Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) गोवंशहत्या बंदीच्या विरोधासाठी गणेशोत्सवात बैल कापणार !

 • एम्आयएम्च्या संभाजीनगर जिल्हाध्यक्षाची चिथावणी !
 • बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्ववाद्यांना नाहक तडीपार करणारे पोलीस एम्आयएम्च्या या जिल्हाध्यक्षाला अटक करण्याचे धैर्य दाखवतील का ? 
 • शुक्रवारी संभाजीनगर बंदची चेतावणी
खासदार चंद्रकांत खैरे
     संभाजीनगर - येथील मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एम्आयएम्चे) जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी गोवंशहत्या बंदीच्या विरोधात १८ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर बंद करण्याची चेतावणी दिली आहे. चिथावणीखोर विधाने करतांना कुरैशी पुढे म्हणाले, गोवंशहत्या बंदी हे आमच्या धार्मिक प्रथांवर आक्रमण आहे. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मीच बैलाची कत्तल करतो. पोलिसांनी मला अटक करावी. त्या दिवशी माझ्यासमवेत शेकडो लोक असतील. तेही स्वतःला अटक करून घेतील.(हिंदूंच्या सणात विघ्न निर्माण करण्यासाठीच धर्मांधांचे नेते अशा प्रकारची चिथावणीखोर विधाने करतात, हे स्पष्ट होते !

अलिबाग (जिल्हा रायगड) येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या पुढाकारामुळे धर्मद्रोही कृत्रिम हौदाचा उपक्रम बंद !

अलिबागच्या नगराध्यक्षांचे सर्वत्रच्या लोकप्रतिनिधींनी अनुकरण करावे !
      अलिबाग (जिल्हा रायगड) - येथे गेल्या तीन वर्षांपासून रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृत्रिम हौदाचा उपक्रम राबवण्यात येत होता. त्यावेळी श्री गणेशमूर्तींची झालेली विटंबना सहन न झाल्याने नगरसेवक श्री. संजय शिवलकर आणि नगराध्यक्ष श्री. प्रशांत नाईक यांनी सदर उपक्रम यावर्षी अलिबाग येथे राबवू नये, असे जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे येथे कृत्रिम हौद बांधले जाणार नाहीत. (धर्मद्रोही उपक्रमाला यशस्वी विरोध करून धर्मकर्तव्य पार पाडणारे अलिबाग येथील श्री. संजय शिवलकर आणि नगराध्यक्ष श्री. प्रशांत नाईक यांचे अभिनंदन ! असे लोकप्रतिनिधी सर्वत्र हवेत ! - संपादक) 

श्री सिद्धीविनायक मंदिरातील हिंदूंचे अर्पण अन्य धर्मियांसाठी का ?

 • हिंदु जनजागृती समितीचा रास्त प्रश्‍न
 • श्री सिद्धीविनायक मंदिर कायद्यात सुधारणा करण्याची शासनाकडेे मागणी !
डावीकडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर,
वैद्य उदय धुरी, श्री. उपेंद्र डहाके आणि
सौ. मनाली नाईक
       केंद्र आणि राज्य शासनांकडून ३ सहस्र ७३४ कोटी रुपये अल्पसंख्यांकांना दिले जात असतांना हिंदूंच्या मंदिरांतील पैसाही त्यांच्यासाठी अर्पण करून स्वतःच्या मतांची जोडणी करणारे लोकप्रतिनिधी देणारे निरर्थक लोकराज्य आता पुरे ! हे अपप्रकार बंद करून मोदी शासन हिंदूंना चांगले दिवस (अच्छे दिन) दाखवेल का ? - संपादक
       मुंबई - येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात हिंदु भाविक मोठ्या संख्येने निधी अर्पण करतात. हा निधी हिंदु धर्म आणि धर्मीय यांसाठी व्यय (खर्च) होणे अपेक्षित आहे; मात्र शासनाकडून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा निधी ८२ ख्रिस्ती आणि ५४८ मुसलमान रुग्णांसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. शासन जरी धर्मनिरपेक्ष असले, तरी देव धर्मनिरपेक्ष नाही. हिंदु भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा उपयोग अहिंदूंसाठी करणे हा त्यांच्या श्रद्धेचा केलेला विश्‍वासघातच आहे. हे मंदिर जरी शासनाच्या कह्यात असले, तरी शासनाने केवळ मंदिराचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.

नेपाळ धर्मनिरपेक्ष करण्यामागे युरोपीय युनियनचा हात असल्याचा आरोप

नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा सिंहस्थातील साधू-महंतांचा निर्धार !
डावीकडून श्री महंत रामरोशनदासजी महाराज,
पू. बालयोगेश्‍वर श्री राम बालकदासजी महाराज,
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, पू. नंदकुमार जाधव
      नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करावे, यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने नव्हे, तर हिंदु संतांनीच पुढाकार घेतला. यावरून संतच खर्‍या अर्थाने राष्ट्रहितासाठी संघटन आणि संघर्ष करण्याची सिद्धता ठेवतात, हे सिद्ध होते ! त्यामुळे खर्‍या अर्थाने संतच हिंदु राष्ट्राचे प्रसारक आहेत !
      नाशिक - नेपाळ हे शेकडो वर्षे हिंदु साम्राज्य होते. वर्ष २००६ मध्ये त्याला धर्मनिरपेक्ष दर्जा देण्यात आला. तेथील ९५ टक्के अर्थव्यवस्था ही भारतावर अवलंबून आहे. भारत आणि नेपाळ यांची संस्कृती समान आहे. नेपाळमध्ये युरोपीय युनियन कोट्यवधी रुपये पैसे व्यय करून तेथील राज्यघटना धर्मनिरपेक्ष बनावी, यासाठी षड्यंत्र रचत आहे. त्यामुळेच १४ सप्टेंबरला नेपाळच्या घटना समितीने बहुमताने हिंदु राष्ट्र नाकारले आहे. हे षड्यंत्र भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने लक्षात घ्यावे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आग्रा येथे सेंट स्टीफन विद्यालयात क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन

फ्लेक्स प्रदर्शनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देतांना
हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजीव शर्मा
     आग्रा - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सेंट स्टीफन विद्यालयात क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा इयत्ता सहावी ते १२ वीपर्यंतच्या १ सहस्र ५०० विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. या विद्यार्थ्यांना समितीचे श्री. संजीव शर्मा आणि श्री. अजय अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. 
क्षणचित्रे 
१. शाळेच्या शिक्षकांनी समितीच्या संकेतस्थळाविषयी माहिती करून घेतली.
२. व्यवस्थापकांनी शाळेच्या एका दुसर्‍या शाखेतही असे प्रदर्शन लावण्याची विनंती केली आहे. 
३. मुख्याध्यापिका दर ३० मिनिटांनंतर स्वत: येऊन प्रदर्शनाच्या ठिकाणी काही हवे नको का, ते पहात होत्या.

वाराणसी येथे वन्दे मातरम् राष्ट्रीय दिन साजरा

हिंदु युवा वाहिनीतर्फे भव्य शोभायात्रा
     वाराणसी - वन्दे मातरम् राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने हिंदु युवा वाहिनीकडून ७ सप्टेंबर या दिवशी क्रांतीकारकांच्या देखाव्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत येथील गोरक्षनाथ मंदिरचे महंत, हिंदु युवा वाहिनी, विश्‍व हिंदु महासंघ, भाजप नेते, हिंदु जनजागृती समिती आणि वन्दे मातरम् संघर्ष समिती यांसह अनेक धर्माभिमानी यांनी सहभाग घेतला. या शोभायात्रेला श्री गोरक्षनाथ मंदिरापासून प्रारंभ करण्यात येऊन गोदौलिया उधमसिंह स्मारक येथे समारोप करण्यात आला.

तमिळनाडूत वयोवृद्ध मिशनर्‍याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार : मुलगी प्रसुत झाल्यावर घटना उघड

मिशनर्‍याकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर होणार्‍या बलात्काराच्या संदर्भात 
वृत्तवाहिन्या एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! 
      चेन्नई - एका १४ वर्षीय मुलीने अपत्याला जन्म दिल्यावर पोलिसांनी तिच्यावर बलात्कार करणार्‍या ६५ वर्षीय ख्रिस्ती मिशनर्‍याला ९ सप्टेंबर या दिवशी अटक केली. पीडित मुलगी गांधीनगर येथील पॉल इमान्युएल चालवत असलेल्या बालगृहात ख्रिस्ताब्द २०१४ पासून राहत होती. त्यावेळी पॉलच्या प्रभुदास नावाच्या मिशनरी पित्याने पीडित मुलीवर अनेकदा बलात्कार केला. त्याने ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. काही दिवसानंतर पीडित मुलगी बालगृहातून शोलीनागानाल्लूर येथील तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली असता ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. तिने ९ सप्टेंबर या दिवशी एका रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिला जन्मदात्याचे नाव विचारण्यात आले. तेव्हा तिने प्रभुदास याचे नाव सांगितले. पिडीत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी प्रभुदास यास अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

हंगेरीकडून सहस्रो निर्वासित स्थानबद्ध

 • निर्वासितांना हाकलून देण्याची हंगेरी शासनाची चेतावणी
 • भविष्यातील धोका जाणून आक्रमक 
 • उपाययोजना आखणार्‍या हंगेरीच्या राज्यकर्त्यांकडून भारतीय राज्यकर्ते काही बोध घेतील का ?
     बुडापेस्ट (हंगेरी) - जिहादी संघटना आय.एस्.आय.एस्.च्या भयाने सिरिया आणि इराक, तसेच त्यांच्या आजूबाजूच्या देशांतून मोठ्या संख्येने नागरिक स्थानांतर करत आहेत. हे सर्व नागरिक युरोपिय देशांकडे वळत असून हंगेरी या युरोपमधील देशाने सुमारे १० सहस्र निर्वासित नागरिकांना स्थानबद्ध करून ठेवले आहे. या सर्व निर्वासितांना काही दिवसांतच हाकलून दिले जाईल, अशी चेतावणी हंगेरी शासनाने दिली आहे. हंगेरीने निर्वासितांकडून युरोपमध्ये येण्यासाठी वापराला जाणारा मार्ग, तसेच लोहमार्ग बंद करून टाकला आहे. पश्‍चिम आशियाकडून येणारा एकही निर्वासित हंगेरीत घुसू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका येथील शासनाने घेतली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस विक्री चालूच राहील !

पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांचे भारतीय न्यायव्यवस्थेला आव्हान देणारे विधान
     जम्मू - काहीही झाले, तरी जम्मू-काश्मीरमध्ये गोमांसविक्री चालूच राहील, असे विधान सत्ताधारी पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पीडीपीच्या) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केले. येथील उच्च न्यायालयाने नुकताच राज्यात गोमांसाच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश दिला, तसेच या आदेशाची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातील सूचनाही पोलिसांना केली. त्या पार्श्‍वभूमीवर मुफ्ती यांनी विधान केले.

बिहारमधील प्रत्येक चौथा युवक बेरोजगार !

हीच का भारतीय लोकराज्याची फलनिष्पत्ती ? लोकहो, येत्या निवडणुकीत तुमच्याकडे 
मते मागण्यासाठी येणार्‍या राज्यकर्त्यांना याविषयी खडसवा !
     पाटलीपुत्र (पाटणा) - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध संस्थांकडून बिहारच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तशाच एका संस्थेने सिद्ध केलेल्या अहवालानुसार तेथील प्रत्येक चौथा युवक बरोजगार असल्याचे स्पष्ट होते. बेरोजगाराच्या अत्यल्प संधी हे यामागील प्रमुख कारण असल्याचे या अहवालात म्हटले आहे. (समाजजीवन सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)

सर्वोच्च न्यायालयाकडून खटला रद्दबातल

धोनीला भगवान विष्णूच्या रुपात दाखवण्यात आल्याचे प्रकरण
     नवी देहली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला भगवान विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. एप्रिल २०१३मध्ये एका मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीला भगवान विष्णूच्या अवतारामध्ये दाखवण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर त्याच्या हातात पादत्राणेही दाखवण्यात आली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी धोनीच्या विरोेधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात बेंगळुरू उच्च न्यायालयाने धोनीच्या विरोधात अटक वॉरट काढले होते. या विरोधात धोनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर धोनी यांच्या अधिवक्त्याने सदर मासिकाने परस्परच हे छायाचित्र प्रसिद्ध केल्याचा युक्तीवाद केला. त्यानंतर धोनीविरुद्धचा हा खटला रद्दबातल ठरवण्यात आला. (कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय वरचे न्यायालय फिरवते, म्हणजे कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश सक्षम नाहीत. असे असतांना त्यांना सेवानिवृत्त का करत नाहीत ? - संपादक)

गीताप्रेसच्या कर्मचार्‍यांचा संप मागे

      गोरखपूर (उत्तरप्रदेश) - वेतनवृद्धीच्या मागणीसाठी गेले अनेक दिवस संपावर असणारे गीताप्रेस या हिंदु धार्मिक पुस्तके छापणार्‍या संस्थेचे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. गीताप्रेसच्या व्यवस्थापकीय समितीने कर्मचार्‍यांची वेतनवृद्धीची मागणी स्वीकार केल्याने कर्मचार्‍यांनी त्यांचा संप मागे घेतला.

आय.एस्.आय.एस्.च्या ४ समर्थकांना केरळ येथे अटक

      कोझिकोड (केरळ) - आय.एस्.आय.एस्.चे समर्थक असणार्‍या ४ युवकांना केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. दोन जणांना कोझिकोड विमानतळ, तर अन्य दोन जणांना तिरुवअनंतपूरम् येथील विमानतळावर कह्यात घेण्यात आले. या चारही जणांना आतंकवादाचे प्रशिक्षण देऊन भारतात परत पाठवण्यात आल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

देशात ‘इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट डॉट कॉम’ संकेतस्थळाला प्रारंभ

     हुबळी (कर्नाटक) - निर्दोष लोकांच्या सामूहिक हत्या, अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवर बलात्कार, त्यांची बाजारात विक्री करणे आणि ऐतिहासिक ठेवे नष्ट करणे अशी अमानवी कृत्ये करणार्‍या आय.एस्.आय.एस्.चा प्रसार भारतात दिवसागणिक वाढत आहे. या दृष्टीने भारतीय युवकांना जागृत अन् संघटित करण्यासाठी 'इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट डॉट कॉम' या नावे संकेतस्थळ (वेबसाईट) चालू करण्यात आले आहेे. या संकेतस्थळाची जागृती करण्यासाठी येथील 'प्रेस क्लब'मध्ये १५ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद, श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष श्री. बसवराज बुद्धीहाळ, 'इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट'चे दक्षिण भारत समन्वयक श्री. गंगाधर कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

हुबळी येथे पत्रकार परिषद 
पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. बसवराज बुद्धीहाळ, श्री. गंगाधर कुलकर्णी,
 श्री. प्रमोद मुतालिक, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. गुरुप्रसाद


सिंहस्थपर्वात पोलिसांच्या झुंडशाहीमुळे भाविक अप्रसन्न !

अशा पोलिसांना हिंदु राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा देण्यात येईल !
सिंहस्थपर्वातील दुसरे राजयोगी स्नान 
स्नान करण्यासाठी जाणार्‍या भाविकांना
बळजोरी करून अडवणारे पोलीस
      त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १५ सप्टेंबर (वार्ता.) - येथे सिंहस्थपर्वासाठी आलेल्या देश- विदेशातील भाविकांना पोलिसांविषयी कटू अनुभव आले. काही ठिकाणी पोलिसांनी भाविकांना साहाय्य केले, तरी बर्‍याच ठिकाणी पोलिसांनी साधू-महंत आणि भाविक यांना अरेरावीची भाषा वापरल्याने पोलिसांविषयी भाविकांमध्ये अद्यापही अप्रसन्नता आहे. मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेल्या भक्तांना १० ते १२ घंटे दर्शनासाठी लागतील, असे सांगून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रकारही सिंहस्थपर्वात पोलिसांकडून घडला. ठिकठिकाणी भाविक पोलिसांच्या अयोग्य वागण्याविषयी अप्रसन्नता व्यक्त करत आहेत. एकंदरित सिंहस्थपर्वात पोलिसांनी भाविकांवर दबावतंत्राचा बर्‍याच प्रमाणात वापर केल्याचे निदर्शनास आले. (अशा पोलिसांना हिंदूंनी कर देऊन पोसायचे कशाला ? भाविकांना अशा प्रकारे त्रास देऊन त्यांची कुचेष्टा करणारे असे धर्मद्रोही पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील ! - संपादक)

भाजपच्या राज्यात आता गणेशोत्सवातील ढोल पथकांवरही पोलिसी नियमांची बंधने!

अशा प्रकारे पोलिसांनी कधी अन्य धर्मियांच्या उत्सवांतील 
 वाद्यांवर नियम लादले आहेत का ? हेच मोदी शासनाचे धर्मप्रेम का ?
     पुणे - पुण्यातील मिरवणुकांचे वैशिष्ट्य असलेल्या ढोल पथकांवर पोलिसांनी बंधनांचा हातोडा चालवला आहे. ढोल पथकांसाठी पोलिसांनी अनुज्ञप्ती (परवाने) घेण्याचे बंधन घातले आहे. स्थिर वादनासाठी संबंधित गणेशोत्सव मंडळाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र (एन्ओसी) घेणेही बंधनकारक केले आहे. (अशा प्रकारची बंधने पोलिसांनी कधी मोहरमच्या मिरवणुकांना घातली आहेत का ? केवळ हिंदूंच्या सणांत विघ्ने आणणार्‍या अशा पोलिसांना निलंबित करा ! - संपादक) 

कल्याण (ठाणे) आणि चेंबूर (मुंबई) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

     मुंबई - विविध राष्ट्र आणि धर्म विषयक मागण्यांसाठी शिवशाही प्रतिष्ठान, मानखुर्द, हिंदु नववर्ष स्वागतयात्रा समिती, चेंबूर, बजरंग दल, शिवसेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १३ सप्टेंबर या दिवशी चेंबूर (पू.) रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. साध्या वेशातील पोलिसांनी येऊन या आंदोलनाचे चित्रीकरण केले. (असे लक्ष आतंकवाद्यांकडे ठेवले असते, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता. - संपादक) 

 आंदोलनस्थळी मार्गदर्शन करतांना श्री. नरेंद्र सुर्वे
आपण १०० कोटी हिंदू फक्त नावाला आहोत का ? 
- श्री. सुभाष गायकवाड, शिवशाही प्रतिष्ठान, मानखुर्द 
     काश्मीरमध्ये आय.एस्.आय.एस्. आणि पाकचे झेंडे फडकवले जातात, आपल्या सैनिकांवर आक्रमणे होत आहेत. फँटमसारख्या भारतातील चित्रपटांवर बंदी घातली जाते आणि आपण काय करतो, त्यांचे कार्यक्रम भारतात साजरे करतो. हिंदु म्हणून आपण काय कृती करतो ? 
     नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भारताने साहाय्य केले पाहिजे केले पाहिजे, असे प्रतिपादन शिवशाही प्रतिष्ठानच्या श्री. अक्षय वरखडे यांनी केले. 
  आपण जन्माने नाही, तर कर्माने हिंदू असले पाहिजे ! - किशोर आवटी, हिंदुत्ववादी 
     आपल्याकडे मूर्तीदान केले जाते. त्या मूर्तींचे अवयव वेगळे करून त्यांची बारीक पूड करून बागेत वापरण्यात येते. ही विटंबना आपण रोखली पाहिजे. 
मुंबई महानगरपालिकेला आव्हान करा की, 
हे धर्मद्रोही कार्यक्रम बंद करा ! - श्री. नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती 
     'हल्ली गणेशोत्सव म्हणजेच प्रदूषण', असा चुकीचा प्रचार काही तथाकथित निधर्मी समाजसुधारक लोक समाजामध्ये करत आहेत. जे लोक वर्षातून ३६० दिवस पर्यावरण वाचवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत ते गणेशोत्सव आला की, जलप्रदूषणाच्या नावाखाली मूर्तीदान करा आणि मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करा, असे आव्हान करतात आणि आम्ही हिंदू त्याला बळी पडतो. 

या आंदोलनात केलेल्या मागण्या ! 
 • वाढत्या लोकसंख्येमुळे भारताच्या साधनसंपत्तीवर निर्माण होणारा ताण दूर करण्यासाठी शासनाने समान नागरी कायदा करण्यासारख्या ठोस उपाययोजना कराव्यात. 
 • पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवणे, हे राष्ट्रद्रोहाचे गंभीर कृत्य ठरवून त्यात सहभागी होणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
 • हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मूर्तीदान आणि तिचे कृत्रिम तलावात विसर्जन या कृती बंद कराव्यात.
 • धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे समुद्र, नदी वा वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी सूचना द्याव्यात, तसेच मागील वर्षी दान केलेल्या मूर्तींची विटंबना करणार्‍यांवर कारवाई व्हावी.
 • नेपाळ हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घ्यावा ! 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विश्‍वव्यापी कार्यास तन, मन, धनाने सहकार्य करणार ! - जिज्ञासू

 • द्वितीय पर्वणीला एका दिवसात ७ सहस्र जिज्ञासूंची भेट, तर आतापर्यंत ३२ सहस्र जिज्ञासूंनी पाहिले प्रदर्शन !
 • सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने नाशिक येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विषयावरील प्रदर्शन
द्वितीय राजयोगी स्नानाच्या दिवशी प्रदर्शन
पहाण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी

गणेशमूर्तींची विटंबना करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! विरेश अहिर, हिंदु जनजागृती समिती

कल्याण (ठाणे) आणि चेंबूर (मुंबई) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
     कल्याण, १५ सप्टेंबर (वार्ता.) हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मूर्तीदान आणि गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन या कृती बंद कराव्यात. धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे समुद्र, नदी किंवा वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी सूचना द्याव्यात. कृत्रिम तलावातून बाहेर काढलेल्या मूर्तींचे पुनर्विसर्जन करणार्‍यांवर, तसेच दान केलेल्या मूर्तींची विटंबना करणार्‍यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विरेश अहिर यांनी केली. 

माळेगाव (जिल्हा पुणे) येथे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन

       बारामती - येथील माळेगाव भागातील शारदानगर या परिसरातील अर्जुन गार्डन मंगल कार्यालय येथे ७ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या वतीने जिल्हा परिषदेची शाळा आणि त्याचे विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यालयाचे मालक श्री. संतोष देवकाते यांनी २०० विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक यांच्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी श्री. देवकाते यांनीच सनातनच्या साधकांना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले.
     सनातनच्या सौ. सिंधु कुंभार यांनी गणेशोत्सव आदर्श आणि धर्मशास्त्रानुसार कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्तीचे अध्यात्मशास्त्र, तसेच आरती आणि विसर्जन यांमागील अध्यात्मशास्त्र आदी सूत्रांवर मार्गदर्शन केले. तसेच वाढदिवस कसा साजरा करावा ? हा विषयही समजावून सांगितला.

मुंबईत रिक्शाची नवी अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य ! - दिवाकर रावते

     मुंबई, १५ सप्टेंबर (वार्ता.) - लवकरच परिवहन विभागाकडून मुंबई महानगरपालिकेसाठी एक लक्ष नवीन अनुज्ञप्ती वितरित केले जाणार आहेत; मात्र त्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक असेल, अशी अट परिवहन विभागाकडून घालण्यात आली आहे. संबंधित रिक्शाचालकाला मराठी भाषा येते की नाही, हे तपासण्यासाठी अनुज्ञप्ती देण्यापूर्वी लेखी भाषेची परीक्षा घेण्यात येईल आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावरच अनुज्ञप्ती देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी केली.

सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा मंडळाची तृतीय वार्षिक सभा उत्साहात !

     मिरज, १५ सप्टेंबर (वार्ता.) - सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा मंडळाची तृतीय वार्षिक सभा गर्डर विठ्ठल मंदिर येथे मंडळाचे संस्थापक ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली. या वेळी लोकजागरचे संपादक श्री. प्रवीण कवठेकर यांच्यासह १२५ हून अधिक वारकरी उपस्थित होते. या वेळी वारकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर, तसेच पुढील वाटचालाविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली. या वेळी ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज म्हणाले, हिंदु धर्मावर सध्या विविध बाजूंनी आघात होत आहेत. या आघातांच्या विरोधात वारकर्‍यांनीही यथाशक्ती कृती करावी.

पाणीटंचाईच्या काळात 'पुरापासून सावधान' हे विज्ञापन अनवधानाने प्रकाशित !

पुणे महानगरपालिकेचा अक्षम्य निष्काळजीपणा ! 
     पुणे, १५ सप्टेंबर (वार्ता.) - राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतांना, तसेच पुण्यातही पाणीकपात चालू असतांना महानगरपालिकेच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी 'पुरापासून सावधान' असे विज्ञापन देण्यात आले होते. आयुक्त, महापौर, उपआयुक्त (समाजकल्याण) यांच्या नावाने हे विज्ञापन देण्यात आले होते. नागरिकांनी पुरापासून सावधानता कशी बाळगावी, या संदर्भातील हे विज्ञापन काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही करण्यात आले होते. या प्रकरणी जागरूक नागरिकांनी आवाज उठवल्यावर हे विज्ञापन अनवधानाने देण्यात आल्याचा खुलासा महानगरपालिकेचे माहिती आणि जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी केला आहे. उपायुक्त विशेष आपत्ती व्यवस्थापन यांच्या कार्यालयाने सदर विज्ञापन 'रुटीन'प्रमाणे प्रसिद्धीसाठी दिल्याचे सांगितले. (महानगरपालिकेचा भोंगळ कारभार ! इतके पाट्याटाकू वृत्ती अंगी भिनलेले पालिका प्रशासन कसा कारभार करत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

पालकमंत्री गिरीष बापट यांच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून तक्रार

असे मंत्री विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवणार ? 
     पुणे, १५ सप्टेंबर - पालकमंत्री गिरीष बापट यांनी विद्यार्थी हक्क परिषदेच्या सभेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना 'तुम्ही ज्या 'व्हिडीओ क्लिप्स' रात्री बघता त्या मीही बघतो', असे विधान केले होते. संबंधित अश्‍लील व्हिडीओ बघण्यास कायदेशीररीत्या बंदी आहे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री. चेतन ओसवाल आणि श्री. योगेश आमटे यांनी गिरीष बापट यांच्या वक्त्यव्यावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती अर्जाद्वारे पोलिसांना केली आहे.

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान रेल्वेगाडी घसरल्याने दिवसभर पश्‍चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

     मुंबई - पश्‍चिम रेल्वेवरील अंधेरी-विलेपार्ले दरम्यान विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणार्‍या लोकलचे ६ डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे पश्‍चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे पुष्कळ हाल झाले. लोकलचे डबे घसरल्याने अनेक प्रवाशांनी आणि महिलांनीही घाबरून गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. सध्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे लोकलगाड्या २५ मिनिटे उशिरा धावत होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. 
     काल हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले होते.

साधूग्राममध्ये प्रशासनाऐवजी नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांकडून स्वच्छता !

     नाशिक, १५ सप्टेंबर (वार्ता.) शहरातील भाविक मार्ग आणि रामकुंड परिसर येथे स्वच्छतेच्या कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदारांना येथील स्वच्छता करण्याचे काम विभागून देण्यात आले आहे. येथे १ सहस्र ६० कामगारांच्या वतीने स्वच्छता केली जात आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी स्वच्छता करणार्‍या कामगारांची संख्या अल्प असून जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांकडून स्वच्छता करण्यात येत आहे. 

महंमद पैगंबरावरील चित्रपटाला मी प्रामाणिकपणे संगीत दिले आहे ! - ए.आर्. रेहमान

'महंमद : मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटाला संगीत दिल्याचे प्रकरण 
     चेन्नई - 'महंमद : मेसेंजर ऑफ गॉड' हा चित्रपट मानवतेचा संदेश देणारा आहे. या चित्रपटाला संगीतबद्ध करतांना मला अनेक आध्यात्मिक अनुभूती आल्या आहेत. त्या वैयक्तिक असल्याने मी उघड करू शकत नाही; मात्र हे संगीत मी प्रामाणिकपणे दिले आहे, त्याची मला खंत वाटत नाही, असे संगीतकार ए.आर्. रेहमान यांनी स्पष्ट केले आहे. 

पर्वणीच्या काळातील अतिरेकी बंदोबस्ताविरोधातील जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली !

     नाशिक, १५ सप्टेंबर (वार्ता.) सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या शाही पर्वणीनिमित्त अतिरेकी पोलिसी बंदोबस्ताविरोधात उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली जनहित याचिका ११ सप्टेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने शासन पक्षाच्या बाजूने निकाल देत फेटाळली. पहिल्या पर्वणीच्या वेळी पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तात भाविकांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपक लवटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका प्रविष्ट केली होती. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, तुमच्या सणांवरील अशी विघ्ने परतवून लावण्यासाठी संघटित व्हा !
      संभाजीनगर येथील एम्आयएम्चे नेते जावेद कुरैशी यांनी गोवंशहत्या बंदीच्या विरोधात १८ सप्टेंबर या दिवशी म्हणजे गणेशोत्सवात मीच बैलाची कत्तल करतो. पोलिसांनी मला अटक करावी, असे चिथावणीखोर वक्तव्य केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
 Maharashtrake Sambhajinagarme MIMke neta ne Ganeshotsavme bail katneki chetavni di. kya aise dharmandonko shasan pahalehi giraftar karegi ? 
जागो ! : 
महाराष्ट्रके संभाजीनगरमें एमआयएमके नेताने गणेशोत्सवमें बैल काटनेेकी चेतावणी दी.
क्या ऐसे धर्मांधोंको शासन पहलेही गिरफ्तार करेगी ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ! - शिवसेना

      मुंबई - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (भाजप शासनाने ही मागणी मान्य करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाचा सन्मान करावा ! - संपादक)

वाणिज्य राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांची प्रदर्शनास भेट

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने सिंहस्थपर्व, नाशिक येथे 
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रदर्शन
श्री. दीपक केसरकर (उजवीकडे) यांचा सत्कार 
करतांना श्री. विनय पानवळकर
      नाशिक, १५ सप्टेंबर (वार्ता.) शिवसेनेचे वाणिज्य राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी सिंहस्थपर्व, नाशिक येथील हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण आणि राष्ट्ररक्षण या विषयावरील प्रदर्शनास भेट दिली. श्री. केसरकर हे श्री काळाराम मंदिर येथे दर्शनासाठी आले होते. त्या वेळी प्रदर्शनास भेट दिली. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्त जाधव-पाटील यांसह त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना प्रदर्शनाविषयी अवगत करून त्यांचा सत्कार केला. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांसह हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या वेळी श्री. केसरकर म्हणाले, "तुमचे समाजजागृतीचे कार्य मोठे आहे. या कार्यास यश मिळोे, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !"

'एक शाम पाकिस्तान के नाम' कार्यक्रम रहित करा !

'एक शाम पाकिस्तान के नाम' कार्यक्रम भारतात ठेवला ।
सतत कुरापत काढून पाक त्रास देत असतो भारताला ॥
ढिम्म शासनसुद्धा अनुमती देते असल्या कार्यक्रमाला ।
हिंदूंनो, एक होऊन कार्यक्रम रहित करून दाखवू शासनाला ॥
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
श्री. अनिल कुलकर्णी

ख्रिस्ती शाळांचा हिंदुद्वेष !

शाळेत मेंदी लावून गेल्याने फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील 'सेंट मेरी कॉन्व्हेंट'च्या मुख्याध्यापिकेने हिंदु विद्यार्थिनींना त्यांच्या हातावरील मेंदी दगडाने घासून काढून टाकण्यास भाग पाडले, तसेच विद्यार्थ्यांच्या हातांवरील राख्या तोडून फेकून दिल्या आणि काही घंटे उन्हात उभे राहण्याची शिक्षा दिली. हिंदु धर्मीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी स्वधर्माप्रमाणे कोणतीही कृती केल्यास त्यांना कठोर शासन करण्यात आल्याचे प्रकार ख्रिस्ती शाळांमध्ये सर्वत्र सातत्याने घडतात. अन्य धर्मियांकडे बघण्याची यांची शिकवण काय आहे, हे ते त्यांच्या कृतीतून सांगतात.
हिंदु पाल्यांनी स्वधर्माचरण केल्यास ख्रिस्ती शाळांना काय अडचण आहे, हे त्यांनी घोषित केलेच पाहिजे. तरीही 'इंग्रजी शिकले, तरच पुढे चांगली नोकरी मिळते आणि मुलाला चांगले इंग्रजी येत नसेल, तर त्याचे जीवन व्यर्थ आहे', असे समजणारे हिंदु पालक आपल्या पाल्यास त्याच शाळांत प्रवेश घेण्यासाठी आटापिटा करत असतात.

असे राजकारणी राष्ट्र आणि धर्म यांचे हित कधी साधतील का ? त्यांना हाकलून लावा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

     राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा खेळ आहे. येथे कुणीही आनंदी नसतो. मी राष्ट्रपतींपासून खालपर्यंत सर्वांना बघितले; मात्र कुणीही आनंदी नाही.
- नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळणमंत्री

झारखंड राज्यातील सनातन संस्थेचे प्रसारकार्य

१. वनिता मंडळाच्या कार्यक्रमात सनातनचे धर्मशिक्षणाविषयीचे प्रवचन !
    सौ. अनुराधा मोघे (पद्मनाभपूर, दुर्ग) यांच्या घरी ४.८.२०१५ या दिवशी वनिता मंडळाची बैठक झाली. या कार्यक्रमात त्यांनी सनातन संस्थेच्या सौ. अनुपमा कानस्कर यांना सणांविषयी माहिती सांगण्यास आमंत्रित केले होते. सौ. अनुपमा कानस्कर यांनी देवपूजा, देवांची मांडणी, पूजेतील साहित्य आणि सण यांविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे आयोजन वनिता मंडळ - पद्मनाभपूर, दुर्गच्या अध्यक्षा सौ. रेखा देशपांडे यांनी केले. पुढेही असे कार्यक्रम आयोजित करण्याची त्यांनी सिद्धता दाखवली.
२. मंदिरात प्रदर्शनाचे आयोजन !
    श्री हनुमान मंदिर (भिलाई नगर) येथे सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे आणि सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन प्रत्येक मंगळवारी अन् शनिवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत लावण्यात आले होते.
- श्री. हेमन्त कानस्कर, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीच्या छत्तीसगढ येथील धर्मप्रसार कार्याचा ऑगस्ट २०१५ चा आढावा

१. शाळेत फ्लेक्स प्रदर्शनाद्वारेप्रसार आणि मार्गदर्शन !
१ अ. सरस्वती शिशू मंदिर, कसारडीह, दुर्ग येथे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन ! : हिंदु जनजागृती समितीकडून सरस्वती शिशू मंदिर, कासारडीह, दुर्ग येथे १८.८.२०१५ या दिवशी क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमाकांत पाण्डेयजी, प्रधानाचार्य श्री. सुनील श्रीवास्तवजी आणि प्रभारी श्रीमती कृपा शर्मा यांनी स्वतः पुढाकार घेऊन सहभाग घेतला. विद्यार्थी फ्लेक्सवरील माहिती त्यांच्या वहीत लिहित होते. शाळेचे प्रधानाचार्य श्री. सुनील श्रीवास्तवजी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना माहिती सांगत होते.
    विद्यार्थ्यांना फ्लेक्स-प्रदर्शनाचा व्यवस्थित लाभ घेता यावा, यासाठी एकेका वर्गाला प्रदर्शन पहाण्यासाठी बोलवले जात होते. शाळेतील ४६० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

भारतियांनो, जातींसाठी नव्हे, तर राष्ट्ररक्षणासाठी एकत्र या !

 श्री. चेतन हरिहर
१. पाकिस्तान, चीन आदी शत्रूराष्ट्रे आक्रमण करण्यासाठी सिद्ध असतांना भारतातील काही लोक आणि राजकीय पक्ष हे जाती, आरक्षण यांद्वारे स्वार्थ जोपासत असणे
भारत ही साधू-संतांची भूमी आहे. अशा भारताची आजची स्थिती पाहिल्यास अनेक नागरिक भारताला दिवसेंदिवस विनाशाकडे नेणार्याशच कृती करत आहेत, असे लक्षात येते. आज भारत अंतर्बाह्य सुरक्षित नाही. एकीकडे पाकिस्तान आपल्याला परमाणू बॉम्बसंबंधी धमकी देत आहे, दुसरीकडे चीन भारतीय समुद्रावर आपले वर्चस्व गाजवण्याची भीती दाखवत आहे, तर श्रीलंका भारतीय मच्छिमार्याांना पकडून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे. या बाह्य अडचणी झाल्या. यांपेक्षा अंतर्गत अडचणी विपरीत आणि भयंकर आहेत. 
सध्या राष्ट्ररक्षणासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे, तरीही काही लोक आणि राजकीय पक्ष हे जाती, आरक्षण, अधिकार (हक्क), सत्ता मिळवणे यांद्वारे स्वार्थासाठी कार्यरत आहेत. या सर्वांनी एक लक्षात घ्यावे की, आपला देश राहिला, तर आपण राहू. त्यामुळे आपण स्वार्थ सोडून एकत्र येणे आवश्यक आहे. 

राजनैतिक संरक्षणाच्या नावाखाली सौदी अरबच्या वासनांध आणि क्रूर धर्मांधाला सूट नको !

१. बलात्कारी सौदी नागरिकाला
राजनैतिक अधिकारी असल्यामुळे संरक्षण
एक सौदी नागरिक. भारतात गुडगावमध्ये दोन नेपाळी महिलांना आपल्या आलिशान घरात कोंडून ठेवतो. मनात येईल तेव्हा त्यांच्यावर बलात्कार करतो. आपल्या मित्रमंडळींना बलात्कार करायला लावतो. एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून पोलीस तेथे छापा टाकतात. त्या महिलांची सुटका करतात. तो सौदी नागरिक, त्याची पत्नी आणि अन्य दोघे यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. तरीही तो सुटतो; कारण तो सौदी अरेबियाचा राजनैतिक अधिकारी असतो. त्याला १९६१च्या व्हिएन्ना कराराने दिलेल्या राजनैतिक संरक्षणाचे कवच असते. कोणत्याही न्यायप्रिय संवेदनशील व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात जावी, असे हे प्रकरण असून, त्याबद्दल केवळ भारतियांच्याच नव्हे, तर नेपाळी नागरिकांच्याही भावना अत्यंत तीव्र आहेत.

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !
      वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
    देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. 
     जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०१५)

गणेशोत्सव मोहिमेत अधिकाधिक संख्येत सहभागी होऊन श्रीगणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी हिंदु यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !
      १७.९.२०१५ या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे. गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करून आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आदर्श मिरवणूक कशी काढावी ? मूर्तीदान अथवा कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन न करता वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याच्या संदर्भात प्रबोधनात्मक मोहीम चालू आहे. या अंतर्गत विविध गणेशोत्सव मंडळांना संपर्क करणे, राष्ट्र-धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील प्रवचनाचे नियोजन करणे, गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श ही ध्वनीचित्र-चकती दाखवणे, प्रसिद्धीसाठी अन्य वृत्तपत्रांत गणपतिविषयक लेखमाला देणे, क्रांतीकारकांचे, तसेच धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शन आयोजित करणे असे धर्मरक्षणाचे प्रयत्न केले जात आहेत.

सर्व साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् राष्ट्रप्रेमी हिंदु यांना नम्र विनंती !

मुंबईतील श्री. अरविंद तापकिरे यांच्याशी संपर्क ठेवू नये !
      कांदिवली, मुंबई येथील श्री. अरविंद तापकिरे हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. समष्टी साधना करतांना त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांमुळे यापुढे त्यांना संस्थेच्या संपर्कात न रहाण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेच्या कोणत्याही कार्याच्या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधू नये, याची सर्व वाचक, हितचिंतक, राष्ट्रप्रेमी हिंदु आणि साधक यांनी नोंद घ्यावी.

काँग्रेस आणि संत

हिंदु समाजाला साधू-संतांचे महत्त्व कळण्यासाठी हे विशेष सदर !
१. गोहत्याबंदी विधेयक अंमलात आणण्यासाठी गोप्रेमी संघटनांनी केलेल्या मागण्यांना केराची टोपली दाखवणारे गोद्रोही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शासन ! : महाराष्ट्रात प्रतिवर्षी २५ लाखांहून अधिक गायी, तसेच वासरे यांची पशूवधगृहांमध्ये अवैधरित्या हत्या केली जाते. जीवदया अभियानाच्या अंतर्गत कार्यकर्ते वारंवार धाडी टाकून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडत असले, तरी हे प्रमाण अल्प होत नाही. त्यामुळेच कायद्याने यावर बंदी घालून कडक कारवाई झाली, तर नक्कीच त्याला आळा बसू शकेल. अहिंसा संघाच्या मागणीचा शासनाकडून गंभीरपणे विचार केला जात नाही. त्यामुळेच शेवटी महासभेच्या माध्यमातून आगामी काळातील आंदोलने, तसेच कार्यप्रणाली निश्‍चित करण्यात येईल. - पू. मुनिश्री विनम्रसागरजी महाराज, अहिंसा संघ
कोटी कोटी प्रणाम !
आज वराह जयंती

गोवा बनत आहे आतंकवाद्यांचे आश्रयस्थान !

जगाच्या नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले गोवा राज्य आता आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनत आहे. इंडियन मुजाहिदीनचा सईद इस्माइल अफाक याने गोव्यात प्रशिक्षण घेतल्याची माहिती उघड झाल्यानंतर पुन्हा एकदा हे पुढे आले आहे. विशेष म्हणजे आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी गोव्यात आश्रय घेतला होता, हे स्पष्ट होत आहे; परंतु गोवा पोलिसांना त्यासंदर्भात पुसटशी कल्पनाही नसते.

सातव्या-आठव्या शतकांतील कुंभमेळ्यात साधू किंवा भाविक यांनी केलेले राजयोगी स्नान आणि वर्ष २०१५ मधील कुंभमेळ्यात व्यक्तीने केलेले राजयोगी स्नान !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले
यांनी सूक्ष्म ज्ञानाच्या आधारे वर्णिलेला भेद !
    एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना सातव्या-आठव्या शतकातील राजयोगी स्नान आणि आताच्या कुंभपर्वातील राजयोगी स्नान यांच्याविषयी सूक्ष्मातून दिसलेली प्रक्रिया आपण १३.९.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभात मध्ये पाहिली. या ठिकाणी दोन्ही कुंभमेळ्यांतील भेद दर्शवणारे लिखाण पाहूया.
    या लिखाणावरून हिंदूंच्या सात्त्विकतेत किती घट झाली आहे, ते आपल्याला लक्षात येते, तसेच कुंभपर्वाचा खर्‍या अर्थाने आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे, हेही लक्षात येते. राजयोगी पर्वणीच्या कालावधीत स्नान करून पापक्षालन होण्यासाठी निरंतर साधना करून स्वतःत भक्तीभाव निर्माण करणे आवश्यक आहे, हे यातून लक्षात येते.

आपल्या सुमधुर बोलांनी साधकांना आनंद देणार्‍या प.पू. डॉक्टरांचा सौ. उमा रविचंद्रन् यांच्याशी भ्रमणभाषद्वारे झालेला संवाद आणि प.पू. गुरुदेवांची अमृतवाणी हृदयात साठवून त्यातून भावानंद अनुभवणार्‍या सौ. उमा रविचंद्रन् !

    चेन्नई येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांचे पती श्री. रविचंद्रन् यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाचे शस्त्रकर्म करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने प.पू. डॉक्टर आणि सौ. उमाक्का यांच्यामध्ये वेळोवेळी झालेल्या भ्रमणभाषवरील संभाषणातून गुरु शिष्याच्या नकळत त्याला कसे घडवतात, हे दिसून येते. सहज संवादातून प.पू. डॉक्टरांनी साधिकेच्या यजमानांंच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच तमिळनाडूतील साधक आणि तेथील प्रसारकार्य यांची माहिती घेऊन त्यांना नवीन धर्माभिमान्यांना कार्याशी जोडून घेण्याची प्रेरणाही दिली. भक्ताला आनंद होईल अशा रितीने सौ. उमाक्का यांच्याशी बोलून त्यांंच्या हनुमानाची दास्यभक्ती या लेखाचे कौतुकही केले.

नामजपाला बसल्यावर प.पू. डॉक्टर निर्गुणाकडे चालले असून ते आणि त्यांची खोली प्रकाशयम झाल्याचे जाणवून शांतीची अनुभूती येणे

    डिसेंबर २०१४ मध्ये नामजपासाठी बसल्यावर प.पू. डॉक्टर निर्गुणाकडे निघाले आहेत, असे मला जाणवले. पूर्वी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत सूक्ष्मातून गेल्यावर प्रारंभी चित्रविचित्र तोंडवळे दिसायचे; पण आता त्यांच्या खोलीत शुभ्र प्रकाश दिसतो. तसेच प.पू. डॉक्टरही प्रकाशमय आहेत, असे वाटते. पूर्वी मनात सेवा किंवा घरचे विचार अधिक असायचे, आता प.पू. डॉक्टरांचे स्मरण केले किंवा नामजप करतांना माझ्या आजूबाजूला काय आहे, याची मला काहीच जाणीव नसते. केवळ शांती जाणवते.  अधिवक्त्या (सौ.) मनिषा माने, शिरोळ, जि. कोल्हापूर.

बेंगळुरू येथे स्थलांतरित होणार्‍या सौ. कोमला श्रीवत्स यांना चेन्नईतील साधकांनी दिलेला भावपूर्ण निरोप !

सौ. कोमला श्रीवत्स यांना चेन्नईतील
साधकांनी दिलेले प.पू. डॉक्टरांचे प्रसादरूपी चित्र
    चेन्नईतील एक साधिका सौ. कोमला श्रीवत्स बेंगळुरू येथे स्थलांतरित होणार होत्या. त्या वेळी चेन्नईतील साधकांना मनातून पोकळी जाणवली, तरी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आणि श्रीकृष्णाच्या अस्तित्वाने त्यांची साधना अडथळ्यांविना चांगली होवो, अशी प्रार्थना ते करत होते. प.पू. डॉक्टरांच्या प्रसादस्वरूपी या चित्रासमवेत त्यांना एक साडी आणि खाऊ देण्यात आला. त्या वेळी त्यांचा भाव जागृत होऊन डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.
    प.पू. डॉक्टरांच्या चित्राखाली इंग्रजी भाषेत लिहिले आहे - तुम्ही चेन्नई किंवा बेंगळुरू कुठेही असलात, तरी तुम्ही एका पवित्र स्थळी, म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी असणार !
- सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२.२.२०१४)

सौ. उमा रविचंद्रन् यांनी पू. अप्पाकाका गर्भितार्थासहित आध्यात्मिक कथा सांगत आहेत, असे चित्र रेखाटणे !

भगवान श्रीविष्णूचे नाममहात्म्य विशद करणारी
भक्त प्रल्हादाची कथा सांगणारे कै. पू. अप्पाकाका
आणि ती ऐकण्यात गढून गेलेली बालकभावातील उमा !
१. कै. पू. अप्पाकाकांच्या प्रत्यक्ष दर्शनाची संधी न लाभल्याने त्यांच्या देहत्यागाची
वार्ता ऐकल्यावर वाईट वाटणे आणि कालांतराने त्यांची दैवी उपस्थिती अनुभवता येणे
    कै. पू. अप्पाकाकांच्या (प.पू. डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू, कै. पू. वसंत बाळाजी आठवले यांच्या) देहत्यागाविषयी ऐकल्यावर मला वाईट वाटले. त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची एकही संधी मला लाभली नाही. एका अर्थी माझ्यासाठी हे चांगलेच झाले; कारण त्यांच्या स्थूल रूपाविषयी आसक्ती निर्माण न झाल्यामुळे त्यांची स्थूल रूपातील अनुपस्थितीही मला जाणवली नाही. उलट आता त्यांची दैवी उपस्थिती जाणवून आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे अधिक प्रकर्षाने जाणवते.

भक्ताचे कौतुक करणार्‍या भगवंताचा भोळेपणा आणि भगवंताने केलेले भक्ताचे कौतुक हे भगवद्गीतेतील उक्तीद्वारे भगवंताचेच कसे गुणगान आहे, हे सांगणार्‍या उमाक्कांचा चतुरपणा !

सौ. उमा रविचंद्रन्
    काही आठवड्यांपूर्वी चेन्नईतील ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनीपू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये रामनाथी आश्रमात लिहून पाठवली होती. ती वाचून प.पू. डॉक्टरांनी पत्ररूपात पुढील निरोप सौ. उमाक्का यांना पाठवला. त्यांच्या पत्राला सौ. उमाक्का यांनी भावपूर्ण उत्तर देऊन प.पू. डॉक्टरांनी घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची खंत व्यक्त करून परीक्षा घेणार्‍यानेच साधकांना उत्तीर्ण करण्याविषयी याचना केली आहे.
१. प.पू. डॉक्टरांनी पाठवलेले पत्र
सौ. उमा रविचंद्रन्,
    पू. (सौ.) अंजलीताईंचे वैशिष्ट्यपूर्ण असे गुण लिहून पाठवले, त्यासाठी धन्यवाद ! त्यांच्यासमवेत आश्रमात रहात असूनही ही गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली नव्हती.
- (प.पू.) डॉ. आठवले (१७.६.२०१५) 

तन-मन-धन अर्पून गुरुसेवा करणार्‍या साधकांना आध्यात्मिक स्तरावर आधार देऊन मातेच्या ममतेने काळजी घेणार्‍या जोधपूर, राजस्थान येथील ६९ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. सुशीला मोदी (वय ६४ वर्षे) !

सौ. सुशीला मोदी
    राजस्थान येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसार कार्याच्या विस्ताराचा फेब्रुवारी २०१५ मध्ये जोधपूरपासून आरंभ झाला. या काळात सनातन संस्थेच्या येथील साधिका ६९ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. सुशीला मोदी (वय ६४ वर्षे) यांच्याशी सेवेनिमित्त पुष्कळ संपर्क आला. या काळात जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. घरकामात साहाय्य करणेे
    सौ. सुशीला मोदीभाभी सेवेला बाहेर पडण्यापूर्वी प्रतिदिन घरातील विविध कामांत सुनांना साहाय्य करतात.
२. सेवेचाच ध्यास असल्याने एका वेळी अनेक सेवा करणे
२ अ. प्रतिष्ठित कुटुंबातील असूनही झोकून देऊन गुरुसेवा करणेे : मोदीभाभी मासिक सनातन प्रभातचे वितरण करणे, मासिकासाठी विज्ञापने मिळवणे, शाळाशाळांत सनातन वह्या आणि क्रांतीकारकांचे प्रदर्शन पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, अधिकाधिक लोकांपर्यंत पंचांग पोेहोचवणे, अशा एक ना अनेक सेवांत सतत व्यस्त असतात. माहेश्‍वरी समाजातील महिलांना काही सामाजिक बंधने असतात, तरीही त्यांनी स्वतःला गुरुसेवेसाठी याप्रमाणे झोकून देणे, हे वाखाणण्याजोगे आहे.

सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या, अखंड कृष्णनामात रमणार्‍या आणि इतरांनाही भावावस्थेत ठेवणार्‍या संतशिरोमणी पू. हेमलता दासआजी (वय ७८ वर्षे) !

पू. श्रीमती हेमलता
दासआजी
    सनातनच्या ३८ व्या संत पू. दासआजी ३.१.२०१४ मध्ये दादर सेवाकेंद्रात आल्या होत्या. या कालावधीत मीपण दादर सेवाकेंद्रात सेवेनिमित्त होते. तेव्हा मला पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे. हे भगवंता, ही सूत्रे तूच लिहून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
१. पू. दासआजींची गुणवैशिष्ट्ये
१ अ. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे
१ अ १. प्रवासात त्रास झाल्याने झोप न मिळाल्याचा स्वतःवर कोणताही परिणाम करून न घेता झोप आल्यावर झोपायचे अन्यथा नामजप करायचा असे सांगणे : पू. आजींच्या गोवा ते दादर या आगगाडीतील प्रवासात सभोवताली सतत वर्दळ चालू होती. त्यामुळे त्यांना रात्री झोप लागली नाही आणि वयोमानामुळे त्यांना पुष्कळ शारीरिक त्रासही झाला. झोपेची वेळ गेल्यानंतर पू. आजींना औषध घेऊनही झोप लागत नाही. याचा स्वतःवर कोणताही परिणाम करून न घेता त्या म्हणाल्या, झोप लागत नाही, याची मला काहीच अडचण नाही. त्या वेळेत मी अधिकाधिक नामजप करू शकते. श्रीकृष्णाचे अधिकाधिक स्मरण करते. झोप आल्यावर झोपायचे अन्यथा नामजप करायचा !

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्माभिमानी यांना नम्र विनंती !
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
     भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात वापरत असलेल्या नोटांवर पेनने लिहिलेले असल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असे क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत सूचित केले होते. अशा नोटा बँकेच्या दृष्टीने कागदासमान असल्याने बाजारात त्या कोणी स्वीकारणार नाही, अशी सूचनाही बँकेने २ वर्षांपूर्वी काढली होती. 
     आतापर्यंत लोकांकडून या सूचनेचे पालन झालेले नसल्याने या संदर्भात कडक धोरण अवलंबण्याचे बँकेने ठरवले आहे. अशा नोटा चलनात चालणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्यास बँकेने आरंभ केला आहे. या संदर्भात सर्वांनी पुढीलप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे. 
१. यापुढे नोटांवर पेन किंवा पेन्सिलने काहीही लिहू नये. नोटांवर संख्या लिहायची असल्यास वेगळ्या कागदाचा वापर करून तो रबरबँडने नोटांना गुंडाळावा. कागद लावण्यासाठी स्टेपलर किंवा टाचणी यांचा वापर करू नये. 
२. सध्या उपलब्ध असणार्‍या नोटांचे पेनने, तसेच पेन्सिलने मजकूर लिहिलेल्या नोटा, असे वर्गीकरण करावे. पेन्सिलने लिहिलेला मजकूर खोडरबरने खोडून अशा नोटा स्वत:जवळ ठेवाव्यात.

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्या चुका 
मानवी आयुष्यात कालक्रमणा करतांना चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तर पुढील आयुष्य यशस्वी होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       हिंदूंनो, तुम्हाला राष्ट्र आणि धर्म यांचे खरे हित करायचे असेल, तर कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ नका. साधना करा आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व्हा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.९.२०१५)

लोकशाहीचा वरवंटा !

नेपाळला पूर्ववत 'हिंदु राष्ट्र' घोषित करण्यासाठी गेले अनेक दिवस स्थानिकांची निदर्शने आणि मोर्चे चालू होते; मात्र १४ सप्टेंबरला या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या जनतेच्या आशेवर लोकशाहीरूपी वरवंटा चालवण्यात आला. हिंदु राष्ट्राची मागणी चिरडण्यासाठी राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने जनमत घेणे सोयीस्कररित्या टाळले. घटना समितीच्या सदस्यांमध्येच मतदान घेऊन दोन तृतीयांश बहुमताने हिंदु राष्ट्राची मागणी फेटाळली. ही घटना भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करू इच्छिणार्यांसाठी आणि हिंदुत्वाचे कार्य करणार्यांघसाठी विचारप्रवण करणारी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn