Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गोमांस मिळत असल्याच्या कारणावरून हिंदु सेनेचे कार्यकर्ते देहलीतील केरळ भवनात घुसले !

 हिंदूंच्या धार्मिक भावनांविषयी जागरूक असणार्या  हिंदु सेनेचे अभिनंदन ! 
  • सूचीत 'बीफ फ्राय'चा उल्लेख !            
  • तत्परतेने केरळ भवनमध्ये धाव !  
  • तत्परतेमुळे केरळचे मुख्यमंत्री संतप्त !
  • केरळच्या खासदारांची निदर्शने !

नवी देहली - गोमांस मिळत असल्याच्या कारणावरून हिंदु सेनेचे कार्यकर्ते देहलीतील केरळ भवनात धडकपणे घुसले. 
१. नवी देहलीत जंतरमंतर पटांगणाच्या नजिक केरळ भवन आहे. तेथे केरळमधील राजकीय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती अन् अधिकारी निवास करतात. 
२. या ठिकाणी गोमांसाचे पदार्थ मिळत असल्याची माहिती केरळमधील हिंदुत्ववाद्यांकडून हिंदु सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. 

मोहरमसाठी ममता (बानो) बॅनर्जी शासनाने श्री दुर्गादेवीच्या प्रतिमांचे विसर्जन २ दिवस पुढे ढकलले !

हिंदूंनो, आज श्री दुर्गादेवीच्या प्रतिमांचे विसर्जन पुढे ढकलणारे ममता (बानो) शासन उद्या नवरात्र साजरे करण्यावरही बंदी घालील, हे लक्षात घ्या ! दादरी प्रकरणावरून हिंदूंच्या विरोधात रात्रंदिवस गरळओक करणार्या वृत्तवाहिन्या हिंदूंवरील या अन्यायाविषयी एका ओळीचे वृत्तही दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
कोलकाता - बंगालमध्ये दुर्गापूजा हा सण सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरेप्रमाणे दसर्यााच्या दुसर्याठ दिवशी श्री दुर्गादेवीच्या प्रतिमांचे विसर्जन केले जाते. यावर्षी दसरा २२ ऑक्टोबरला होता; त्यामुळे श्री दुर्गादेवीच्या प्रतिमांचे विसर्जन २३ ऑक्टोबरला करण्यात येणार होते. हा विसर्जन सोहळा २४ ऑक्टोबरपर्यंत चालला असता. तथापि २४ ऑक्टोबरला मोहरम आल्याने श्री दुर्गादेवीच्या प्रतिमांचे विसर्जन २३ आणि २४ ऑक्टोबरला करू नये, असा आदेश तृणमूल काँग्रेसच्या ममता (बानो) शासनाने काढला. विसर्जनाची प्रथा मोडल्यामुळे श्री दुर्गादेवीच्या प्रतिमांच्या विसर्जनाला विलंब झाला. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर 'शहरातील रहदारी विस्कळीत होईल', असे कारण पुढे करत हे विसर्जन २६ ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवू नये, असेही या आदेशात म्हटले होते. या निर्बंधांची घोषणा स्वत: मुख्यमंत्र्यांनी दुर्गापूजा समितींच्या पदाधिकार्यांटची बैठक घेऊन केली. तसेच प्रथेविरुद्ध जाऊन घरोघरी बसणार्याद दुर्गा प्रतिमांचे विसर्जन एक दिवस अगोदरच म्हणजे २२ ऑक्टोबरलाच करावे, असेही निर्बंध घालण्यात आले होते. (सत्तांध ममता बॅनर्जी यांनी धर्माचरणापासून हिंदूंना वंचित ठेवले, यात आश्चघर्य नाही ! - संपादक)

राजौरी (काश्मीर) येथील शाळांत आजही म्हटले जात नाही राष्ट्रगीत !

केंद्रशासनाने यात त्वरित हस्तक्षेप करून इतर शाळांप्रमाणे 
राजौरीतील सर्व शाळांतून राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करावे, ही अपेक्षा !
राजौरी - सीमावर्ती आणि आतकंवादग्रस्त भाग असलेल्या राजौरीमधील शासकीय, तसेच खाजगी शाळांत आजही राष्ट्रगीत म्हटले जात नाही. एकेकाळी आतंकवाद्यांच्या धास्तीने येथील शाळांत राष्ट्रगीत म्हटले जात नव्हते; मात्र आता आतंकवादी आक्रमणे पुष्कळ न्यून होऊनही ते म्हटले जात नाही. 
राष्ट्रगीत न म्हणणे, हा राष्ट्रगीताचा अवमान असून आता ते सर्व शाळांमधून म्हणण्यासाठी शिक्षण विभागाकडून एक पत्र काढून आदेश देण्यात येणार आहे. ज्या शाळांमधून राष्ट्रगीत म्हटले जाणार नाही, त्या शाळांवर कारवाई करणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

कॅनडातील राष्ट्रप्रेमी भारतीय नागरिकाने विचारलेल्या प्रश्‍नांमुळे साहित्य अकादमी पारितोषिक परत करणारे अशोक वाजपेयी झाले निरुत्तर !

समाजाविषयी स्वारस्य असल्यामुळे नव्हे, तर केवळ मोदीद्वेष आणि प्रसिद्धीलोलुपता यांमुळे लेखक 
पुरस्कार परत करत असल्याच्या शंकेला तथ्य असल्याचे स्पष्ट करणारी घटना !
     टॉरंटो (कॅनडा) - शहरात २१ ऑक्टोबर या दिवशी साहित्य अकादमी पारितोषिक परत करणारे अशोक वाजपेयी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास राष्ट्र्रप्रेमी भारतीय श्री. सुंदर दिलीपन् हेही उपस्थित होते. यापूर्वी त्यांनी अशोक वाजपेयी यांचे नावही ऐकले नव्हते. केवळ उत्सुकतेपोटी ते या व्याख्यानाला गेले होते. त्यांनी श्री. वाजपेयी यांना काही प्रश्‍न विचारले; मात्र त्यांची उत्तरे वाजपेयी यांना देता आली नाहीत.

देहलीतील भारत-आफ्रिका परिषदेवर आय.एस्.आय.एस्. आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांच्या आक्रमणाचे सावट

२५ सहस्रांहून अधिक सुरक्षा रक्षकांचा कडक बंदोबस्त  
नवी देहली - येथे चालू असलेल्या 'भारत-आफ्रिका' परिषदेसाठी आलेल्या आफ्रिकेच्या नेत्यांना 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ँण्ड सिरिया' अर्थात् आय.एस्.आय.एस्. आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांचे जिहादी आतंकवादी धोका निर्माण करू शकतात, अशी शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तवण्यात आल्यामुळे परिषदेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबरपासून चालू झालेली ही परिषद २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून या परिषदेला आफिक्रा खंडातील १४ मंत्र्यांसह ५४ देशांतील नेते आले आहेत. 

काश्मीरमध्ये चकमकीत १ सैनिक हुतात्मा; २ आतंकवादी ठार

हे कुठपर्यंत चालणार आहे ? शासनाने आतातरी पाकला धडा शिकवावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
श्रीनगर - दक्षिण काश्मीमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले असून १ सैनिक हुतात्मा झाला आहे. सुरक्षा दलाला पुलवामाच्या द्राबगांव येथे २ आतंकवादी लपले असल्याची सूचना मिळाली होती. सैन्य आणि पोलीस तेथे गेल्यावर आतंकवाद्यांनी गोळीबार चालू केला. ही चकमक सुमारे अडीच घंटे चालू होती.

बजरंग दल १० लक्ष नवीन गोरक्षक प्रशिक्षित करणार !

गोरक्षणासह धर्महानीच्या इतर घटनांविषयीही बजरंग दलाने कृती करावी, ही हिंदूंची अपेक्षा !
     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्‍या बजरंग दलाने विविध राज्यांत १० लक्ष नवीन गोरक्षक प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधीही गो-रक्षा आणि हिंदु धर्मातील विविध जाती-जमातीतील लोकांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करणार्‍या १५ लक्ष कार्यकर्त्यांपैकी ३ लक्ष कार्यकर्त्यांना पुनर्प्रशिक्षित करण्यात आले आहे. 
१. वर्ष १९८४ मध्ये स्थापन झालेल्या बजरंग दलाने ख्रिस्ताब्द १९९६ पासून गोरक्षणाच्या कार्यास प्रारंभ केला. वर्ष १९९६-९७ मध्ये १ लक्ष ५० सहस्र गोवंशांना पशूवधगृहात जाण्यापासून त्यांनी वाचवले. विश्‍व हिंदु परिषदेची युवा शाखा म्हणून कार्यरत असलेल्या बजरंग दलाने त्यानंतर प्रत्येक वर्षी १ लक्ष गोवंश कसायाकडे जाण्यापासून रोखले आहेत.

दर्शन तिरुनल महामहम् उत्सवाद्वारे हिंदूंना फसवण्याचा ख्रिस्ती मिशनर्‍यांचा डाव !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! हिंदूंनो, ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या या भूलथापांना बळी पडू नका !
     कोची (केरळ) - राज्यात सध्या ठिकठिकाणी दर्शन तिरुनल महामहम् हा उत्सव साजरा करण्याची भित्तीपत्रके लागली आहेत. ती वाचून कोणत्याही हिंदूची हा हिंदु उत्सव असेल, अशी समजूत होते; मात्र तसे काही नसून भोळ्या हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचे आणखी एक जाळे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी विणले आहे. 

दादरी प्रकरणी अभाविपच्या संदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्पष्टीकरण 
मुंबई - दादरी प्रकरण हे लव्ह जिहादवरून घडले असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होेते. तथापि हे वृत्त निराधार असल्याचे अभाविपने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. दादरी येथे घडलेल्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआय) चौकशी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेला कोणताही राजकीय रंग न देता समाजात शांती कायम ठेवावी, असे आवाहन अभाविपकडून या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे. 

देशद्रोहाचे परिपत्रक मागे ! - शासनाची न्यायालयात माहिती

मुंबई - शासन किंवा लोकप्रतिनिधी यांवर टीका केल्यास देशद्रोहाचा खटला भरण्याविषयीचे वादग्रस्त ठरलेले परिपत्रक मागे घेत असल्याचे राज्यशासनाकडून २७ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी हे परिपत्रक रहित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याचे सांगितले होते.  

लालूप्रसाद यांच्या पुत्राला १ लाख २५ सहस्र कोटी रुपये आकडा लिहिता येणार नाही ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

     पाटणा (पाटलीपुत्र) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या १ लाख २५ सहस्र कोटी रुपयांच्या बिहार पॅकेजवर राष्ट्र्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पुत्राने टीका केली. यावर लालूप्रसाद यांच्या पुत्राला १ लाख २५ सहस्र कोटी हा आकडा कागदावर लिहायला सांगितला, तर त्यावर किती शून्य असतात, हेही त्यांना समजणार नाही, अशी टीका मोदी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी नौबतपूर येथील सभेत मोदी बोलत होते. यापूर्वी पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात यादव यांच्या कन्या मीसा भारती यांचा भाजपकडून पराभव झाला होता. या वेळी यादव यांनी त्यांच्या तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उभे केले आहे.

उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक आणि नगरविकास मंत्री आझम खान म्हणतात,गायीसारख्या निष्पाप प्राण्याला मारणारे पापी !

आझम खान यांनी हे त्यांच्या धर्मबांधवांना सांगावे !
     रामपूर (उत्तरप्रदेश) - गाय ही निष्पाप आणि अतिशय उपयोगी आहे. ती आपल्याला दूध देते. शास्त्रामध्येही गायीचे दूध उपयुक्त असून तिचे मांस हानीकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जे कोणी गायीसारख्या उपयुक्त आणि निष्पाप प्राण्याला मारतात, ते येथे आणि स्वर्गामध्येही पापी ठरतात, असे उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक आणि नगरविकास मंत्री आझम खान यांनी म्हटले आहे. गोवर्धनपुरीचे पीठाधीश्‍वर स्वामी अधोक्षानंदजी महाराज यांनी खान यांना गाय भेट दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. खान पुढे म्हणाले, स्वामी अधोक्षानंदजी महाराज यांच्याशी माझा चांगला परिचय आहे. यापूर्वी महाकुंभसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांनी मला गायही भेट दिली आहे. अशा प्रकारची भेट देऊन त्यांनी माझ्यावरील प्रेम दर्शवले आहे आणि या प्रेमाला आम्ही प्रेमानेच उत्तर देणार आहोत.

दादरी (उत्तरप्रदेश) येथे रामलीलेच्या कार्यक्रमात सनातनच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

ग्रंथप्रदर्शनास ३ सहस्र ५०० हून अधिक जिज्ञासूंची भेट !
ग्रंथ प्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू
     दादरी (उत्तरप्रदेश) - येथे १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यासह या प्रदर्शनात धर्मशिक्षण देणारे फलकही लावण्यात आले होते. या प्रदर्शनास साडेतीन सहस्राहून अधिक जिज्ञासूंनी भेट दिली. हे प्रदर्शन लावण्यास या रामलीलाचे आयोजक श्री. पवन बंसल, तसेच त्यांचे बंधू श्री. कृष्णा बंसल, कु. निकुंज बंसल आणि कु. माधव बंसल यांनी यासाठी सहकार्य केले.

फेसबूकद्वारे आय.एस्.आय.एस्.चा प्रचार करणार्‍या अझिझाह युसूफ या ५५ वर्षीय महिलेला मलेशियात शिक्षा !

आतंकवाद्याच्या धर्मांध मातेला शिक्षा करणार्‍या मलेशियाकडून भारतीय राज्यकर्त्यांनी बोध घ्यावा !
    क्वालालंपूर - फेसबूकद्वारे आय.एस्.आय.एस्.चा प्रचार करणार्‍या अझिझाह युसूफ या ५५ वर्षीय महिलेला मलेशियातील न्यायालयाने अडीच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अझिझाह युसूफ हिचा मुलगा आय.एस्.आय.एस्.चा आतंकवादी आहे. अझिझाह हिला २८ एप्रिलला अटक करण्यात आली होती. अझिझाहच्या घरातून पोलिसांनी संगणक आणि हेडफोन हस्तगत करून चाचणीसाठी पाठवला आहे. अझिझाहची फेसबूकवर २ खाती असल्याचे तपासात निष्पन्न झाले. एक खाते वर्ष २०१३ मध्ये तिच्या मुलीने उघडले होते. मुलगा आय.एस्.आय.एस्. मध्ये सहभागी झाल्यावर तिने दुसरे फेसबूक खाते उघडले होते. तिच्या मुलाने सिरियातील विविध घडामोडी आईला कळवल्यावर अझिझाहने ती माहिती इतरत्र पाठवून त्याचा प्रचार केला होता.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नई येथील श्री भवानी मंदिरात सत्संग

सत्संगाला उपस्थित असलेल्या महिला भाविक
     चेन्नई - कोलाथूर येथील श्री भवानी मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंथी जयकुमार यांनी धर्माचरणाचे महत्त्व या विषयावर सत्संग घेतला. या वेळी त्यांनी नवरात्र, कुंकुमार्चन, दीपावली यांविषयीचे आध्यात्मिक महत्त्व विषद केले, तसेच फटाक्यांचे दुष्परिणाम सांगितले.

होशंगाबाद (मध्यप्रदेश) येथे भागवतकथा कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथ अन् धर्मशिक्षणफलक यांचे प्रदर्शन

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पहातांना प.पू. सदाशिव
स्वामी नित्यानंदगिरीजी महाराज
     पलिया पिपरिया, होशंगाबाद (मध्यप्रदेश) - येथे २३ ऑक्टोबरपासून स्वामी नित्यानंदगिरी यांचे भागवतपुराणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथ अन् धर्मशिक्षणफलक प्रदर्शन लावण्यात आले आहे. स्वामीजी त्यांच्या प्रवचनातून राष्ट्र्ररक्षण, धर्मजागृती, हिंदु संस्कृती आणि धर्माचरण यांविषयी मधुर भाषेत प्रबोधन करतात. याकरता गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात.

महाराष्ट्रात पुणे परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक सापळे रचले !

जय जय महाराष्ट्र माझा !
भ्रष्टाचारमुक्त देशासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
नाशिक - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षी पुणे परिक्षेत्रात १८१ सापळे यशस्वीरित्या रचल्याचे वृत्त समोर आले आहे. नाशिक परिक्षेत्रात १६१ सापळे रचण्यात आले आहेत. नाशिक परिक्षेत्रात नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे. भ्रष्टाचार करणार्या शासकीय कर्मचार्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रवीण दीक्षित यांच्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती चळवळ चालू झाली. सोशल मिडियाच्या माध्यामातूनही जनतेत जनजागृती झाल्यामुळे नागरिक जागरूक झाल्याने सापळ्यांची संख्या वाढली. पुढील काही परिक्षेत्रांत लाचलुचपत विभागाने रचलेल्या सापळ्यांची संख्या अशी आहे - संभाजीनगरमध्ये १५४, नागपूरमध्ये १४१, ठाण्यामध्ये ११६, अमरावतीमध्ये ११२, नांदेडमध्ये १०३, तर मुंबई येथे ५४.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहेत. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही 'धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत', असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. 'त्यात तथ्य आहे', असे क्षणभर गृहीत धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. 'कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत', असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये धर्मश्रद्ध हिंदूंसाठी किती दुखरी असतात, याची उदाहरणे खाली दिली आहेत. या वक्तव्यांचे समर्थन विचारस्वातंत्र्य म्हणून करता येईल का, हे हिंदूंनी ठरवावे.
भाकडकथांनी भरलेली, अस्पृश्यतेचे समर्थन करणारी आणि अलीकडे शे-सव्वाशे वर्षातच मुस्लिम पिरांकडून हिंदु धर्मात आलेली सत्यनारायण पूजा, ही श्रद्धेचा मानबिंदू ठरते कशी ? - डॉ. नरेंद्र दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (संदर्भ : अंधश्रद्धा विनाशाय, लेखक : डॉ. नरेंद्र दाभोलकर)     (क्रमश: )

धर्माचरणाने स्त्रियांमधील देवीचे तत्त्व वाढते ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्माभिमान्यांना मार्गदर्शन 

   
पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित धर्माभिमानी
हुपरी,
२७ ऑक्टोबर (वार्ता.) - धर्माचरणाने स्त्रियांमधील देवीचे तत्त्व वाढते आणि देवाचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात. लव्ह जिहादने हिंदु संस्कृती आणि भारताला ग्रासलेले आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक घरात मुलीने धर्माचरण करणे आणि हिंदु संस्कृतीचे पालन करणे, हीच अंतिम उपाययोजना असणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी येथे केले. येथील राजगुरुनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये धर्माभिमान्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या ७० धर्माभिमान्यांची उपस्थिती होती. 

(म्हणे) शस्त्रपूजेमुळे हिंसक वृत्तीला पोषक वातावरण !

  • शस्त्रपूजनामागील शास्त्र जाणून न घेता त्यावर नाहक टीका करणे, हा हिंदुद्वेषच !
  • डाव्यांकडे नक्षलवाद आहे, असे म्हणणारे प्रकाश आंबेडकर यांचा संघावर हास्यास्पद आरोप !
     नागपूर - लढण्यासाठी कुठलीही परकीय सत्ता नसतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्रास्त्रांची मोठ्या संख्येने पूजा करून हिंसक वृत्तीच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण करत आहे. शस्त्रपूजन करणे आवश्यक असेल, तर देशाच्या सीमांवर लष्कराची आणि देशांतर्गत संरक्षणाची आवश्यकता काय, असा प्रश्‍न भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला. (दलितांनी शस्त्रे हाती घ्यावीत, अशा अर्थाची विधाने वारंवार जोगेंद्र कवाडे यांच्यापासून खासदार रामदास आठवले यांच्यापर्यंत अनेक नेते करत असतांना विजयादशमीला शस्त्रपूजनाची प्राचीन परंपरा असणार्‍या शस्त्रांचे पूजन संघाने का करू नये ?  - संपादक)

हिंदूंना बळ मिळण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे ! - राजन बुणगे

श्री दुर्गादौडीनिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी मार्गदर्शन 
     टोप (जिल्हा कोल्हापूर), २७ ऑक्टोबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र विसरल्यामुळे महाराष्ट्र आणि भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात गेला अन् अजूनही तरा सांस्कृतिकदृष्ट्या पारतंत्र्यांतच आहे. ही स्थिती पालटण्यासाठी शिवछत्रपतींच्या चरित्राचे स्मरण करून ते आचरणामध्ये आणणे, हेच हिंदु धर्माने शिकवलेले आहे. हा जातीय भेद, सांप्रदायिकता, पक्ष, संघटना हे धर्मापेक्षा मोठे होऊन बसले आहेत; म्हणून धर्म बाजूला गेला. हिंदू धर्माचरण करत नसल्याने त्यांना धर्माचे म्हणजे देवाचे बळ मिळत नाही. हिंदूंना बळ मिळण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी येथे केले. २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ वाजता येथील मारुति मंदिर येथे श्री दुर्गामाता दौडीच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटवा ! - नीलम गोर्‍हे, आमदार, शिवसेना

     कोल्हापूर, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीपर्यंत सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आज केली. त्या म्हणाल्या, "चंद्रकांतदादा पाटील हे भाजप आणि ताराराणी आघाडीमध्ये गुंडांना निवडणुकीची संधी देऊन हाणामार्‍यांचे समर्थन करत आहेत. त्यामुळेच त्यांना कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे."

(म्हणे) सनातनवर ४ बॉम्बस्फोटांचे आरोपपत्र प्रविष्ट !

सनातनच्या विरोधात आवई उठवणारे माजी न्यायमूर्ती 
बी.जी. कोळसे-पाटील यांचा धादांत खोटा आरोप !
     नगर, २७ ऑक्टोबर - रा.स्व. संघावर १३, तर सनातन संस्थेवर ४ बॉम्बस्फोटांचे आरोपपत्र प्रविष्ट आहे, असे वक्तव्य माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केले. (कोणत्याही न्यायालयाने सनातन संस्थेवर दोषारोप पत्र ठेवलेले नसतांना असा आरोप करणारे न्यायमूर्ती कोळसे-पाटील हिंदुद्वेषापोटी बोलत आहेत, असे वाटल्यास चूक ते काय ? माजी न्यायमूर्तींसारख्या व्यक्तींनी अशा प्रकारे धादांत खोटे बोलणे म्हणजे समाजाची दिशाभूल करणेच होय. - संपादक)

कर्नाटक शासनाचा १ नोव्हेंबरला राज्योत्सव; मात्र मराठी भाषिक पाळणार काळा दिन

     बेळगाव - येथे कर्नाटक शासन १ नोव्हेंबरला राज्योत्सवाची सिद्धता करत आहे; मात्र या दिवशी मराठी भाषिक काळा दिन पाळणार आहेत. मराठी भाषिक युवा आघाडी, मराठी युवा मंच यांसारख्या एकीकरण समितीच्या संलग्न संघटनांनी बैठका घेऊन काळ्या दिनाची जोरदार सिद्धताही केली आहे. बेळगावात कर्नाटक शासन मराठी भाषिकांवर अत्याचार करत असल्याने ते आपापल्या पद्धतीने विरोध करत आहेत.

शिक्षणक्षेत्रातील प्रतिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्‍वस्त मंडळ बरखास्त

विद्येच्या माहेरघरामध्ये अशी घटना होणे लज्जास्पद ! 
     पुणे, २७ ऑक्टोबर - आर्थिक अपहाराच्या तक्रारी आणि सर्वसाधारण सभा न घेणे, अशा अनागोंदी कारणामुळे शिक्षणक्षेत्रातील प्रतिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्‍वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश सह धर्मादाय आयुक्त शि.ग. डिगे यांनी दिला आहे. त्यांनी संस्थेवर साहाय्यक धर्मादाय आयुक्त न.वा. जगताप यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचाही आदेश दिला आहे. 

लोंढा दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी ! - खानापूर परिसरातील नागरिकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अशा मागण्यांसाठी नागरिकांना निवेदन द्यावे लागू नये, हे अपेक्षित आहे !
अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुरेश इटनाळ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना नागरिक
     बेळगाव, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - लोंढा येथे झालेल्या हिंदु धर्मजागरण सभेच्या वेळी समाजकंटकांनी दगडफेक करून काही दुकाने आणि वाहने यांची मोडतोड केली. या दंगलीला कारणीभूत धरून हिंदु समाजातील निष्पाप धर्माभिमान्यांना अटक करण्यात आली, तर दंगलखोर धर्मांधांना मात्र मोकाट सोडण्यात आले आहे. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला आहे.

गोरक्षा समितीच्या सतर्कतेमुळे ११ बैलांचे प्राण वाचले !

 गाडीत कोंबलेले बैल
     नंदुरबार - गोरक्षा समितीने २४ ऑक्टोबर या दिवशी दोन गाड्यांमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबून नेण्यात येेणारे ११ बैल पोलिसांच्या कह्यात दिले आहेत. प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक देण्याविषयी वाहनधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे बैल कशासाठी नेले जात होते, याची चौकशीही पोलिसांनी चालू केली आहे. (वाहनात बैल अशा प्रकारे कोंबून कशासाठी नेले जातात, हे कोणीही सहज ओळखू शकते. त्यामुळे यांच्यावर केवळ प्राण्यांना निर्दयपणे नेण्यावरून गुन्हा नोंदला जाणे उपयोगाचे नाही ! - संपादक) 

शिवसेनेवर आंतरराष्ट्रीय बंदी आणण्यासाठी पाकिस्तान जागतिक स्तरावर प्रयत्नशील ! - 'द नेशन'

शिवसेनेला आतंकवादी ठरवण्यापूर्वी पाकिस्तानने
त्याच्या बुडाखाली काय जळत आहे, याचा शोध घ्यावा ! 
     इस्लामाबाद - एकीकडे शिवसेनेने पाकिस्तानचे खेळाडू, कलाकार आणि नेते यांना विरोध करण्याची भूमिका कडक केली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान शिवसेनेला आतंकवादी संघटना ठरवून तिच्यावर आंतरराष्ट्रीय बंदी आणण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नशील आहे, असे वृत्त पाकिस्तानातील 'द नेशन' या वृत्तपत्राने पाकिस्तान परराष्ट्र खात्याचा हवाला देऊन प्रसिद्ध केले आहे. (विरोधात जाणारी प्रत्येक गोष्ट जागतिक व्यासपिठावर नेण्याचा रोगच पाकला जडलेला आहे. 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते', या म्हणीचा पाकला अनुभव येत असतोच, हेही नसे थोडके ! - संपादक)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयुर्वेदीय औषधांची विक्री चालू !

     मुंबई - महाराष्ट्र शासनानेे आयुर्वेदीय आणि वनौषधी यांची विक्री चालू केली आहे. ही उत्पादने राज्यातील जंगलांतून मिळवलेल्या सामग्रीतून सिद्ध करण्यात आली आहेत. 'वनधन जनधन' योजनेच्या अंतर्गत नागपुरात पहिले विक्री केंद्र चालू करण्यात आले आहे. अवघ्या २५ दिवसांत येथे २ लाख रुपयांची उत्पादने विकली गेली आहेत. यामुळे शासन आता प्रत्येक विमानतळ आणि रेल्वेस्थानक येथे ३०० चौरस फूट जागेत दोन-दोन विक्री केंद्रे चालू करण्याचा विचार करत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, अनेक आजारांवर रामबाण ठरणार्‍या वनौषधींची माहिती आदिवासींना आहे. त्याचाच वापर करून आम्ही आदिवासींनी बनवलेली औषधे विकणार आहोत. यामुळे आदिवासींनाही रोजगार मिळेल.

श्री साईबाबा यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचे दस्तऐवज सापडत नाहीत !

ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
     शिर्डी, २७ ऑक्टोबर - श्री साईबाबा यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचा कोणताही कागद शासनाच्या दप्तरी आढळत नाही. शासकीय दप्तरात जीर्ण झालेले, त्यातील गहाळ झालेली पाने आणि कमालीच्या अनास्थेमुळे हा दुर्मिळ आणि ऐतिहासिक ठेवा सध्या तरी सापडत नाही.    १५ ऑक्टोबर १९१८ या दिवशी दुपारी २.३० वाजता श्री साईबाबा पंचतत्त्वात विलीन झाले. त्यानंतर हिंदु-मुसलमान यांच्या वादात ३६ घंट्यांनी सध्याच्या बुटीवाड्यात त्यांचा देह समाधीस्त करण्यात आला. त्या वेळी कोपरगावचे तहसीलदार आणि रहात्याचे फौजदार उपस्थित होते.

हिंडलगा कारागृहात ४५० हून अधिक बंदीवानांचे उपोषण

  • श्रीराम सेनेचे प्रवक्ते मारुति सुतार यांचा पुढाकार
  • खाण्यायोग्य जेवण नसल्याचे कारण अन् धर्माभिमानी बंदीवान यांवर उपचार करण्याच्या मागणीसाठी उपोषण
    बेळगाव, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात दिले जाणारे जेवण खाण्यायोग्य नसते. त्यामुळे अनेक बंदीवानांना अन्नातून विषबाधा होत आहे, असा आरोप करून आणि पोलिसांनी मारहाण केलेला धर्माभिमानी बंदीवान श्री. रवी कर्लिंगण्णवर (वय २७ वर्षे) यांच्यावर उपचार करण्याच्या मागणीसाठी कारागृहातील ४५० हून अधिक बंदीवानांनी २६ ऑक्टोबरपासून सकाळी उपोषणास प्रारंभ केला. लोंढा दंगल प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले श्रीराम सेनेचे प्रवक्ते श्री. मारुती सुतार यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्राच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल ! - मुख्यमंत्री

    आरेवाडी (जिल्हा सांगली), २७ ऑक्टोबर (वार्ता.) - जलयुक्त शिवार ही शासनाने हाती घेतलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे आतापर्यंत २४ टीएम्सी पाणीसाठा वाढला असून मोठ्या प्रमाणात भूमी ओलीताखाली आली आहे. पाण्याचे विकेंद्रीकरण झाल्याने त्याचा लाभ शेतीला होत आहे. प्रत्येक ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात शासनाचा भर आहे. त्यामुळे हे अभियान महाराष्ट्राच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाला प्राधान्य ! - सुरिंदर अंबरदार, भाजप, आमदार

     पुणे, २७ ऑक्टोबर (वार्ता.) - भाजप आणि पीडीपी यांचे शासन जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत आले आहे. वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाला शासनाचे प्राधान्य राहील. त्या दृष्टीने प्रक्रिया चालू झाली आहे; मात्र त्यामध्ये अडचणी आहेत, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे आमदार श्री. सुरिंदर अंबरदार यांनी केले. २७ ऑक्टोबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काश्मिरी हिंदुसभेचे अध्यक्ष श्री. शिवपुरी, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष श्री. विश्‍वास ननावरे, भाजपचे श्री. मंदार घाटे उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनीही देशाच्या एका 
भागात राष्ट्रगीत म्हटले न जाणे, हा राष्ट्रद्रोहच ! 
     सीमावर्ती आणि आतकंवादग्रस्त भाग असलेल्या राजौरी (काश्मीर) मधील शासकीय, तसेच खासगी शाळांत आजही राष्ट्रगीत म्हटले जात नाही. यासाठी एकेकाळी आतंकवाद्यांची धास्ती होती; मात्र आता तशीही स्थिती नाही.

आतंकवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर सीमेवरील रहिवाशांना सतर्क रहाण्याची चेतावणी

आतंकवादग्रस्त भारत !
    जम्मू - जम्मू मधील कथुआ आणि सांबा भागात पाकिस्तान आतंकवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याने त्या भागांत राहणार्‍या नागरिकांनी आणि माजी सैनिकांनी सतर्क राहावे, अशी चेतावणी सैन्याच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख ले. जनरल के.जे. सिंह यांनी दिली. पाकने यापूर्वीही आतंकवादी कारवाया केल्या आहेत आणि या पुढेही त्या करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती त्वरित सैन्याला द्यावी, असे आवाहन ले.ज. सिंह यांनी केले.  सैन्याने नागरिकांत सतर्कता वाढवण्यासाठी सैन्याकडून जागरूक हिंदुस्तान सीमा भाग क्रिकेट स्पर्धा, तसेच शहीदांच्या स्मरणार्थ एका ध्वनीचित्रचकती दाखवणे, अशा २ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 kashmirke Rajouri me ajbhi pathshalaome rashtrageet nahi hota. 
 kya yaha rashtradroha nahi ?

जागो ! 
 कश्मीर के राजौरी में आजभी पाठशालाआें मे राष्ट्रगीत नही होता. 
 क्या यह राष्ट्रद्रोह नही ?

दिवाळीतील जीवघेण्या प्रदूषणकारी फटाक्यांची आतषबाजी रोखा !

नंदुरबार येथे निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीची मागणी
नंदुरबार येथे निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीची मागणी
    नंदुरबार - दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या आतषबाजीला सर्वाधिक महत्त्व दिल्याने त्यातून होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण यांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. फटाक्यांमुळे आगी लागून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी होणे, भाजून मृत्यू होणे, असे प्रकार घडतात. आताच्या महागाईच्या काळात पैशांची निव्वळ राखरांगोळी करणार्‍या फटाक्यांची आतषबाजी करायची का,

साहित्य अकादमी पुरस्कार परत देण्याचे नाटक !

श्री. भाऊ तोरसेकर
सध्या साहित्य अकादमी वा अन्य पुरस्कार परत करण्याचे पेव फुटले आहे. त्यामागे एक पद्धतशीर राजकीय रणनीती आहे, यात शंका नाही. त्याचा प्रारंभ लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच झालेला होता. अनंतमूर्ती नावाच्या कन्नड साहित्यिकाने मोदी पंतप्रधान झाल्यास भारत सोडून पळावे लागेल, अशी भाषा केली, त्याला आता दोन वर्षे होऊन गेली आहेत. आता पुरस्कार परतीचे चाललेले नाट्य त्याचेच पुढचे अंक आहेत; पण त्या पुरस्काराची महती कितीशी आहे ? एक प्रकारे त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षात अपराधगंड निर्माण करण्याचा डाव त्यामागे आहे. आपण विसरलो नसू, तर हेच नाटक तेरा वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्याही संदर्भात झाले होते.

चेन्नई येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

सौ. उमा रविचंद्रन
    सध्या धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये अकस्मात् वाढ झाल्याचे आम्ही अनुभवत आहोत आणि हे सर्व आमच्या क्षमतेबाहेरचे आहे, हेही आम्हाला ज्ञात आहे. याची काही उदाहरणे खाली देत आहे. 
१. अल्पावधीतच सनातन-निर्मित ग्रंथांचा संच १५ ग्रंथालयांमध्ये ठेवण्यासाठी प्रायोजक मिळाले. 
२. व्यक्तीमत्त्व विकास आणि तणावमुक्त जीवन या विषयावर एक आकर्षक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सिद्ध ! : व्यक्तीमत्त्व विकास आणि तणावमुक्त जीवन या विषयावर एक आकर्षक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सिद्ध करण्यात आले. त्याचे सादरीकरण करता यावे, यासाठी साहाय्यक पोलीस आयुक्तांसहित ३ संस्थांना निवेदनपत्रे देण्यात आली.

प्राध्यापक गणेश देवी यांनी साहित्य अकादमी पुरस्कार का परत केला ?

...हेच ते, गणेश देवी
     आजकाल देशातील साहित्यिक आणि लेखक यांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची टूम निघाली आहे. अत्यंत नाटकी स्वरूपात भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका पोहोचत आहे, लेखकांवर दबाव आणला जात आहे, लिखाणाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, असे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे वगैरे. या पुरस्कार परतीच्या नाटकामुळे देशाला एवढे तरी समजले की, अच्छा ! यांनापण पुरस्कार मिळाला होता, अच्छा ! यांना कधी पुरस्कार मिळाला ? यांचे साहित्यतर कवडीमोलाचेही नाही. याचबरोबर पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांचे खरे विकृत स्वरूपही उघड झाले. याच साहित्यिकांपैकी एक आहेत वडोदरा, गुजरात येथील सयाजीराव गायकवाड विश्‍वविद्यालयाचे माजी प्राध्यापक गणेश देवी ! 

पाकच्या कलाकारांना भारतीय नागरिकत्व हवे कशाला ?

पाकिस्तानी गायक गुलाम अलींचे गाणे ऐकायला मिळणार नाही; म्हणून काहींचा कंठ दाटून आला होता. त्याच देशाच्या माजी परराष्ट्रमंत्र्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची घाई वैचारिक अध:पतन झालेल्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णींना लागल्याने त्यांनीही पुस्तक प्रकाशन आटपून घेतले. प्रखर राष्ट्रप्रेमी शिवसैनिकांनी कुलकर्णींचे केलेले काळे तोंड पाहून करावे तसे भरावे या वाक्याची आठवण झाली. स्वतःचे काळे झालेले तोंड जगाला दाखवण्याची कुलकर्णींना घाई झाली होती. काळे तोंड घेऊन माध्यमांसमोर फिरण्यात त्यांना कोणते तरी शौर्य गाजवल्याचा आनंद झाला होता, असे वाटत होते. आता तर पाकिस्तानी गायक अदनान सामीस यांना या राष्ट्राचे नागरिकत्व देण्याच्या हालचाली चालू झाल्याची वृत्ते येत आहेत.

मानवहितासाठी वनांचे संरक्षण आवश्यक !

१. वृक्षतोडीची भयावहता !
    वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्रत्येक मासाला (महिन्याला) ९९ प्रतिशत प्रस्ताव केवळ वृक्षतोडीची अनुमती मागण्यासाठी येत असतात. 
२. पृथ्वीच्या बाह्य आणि आंतरिक भागांत आढळून येणारा तापमानातील प्रचंड भेद 
अनेक मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरणे 
     पृथ्वीच्या पोटातील उष्णता ही सूर्याच्या पृष्ठभागावरच्या उष्णतेशी स्पर्श करू शकेल इतकी आहे. पृथ्वीचा गाभा ६ सहस्र अंश सेल्सिअस इतका तप्त आहे; मात्र तिच्या पृष्ठभागाचे तापमान त्या तुलनेत अतिशय अल्प आहे. पृथ्वीच्या या बाह्य आणि आंतरिक भागांत आढळून येणारा हा तापमानातील प्रचंड भेद अनेक मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरतो. 

धर्मविरोधी प्रसारमाध्यमांनो, शिकण्याच्या स्थितीत राहून सनातन संस्थेचे कार्य जाणून घ्या आणि मगच तिच्याविषयी बोला !

कु. दीपाली पवार
१. सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने 
प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी रहाता येणे 
     कृष्णा, गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे, शाम मानव आणि धर्मविरोधक सनातन संस्थेविषयी किती अपप्रचार करत आहेत ! हा अपप्रचार ऐकून मला पूर्वी पुष्कळ राग यायचा. सनातनचे कार्य काय आहे ? सनातन आश्रमात काय चालते ? हे न पहाताच ते सनातनवर असे कसे आरोप करू शकतात ?, असे वाटून माझे रक्त सळसळून उठायचे आणि प्रत्यक्ष जाऊन त्यांना चांगले चोख उत्तर द्यावे, असे विचार यायचे; मात्र या वेळी असे काही झाले नाही. या वेळी विविध दैनिकांत चाललेला अपप्रचार, होत असलेली टीका ऐकून आणि वाचूनही माझे मन स्थिर अन् शांत आहे.

बुद्धीप्रामाण्यवादी, साम्यवादी, राजकारणी किंवा इतर कोणी सनातनसारखे संत सिद्ध करू शकतात का ?

     जे लोक सनातनची शिकवण चुकीची असल्याचे सांगतात, त्यांना आमचा प्रश्‍न आहे. सनातनची शिकवण चुकीची असती, तर सहस्रो जणांनी तन, मन आणि धन यांचा त्याग करून हिंदु धर्माची सेवा केली असती का ? सनातनचे ५४ साधक संत झाले असते का ? बुद्धीप्रामाण्यवादी, साम्यवादी, राजकारणी किंवा इतर कोणी असे संत तयार करू शकतात का ? - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

स्वामी विवेकानंदांसारखा देशाभिमान स्वत:मध्ये निर्माण करणे आवश्यक !

      एकदा स्वामी विवेकानंद यांच्यासमोर एका इंग्रज वक्त्याने भारतियांना हीन संबोधले. तेव्हा स्वामीजींनी रागाने सर्वांसमक्ष त्या वक्त्याच्या थोबाडीत दिली. भारतीय कुत्रे नाहीत, तर सिंह आहेत, असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले. असा भारतीयत्वाचा अभिमान आपल्यालाही स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था 

ईश्‍वराला विसरल्याने साम्राज्ये उद्ध्वस्त होणे !

     व्यक्ती, समूह, समाज, गाव, नगर, राज्य, देश अशा सर्वांच्या कर्मांची गणना ईश्‍वराकडे असते आणि या गणनेप्रमाणे सर्वांना त्याची फळे भोगावी लागतात. याकरिता प्रत्येक देशाने ईश्‍वराला स्मरून कार्य करावयास हवे. ईश्‍वराला विसरल्याने अनेक साम्राज्ये आतापर्यंत उद्ध्वस्त झालेली आहेत.
     दुसर्‍या महायुद्धाच्या काळात एक दिवस एक फकीर मुंबई बंदरानजीक अरे ! जान बचाना है तो भाग जाव ! असे जोरजोराने ओरडत फिरत होता. त्याला वेडा समजून कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दोन दिवसांनंतर मुंबई बंदरात प्रचंड स्फोट झाला. अनेक घरे कोसळली आणि शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. 
(मानवी जीवनातील गूढ रहस्ये, भाग ३, पृष्ठ क्र. ३७. लेखक : स्वामी दत्तावधूत)
     न्यायाची प्रीती, सत्याची भक्ती आणि ईश्‍वराची आज्ञा पाळण्याची वृत्ती हे गुण समवेत घेऊन जन्माला आलेले सावरकर हे दुसरे शिवाजीच होते ! - धनंजय कीर (संदर्भ : अज्ञात)
     स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

पतीनिधनाच्या वेळी ईश्‍वरावरील श्रद्धेच्या बळावर शांत आणि स्थिर रहाणार्‍या संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती छाया काकडे !

श्रीमती छाया काकडे
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. लहानपणापासून देवाची आवड असणे : आई ८ - ९ वर्षांची असल्यापासून पहाटे ४ वाजता उठून तिच्या आजीसमवेत देवपूजा, तसेच सर्व व्रते मनापासून करायची. आईमुळे आम्हा भावंडांवर साधनेचे आणि इतर चांगले संस्कार झाले.
१ आ. कष्टाळूपणा : लहान असल्यापासूनच आईला घरच्या अडचणींमुळे बाहेर काम करावे लागले. तिचे संपूर्ण जीवन पुष्कळ कष्ट करण्यात गेले. आई आजही घरातील सर्व कामे करूनच सेवेला बाहेर पडते. ती सतत इतरांसाठी काहीतरी करतच असते.

उत्तम व्यवस्थापन असलेले आनंदधाम : रामनाथी आश्रम !

१. साधकांच्या तोंडवळ्यावरील हास्य पाहून मनाला आनंद होणे : एकमेकांची ओळख नसतांनाही सगळ्या साधकांच्या तोंडवळ्यावर असलेले हास्य पाहून मनाला आनंद होतो आणि ते खरेखुरे हास्य असते.
२. आश्रमातील प्रत्येक कार्याचे नियोजन पाहून प्रभावित होणे : आश्रमात जी सुव्यवस्था आहे, तशी कुठेही पहायला मिळत नाही. येथे प्रत्येक कार्य वाटून घेतले जाऊन ते चांगल्या प्रकारे करण्यात येते. प्रत्येक स्थानाची स्वच्छता कोण आणि केव्हा करणार, याचे सगळे पूर्वनियोजन केलेले असते. यामुळे मी अतिशय प्रभावित झाले.

कर्मकांड आणि गुरुकृपायोगानुसार साधना

     आजारी असतांना आणि वय झाल्यावर कर्मकांड करता येत नाही; म्हणून कर्मकांड करणारे साधना होत नाही म्हणून दुःखी होतात. याउलट नामजप, स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, भावजागृती इत्यादी गुरुकृपायोगानुसारची साधना करणारे बेशुद्ध पडेपर्यंत साधना करू शकतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१०.२०१५)

शारीरिक त्रास आनंदाने स्वीकारून तळमळीने साधना करणारे जयपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजकुमार (वय ७२ वर्षे) आणि सौ. कुसुम भार्गव (वय ७१ वर्षे) !

सौ. कुसुम भार्गव
   
श्री. राजकुमार भार्गव
   जयपूर येथील साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजकुमार भार्गव आणि सौ. कुसुम भार्गव यांना तीव्र शारीरीक त्रास असूनही ते व्यष्टी अन् समष्टी साधनेचा प्रयत्न सतत करत असतात. त्यांना एखादी दुखापत झाली असता ते म्हणतात, आपले एक प्रारब्ध नष्ट झाले. काकूंना प्रतिदिन नवनवीन प्रार्थना सुचतात. त्यांची जयपूर येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.  

लहानपणापासून प्रारब्धवशात् विविध संकटे येऊनही देवाच्या कृपेने त्यांतून सुखरूप वाचलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नांद्रा (बुद्रुक) येथील कु. लक्ष्मी हिरामण वाघ (वय ८ वर्षे) !

कु. लक्ष्मी वाघ
१. कु. लक्ष्मी ९ मासांची (महिन्यांची) असतांना तिने हातात पेटता दिवा धरल्यामुळे तिचे बोट भाजले.
२. ११ मास
उकळत्या भाजीच्या पातेल्यात पडून ९० टक्के भाजूनही तेराव्या दिवशी बरी होणे : लक्ष्मी ११ मासांची असतांना ती माझ्या हातातून उकळत्या भाजीच्या पातेल्यात पडली. त्यामुळे ती पुष्कळ भाजली होती. त्या वेळी आधुनिक वैद्यांकडे नेले असतांना ते म्हणाले, हिला रुग्णालयात भरती करून काहीही लाभ होणार नाही. ती ९० टक्के भाजली होती. ती भाजल्यामुळे तिचे सर्व केस जळून गेले होते. गालाची चामडीही गळून गेली होती. डोक्यावरील चामडी निघत होती.

लहान वयातच दायित्व घेऊन सेवा करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नांद्रा (बुद्रुक), जि. जळगाव येथील कु. कविता हिरामण वाघ (वय १२ वर्षे) !

कु. कविता वाघ
१. जन्मापूर्वी
     मी गर्भवती असतांना मला पुष्कळ अनुभूती यायच्या. श्री सप्तशृृंगीदेवी माझ्या स्वप्नात येऊन मला स्वयंपाक करायला सांगायची. मी शेतात जात असतांना मला सोडायला यायची. मी सतत तिच्याशी सूक्ष्मातून
बोलत असे.
२. जन्मानंतर
२ अ. दायित्व घेऊन सेवा परिपूर्ण करणे आणि स्वतः धर्माचरण करून इतरांना धर्माचरणाविषयी सांगणे : कविता वयाच्या आठव्या वर्षापासून सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण दायित्व घेऊन परिपूर्ण करते.

साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी धडपडणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. अजय जोशी !

 
डॉ. अजय जोशी
     आश्‍विन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२८.१०.२०१५) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमातील इंग्रजी विभागात सेवा करणारे डॉ. अजय जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. सुप्रिया जठार यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
डॉ. अजय जोशी यांना वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. प्रेमभाव
     काकांमधील प्रेमभावामुळे साधक त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतात.

नांद्रा (बुद्रुक), जिल्हा जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. सुदर्शन हिरामण वाघ (वय १० वर्षे) याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. सुदर्शन वाघ
१. मंदिरात गेल्यावर एका माकडाने कु. सुदर्शनला खेळवणे 
आणि पुजार्‍याने या माकडाने तुमच्या बाळाला घेतले,
 त्यामुळे तुमचे बाळ भाग्यवान आहे, असे सांगणे
     सुदर्शन ४ - ५ मासांचा (महिन्यांचा) असतांना आम्ही नदीकिनारी असलेल्या एका श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मंदिरात गेलो होतो. त्या वेळी एका माकडाने सुदर्शनला माझ्या हातातून घेतले आणि ते सुदर्शनसमवेत १ - २ घंटा खेळले; परंतु त्याने सुदर्शनला काहीही केले नाही. माकडाने त्याला नदीजवळ नेले. तेव्हा मला पुष्कळ भीती वाटली आणि हे माकड सुदर्शनला नदीत बुडवील कि काय ?, असे मला वाटायला लागले.

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला 'लाईफ सर्टिफिकेट' द्यावे !

     'ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला 'निवृत्ती वेतन' (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात 'लाईफ सर्टिफिकेट' द्यावे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवल्यास त्या अधिकोषात 'लाईफ सर्टिफिकेट' देता येईल. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहली येथे वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.) 
 - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
काल पौर्णिमा झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'घरच्याला किंमत नसते', ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !
'जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१०.२०१५)

बोधचित्र


साधकांनो, आपत्काळाची तीव्रता वाढलेली असल्यामुळे 'ॐ' हा नामजप दिवसभर करा !

सर्वांसाठीच्या उपायांच्या संदर्भात सूचना !
     'सनातनचे साधक सध्या 'ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।' हा नामजप करत आहेत; मात्र आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणारे त्रासही वाढत आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी एका संतांनी 'ॐ' हा नामजप २८.१०.२०१५ ते २.११.२०१५ या कालावधीत करण्यास सांगितला आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे 
एकदा घर सुटले, की तो दारोदार होतो, 
दारोदार झाला की, घरोघर होतो आणि घरोघर
 झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही. 
भावार्थ : 'एकदा घर सुटले' येथे 'घर' हा शब्द 'माया' या अर्थाने वापरला आहे. 'दारोदार होतो ... सर्वत्र असतो' येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. 'म्हणून त्याला घरघर नाही' म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो. 
 (संदर्भ: सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनातील वादळे नकोत !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     समुद्रातील वादळ थोड्या काळात नाहीसे होते; पण मनातील वादळ एकदा निर्माण झाले की, ते आवरणे कठीण ! म्हणून मनातील ही वादळे निर्माण होऊ न देणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)चित्रपटांमधून गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याचे षड्यंत्र !

संपादकीय
    रामायण बघून कुणी राम होत नाही आणि मुन्नाभाई एम्.बी.बी.एस्. बघून कुणी गांधी होत नाही, तर मग माझा चित्रपट बघून लोकांवर काय परिणाम होणार आहे ? हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी आहे. लोकांनी त्याची मजा घ्यावी, असे उन्मत्त उद्गार चित्रपट अभिनेते रणदीप हुडा याने काढले आहेत. कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराज याच्या जीवनावर आधारित मै और चार्ल्स हा चित्रपट ३० ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शित होत असून यात रणदीप याने शोभराजची भूमिका केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn