Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीरमध्ये ८ वीतील विद्यार्थ्यांकडून शाळेतच पाकच्या समर्थनार्थ घोषणा !

शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांनी पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणे म्हणजे शासकीय पैशांतून देशद्रोह्यांना पोसणे होय ! असे विद्यार्थी पुढे देशभक्त होतील कि देशद्रोही ? मुसलमाबहुल काश्मीरमध्ये लहानपणापासूनच फुटीरतावाद आणि भारतद्वेष नसानसांत कसा भिनवला जातो, याचे हे उत्तम उदाहरण आहे ! भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे ! आता प्रसारमाध्यमे याविषयी गप्प का ?
श्रीनगर - कालकोटे (जिल्हा राजौरी) येथील एका शासकीय शाळेत ८वीत शिकणार्‍या १२ विद्यार्थ्यांनी शाळेतच पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याची घटना घडली. या प्रकरणी शाळेतील शिक्षक अरविंदकुमार गुजराल यांनी या विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. तहसीलदारांच्या सांगण्यावरून नंतर ही तक्रार नोंद करून घेण्यात आली.

काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाक आणि आय.एस्.आय.एस्. यांचे झेंडे !

यावरून काश्मीरमध्ये शासन नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो !
श्रीनगर - येथील जामिया मशिदीच्या परिसरात काही धर्मांध देशद्रोह्यांनी शुक्रवार, ३० ऑक्टोबर या दिवशी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात् आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेचे, तसेच पाकिस्तानचे झेंडे फडकवले. हे झेंडे फडकवणारे युवक आणि पोलीस यांच्यात जोरदार संघर्ष उडाला. या युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच पाण्याचा मारा केला. जामिया मशिदीत शुक्रवारचे नमाजपठण झाल्यानंतर लगेच तोंडवळा झाकलेल्या युवकांचा एक गट रस्त्यावर उतरला आणि त्याने पाकिस्तान, आय.एस्.आय.एस्. तसेच जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांचे झेंडे फडकवणे चालू केले. याशिवाय जमाद-उद्-दवाचा प्रमुख हाफीज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सल्लाऊद्दीन यांचे पोस्टर्सही झळकवले.

संभाजीनगर येथे मंदिरे पाडल्याने हिंदू संतप्त !

संभाजीनगर येथे बुलडोझरने पाडण्यात आलेले हिंदूंचे मंदिर
संभाजीनगर - येथील बजाजनगर परिसरात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने हिंदूंची चार मंदिरे पाडली आहेत. त्यामुळे येथील मशिदींवर बुलडोझर फिरवण्याचे धैर्य प्रशासन दाखवणार का, असा संतप्त प्रश्‍न येथील हिंदूंनी केला आहे.
१. रस्त्याच्या मध्यभागी आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी प्रार्थनास्थळे पाडावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
२. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांची सूची सिद्ध केली.
३. १५ नोव्हेंबरपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवण्याची मुदत होती; परंतु जिल्हाधिकार्‍यांनी बजाजनगरातील मंदिरे पाडण्याचा आदेश दिला.
४. मंदिरे पाडल्यामुळे हिंदु संतप्त झाले. विशेष म्हणजे ही मंदिरे रस्त्यात नव्हती किंवा त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत नव्हता, असे येथील हिंदूंचे म्हणणे आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य वाढले पाहिजे ! - पू. विद्यानंद सरस्वती महाराज

संत पू. विद्यानंद सरस्वती महाराज यांना सनातनच्या
ग्रंथाविषयी माहिती सांगतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
    राऊरकेला (ओडिशा) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य आवश्यक असून ते अधिक वाढले पाहिजे, असे प्रतिपादन टाटानगर येथील जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते श्री महंत विद्यानंद सरस्वती महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी महाराजांची भेट घेतली. या वेळी पू. डॉ. पिंगळे यांनी स्वामीजींना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी माहिती दिली. 

सरकारीकरण कायदा सर्व धर्मियांसाठी लागू करा अन्यथा तो रहित करा ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

१. मंदिरांना सरकारीकरण कायद्याच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी लढा दिला पाहिजे. 
२. या कायद्याच्या अंतर्गत शासन निवडक मंदिरांचे सरकारीकरण करते आणि त्या मंदिरांची मालमत्ता स्वत:ची खाजगी संपत्ती समजून वापरते.
३. अनेक मंदिरे ही शासनाच्या महसुली उत्पन्नाचा स्रोत बनली आहेत. 
४. हा कायदाच मुळी घटनेच्या २६व्या कलमाच्या विरुद्ध आहे. या कलमानुसार प्रत्येक धर्माला स्वतःचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. 
५. सरकारीकरण कायद्याशी संबंधित अनेक खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

(म्हणे) शिवसेनेला आतंकवादी संघटना घोषित करा !

शत्रूराष्ट्रांना भारतातील राष्ट्रप्रेमी संघटना आतंकवादी वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?
जिहादी आतंकवाद्यांचे माहेरघर असलेल्या पाकचा कांगावा !
     नवी देहली - आंतरराष्ट्रीय समुदायाने शिवसेनेच्या आतंकवादी कारवायांची गंभीर दखल घेऊन शिवसेनेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता काझी खलीलुल्लाह यांनी केली आहे. शिवसेना आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा प्रस्ताव पाकमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पिपल्स पार्टीने यापूर्वीच पाकच्या संसदेकडे सादर केलेला आहे.

मोदी शासन आणि संघ यांना घेरण्यासाठीच पुरस्कार वापसीचे राजकारण !

पुरस्कार परत करणार्‍यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रहार !
      रांची (झारखंड) - पुरस्कार परत करणारी मंडळी, ही लोकांनी ज्यांचे विचार ऐकणे बंद केले आहे, अशा हताश, निराश आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तथाकथित बुद्धीवाद्यांची टोळी असून ते केवळ त्यांची राजकीय दुकानदारी चालण्यासाठी आणि चर्चेत येण्यासाठीच असे करत आहेत, अशा शब्दांत पुरस्कार परत करणारे साहित्यिक, लेखक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रहार केला आहे. एवढेच नव्हे, तर हा मोदी शासन आणि संघ यांना घेरण्यासाठी रचलेला डाव असून मूठभर तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांचे हे राजकारण कधीही यशस्वी होणार नाही, असेही संघाने स्पष्ट केले आहे. काही साहित्यिक, लेखक, कलावंत यांच्या मागोमाग ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम्. भार्गव यांनीही त्यांचा पद्मभूषण पुरस्कार नुकताच परत केला आहे. 

सतीच्या प्रथेप्रमाणे तलाकची प्रथाही बंद झाली पाहिजे ! - सर्वोच्च न्यायालय

हिंदु धर्मावरील कुठल्याही परंपरांच्या संदर्भात ऊठसूट चर्चासत्रे घेणारी प्रसारमाध्यमे मुसलमान 
महिलांवरील अन्यायाविषयी मात्र चर्चासत्रे घेत नाहीत, हे लक्षात घ्या ! महिलांच्या 
अधिकारांसाठी लढणार्‍या महिला आयोगाला याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • कायद्यात पालट करणे काळाची आवश्यकता असल्याचे न्यायालयाचे मत
  • कायद्यातील वैधतेची नव्याने पडताळणी करण्याचा निर्णय
     नवी देहली - मुसलमान पुरुषांना तलाक आणि बहुपत्नीत्वाचे मनमानी अधिकार हा महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे सतीच्या प्रथेप्रमाणे तलाक ही प्रथाही बंद झाली पाहिज, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले. या कायद्यात पालट करणे ही काळाची आवश्यकता असल्याचेही न्यायालयाने सांगितले. यासह मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड या कायद्यातील वैधता नव्याने पडताळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला.

शासकीय पातळीवर पाक कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही ! - मुख्यमंत्री

भाजप-शिवसेना युती शासनाला १ वर्ष पूर्ण
मुंबई - शासकीय पातळीवर गुलाम अली किंवा कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार नाही; मात्र अन्य कोणी तसे कार्यक्रम आयोजिक केल्यास त्यांना संरक्षण देऊ, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजप-शिवसेना युती शासनाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभरातील कारभाराचा लेखाजोखा घेण्यासाठी त्यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, मूल्यमापनासाठी एक वर्षाचा काळ पुरेसा नाही. वर्षभरात पारदर्शी आणि वेगवान कारभार करून राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. सेवा हमी कायदा, जलयुक्त शिवार या योजना शासनाच्या यशाच्या निदर्शक आहेत. राज्यावरील कृषीसंकटात शेतकर्‍याला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. चूक होत असेल, तर टीका अवश्य करा; पण पुरस्कार परत करणे हा उपाय नाही.

प्रशांत पुजारी यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्यास कर्नाटक शासनाचा नकार !

आपापसांतील हाणामारीतून हत्या झाल्यास शासनाने
हानी भरपाई का द्यावी ?
- कर्नाटकचे आरोग्यमंत्री यु.टी. खादर
      काँग्रेसचा बेगडी धर्मनिरपेक्षवाद पुन्हा एकदा उघड ! दादरी प्रकरणात मारल्या गेलेल्या इखलाखच्या कुटुंबियांना हानीभरपाई मिळण्यासाठी आवाज उठवणारी काँग्रेस प्रशांत पुजारी यांच्या कुटुंबियांना मात्र हानीभरपाई देण्यास स्पष्ट नकार देते ! अशा काँग्रेसकडे त्यांच्या दुटप्पी धोरणाविषयी विचारणा करा !
     बेंगळुरू (कर्नाटक) - मुडबिद्री येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांच्या हत्येच्या प्रकरणाशी शासनाचा काहीएक संबंध नाही. आपापसातील हाणामारीतून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी शासनाने हानीभरपाई का द्यावी ? असे संतापजनक विधान कर्नाटकचे आरोग्यमंत्री यु.टी. खादर यांनी येथे केले. बेंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमानंतर खादर पत्रकारांशी बोलत होेते.

किरकोळ गुन्ह्यासाठी कह्यात असलेल्या आरोपीची चौकशी रात्री १० नंतर करू नये ! - उच्च न्यायालय

हे न्यायालयाला पोलिसांना का सांगावे लागते ?
    तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकत नाही, अशा किरकोळ गुन्ह्यासाठी कह्यात घेण्यात आलेल्या आरोपींची रात्री १० नंतर चौकशी न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने २१ ऑक्टोबर २०१५ या दिवशी पोलिसांना दिला.

देहलीतील वातावरणात अल्ट्रा-फाईन घटकांच्या प्रमाणात वाढ !

हे विज्ञानाचे दुष्परिणाम नव्हेत का ?
    नवी देहली - राजधानी देहलीत विषारी पदार्थांमुळे प्रदूषित झालेला परिसर, औद्योगीकरण, निकृष्ट दर्जाचे ऊर्जास्रोत, प्रतिकूल हवामान आदी घटकांमुळे वायूप्रदूषणाची तीव्रता आणखी वाढली असल्याचे ब्रिटनमधील एका विद्यापिठातील अभ्यासक डॉ. प्रशांत कुमार यांनी केलेल्या संशोधनातून उघड झाले आहे. एका पर्यावरणाविषयीच्या मासिकात याविषयीचा त्यांचा लेख प्रसिद्धही झाला आहे. देहलीच्या वातावरणात अल्ट्रा-फाईन घटकांचे प्रमाण वाढल्याने मानवी आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.

(म्हणे) भारताच्या अण्वस्त्रांपासून पाकला धोका !

भारताला अणूबॉम्बची चेतावणी देणार्‍या पाकिस्तानचा कांगावा !
     इस्लामाबाद - भारताच्या अण्वस्त्रांपासून आम्हाला धोका असून त्यांच्या चिथावणीखोर सैनिकी कारवाया आमच्या चिंता वाढवणार्‍या आहेत, असा कांगावा पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सरताज अझीझ यांनी केला आहे. (भारत आणि पाक यांच्यात आतापर्यंत जेवढी युद्धे झाली, त्या सर्व युद्धांचा आरंभ पाककडूनच झाला आहे. भारताच्या वारंवार कुरापती काढणार्‍या पाकशी युद्ध करून त्याला धडा शिकवण्याला आता पर्याय नाही ! - संपादक)

चीन नेपाळला करणार एक सहस्र टन तेलाचे साहाय्य

चीन-नेपाळची हातमिळवणी
     नवी देहली - आतापर्यंत पेट्रोलियम पदार्थांसाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून असलेल्या नेपाळने चीनशी एक करार केला आहे. नेपाळ दुतावासाने करार झाल्याचे म्हटले असले, तरी कराराची पूर्ण माहिती दिलेली नाही. या करारानुसार चीन नेपाळला एक सहस्र टन तेलाचे साहाय्य म्हणून देणार असल्याचे समजते. ७० टक्के व्यापार भारतासह करणार्‍या आणि अनेक बाबतीत भारतावर अवलंबून असतांना नेपाळने चीनशी केलेला हा करार भारताच्या नेपाळमधील हितसंबंधांना धक्का समजला जात आहे. गेल्या चार दशकांपासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह असलेला करार नेपाळने मोडला असून नेपाळ ऑईल कॉर्पोरेशन आणि नॅशनल युनायटेड ऑईल कॉर्पोरेशन (पेट्रो चायना) यांच्यात हा नवीन करार करण्यात आला आहे.

राजस्थानमधील प्रसिद्ध श्री करणीमाता मंदिरात सनातन संस्थेच्या ग्रंथसंपदेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

     बीकानेर, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देशनोक येथील श्री करणीमाता मंदिरात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार करण्यात आला. येथील मंदिरासमोरील पटांगणात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक कक्ष उभारण्यात आला होता. त्यात मंदिर, गोरक्षा, धर्माचरण आणि नवरात्र या विषयांवर फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यासह सनातन संस्थेच्या विविध विषयांवरील ग्रंथांचेही प्रदर्शन यात लावण्यात आले होते. येथे प्रदर्शनासह सनातन संस्थेच्या ग्रंथांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारचे ग्रंथ मिळणे कठीण आहे. अनेकदा शोधूनही अशा प्रकारचे साहित्य मिळत नाही; पण योग असले की, ध्यानीमनी नसतांनाही मिळतात, अशी प्रतिक्रिया जिज्ञासूंनी व्यक्त केली.

दंगलपीडितांना प्रत्येकी ५ लाख रुपये हानीभरपाई मिळणार

इतर वेळी तथाकथित दंगलग्रस्त मुसलमानांना हानीभरपाई देण्यास पुढे असणारी काँग्रेस शिखांना 
हानीभरपाई का देत नाही ? केंद्रशासनाने हानीभरपाईची ही रक्कम काँग्रेसकडून वसूल करावी !
वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगल
     नवी देहली - वर्ष १९८४ मध्ये शीखविरोधी दंगलीतील पीडितांच्या कुटुंबियांना केंद्रशासनासह आम आदमी पक्षाकडूनही हानीभरपाई देण्यात येणार आहे. हानीभरपाई म्हणून २ सहस्र ६०० पीडित कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार असून त्यासाठी एकूण १३० कोटी रुपयांचा व्यय होणार आहे. यापैकी केंद्रशासनाने धनादेश वाटपाला प्रारंभही केला, तर आपची योजना तयार आहे. पंजाबमध्ये वर्ष २०१७ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे साहाय्य केले जात असल्याचे बोलले जात आहे.

महिलांवर उपचार करणार्‍या पुरुष डॉक्टरांना ठार मारू ! - आय.एस्.आय.एस्.चा फतवा

अशा जिहादी संघटनांना भारतात येण्यापासून रोखण्यासाठी शासनाने 
वेळीच योग्य ती पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
    दमास्कस - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने महिलांच्या ज्या रुग्णालयांमध्ये पुरुष डॉक्टर असतील, अशी सर्व रुग्णालये बंद करा, असा फतवा काढला आहे. पुरुष डॉक्टरांनी जर महिलांवर उपचार केले, तर त्यांना ठार मारले जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
१. आय.एस्.आय.एस्.च्या कह्यात असलेल्या भागांत महिला आणि पुरूष यांना वेगवेगळे ठेवले जाण्याचे धोरण राबवले जात आहे.

सनातनविरोधी चक्रव्यूह भेदून सनातन संस्था ठामपणे उभी ! - अभय वर्तक

पिंपरी (पुणे) येथे जाहीर जनसंवाद सभा !
डावीकडून अधिवक्ता देवदास शिंदे, श्री. अभय वर्तक, श्री. अभिजीत देशमुख
पुणे - डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर सनातन आतंकवादी संघटना म्हणून पुरोगाम्यांनी डांगोरा पिटायला प्रारंभ केला. सनातनला संपवण्याचे षड्यंत्र कार्यरत झाले; कारण सनातन संस्था एक हिंदुत्ववादी संघटना आहे. सनातनला अडकवण्यासाठी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून चक्रव्यूह तयार केले. सनातन संस्था मात्र भगवान श्रीकृष्णाचा अन् संतांचे आशीर्वाद यांच्या बळ्यावर पुरोगाम्यांच्या चारीमुंड्या चीत करत आज ठामपणे उभी आहे. सनातन त्याच बळावर या राष्ट्राला हिंदु राष्ट्र बनवेल, असे आश्‍वासक प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता
श्री. अभय वर्तक यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर जनसंवाद सभेत ते बोलत होते. या सभेला ५०० धर्माभिमानी उपस्थित होते.

सनातनमुळे धर्मप्रचारकांची फळी निर्माण होते आहे ! - अधिवक्ता देवदास शिंदे

पिंपरी (पुणे) येथे सनातनची जाहीर जनसंवाद सभा !
      हिंदु धर्माच्या विदारक स्थितीला आपण स्वत:च कारणीभूत आहोत. हिंदु धर्मप्रचाराचे कार्य बंद पाडण्यासाठी मिडीया ट्रायलच्या नावाखाली सनातनवर आरोप चालू झाले. यामागे आंरराष्ट्रीय षड्यंत्र असू शकते. प्रत्यक्षात सनातन समाजात धर्माचे शिक्षण देत असून, त्यामुळे धर्मप्रचारकांची फळी निर्माण होते आहे. पुरोगाम्यांच्या दबावाला बळी न पडता आम्ही सातासमुद्रापार हिंदु धर्माचा ध्वज फडकवण्यासाठी कटिबद्ध राहू.

हिंदूंच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ढोंगी धर्मनिरपेक्षता संपवावी लागेल ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन
उल्हासनगर (जिल्हा ठाणे) - आज भारतात हिंदूंची लोकसंख्या १०० कोटी आहे. अन्य धर्मियांच्या तुलनेने देशात आपण पाचपट आहोत; पण आपण पूर्ण शक्तीने लढत असतांनाही गोहत्या पूर्णपणे रोखू शकलेलो नाही, धर्मांतर थांबवू शकलेलो नाही. लव्ह जिहाद, धर्मावरील अन्य आघातांविषयी अशीच स्थिती आहे. जसे श्रीरामाने बाणाने रावणाचे एक शिर उडवल्यावर दुसरे शिर प्रकट व्हायचे, दुसरे उडवल्यावर तिसरे शिर प्रकट व्हायचे, तसे हिंदूंच्या समस्यांविषयी झाले आहे. रावणाला मारण्यासाठी रामाला त्याच्या नाभीस्थानाचा वेध घ्यावा लागला, तसे हिंदूंच्या समस्यांचे निराकरण करायचे असल्यास या समस्यांच्या नाभीस्थानी असलेली ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या जागी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उल्हासनगर येथील चालिया सभागृहात ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी होत असलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनात ते बोलत होते. प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या या उद्घाटन सोहळ्याच्या सत्रात लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर आणि सनातनच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर या प्रमुख वक्त्यांनीही मार्गदर्शन केले.

संभाजीनगरात केवळ हिंदूंचीच मंदिरे का पाडली, मशिदी आणि दर्ग्यांवर कारवाई कधी ? - उद्धव ठाकरे

     मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने केवळ हिंदूंचीच मंदिरे पाडा, असे काही फर्मान दिले नव्हते. मग ठरवून हिंदूंचीच मंदिरे का पाडण्यात आली ? संभाजीनगरातच मशिदी आणि दर्ग्यांच्या असंख्य अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस आणि जिल्हा प्रशासन का दाखवत नाहीत, असे रोखठोक प्रश्‍न शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी सामनातील संपादकीयमध्ये उपस्थित केले आहेत. औरंगजेब थडग्यातून बाहेर पडला काय ? या मथळ्याच्या संपादकीयातून वरील प्रश्‍न विचारण्यात आले आहेत.
या संपादकीयमध्ये श्री. ठाकरे यांनी मांडलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

मुंबईकडे मांस घेऊन जाणार्‍या दोन कंटेनरचालकांना अटक

मांसविक्री करणार्‍या संबंधितांवर पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा !
१ कोटी रुपयांचा माल कह्यात
      अक्कलकोट (जिल्हा सोलापूर), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - कर्नाटकातून मुंबईकडे मांस घेऊन जाणार्‍या दोन कंटेनरचालकांना पोलिसांनी पकडले. त्याद्वारे १ कोटी रुपयांचा मालही त्यांनी कह्यात घेतला आहे. या कारवाईमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील मांसाची तस्करी करणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात मांस असल्याचे उघडकीस आले. दोन्ही चालकांकडे कागदपत्रांची चौकशी केल्यावर त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अक्कलकोट पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारांनी सांगितले की, कह्यात घेतलेलेे मांस पुण्याला तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. ८ दिवसांत त्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला या नाटकावर सातारा जिल्ह्यात बंदी घालावी !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी 
सातारा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला हे नाटक महाराष्ट्राच्या इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबवण्यासाठी केलेले प्रचारनाट्य आहे. या नाटकाच्या शिवाजी अंडरग्राऊंड...... या नावातूनच शूर आणि पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांची अपकीर्ती करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा प्रखर, जाज्वल्य, दैदीप्यमान, पराक्रमी इतिहास जनतेसमोर ठेवण्याऐवजी नव्या पिढीला शेळपट आणि कुचकामी बनवण्यासाठी खोटा इतिहास या नाटकातून मांडण्यात येत आहे. त्यामुळे या नाटकाचे सातारा आणि कराड येथे होणारे प्रयोग रहित करून नाटकाच्या प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी श्री. अश्‍विन मुद्गल आणि जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख यांनी, तर जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री. संजय सुर्वे यांनी निवेदन स्वीकारले.

मराठी जनतेवरील अन्यायाच्या निषेधार्थ आज काळा दिन पाळण्यात येणार !

      बेळगाव, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - मराठी जनतेवरील अन्यायाच्या निषेधार्थ रविवार, १ नोव्हेंबर या दिवशी काळ्या दिनी सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येणार आहे. तसेच मूक सायकलफेरी काढण्यात येणार आहे. या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर म.ए. समिती, तालुका म.ए. समिती, शिवसेना, महिला आघाडी, मराठी युवा मंच आदी संघटनांनी केले आहे. सीमावासियांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सायकलफेरीत कणकवली येथील काँग्रेसचे आमदार नीतेश राणे आणि जालना येथील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर सहभागी होणार आहेत. काळ्या दिनाविषयी ठिकठिकाणी म.ए. समितीच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. तसेच तरुणांनी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे.

धुळे येथे उप-जिल्हाधिकार्‍यांकडून देवतांच्या चित्रांचे फटाके विक्री होऊ न देण्याचे आश्‍वासन

उप-जिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना हिंदुत्ववादी
हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
    धुळे - हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या सूचनांविषयी आम्ही विचार करू, तसेच देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असे प्रतिपादन धुळे येथील निवासी उप-जिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुलवळे यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले. समितीच्या वतीने ३० ऑक्टोबर या दिवशी दिवाळीतील फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबावी, यासाठी श्री. हुलवळे यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले.

शंभूराजांच्या तेजस्वी बलिदानाने महाराष्ट्राला बळ दिले ! - डॉ. परीक्षित शेवडे

     चेंबूर - छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने महाराष्ट्राला बळ दिले. महाराष्ट्र्र बळकावण्याचे औरंगजेबाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले; इतका कडवट प्रतिकार महाराष्ट्राने केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे शंभूराजांनी केवळ संरक्षणच केले नाही, तर त्याचा विस्तारही केला. एका बाजूने मदुराईपर्यंत, तर दुसरीकडे गोव्यापर्यंत स्वराज्याचा विस्तार त्यांच्या कारकीर्दीत झाला, असे प्रतिपादन आयुर्वेदतज्ञ आणि इतिहास अभ्यासक असलेल्या डॉ. परीक्षित शेवडे यांनी केले. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र धर्म व्याख्यानमालेत ते २९ ऑक्टोबर या दिवशी बोलत होते.

बेळगाव महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या विरोधाला न जुमानता भगव्या पताका काढल्या !

भगव्या पताका काढणारे महापालिकेचे कर्मचारी भारताचे कि पाकचे ?
      बेळगाव, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - राज्योत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात स्वागत फलक, जाहिराती आणि पताका लावण्यासाठी ठिकठिकाणी लावलेल्या भगव्या पताका हटवण्यास महानगरपालिकेने ३० ऑक्टोबरपासून प्रारंभ केला आहे. यामुळे धर्माभिमानी संतप्त झाले आहेत. (हिंदूंनो, केवळ संतप्त होऊन थांबू नका, तर भगव्या पताका पुन्हा लावेपर्यंत महानगरपालिकेतील संबंधितांकडे पाठपुरावा घ्या ! - संपादक) अतिक्रमण हटवण्याकडे कानाडोळा करणार्‍या महापालिका अधिकार्‍यांच्या डोळ्यांत भगव्या पताकाच का खुपत आहेत आहेत ? असा प्रश्‍न करून पताका हटवण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

खोटे बोलायचे; पण रेटूनबोलायचे, हे प्रसारमाध्यमांचे धोरण ! - संमोहनतज्ञ मनोहर नाईक

     मी ३० वर्षांपूर्वी (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांना भेटलो. त्यांचे व्यक्तीमत्त्व दैवी (सात्त्विक) आहे. मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी सनातनविषयी खोटे बोलायचे; पण रेटून बोलायचे, अशा प्रकारे धुमाकूळ घातला. मी माध्यमांना म्हटले, मी केवळ सत्याची बाजू घेणार. सत्य म्हणजे सनातन आहे. शाम मानव यांनी संमोहनाचे वर्ग घेऊन लाखो रुपये कमावले आहेत. शाम मानव यांच्यामुळे सनातन संस्थेसारख्या चांगल्या संस्थेच्या संपर्कात आलो, हे वाईटातून चांगले झाले. सनातनवरील आरोप १०० टक्के खोटे आहेत. - विख्यात संमोहनतज्ञ श्री. मनोहर नाईक

भ्रष्ट नेत्यांकडून कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक रक्कम वसूल करणार !

     मनमानी कर्जवाटप करून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला १४७ कोटी रुपयांना फसवणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांसह ४५ संचालकांकडून तातडीने रक्कम वसूल करण्याचा आदेश भाजप शासनाचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. 
    या आदेशामुळे अनेक दिग्गज नेत्यांना तातडीने रक्कम जमा करावी लागणार आहे.

३० ग्रॅमचा प्रसादरूपी लाडू ५० ग्रॅम दाखवून भक्तांची फसवणूक !

हिंदूंनो, प्रसादाच्या माध्यमातूनही भाविकांना लुबाडू पहाणार्‍यांना खडसवण्यासाठी संघटित व्हा !
  • भाविकांनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! 
  • पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा आणखी एक घोटाळा उघड !
      पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीद्वारे दिल्या जाणार्‍या लाडूच्या प्रसादात संबंधित ठेकेदाराकडून भक्तांची फसवणूक केली जात आहे. ३० ग्रॅमचा लाडू ५० ग्रॅम वजनाचा म्हणून विकला जात आहे. लाडूत काजू-बेदाण्याचे तुकडेही दिसत नाहीत, तसेच सिद्ध झालेल्या कळ्या आणून तो लाडू केला जात आहे. लाडू फुटून अनेक पाकिटांत केवळ कळ्या राहिल्या आहेत. याविषयी देवस्थानाकडे भक्तांच्या तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. या कारणास्तव १९ ऑक्टोबर या दिवशी देवस्थान समितीने ठेकेदाराला नोटीस दिली.

दिगंबर जाधव यांच्यासह स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांना पोलीस कोठडी !

सांगली येथील गोळीबार प्रकरण
    सांगली, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - ३० ऑक्टोबर या दिवशी संजयनगर परिसरात काँग्रेसचे नेते दिगंबर जाधव यांचा काँग्रेसचे महापालिकेतील स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्याशी भूमीच्या प्रकरणावरून वाद झाला होता. त्यातून यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी वरील दोघे आणि त्यांचे समर्थक यांना अटक केली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी प्रविष्ट झाल्या आहेत. ३१ ऑक्टोबरला दोन्ही गटांना न्यायालयात उपस्थित केले असता दिगंबर जाधव आणि त्यांचे समर्थक यांना ३ नोव्हेंबरपर्यंत, तर संतोष पाटील आणि त्यांच्या समर्थकांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी दिले आहेत. (अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना यापुढे निवडून द्यायचे का ? हे आता सूज्ञ जनतेने ठरवले पाहिजे ! - संपादक)

बजरंग दलाच्या वतीने मुशर्रफ यांच्या पुतळ्यास जोडे मारा आंदोलन !


      जयसिंगपूर, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना मनोरुग्ण, तसेच शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना आतंकवादी म्हटले होते. याचा निषेध करण्यासाठी जयसिंगपूर येथे बजरंग दलाच्या वतीने श्री. विजय धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली परवेझ मुशर्रफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारा आंदोलन करण्यात आले. तसेच नंतर तो पुतळा जाळण्यात आला.

कल्याण-डोंबिवलीत आज मतदान

      ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका, नवनिर्मित तीन नगर परिषदा अन् ६४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
     कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण १२२ जागांपकी ६१ जागा, तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांपकी ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. दोन्ही ठिकाणी २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल.

फलक प्रसिद्धीकरता

शाळेत पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणारे विद्यार्थी भारताचे कि पाकचे ?
    काश्मीरमधील कालकोटे (जि. राजौरी) येथील एका शासकीय शाळेत ८वीत शिकणार्‍या १२ विद्यार्थ्यांनी शाळेतच पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याची घटना घडली. या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Kashmirme 8vi kaksha ke 12 vidyarthione school ke dauran Pakistani nare lagaye.
    yah vidyarthi Bharat ke hai ya Pak ke ?
जागो !
    कश्मीरमें ८वीं कक्षा के १२ विद्यार्थीओने स्कूल के दौरान पाकिस्तानी नारे लगाए.
    यह विद्यार्थी भारत के या पाक के ?

प्रचलित शिक्षणपद्धतीत भारतीय दृष्टीकोनातून आमूलाग्र पालट आवश्यक !

श्री. दुर्गेश परूळकर
     आजवर शिक्षणाचे झालेले हिरवेकरण आणि त्याविषयीची सर्वमान्य होईल, अशी उपाययोजना यांवर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ लेखक, अभ्यासक आणि प्रखर हिंदुत्ववादी श्री. दुर्गेश परूळकर यांचा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. मागील लेखांमध्ये सध्याच्या शिक्षणपद्धतीमधील पालट, अयोग्य असलेली मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत, इंग्रजी वर्ष बनवतांना झालेले गोंधळ आणि परिपूर्ण असलेली भारतीय कालगणना यांविषयी आपण पाहिले. आज आपण समाज आणि राष्ट्र सामर्थ्यवान करण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षणपद्धत पहाणार आहोत.                                                                                भाग ३

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

     कानाचे पडदे फाडणारे, हृदयरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेश चतुर्थी, दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. आता दिवाळी तोंडावर आली आहे. या आठवड्यात परीक्षा संपल्या की, फटाक्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडेल. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही फटाक्यांच्या विक्रीवर कायमची बंदी घालू शकत नसल्याचे सांगितले, तर तमिळनाडू शासनाने फटाक्यांची चीनमधून होणारी आयात थांबवली आहे. त्यामुळेही फटाक्यांचा विषय दिवाळीच्या जरा आधीच चर्चेत आला आहे. खरे तर कोट्यवधी रुपयांचे कर्ज डोक्यावर असतांना आणि देशातील अर्धी जनता उपाशीपोटी झोपत असतांना सहस्रो रुपये जाळून फटाक्यांची विनाशकारी चैन करणे आपल्या देशाला परवडणारेही नाही.

मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीपेक्षा सुसंस्कारित पिढीच्या निर्मितीसाठी धर्मशिक्षण आवश्यक !

सौ. आनंदी पांगुळ
       मुंबई महापालिकेच्या शाळेत लैंगिक शिक्षणास प्रारंभ होणार ! या विषयीचे वृत्त गेल्या मासात वाचनात आले. यामध्ये म्हटले आहे की, मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. तूर्तास नववी आणि दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्यात येणार आहे. किशोरवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण कसे होऊ शकते आणि ते कशा प्रकारे टाळता येईल, याचे धडेही दिले जातील. जर असा प्रकार घडलाच, तर साहाय्यासाठी कुठे संपर्क करायचा, हेही सांगितले जाईल.

प्रसिद्धीमाध्यमांनी समाजमन कलुषित केल्यामुळे एका व्हॉट्स अ‍ॅप गटात सनातन या शब्दामुळे चालू झालेला वैचारिक लढा आणि त्यातून सिद्ध झालेल्या हिंदुत्ववादी गटातील संभाषण

     कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणी गेल्या एक मासापासून सनातन संस्थेवर विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. बहुतांशी वृत्तवाहिन्या हिंदुद्वेष्ट्या असल्यामुळे सनातनच्या हिंदु धर्मप्रसाराच्या कार्याचा धसका घेऊन त्यांनी अकारण सनातनवर टीकेची झोड उडवली. त्यामुळे घराघरात सनातनचे नाव पोचले. सनातनला ओळखणारे विचारी लोक सनातनच्या पाठीशी उभे राहिले, तर सनातनच्या कार्याविषयी अनभिज्ञ असलेल्या काही जणांचे मत सनातनवरील आरोपांमुळे कलुषित झाले.

हिंदु जनजागृती समितीवरील दडपशाही चालूच !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर
१. हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील
अन्यायाची दखल न घेणारी प्रसारमाध्यमे !
    सध्या विविध प्रसिद्धीमाध्यमांतून अश्‍लील संकेतस्थळांवरील बंदीविषयी पुष्कळ ऊहापोह चालू आहे. मानवाधिकार, स्वातंत्र्य यांच्या नावाखाली अश्‍लील संकेतस्थळांच्या बाजूने गळा काढणारे आंबटशौकीनही यात आहेतच. त्यातच ४ भिंतींच्या आत अश्‍लील संकेतस्थळांना पहाणे गुन्हा नाही, असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केल्याने या बाजारबुणग्यांना अधिकच चेव चढला आहे. अशा वेळी सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीसारख्या राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असलेल्या संकेतस्थळावर होणार्‍या अन्यायाची दखल मात्र कोणत्याही प्रसिद्धीमाध्यमाने घेतलेली नाही. या निमित्ताने केवळ टीआर्पीच्या मागे धावणार्‍या, एकांगी वृत्ते दाखवून सामान्यांची दिशाभूल करणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

अशांना काँग्रेस आमदारपद देते ! ही आहे काँग्रेसची संस्कृती आणि नीतीमत्ता !

आसाम राज्यातील काँग्रेसच्या ३६ वर्षीय आमदार श्रीमती रुमी नाथ यांचा जीवनपट अत्यंत वादग्रस्त आहे. वाहनचोर्‍या प्रकरणी प्रमुख सूत्रधार म्हणून गाजलेले अनिल चौहान यांच्याशी त्यांचा संबंध असल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी त्यांच्या प्रथम पतीला घटस्फोट न देता फेसबूक वरील मित्र जॅकी जाकीर या धर्मांधाशी विवाह केला. तत्पूर्वी मुस्लिम धर्मही स्वीकारला होता.

शासकीय कार्यक्षमता ! ही योजना ३ मासांत का बनवता आली नाही ?

     गोवा राज्यात दीन दयाल आरोग्य विमा योजना बनवण्याची प्रक्रिया गेली ३ वर्षे चालू होती. - आरोग्यमंत्री अधिवक्ता फ्रान्सिस डिसोझा

जे अमेरिकेला कळते, ते भारताला का कळत नाही ?

     अमेरिकेच्या संसदेने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य (आय.आर्.एफ्.) आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाने पाकिस्तानात होत असलेल्या हिंदु आणि ख्रिस्ती धर्मियांच्या संदर्भातील धार्मिक स्वातंत्र्य उल्लंघनाच्या गंभीर घटना लक्षात घेता पाकिस्तानला काळजी करण्यासारखे देश या सूचीत टाकण्याची शिफारस केली आहे. या आयोगाचे अध्यक्ष रॉबर्ट जॉर्ज यांनी ही माहिती दिली.

गोव्यातील पर्यटन योग्य दिशेने चालले आहे का ?

     दुर्दैवाने गोवा संगीतरजन्यांची राजधानी झाली असून सी प्लेेन्स, (पर्यटनासाठी समुद्रात उतरणारे विमान) कॅसिनो, संगीतरजन्या, हिप्पी (पाश्‍चात्त्य जीवनशैलीनुसार वावरणारे विदेशी), वेश्याव्यवसाय भाग (रेडलाईट भाग), समुद्रकिनार्‍यांवरील मसाज ही सध्या गोव्याची प्रतिमा झाली आहे. ही प्रतिमा गोव्याला हवी आहे का ? - प्रेरणा सिंग बिंद्रा, व्याघ्र प्रकल्पाच्या अध्यक्षा, पर्यावरणीय पत्रकार, पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या राष्ट्रीय मंडळाच्या सदस्या 

अमेरिकेच्या बॉबी जिंदाल यांना कळते, ते भारतियांना का कळत नाही ?

     अलीकडे हिंसक चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आदी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे नैतिक अधःपतन रोखण्यासाठी अमेरिकेला आध्यात्मिक पुनरुत्थानाची आवश्यकता आहे. - बॉबी जिंदाल, नेते, रिपब्लिकन पार्टी, अमेरिका

दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक यांचा जावईशोध !

     (म्हणे) महिलांपर्यंत साहित्यिकांचे विचार पोहोचत नाहीत; म्हणून त्या सनातनमध्ये सहभागी होतात ! - राजू नायक, संपादक, दैनिक लोकमत

पेजावर मठाचे श्री विश्‍वेशातीर्थ स्वामी यांच्या सहकार्‍यांच्या वाहनांवर दगडफेक

गोहत्याबंदी कायद्याविषयी प्रबोधन करणार्‍या स्वामीजींच्या सहकार्‍यांच्या 
वाहनांवर दगडफेक करणारे कोण असतील, हे हिंदू जाणून आहेत !
     टिळकवाडी (बेळगाव) येथील श्रीकृष्ण मठाच्या प्रदर्शनी भागामध्ये उडुपी येथील पेजावर अदोक्षजा मठाचे श्री विश्‍वेशातीर्थ स्वामी यांच्या सहकार्‍यांनी ठेवलेल्या वाहनांवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून वाहनांची मोडतोड केल्याची घटना १८ ऑक्टोबर २०१५च्या रात्री घडली. स्वामीजी गोहत्याबंदी कायद्याविषयी प्रबोधन करत असतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांवर समाजकंटकांनी आक्रमण केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांकडून स्वत:हून तक्रार दाखल करून घेण्यात आली असून अन्वेषण करण्यात येत आहे.
     स्वातंत्र्य, समता आणि न्याय या संविधानाने दिलेल्या अधिकारांपासून आपण दूर जात आहोत. केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, तर व्यक्तीस्वातंत्र्यही हिरावून घेण्याचा प्रकार चालू आहे. - श्री. परेश प्रभु, संपादक, दैनिक नवप्रभा

उत्तरदायींना तात्काळ निलंबित करा !

     नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या लोकप्रशासन विभागातील विद्यार्थ्यांचा निकाल विविध घोळांमुळे तीन वेळा पालटण्यात आला.
     विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम साधणे, वेदांमधील तत्त्वज्ञान सिद्ध करणे, हे माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. संगणकाच्या माध्यमातून देवाचे अस्तित्त्व सिद्ध करणे, हे माझे ध्येय आहे. - ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर
     मंदिरांच्या संपत्तीचा शासकीय दुरुपयोग, तसेच गोहत्या थांबणे आवश्यक आहे. या मंदिरांचा उपयोग राजकीय नेत्यांच्या पुनर्वसनासाठी होतो. त्याऐवजी त्यांचे व्यवस्थापन जनतेला अथवा भाविकांच्या विश्‍वस्त संस्थेकडे सोपवले पाहिजे.- शारदा पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

जाणून घ्या दीपावलीचे धर्मशास्त्र !

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
दीपावली विशेषांक !
प्रसिद्धी दिनांक : ८ नोव्हेंबर २०१५
मूल्य : ५ रूपये     पृष्ठे : १०
या अंकात वाचा...
१. दिवाळीतील सणांमागील अध्यात्मशास्त्र
२. अंगाला उटणे लावण्याची पद्धत
३. नरकासुर प्रतिमादहन आणि फटाक्यांचे प्रदूषण नकोच !
४. विविध सात्त्विक रांगोळ्यांच्या रंगीत कलाकृती !
५. आकाशकंदिल खरेदी करतांना हे लक्षात घ्या !
त्वरा करा ! आपली प्रत आजच राखून ठेवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ नोव्हेंबर
या दिवशी दुपारी ३.३० पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

मासिक सनातन प्रभात आता होणार पाक्षिक !

     राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची संख्या वाढत असल्याने सध्या या आघातांची वृत्ते येण्याचा ओघ प्रचंड आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्र आणि धर्म यासंदर्भात स्फूर्तीदायक प्रसंग घडतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टींविषयी हिंदूंना अवगत करणे आवश्यक आहे. यासाठीच पाक्षिक सनातन प्रभात करत आहोत.
वर्ष १७ अंक क्र. १ (१ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६)
१६ पानी पाक्षिक  मूल्य ८ रुपये  (वार्षिक वर्गणी : १८० रुपये)
पाक्षिकांमध्ये वाचकांना मिळणारे लिखाण
  •  राष्ट्र आणि धर्म याविषयी संतांचे मार्गदर्शन
  •  हिंदु धर्मावरील संकटांची वृत्ते /राष्ट्र आणि धर्म विषयक लेख
  •  राष्ट्रभाषा आणि देवभाषा यांच्या उत्थानासाठी प्रयत्न   
  •  सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍यांचे अभिप्राय
  •  भावी पिढी सुसंस्कारीत होण्यासाठी संस्कारविषयक मार्गदर्शन

गोवा दूतचे संपादक सचिन परब यांना अन्वेषण यंत्रणांपेक्षा अधिक कळते का ?

     डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी आणि पानसरे सरांना मारले. त्या-त्या वेळेस सनातन संस्थेवर बोट ठेवले गेले. विचार पटत नाहीत; म्हणून काय त्यांचा खून करायचा ? इतकी नीच विचारसरणी ? आणि त्याला धर्म आणि संस्कृती यांचा आधार द्यायचा ? आमच्या संस्कृतीबद्दल बोलण्याचा अधिकार तरी आहे का ? अक्कल तरी आहे का ? हे सनातन आपल्याकडे आहे, आपल्याबरोबर आहे, आपल्या सोबत वावरत आहे. याच्याविषयी मला तरी अत्यंत वाईट वाटते. मी इथे जगतो आहे, जिथे सनातनला मान दिला जातो; त्याच्याविषयी मला अतिशय वाईट वाटते. - सचिन परब, संपादक, गोवा दूत

बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर प्रसारमाध्यमे आणि साहित्यिक गप्प का ?

     बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी ४६ जिल्ह्यांमध्ये हिंदू नरकमय जीवन जगत आहेत. हिंदूंची १२८ मंदिरे पाडण्यात आली असून २५५ घरे जाळून टाकण्यात आली आहेत, तसेच २१ दुकानेही लुटून त्यांना आग लावण्यात आली आहे. हिंदूंची ५०० घरे या हिंसाचारात बाधित झाली आहेत. हे सर्व अत्याचार जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या सदस्यांनी स्थानिक अधिकार्‍यांच्या मूक संमतीने केले आहेत. त्यामुळे विभाजनाआधी हिंदूंची २८ टक्के लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात आता केवळ १२ टक्के हिंदूच शिल्लक राहिले आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.

अशी धर्मांध आणि राष्ट्रविघातक वक्तव्ये केवळ भारतातच केली जातात अन् प्रतिदिन पाकिस्तान भारतावर आक्रमण करतो !

     कल्याण-डोंबिवलीमध्ये महानगरपालिका निवडणुकीत एम्.आय.एम्.च्या शकिला बानो आणि रमीज मजीद यांच्या प्रचारासाठी या पक्षाचे नेते जावेद डॉन २१ ऑक्टोबर २०१५ या दिवशी कल्याणमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी याकूब मेमन मुसलमानांसाठी शहीद झाला, हे लक्षात ठेवा आणि एम्.आय.एम्.ला मते द्या, असे मुसलमानांना आवाहन केले. हे प्रशासनाला लज्जास्पद !

नुसत्या बातम्या देणारे नव्हे, तर अपघात होऊ न देणारे शासन हवे !
     महाराष्ट्रात वर्षभरात एकूण ६१ सहस्र ६२७ अपघात झाले. त्यात १२ सहस्र ८६३ जणांचा बळी गेला. मृत्यूच्या संख्येत राज्य तिसर्‍या स्थानावर आहे. रस्त्यांची दूरवस्था, गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसणे, धोक्याच्या ठिकाणी दुभाजक असणे, अतिवेगामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटणे, दारू पिऊन गाडी चालवणे, समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे, धोकादायक वळणावर वेगाने गाडी चालवणे, पार्किंग लाईट न लावता महामार्गावर गाडी थांबवणे अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात.
     अधर्मी राज्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली भारताच्या निधर्मीपणाच्या चिंध्या चिंध्या उडवल्या आहेत !

एका साधिकेला महाविद्यालयात आलेले कटू अनुभव

उघडपणे अशा गोष्टी घडूनही यासंदर्भात काही न करणारे मृतवत् हिंदू !
१. पंजाबी पोषाख घालून महाविद्यालयात गेल्यावर
मैत्रिणींनी नावे ठेवणे आणि जीन्स घालण्यास सांगणे
    मी महाविद्यालयात जातांना मध्ये भांग पाडायचे, कुंकू लावायचे आणि पंजाबी पोषाख घालायचे. त्यामुळे इतर मुली मला म्हातारी म्हणायच्या. त्या मला सांगायच्या, भांग पाडू नकोस. जीन्स नाहीतर निदान लेगीन्स तरी घालत जा. मला ते घालायला आवडत नव्हते; म्हणून मी कधी तसे केले नाही. मी लेगीन्स घालावी आणि इतर मुलींप्रमाणे रहावे, असे माझ्या आईलाही वाटायचे.
२. स्वतःच्या स्वार्थासाठी जन्मदात्या आई-वडिलांशी खोटे बोलणारी तरुण मुले !
    वर्गातील काही मुली अशाही होत्या की, त्या पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्या, तरी मी उत्तीर्ण झाले, असे खोटे सांगायच्या आणि आई-बाबांकडून शिक्षणासाठी पैसे घ्यायच्या. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, कुठे स्वतःच्या स्वार्थासाठी जन्मदात्या आई-वडिलांशी खोटे बोलणारी ही तरुण मुले आणि कुठे राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी पूर्णवेळ सेवा करणारे सनातनचे आदर्श साधक !

सनातनच्या असामान्य कार्याचे महत्त्व प्रसारमाध्यमे, पुरोगामी आदींना न समजण्याचे कारण

सूर्य कितीही तेजस्वी असला, तरी मातीच्या गोळ्यावर त्याचे प्रतिबिंब पडत नाही. त्याच्या तेजाची धारणा करण्यासाठी आरसा किंवा स्फटीकच असावा लागतो. या न्यायाने प्रसारमाध्यमे, पुरोगामी आदी सनातनच्या कार्यावर टीका करतात, तर अनेक संत, धर्माचार्य आणि धर्माभिमानी सनातनच्या कार्याचे कौतुक करतात.

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला लाईफ सर्टिफिकेट द्यावे !

      ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात लाईफ सर्टिफिकेट द्यावे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून लाईफ सर्टिफिकेट देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.) - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०१५)

वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व !

    मोदी शासनाने २१ जून हा योगदिन म्हणून साजरा केला, हे स्तुत्य होते; पण त्यातून ॐ वगळण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी होता, हे केवळ श्रद्धाळू हिंदूंच्याच नव्हे, तर ॐ चे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले महत्त्व जाणणार्‍या कोणत्याही व्यक्तीच्या सहज लक्षात येईल. काही दिवसांपूर्वी नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) या अमेरिकेतील संस्थेने उपग्रहाद्वारे सूर्याच्या नादाचे केलेले ध्वनीमुद्रण यू-ट्यूब या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ध्वनीमुद्रण ऐकल्यावर सूर्याचा नाद आणि ॐकार यांत आश्‍चर्यकारक साधर्म्य असल्याचे लक्षात आले. या पार्श्‍वभूमीवर वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व सांगणारे संकेतस्थळावरील पुढील लिखाण वाचकांसाठी देत आहोत.
१. वैज्ञानिक आणि व्यवहार्य कारणांमुळे ॐचा जप करणे लाभदायी !
    ॐ मंत्राविषयी पुष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत. ॐ हा एक वैश्‍विक ध्वनी (कॉस्मिक साऊंड) असून त्यातून विश्‍वाची निर्मिती झाली, हा त्यातील सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे; पण भारतीय (हिंदु) संस्कृतीत ॐ चा नियमित जप करण्यामागे केवळ तेच एकमेव कारण नाही, तर हिंदु संस्कृतीतील इतर पारंपरिक धार्मिक कृतींमागे असतात, तशी मनुष्याला दीर्घकालीन लाभ देणारी काही शास्त्रीय आणि व्यवहार्य कारणेही आहेत. (ही कारणे ध्वनी, कंपने आणि अनुनाद (रेझनन्स) यांच्याशी संबंधित शास्त्रावर आधारित आहेत.)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उच्च लोकांतून भूतलावर जन्माला आलेल्या दैवी (सात्त्विक) बालकांचे आदर्श पालक !

डावीकडून कु. ईशान जोशी, श्री. योगेंद्र जोशी, सौ. निवेदिता जोशी आणि कु. सानिका जोशी
सौ. निवेदिता जोशी यांनी कु. सानिकाला वयाच्या १६ व्या वर्षी आणि
कु. ईशानला वयाच्या १४ व्या वर्षी पूर्णवेळ साधनेसाठी
रामनाथी आश्रमात पाठवण्याविषयी प्रेरक चिंतनातून व्यक्त केलेले मनोगत !
मुले साधनेसाठी सनातनच्या आश्रमात रहातात, याचे
कौतुक वाटणारे आदर्श आई-वडील श्री. योगेंद्र आणि सौ. निवेदिता जोशी !
    सनातन संस्था मुलांना पळवते, असा आरोप करणार्‍या धर्मद्रोह्यांना आश्रमात रहाण्यास येणार्‍या मुलांच्या आई-वडिलांचा दृष्टीकोन कसा असतो, हे सौ. निवेदिता जोशी यांनी लिहिलेल्या या लेखावरून स्पष्ट होईल. अशा आदर्श आई-वडिलांच्या तुलनेत मुलांना साधना करण्यास किंवा आश्रमात रहाण्यास विरोध करणारे आई-वडील आणि नातेवाईक किती क्षुद्र वृत्तीचे असतात, मुलांच्या ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गात कसे तीव्र स्वरूपाचे अडथळे आणतात, हेही यावरून स्पष्ट होईल. सौ. निवेदिता जोशी यांनी लिहिलेल्या सुंदर लेखाबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे ! कु. सानिका आणि कु. ईशान जोशी यांच्या आई-वडिलांसारखे आई-वडील साधना करण्यास इच्छुक असणार्‍या सर्वांनाच लाभोत, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.१०.२०१५)

अपघातामुळे भाजलेल्या यजमानांची रुग्णालयात निकराची झुंज चालू असतांना प्रत्यक्ष भगवंतच कसा पाठीराखा होऊन राहिला आणि गुरुमाऊलीच्या अपार कृपेमुळे जीवघेण्या प्रसंगांना कसे तोंड देता आले, याविषयी साधिकेला आलेले अनुभव

    २५ ऑक्टोबरच्या अंकात आपण श्री. नितीन सहकारी यांनी अपघाताच्या प्रसंगावर उत्कट श्रद्धेच्या बळावर मात कशी केली ते पाहिले. आज आपण सौ. श्रुती सहकारी यांना आलेल्या अनुभूती पाहूया.
    रामनवमीला, म्हणजे २८.३.२०१५ या दिवशी माझे यजमान श्री. नितीन सहकारी यांना जहाजावर अपघात होऊन त्यांचे दोन्ही पाय गंभीररित्या भाजले. त्यानंतर ४३ दिवस ते वैद्यकीय उपचारांसाठी सायप्रस या देशातील एका रुग्णालयात होते. त्यांच्यासमवेत मीही १ मास तिथे होते. या प्रसंगी अनेक नातेवाइकांनी आपणहून साहाय्य केल्याने त्यांच्यातील चांगुलपणा अनुभवता आला, तसेच देवाच्या कृपेने परक्या देशांतही अनेक जण साहाय्यासाठी धावून आल्याने त्या कठीण प्रसंगावर मात करता आली. या वेळची मनाची स्थिती, स्वभावदोष-निर्मूलन अन् भावजागृती यांसाठी केलेले प्रयत्न आणि देवाच्या कृपेच्या आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.   
    पतीवर दोन्ही पाय गमावण्याचा प्रसंग आल्यावरही भावनाप्रधान सौ. श्रुती नितीन सहकारी किती लवकर भावाच्या स्तरावर राहू शकल्या, हे त्यांच्या या लेखातून लक्षात येईल. पुढे येणार्‍या आपत्काळात बर्‍याच कुटुंबांवर असे प्रसंग येतील. तेव्हा सौ. सहकारी यांचे उदाहरण आठवल्यास त्या प्रसंगात स्थिर रहाण्यास साहाय्य होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.८.२०१५)          
                               
१. पूर्वसूचना
    २५.३.२०१५ या दिवशी आमच्या आगाशीत लावलेल्या तुळशीची एक फांदी अकस्मात् करपली. तुळशीवर आक्रमण झाल्याचे मला जाणवले आणि काहीतरी अघटित घडणार असल्याचा हा संकेत असावा, असे वाटले. २८ आणि २९ मार्च या दिवशी मनाची अस्वस्थता वाढली होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म
या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
    सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पांडित्य दाखवणारे केवळ पुस्तकाप्रमाणे असणे !
पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते. ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०१५)

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमार्थ म्हणजे काय ? 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       स्वार्थाची (स्वचा अर्थ जाणून घ्यायची) पराकाष्ठा, म्हणजे परमार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

पारंपरिक आतंकवाद !

संपादकीय
    २८ ऑक्टोबर या दिवशी काश्मीर राज्यातील खुडपोरा या गावी सुरक्षा दलाच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचा काश्मीरमधील प्रमुख अबू कासिम ठार झाला. मागील ६ वर्षे जम्मू-काश्मीर राज्यातील आतंकवादी कारवायांची सूत्रे तो हाताळत होता. सुरक्षा दलाच्या सैनिकांनी आतंकवादी संघटनेच्या म्होरक्याला संपवले, ही गोष्ट देशाला अभिमानास्पद आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी कासिमचा अंत्यविधी पार पडला, तेव्हा सहस्रावधी लोक उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn