Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) 'साध्वी प्राची यांची हत्यासुद्धा वैध ठरेल !'

  • गोमांस खाल्ल्याने हत्या झाल्याच्या कांगाव्याचे प्रकरण
  • समाजवादी पक्षाचा धर्मांध नेता माविया अली यांची खुली चिथावणी

अशा प्रकारची खुली चिथावणी द्यायला हा भारत आहे कि पाक ? समाजवादी पक्षाच्या 
अशा नेत्यांवर वेसण घालण्याचे काम केंद्रातील भाजप शासनाने करावे, हीच जनतेची अपेक्षा ! 
लक्ष्मणपुरी, वाराणसी, देवबंद - उत्तरप्रदेशातील दादरी येथे अखलाख यांची हत्या झाली. या संदर्भात पोलिसांनी अजून कारण स्पष्ट केलेले नसतांना 'अखलाख यांची हत्या गोमांस खाल्ल्याने झाली', असा कांगावा चालू असून उत्तरप्रदेशात त्यावरून राजकारणाला उधाण आले आहे. त्यातच ५ ऑक्टोबरला समाजवादी पक्षाचा धर्मांध नेता माविया अली याने साध्वी प्राची यांना सरळसरळ हत्येची धमकी दिली आहे. अली म्हणाले की, 'मुसलमानांच्या विरोधात सातत्याने विष ओकणार्या साध्वी प्राची यांची हत्यासुद्धा माझ्या दृष्टीने वैध ठरवली पाहिजे !' (साध्वी प्राची यांच्या हत्येविषयी अशी चिथावणी देणार्या नेत्यांना स्थानिक समाजवादी पक्षाचा पाठिंबा असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही ! यासाठी आता केंद्रशासनाने पुढाकार घेऊन अली यांच्यावर कारवाई केल्यास पुन्हा अशी धमकी देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ! - संपादक)

वाराणसीत संतांच्या 'अन्याय प्रतिकार मोर्च्या'वर पोलिसांचा पुन्हा लाठीमार !

संतांवर वारंवार नाहक लाठीमार करणार्या समाजवादी पक्षाच्या राज्यातील 
पोलिसांची मोगलांनाही लाजवणारी कृती !
वाराणसी - गेल्या आठवड्यात मूर्तीविसर्जनाच्या मध्यरात्री वाराणसीच्या पोलिसांनी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी यांच्यासह साधू आणि सामान्य हिंदू यांच्यावर अमानुष लाठीमार केला. त्यांना मूर्तीविसर्जनाचे धर्मकर्तव्य पार पाडू दिले नाही. याच्या निषेधार्थ ५ ऑक्टोबरला साधू-संतांनी 'अन्याय प्रतिकार मोर्चा' काढला. सहस्रोंच्या संख्येने ठिकठिकाणचे हिंदू टाऊनहॉल परिसरात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी करत होते. सभेनंतर मोर्चा चालू झाला. या मोर्च्यात 'बाबा काशी विश्वनाथा'ची पालखी होती. मोर्च्याला हिंदूंचा मोठा प्रतिसाद लाभत होता. ठिकठिकाणचे हिंदू संतांना अभिवादन करत होते. काही ठिकाणी मुसलमान या मोर्च्याकडे संशयाने पहात होते; मात्र या वेळी पोलिसांनी या साधू-संतांवरच आक्रमण केले. पोलिसांच्या या आक्रमणामुळे मोर्च्यात सहभागी हिंदू सैरावैरा पळू लागले. (अशा प्रकारे उत्तरप्रदेश पोलिसांनी कधी अहिंदूंच्या सहस्रोंच्या मोर्च्यावर आक्रमण केले आहे का ? - संपादक) त्यामुळे काही हिंदूंच्या संतापाचा उद्रेक झाल्याने जाळपोळीसारखे प्रकारही घडले.
(सविस्तर वृत्त  उद्या वाचा )

वाराणसीत संतांच्या 'अन्याय प्रतिकार मोर्च्या'वर पोलिसांचा पुन्हा लाठीमार !

संतांवर वारंवार नाहक लाठीमार करणार्या समाजवादी पक्षाच्या राज्यातील 
पोलिसांची मोगलांनाही लाजवणारी कृती !
वाराणसी - गेल्या आठवड्यात मूर्तीविसर्जनाच्या मध्यरात्री वाराणसीच्या पोलिसांनी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी यांच्यासह साधू आणि सामान्य हिंदू यांच्यावर अमानुष लाठीमार केला. त्यांना मूर्तीविसर्जनाचे धर्मकर्तव्य पार पाडू दिले नाही. याच्या निषेधार्थ ५ ऑक्टोबरला साधू-संतांनी 'अन्याय प्रतिकार मोर्चा' काढला. सहस्रोंच्या संख्येने ठिकठिकाणचे हिंदू टाऊनहॉल परिसरात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी करत होते. सभेनंतर मोर्चा चालू झाला. या मोर्च्यात 'बाबा काशी विश्वनाथा'ची पालखी होती. मोर्च्याला हिंदूंचा मोठा प्रतिसाद लाभत होता. ठिकठिकाणचे हिंदू संतांना अभिवादन करत होते. काही ठिकाणी मुसलमान या मोर्च्याकडे संशयाने पहात होते; मात्र या वेळी पोलिसांनी या साधू-संतांवरच आक्रमण केले. पोलिसांच्या या आक्रमणामुळे मोर्च्यात सहभागी हिंदू सैरावैरा पळू लागले. (अशा प्रकारे उत्तरप्रदेश पोलिसांनी कधी अहिंदूंच्या सहस्रोंच्या मोर्च्यावर आक्रमण केले आहे का ? - संपादक) त्यामुळे काही हिंदूंच्या संतापाचा उद्रेक झाल्याने जाळपोळीसारखे प्रकारही घडले.
(सविस्तर वृत्त  उद्या वाचा )

(म्हणे) 'नरेंद्र मोदी 'अत्याचारी सैतान' !'

अकबरुद्दीन ओवैसी यांची गरळओक !
सनातन प्रभातमध्ये 'विषारी विचारसरणी' आहे, असे म्हणणार्या  पुरोगाम्यांना 
'ओवैसी यांची ही विचारसरणी फुले उधळणारी आहे', असे वाटते का ?
किशनगंज (बिहार) - 'मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन'चे (एम्आयएम्चे) वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किशनगंज येथील त्यांच्या दौर्यात अत्यंत शेलक्या शब्दांचा वापर करत विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी लोकभावना भडकवून मुसलमानांची मते मिळवण्यासाठीच अशी विधाने केल्याचे बोलले जात आहे. ४ ऑक्टोबर या दिवशी ओवैसी म्हणाले की, 
१. गुजरात दंगलींना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हेच उत्तरदायी आहेत. 
२. श्री. मोदी हे जुलमी सैतान आहेत. गुजरात दंगलीतील प्रत्येक गोष्टी श्री. मोदी यांच्याच सांगण्यावरून झाली असून त्यांनी मुसलमान महिला आणि मुले यांच्यावरही अत्याचार केले. ते अत्याचारी (जुलमी) सैतान आहेत. (आजवर कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने असे म्हटलेले नाही ! - संपादक)

काश्मीरमध्ये गोळीबारात ३ भारतीय सैनिक हुतात्मा

आक्रमण हाच संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे जाणून भाजप शासनाने आता पाकमध्ये घुसून आतंकवाद संपुष्टात आणावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यात भारतीय सैन्य दलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेल्या गोळीबारात ३ सैनिक हुतात्मा झाले आहेत. अधिकार्यानी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडातील हाफरडा येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सैनिकांनी शोधमोहीम चालू केली. या शोधमोहिमेच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात ३ सैनिक हुतात्मा झाले आहेत. दोन्ही बाजूंनी अजून गोळीबार चालू असून आतंकवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पाकव्याप्त काश्मीर परत घेणे, हाच काश्मीर समस्येवरील उपाय ! - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मोदी शासन पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी पावले उचलेल ?
      नवी देहली - पाकव्याप्त काश्मीरला पाकच्या अवैध नियंत्रणातून मुक्त करणे हाच काश्मीर समस्येवर एकमात्र उपाय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर मध्ये म्हटले आहे.
      पाकिस्तानची क्रूरता आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असणारे पाकिस्तानच्या विरोधातील आंदोलन याच्या ध्वनिचित्रफिती संकेतस्थळांवर पसरत आहेत. जम्मू-काश्मीरचे नेते मौलाना सैयद अतहर हुसेन देहलवी यांनी या भागाचा दौरा केल्यावर म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोक भारत शासनामुळे प्रभावित झाले आहेत, तसेच ते पाकिस्तानमधील वाढत्या आतंकवादामुळे त्रस्त झाले असून त्यांना भारतात सहभागी व्हायचे आहे. देहलवी यांच्या या विधानावर संघाने वरील वक्तव्य केले.

(म्हणे) 'सनातन संस्थेची मान्यता रहित करावी !'

सनातन संस्थेच्या विरोधात कोणतेही 
पुरावे नसतांना भारिप बहुजन महासंघाची मागणी
महासंघाकडून दैनिक सनातन प्रभातच्या अंकाची होळी
  पुणे, ५ ऑक्टोबर - दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येनंतर सनातनचा चेहरा पुढे आला आहे. त्यामुळे सनातन संस्थेची मान्यता रहित करावी, असे सनातनद्वेषी प्रतिपादन भारिप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अधिवक्ता वैशाली चांदणे यांनी केले. (सनातन संस्थेच्या विरोधात अजून एकही गुन्हा कुठेच नोंद झालेला नाही किंवा कोणत्याही प्रकरणात प्रथमदर्शी पुरावाही नसतांना वैशाली चांदणे यांनी अशी मागणी करणे हास्यास्पद आहे. यामुळे होत असलेल्या मानहानीविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. - संपादक) सनातन संस्थेचे कार्यकर्ते तरुणांची डोकी भडकवत आहेत. संस्थेचे कार्यकर्ते देशद्रोही कारवाया करत आहेत. त्यामुळेच संस्थेचे प्रमुख आणि प्रवक्ते यांच्यावर कारवाई करावी. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकार्योंना देण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. (भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण नक्षलवाद डाव्यांच्या हातात आहे त्यामुळे देशद्रोही कारवाया कोण करत आहे, ते उघड आहे. - संपादक)

काँग्रेसच्या कार्यकर्त्याने कबुतर बांधलेले रॉकेट आकाशात उडवले !

प्राणीद्रोही काँग्रेस ! 
     भाग्यनगर - आंध्रमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिवंत कबुतराला एका कागदी पाकिटात बंद केले. त्यानंतर ते रॉकेटला बांधले आणि ते पेटवून हवेत उडवल्याची चित्रफीत (व्हीडीओ) सगळीकडे प्रसारित झाली आहे. 
    काँग्रेसचे आंध्रप्रदेश अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हा घाट घातल्याचे समजते. कबुतराच्या तोंडात काँग्रेसचा झेंडा अडकवून एक कार्यकर्ता त्या कबूतराला एका कागदी पाकिटात बंद करतांना या चित्रफितीत दिसत आहे. त्यानंतर ते पाकिट रॉकेटला बांधून ते हवेत उडवल्या जात असल्याचे या चित्रफीतीत स्पष्टपणे दिसून येत आहे. कबुतरावर अतोनात अत्याचार करणार्‍या या कार्यकर्त्यांने या घटनेत ते कबुतर मृत्यूमुखी पडले नसून ते हवेत उडून गेल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे रघुवीर रेड्डी यांच्यादेखत हा प्रसंग घडूनही त्यांनी त्याचा आनंद लुटल्याचे म्हटले जात आहे.

(म्हणे) 'सनातनसारख्या प्रवृत्तींना आळा न घातल्यास देशासमोर गंभीर धोका निर्माण होईल !'

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांचे सनातनद्वेषी विधान 
शासनावर दबाव आणण्यासाठी अशी हिंदुद्वेषी विधाने करणार्यांवर शासनाने कठोर कारवाई 
करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
सनातन नव्हे, तर नक्षलवादी आणि आतंकवादी यांच्याकडून 
देशाला धोका आहे, हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही !
मुंबई - सनातनचा साधक समीर गायकवाड याला कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक झाल्याने सनातनचे खरे स्वरूप समोर आले आहे. सनातनला शासनाने अभय दिले आहे. त्यांचे कोंबिंग ऑपरेशन करा. सनातनसारख्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालायची आवश्यकता आहे अन्यथा देशासमोर गंभीर धोका निर्माण होण्याची भीती आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. (श्री. समीर गायकवाड यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नसतांनाही अशा प्रकारची विधाने करणारे स्वतःचे खरे हिंदुद्वेषी रूप समाजासमोर आणत आहेत ! - संपादक) 'शासनाने गांभीर्याने वेळीच नोंद घेण्याची आवश्यकता आहे', असेही ते म्हणाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सनातन संस्थेला सदैव आशीर्वाद ! - जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज

     मुंबई - सनातन संस्थेला माझा सदैव आशीर्वाद आहे, असे प्रेमपूर्वक उद्गार जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी सनातनच्या साधकांसमवेत बोलतांना काढले सांगितले. येथे त्यांचे प्रवचन आणि दर्शन सोहळा यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या भेटीच्या वेळी ते साधकांशी बोलत होते. या वेळी सौ. तन्वी सरमळकर, श्री. सीमित सरमळकर, माधुरी ताम्हणकर, हिंदुत्ववादी रवी बाला यांनी भेट घेतली. सनातन संस्थेवर आलेल्या बंदीच्या संकटाच्या संदर्भात साधकांनी सांगितल्यावर ते म्हणाले, काळजी करू नका ! असे काही होणार नाही. हे सर्व आता निवळत चालले आहे. लोकांच्या सत्य लक्षात येत आहे. सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी संस्थेची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली. याविषयी त्यांचे कौतुक वाटते.

(म्हणे) रा.स्व. संघ देशातील सर्वांत मोठी आतंकवादी संघटना !

नक्षलवाद्यांचा पुरस्कार करणार्‍या डाव्यांच्या हातात हात घालणारे कोळसे-पाटील यांचा हिंदुद्वेष !
  • देश बचाव आघाडी आयोजित जाहीर सभेत मान्यवरांचे हिंदुद्रोही फुत्कार !
  • सनातन संस्थेवर बंदीची मागणी !
हिंदुत्ववाद्यांनो, तथाकथित निधर्मीवादी, जहाल साम्यवादी, दलित, आदिवासी आणि मुसलमान यांनी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात पुकारलेल्या या एल्गाराला उत्तर देण्यासाठी तुम्ही काय सिद्धता केली आहे ?
      पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वांत मोठी आतंकवादी संघटना असून स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी आणि अराजक माजवण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती. त्यामुळे भारत आर्एस्एस्मुक्त झाल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत. भारतात सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विषारी विचारसरणी कार्यरत असून ती समाजाचा बुद्धीभेद करणारी आहे.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्याचा म्हापसा येथील हिंदुत्ववाद्यांचा निर्धार

     म्हापसा, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - 'सनातन संस्थेवर बंदी कदापी येऊ देणार नाही. सनातन संस्थेवर बंदी घालू नये, यासाठी आम्ही उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून लोकशाही पद्धतीने विरोध करू', असा ठराव म्हापसा येथील धर्माभिमान्यांनी घेतला आहे. सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवण्यासाठी गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाच्या वतीने ३ ऑक्टोबर या दिवशी म्हापसा येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला म्हापसा परिसरातील अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. 

राष्ट्र-धर्माच्या अनुषंगाने घेण्यात येणार्‍या आंदोलनाच्या नियोजनासाठी पेण येथे हिंदुत्ववाद्यांची बैठक

     पेण (जिल्हा रायगड) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी करावी; राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात यावी; स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह लहान बालकांवर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर त्वरित कारवाई करून राज्य शासनाला खडसवावे, या मागण्यांसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथे आंदोलनाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

(म्हणे) हिंदु राष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे !

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खासदार सीताराम येचुरी यांना उठलेला पोटशूळ !
      नागपूर - भाजप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कळसूत्री बाहुली आहे. देशावर संघाची विचारधारा थोपवण्यासाठी हिंदु राष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खासदार सीताराम येचुरी यांनी ४ ऑक्टोबरला केली. रिपब्लिकन परिवारच्या वतीने विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित संघीकरणविरोधी परिषदेच्या वेळी ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले, संघाला देशाची रचना धर्मावर आधारित अशी पूर्वीपासूनच करायची आहे. त्या दिशेने त्यांचे काम चालू आहे. राजकारणात भाग घेणार नाही, या अटीवर संघावरील बंदी मागे घेण्यात आली. तेव्हा संघाने स्वतंत्र राजकीय संघटन उभे केले. यातून जनसंघाची स्थापना झाली. नंतर भाजपात त्याचे रूपांतर झाले. त्यामुळे भाजप संघापासून वेगळा नाही.

ढोंगी पुरोगाम्यांनी सनातन बंदीची भाषा बंद करावी; अन्यथा शिवसेना जशास तसे उत्तर देईल ! - अनिल शेटे, शिवसेना, सांगली उपतालुकाप्रमुख

      सांगली, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसतांना ढोंगी पुरोगामी संघटना देशप्रेमी सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्थेचे कार्य इतके उत्तुंग आहे की, पुरोगामी संघटना पासंगाला पुरणार नाहीत. या संघटनांनी बंदीची भाषा, तसेच अन्य आरोप करणे बंद करावे, अन्यथा शिवसेना जशास तसे उत्तर देईल. त्याचप्रमाणे बंदी घालण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास आम्ही मागे-पुढे पहाणार नाही. सनातन संस्थेचे कार्य आम्ही जवळून पाहिले असून अशा संघटनांची आज समाजाला अत्यावश्यकता आहे, असे मत शिवसेनेचे सांगली उपतालुकाप्रमुख श्री. अनिल शेटे यांनी व्यक्त केले आहे.

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात चोपडा (जळगाव) येथे हिंदुत्ववाद्यांचे निवेदन

      चोपडा (जळगाव) - कॉ. पानसरे हत्याप्रकरणी सनातनचे श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यावर अनेकांकडून सनातनवर बंदीची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील भामरे यांना देण्यात आले. 

राज्यातील ६६ सहस्र ९८८ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीत !

राज्यातील शाळांची भयावह परिस्थिती दर्शवणारा केंद्र शासनाचा अहवाल 
 अशा शाळा विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ? 
     पुणे, ५ ऑक्टोबर - राज्यातील ४६ सहस्र शाळांमध्ये विषयानुसार शिक्षक नाहीत, तर यातील ३ सहस्र ५०० शाळा या एकशिक्षकी आहेत. ४२ सहस्र शाळांचा कारभार दोनच शिक्षकांना सांभाळावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे ६६ सहस्र ९८८ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीत, अशी माहिती केंद्र शासनाकडून प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या गेल्या वर्षीच्या (२०१४-१५) सर्वेक्षणाच्या विश्‍लेषणातून समोर आली आहे. (राज्य शासनाने शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या या उणिवा दूर करून शिक्षण विभागाला 'चांगले दिवस' दाखवावेत ! - संपादक)

मोदीरूपी धृतराष्ट्र केवळ आंधळा नाही, तर बहिरा आणि मुकाही आहे !

राजदचे नेते लालू प्रसाद यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका 
     नवी देहली - हस्तिनापूरात बसलेला कलियुगातील मोदीरूपी धृतराष्ट्र केवळ आंधळा नाही, तर बहिरा आणि मुकाही आहे. जेव्हा बोलण्याची वेळ येते, तेव्हा मौन धारण करून लपून बसतो, अशी टीका दादरी प्रकरणावरून राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे. उत्तरप्रदेशमधील दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयातून हिंदुत्ववाद्यांनी एका मुसलमानाच्या घरावर आक्रमण करून त्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

नगर येथे पशूवधगृहावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ११ गोवंशियांची सुटका

शासन गोहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी कधी करणार ? 
     नगर, ५ ऑक्टोबर - येथील बंगाली बाबा चौकात हत्येसाठी काही गोवंशियांना पशूवधगृहामध्ये डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून ११ गोवंशियांची सुटका केली. ही घटना २ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी घडली असून या प्रकरणी एकाला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी या गोवंशियांना पांजरपोळ येथे हालवले आहे. गेल्या मासात बंगाली बाबा चौकात पोलिसांनी यापूर्वी दोनदा अशीच कारवाई करून गोवंशियांची सुटका केली होती. (गोवंशियांना वारंवार सोडवावे लागू नये, यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)

द्रुतगती महामार्गाची पथकर वसुली चालू राहिल्यास १ सहस्र कोटी रुपये जास्त वसुलीची शक्यता

     पुणे, ५ ऑक्टोबर - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पथकर रकमेची वास्तव माहिती ३ ऑक्टोबर या दिवशी जाहीर झाली. त्यानुसार द्रुतगती महामार्गाच्या ठेकेदाराला प्रतिवर्ष अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. वर्ष २०१९ पर्यंत या ठेकेदाराला २८६९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असतांना ऑगस्ट २०१५ पर्यंत त्याला २ सहस्र ३०६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आता केवळ ५६३ कोटी रुपयेच मिळणे शिल्लक राहिले आहेत. सध्या मिळत असलेल्या उत्पन्नाचा वेग पाहता मुदतीपूर्वीच त्याच्या संपूर्ण पैशांची वसुली होणार असल्याचे चित्र दिसत आहे. (ही वास्तव माहिती लपवण्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्यास वावगे काय ? - संपादक) २०१९ पर्यंत पथकर वसुली चालू राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांकडून सुमारे १ सहस्र कोटी रुपये अधिक वसूल केले जातील. 

जम्मू काश्मीरमधील गोमांसबंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली !

     जम्मू - गेल्या अनेक दशकांपासून जम्मू काश्मीरमध्ये गोमांसबंदी लागू होती; मात्र गेल्या महिन्यात एका याचिकेवर निर्णय देतांना जम्मू उच्च न्यायालयाने सदर बंदीची कारवाई परिणामकारकपणे करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. सदर आदेश सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी रद्दबातल केले आहेत.

भाविकांचे पैसे चोरणार्‍या तिघांना अटक

हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदुच !
     कोल्हापूर, ५ ऑक्टोबर (वार्ता.) - २ ऑक्टोबर या दिवशी दुपारी २.४५ वाजता श्री महालक्ष्मी मंदिरातील कासव मंडपातील गणपतीचे दर्शन घेत असतांना श्री. युवराज दत्तात्रय पाटील (वय ५० वर्षे) यांच्या विजारीच्या खिशातील ५ सहस्र रुपयांची चोरी करणारे आरोपी नागराज गोजडे, शिवराज बगाडे, आणि प्रताप दोडामणी यांना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

परतवाडा, अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीकडून १ सहस्र ७०० मुलींना लव्ह जिहाद या विषयावर मार्गदर्शन

लव्ह जिहाद ग्रंथ दाखवून मुलींचे
प्रबोधन करतांना कु. प्रतिक्षा कोरगावकर
  अमरावती - परतवाडा भागातील धर्मजागरण मंचाने १ सहस्र ७०० मुलींच्या सामान्यज्ञान परीक्षेनंतर हिंदु जनजागृती समितीला लव्ह जिहाद या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. या वेळी समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी लव्ह जिहाद हे राष्ट्रावरील मोठे संकट असून त्याच्या सत्य परिस्थितीची कल्पना दिली. मार्गदर्शनाअगोदर हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांवरील १०० प्रश्‍न देऊन १०० गुणांची प्रश्‍नपत्रिका देऊन त्यावर परीक्षाही घेण्यात आली.

(म्हणे) शासनाने सनातनला वाचवण्याऐवजी देशाला वाचवावे !

दलितांना शस्त्रे हाती घेण्याचे आवाहन करून जातीद्वेषाचा विखार
पसरवणार्‍या जोगेंद्र कवाडे यांना सनातनविषयी काहीही बोलण्याचा अधिकार नाही !
शासन सनातनला वाचवत आहे, हा जावईशोध प्राध्यापक महाशयांना कसा लागला ?
      कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि भारतीय साम्यवादी पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण राज्य शासने निष्पक्षपणे करावे. शासनाने सनातनला वाचवण्याऐवजी देशाला वाचवावे, असे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ४ ऑक्टोबरला येथील पत्रकार परिषदेत केले. ते पुढे म्हणाले, बहुसंख्याकांचा आतंकवाद देशाला विघटनाकडे नेणारा आहे. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात संशयाची सुई सनातनकडे आहे.

नवी मुंबईतील दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींवर कारवाई १ सहस्र ८३६ कुटुंबे बेघर

कॅम्पा कोला या अनधिकृत इमारतीवर अशाच प्रकारची कारवाई तत्परतेने का झाली नाही ?
      नवी मुंबई - येथील दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींवर एम्आयडीसीने कारवाईला प्रारंभ केला आहे. एम्आयडीसीने ९४ पैकी ९० इमारतींमधील १ सहस्र ८३६ कुटुंबांना वृत्तपत्राच्या माध्यमातून सात दिवसांची पब्लिक नोटीस बजावली होती. (इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभारल्या जात असतांना एम्आयडीसीमधील संबंधित अधिकारी झोपले होते का ? - संपादक) रहिवाशांना दिलेली ती मुदत ५ ऑक्टोबरला संपल्याने कारवाईस प्रारंभ झाला. त्यामुळे रहिवाशांनी ठिय्या आंदोलन चालू केले आहे. या वेळी आंदोलक महिलांनाही कह्यात घेण्यात आले आहे.
     अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी एम.आय.डी.सी, सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांनी मिळून ही कारवाई केली आहे. रहिवासी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

फलक प्रसिद्धीकरता

सनातन प्रभातमध्ये 'विषारी भाषा' असल्याचा आरोप 
करणार्‍यांना ओवैसींची भाषा फुले उधळणारी वाटते का ?
     गुजरात दंगलीतील प्रत्येक गोष्ट मोदी यांच्याच सांगण्यावरून झाली असून त्यांनी मुसलमान महिला आणि मुले यांच्यावरही अत्याचार केले. ते अत्याचारी (जुलमी) सैतान आहेत, अशी टीका 'एम्आयएम्' चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली.

(म्हणे) जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार न पटणार्‍या शक्तीचा संपूर्ण समाजाने नाश करायला पाहिजे !

एका समाजाला दुसर्‍या समाजाचा नाश करण्यासाठी उद्युक्त करणारी ही भाषा कुणाला आक्षेपार्ह
वाटत नाही का ? सनातन प्रभातमधील भाषेविषयी टीका करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
      पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या खून करणार्‍या शक्ती कोणत्या, त्याच, ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही, अशा शक्तीचा संपूर्ण समाजाने नाश करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरून जातीविरहित धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी करायला पाहिजे, असे मत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी रविवारी व्यक्त केले.

हिंदू तेजा जाग रे !

jago !
 Modi julmi saitan hai, aisa MIMke neta Akbaruddin Ovaisine kaha. 
- Sanatanko jahrila kahanewale ab chup kyo ? 

जागो !
 मोदी जुलमी सैतान है, ऐसा 'एम्आयएम्' के  नेता अकबरुद्दीन ओवैसीने कहा. 
- सनातनको जहरिला कहनेवाले अब चुप क्यो ?

पानसरे कोण होते ?

अधिवक्ता
संजीव पुनाळेकर
१. पानसरे यांनी शिवाजी कोण होता पुस्तक का लिहिले ?
      चरित्रांचा अभ्यास तुलनेसाठी होतो. त्या व्यक्तीत्वाच्या उंचीने भारावून जाऊन तो अभ्यास केला जातो. पानसरेंनी तसे केले नाही. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा होता. जशी अन्य राजांना असते, तशी शिवाजी महाराजांनाही त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा होती, असे दाखवत शेवटी साम्यवादी मूल्येच खरी, हे पटवायचे होते. पानसरेंच्याच भाषेत सांगायचे, तर पुरोगाम्यांना स्फूर्तीप्रद आणि आदर्श असलेल्या प्रतिमा उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जातात. (अरुण शौरींचे डॉ. बाबासाहेबांवरील पुस्तक, बाळ गांगल यांचे महात्मा फुलेसंबंधीचे लिखाण इ.) पुरोगामी मात्र त्यांच्या (पानसरेंच्या भाषेत धर्मद्वेष्ट्यांच्या) प्रतिमांना हात लावत नाहीत. (खरेतर हे धादांत खोटे विधान आहे; परंतु ते जरी खरी मानले, तरी त्यातून पानसरेंचा प्रतिमाभंजनाचा प्रयत्न स्पष्ट दिसून येत नाही काय ?)

श्रद्धेने श्राद्ध करावे !

      हिंदु धर्मात सांगितलेल्या सर्व कृती मिथ्या आणि अंधश्रद्धा पसरवणार्‍या आहेत, असा ठाम अपसमज करून घेऊन अनेक कथित बुद्धीवादी समाजाला वेगवेगळी आवाहने करत असतात. विशेष म्हणजे विवेक आणि विज्ञान याच्या बाता मारणार्‍यांकडून हिंदु धर्मात सांगितलेल्या कृतींमागचे अध्यात्म आणि विज्ञान जाणून घेण्याचे कष्टही घेतले जात नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता चालू असलेल्या पितृपंधरवड्याच्या निमित्तानेही कावळ्याच्या माध्यमातून पितर कसे जेवण करतील ?, हे सर्व विधी म्हणजे ब्राह्मणांचे षड्यंत्र आहे, या दिवसांमध्ये खरेदी, शुभकार्य न करणे म्हणजे खुळचटपणा आहे, श्राद्ध करण्यापेक्षा जिवंतपणी आई-वडिलांची सेवा करा, अशा प्रकारची विधाने आणि आवाहने केली जात आहेत. पूर्वजांची सेवा करायचीच असेल, तर श्राद्ध करण्यापेक्षा एखाद्या शाळेला अर्थसाहाय्य करा, सामाजिक कार्याला साहाय्य करा, अशा प्रकारची आवाहनेही व्हॉट्स अ‍ॅप आणि अन्य सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केली जात आहेत.

उद्धटपणे प्रश्‍न विचारून पत्रकारिता धर्माला कलंकित करणारी आणि सनातन संस्थेची अकारण अपकीर्ती करून पक्षपातीपणाने वागणारी एबीपी न्यूज वाहिनी !

१. पानसरेंच्या खुनासाठी सनातनला आरोपी बनवणार्‍या सनातनद्वेष्ट्या वृत्तवाहिन्या आणि आरोपांचा सनातनने केलेला प्रतिवाद यांमुळे 
सनातनचे निदोर्र्र्र्र्र्षत्व घराघरात जाणे
     कॉम्रेड पानसरेंच्या खुनासाठी सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक केल्यावर ते वृत्त दिवसरात्र दाखवून वृत्तवाहिन्यांनी आकाश-पाताळ एक केले. ऐकीव माहिती आणि कपोलकल्पित वृत्ते यांच्या आधारे हा विषय रंगवून सर्व वाहिन्यांनी त्यांच्यातील सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. त्या प्रत्येक वाहिनीवरील चर्चेत सनातनने स्वतःचे निर्दोषत्व तेवढ्याच प्रभावीपणे मांडून या वाहिन्यांची गोची केली. सनातनच्या दृष्टीने या वाहिन्यांनी घराघरात सनातनचे नाव पाहोेचवले आणि सनातनचे निर्दोषत्व जनतेला आपोआपच ज्ञात झाले.

हिंदु जनजागृती समितीचा गुजरात राज्याचा ऑगस्ट २०१५ मधील धर्मप्रसार कार्याचा आढावा

१. जिल्हा - कर्णावती 
१ अ. राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या अंतर्गत आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देणे : राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या अंतर्गत कर्णावती येथील आयुक्तांना पुढील विषय अंतर्भूत असलेली निवेदने देण्यात आली.
१. १५ ऑगस्टच्या दिवशी विविध माध्यमांतून होणारा राष्ट्रध्वजांचा अवमान रोखणे
२. कर्नाटक राज्यातील हिंदु मंदिरांमध्ये अन्य धर्मीय अधिकार्‍यांची केलेली नियुक्ती स्थगित करणे आणि संबंधितांवर योग्य कार्यवाही करणे
३. तेलंगणा येथील भाजपचे आमदार श्री. टी राजासिंह यांना अतिरिक्त सुरक्षा देणे आणि त्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यासाठी अनुमती पत्र देणे, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍यांवर कार्यवाही करणे
४. रेल्वेस्थानक किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करण्यास बंदी घालणे

भाद्रपद मासाच्या कृष्णपक्ष-पितृपक्षामध्ये पितृश्राद्ध करण्याचे महत्त्व !

     हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.
      २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्त आजच्या भागात पितृश्राद्ध करण्याचे महत्त्व पाहू.

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटित

मंगळुरू येथे आंदोलकांना संबोधित करतांना श्री श्री मुक्तानंद स्वामी
आणि उपस्थित हिंदु धर्माभिमानी
     सनातन संस्था गेली अनेक वर्षे हिंदुत्ववादी संघटनांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या संघटनांना सनातन संस्था मातृ संघटना वाटते. गेले काही दिवस सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी सनातनद्वेष्टे राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे करत आहेत. याला भारतभरातील हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटना विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याचा वृत्तांत येथे दिला आहे.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात ठिकठिकाणच्या धर्माभिमानी हिंदूंनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

     कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक झाल्यानंतर प्रसारमाध्यमे आणि राजकारणी यांनी सनातनवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला; मात्र हिंदु धर्माभिमानी आता सूज्ञ झाले आहेत. ही चिखलफेक होत असतांनाही ठिकठिकाणी धर्माभिमानी हिंदूंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. 
श्री. रामचंद्र नथु गांगुर्डे, प.पू. निर्मलादेवी संप्रदाय, भांडुप, मुंबई : सनातन संस्थेचे हिंदुत्वाचे कार्य चांगले आहे. मोगलांनी हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी तो नष्ट झाला नाही आणि यापुढेही होणार नाही. 
श्री. प्रमोद मसुरकर, एकता मित्र मंडळ, भांडुप, मुंबई : सनातनवर बंदी येऊच शकत नाही. सनातनवर बंदी घालणे, हे काय खायचे काम आहे का ? आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. 
श्री. आम्रे, अध्यक्ष, सिद्धीविनायक मंदिर, ऐरोली, मुंबई : तुमचे कार्य चांगले आहे. तुम्ही आहात; म्हणून हिंदुत्व टिकून आहे. 

प्रा. शाम मानव रूढ करत असलेल्या संमोहित करणे या नव्या वाक्प्रचारावरून सूचलेल्या काही गमती !

      परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संमोहनाद्वारे काही साधकांकडून गुन्हे घडवले आणि त्यानंतर त्यांच्या स्मृती पुसून टाकल्या, असा कपोलकल्पित आरोप करून प्रा. शाम मानव यांनी महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. त्यामुळे आता संमोहित करणे हा नवा वाक्प्रचार रूढ होण्याची चिन्हे आहेत. प्रा. मानव यांच्या (कु)तर्कशास्त्रानुसार पुढील गौप्यस्फोटांची मालिकाच सिद्ध होईल.
- श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१५)

कुठे धार्मिकता वा संस्कृती यांचा पुरस्कार केल्याने चिरकाल टिकणारे कुलविवाह, तर कुठे दोन-तीन वर्षांनंतर मोडणारे आंतरजातीय विवाह !

     आंतरजातीय विवाहाचा सपाटा चाललेल्या आडवाटेच्या मार्गावरच्या पती-पत्नींची पाहणी पुणे विद्यापिठाने केली. २-३ वर्षांपलीकडे एकही विवाह टिकलेला नाही. स्वप्नातील राणी आणि राजा पहाणार्‍यांंनी जागे व्हावे ! आज जातीजातींची कुंपणे अधिकाधिक काटेरी केली जात आहेत. राजकीय आणि सामाजिक योजना, कायदे होत आहेत अन् त्या वेळी अनिर्बंध स्वैराचाराला प्रतिबंध करणारे कुलविवाह मोडून टाकायचे प्रयत्न होत आहेत. इथे आध्यात्मिक, धार्मिक वा संस्कृतीचा लेशही नाही.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित, मे २०१२)

संसद सदस्यांचे फाजील लाड पुरवणारा भारत !

      प्रत्येक संसद सदस्य त्याच्या कार्यालयात एक, घरी एक आणि मतदारसंघात एक, असे तीन दूरभाष संच घेण्यास पात्र असतो. त्याला ५०,००० संपर्क (कॉल्स) विनामूल्य असतात. प्रतिवर्षी त्याला त्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळतो. त्यातील पहिल्या एक कोटी रुपयांचा हिशेब देण्याचे बंधन त्याच्यावर नसते. उरलेल्या एक कोटी रुपयांचा व्यय कसा झाला, त्याचाच हिशेब केवळ द्यावा लागतो. संसद व्यय कसा झाला, याचाच केवळ हिशेब द्यावा लागतो. भारतातील संसद सदस्यांप्रमाणे असे फाजील लाड जगातील कोणत्याही देशात पुरवले जात नाहीत.
- श्री. दुर्गेश परूळकर (धर्मभास्कर वर्षारंभ विशेषांक, मे २०११)

आम्ही दुर्बळ बनत गेल्यानेच आमचे राष्ट्रीय जीवन अधोगतीला पोहोेचलेे असून शक्तीसंचयाची खाण असलेली उपनिषदेच सर्व दुर्बलांची शक्तीस्थाने बनू शकणे ! - स्वामी विवेकानंद

     उपनिषदांच्या एकेका पानातून जे सांगण्यात आले, ते म्हणजे शक्ती ! गेली सहस्रो वर्षे आमचा वंश अधिकाधिक दुर्बळ बनत जाईल, अशीच प्रत्येक गोष्ट झाली. या प्रदीर्घ कालखंडामध्ये केवळ हेच एक अंतिम उद्दिष्ट दृश्यमान होत होते. आपण अधिकाधिक दुर्बळ बनत जाऊन, गांडुळांसारखे वळवळत राहून, जो आपल्याला त्याच्या पायाखाली चिरडून टाकायला निघाला आहे, त्याच्याच पायाशी लोळण घेत राहिल्याने आमचे राष्ट्रीय जीवन अधोगतीला पोहोचले होते. 
      आपल्याला केवळ शक्तीचीच आवश्यकता असून प्रत्येक क्षणी शक्ती, शक्ती, असाच ध्यास हवा ! उपनिषदे म्हणजे प्रचंड शक्तीसंचय असलेली मोठी खाण आहे. ही उपनिषदेच हाती तुतारी घेऊन सार्‍या दुर्बळ जनांना, दुःखी, कष्टी आणि विविध स्तरांवरील लोकांना सांगतील की, तुम्ही तुमच्या पायावर उभे रहायला शिका आणि मुक्त व्हा ! ही मुक्ती म्हणजे शारीरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य ! हे उपनिषदांचे तीन परवलीचे शब्द आहेत. - स्वामी विवेकानंद

प्रखर धर्माभिमानी आणि गुरूंप्रती अपार भाव असणारे केरळ येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता गोविंद के. भरतन् (वय ७६ वर्षे) !

अधिवक्ता गोविंद भरतन्
      अधिवक्ता गोविंद भरतन् हे केरळ उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता आहेत. मागील काही वर्षांपासून ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. यावर्षी ११ ते १७ जून २०१५ या कालावधीत गोवा येथे समितीद्वारा आयोजित चौथ्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ते सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या संपर्कात असतांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. साधी राहणी : गोविंदजी समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ते एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांचे वागणे आणि बोलणे अगदी साधे आहे. 

श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणारी डोंबिवली, ठाणे येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. केेतकी राकेश शिंपी (वय ६ वर्षे) !

कु. केेतकी शिंपी
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भधारणेपूर्वी यजमानांना साधनेसाठी विरोध करणे आणि गर्भधारणेनंतर नामजप आणि सत्संग यांची आपोआप आवड निर्माण होणे : पूर्वी मला साधनेविषयी काहीच ठाऊक नव्हते आणि माझा साधनेला पुष्कळ विरोध होता. माझे यजमान साधना करत होते. ते करत असलेली सेवाही मला पटत नव्हती; म्हणून मी त्यांना सेवा बंद करा, असे सांगितले. गर्भधारणा झाल्यापासून मला नामजप आणि सत्संग यांची आवड निर्माण झाली. सेवा करा, असे मी यजमानांना सांगू लागले. मला जाता येत नसले, तरी यजमानांनी सत्संगाला जावे, जेणेकरून येणार्‍या बाळावर चांगले संस्कार होतील, असे मला सारखे वाटत असे.
१ आ. केवळ शास्त्रीय संगीतच ऐकावेसे वाटणे आणि पुस्तके वाचण्याची आवड नसतांना धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे : आधी मला शास्त्रीय संगीताची मुळीच आवड नव्हती; पण गर्भधारणा झाल्यापासून मला केवळ तेच ऐकावेसे वाटत होते. पुस्तके वाचण्याची आवड नसतांना मी श्रीराम आणि गोंदवलेकर महाराज यांविषयीची पुस्तके वाचली.

सनातनचे पू. उमेश शेणै यांनी साधकांच्या मनाचा खोलवर अभ्यास करून सनातन संस्थेच्या साधनेचा गाभा असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. उमेश शेणै
    सनातनचे पू. उमेश शेणै यांनी साधकांच्या मनाचा खोलवर विचार करून विचारांची अयोग्य प्रक्रिया आणि त्यावरील योग्य दृष्टीकोन यांविषयी केलेले सविस्तर विवेचन पुढे देत आहे. यामागे अयोग्य विचारप्रक्रियेमुळे त्याच्या साधनेची हानी होऊ नये, तसेच विचारांना सुस्पष्टता येऊन त्याची साधना अधिकाधिक गतीने व्हावी, ही तळमळ शब्दाशब्दांतून प्रत्ययास येते. या सूत्रांचा साधकांनी गांभीर्याने अभ्यास केल्यास साधनेतील अडथळेदूर होतील ! (भाग १)
१. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या प्रक्रियेकडे योग्य प्रकारे
न पाहिल्याने साधकांनी समष्टी साधनेची संधी गमावणे
    स्वभावदोष आणि अहं निर्मूलन नावाची दोन अमूल्य शस्त्रे देऊन ईश्‍वर आपली शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून मोक्षप्राप्तीचा मार्ग सुगम करत आहेत. या शस्त्रांचा उपयोग करतांना आपण दोन प्रकारच्या चुका करत असतो. इतरांच्या चुका आणि अहं यांविषयी न सांगणे, तसेच स्वतःला साहाय्य करण्याच्या दृष्टीने इतरांनी सांगितलेल्या चुका अन् अहं यांचा स्वीकार करून त्यावर कृती करण्यात न्यून पडणे. यांमुळे समष्टी साधनेची मोठी संधी आपण गमावत आहोत. ही प्रक्रिया समजावून सांगून ती कृतीत यावी, यासाठी अनेक प्रयत्न केले. आम्ही मात्र या अमूल्य संपत्तीकडे दुर्लक्ष करून आमची आध्यात्मिक हानी करत आहोत.

कु. सिद्धि क्षत्रीय यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

ध्यानमंदिरात नामजप करतांना कु. सिद्धि क्षत्रीय यांची आध्यात्मिक प्रगती झाली असावी, असा विचार येणे आणि त्यानंतर त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात येणे : २७.७.२०१५ या दिवशी माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार येत होते. त्याची जाणीव होताक्षणी मी नामजप करू लागले, तरीही मनातील विचार थांबत नव्हते. मी श्रीकृष्णाला त्याविषयी प्रार्थना करून त्याच्याशी बोलू लागले. या वर्षी आश्रमातील साधकांपैकी कुणाकुणाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे, ते मला सांगशील का ? असे मी श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा ध्यानमंदिरात डोळे मिटून शांतपणे बसलेली कु. सिद्धि क्षत्रीय दिसली. तेथे आणखीही साधक होते; मात्र ती एकटीच स्पष्टपणे दिसली. तिच्यानंतर आणखी कुणाचाही तोंडवळा मला दिसला नाही. तेव्हा तिची आध्यात्मिक प्रगती झाली असावी, असे मला वाटले. ३१.७.२०१५ या गुरुपौणिमेच्या दिवशी कु. सिद्धि क्षत्रीय यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित करण्यात आली. - सौ. विजयलक्ष्मी आमाती, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(३१.७.२०१५)

गोकुळाष्टमीच्या दिवशी सेवा करण्यापूर्वी श्रीकृष्णाला, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्यावर भावाच्या स्थितीत सेवा पूर्ण झाल्याची आलेली अनुभूती

सौ. अंजली विभूते
१. नामजप आणि प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष
यांमुळे रवा भाजायची सेवा २ घंट्यांत पूर्ण होणे
    गोकुळाष्टमीच्या दिवशी मी विभागात सेवा करत होते. त्या वेळी सहसाधिकेने मला विचारले, रवा भाजण्यासाठी मला साहाय्य कराल का ? मी होकार दिला आणि श्रीकृष्णाला, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केली, माझ्याकडून तुम्हीच ही सेवा नामासहीत आणि परिपूर्णरित्या करवून घ्या ! मी प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष केला आणि सेवा चालू केली. त्या वेळी २ घंट्यांत ३५ किलो रवा भाजून सेवा पूर्ण झाली. सेवा पूर्ण झाली आणि तेथे सौ. अश्‍विनीताई आल्या. त्या म्हणाल्या, काकूंकडे देव पहात आहे. मी म्हणाले, देवच मला भेटायला आला आहे. माझ्या मनात आले, नामजप आणि प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष यांमुळे सेवा कधी पूर्ण झाली, हे कळलेच नाही. अश्‍विनीताईने माझ्या मनात आलेला विचार जाणला आणि मी सेवा करतानांचे छायाचित्र काढून त्या म्हणाल्या, आपण हे छायाचित्र श्री. विभूतेकाकांना दाखवूया !

पतीनिधन झालेल्या साधिकेने पतीच्या सेवेत झालेल्या चुकांविषयी आत्मनिवेदन करून श्रीकृष्णचरणी केलेली क्षमायाचना !

    कोणी आजारी असल्यास त्याची सेवा करतांना कोणती सूत्रे लक्षात ठेवली पाहिजेत, हे पुणे येथील श्रीमती विजयालक्ष्मी विष्णु काळे यांनी प्रांजळपणे लिहिलेल्या पुढील लेखावरून लक्षात येईल. या लेखाबद्दल त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी शरणागत होऊन शिरसाष्टांग नमस्कार.
    माझे पती वैद्य विष्णु चिंतामण काळे यांचे गुरुवार, ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्थी (२१.५.२०१५) या रात्री १.३० वाजता देहावसान झाले. यजमानांच्या रुग्णस्थितीतील शेवटच्या २ - ३ मासांत (महिन्यांत) त्यांची सेवा करतांना माझ्याकडून अहं आणि गृहीत धरणे या दोषांमुळे अनेकविध चुका झाल्या. त्या आता लक्षात येत आहेत. त्या लिहून देत आहे आणि त्यासाठी क्षमायाचना करत आहे. त्यासाठी जी प्रायश्‍चित्ते घ्यायला हवीत, ती माझ्याकडून पूर्ण करवून घ्यावीत, अशी प्रार्थना करते, तसेच या क्षुद्र जिवाच्या उर्वरित आयुष्यातील साधनेची पुढील वाटचाल गतीने मोक्षप्राप्तीच्या दिशेने करवून घ्यावी, अशी नम्रभावाने प्रार्थना करत आहे.

ज्ञानग्रहणाच्या सेवेमुळे साधकाला साधनेच्या अनुषंगाने होणारे लाभ

श्री. राम होनप
१. ईश्‍वराकडून ज्ञान घेण्याची वेळ, स्थळ, विषय सर्वकाही ईश्‍वराच्या हातात असल्याने साधकाची ज्ञान मिळण्याविषयी स्वेच्छा उरत नाही.
२. साधना, तसेच ज्ञानपरत्वे सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये अधिकाधिक विकसित होतात.
३. ज्ञानाच्या माध्यमातून साधकाला ईश्‍वराचा स्पर्श होतो. हा स्पर्श आनंदस्वरूप असतो. याला आध्यात्मिक त्रास असलेला साधक अपवाद असू शकतो.
४. साधकाची ग्रहणक्षमता अधिक असतांना मथळे आणि अचूक वाक्यरचना यांसह ज्ञान प्राप्त होते. त्यात व्याकरणदृष्ट्या कोणताही पालट करावा लागत नाही. त्यामुळे साधकात ईश्‍वर ज्ञानाची सेवा आपल्याकडून करवून घेत आहे, ही जाणीव निर्माण होण्यास साहाय्य होते.
५. ईश्‍वराकडून स्वतःला मिळालेले ज्ञान स्वतःच वाचतांना मनात येणार्‍या पुढील विचारांमुळे स्वतःची ईश्‍वरावरील श्रद्धा वृद्धींगत होण्यास साहाय्य होते.
अ. इतके सुंदर ज्ञान माझे नसून हे माझ्या बुद्धीपलीकडील आहे.
आ. या ज्ञानाचा कर्ता केवळ ईश्‍वरच आहे.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१५)

सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या वृत्तवाहिन्यांवरील एकांगी वार्तांमुळे बालसाधिकेला पडलेले स्वप्न आणि त्यातून ध्यानात आलेले आपत्काळाचे वास्तव !

१. दुष्काळामुळे सर्वत्र वाळवंटासारखी आणि तणावग्रस्त स्थिती
दिसणे अन् सनातनवर बंदी येणार असल्याची चर्चा असणे
    १.१०.२०१५ या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले. स्वप्नात दिसले की, मी आणि काही साधक रामनाथी आश्रमात नसून अन्य एका ठिकाणी आहोत. त्या ठिकाणी नवीन साधकही होते. सर्व जण एकमेकांना नामजपाचे महत्त्व सांगून नामजप करण्याची आठवण करून देत होते. मी, कु. वैभवी झरकर (वय १० वर्षे) आणि अन्य एक साधिका अशा तिघी जणी आम्ही एकत्रित होतो. आम्हाला रामनाथी आश्रमात जायचे होते. आश्रमात जाण्यास निघाल्यावर बाहेर वाळवंटासारखी स्थिती असल्याचे लक्षात आले. सर्वत्र तणावग्रस्त वातावरण होते. सनातन संस्थेवर बंदी घालण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. हे सर्व पाहून आम्हाला थोडी भीती वाटली. बाहेर रस्ते दिसत नव्हते; पण लोकांच्या साहाय्यासाठी इकडे-तिकडे मालगाड्या धावत होत्या. सर्वत्र दुष्काळजन्य स्थिती होती.

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना

दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ,
सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या यांचे अधिकाधिक वितरण करा !
    नोव्हेंबर २०१५ मध्ये दीपावली आणि कार्तिकी एकादशी असणार आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोेचवण्याची सुवर्णसंधी गुरुकृपेमुळे लाभत आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या 'युवा क्रांतीकारकांना संमोहित करून त्यांना कृती करण्यास भाग पाडले', असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी उद्या म्हटले, तर आश्चर्य वाटणार नाही.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.९.२०१५) 
लाखो दर्शक असणार्या् दूरचित्रवाहिन्या आणि लाखो वाचक असलेली वृत्तपत्रे यांनी पानसरे हत्या आणि संमोहन या विषयांच्या संदर्भात सनातन संस्थेविरुद्ध कितीही आरडाओरड केली, तरी शेवटी 'सत्यमेव जयते ।' हेच सिद्ध होणार आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.१०.२०१५) 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व 
कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. 
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

प्रत्येक कृती परमेश्‍वरी कार्य म्हणून करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्‍वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्‍वर आपल्यापासून फार दूर नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शोभा डे यांचे अशोभनीय वर्तन !

     भारतात सध्या आधुनिक विचारवंतांना सुकाळ आला आहे. ट्विटर फेसबूक यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमांतून ते त्यांचे अमोघ विचार लोकांपर्यंत पोहोचवत असतात. या विचारवंतांना हिंदूंच्या कसल्याच गोष्टी रूचत नाहीत. हिंदु समाज हा २-३ सहस्र जुन्या काळात रहाणारा, कोणतेही मॅनर्स एटीकेट्स नसलेली जमात आहे, अशी यांची धारणा आहे. त्यामुळे हिंदूंनी गोमांस खाल्ल्यामुळे आमच्या धर्मभावना दुखावतात, असे म्हटल्यावर या विचारवंतांमध्ये शंभर हत्तींचे बळ संचारून ते हिंदूंना विरोध करण्यास सरसावतात. त्यातलाच एक महाभाग म्हणजे शोभा डे ! मी आताच गोमांस खाल्ले आहे. मला मारा !, अशा आशयाचे ट्विट त्यांनी काही दिवसांपूर्वी केले असून त्यामुळे गदारोळ माजला आहे. उत्तरप्रदेशातील दादरीमध्ये मुसलमानाच्या घरात गोमांस आणले म्हणून एका गटाने त्या घरातील अखलाक नामक व्यक्तीला ठार मारले. त्यानंतर पुन्हा एकदा गोमांस खाणारे आणि गोमांसाला विरोध करणारे जे प्रामुख्याने प्रखर हिंदू आहेत, यांच्यात जुंपली. त्या वेळी शोभाबाईंनी या वादात उडी घेतली आणि स्वतःची अक्कल पाजळली. केवळ नामधारक असणारे असे हिंदूच हिंदु धर्माच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे त्यांचा समाचार घेणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn