रधान देशाचे अल्प-अधिक हानीच करून गेले आहेत. ताश्कंद करार करून पाकव्याप्त काश्मीर न मागता लाहोरपर्यंतचा सैन्याने जिंकलेला प्रदेश परत करणारे लालबहादूर शास्त्री हेही देशाची हानीच करून गेले आहेत. - श्री. अरुण रामतीर्थकर, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर.

सात्त्विक गोष्टींची आवड असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला म्हैसूर, कर्नाटक येथील चि. अक्षज पालतोड शशिकुमार (वय ५ वर्षे) !

चि. अक्षज शशिकुमार
१. सर्वांशी जुळवून घेणे
लहान मुले असोत वा मोठी माणसे असोत, तो सर्वांशी जुळवून घेतो. सर्वांशी ओळख करून घेतो.
२. सात्त्विक गोष्टींची आवड असणे
अ. सासूबाई देवाजवळ दिवा लावतात. तेव्हा तो प्रतिदिन त्यांच्यासमवेत जातो. त्याला देवाजवळ उदबत्ती लावायची असते.
आ. दूरचित्रवाणीवर रात्री १० वाजता मल्याळम् भाषेतील शिवाची मालिका असते. झोप आली, तरी ती बघूनच तो झोपतो.

देवाविषयी ओढ आणि धर्माचरणाची आवड असलेला डिचोली, गोवा येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. पार्थ पुष्पराज पराडकर (वय ७ वर्षे) !

१. लहान-मोठ्यांना आपलेसे करणे
कु. पार्थ पराडकर
      पार्थला घरात माणसे आलेली आवडतात. तो मोठ्या माणसांना आदराने आपलेसे करून घेतो. ते जाऊ लागल्यावर ते लगेच का जातात ? ते परत कधी येतील ? ते अधिक दिवस का रहात नाहीत ?, असे विविध प्रश्‍न विचारतो, तर लगेच ते विसरून पुन्हा आपल्या कामाला लागतो. त्यांच्यात अडकून पडत नाही. तो सभोवतीच्या लहान मुलांना,

मी सनातनची एक साधिका आहे । हेच माझे परम भाग्य आहे ॥

श्रीमती वृंदा कुलकर्णी
मी सनातनची एक साधिका आहे ।
हेच माझे परम भाग्य आहे ।
पूर्वसुकृतामुळेच गुरुमाऊली लाभली आहे ।
गुरुमाऊलीच माझा उद्धार करणार आहे ॥ १ ॥

दोष आणि अहं निर्मूलन करायचे आहे ।
गुरुमाऊलीचे आज्ञापालन करायचे आहे

सामान्य मनुष्य ते ९९ टक्के पातळीपर्यंतचे संत, धर्मगुरु आदींकडून शरीर, मन आणि बुद्धी यांच्या स्तरांवर होणार्‍या कार्याच्या मर्यादा अन् त्यांमागील कारणे

१. आध्यात्मिक पातळी आणि प्रतिदिन
 होणार्‍या चुकांची संख्या
२. मन, बुद्धी आणि चित्त यांचा लय झाल्यानंतरही उन्नतांच्या कार्यात त्रुटी रहाण्याची कारणे
अ. १०० प्रतिशत म्हणजे परिपूर्णता हा गुण जेथे पूर्ण स्वरूपात नाही, तेथे अपूर्णता आहे. अपूर्णता मर्यादा दर्शवते. त्यामुळे त्यांच्या कार्यात त्रुटी रहातात.
आ. साखरेत दोष नसला, तरी ती जोपर्यंत स्वतःचा गुणधर्म आणि घनता सोडत नाही, तोपर्यंत ती पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही

स्वयंपाकघरात सेवा करत असतांना आश्रमात देवतांचे प्रत्यक्ष आगमन झाल्याचे जाणवणे

     ११.६.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत असतांना दुपारनंतर देवतांचे अस्तित्व जाणवत होते. मी एका साधिकेला म्हणाले, आज देवतांचे प्रत्यक्ष आगमन आश्रमात झाले आहे. त्या वेळी शब्दांत वर्णन करता येणार नाही, इतका हलकेपणा वातावरणात जाणवत होता.

शिस्तप्रिय, समाधानी वृत्ती असलेल्या आणि भोळ्या भावामुळे प्रतिकूल परिस्थितीला स्थिरतेने तोंड देणार्‍या नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती श्यामला देशमुख !

श्रीमती श्यामला देशमुख
     नाशिक येथील श्रीमती श्यामला देशमुख (वय ५२ वर्षे) मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत असून त्यांचे पूर्ण कुटुंबच साधना करत आहे. त्यांच्या दोन्ही विवाहित मुली आणि जावई हे पूर्णवेळ साधना करतात. समाधानी वृत्ती असलेल्या आणि तीव्र इच्छाशक्ती आणि भावाच्या बळावर अनेक कठीण प्रसंगांना स्थिरतेने तोंड देणार्‍या श्रीमती श्यामला देशमुख यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. समाधानी वृत्ती असल्याने काटकसरीने संसार करणे
     आमचे एकत्र कुटुंब होते. आम्ही घरात १० - १२ जण होतो आणि बाबा एकटेच कमावणारे होते. अशा स्थितीतही आईने पै न् पै जमवून सर्वांच्या गरजा प्राधान्य देऊन पूर्ण केल्या. स्वतःसाठी मात्र तिने कधीही कोणतीही वस्तू विकत घेतली नाही.

एका मासात एका नाडी भविष्यात आणि तीन संतांनी हनुमानाची उपासना करायला सांगणे !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
     काळाप्रमाणे साधना कशी पालटते, याचे एक उदाहरण हल्लीच अनुभवले. सनातनमध्ये साधकांना गेली काही वर्षे श्रीकृष्णाचा नामजप करायला सांगितले जात होते. गेल्या मासात एका नाडी भविष्यात आणि तीन संतांनी हनुमानाची उपासना करायला सांगितली. एका संतांनी याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, तुम्हाला हिंदु राष्ट्र, म्हणजे रामराज्य स्थापायचे आहे. प्रभु श्रीरामचंद्राच्या रामराज्य स्थापन करण्याच्या कार्यात हनुमंताने साहाय्य केले होते. आपल्यालाही रामराज्य स्थापन करायचे आहे;

श्रद्धा आणि तळमळ असेल, तर देव भक्ताची काळजी घेतो, याची साधिकेला आलेली अनुभूती !

१. नात झाल्यावर सेवा नियमितपणे करणे, सूनेने बाळासमवेत घरकामही सांभाळणे आणि त्या वेळी लोक काय म्हणत असतील ?, असा विचार येणे : मी वर्ष २००१ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केला. तेव्हापासून मी प्रतिदिन दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत सेवा करत असे. वर्ष २००७ मध्ये माझ्या मुलाचा विवाह झाला. वर्ष २००८ मध्ये मला नात झाली. तेव्हाही मी नेहमीप्रमाणे सेवेला जात असे. वर्ष २०१० मध्ये माझी नात दीड वर्षाची असतांना भिंतीला धरून उभे रहाण्याचा आणि हात सोडून उभे रहाण्याचा प्रयत्न करू लागली. माझी सून बाळाला सांभाळून घरातली सर्व कामे करायची.

विमानप्रवासाच्या कालावधीत श्री. गौरव सेठी यांना आलेल्या अनुभूती आणि पू. (सौ.) गाडगीळकाकूंचा समष्टी सेवेच्या संदर्भात मिळालेला सत्संग

श्री. गौरव सेठी
१. नायरोबी येथे विमान थांबले असतांना पू. मुरारीबापू 
यांचे दर्शन होणे आणि प.पू. डॉक्टर अन् सर्व साधक यांच्या
वतीने त्यांना नमस्कार करण्याचा विचार मनात येणे
      मी जोहान्सबर्ग ते मुंबई असा विमानाचा प्रवास करतांना आमचे विमान मध्ये नायरोबी येथे ४ घंटे थांबले होते. तेथील आरामगृहात आराम करतांना मला पू. मुरारीबापू मुंबईला जाणार्‍या विमानासाठी आपल्या भक्तांसमवेत बसलेले दिसले. त्यांना पहाताक्षणीच आपण प.पू. डॉक्टर आणि सर्व साधक यांच्या वतीने त्यांना नमस्कार करूया, असा विचार माझ्या मनात आला;

वक्तशीरपणाच्या अभावामुळे धर्मप्रेमींना भेटण्याची नियोजित वेळ न पाळणारे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते !

१. कार्यकर्त्यांना भेटता येण्यासाठी धर्माभिमान्यांनी कार्यालयात जाण्याच्या नियोजनात पालट
 केला असतांनाही भेटीसाठी वेळेत न पोचणे, परिणामी त्यांना स्वतःचे नियोजन पालटावे लागणे
     देहली येथील कु. कृतिका खत्री आणि कु. मनीषा माहूर यांनी एका धर्माभिमान्याला आम्ही सकाळी ११ वाजता तुम्हाला भेटायला येऊ शकतो का ? असे विचारले. तेव्हा त्या धर्माभिमान्याने मी प्रतिदिन सकाळी ८.३० वाजता कार्यालयात जातो. या संपर्कासाठी मला ११ वाजेपर्यंत घरी थांबावे लागेल. त्यामुळे तुम्ही लवकर या, असे कळवले.
     सेवाकेंद्रातून त्यांच्या घरी पोचण्यासाठी ४५ मिनिटे लागत असतांनाही संपर्काच्या दिवशी सकाळी १०.३० वाजेपर्यंत कु. कृतिका आणि मनीषा सेवाकेंद्रातून निघाल्याच नव्हत्या.

साधकांना महत्त्वाची सूचना

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !
     सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर अवैध कारवायांत गुंतलेली अथवा राष्ट्रविरोधी संघटना असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा अथवा सनातनच्या कार्यात रस असल्याचा देखावा करून सनातनचे आश्रम, सेवाकेंद्र किंवा साधकांच्या निवासस्थानी येऊ शकतात आणि काही आक्षेपार्ह वस्तू तेथे ठेवून जाऊन पोलिसांकडे तक्रार करू शकतात. यामुळे संस्था आणि साधक अडचणीत येऊ शकतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
मानसिक स्तरावरचा हिंदु धर्माचा प्रसार केवळ हिंदूंनाच एकत्र करू शकतो, तर आध्यात्मिक स्तरावरचा हिंदु धर्माचा प्रसार जगभरच्या सर्व मानवांना एक करून सर्वांना आनंद देऊ शकतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.११.२०१५)

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

समर्पित व्हा ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      इतरांना प्रकाश देण्यासाठी ज्योत सतत तेवत रहाते. तोच आदर्श समोर ठेवावा आणि गरजू लोकांसाठी आपले जीवन समर्पित करावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान 
माया आणि परमेश्‍वर 
अ.  परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे. 
भावार्थ : 'माया समजून घेऊन' म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे. 
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान. 
भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

ब्राह्मणद्वेषापोटी इतिहासद्रोह !

संपादकीय
     हिंदवी स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवरायांनी खानाला यमसदनी धाडले. हा दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. अफझलखानभेटीच्या वेळी खानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न करतांच शिवरायांनी त्यांची वाघनखे आणि बिछवा खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यानंतर खानाचे वकील म्हणून भूमिका बजावणार्‍या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला असता छत्रपती शिवरायांनी तलवारीचा घाव घालून कृष्णाजी भास्करला ठार केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn