Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. आठवले यांचे व्यक्तीमत्व दैवी; सनातनवरील आरोप १०० टक्के खोटे ! - मनोहर नाईक, विख्यात संमोहनतज्ञ

ठाणे येथे जाहीर जनसंवाद सभा
जनसंवाद सभेत श्री. अभय वर्तक, दीपप्रज्वलन करतांना पू. (कु.) अनुराधा वाडेकर,
संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक आणि श्री. रमेश शिंदे
    ठाणे, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - मी ३० वर्षांपूर्वी (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांना भेटलो. त्यांचे व्यक्तीमत्त्व दैवी (सात्त्विक) आहे. मध्यंतरी माध्यमांनी सनातनविषयी खोटे बोलायचे; पण रेटून बोलायचे, अशा प्रकारे धुमाकूळ घातला. मी माध्यमांना म्हटले, मी केवळ सत्याची बाजू घेणार. सत्य म्हणजे सनातन आहे. शाम मानवांनी संमोहनाचे वर्ग घेऊन लाखो रुपये कमावले आहेत. सनातनवरील आरोप १०० टक्के खोटे आहेत, असे प्रतिपादन संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी केले. येथील नौपाडा भागातील वसंतराव नाईक सभागृह येथे २४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता या जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. सनातन संस्थेच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक, सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

आप शासनाकडून देहलीतील वक्फ बोर्ड विसर्जित : महसूल सचिवांना दिले सर्वाधिकार !

      नवी देहली - देहलीतील आप शासनाने वक्फ बोर्ड विसर्जित (बरखास्त) करून बोर्डाचे सर्व अधिकार राज्याच्या महसूल सचिवांना प्रदान केले आहेत. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा राणा परवीन सिद्दिकी यांनी देहलीच्या उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी ३० ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. २० जानेवारी या दिवशी बोर्डाच्या ६ पैकी ४ सदस्यांनी श्रीमती राणा परवीन सिद्दिकी यांची वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड केली होती; मात्र त्याचे अधिपत्रक देहली शासनाने अद्याप काढले नाही. याविरुद्ध राणा परवीन सिद्दिकी यांनी आधीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने आहे तशी स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. वक्फ बोर्ड विसर्जित करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे, असा दावा राणा परवीन सिद्दिकी यांनी केला आहे.

मदरसे हे प्रार्थनास्थळे नाहीत ! - केरळ उच्च न्यायालयाचा निकाल

     थिरुवनंतपुरम् - मदरसे हे प्रार्थनास्थळे नाहीत, ते केवळ शिक्षण संस्था आहेत आणि तेथे मतदान केंद्रे स्थापन केली जाऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला.
     मदरशांत मतदान केंद्र स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. निवडणूक आयोगाने चेनकला येथील ७ मदरशांत मतदान केंद्र निर्माण करण्याचे निश्‍चित केले आहे. यावर आक्षेप घेत कासिम यांनी निवडणुकीसाठी मदरशांचा वापर करणे घटनाबाह्य असल्याचा दावा करत आयोगाच्या निर्णयाला विरोध केला होता. यावर न्यायाधीश व्ही. चिदंबरेश यांनी मदरसे हे शाळा असून त्यांना प्रार्थनास्थळे मानता येणार नाही. त्यामुळे त्यांना कोणतेही धार्मिक स्वातंत्र्य नाही, असे सांगत कासिम यांची याचिका फेटाळून लावली.

शरीफ यांच्या अमेरिकेतील भाषणाच्या वेळी झळकला स्वतंत्र बलुचिस्तानचा फलक !

     वॉशिंग्टन - पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नुकतेच यु.एस्. इन्स्टीट्यूट ऑफ पीससमोर भाषण केले. भाषण चालू होताच त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या सूत्रावरून एका व्यक्तीने भर सभागृहातच शरीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली. तुम्ही लादेनचे मित्र आहात, असेही तो म्हणाला. या व्यक्तीने स्वतंत्र बलुचिस्तानचा फलक झळकवला. त्यावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा लिहिलेली होती. त्यानंतर सुरक्षारक्षक त्याला बाहेर घेऊन गेले. त्यानंतर शरीफ यांनी भाषण चालू केले.

पाकिस्तानात धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन ! - अमेरिकेच्या संस्थेचा अहवाल

सातत्याने पाकची कड घेणारी अमेरिका त्याच्यावर कारवाई करेल, तो सुदिन !
      वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य (आय.आर.एफ्.) आयोगाने पाकिस्तानात होत असलेल्या हिंदु आणि ख्रिस्ती धर्मियांच्या संदर्भातील धार्मिक स्वातंत्र्य उल्लंघनाच्या गंभीर घटना लक्षात घेता पाकिस्तानला काळजी करण्यासारखे देश या सूचीत टाकण्याची शिफारस केली आहे. या आयोगाचे अध्यक्ष रॉबर्ट जॉर्ज यांनी ही माहिती दिली.
      पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. त्या वेळी पाकच्या धार्मिक स्वातंत्र्य उल्लंंघनाचे सूत्रही उचलून धरावे, असे ओबामा यांना सुचवण्यात आले होते. अमेरिकेने ख्रिस्ताब्द १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा पारित केला होता. त्यानुसार ज्या देशाचे नाव काळजी करण्यासारखे देश या सूचीत असते, त्याच्यावर अमेरिकेने दबाव टाकावा, असे नमूद केले आहे. आता या सूचीत पाकचे नाव आल्यास अमेरिकी शासन काय भूमिका घेते, याकडे जगाचे लक्ष लागून आहे.

भिलाईनगर (छत्तीसगड) येथील विद्यालयात क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनाचा विषय
विद्यार्थ्यांना समजावून सांगतांना शाळेतील शिक्षिका
     छत्तीसगड - छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्याच्या भिलाईनगर येथील एंजिल वैली स्कूल, हुडको या विद्यालयात नुकत्याच लावण्यात आलेल्या क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनाला शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेतील २२५ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. छत्तीसगड येथील शाळा आणि विद्यालये यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात येत असलेल्या क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

अमेरिकी आस्थापना वॉलमार्टने भारतात परवाने मिळवण्यासाठी विविध अधिकार्‍यांना दिली लाच !

अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालातील माहिती
विदेशी आस्थापना भारतीय अधिकार्‍यांना लाच देऊन येथे कशा प्रकारे प्रस्थापित
होतात, याचे हे उदाहरण होय ! भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनलेले प्रशासन याला उत्तरदायी आहे !
      वॉशिंग्टन - अमेरिकेची बहुराष्ट्रीय आस्थापना वॉलमार्टने स्थानिक अधिकार्‍यांना लाच देऊन त्यांच्याकडून कस्टम आणि रिअल इस्टेटशी संबंधित परवाने मिळवले होते, असा आरोप करण्यात आला आहे. वॉलमार्टचे भारतात २१ रिटेल स्टोअर (किरकोळ वस्तूंची विक्री करणारी केंद्रे) आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये या स्टोअर्सची संख्या ५० करण्याचा त्यांचा मानस आहे.
१. प्रसारमाध्यमांवर प्रसारीत झालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने त्याच्या अहवालात वॉलमार्टने भारतात त्यांच्या वस्तू कस्टमकडून सोडवण्यासाठी, तसेच रिअल इस्टेटचे परवाने मिळवण्यासारख्या कामांसाठी ५ डॉलर (३५० रुपये) पासून ते २०० डॉलर (१३ सहस्र रुपये) पर्यंत अधिकार्‍यांना दिले.

पाककडून सीमेवर गोळीबार

कुरापतखोर पाक !
      जम्मू - पाकने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सांबा येथील सीमा सुरक्षा दलाच्या ९ चौक्यांवर गोळीबार केला. २३ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चालू झालेला हा गोळीबार रात्रभर चालू होता. या आक्रमणात १ नागरिक ठार, तर २ जण घायाळ झाले. पाकच्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ग्रंथ

१. ग्रंथसंख्या : केंद्रशासनाचे साहित्य अकादमी आणि पद्मश्री हे पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळवणार्‍या साहित्यिकांच्या किती ग्रंथांच्या किती प्रती प्रकाशित झाल्या ? १९९८ ते सप्टेंबर २०१५ या काळात, म्हणजे गेल्या १८ वर्षांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या २७६ ग्रंथांच्या १४ भाषांत ६१ लाख ६० सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
२. समाजाला लाभ : साहित्यिकांचे ग्रंथ वाचून समाजाला काय लाभ झाला ? परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ग्रंथ वाचून सहस्रो साधनेला लागले.
यावरून समाजाला काय आवडते आणि लाभदायक आहे, हे स्पष्ट आहे.
- संपादक, सनातन प्रभात (२४.१०.२०१५)

आरोपींच्या करावयाच्या ब्रेन मॅपिंग, नार्को, सस्पेक्ट डिटेक्शन इत्यादी चाचण्यांसंदर्भातील वस्तूस्थिती

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
पोलिसांनी ब्रेन मॅपिंग, नार्को, सस्पेक्ट डिटेक्शन इत्यादी चाचण्या करू का ?, असे विचारले, तर ती मागणी स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार आरोपीला असतो. आरोपीने चाचणी करण्यास नकार दिल्यास पोलीस अथवा न्यायालय त्याच्यावर दबाव आणू शकत नाही अथवा त्याच्या मताच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खरेतर अशा चाचण्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहेत; परंतु मालेगाव २००८ च्या स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदी आरोपींची ब्रेन मॅपिंग चाचणी केली. त्या चाचणीत आरोपी निर्दोष आहेत, असा अहवाल आला; पण तो दडपला गेला. मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याच्या नार्को चाचणीत काही राजकीय पुढार्‍यांची नावे आली; परंतु त्यांचा तपासच केला गेला नाही. त्यामुळे आज अहवालाप्रमाणे पोलीस वागतील यावर विश्‍वास ठेवता येईल का ?, असा प्रश्‍न आहे.
- अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद.

बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध बांगलादेशच्या राष्ट्रपतींना निवेदन

बांगलादेशातील हिंदु बांधवांवर होणार्‍या अत्याचारांच्या
विरोधात आवाज उठवणार्‍या बंगालमधील धर्माभिमानी हिंदूचे अभिनंदन !
      कोलकाता - बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध येथील निखील बंगा नागरिक संघाचे सचिव श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी बांगलादेशच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवले असून हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी उपाययोजना आखावी, अशी मागणी केली आहे.
      या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी ४६ जिल्ह्यांमध्ये हिंदू नरकमय जीवन जगत आहेत. हिंदूंची १२८ मंदिरे पाडण्यात आली असून २५५ घरे जाळून टाकण्यात आली आहेत, तसेच २१ दुकानेही लुटून त्यांना आग लावण्यात आली आहे. हिंदूंची ५०० घरे या हिंसाचारात बाधित झाली आहेत. हे सर्व अत्याचार जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या सदस्यांनी स्थानिक अधिकार्‍यांच्या मूक संमतीने केले आहेत. त्यामुळे विभाजनाआधी हिंदूंची ५० टक्के लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात आता केवळ १२ टक्के हिंदूच शिल्लक राहिले आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.

पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता

      नवी देहली - गत १५ वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेले पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना लवकरच भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याविषयी वृत्त दिले आहे. वर्ष २००१मध्ये एक वर्षाच्या व्हिसावर अदनान सामी भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत प्रतीवर्षी व्हिसाचे नुतनीकरण केले; मात्र त्यांच्या पारपत्राची मुदत संपली. पाकिस्तानकडून त्यांच्या पारपत्राचे नुतनीकरणास नकार देण्यात आला. त्यामुळे सामी यांनी भारतीय गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन भारतात राहू देण्याची विनंती केली.

वर्ष २०१४ मध्ये देहलीत जनतेने २४० कोटी रुपये लाच म्हणून दिले !

सेंटर फॉर मिडिया स्टडीज या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झालेली माहिती
सर्वाधिक भ्रष्टाचार पोलीस खात्यात !
भ्रष्टाचारग्रस्त भारत ! जनतेला धर्मशिक्षण दिल्यास
भ्रष्टाचारच नाही, तर इतरही अनेक समस्या नष्ट होण्यास वेळ लागणार नाही !
      नवी देहली - देहलीत गेल्या वर्षी प्रत्येक कुटुंबामागे सरासरी २ सहस्र ४८६ रुपये लाच म्हणून दिले गेले, अशी आकडेवारी सेंटर फॉर मिडिया स्टडीज (सी.एम्.एस्.) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. सर्वेक्षणानुसार सरासरी २४० कोटी रुपये जनतेने एका वर्षात दिल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक भ्रष्टाचार पोलीस खात्यात आढळून आला. त्या खालोखाल वाहतूक विभाग आणि नवीन बांधकामाच्या अनुमती देणार्‍या महापालिका यांचा क्रमांक लागतो.

बनावट नोटाप्रकरणी प्रमुख हस्तकाला अटक !

बनावट नोटा चलनात आणून देशाची अर्थव्यवस्था पोखरणार्‍या
उत्तरदायिंना कठोर शिक्षा करून आजन्म कारागृहात टाका !
      नवी देहली - बनावट नोटाप्रकरणी अन्वेषण करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) अधिकार्‍यांनी उत्तमकुमार सिन्हा याच्या अटकेपाठोपाठ या प्रकरणातील प्रमुख हस्तक पुरुषोत्तम केसरी याला सुरत शहरातून अटक केली.
     १० लक्ष रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करत आहेत. वरील दोघेही आरोपी बनावट नोटा प्रसारात आणण्याच्या बंगालमधील मुर्शीदाबाद येथील कटात सहभागी आहेत. पाकिस्तानमध्ये छापण्यात आलेल्या या बनावट नोटा बांगलादेशमार्गे भारतात आणण्यात येतात. नंतर त्या विविध हस्तकांमार्फत देशाच्या अन्य भागांत पाठवण्यात येतात.

देशद्रोहाविषयीचे वादग्रस्त परिपत्रक रहित करणार ! - मुख्यमंत्री

मुंबई - शासन किंवा लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका केल्यास देशद्रोहाचा खटला भरण्याविषयीचे वादग्रस्त ठरलेले परिपत्रक रहित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २३ ऑक्टोबरला एका कार्यक्रमात केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले,
१. अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य हे आम्हाला मान्यच आहे. आधीच्या शासनाच्या कार्यकाळात तत्कालीन महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या परिपत्रकाचा मसुदा सिद्ध करून त्याचे मराठीत भाषांतर करतांना चुका झाल्या आणि त्यातून वाद निर्माण झाला.
२. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशद्रोहाचे प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्र असते आणि त्याचा त्या दृष्टीने विचार करावा लागतो.

(म्हणे) याकूब मेमन शहीद !

कल्याण-डोंबिवली येथे एम्आयएम्कडून विखारी प्रचार
राष्ट्रद्रोह्यांचे उदात्तीकरण करणार्‍या एम्आयएम् पक्षासारख्या विकृतीला भाजप शासनाने वेळीच आवर घालावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
ठाणे - कल्याण-डोंबिवलीमध्ये महानगरपालिका निवडणुकीत एम्आयएम्कडून उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आतंकवादी याकूब मेमन शहीद असल्याचे प्रचारात सांगण्यात येत आहे. ४०-५० लोकांना एकत्र करून एम्आयएम्चे कार्यकर्ते हा प्रचार करत आहेत.
एम्आयएम्च्या उमेदवारांपैकी शकीला बानो आणि रमीज मजीद यांच्या प्रचारासाठी एम्आयएम्चे नेते जावेद डॉन २१ ऑक्टोबर या दिवशी कल्याणमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी आतंकवादी याकूबचा उल्लेख शहीद असा करून मतदान करण्याचे आवाहन मुसलमानांना केले. याकूब मेमन मुसलमानांसाठी शहीद झाला, हे लक्षात ठेवा आणि एम्आयएम्ला मते द्या, असे डॉन म्हणाले. याप्रकरणी डॉन यांच्यावर आचारसंहिताभंगाचा, तसेच दोन समाजांत तेढ निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आसाममधील काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ यांची हिंदु धर्मात घरवापसी

     गोहत्ती (आसाम) - राज्यातील काँग्रेसच्या ३६ वर्षीय आमदार रुमी नाथ यांनी बोर्खोला येथील श्री लोकनाथ बाबा मंदिरात झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करून घरवापसी केली आहे. वाहनचोर्‍या प्रकरणी प्रमुख सूत्रधार म्हणून गाजलेले अनिल चौहान यांच्याशी त्यांचा संबंध असल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी त्यांच्या प्रथम पतीला घटस्फोट न देता फेसबूक वरील मित्र जॅकी जाकीर या धर्मांधाशी विवाह केला. तत्पूर्वी मुस्लिम धर्मही स्वीकारला होता. या विवाहावरून २०० जणांच्या जमावाने या दोघांना जुलै २०१२ मध्ये मारहाण केली होती.

हवाई दलाच्या लढाऊ पथकात महिलांचा समावेश करण्यास मान्यता

     नवी देहली - हवाई दलाच्या लढाऊ पथकात महिलांचा समावेश करण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जून २०१६ मध्ये महिलांची पहिली तुकडी हवाई दलाच्या लढाऊ पथकात दाखल होणार आहे. एअर फोर्स अ‍ॅकॅडमीत सध्या प्रशिक्षण घेणार्‍या महिलांमधूनच महिला फायटर पायलट्सची निवड केली जाईल. त्यानंतर एक वर्ष अद्ययावत प्रशिक्षण देऊन वर्ष २०१७ मध्ये त्यांना लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश दिला जाईल.

मौलानाकडून महिलांशी अश्‍लील चाळे, गुन्हा दाखल

    सिमला (हिमाचल प्रदेश) - सिमनौर जिल्ह्यात मिस्रवाला या मदरशाचा संचालक कबरूद्दीन फरहना या मौलानाने उपचारासाठी आलेल्या महिलांशी अश्‍लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी एका पीडित महिलेने मौलानाच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदी आणण्याच्या मागणीचा निषेध ! - मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी

श्री. मिलिंद एकबोटे
प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे पाठिंबा दर्शवल्याविषयी मिलिंद एकबोटे यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून आभार व्यक्त !
पुणे - समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी पत्र पाठवून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना पाठिंबा दर्शवल आहे. या पत्रात श्री. एकबोटे यांनी नमूद केले आहे की, आध्यात्मिक आणि धार्मिक विषयांच्या संदर्भात जनतेला उत्कृष्ठ मार्गदर्शन करणार्‍या या संस्था आहेत. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याचे अत्यंत अनमोल कार्य या दोन्ही संस्थांनी आजपर्यंत मनोभावे केले आहे. हिंदु समाजात या दोन्ही संस्थांविषयी आदराची भूमिका आहे, यात शंका नाही. अपप्रचारामुळे आणि गैरसमजामुळे या दोन्ही संस्थांवर बंदी आणण्याची मागणी काही सामाजिक घटक पुढे रेटत आहेत; परंतु अशी मागणी करणार्‍यांचे हात अजिबात स्वच्छ नाहीत.

कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे श्री दुर्गादेवीच्या मिरवणुकीवर धर्मांधाकडून गोळीबार

  • एक हिंदु ठार, तर एक गंभीर घायाळ
  • संतप्त जमावाकडून जाळपोळ
  • शहरात संचारबंदी लागू
  • ४ जणांना अटक
उत्तरप्रदेशात शासन अस्तित्वात आहे का ? हिंदुद्वेषी समाजवादी
पक्षाच्या हाती सत्ता दिल्याची शिक्षाच आज हिंदूंना भोगावी लागत आहे !
कानपूर - उत्तरप्रदेशातील कन्नौज येथे दुर्गापूजेची मिरवणूक चालू असतांना या मिरवणुकीवर एका धर्मांधाने गोळीबार केला. या गोळीबारात एक हिंदु ठार झाला असून दुसरा गंभीर घायाळ झाला आहे. या घटनेमुळे शहरात दंगल उसळून अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले. गोळीबार करणार्‍या धर्मांधास अटक करण्यात आली आहे. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून स्थिती तणावपूर्ण आहे.
१. शहरात २३ ऑक्टोबरला परंपरागत दुर्गादेवीची मिरवणूक निघाली होती. त्या वेळी उधळण्यात आलेला थोडा रंग एका मुसलमान युवकाच्या अंगावर उडाला. तेथून कुरबुरीला प्रारंभ झाला.
२. त्यानंतर त्वरित धर्मांधांचा एक जमाव एकत्र येऊन त्यांनी वाद घालण्यास प्रारंभ केला. तेवढ्यात शेजारील उंच इमारतीवरून अक्रम नावाच्या धर्मांधाने हिंदूंवर गोळीबार केला.
३. या गोळीबारात रस्त्यावर बाजूला उभे असलेले महेश कुशवाहा आणि अपूर्व गुप्ता घायाळ झाले. कुशवाहा यांना रुग्णालयात नेतांना त्यांचे निधन झाले, तर अपूर्व गुप्ता गंभीर घायाळ झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ठाणे येथील जाहीर जनसंवाद सभेतील अन्य मान्यवरांचे विचार

 रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमासारखी पवित्र वास्तू पहाण्याची उपस्थितांना विनंती
जाहीर जनसंवाद सभेचा उद्देश
      कॉ. पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकाला संशयित म्हणून अटक केल्यावर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, संत-महंत, हिंदुत्ववादी संघटना यांनी सनातनला जाहीर पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनीही पुढाकार घेत सनातनच्या पाठीशी उभे रहात हिंदुत्वविरोधकांचे तोंड बंद केले. या काळात तथाकथित पुरोगाम्यांकडून बेछूट आणि विद्वेषी आरोप करत सनातन संस्थेवर बंदीची मागणीही करण्यात आली. या खोट्या आरोपांमागील वस्तुस्थिती समाजाला कळावी, या हेतूने येथे जाहीर जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई महापौरांना पत्राद्वारे धमकी

मुंबईनंतर आता नवी मुंबईवरही अराजकाची टांगती तलवार !
वाशी, नेरुळ, रबाळे, ऐरोली रेल्वेस्थानक आणि कोकण भवन उडवून देणार !
     नवी मुंबई - येथील मार्गावरील वाशी, नेरुळ, रबाळे, ऐरोली रेल्वेस्थानकांसह मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे सीबीडी येथील कोकण भवन उडवून देण्याची धमकी एका पत्राद्वारे नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांना देण्यात आली आहे. या पत्रानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणी, तसेच संबंधित रेल्वेस्थानकांचे व्यवस्थापक अन् रेल्वे पोलीस यांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. (एखादे धमकीचे पत्र मिळाल्यावर सतर्क रहाण्यापेक्षा आधीपासूनच ती बाळगल्यास अशा धमक्या येणारच नाहीत ! - संपादक)

मुडब्रिदी येथील हिंदु तरुणाच्या हत्येविषयी कोणीच बोलत नाही ! - पेजावर मठाधीश श्री १०८ श्री विश्‍वेश्‍वरतीर्थ स्वामीजी

श्री विश्‍वेश्‍वरतीर्थ स्वामीजी
निधर्मीतेचा उदोउदो करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
      बेळगाव - दादरी हत्याकांडाची व्यापक चर्चा आणि प्रचार होत आहे; मात्र मुडबिद्री येथे झालेल्या हिंदु तरुणाच्या हत्येविषयी कोणीच बोलत नाहीत. दादरी हत्याकांड जसे निषेधार्ह आहे, त्याचप्रमाणे मुडबिद्री येथील हत्या प्रकरणही निषेधार्हच आहे, असे परखड मत उडुपी श्रीकृष्ण मठाचे पेजावर मठाधीश श्री १०८ श्री विश्‍वेश्‍वरतीर्थ स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. २० ऑक्टोबर या दिवशी टिळकवाडी येथील आर्पीडी महाविद्यालयासमोरील श्रीकृष्ण मठ येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा शासकीय कर्मचार्र्‍यांकडून नृत्याच्या कार्यक्रमासाठी वापर

मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा अपवार करणार्‍यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
माहिती अधिकारातून वास्तव उघड
      मुंबई - माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील पैसे १५ शासकीय कर्मचार्‍यांनी बँकॉक येथील नृत्याच्या कार्यक्रमासाठी वापरल्याचे समोर आले आहे. राज्यात एखादी आपत्तीजनक परिस्थिती ओढवली, तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पैसे साहाय्य म्हणून दिले जातात.
     माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्राच्या आधारे मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून बँकॉक येथील नृत्यासाठी ८ लाखांची नियमबाह्य खैरात १५ शासकीय कर्मचार्‍यांनी केल्याची माहिती समोर आणली. हा आठ लाखांचा निधी परत घेण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केले ! - ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना श्री. पांडुरंग बलकवडे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीची सांगता
    बेळगाव, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - ज्या ज्या वेळेस क्षात्रतेजाचा समाजाला विसर पडला, त्या त्या वेळेस देश दास्यत्वात गेला. ज्या देशात सोन्याचा धूर निघत होता, तेथे विपत्ती आली, अशा त्या परचक्राविरुद्ध ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष चालू केला. त्यानंतर स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आदर्श चारित्र्यातून सर्वांना प्रेरणा दिली. या प्रेरणेतूनच धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासह पेशवे आणि अनेक स्वातंत्र्यवीरांनी इतिहास निर्माण केला. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज हे राष्ट्रीय महामंत्र असून या महामंत्राचा जप करत पुन्हा एकदा आपण इतिहास निर्माण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग शास्त्री बलकवडे यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीची सांगता धर्मवीर संभाजी चौक येथे २२ ऑक्टोबर या दिवशी झाली. त्या वेळी त्यांनी धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.

नाचगाणे छठ पूजेचा भाग असू शकत नाही ! - उच्च न्यायालय

धर्मशिक्षण नसल्यामुळेच आज हिंदूंकडून त्यांचे सण, उत्सव आणि प्रथा परंपरांचे 
बाजारीकरण होत आहे. त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण देऊन संस्कारित करणे अत्यावश्यक आहे !
      मुंबई - छठ पूजेत धार्मिक अनुष्ठानांची जागा नाचगाण्यांनी घेतल्याविषयी खेद व्यक्त करत उच्च न्यायालयाने एका छठ पूजा आयोजकांची याचिका फेटाळून लावली आहे. या आयोजकांनी छठ पूजेसाठी कलाकारांना निमंत्रित करण्यासाठी न्यायालयाकडे अनुमती मागितली होती. मन रंगलो नाम या सांस्कृतिक संस्थेने जुहू समुद्र किनार्‍यावर साजरा होणार्‍या छठ पूजेसाठी कलाकारांना निमंत्रित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस्.सी. धर्माधिकारी आणि न्या. बी.पी. कोलाबवाला यांनी याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले.

योग शिकवणार्‍या धर्मादाय संस्था सेवाकरातून मुक्त !

       मुंबई - धर्मादाय न्यासाच्या (चॅरिटेबल ट्रस्ट) माध्यमातून योगाशी संबंधित अभ्यासक्रम करण्यात येत असतील, तर त्यांना सेवा कर भरावा लागणार नाही, असे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्सने अधिसूचनेच्या माध्यमातून जाहीर केले आहे. यामुळे या संस्थांना १४ टक्के असलेल्या सेवाकरातून मुक्ती मिळाली आहे. याविषयीची घोषणा २०१५ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. केंद्रीय बोर्डाने २१ ऑक्टोबर या दिवशी हे पत्रक काढले आहे.
    धर्मादाय संस्थांमध्ये धार्मिक आणि आत्मिक उन्नतीच्या प्रगतीसाठी कार्य केले जाते. योगा हे धर्मादाय कृत्य असल्याचे गृहित धरण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या हेल्थ आणि फिटनेस इन्स्टिट्यूट धर्मादाय संस्था म्हणून नोंद नाहीत, त्यांना योगा शिकवण्यावर करसवलत मिळणार नाही.

पुणे येथे १० टन गोमांस नेणारा ट्रक हिंदुत्ववाद्यांनी पकडला !

भाजप शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर कार्यवाही करावी, ही अपेक्षा !
धर्मांध ट्रकचालक अटकेत
जे पोलिसांनी करायला हवे, ते हिंदुत्ववाद्यांना का करावे लागते ?
     पुणे, २४ ऑक्टोबर - कर्नाटकातील गुलबर्गा येथून मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारा एक ट्रक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कात्रज-देहू मार्गावर पकडून पोलिसांच्या कह्यात दिला. या ट्रकमध्ये १० टन गोमांस आढळले असून ट्रकचालक मोहमद आरिफ अब्दुल गनी याला पोलिसांनी अटक केली आहे. (अशा धर्मांधांना कठोर शासन झाल्याविना या घटनांना आळा बसणार नाही ! - संपादक) या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून न्यायालयानेही हे मांस नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
१. येथील कात्रज-देहू बाह्यवळण रस्त्यावरील नवले पुलाजवळ एका ट्रकमधून मांसाचे तुकडे रस्त्यावर पडत होते. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ आणि समस्त हिंदू आघाडी यांच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ ट्रकचा पाठलाग करून तो अडवला.

सणांचे पावित्र्य आणि शुद्धता राखली जावी ! - उच्च न्यायालयाचे आवाहन

हे उच्च न्यायालयाला का सांगावे लागते ?
      मुंबई - सध्या सणाचे पावित्र्य उरलेले नाही. चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांना आणून त्यांना नाचगाणे करायला लावणे, ध्वनीवर्धक लावणे याiमुळे अलीकडे सणांचे इव्हेंटीकरण होत आहे. ते थांबवले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले. काँग्रेसचे प्रवक्ते संजय निरुपम यांच्या भारती फ्रंट या छट पूजा साजरा करणार्‍या मंडळाला जिल्हाधिकार्‍यांनी यंदा अनुमती नाकारल्याने मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या.एस्.सी. धर्माधिकारी आणि न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. त्या वेळी त्यांनी वरील मत नोंदवले.

शीव येथे गच्चीवरील जुगार क्लबवर छापा, क्लबच्या धर्मांध मालकासह ७५ जणांना अटक

    मुंबई - सायन कोळीवाडा येथील म्हाडाच्या एका इमारतीच्या गच्चीवर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळत असलेल्या ७५ जणांना अटक केली. त्यांच्याकडे एक लक्ष ६१ सहस्र रुपयांची रोख रक्कम आणि ७२ भ्रमणध्वनी जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडून पळापळ झाली. गेल्या काही महिन्यांतील महानगरातील ही मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
१. म्हाडाच्या सहा क्रमांकाच्या इमारतीच्या गच्चीवर गेल्या काही दिवसांपासून रोज रात्री जुगार क्लब चालविला जात असल्याची माहिती समाजसेवा शाखा पोलिसांना मिळाली.

कामशेत (जिल्हा पुणे) येथील श्री खंडोबा मंदिरातील चांदीचे मुखवटे चोरीला !

राज्यातील असुरक्षित मंदिरे !
     कामशेत, २४ ऑक्टोबर - मावळ तालुक्यातील कामशेतजवळ असलेल्या कडधे गावाचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचे मंदिर आहे. तेथे श्री खंडोबा, श्री म्हाळसादेवी, श्री बानुबाईदेवी आणि द्वारपाल यांच्या मूर्तीवर चांदीचे मुखवटे होते. हे सव्वा किलो चांदीचे मुखवटे २२ ऑक्टोबर या दिवशी पहाटे चोरीला गेले आहेत. अज्ञात चोरांनी लोखंडी जाळीचा कोयंडा उचकटून गाभार्‍यात प्रवेश केला आणि मुखवटे चोरले. या प्रकरणी तक्रारही प्रविष्ट करण्यात आली आहे.

पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याची शिवसेनेची भूमिका योग्यच ! - अभिनेता शरद पोंक्षे

महापालिका निवडणुका २०१५
      कोल्हापूर, २४ ऑक्टोबर (वार्ता.) - देशातील नामवंत गायक असलेल्या लता मंगेशकर, अभिनेता अमिताभ बच्चन यांसह साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील एकही कलावंत आणि दिग्गज यांना पाकिस्तानात आजपर्यंत बोलावण्यात आलेले नाही. एकीकडे सीमेवर रक्षण करणार्‍या आमच्या सैनिकांवर गोळ्या झाडायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानी गायक आणि कलाकार यांनी भारतात येऊन राग आळवायचा, हे कदापी सहन केले जाणार नाही. शिवसेनेची भूमिका प्रखर असली, तरी ती योग्य आहे, असे प्रतिपादन अभिनेता श्री. शरद पोंक्षे यांनी केले. २३ ऑक्टोबर या दिवशी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राजारामपुरीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना शहरप्रमुख सर्वश्री दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

या देशात हिंदूंना त्यांचे सण-उत्सव
आनंदात आणि शांततेत कधी साजरे करता येतील का ?
    उत्तरप्रदेशातील कन्नौज येथे दुर्गापूजेच्या मिरवणुकीवर एका धर्मांधाने गोळीबार केला. या गोळीबारात एक हिंदु ठार झाला असून दुसरा गंभीर घायाळ झाला आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Uttarpradeshke Kannouj me Durga murti visarjan yatrapar
dharmandhase golibari, 1 hinduki Mrutyu aur 1 ghayal.
    yah Bharat hai ya Pakistan ?
जागो !
    उत्तरप्रदेशके कन्नौज में दुर्गा मूर्ति विसर्जन यात्रा पर
धर्मांधसे गोलीबारी, १ हिंदु की मृत्यु और १ घायल.
    यह भारत है या पाकिस्तान ?

गोवंशहत्या बंदीच्या कायद्याच्या निषेधार्थ धर्मांधाने केलेल्या चाकू आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस बलाचे ३ सैनिक घायाळ

धर्मांधांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलणे अपेक्षित आहे !
      यवतमाळ - शासनाने लागू केलेल्या गोवंशहत्या बंदीच्या कायद्याच्या निषेधार्थ धर्मांध अब्दुल मलिक (वय २० वर्षे) याने केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआर्पीएफ्च्या) ३ सैनिकांवर चाकूने आक्रमण केले. यात ३ सैनिक गंभीररित्या घायाळ झाले आहेत. (धर्मांधांच्या उद्दामपणावर वचक आणण्यासाठी पोलिसांनी कृतीशील व्हावे. - संपादक) अब्दुलला पोलिसांनी अटक केली असून त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
१. धर्मांध अब्दुल मशिदीत जायचा. तेथील मौलवींनी त्याच्या मनात भारतविरोधी कारवायांचे विष पेरले. मौलवी त्याला आतंकवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवणार असल्याचे त्याने सांगितले. या मौलवीचा पोलीस शोध घेत आहेत. (मौलवींचा भारतद्वेष ! - संपादक)

हे आपल्याला माहीत आहे का ?

    आपल्या देशात हिंदूंसाठी वेगळे आणि अल्पसंख्यांकांसाठी हिंदूंसाठी वेगळे, असे दोन प्रकारचे कायदे कार्यरत आहेत. (संदर्भ : जनजागृती महाअभियान क्यों ?, लेखक ब्रह्मर्षि विश्वाेत्मा बावरा महाराज)      

'पूर्व बंगाल (आताचा बांगलादेश) मधे जे काही झाले, ते पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या निघृण, भयावह आणि लज्जास्पद दुष्कृत्यांच्या तुलनेत काहीच नाही.' - डॉ. डॅनियल मॉनिहान ('युनायटेड नेशन'चे अमेरिकेचे प्रतिनिधी)  

प्रतिष्ठित पक्षकाराकडून पैसे मिळण्यासाठी एका अधिवक्त्याने केलेली क्लृप्ती !

अधिवक्ता रामदास केसरकर
'एका जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात एका दाव्यातील तडजोडीनंतर वादीने प्रतिवादीला ठराविक रक्कम धनादेशाने देण्याचे ठरले. तो धनादेश स्वीकारण्यासाठी प्रतिवादी न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही, 'तरी देय रकमेचा धनादेश स्वतःच्या नावाने काढावा', अशी विनंती प्रतिवादीच्या अधिवक्त्याने वादीच्या अधिवक्त्यांना लेखी पत्राद्वारे केली. 'देय रकमेचा प्रतिवादीच्या नावाने काढलेला धनादेश आपण त्यांचे अधिवक्ता या नात्याने स्वीकारू शकता, असे असतांना आपण तो स्वतःच्या नावाने काढा, अशी विनंती का करत आहात ?', असे वादीच्या अधिवक्त्यांनी प्रतिवादीच्या अधिवक्त्यांना विचारले. यावर प्रतिवादीचे अधिवक्ता म्हणाले, "अहो, माझे पक्षकार प्रतिष्ठित असल्याने मी या दाव्यासाठी त्यांचे वकीलपत्र घेतले. त्यांच्याकडून मला एक पैसाही सेवाशुल्क मिळाले नाही; म्हणून मी 'माझ्या नावाने धनादेश द्या', अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली आहे.'
- अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार (१२.८.२०१५)  


एका वाचकाने महाविद्यालयात २ वर्षे हेलपाटे घालूनही न मिळणारी प्रवेशप्रक्रियेची कागदपत्रे श्री कुलदेवी आणि दत्त यांना प्रार्थना केल्यावर लगेच मिळणे

१. एका साधकाने दैनिक सनातन प्रभातच्या एका वाचकाला गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त अर्पण करण्याचे महत्त्व सांगणे अन् त्यावर वाचकाने दोन वर्षे हेलपाटे घालूनही महाविद्यालयातून प्रवेशप्रक्रियेसंबंधी 'कागदपत्रे मिळत नाहीत,अशी समस्या मोकळेपणाने साधकाला सांगणे'
    मी दैनिक सनातन प्रभातच्या एका वाचकाकडे संपर्कासाठी गेेलो आणि त्यांना गुरुपौर्णिमा महोत्सवाविषयी महत्त्व सांगितले. त्या वेळी त्या वाचक म्हणाल्या, माझा मुलगा रुग्णाईत असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेला गेला नाही. नंतर मी मुलाची प्रवेशप्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे मागितल्यावर महाविद्यालयातील कारकुनाने सांगितले की, तुमचा मुलगा परीक्षेला न बसल्याने महाविद्यालयाला अनुमाने ३५ सहस्र रुपयांचे शासकीय अनुदान मिळाले नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला तेवढी रक्कम दिल्यावरच त्याची कागदपत्रे आम्ही देऊ. (महाविद्यालयांत भ्रष्टाचार कसा चालतो, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. - संपादक) त्यानंतर पुढे २ वर्षे हेलपाटे घालूनसुद्धा महाविद्यालयातील कर्मचारी आम्हाला ती कागदपत्रे देत नाहीत.
    (वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांची अडवणूक करणारे कार्यालयीन कर्मचारी असणारे महाविद्यालय विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण देत असेल, याचा विचार न केलेला बरा ! - संपादक)

शौर्य, धैर्य, त्याग आणि पराक्रम या सद्गुणांचे संदर्भच बदलल्याने आज भ्रष्टाचार, काळा बाजार करणारे लोक देशभक्त ठरले आहेत !

    देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊनही त्या स्वातंत्र्यासाठी आत्मयज्ञ करणार्यां या महान मृत्यूंजयांचा, स्वा. सावरकरांचा गौरव करण्याची इच्छा आजच्या नतद्रष्ट, भ्रष्टाचारी आणि अनीतीमान राज्यकर्त्यांना होत नाही, ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे किंबहुना या हुतात्म्यांच्या क्रांतीकार्याकडे बघण्याची आजच्या राज्यकर्त्यांची दृष्टी इतकी कोती आणि कृतघ्नपणाची आहे की, ती पाहून कोणाही स्वातंत्र्यभक्ताचा संताप अनावर झाल्यावाचून रहाणार नाही. किंबहुना 'रक्ताचा थेंब न सांडता आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले', असा दावा करण्यापर्यंत या उन्मत्त काँग्रेस सत्ताधार्यांची मजल गेली होती. सत्य आणि नीती यांची विटंबना झाली आहे आणि अनैसर्गिक तत्त्वज्ञानाचा राजकारणावर पगडा बसला आहे. स्वातंत्र्य मिळून आज ६७ वर्षे झाली; पण राष्ट्रीय जीवनाचा जो झपाट्याने अधःपात झालेला दिसतो तो याचमुळे ! शौर्य, धैर्य, त्याग आणि पराक्रम या सद्गुणांचे संदर्भच बदलले आहेत.
    स्वराज्यात अधिकाराचा भ्रष्टाचार, काळा बाजार करणारे लोक आज देशभक्त ठरावेत अन् मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आत्यंतिक त्याग करणारे, सर्वस्व देणारे मृत्यूंजय, हुतात्मे, देशद्रोही समजले जावेत, यापेक्षा राष्ट्रीय जीवनाचा अधिक अधःपात होणे शक्य आहे का ? - श्री. शंकर द. गोखले (स्वातंत्र्यवीर, दिवाळी विशेषांक २००८)

संपूर्ण जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये, यासाठी स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता संकटात उडी घेणारे शूर लढवय्ये साधक श्री. नितीन सहकारी !

आजारपणातही साध्नारत राहून 
मनाची स्थिरता  अनुभवणे
आजारपणातही मनाची 
असलेली आनंदावस्था 
मी नोकरीच्या निमित्ताने जहाजावर होतो. श्रीरामनवमीच्या (२८.३.२०१५) दिवशी सुमारे १२० - १३० डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या इंधन गळतीमुळे झालेल्या अपघातात माझे दोन्ही पाय भाजले. पाय भाजल्यामुळे मला त्वरित रुग्णालयात भरती करून उपचार करणे आवश्यक होते. त्या वेळी अनेक अडचणी आल्या; पण ईश्वराच्या अखंड कृपेमुळे हे मोठे दुःख सोसता आले. 
पुढे येणार्या आपत्काळात लाखो जणांना भाजल्यामुळे जखमा होऊन असह्य वेदना होतील. त्या प्रसंगाला तोंड कसे द्यायचे, याचे आदर्श उदाहरण श्री. नितीन सहकारी यांनी सर्वांपुढे ठेवले आहे. त्यांच्याप्रमाणे साधना केली, तरच 'जीव गेला, तर बरं', असा विचार न येता वेदना सहन करता येतील आणि साधनेतही प्रगती होईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.८.२०१५)   आजारपणातही मनाची असलेली आनंदावस्था
आजारपणात साधनारत राहून मनाची स्थिरता अनुभवणे
    २२ ऑक्टोबरच्या अंकात आपण अपघाताची पूर्वपीठिका आणि अन्य घटनाक्रम पाहिला. आज आपण या जिवावर बेतलेल्या प्रसंगावर श्रीकृष्णावरील उत्कट श्रद्धेच्या बळावर कशी मात करता आली, हे पहाणार आहोत.

प्रमुख अभियंता म्हणून जहाजावरील नोकरी करतांना गुणसंवर्धनासाठी केलेले प्रयत्न आणि त्यामुळे झालेले पालट

१. कामकाजाशी संबंधित इतर विभागांच्या लहान समस्यांचाही अभ्यास केल्याने दायित्व घेणे या गुणाची वृद्धी होणे : कामकाज करतांना मी विभाग स्तरावर, तसेच आमच्या विभागाशी संबंधित अशा अन्य गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे माझ्यात दायित्व घेणे, छोट्या-छोट्या गोष्टींचा अभ्यास करणे या गुणांची वृद्धी होण्यास साहाय्य झाले. या आधी मी आमच्या विभागातील लहान लहान गोष्टींत लक्ष घालत नसे.
२. उल्लेखनीय गोष्टींचे कौतुक करून कर्मचार्यांना प्रोत्साहन देणे : आमच्या, तसेच दुसर्याे विभागातील कर्मचार्यां नी त्यांच्या कामात केलेल्या उल्लेखनीय गोष्टींसाठी, तसेच लहानातील लहान प्रयत्नासाठी मी संबंधितांना मनमोकळेपणे दाद देऊन प्रोत्साहन देऊ लागलो. याचा चांगला परिणाम म्हणजे त्यांचा कामातील उत्साह आणि आत्मविश्वा स वाढला अन् माझ्यात प्रीती या गुणाची वृद्धी होण्यास साहाय्य झाले.

भारताच्या जीवनग्रंथाचा विषयच धर्म असल्याने भारत संपूर्ण जगासमोर आदर्श आहे !

    राजकीय थोरपण किंवा सैनिकीशक्ती आमच्या समाजाचे ध्येय नव्हते, पूर्वी कधीही नव्हते आणि यापुढे ते कधीही असणार नाही. आपल्याला असे दिसते की, भारतीय वंशातील लोक श्रीमंतीच्या पाठीमागे कधीच नव्हते, जरी त्यांनी भरपूर श्रीमंती मिळवली तरीही ! दुसर्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या सीमा ओलांडल्या नाहीत. आपल्या चतुःसीमांच्या आत ते अगदी समाधानी होते; म्हणून त्यांनी दुसर्या कोणाशीही युद्ध केले नाही. तेव्हा पैसा आणि सत्ता या वंशातील लोकांचे कधीही आदर्श नव्हते.
    पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील वंशांतील लोकांत मी भटकलो. जगभर प्रवास केला. प्रत्येक ठिकाणी राष्ट्रांसमोर एक आदर्श आहे. 'हा आदर्श म्हणजे त्यांचा कणा आहे', हे मी पाहिले. त्यांपैकी काहींसाठी राजकारण, अन्य दुसर्‍यांसाठी सामाजिक संस्कृती, काहींना बौद्धिक संस्कृती इत्यादी पार्श्वभूमी असते; पण आमच्या या मातृभूमीसाठी धर्म आणि धर्मच तिचा पाया, तिचा कणा, तिचा आधार आहे. या पायावरच त्याच्या जीवनाची इमारत उभी आहे.
    हा भारताच्या जीवनग्रंथाचा विषय आहे. हेच या अमरगीतांचे धृपद आहे. त्याच्या अस्तित्वाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या जीवनाचा आधार आहे. त्याच्या अस्तित्वाचा हेतू आहे. मानवी वंशाचे आध्यात्मिकरण करणे, यासंदर्भात या राष्ट्राचा जीवनप्रवाह कधीही पालटला नाही.
- श्री. राजाभाऊ जोशी (मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८)

भारतनिष्ठा हा सार्‍याच पक्षांचा मानबिंदू असायला हवा !

     भारत आणि भारतनिष्ठा हा सार्‍याच पक्षांनी परम पवित्र असा मानबिंदू मानावयास हवा होता. भारतमातेच्या रक्ताने रंगलेले हात कुठल्याही प्रलोभनासाठी कुणीही हातात घ्यावयास नको होते; पण प्रत्यक्षात मात्र काही विपरीत घडले. देशहितापेक्षा पुन्हा एकदा पक्षहित महत्त्वाचे मानले गेले. राष्ट्रीय स्वार्थापेक्षा वैयक्तिक स्वार्थ वरचढ झाले. सत्तापिपासेला पुन्हा एकदा सत्त्वाचा बळी दिला गेला. मुसलमान जातवेडाच्या मनधरणीचा तोच जुना खेळ नव्या भयानकतेने रंगू लागला. अनेक पक्षोपपक्षात विभागली गेलेली बहुसंख्या संघटित अल्पसंख्यांकांची आराधना करू लागली. राष्ट्रीय प्रकोपाच्या नैसर्गिक अपेक्षेने दबलेले जातवेडे पुन्हा शिरजोर बनले. सत्तेचा तराजू ते तोलू लागले. जयापजयाचे पारडे ते फिरवू लागले. बहुसंख्येतील अनंत कलह आणि मतभेद यांचा लाभ ते घेऊ लागले. (साप्ताहिक राष्ट्रपर्व, ५.४.२०१० - संदर्भ : वाघनखे - पु.भा. भावे जन्मशताब्दी वर्ष २००९-२०१०)

पाकिस्तानातील हिंदूंची भयावह स्थिती !

१. इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपच्या अभ्यासगटाने
सांगितलेली पाकस्थित हिंदूंची परिस्थिती
     पाकिस्तानातील हिंदूंची नेमकी परिस्थिती काय आहे, याविषयी मिशेल बूमगार्ड आणि अ‍ॅमी पेट यांनी इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपसाठी एक अहवाल सिद्ध केला आहे.
अ. पाकिस्तानातील लोकसंख्येच्या दृष्टीने हिंदूंची संख्या केवळ दोन टक्के आहे आणि हिंदूंची लोकवस्ती मुख्यत: सिंध प्रांतात आहे.
आ. हिंदू मुख्यतः ग्रामीण भागात दारिद्य्ररेषेखाली जगत आहेत. त्यांपैकी अनेक जण चक्क वेठबिगार (बळजोरीने कामास लावलेले) आहेत.
इ. पाकिस्तानच्या राजकारणात आणि अर्थकारणात हिंदूंना कोणतेही महत्त्वाचे स्थान नाही.
ई. हिंदूंच्या देवळांवर वारंवार आक्रमणे केली जातात.
उ. पाकिस्तानचे शासन हिंदूंकडे सदैव ते जणू काही भारताचे हस्तक आहेत, अशा दृष्टीने पहात असते.
ऊ. राजकीयदृष्ट्या हिंदू संघटित नाहीत आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांचा कोणताही राजकीय पक्ष नाही.

खालील लिखाण रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

अशा चित्रीकरणात पोलिसांनी वेळ घालवणे कितपत योग्य ?
     १८ ऑक्टोबर २०१५ या दिवशी सनातन संस्थेच्या संभाव्य बंदीच्या विरोधात विविध हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक संघटना यांसह भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याच्या शेवटी पोलिसांनी मोर्च्याचे चित्रीकरण केले. 
------
     तोंडावर शाई उडवली तर एवढे चिडता, मग सीमेवर आमच्या सैनिकांचे रक्त पाहून तुम्हाला चीड येत नाही का ! - खासदार श्री. संजय राऊत, संपादक, सामना (१३.१०.२०१५)

गांधीवादामुळे गमावलेला स्वाभिमान भारताला सावरकरवादानेच परत मिळेल !

     देशातील समस्यांचे निवारण करू शकणारे एकमेव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होते. प्रत्येक समस्येवर त्यांच्याकडे उपाययोजना सापडते. अमेरिका, युरोप खंडातील देश सावरकर जगतात; म्हणून हे देश जगात ताठ मानेने जगतात, तसेच कणखर आणि प्रगती करणारे देश म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. याउलट भारत गांधीवादी असल्याने भारताची आज दु:स्थिती झालेली आहे.
- श्री. शरद पोंक्षे, सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत

सनातन मुलींना पळवून नेते, असा तथ्यहीन आरोप करून सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती करणारे शाम मानव आणि त्यांच्या बेताल वक्तव्यांना अनाठायी प्रसिद्धी देणार्‍या वृत्तवाहिन्या यांचे बोलविते धनी कोण ?

कु. वर्षा जबडे
कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या एका साधकाला केवळ संशयित म्हणून अटक केल्यावर सनातनद्वेषाने पछाडलेली मंडळी वृत्तवाहिन्यांवरून वाटेल तशी गरळओक करू लागली. संस्थेच्या कार्याचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता हास्यास्पद वक्तव्ये करू लागली आणि वाटेल ते निराधार आरोप करून धर्मद्रोह कसा असतो, हे दाखवून देऊ लागली. याच वेळी संस्थेवर वारंवार असेही आरोप होऊ लागले, ते म्हणजे सनातन मुलींना पळवून नेते ! किंवा त्यांना घरी जाऊ दिले जात नाही, तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबियांपासून दूर केले जाते. अनेक खोट्या प्रकरणांत अडकवू पहाणार्‍यांना संस्थेच्या विरोधात हाती काहीच न मिळाल्याने त्यांनी सनातनची अपकीर्ती करायचीच, अशा उद्देशाने असा कांगावा चालू केला, हे त्यांच्या बोलण्यातून लगेचच स्पष्ट होेते. त्यामुळेच बिनबुडाचे आरोप करून ते दडपशाही करत आहेत. सनातन मुलींना पळवून नेत नसून घरातील वातावरण साधनेला पूरक नसल्याने सर्व वयोगटातील साधक-साधिका सनातनच्या आश्रयाला येत आहेत, हेच खरे सत्य आहे.

हिंदु धर्मासाठी भारताबाहेरून आर्थिक वा इतर कोणतीही मदत येणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या दृष्टीने विचार केला, तर हिंदूंना स्वबळावर उभे रहाण्याशिवाय पर्याय नाही ! (लोकजागर)मतीमंद मुसलमान मुलामधील थक्क करणारी धर्माबद्दलची कट्टरता !

     माझा भाऊ मंदबुद्धी असल्यामुळे तो तशा मुलांकरता असलेल्या विशेष शाळेत जातो. त्याच्या शाळेच्या तासांत आईही शिक्षकांना साहाय्य करते. या शाळेत एक मुस्लीम मंदबुद्धी मुलगा शिकण्यासाठी येतो. एकदा आईने त्याला शिकवायला प्रारंभ केला. आई काही लिहायला प्रारंभ करण्यापूर्वी श्री लिहिते. तसे त्या वेळीही तिने लिहिले. ते पाहून तो मुलगा एकदम तिच्यावर ओरडून म्हणाला, यह क्या है ? आईने त्याला उत्तर दिले, यह हमारा श्री है । त्यावर तो म्हणाला, इसे पोछो, यह मत लिखो ।

व्यावसायिक दृष्टीने चालवली जाणारी अन्य वृत्तपत्रे आणि समाजाला साधना करण्यास प्रवृत्त करणारे दैनिक सनातन प्रभातप.पू. परशराम माधव पांडे
- प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.१०.२०१५)

सत्संगामुळे साधनेतील प्रयत्नांविषयी सुस्पष्टता येऊ लागल्यानंतर धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून त्यांच्यातील साधकत्व, गुरुनिष्ठा अन् भाव यांचे घडलेले दर्शन !

हिंदु जनजागृती समितीने आजपावेतो १ सहस्रापेक्षा अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे यशस्वीरित्या आयोजन केले. त्यामुळे लक्षावधी लोकांना समितीचे धर्मकार्य अवगत झाले. सभेतील स्फूर्तीप्रद विचार ऐकून अनेकांच्या मनातील हिंदूतेज जागृत झाले आणि समितीच्या राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांच्या कार्यात सहभागी होण्याची उत्कंठा त्यांच्यात निर्माण झाली.
    त्यांना साधना समजावी यासाठी घेण्यात येणाऱ्या सत्संगात धर्मरक्षणाच्या निरनिराळ्या कृती करतांना कार्याची हानी होऊ नये, यासाठी त्यामध्ये झालेल्या चुकांचा अभ्यास केला जातो आणि पुन्हा या चुका होऊ नयेत, यासाठी परिणामकारक उपाययोजना कशी काढता येईल, यावर चर्चात्मक चिंतन केले जाते. त्यामुळे सर्वांनाच योग्य-अयोग्य कृती आणि त्यामुळे होणारी हानी, तसेच कार्याची फलनिष्पत्ती वाढवण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न यांची अचूक दिशा मिळत आहे. त्याचप्रमाणे अंतर्मुखता वाढून चुका होण्यामागील दोष आणि अहंचे पैलू यांचे चिंतन होऊन त्या टाळण्याची अन् स्वतःच्या अंतरात हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
    या धर्माभिमान्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नवीनच असूनही सत्संगात आत्मविश्वामसाने बोलतात, तसेच एकमेकांना साधनेत साहाय्य करतात. त्यांच्यातील प्रांजळपणा, अंतर्मुखता, शिकण्याची स्थिती, श्रीकृष्णावरील श्रद्धा, आंतरिक भाव, तसेच गुरुकार्याची तळमळ आदी उपजत गुण या सत्संगातून लक्षात येत आहेत. त्यांचे प्रगल्भ विचार अनेक वर्षांपासून साधना करणार्याल साधकांनीही अभ्यासण्यासारखे आहेत.
    काही धर्माभिमान्यांनी मांडलेले मनोगत पुढे देत आहे. भाग ३

सार्वजनिक ठिकाणी हिंदु तरुणीची धर्मांधाकडून छेड काढली जात असतांना त्याला रोखण्याची धमक उपस्थित एकही हिंदू दाखवत नाही, हे लज्जास्पद !

     १९.२.२०१४ या दिवशी सकाळी ८.३० वाजता गोव्यात भुईपाल येथून साखळी येथे बसगाडीमधून जाणार्‍या एक १९ वर्षीय हिंदु युवतीची हमीद शेख या मुसलमान युवकाने छेड काढली आणि तिचा विनयभंग केला.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहे. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत, असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. त्यात तथ्य आहे, असे क्षणभर गृहित धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत, असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत.

सनातन संस्थेचा अकारण छळ करून समाज, राष्ट्र आणि स्वधर्म यांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र झटणार्‍यांना स्वकियांनी केलेल्या विरोधाची परंपरा अबाधित राखणारे सनातनद्वेष्टे !

कु. मधुरा भोसले
जगात कोणत्याही लोकशाही राष्ट्रात समाज, राष्ट्र आणि स्वधर्म यांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र झटणार्‍यांंना स्वकियांकडून प्रखर विरोध होत नाही; परंतु विज्ञानातील प्रत्येक सिद्धांताला काही ना काही अपवाद असतात. त्याप्रमाणे या जागतिक सिद्धांतालाही अपवाद आहे. या अपवादाचे नाव आहे - भारत !
१. समाज, राष्ट्र आणि स्वधर्म यांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र झटणार्‍यांना 
स्वकियांनी केलेल्या विरोधाची काही ऐतिहासिक उदाहरणे 
१ अ. आर्य चाणक्य
१ अ १. बालपणी सोसलेल्या यमयातना आणि बालमनाची झालेली होरपळ ! : आर्य चणक (आर्य चाणक्य यांचे पिता विष्णुगुप्त) यांनी मगधचा राजा धनानंद याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आणि ते जनतेला जागृत करण्यासाठी ठिकठिकाणी भाषणे देऊ लागले. राजा धनानंदाने त्यांना देशद्रोही ठरवून सैनिकांकरवी अमानुष मारहाण केली आणि कैद केले. त्यांचा कारागृहात मृत्यू झाला. समाजाने बाल चाणक्य आणि त्याची आई यांना देशद्रोह्याचे कुटुंबीय म्हणून वाळीत टाकले. त्यांना गुरुकुलातून काढून टाकले. गावात कुणीही त्यांना भिक्षा देत नसे आणि पदोपदी देशद्रोह्याचा मुलगा म्हणून हिणवत असत. मानसिक आघात आणि उपासमार यांमुळे बाल चाणक्याच्या आईचे निधन झाले. मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील एकही मनुष्य बाल चाणक्याच्या साहाय्याला आला नाही. २ - ३ मित्रांना सोबत घेऊन त्याने मोठ्या कष्टाने आईचे अंत्यविधी पूर्ण केले. त्यानंतर गुरुकुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते मगधची राजधानी पाटलीपुत्र सोडून गांधार प्रदेशातील तक्षशीलेला निघून गेले.

सत्यान्वेषण हे ध्येय विसरलेली बाजारू प्रसारमाध्यमे !

श्री. गुरुप्रसाद
१. समाजाचा आरसा असलेल्या प्रसारमाध्यमांनी मांडलेले प्रत्येक 
सूत्र सत्यावर आधारित आहे, अशी जनतेची धारणा असणे
     विविध प्रकारची प्रसारमाध्यमे म्हणजे समाजाचा आरसा आहे. तेे मांडत असलेले प्रत्येक सूत्र आणि विचार सत्याधारित आहे, अशी समाजाची धारणा असते. समाजातील कोणत्याही घटनेचे वास्तव सत्य समाजापर्यंत पोेचवण्याचे दायित्व त्यांच्यावर आहे.
२. प्रसारमाध्यमांची आजची कार्यशैली संशयास्पद असणे
      सध्याची प्रसारमाध्यमांची कार्यशैली पहाता प्रसारमाध्यमे खरोखर समाजाचा आरसा आहेत का ?,

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

     पिढ्यानपिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये चालू होतात. त्याचे परिणाम समाज आणि राष्ट्र यांना भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत आणि विघटनकारी कृत्ये बोकाळली आहेत. भौतिक वाद पुढे येत आहे. तेव्हा नवीन पिढीवर परत सुसंस्कार करणे आवश्यक आहे.
- प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ७८)

हिंदु राष्ट्राची स्थापना !

श्री. मधुसूदन कुलकर्णी
केरळमधील तथाकथित धर्मनिरपेक्षता, हिंदूंचे धर्मांतर आणि 
साम्यवाद यांमुळे निर्माण झालेल्या प्रश्‍नांवर एकच उत्तर
      केरळ येथील कोचीन (एर्नाकुलम्) या शहरात एका सेवाकेंद्राचे बांधकाम चालू होते. तेथे ऑगस्ट २०१४ मध्ये बांधकाम सेवेसाठी जाण्याचा योग आला.
     हिंदुत्व हा या देशाचा आत्मा आहे. हिंदुत्व तर सोडाच; परंतु हिंदुस्थानात केरळ हे राज्य आहे कि नाही ?, असा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. प्रसंगही तसेच घडले. केरळ येथे साम्यवाद्यांची सत्ता आहे. त्यामुळे तेथील लोकांची हिंदुद्वेषी मानसिकता आणि तिचा भारतीय संस्कृतीवर होणारा विपरीत परिणाम हे पाहून माझे मन उद्विग्न झाले. कोचीनमध्ये लक्षात आलेले काही प्रसंग पुढे देत आहे.

प्रचलित शिक्षणपद्धतीत भारतीय दृष्टीकोनातून आमूलाग्र पालट आवश्यक !

श्री. दुर्गेश परूळकर
     आजवर शिक्षणाचे झालेले हिरवेकरण आणि त्याविषयीची सर्वमान्य होईल, अशी उपाययोजना यांवर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ लेखक, अभ्यासक आणि प्रखर हिंदुत्ववादी श्री. दुर्गेश परूळकर यांचा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. मागील लेखामध्ये आपण सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये कोणते पालट हवेत आणि मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत जशीच्या तशी वापरणे किती चुकीचे आहे, ते पाहिले. आज आपण इंग्रजी वर्ष बनवतांना कोणते गोंधळ केले आहेत आणि भारतीय कालगणना कशी परिपूर्ण आहे, ते पहाणार आहोत.

पुरोगामीपणाचे कातडे पांघरणार्‍यांनो, ईश्‍वराचा आशीवार्र्द असलेली सनातन संस्था, हीच खरी पुरोगामी आहे, हे लक्षात घ्या !

१. पानसरेंच्या हत्येनंतर ७ मासांनी (महिन्यांनी) सनातनच्या साधकाला केवळ संशयित
 म्हणून कह्यात घेतल्यावर सनातनला प्रतिगामी ठरवत तिच्यावर तुटून पडणारे पुुरोगामी!
पू. अशोक पात्रीकर
      कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि पुरोगामी नेते म्हणून प्रसिद्ध असणारे पानसरे यांची हत्या होऊन ८ मास (महिने) झाले. त्यांची हत्या निषेधार्ह आहेच. ज्या कुणी ती केली, त्याला योग्य ती शिक्षाही व्हायला हवीच; मात्र त्यांची हत्या झाल्यानंतर स्वतःला पुरोगामी म्हणवणारे ७ मास (महिने) चूप बसले. अकस्मात् सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून पोलिसांनी कह्यात घेतल्यावर सर्व पुरोगामी मंडळी सनातन संस्थेवर गिधाडाप्रमाणे तुटून पडली; कारण सनातन संस्था म्हणजे

तथाकथित चर्चासत्रांचे कि कुचर्चांचे आयोजन करून त्याद्वारे प्रसारमाध्यमांतील आतंकवादाचे दर्शन घडवणार्‍या दूरचित्रवाणीच्या काही वाहिन्या आणि त्यांचे अहंकारी निवेदक !

 
अधिवक्ता योगेश जलतारे
    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक झाली. यानंतर विविध दूरचित्रवाहिन्यांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. या चर्चासत्रांच्या संदर्भात पुढील निरीक्षण झाले.
१. बेछूट आरोप करणे
     प्रत्येक वाहिनीवर कोणतीही शहानिशा न करताच बेछूट आरोप केले जातात. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनी काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मध्येच तोडले जाते किंवा मध्यंतर घेतले जाते.
२. समोरच्याला अपमानित करणे
अ. चर्चासत्रात सहभागी झालेले विरोधक आणि निवेदक मिळून

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना

उज्जैन सिंहस्थ कुंभपर्वातील धर्मप्रसारांतर्गत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !
१. क्षिप्रा नदीतील मोक्षदायी स्नानाचा लाभ करून देणारे उज्जैन कुंभपर्व !
    २२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन येथे सिंहस्थ कुंभपर्व असणार आहे. या सिंहस्थ कुंभपर्वाच्या वेळी क्षिप्रा नदीतील स्नान मोक्षदायी असते. या पर्वाला ५ कोटी संत-महंत आणि भाविक येण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक सिंहस्थ कुंभपर्वाच्या ५ पट क्षेत्रात या कुंभपर्वाचे आयोजन होत आहे.
    १.४.२०१६ ते २८.५.२०१६ या काळात सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शन, फलक प्रदर्शन, संतसंमेलने आणि धर्मजागृतीपर चळवळी आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या सेवांमध्ये सहभागी होण्याची अमूल्य संधी साधकांना उपलब्ध आहे.

केवळ रविवारच्या दैनिक सनातन प्रभातचे वाचन करणार्‍या राष्ट्र-धर्म प्रेमी आणि जिज्ञासू वाचकांना नम्र विनंती !

राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांचा वसा घेतलेल्या दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक व्हा !
१. राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असल्याने वाचकांना
चौकस ज्ञानसंपदा उपलब्ध करून देणारे अनोखे दैनिक सनातन प्रभात !
    दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आचारधर्म, कायदा, आर्थिक उलाढाल, राजकारण आदी विषयांवरील लेख योग्य संपादकीय दृष्टीकोनासह या नियतकालिकातून प्रसिद्ध केले जातात. वाचकांच्या मनातील देशप्रेम वृद्धींगत करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघांताविषयी त्यांना अवगत करण्यासाठी हे नियतकालिक सदैव कटीबद्ध आहे.
    देवतांविषयी भावभक्ती वाढवणारी, साधनेची अपरिहार्यता सांगणारी नानाविध सदरेही यामध्ये प्रसिद्ध केली जातात.

साधकांना सूचना

   पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (२६.१०.२०१५) रात्री ९.१० वाजता
समाप्ती - आश्‍विन पौर्णिमा (२७.१०.२०१५) सायं ५.३५ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

साधकांनो, संगणकीय प्रणालींचा वापर करून समाजाला फसवणार्या आणि दिशाभूल करणार्या लोकांपासून सावधान !

सौ. जान्हवी शिंदे
१. माहितीजाळावरील चित्रांवर काम करून एका संतांच्या संदर्भातील अनुभूती असल्याचे सांगून ते चित्र सनातन संस्थेला पाठवून फसवण्याचा प्रयत्न करणे
    काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) एका संतांच्या शिष्यांंनी सनातन संस्थेच्या ई-मेलवर एक छायाचित्र त्या संतांच्या संदर्भातील अनुभूती म्हणून पाठवले होते. अनुभूती अशी होती की, एक विधी करतांना आकाशातील ढगांत त्या संतांची प्रतीकृती दिसत होती. त्या शिष्याने त्याचे छायाचित्र काढून पाठवले होते.
    काही दिवसांनी माहितीजाळावर एक चित्र शोधतांना ढगात आकृती असलेले तसेच चित्र सापडले. तेव्हा कळले की, ही अनुभूती नसून संगणकावर काम करून त्या शिष्याने संस्थेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयी त्या संतांना काहीच कल्पना नव्हती.


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक साक्षरता वाढवावी !
     भक्तीच्या माध्यमातून साधकांचा समजूतदारपणा, बुद्धीची प्रगल्भता आणि मनाची जाणीव व्यापक झाली की, परमार्थाची दारे उघडतात.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते.
मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
    मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
मोडकळीस येत असलेली कुटुंबव्यवस्था हल्ली एकत्र कुटुंब हा शब्द भूतकाळातील आणि अशक्य असा वाटतो. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात केवळ सख्खीच नाही, तर चुलत भावंडेही एकत्र रहात. काही एकत्र कुटुंबांत ४० - ५० व्यक्तीही असत. आता मात्र बर्‍याच कुटुंबांतील वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. काही वर्षांनी तर कुटुंब हा शब्दही उरणार नाही कि काय ?, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हा आहे व्यक्तीस्वातंत्र्य, पाश्‍चात्त्यांचे अनुकरण आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांचा परिणाम. हे टाळण्यासाठी साधना करून प्रीती निर्माण करून हे विश्‍वचि माझे घर । ही वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.७.२०१४) 

नित्याचा उपद्रव थांबला पाहिजे !

     कर्नाटक राज्यातील लोंढा येथे २१ ऑक्टोबरच्या रात्री श्रीराम सेना या संघटनेने धर्मजागरण सभेचे आयोजन केले होते. एका वक्त्याचे भाषण चालू असतांना जवळपास २०० धर्मांधांनी वक्त्याच्या दिशेने दगडफेक केली. हातात तलवारी आणि काठ्या घेऊन हे आक्रमक आले होते; याचा अर्थ त्यांचे हे आक्रमण पूर्वनियोजित होते आणि भय निर्माण करून त्यांना सभा उधळायची होती. या आक्रमणाच्या वेळी या आक्रमकांनी काय काय केले हे पाहिले, तर त्यांच्या रूढ झालेल्या मानसिकतेवर प्रकाश पडतो. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले फलक फाडून टाकले आणि महाराजांच्या विषयी अवमानकारक शब्द वापरले. त्यांचे हे कृत्य सहन न झालेले सेनेचे कार्यकर्ते आक्रमकांच्या दिशेने धावून गेले. श्रद्धास्थानाचा अवमान झाल्यावर उमटलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. या प्रकाराच्या वेळी दोन धर्माभिमानी घायाळ झाले. पोलिसांनी मात्र श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. येथे निर्माण होणारा प्रश्‍न म्हणजे शांतपणे चालू असलेल्या सभेत दगडफेक करणारे किंवा वातावरण बिघडवणारे कोण होते, हे ठाऊक असूनही श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. प्रत्यक्ष गुन्हा करणारे कसे पकडले गेले नाहीत ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn