Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

महर्षि वाल्मीकि यांची आज जयंती

प.पू. राऊळ महाराज यांची आज जयंती

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक !

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ४५ संचालकांकडून १४७ कोटी रुपये वसूल करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश !
अशा काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जनतेने बंदीची मागणी केल्यास आश्चर्य ते काय ? कथित आरोपांवरून सनातनची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी याविषयी गप्प का ?
  कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू असतांनाच भाजप शासनाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांना जोराचा झटका दिला आहे. मनमानी कर्जवाटप करून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला १४७ कोटी रुपयांना फसवणार्याक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांसह ४५ संचालकांकडून तातडीने रक्कम वसूल करण्याचा आदेश भाजप शासनाचे सहकारमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे.

पोलिसांकडून श्रीराम सेनेच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची धरपकड चालूच !

लोंढा (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या सभेत दगडफेक केल्याचे प्रकरण !
हिंदूंनो, काँग्रेसच्या राज्यात दंगलखोर धर्मांधांवर नव्हे, तर धर्मप्रेमी हिंदुत्ववाद्यांचा छळ होतो, हे जाणा !
खानापूर (जिल्हा बेळगाव), २६ ऑक्टोबर (वार्ता.) - लोंढा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचे पडसाद खानापूर शहरातही उमटले होते. या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २० जणांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत. या दंगलीनंतर श्रीराम सेना पोलिसांचे लक्ष्य झाले असून पोलिसांनी आता श्रीराम सेनेच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची धरपकड चालू केली आहे. यासाठी पोलिसांची वाहने खानापूर शहर परिसरातील खेड्यापाड्यांतही रात्री-अपरात्री फिरत असून कार्यकर्त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. पोलीस निष्पाप हिंदु तरुणांवर कारवाई करत आहेत. यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रवींद्र गडादी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शेखर अगडी आणि इतर पोलीस अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून येथे तळ ठोकून आहेत, असे समजते. (पोलिसांनी ही शक्ती जिहादी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता ! - संपादक)

भूकंपाच्या तीव्र धक्क्याने उत्तर भारत हादरला !

नवी देहली - उत्तर भारतीय उपखंडाला आज दुपारी २.४५ च्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी नोंदवण्यात आली असून अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये त्याचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले. भूकंपाच्या या धक्क्याची झळ पाकलाही बसली असून भूकंपामुळे पाकमध्ये ४५ हून अधिक जण ठार, तर २०० हून अधिक घायाळ झाले आहेत.  देहलीत तब्बल २ मिनिटे हे हादरे जाणवत होते. भूकंप झाल्याची जाणीव होताच लोकांनी घर आणि कार्यालये सोडून बाहेरील मोकळ्या जागेत धाव घेतली. देहलीतील मेट्रो रेल्वेही काही काळ थांबवण्यात आली होती.

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीला तमिळनाडू शिवसेनेचा विरोध

  • शिवसेनेच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत ठराव संमत
  • प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या तमिळनाडू शिवसेनेचे सनातनकडून आभार !
डावीकडे बैठकीला संबोधित करतांना तमिळनाडू शिवसेनेचे राज्यप्रमुख
श्री. राधाकृष्णन् आणि व्यासपिठावर उपस्थित सेनेचे पदाधिकारी 
     चेन्नई, २६ ऑक्टोबर - तमिळनाडू शिवसेनेच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीची बैठक नुकतीच येथे पार पडली. या बैठकीत सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात ठराव संमत करण्यात आला आणि सनातनच्या पाठीशी उभे रहाण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला तमिळनाडू राज्यातील १५ जिल्ह्यांतून २२५ शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे पी. प्रभाकरन् यांनी प्रार्थना आणि विघ्नेश्‍वराचा श्‍लोक म्हटला. या वेळी व्यासपिठावर तमिळनाडू शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन्, राज्य महासचिव एम्. रविचंद्रन्, श्री. सेन्थील, श्री. स्टॅलिन उपस्थित होते. 

कुख्यात गुंड छोटा राजनला इंडोनेशियात अटक

इंटरपोल, भारतीय अधिकारी आणि इंडोनेशियाचे पोलीस यांची संयुक्त कारवाई
बाली (इंडोनेशिया) - मुंबई येथील कुख्यात गुंड राजेंद्र सदाशिव निकाळजे उपाख्य छोटा राजन याला २५ ऑक्टोबर या दिवशी बाली येथे अटक करण्यात आली आहे. सिडनीमधून बालीला आल्यानंतर त्याला इंडोनेशियाच्या पोलिसांनी कह्यात घेतल्याचे 'इंटरपोल'च्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. भारताने छोटा राजनसाठी इंटरपोलची 'रेड कॉर्नर' नोटीस बजावली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सांगण्यावरून ही अटक करण्यात आल्याचे भारताच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याला भारतात पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. या अटकेमागे ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही सांगण्यात येते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहेत. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही 'धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत', असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. 'त्यात तथ्य आहे', असे क्षणभर गहीत धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. 'कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत', असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये धर्मश्रद्ध हिंदूंसाठी किती दुखरी असतात, याची उदाहरणे खाली दिली आहेत. या वक्तव्यांचे समर्थन विचारस्वातंत्र्य म्हणून करता येईल का, हे हिंदूंनी ठरवावे.
चमत्कार करणारे सारेच बाबा सक्रीय (अ‍ॅक्टिव्ह) बदमाश असतात ! जो जो स्वतःला बाबा म्हणवतो आणि लोकांना पाया पडू देतो, तो तो बदमाशच असतो ! - शाम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र टाइम्स, १४ फेब्रुवारी १९८८)   (क्रमश:)

धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करणार्‍यांची गय नाही ! - सरन्यायाधीश एच्.एल्. दत्तू

     नवी देहली - धर्माच्या नावाखाली कुणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याची गय करणार नाही. पुराव्यांच्या आधारे अशा समाजकंटकांना कठोर शिक्षा देण्यात येईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एच.एल्. दत्तू यांनी एका वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केेले.

(म्हणे) हिंदूंनी गाय विकणे बंद केल्यासच गोहत्या थांबतील ! - आझम खान

हिंदूंनो, गायींची कसायांना विक्री करून गोहत्येसाठी हिंदूंना उत्तरदायी 
ठरवण्याची संधी धर्मांध नेत्यांना देऊ नका !
     नवी देहली - हिंदूंनी गाय विकणे बंद केल्यासच देशात होणार्‍या गोहत्या रोखल्या जातील, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी एका पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे गाय विकण्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, गायीचा सन्मान झाला पाहिजे. ज्या गायीला तुम्ही मातेचा दर्जा देता, ती जेव्हा म्हातारी होऊन दूध देणे बंद करते, तेव्हा तुम्ही तिला लगेच विकून टाकता ? हिंदूंनी गायीला विकण्यापेक्षा तिचे रक्षण करून सेवा करावी.

हरवलेली गीता १५ वर्षांनंतर पाकिस्तानातून भारतात परतली !

     नवी देहली - पंधरा वर्षांपूर्वी समझौता एक्स्प्रेसमधून चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या गीता या मुकबधीर मुलीला परत भारतात आणण्यात आले आहे. तिच्या परतीसाठी सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आल्यानंतर २६ ऑक्टोबर या दिवशी नवी देहली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गीताचे आगमन झाले.

इराणच्या मासेमारी बोटीच्या चौकशीसाठी अन्वेषण यंत्रणा सागरतळ धुंडाळणार !

मासेमारी करणारी इराणची नौका भारतीय हद्दीत घुसतेच कशी ? ती घुसेपर्यंत सुरक्षा यंत्रणा काय करत 
होत्या ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     कोची (केरळ) - इराणची एक मासेमारी करणारी नौका भारतीय सागरी सीमेत आढळून आली होती. या नौकेला सागरी तटरक्षक दलाने कह्यात घेऊन त्यातील १२ जणांना अटक केली. त्यांच्या जवळ एक सॅटेलाईट भ्रमणभाष आणि अनेक सिम कार्ड सापडली. या नौकेत काही शस्त्रास्त्रे अथवा अवैध साहित्य होते का, याचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्थेचे साहाय्य घेऊन सागरतळ धुंडाळण्याची सिद्धता केली आहे. या बोटीला कह्यात घेण्याआधी त्यातील काही शस्त्रास्त्रे अथवा अवैध साहित्य सागरात फेकून दिले असण्याची शक्यता आहे.

दादरी हत्याकांडामागे 'लव्ह जिहाद !' - अभाविपचा दावा

अभाविपचा दावा खरा ठरल्यास दादरी प्रकरणावरून हिंदूंना कोंडीत पकडणारी प्रसारमाध्यमे, 
विरोधी पक्ष आणि धर्मनिरपेक्षतावादी प्रायश्‍चित्त घेतील का ? 
  लक्ष्मणपुरी (लखनौ) - दादरी हत्याकांडामागे गोहत्या नाही, तर महंमद अखलाखच्या मुलाने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यामुळे हे प्रकरण घडले, असा दावा भाजपची युवा संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. परिषदेचे पदाधिकारी श्री. सत्यभान यांनी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या  बातम्यांचा संदर्भ देत दादरीमागे 'लव्ह जिहाद' असल्याचे स्पष्ट केले. हिंदु मुलीच्या घरच्यांनी अखलाखसह त्याचा धाकटा मुलगा दानिश याच्यावर आक्रमण केले होते. या आक्रमणात अखलाखचा मृत्यू झाला होता, तर दानिश अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. काही राजकीय पुढार्यांनी षड्यंत्र रचून या प्रकरणाला वेगळे वळण दिले. या घटनेचा राजकीय लाभ उठवण्यासाठी या लोकांकडून गोहत्येची अफवा पसरवण्यात आली, असेही सत्यभान याने सांगितले. अखलाखचा मोठा मुलगा सरताज हा चेन्नई येथे भारतीय वायूदलात नोकरीवर आहे.

अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणार्‍यांचे लिंगच कापून टाकायला हवे ! - मद्रास उच्च न्यायालय

     चेन्नई - लहान मुलांवरील बलात्कारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अशा बलात्कार करणार्‍यांचे लिंगच कापून टाकायला हवे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. एन्. किरुबाकरन् यांनी व्यक्त केले. इंग्लंडच्या एका नागरिकाने भारतातील मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात खालच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्या. एन्. किरुबाकरन् यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.

वेदांची निर्मिती कधी झाली ?, या विषयावर रशियात परिषद

रशिया वेदांचा अभ्यास करण्यात रस दाखवतो ! भारतातील किती हिंदू वेदांचा अभ्यास करतात ?
     मॉस्को - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि रशियातील मानवी संस्कृती विश्‍वविद्यालय यांच्या वतीने शहरात २८ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भारतीय संस्कृतीच्या अभ्यासावर पुढील संशोधन आणि रशियातील शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध असलेले प्राचीन भारतीय वाङमयाची उपयुक्तता यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या प्रसंगी इराणीयन अवेस्तन भाषेची वैदिक संस्कृत भाषेशी साम्यता यावर भारतीय आणि रशियन तज्ञ त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. 

फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा ! राष्ट्रहानी रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी आणावी !

बिकानेर (राजस्थान) येथे हिंदु जनजागृती समितीचे शासनाला निवेदन
अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिप्रसाद पिपरालिया यांना
निवेदन देतांना डावीकडून सर्वश्री भवानीशंकर परिहार,
सावन सोनी, गजानन केसकर आणि मनोज सिंह
    बिकानेर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कोणताही आधार नसून ही विदेशी प्रथा आहे. या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते, तसेच समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण यांचीही हानी होते. केवळ दिवाळीच्या पर्वावर भारतात जवळपास ४ सहस्र कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात. त्यामुळे शासनाने देवता आणि राष्ट्रपुरूष यांचे चित्र असणार्‍या फटाक्यांसह प्रदुषण करणार्‍या फटाक्यांवर बंदी आणावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. हरिप्रसाद पिपरालिया यांना सादर करण्यात आले. या वेळी सर्वश्री. भवानीशंकर परिहार, सावन सोनी, मनोज सिंह, राजेंद्र सिंह, गजानन केसकर आणि आनंद जाखोटिया उपस्थित होते.

ज्यू धर्मियांच्या वंशसंहाराची कल्पना मुसलमान मौलवीने हिटलरच्या डोक्यात उतरवली ! - नेतान्याहू

     तेल अवीव - ज्यू धर्मियांच्या वंशसंहाराची कल्पना मुसलमान मौलवीने हिटलरच्या डोक्यात उतरवली, असे विधान करून इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी एका नवीनच वादाला तोंड फोडले आहे. नेतान्याहू यांचे वडील प्रख्यात इतिहासतज्ञ होते. 
    राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत भाषण करतांना नेतान्याहू म्हणाले, प्रारंभी हिटलरच्या डोक्यात केवळ ज्यू धर्मियांना जर्मनीतून हद्दपार करण्याचीच कल्पना होती; मात्र पॅलेस्टाइन देशातील जेरुसलेम येथील मौलवी हज अमीन अल-हुसेनी याने हिटलरची भेट घेतली आणि त्याला सांगितले की, ज्यूंना केवळ देशाबाहेर काढून प्रश्‍न सुटणार नाही. ते मोठ्या संख्येने परततील; म्हणून त्यांचा वंशसंहार करणेच आवश्यक आहे. तेव्हापासून हिटलरने ६० लक्ष ज्यूंचे शिरकाण केले. नेतान्याहू यांच्या वक्तव्याने हिटलरला निर्दोषत्व बहाल केले असून बेन्जामिन नेतान्याहू यांचा इस्लामद्वेष उघड झाला आहे, असे पॅलेस्टाइन देशातील अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने आतंकवादी संघटनांमध्ये भेद करू नये ! - बराक ओबामा

भारतीय राज्यकर्त्यांनो, अमेरिकेच्या इशार्‍यावरून पाक आतंकवाद संपवेल, 
अशी भाबडी अपेक्षा करू नका !
    वॉशिंग्टन - पाकिस्तानने आतंकवादी संघटनांमध्ये भेद करू नये, असे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना स्पष्ट केले. २२ ऑक्टोबर या दिवशी येथील ओव्हल कार्यालयात ओबामा आणि शरीफ यांची बैठक पार पडली. 

आरक्षण द्या; अन्यथा धर्मांतर करू ! - पटेल समाजाची चेतावणी

हिंदु धर्माच्या मुळावर उठलेला आरक्षणाचा भस्मासुर !
धर्मशिक्षण नसल्याचा परिणाम ! स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कधी मुसलमान अथवा ख्रिस्ती धर्मांतर करण्याची धमकी देतात का ?
गांधीनगर (गुजरात) - आम्हाला आरक्षण द्या; अन्यथा आरक्षणासाठी सुरत येथील पटेल समाजाचे पाचशे नागरिक धर्मांतर करतील, अशी गर्भीत चेतावणी अखिल भारतीय पाटीदार सेनेचे सदस्य राजू बोदरा यांनी दिली आहे. (आरक्षणाचा भस्मासुर ! आरक्षण म्हणजे एखाद्याची पात्रता नसतांनाही त्याची पदावर नियुक्ती करून पात्रता असलेल्यावर अन्याय करणे होय ! त्यामुळे राज्यकर्त्यांनी अशा चिथावण्यांसमोर मान न तुकवता ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे ! - संपादक) 
पटेल समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करून त्याला नोकरी आणि शिक्षण यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी करत गेल्या काही दिवसांपासून पटेल समाजाने गुजरातमध्ये आंदोलन चालू केले आहे; मात्र अद्यापही शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप पटेल समाजाने केला आहे. 

महाराष्ट्रात उत्पादित केलेल्या आणि विकल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची माहितीपत्रके आणि वेष्टने यांवर मराठीचा वापर न करणार्या आस्थापनांवर दंडाचा अवलंब करा !

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर राज्यशासनाचे परिपत्रक !
हिंदूंनो, यासाठी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
हिंदु जनजागृती समितीचे यश !
मुंबई - महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मधील तरतुदीनुसार १ मे १९६६ पासून वर्जित प्रयोजने वगळता सर्व कामकाज मराठीतून बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतांना राज्यात उत्पादित केल्या जाणार्या, तसेच विकल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणकीय प्रणाली, माहिती तंत्रज्ञान उपकरणे, भ्रमणभाष इत्यादींची माहितीपत्रके आणि वेष्टने यांवर राजभाषा मराठीचा वापर होत नसल्याचे हिंदु जनजागृती समितीच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीने या संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्याकडे वरील संबंधित आस्थापने मराठीचा वापर करत नसल्याविषयी त्यांना शिक्षा अन् दंड करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती, तसेच या संदर्भात आमदारांच्या माध्यमातून विधीमंडळाच्या मागील अधिवेशनात हा विषयही उपस्थित करण्यात आला होता. अखेर याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आस्थापन विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले असून त्यात 'महाराष्ट्रात जी आस्थापने माहितीपत्रके आणि वेष्टने यांवर मराठीचा वापर करत नाहीत, त्यांच्यावर हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी, तसेच या आदेशाची अंमलबजावणी (कार्यवाही) सर्व विभाग अन् कार्यालये यांनी करावी', असे नमूद करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

देशद्रोही याकूबचे समर्थन करणार्‍यांनी आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नयेत ! - आमदार नीलमताई गोर्‍हे

     सांगली, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोही याकूब मेननला फाशीची शिक्षा दिल्यावरही काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषद येथील लोकप्रतिनिधींनी याकूबला फाशी न होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. अशा देशद्रोही याकूबचे समर्थन करणार्‍यांनी आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नयेत. तसेच ज्यांना आदर्श घोटाळा प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यावर मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते, त्यांनी आम्हाला काही शिकवण्याची आवश्यकता नाही, असे परखड मत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार निलमताई गोर्‍हे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. नुकतेच माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब काटकर यांचे निधन झाले. त्यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी आमदार निलमताई गोर्‍हे आल्या असतांना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेने सत्तेत राहून विरोध करू नये, धैर्य असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, अशी टीका केली होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर त्या बोलत होत्या. 

सोलापूर येथील अवैध धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणात गोंधळ !

     सोलापूर, २६ ऑक्टोबर - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अनेक मंदिरे ही खाजगी जागेत आणि अनुज्ञप्ती घेऊन बांधली गेलेली आहेत. त्यांनाही पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांनी नोटिसा बजावल्या आहेत. (असा चालतो महानगरपालिकेचा भोंगळ कारभार ! - संपादक) मुसलमानांच्या धार्मिक स्थळांना अथवा अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या मदरसे आणि मशिदी यांना हात लावण्यात आलेला नाही. श्री सिद्धेश्‍वर मंदिराच्या महाद्वारासमोर असलेल्या अवैध थडग्याचा यात समावेश नाही. (यावरून महानगरपालिका प्रशासन हे अल्पसंख्यांकांची हुजरेगिरी करत आहेत, असे वाटल्यास वावगे काय ? - संपादक) त्यामुळे झालेले सर्वेक्षण चुकीचे असून ते पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त काळम पाटील आणि पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. 

विकाऊ प्रसारमाध्यमे, सामाजिक संकेतस्थळे आणि निधर्मीवाद यांमुळे देश आणि धर्म धोक्यात ! - अधिवक्ता श्री. सिद्धेश पाटील

अधिवक्ता श्री. सिद्धेश पाटील (डावीकडे)
यांचे अभिनंदन करतांना श्री. राजीव आनंद
    मुंबई - विकाऊ प्रसारमाध्यमे, सामाजिक संकेतस्थळे आणि निधर्मीवाद ही युवा पिढीसमोरील नवी आव्हाने आहेत. त्यांच्यामुळेच आज आपला देश आणि धर्म धोक्यात आहे, असे प्रतिपादन शिवरत्न पुरस्काराचे मानकरी अधिवक्ता श्री. सिद्धेश पाटील यांनी केले. कुर्ला (पश्‍चिम) येथील बाल मित्रमंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 
     या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श चारित्र्य आणि शिवरायांच्या आदर्शांची युवा पिढीला असणारी गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अधिवक्ता श्री. सिद्धेश पाटील यांनी समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर केलेल्या निश्‍चयाचा महामेरू या काव्याचे विवेचन केले. तसेच युवा पिढीसमोरील खरी आव्हाने आणि त्यावरील उपाय म्हणून शिवचरित्राची आवश्यकता यांवरही भाष्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव आनंद यांनी अधिवक्ता श्री. सिद्धेश पाटील यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला १०० हून अधिक युवक आणि महिला सहभागी होत्या.

सनातनचे कार्य ही काळाची आवश्यकता ! - पूजाबहन, पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या शिष्या

पूज्यपाद आसारामजी बापूंच्या शिष्या पूजाबहन यांचा 
 सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान 
     अमरावती - "सनातन संस्था फार चांगले कार्य करत आहे. ती काळाची आवश्यकता आहे. तसेच सनातनने आम्हालासुद्धा बापूजींच्या अटकेनंतर पुष्कळ आधार दिला. या घोर आपत्काळात आपण सर्वांनी असेच एकत्रीतरित्या हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवश्यकता आहे. साधक मला भेटायला आल्यामुळे आनंद झाला आहे", असे उद्गार पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या शिष्या साध्वी पूजाबहन यांनी काढले. कर्णावती महिला आश्रमात साध्वी पूजाबहन यांचा २५ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमाच्या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांना सनातनचा हिंदी ग्रंथ 'अध्यात्मका प्रस्तावनात्मक विवेचन' आणि 'सनातन पंचांग २०१६' भेट देण्यात आले.

निवडणुकीत दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! - गृहराज्यमंत्री राम कदम

     कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे; म्हणूनच काही ठिकाणी दहशत निर्माण केली जात आहे; मात्र निवडणूककाळात भीतीचे वातावरण निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी गृहराज्यमंत्री श्री. राम शिंदे यांनी येथे बोलतांना दिली. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ते येथे बोलत होते. ते म्हणाले की, शहरात जनतेचा भाजपला पाठिंबा वाढत असल्यानेच विरोधक दहशतवादाचे 'पराक्रम' करत आहेत; मात्र महापालिकेची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे.

श्री दुर्गामाता मिरवणुकीत 'डॉल्बी' वापरल्याने मिरज शहरात ६ मंडळांच्या २० जणांवर गुन्हे !

अशीच कारवाई अन्य धर्मियांच्या नियमबाह्य मिरवणुकांवर होणार का ? 
     मिरज, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - शहरात दसर्‍याच्या दिवशी श्री दुर्गामाता मिरवणुकीत 'डॉल्बी' लावल्याने सहा नवरात्रोत्सव मंडळांच्या २० जणांवर शनिवारी रात्री गुन्हे प्रविष्ट करण्यात आले. यात दोन महिलांसह दोन डॉल्बी मालकांचाही समावेश आहे. नुकताच मोहरम पार पडला. यात मुसलमान समाजाच्या मिरवणुका महानगरपालिका शहरात मोठ्या प्रमाणात निघाल्या होत्या. त्यांच्याकडूनही नियमांची पायमल्ली झाली असल्यास पोलीस प्रशासन त्यांच्यावरही हिंदूंप्रमाणेच गुन्हे प्रविष्ट करणार काय, असा प्रश्‍न महापालिकेच्या क्षेत्रातील हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे.

पिंपरी (पुणे) येथे 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांकडून वाहने आणि दुकाने यांची तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन वारसा चालवणार्‍या पक्षाकडून हे अपेक्षित नाही. 
     पिंपरी, २६ ऑक्टोबर - हरियाणामध्ये एका दलित कुटुंबाला जाळल्याची घटना आणि केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे २५ हून अधिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. या कार्यकर्त्यांनी येथील डीलक्स चौकातील मॉल आणि वाहने यांची तोडफोड केली. ही घटना २३ ऑक्टोबरच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पक्षाचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे याच्यासह ६ जणांना अटक केली आहे, तर २० हून अधिक कार्यकर्ते पसार आहेत.

प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी पालकांची कार्यशाळा

     पुणे, २६ ऑक्टोबर - येथील काही बालवाडी आणि प्राथमिक शाळांमधील बालकांमध्ये व्रात्यपणा, अयोग्य वर्तन, शिव्या देणे, मारामारी करणे आणि वर्गातील विद्यार्थी अन् विद्यार्थिनींमध्ये जोड्या लावणे, असे अपप्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे शाळांनी या गंभीर अपप्रकारांची नोंद घेऊन पालकांच्या समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये पालक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद, शालेय वर्तन आणि त्याविषयी काढावयाचे उपाय यांविषयी तज्ञ समुपदेशकांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

जय हनुमान पतसंस्थेच्या वतीने सनातनचे साधक श्री. राजाराम मोरे यांचा ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सत्कार !

सनातनच्या साधकांवर खोटे आरोप करणार्‍यांना चपराक ! 
     ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), २६ ऑक्टोबर (वार्ता.) - जय हनुमान पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने येथील सनातन संस्थेचे साधक श्री. राजाराम मोरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी इस्लामपूर अर्बन बँकेचे संचालक श्री. एम्.एम्.पाटील हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वाळवा तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. बी.के. पाटील होते. या वेळी श्री अंबिका महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा मोरे, जय हनुमान पतसंस्थेचे संचालक श्री. शहाजी पाटील (बापू), तसेच अन्य पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (सनातन संस्थेचे कार्य चांगले असल्याचे जाणून घेऊन आज समाजातील संस्थाही सनातनच्या साधकांचा गौरव करत आहेत. ही बाब सनातनचे साधक राष्ट्र आणि धर्मप्रेमी असल्याचे अधोरेखित करते ! - संपादक)

अनधिकृत बांधकामांच्या कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍यांना ६० सहस्र रुपये दंड

प्रत्येक वेळी असे कठोर शासन दिले गेले, तर अनधिकृत बांधकामांचा 
विळखा अल्प होण्यास वेळ लागणार नाही !
     घाटकोपर - येथील परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही पालिकेने काहीच कृती केली नाही. यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली कारवाईविषयी माहितीची विचारणा करण्यात आली; परंतु अधिकार्‍यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे माहिती आयोगाने संबंधित पालिका अधिकार्‍यांना ६० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे.

नागपूर येथे घट विसर्जनासाठी धर्मशास्त्रविरोधी कृत्रिम तलावांचा प्रयोग

प्रदूषणाच्या नावाखाली हिंदूंच्या सण-उत्सवांना होणारा अटकाव शासनाने रोखावा, ही अपेक्षा !
     नागपूर - येथे ग्रीन विजिल या पर्यावरणप्रेमी संस्थेने कृत्रिम तलावाचा प्रयोग घट विसर्जनासाठी फुटाळा तलावावर केला. शहरातील फुटाळा, गांधीसागर आणि सोनेगाव या ठिकाणांवर गणपति आणि देवी विसर्जन वर्षानुवर्षापासून करण्यात येत आहे. याच फुटाळा तलावावर या वेळी ग्रीन विजिल या पर्यावरणप्रेमी संस्थेमुळे प्रथमच देवी विसर्जनात कृत्रिम तलावांचा प्रयोग घट विसर्जनासाठी केला.

तिरूपती देवस्थान समितीकडून श्री महालक्ष्मी देवीला ७४ सहस्र रुपयांचा शालू अर्पण !

     कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - तिरूपती देवस्थान समितीकडून प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही २१ ऑक्टोबरला म्हणजेच अष्टमीला सकाळी समितीचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी श्री. आर्. सेवलम् आणि श्री. के. वाणी हे शालू घेऊन श्री महालक्ष्मी मंदिरातील भवानी मंडपात आले. मंडपातून शालूची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक श्री महालक्ष्मी मंदिरात आल्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. या मिरवणूक सोहळ्यात भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवीला दिलेल्या पोपटी रंगाच्या शालूची किंमत ७४ सहस्र रुपये आहे. शालूचा पदर गुलाबी रंगाचा असून त्यावर चंदेरी नक्षीकाम करण्यात आले आहे.

(म्हणे) डॉ. नरेंद्र दाभोलकर कैलासवासी (?)

     सातारा, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील संगम माहुली स्मशानभूमी परिसरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाअगोदर कैलासवासी, असे बिरुद लावण्यात आले आहे. कैलास स्मशानभूमीचे व्यवस्थापन पहाणार्‍या श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी हे फ्लेक्स लावल्याचे समजते. (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धांना विरोध करू पहाणारे नरेंद्र दाभोलकर यांच्याच नावाअगोदर त्यांच्या अनुयायींनी कैलासवासी हे बिरुद लावणे म्हणजे त्यांच्या वैचारिक पराभवाची पोचपावतीच आहे ! - संपादक)

सांगोल्यात (जिल्हा सोलापूर) आज अंबिकादेवी मंदिराचा कळसारोहण सोहळा

     सांगोला (जिल्हा सोलापूर), २६ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिराचा कळसारोहण समारंभ मंगळवार, २७ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. दुपारी ४ वाजता श्री रुद्रपशुपती कोळेकर महाराज यांच्या हस्ते कळसारोहण आणि सभामंडपाचे उदघाटन होईल. सकाळी ९ वाजता नवचंडी यज्ञ होईल. दुपारी १.३० वाजता कळसाची मिरवणूक निघेल. कळस घेऊन सुहासिनी महिला या मिरवणुकीत सहभागी होतील. सायंकाळी ५ वाजता प्रसादवाटप होईल. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. आमदार साळुंखे यांच्या स्थानिक विकास निधी आणि लोकवर्गणी यांतून मंदिराच्या सभा मंडपाचे आणि शिखराचे बांधकाम झाले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन जगदंबा प्रतिष्ठानने केले आहे.

पुणे येथे पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महानगरपालिकेची कारवाई थंडावली

पुणे जिल्ह्यात पाण्याची स्थिती बिकट असतांना पाण्याची 
होणारी उधळपट्टी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई अपेक्षित आहे ! 
     पुणे, २६ ऑक्टोबर - शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा चालू करण्यात आला असतांनाही पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात चालू आहे. गाड्या धुणे, बांधकाम, गाडी धुलाई केंद्र येथे पाण्याचा अपव्यय होत आहे, तसेच पाणीगळती, पाण्याच्या टाक्या भरून वहाणे, असे प्रकारही चालू आहेत; मात्र पुणे महानगरपालिकेकडून त्या विरोधात चालू केलेली कारवाई थंडावली आहे. (पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना कधीपर्यंत राबवणार आहेत, तेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट करावे ! - संपादक) 

देशाला 'हिंदु राष्ट्र' म्हणून घोषित करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेशी हिंदू महासभा सहमत

     जालना, २६ ऑक्टोबर - शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या दसरा मेळाव्यात देशाला हिंदु राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची आणि समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या सूत्रांशी हिंदू महासभा सहमत असून शासनाने या सूत्रांची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदू महासभेचे मराठवाडा प्रमुख धनसिंह सूर्यवंशी यांनी केले. (या भूमिकेविषयी हिंदू महासभेचे अभिनंदन ! - संपादक) 

वारंवार गोवंशरक्षण करावे लागू नये, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

चाळीसगाव येथे ग्रामस्थांनी केली २४ गोवंशियांची सुटका 
     मालेगाव - येथे २४ गोवंशियांची अमानुषपणे वाहतूक करणारे दोन टेम्पो पिलखोडच्या ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या वेळी २४ गोवंशियांनाही पोलिसांकडे देण्यात आले. या वेळी पोलिसांनी टेम्पो चालकासह तिघांना कह्यात घेतले आहे. चालकाकडे वाहतुकीची पावतीही नसल्याचे उघड झाले आहे.

रोड शोद्वारे आदित्य ठाकरे यांचे शक्तीप्रदर्शन !

     कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, नाद नाही करायचा शिवसेनेचा, जय भवानी जय शिवाजी अशा जोरदार घोषणा देत शिवसेनेनेे रोड शोद्वारे २५ ऑक्टोबर या दिवशी शक्तीप्रदर्शन केले. युवा सेनाप्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. फेरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून श्री. ठाकरेही भारावून गेले. सायंकाळी ५.३० वाजता ताराराणी चौकातून फेरीस प्रारंभ झाला. दुपारी ४ वाजल्यापासूनच चौकात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दुचाकी वाहनांवरून फेरी काढून शिवसैनिकांनी जल्लोष केला.

साईबाबा संस्थान ट्रस्टने निमंत्रणपत्रिकांवर व्यय करू नये ! - उच्च न्यायालय

  • मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
  • भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांची उधळपट्टी करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भक्तांची मागणी आहे !
     मुंबई/शिर्डी - शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टने निमंत्रणपत्रिकांच्या छपाईवर केलेल्या खर्चाला संमती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दर्शवला आहे. साईबाबा संस्थान ट्रस्टने आश्रयदात्यांना दसर्‍याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यासाठी १४ लक्ष ९४ सहस्र रुपये खर्चून निमंत्रणपत्रिका छापून घेतल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती ए.बी. चौधरी आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी साईबाबा संस्थान ट्रस्टने केलेल्या अर्जावरील सुनावणीच्या वेळी वरील आदेश दिला.

आफ्रिकन देशातही गोहत्या करणे पाप ! - मोहन भागवत

गोहत्या करणारे भारतीय आफ्रिकेकडून काही बोध घेतील का ? 
     नागपूर - आफ्रिकन देशातही गोहत्याला पाप समजले जाते, जगण्याचा शेवटचा पर्याय म्हणूनही आफ्रिकन गायीला मारत नाहीत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले आहे. त्यांनी या विधानातून एकप्रकारे गोहत्या बंदीचे समर्थनच केले आहे.

मिरज येथील धर्माभिमानी अधिवक्त्यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

डावीकडून मिरज येथील अधिवक्ता किरण जाबशेट्टी,
अधिवक्ता अण्णासाहेब जाधव, अधिवक्ता राजेंद्र शिरसाट,
अधिवक्तासी.ए. पाटील आणि पाठीमागे सनातनचे श्री. किरण
पोळ यांना सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती
सांगतांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी
     रामनाथी (गोवा) - मिरज येथील अधिवक्ता श्री. किरण जाबशेट्टी, अधिवक्ता श्री. अण्णासाहेब जाधव, अधिवक्ता श्री. राजेंद्र शिरसाट आणि अधिवक्ता श्री. सी.ए. पाटील या सर्व धर्माभिमानी अधिवक्त्यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म याविषयीचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांविषयी अवगत केले. 

फटाक्यांवरील देवतांच्या चित्रांच्या विरोधात जळगाव येथे निवेदन

निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके
यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते आणि संस्थेचे साधक
     जळगाव - फटाक्यांच्या वेष्टनांवर देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापल्याने त्यांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती ख्रिस्ताब्द २००५ पासून सनदशीर मार्गाने जनजागृती चळवळ राबवत आहे. या चळवळीच्या अंतर्गत श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्री विष्णु आदी देवता, तसेच राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री थांबवण्याविषयी कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रणव नागणे, श्रेयस पिसोळकर, आशिष गांगवे, शशी सूर्यवंशी, निखील लोंकलकर, रवि चव्हाण आणि सनातन संस्थेचे श्री. प्रितम पाटील हे उपस्थित होते. 

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यू.एस्. अवटी निलंबित !

     खानापूर (जिल्हा बेळगाव), २६ ऑक्टोबर (वार्ता.) - लोंढा येथे २१ ऑक्टोबर या दिवशी श्रीराम सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मजागरण सभेनंतर झालेल्या दंगलीच्या वेळी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलीस प्रमुख रविकांतेगौडा यांनी खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक यू.एस्. अवटी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या जागी चिक्कोडी (जिल्हा बेळगाव) येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजार यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी त्यांचा पदभारही स्वीकारला आहे. पोलीस उपनिरीक्षक अवटी यांनी ही धर्मजागरण सभा करण्यास अनुमती दिली होती. त्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवला नव्हता.

अभाविपचा दावा खरा ठरल्यास प्रसारमाध्यमे आणि धर्मनिरपेक्षतावादी प्रायश्‍चित्त घेतील का ?

फलक प्रसिद्धीकरता
    दादरी हत्याकांडामागे गोहत्या नाही, तर महंमद अखलाखच्या मुलाने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यामुळे हे प्रकरण घडले, असा दावा भाजपची युवा संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
ABVPka dava : Akhalakhki hatya ke pichhe uske beteka Hindu ladkise prem prakaran.
Ab es love Zihad par Media chup kyo ? 
जागो ! 
अभाविप का दावा : अखलाक की हत्याके पिछे उसके बेटे का हिन्दू लडकी से प्रेम प्रकरण ! 
अब इस लव्ह जिहादपर मीडिया चूप क्यो ?

जिहादी मुसलमानांचे लांगूलचालन करणारे तथाकथित सुधारक आणि पुरोगामी !

     आतंकवादाचे मूळ जागतिकीकरण, सामाजिक विषमता, गरिबी, आर्थिक विषमता यांमध्ये निश्‍चितच नसून इस्लामची शिकवणच त्याला कारणीभूत आहे. बॉम्बस्फोट, अन्य धर्मियांच्या हत्या आणि मानवी आक्रमणे या सर्व गोष्टी मुसलमानांच्या नसानसांमध्ये भिनलेल्या जिहाद या इस्लामच्या धार्मिक शिकवणीचा परिपाक आहेत. संपूर्ण जग इस्लाममय करण्यासाठी सर्व गोष्टींचा अतिरेक करणे, हे जिहादींना अभिमानास्पद वाटते. जिहादींची वैचारिक बैठक अन् त्यांचे वागणे हे सर्व इस्लामी धर्मतत्त्वांनुसार असते. ही वस्तूस्थिती भारतातील डोके नसलेले तथाकथित सुधारक आणि पुरोगामी लोक या सर्व अयोग्य अन् विकृत विचारांपुढे सपशेल शरणागती का पत्करतात, हेच कळत नाही. 
- विचारवंत डॉ. बाबू सुशीलन (हिंदु व्हॉईस) (दैनिक सनातन प्रभात, ४.१.२००७ )

ज्येष्ठ नागरिकांना चांगले दिवस केव्हा ?

गेल्या आठवड्यात पुणे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये आयुक्तांनी त्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या ऐकल्यावर अनेक जण अवाक् झाले. त्यांच्या समस्या कोणत्या होत्या, तर आम्हाला मिळणारे निवृत्ती वेतन (पेन्शन) मुलांना घरामध्ये व्यय करण्यासाठी हवे, त्यांच्या नावावर असलेली संपत्ती ही मुलांना वाटणी करून हवी आहे, पैसे दिल्याविना घरामध्ये नीट वागणूक मिळत नाही, रस्ता ओलांडतांना कोणी साहाय्य करत नाही अथवा मिळत नाही वगैरे. यावर पोलीस आयुक्तांनी असे आदेश दिले की, ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या नावाची नोंद पोलीस ठाण्यात करून एक ओळखपत्र देण्यात येईल आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणार्‍या अडचणी तत्काळ सोडवाव्यात !

स्वार्थासाठी शासकीय पुरस्कार परत करण्याचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेले राजकारण !

      देशात शासकीय पुरस्कार परत करण्याची नवीन फॅशन आली आहे, असे म्हटले जात आहेे. या फॅशनचे मूळ प्रणेते (कदाचित) तरुण पिढीला ठाऊक नसावेत; म्हणूनच त्यांची ओळख करून देण्यासाठी हा पत्रप्रपंच !
     धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी शासकीय पुरस्कार परत करण्याची काँग्रेसी परंपरा आजही अखंड चालू आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते गांधी आणि नेहरू यांनीच सर्वप्रथम त्यांच्या कृतीतून हा धडा घालून दिला आहे. 
१. वर्ष १९१९ मध्ये जालियनवाला बागेत अत्यंत नृशंस हत्याकांड झाले. त्याचा तीव्र निषेध तर नाहीच; पण कोणतीही प्रतिक्रियाही त्यांनी दिली नाही. इतकेच नव्हे, तर त्याचा साधा उल्लेखही ६ मास (महिने) त्यांनी केला नाही. नेहरू या हत्याकांडाची चौकशी करणार्‍या समितीचे सचिव होते. त्यांनी वस्तुस्थितीची नोंदही घेतली नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला पुरस्कार (किताब) चिडीने ब्रिटीश शासनाला परत केला; परंतु गांधींना आफ्रिकेत असतांना ब्रिटीश साम्राज्य सेवेसाठी मिळालेली २ पदके त्यांनी गुलबकावलीसारखी, म्हणजे फुलासारखी जपून ठेवली होती. त्यांना ते परत करण्याचे धाडस मात्र झाले नाही. त्यांना जालियनवाला बाग हत्याकांड हे शब्द उच्चारण्यासाठीही ६ मास (महिने) लागले.

हिंदुशौर्य गाथा का शिकवली जात नाही ?

     छत्रपती शिवाजी महाराजांनी वीरवृत्तीने शौर्य गाजवले; म्हणून पाच पातशाह्या पायदळी तुडवून त्यांनी हिंदवी स्वराज्याचा भगवा डौलाने फडकवला. मराठ्यांना राजा नव्हता, तेव्हा आमच्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या सेनानींनी औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडला ! थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हिंदवी साम्राज्याचा विस्तार केला, तर राघोबादादांनी नुसता अटकेपार भगवा फडकवला नाही, तर दिल्लीचे तख्तही फोडले. अहो, देश पारतंत्र्यात असतांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विदेशात जाऊन सैन्य उभे केले आणि म्यानमार, अंदमान पादाक्रांत केले. आझाद हिंद सेनेच्या भीतीने इंग्रजांना देश सोडावा लागला. अशा किती शौर्यकथा हिंदूंना सांगाव्यात ? पण आज ही हिंदुशौर्याची परंपरा लपवली जाते. ती हिंदूंना शिकवली जात नाही; कारण हिंदूंनी शूरतेने आचरण करणे, हे काही राष्ट्रद्रोही शक्तींना नको आहे. - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था (२०.१०.२०१५)

साहित्यिकांचा तमाशा !

डॉ. सच्चिदानंद शेवडे
     समाजात घडणार्‍या काही अप्रिय घटनांचा निषेध करण्यासाठी नयनतारा सहगल, अशोक बाजपेयी, सारा जोसेफ आदींनी आपापले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला, तर के. सच्चिदानंदन् आणि पी.के. पराक्कादवू या मल्याळी आणि पद्मश्री शशी देशपांडे या कानडी साहित्यिकाने साहित्य अकादमीच्या आपल्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. हा लेख प्रकाशित होईपर्यंत आणखी काहीजणसुद्धा यांचा कित्ता गिरवतील, याविषयी आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. या तमाम पुरोगामी साहित्यिकांची मने किती अतीसंवेदनशील आहेत, याचा आम्हाला प्रत्यय आला आणि आमचे डोळे भरून येऊन पाझरू लागले.

निरपेक्ष प्रीती, कृतज्ञता, भावभक्ती, शरणागती आदी अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या आणि कोणतेही अवडंबर न माजवणार्‍या सनातनच्या संतांची वैशिष्ट्ये !

सौ. शालिनी मराठे
१. बाह्य रूप : सनातनचे संत बाहेरून अगदी सामान्य वाटतात. स्वच्छ साधे कपडे, मोजके बोलणे, कसलेच अवडंबर नाही, असे ते आहेत. ते स्वतःची कामे स्वतःच करतात. त्यामुळे साधक आणि संत यांतील भेद समाजाला ओळखता येत नाही. बगळा पांढरा आणि हंसही पांढरा असतो; पण नीर-क्षीर विवेक करतो तो हंस ! तसेच सनातनच्या संतांसंदर्भातही आहे.
२. अंतरंग : समाजातील सामान्य व्यक्तीला संत ओळखता यावेत, यासाठी काही सूत्रे येथे देत आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
     - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

श्रीकृष्णाविषयीच्या भक्तीचे महत्त्व दृढ करणारा सनातनचा ग्रंथ !

रासलीला
     रासलीला म्हणजे कृष्णाने गोपींसह केलेली कामक्रीडा, या खोडसाळ आरोपातील अर्थशून्यता स्पष्ट करून, ती भक्तीची सर्वोच्च अवस्था कशी, हे सकारण स्पष्ट करणारा अन् गोपींची आदर्श भक्ती दाखवून देणारा ग्रंथ !
धर्माविषयीचा व्यापक दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा SanatanShop.com वर उपलब्ध

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

     धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदु राष्ट्राचे निर्माण अन् पोषण होईल !

हिंदु जनजागृती समितीचा मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांचा सप्टेंबर २०१५ मधील धर्मप्रसार कार्याचा आढावा !

राष्ट्र आणि धर्म कार्यातील हिंदु जनजागृती समितीची वाटचाल
      मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्माभिमान्यांना वैयक्तिक संपर्क, धर्मप्रसार, धार्मिक उत्सवातील जनजागृती चळवळी, हिंदूसंघटन मेळावे, वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रातील सहभाग आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन केल्यावर धर्मकार्य वाढण्यास साहाय्य झाले. या तीन जिल्ह्यांचा सप्टेंबर २०१५ मधील धर्मकार्याचा संक्षिप्त आढावा पुढीलप्रमाणे आहे.

नीटनेटकेपणा आणि देवाप्रती भाव असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील चि. स्वरूपा सतीश डेकाटे (वय २ वर्षे) !

चि. स्वरूपा डेकाटे
१. व्यवस्थितपणा
अ. स्वरूपा कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करते.
आ. तिला चादर किंवा सुखासनावरचे आच्छादन विस्कटलेलेे दिसले, तर ती लगेच नीट करते.
इ. ती चपला एकाच जागी ओळीत ठेवते. कुठेही चपला काढल्या, तरी ती चपला ठेवण्याच्या जागी आणून ठेवते.
ई. तिच्या कपड्यांची बॅग उघडली आणि माझ्याकडून बॅगची साखळी (चेन) थोडी उघडी राहिली, तर ती स्वतः पूर्णपणे लावते.

चातुर्मास झाला रामनाथी आश्रमात ।

सौ. नीलिमा सप्तर्षी
      श्री. राजाभाऊ (वय ८३ वर्षे) आणि सौ. नीलिमा सप्तर्षी (वय ७८ वर्षे) हे दोघे चातुर्मासाच्या कालावधीत रामनाथी आश्रमात वास्तव्यास होते. चातुर्मासात रामनाथी आश्रमात रहायला मिळाल्याबद्दल सौ. नीलिमा सप्तर्षी यांनी व्यक्त केलेली काव्यमय कृतज्ञता पुढे देत आहोत.

चातुर्मास झाला रामनाथी आश्रमात ।
श्रीकृष्णाच्या आठवणीत ।
संतांच्या मेळाव्यात ।
साधकांच्या जिव्हाळ्यात ।
निसर्गाच्या आश्रयात ॥ १ ॥

ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेच्या बळावर आणि त्यांच्या शिकवणीच्या आधारे जीवनातील कठोर प्रारब्ध सहनशीलतेने भोगणारे पणजी, गोवा येथील कै. शेखर मयेकर (वय ५९ वर्षे) !

कै. शेखर मयेकर
    सनातनचे पणजी, गोवा येथील साधक कै. शेखर मयेकर (वय ५९ वर्षे) हे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातील एक प्रामाणिक, सर्वांना सहकार्य करणारे आणि मनमिळाऊ अधिकारी होते. गेली ३२ वर्षे ते या खात्यात कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी दैनिक नवप्रभा या दैनिकात काम केले होते. त्यांचेे २९.९.२०१५ या दिवशी निधन झाले.
१. सहनशील
१ अ. त्रास देणार्‍या अधिकार्‍याविरुद्ध नाराजी नसणे : काकांच्या कार्यालयीन जीवनात ते कधी कोणावर रागावले नाहीत. त्यांना त्रास देणार्‍या अधिकार्‍याविरुद्धही त्यांनी कधी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी त्यांची नेहमीच आठवण काढतात. कुठल्याही मनाविरुद्ध घडणार्‍या गोष्टी प्रारब्ध म्हणून स्वीकारणे, हा त्यांचा उपजत स्वभाव होता.

गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण गोळा करत असतांना एका भिकार्‍याने त्याच्याकडील सर्व पैसे अर्पण देणे आणि काही मासांनी पुन्हा भेटल्यावर तो मजुरी करून पोट भरत असल्याचे कळल्यावर भावजागृती होणे

     नागपूरला असतांना आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण आणण्यासाठी साधकांसह दुकानात जायचो. मुख्य रस्त्यांवरची दुकाने एका ओळीत होती. प्रत्येक दुकानात जाऊन अर्पणाचे महत्त्व सांगत असतांना एक भिकारी आमचा पाठलाग करत होता आणि आमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. एका दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदाराला अर्पणाचे महत्त्व सांगितल्यानंतर त्याने अर्पण तर दिले नाहीच, उलट आमचा अनादर करून तो आम्हाला वाटेल तसे अपमानास्पद बोलू लागला.

सुप्रभातकाळी ईश्‍वराने आनंदाची पर्वणी दिली ।

    ३१.७.२०१५ या दिवशी सौ. नयना नीळकंठ नाईक, भाग्यनगर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी भाग्यनगर येथील सौ. श्रुती आचार्य यांना सुचलेली कविता पुढे देत आहोत.
आज या सुप्रभातकाळी ।
ईश्‍वराने आनंदाची पर्वणी दिली ॥ १ ॥
काकांच्या पावलावर पाऊल ठेवूनी (टीप) ।
काकूही मुक्त झाल्या
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनी ॥ २ ॥

६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले नाशिक येथील श्री. नेमीचंदजी पोद्दार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. नेमीचंदजी पोद्दार
    सनातनचे साधक श्री. बाळासाहेब पोटे हे नाशिक येथील प्रखर हिंदुत्ववादी श्री. नेमीचंदजी पोद्दार यांच्या आस्थापनात गेल्या ६ वर्षांपासून नोकरी करतात. श्री. नेमीचंदजी गोवा येथे जून मासात झालेल्या चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित होते. त्यांची श्री. पोटे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. आस्थापनात येणार्‍या प्रत्येकाला ते पाणी आणि चहा द्यायला सांगून आदरातिथ्य करायला सांगतात.
२. काटकसर : ते कार्यालयात असतांना आवश्यक तेवढेच दिवे लावतात आणि बाहेर जातांना दिवे स्वतःच बंद करून जातात.
३. स्वावलंबी : स्वतःचे पटल पुसणे इत्यादी कामे ते स्वतःच करतात.

अतिथ्यशील आणि प्राप्त परिस्थितीत आनंदाने रहाणार्‍या रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनल खेर !

१. देवी घरी आली आहे, या भावाने आदरातिथ्य करणे : मी माझ्या मुलीला आणि दीड महिन्याच्या नातीला देवदर्शन झाल्यावर डोक्यावर तेल घालण्यासाठी सौ. मीनल खेर यांच्याकडे घेऊन गेले होते. श्रीमती मंगलाआजींचा (सौ. खेरकाकूंच्या सासुबाई) आध्यात्मिक स्तर चांगला असल्याने त्यांनी नातीला तेल घालून आशीर्वाद द्यावा, एवढीच माझी अपेक्षा होती. सौ. खेरकाकूंनी आम्हाला कॉफी करून दिली. मला ब्लाऊज ठेवण्यासाठी पाऊच दिला.

पू. राधा प्रभु केरळ येथे आल्यानंतर तेथील साधकांना आलेल्या अनुभूती

    पू. राधा प्रभु (राधापाच्ची) केरळ येथील कोची सेवाकेंद्रात १२ ते १४.९.२०१५ या कालावधीत नामजप करण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी केरळ येथील साधकांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. नामजप झाल्यावर रात्री घरी आल्यानंतर चक्कर येऊ लागणे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी चक्कर येत असल्याने नामजपाला जाता येणार नाही, असे वाटणे
    पू. पाच्चींच्या नामजपाला बसून घरी गेल्यानंतर रात्री ११ वाजल्यापासून मला चक्कर येऊ लागली. मी दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर (दुसर्‍या दिवशीही नामजपाला जायचे होते.) मला चक्कर येत होती, तरीही ७ ते ७.३० वाजेपर्यंत मी घरातील कामे करत होते आणि मधे मधे झोपून विश्रांतीही घेत होते. तेव्हा मी गणपतीचा नामजप करत होते. हे करूनही त्रास न्यून होत नसल्यामुळे आज नामजपाला जाता येणार नाही, असे मला वाटू लागले; पण असे करून चालणार नाही. मला नामजपाला जायचेच आहे, असेही वाटत होते.

साधकांचा त्रास न्यून होण्याच्या तळमळीने त्यांना साहाय्य करणार्‍या पू. (श्रीमती) राधापाच्ची (राधाकाकू) प्रभु !

पू. राधा प्रभु
    पू. राधा प्रभु (राधापाच्ची) केरळ येथील कोची सेवाकेंद्रात १२ ते १४.९.२०१५ या कालावधीत आल्या होत्या. त्या वेळी केरळ येथील साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. वेळेचा परिपूर्ण वापर करण्याची तळमळ
    पू. राधापाच्चींना मंगळुरूहून कोची येथे पोचायला (रेल्वे बिलंबाने पोचल्यामुळे) १२ घंटे लागले. तेव्हा त्यांच्या दौर्‍याच्या वेळी प्रतिदिन ५ घंटे नामजपाचे नियोजन केले होते. त्या २ दिवस केरळ येथे वास्तव्य करणार होत्या. तेव्हा त्यांना वाटले की, १२ घंटे प्रवास करून केवळ १० घंटेच नामजप केला, तर कसे होईल ? म्हणून त्यांनी नामजपाचे घंटे वाढवण्याविषयी संबंधित दायित्व असलेल्या साधिकेला सांगितले. यातून एवढ्या उतारवयातही पू. राधापाच्चींची तळमळ दिसून येत होती. - सौ. अवनी लुकतुके, केरळ

शांत आणि नम्र स्वभावाच्या अन् समष्टी सेवेचे दायित्व लीलया पेलून व्यष्टी साधनाही गांभीर्याने करणार्‍या सौ. अश्‍विनी सावंत !

सौ. अश्‍विनी सावंत
     आश्‍विन पौर्णिमा (२७.१०.२०१५) या दिवशी रामनाथी आश्रमातील संकेतस्थळ विभागात सेवा करणार्‍या सौ. अश्‍विनी यज्ञेश सावंत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. कविता निकम यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
सौ. अश्‍विनी सावंत यांना सनातन परिवाराच्या वतीने
 वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. हसतमुख
     ताई नेहमी हसतमुख असते. तिच्या तोंडवळ्यावर कधीच ताण किंवा निराशा दिसत नाही.

मनमोकळ्या स्वभावाच्या आणि प्रत्येक क्षण ईश्‍वराचा असल्याने तो त्याच्या सेवेत जावा, यासाठी धडपड करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या पनवेल येथील सौ. पुष्पलता उथळे !

सौ. पुष्पलता उथळे
१. काटकसर
     सौ. उथळेकाकूंमध्ये काटकसर हा ईश्‍वराचा गुण प्राधान्याने जाणवतो. ईश्‍वराने दिलेल्या प्रत्येक वस्तूचा त्या काटकसरीने वापर करतात, तसेच त्या सहसाधकांना आणि कुटुंबियांना याची स्पष्टपणे जाणीवही करून देतात.
२. मनमोकळेपणा
     काकूंचे वागणे, बोलणे अगदी सहज असते. प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी, असे त्यांना वाटते. परिपूर्ण सेवा होण्यासाठी त्यांची तळमळ असते. काकी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने बोलतात. त्यामुळे त्यांच्याशी कुठल्याही विषयावर बोलतांना संकोच वाटत नाही

सनातनचे अनमोल ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

साधक आणि सनातनच्या उत्पादनांचे वितरक यांच्यासाठी सूचना
     सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची ए४ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहे. पहिल्या प्रकारची सूची केवळ मराठी भाषेतील ग्रंथांची आहे, तर दूसरी सूची मराठीसह अन्य सर्व भाषांतील ग्रंथाची आहे. पहिल्या प्रकारातील सूचीमध्ये ग्रंथाच्या नावापुढे केवळ पृष्ठसंख्या आणि मूल्य दिले आहे, तर दुसर्‍या प्रकारच्या सूचीमध्ये ग्रंथ कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे, हे देण्यात आले आहे. 
    साधकांनी, ग्रंथप्रदर्शने, वाचनालये आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार योग्य प्रकारची सूची प्रसारासाठी वापरावी. या दोन्ही सूची नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध आहेत.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (२६.१०.२०१५) रात्री ९.१० वाजता
समाप्ती - आश्‍विन पौर्णिमा (२७.१०.२०१५) सायं ५.३५ वाजता
आज पौर्णिमा आहे.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
लौकिक शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण यांतील जमीन-आकाश एवढा भेद ! 
'शाळा, महाविद्यालये, विश्वनविद्यालये इत्यादी तात्कालिक सुख देणारे आणि अहंभाव वाढवणारे शाब्दिक ज्ञान शिकवतात, तर अध्यात्म चिरंतन आनंद देणारी आणि अहंभाव नष्ट करणारी शब्दातीत अनुभूती कशी अनुभवायची, हे शिकवते.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१०.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संयमाची आवश्यकता !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     संस्कृती हा केवळ विद्वत्तापूर्ण चर्चा करण्याचा विषय नसून नित्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, हीच खरी संस्कृती ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सतत वर्तमानकाळात रहाणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या 
पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
भावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

धिर्यो !

संपादकीय
     गोव्यात सध्या एक प्रश्‍न बराच गाजत आहे. तो म्हणजे बैलांची धिर्यो (बैलांची झुंज) ! गावागावांत बैलांची झुंज लावणारे आणि शेकडोंच्या संख्येने ते पहाणारे, असे दृश्य गोव्यात अनेकदा पहायला मिळते. तसे महाराष्ट्रातही असे प्रकार घडतच असतात. तमिळनाडूतही हा प्रकार जलीकट्टू या नावाने चालतो. सध्या तो प्रकार विशेष चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याच्यावर बंदी असूनही गोव्यात अनेक ठिकाणी धिर्यो लावली जात आहे. त्याला शेकडो शौकीन उपस्थितही असतात; त्यासंदर्भात पोलिसांना मात्र पत्ताच लागत नाही. त्यामुळे गोव्यातील प्राणीप्रेमी संतप्त आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn