Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

चक्रधरस्वामी यांची आज जयंती

नेपाळच्या घटना समितीने हिंदु राष्ट्राची मागणी फेटाळली, हिंदू संतप्त

    नेपाळमध्ये साम्यवाद्यांनी क्रांती करून हिंदु राष्ट्र संपवले. नेपाळ आणि भारत या दोन्ही राष्ट्रांत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे; म्हणून आतापर्यंत शांततापूर्वक चळवळी होऊनही त्यांचा काही परिणाम झालेला नाही. एवढेच नव्हे, तर नेपाळमधील हिंदु राष्ट्रासाठी उपोषण करणारे मेले, तरी तेथील शासनावर काही परिणाम होणार नाही. यासाठी धर्मक्रांतीच हवी !
    काठमांडू - नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने नवीन घटनेत नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचा केलेला प्रस्ताव घटना समितीच्या सदस्यांनी दोन तृतीयांश बहुमताने फेटाळला. या निर्णयाने नेपाळमध्ये हिंसाचाराने थैमान घातले असून पोलिसांनी निदर्शकांवर पाण्याचा मारा करून लाठीमार केला. या वेळी घटना समिती सभागृहाकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     सर्व पक्षीय सरकारे केवळ हिंदूंवरच धर्मनिरपेक्षता लादतात. इतर धर्मियांवर नाही, हे लक्षात घ्या !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.९.२०१५)

पाकिस्तानच्या आक्रमणात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

गृहमंत्रीजी, पाकच्या गोळीचे उत्तर भारतीय गोळीने देता येईल;
पण भारतीय सैनिकांच्या प्राणाचे मोल पाककडून कसे वसूल करणार ?
    नवी देहली - १३ सप्टेंबर या दिवशी जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याकडून गोळीबार करण्यात आला, तसेच मोर्टारचाही मारा करण्यात आला. पाकच्या या आक्रमणात सोहन लाल हे भारतीय सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी हुतात्मा झाले.  पाकिस्तानकडून फेकण्यात आलेले एक मोर्टार सोहन लाल यांच्या जवळ फुटले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पाककडून जुलै २०१५पासून आतापर्यंत १९२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सीमारेषेवर गोळीबार न करण्याचे आणि मोर्टारने आक्रमण न करण्याचे आश्‍वासन पाक सैन्याधिकार्‍यांनी नुकत्याच भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत दिले होते; पण २४ घंट्यातच पाकच्या आश्‍वासनातील फोलपणा स्पष्ट होतो.

शाहीस्नानासाठी (राजयोगी स्नानासाठी) एवढ्या पाण्याची उधळपट्टी का ? - उच्च न्यायालय

पशूवधगृह, बांधकाम आणि पेप्सीसारखी आस्थापने येथे पाण्याची
उधळपट्टी करणार्‍यांनाही न्यायालयाने खडसवावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
    नाशिक - एकिकडे निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाची झळ सोसत असतांना सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी (राजयोगी स्नानासाठी) पाण्याची उधळपट्टी का केली जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात शाहीस्नानासाठी ३ टीएम्सी पाण्याची आवश्यकता नाही. हे शासनाच्या धोरणाच्या विरोधात आहे, असे उच्च न्यायालयाने १४ सप्टेंबरला शासनाला सांगितले.
    एच्.एम्. देसरडा यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. हा पाण्याचा अपव्यय आहे. ही धर्माची सेवा नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात प्रशासकीय अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, एकूण साडेचार सहस्र दशलक्ष घनफूट एवढे पाणी या वर्षी धरणातून सोडण्यात आले आहे. यात नाशिक जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. मागील वर्षी ३ सहस्र ८०० दशलक्ष घनफूट एवढे पाणी सोडले होते.

मंगळुरू येथे इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन !

डावीकडून श्री. राजेश पवित्र, श्री. गुरुप्रसाद,
श्री. प्रमोद मुतालिक, श्री. गंगाधर कुलकर्णी, श्री. महेश कोप्प

सनातनला कुणी त्रास दिल्यास ते सहन केले जाणार नाही ! - श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज यांचे धर्मद्रोह्यांना खडे बोल

श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज
हिंदू संघटित होण्यासाठी श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य
खडेश्‍वर महाराज यांची ३८ वर्षांपासून उभे राहून साधना !
     सर्वच संतांना सरसकट भोंदू ठरवणे, देवता, धर्म यांना खोटे ठरवून हिंदु संस्कृती आणि परंपरा यांवर आघात करणारे तथाकथित पुरोगामी आणि अंनिसवाले यांना काय म्हणायचे आहे ?
    त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १४ सप्टेंबर (वार्ता.)  सिंहस्थपर्वासाठी अनेक संप्रदायाचे साधू, संत आणि महंत येथे आले आहेत. त्यातील येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील दत्तवाडी गावातील खडेश्‍वर सेवा आश्रमाचे श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज येथे आले आहेत. ते येथे त्यांच्या पर्णकुटीत दिवसरात्र उभे राहून साधना करतात.
     श्री खडेश्‍वर महाराज १६ जून १९७८ म्हणजे गेल्या ३८ वर्षांपासून उभे राहून साधना करत आहेत. ंमाझा हिंदु धर्म महान आहे. हिंदु धर्मासाठी हिंदूंनी संघटित रहावे, या उद्देशाने मी उभे राहून साधना करत आहे. सनातन संस्था आणि सनातन प्रभात हिंदूंचा श्‍वास अन् प्राण असल्याने ही संस्था आतंकवादी असूच शकत नाही. सनातनला कुणी त्रास दिल्यास ते सहन केले जाणार नाही, असे उद्गार श्री खडेश्‍वर महाराज यांनी काढले. त्यांनी अंनिस आणि इतर धर्मद्रोही यांना खडेबोल सुनावले. श्री खडेश्‍वर महाराज यांची दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने भेट घेऊन सनातनच्या कार्याविषयी माहिती दिली. या वेळी श्री खडेश्‍वर महाराज यांनी सनातन संस्थेला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगून आशीर्वादही दिले.

विश्‍वशांती, मानव कल्याण, तसेच धार्मिक जीवन, धर्मस्थळांचे रक्षण, मठ-मठाधीपती यांना स्वायत्तता देण्याची मागणी

(पुढील रांगेत) डावीकडून सागरानंद सरस्वती, महामंत्री
धर्माचार्य स्वामी हरिनारायणानंद, प.पू. गोपालानंद ब्रह्मचारी
महाराज (वय ११५), श्री गोविंदानंद महाराज आणि ब्रह्मर्षि रामकृष्णानंदजी महाराज
द्वारका पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी
स्वरूपानंद सरस्वती महाराज आणि प्रमुख आखाडे यांच्या प्रमुख
उपस्थितीत आजपासून आध्यात्मिक अन् सामाजिक जागृती अभियान प्रारंभ होणार
    श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १४ सप्टेंबर (वार्ता.) - भारत साधू समाजाच्या वतीने नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने १५ सप्टेंबरपासून विश्‍वशांती, मानव कल्याण, धार्मिक जीवन, धर्मस्थळांचे संरक्षण, मठ-मठाधीपती यांच्या धर्मस्थळांतील स्वायत्ततेचे सरंक्षण, तसेच मूल्यहीन राजकारण आणि प्रशासनात पसरलेला भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, महिलांवरील बलात्कार आदींना नियंत्रित करण्यासाठी विशेष आध्यात्मिक अन् सामाजिक जागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. जात-पात आणि धर्म यांच्या नावावर शासकीय कोष आणि आरक्षण यांची सुविधा देण्यापेक्षा सर्व गरीब लोकांना समान स्वरूपात ती दिली पाहिजे; मग त्यांची जात वा धर्म कोणताही असो. विद्यालयात धार्मिक शिक्षण अनिवार्य करणे, तसेच महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, बिहार आदी राज्यांमध्ये धर्मदाय कायद्यात सुधारणा करून शासकीय नियंत्रण काढून टाकण्यावर विचार करण्यात यावा. हे करतांना धर्माचार्यांचे महत्त्व अबाधित रहावे, अशी माहिती समस्त साधू संत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुराण आणि बायबल यांच्यात भारताचा आत्मा नाही ! - महेश शर्मा, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री

      नवी देहली - कुराण आणि बायबल यांचा मी आदर करतो; परंतु ते केवळ धर्मग्रंथच आहेत, त्यामध्ये रामायण आणि महाभारत यांच्याप्रमाणे भारताचा आत्मा नाही, असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले. शर्मा यांनी नुकताच एका वृत्तवाहिनी संवाद साधला असता ते बोलत होते. शर्मा म्हणाले, रामायण, महाभारत आणि गीता हे देशातील प्रत्येक शाळेत बंधनकारक करायला हवे. देशाचा सांस्कृतिक मंत्री असल्याने गीता आणि रामायण यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, यासाठी मी केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या संपर्कात आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीने भारतीय संस्कृती प्रदूषित केली, असेही ते म्हणाले.

महंमद-मेसेंजर ऑफ गॉडमधून प्रेषित महंमद यांचा अवमान ! - रझा अकादमी

चित्रपटात हिंदु देवतांचे विडंबन झाल्याविषयी हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध
केला असता, तर वाहिन्यांनी काहूर माजवले असते ! आता मात्र त्यांची वाचा गेली आहे !
संगीतकार ए.आर्. रहमान आणि चित्रपट निर्माते माजिदी यांच्याविरुद्ध फतवा
      नवी देहली - महंमद-मेसेंजर ऑफ गॉड हा चित्रपट इस्लाम आणि प्रेषित महंमद यांचा अवमान करणारा आहे, असा दावा रझा अकादमीने केला आहे, तर या चित्रपटाचे निर्माते मजिद माजिदी आणि सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांनी इस्लामविरोधी काम केल्यावरून त्यांच्या विरुद्ध हाजी अली मशिदीचे इमाम मुफ्ती मेहमूद अख्तर यांनी फतवा काढला आहे. या दोघांनी पुन्हा कलमा म्हणून आपले इमान बळकट करावे, असे मौलानांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कारागृहावर सशस्त्र आक्रमण

४०० कैद्यांची सुटका, ११ ठार
     काबूल - तालिबानी आतंकवाद्यांनी अफगाणिस्तानमधील गजनीच्या कारागृहावर आत्मघातकी आक्रमण करून ४०० हून अधिक कैद्यांची सुटका केली आहे. अफगाणी सैनिकांच्या वेेषात मध्यरात्री केलेल्या या आक्रमणात ४ सुरक्षारक्षक आणि ७ आतंकवादी ठार झाले. तालिबान्यांच्या दाव्यानुसार सोडवण्यात आलेल्या कैद्यांमध्ये त्यांच्या १५० सहकार्‍यांचा समावेश आहे.
     वरिष्ठ शासकीय अधिकारी मोहम्मद अली अहमदी यांनी माहिती दिल्यानुसार २ संशयित आत्मघातकी आतंकवाद्यांनी एका चारचाकी वाहनात बसून कारागृहाचे मुख्य दार स्फोटाद्वारे उडवले. या आतंकवाद्यांचे मृतदेह घटनास्थळी मिळाले आहेत.

हिंदु धर्मासाठी कृती करण्यात पुढाकार घ्या ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

हिंदु जनजागृती समिती आयोजित आणि 
 हिंदु विधीज्ञ परिषद संबोधित अधिवक्ता संघटन मेळावा 
हिंदुत्वावर होणार्‍या आघातांच्या विरोधात अधिवक्ता म्हणून योगदान देण्याचा निर्धार ! 
अधिवक्त्यांना मार्गदर्शन करतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर 
     सांगली, १४ सप्टेंबर (वार्ता.) - आज आपण हिंदुत्ववादी शासन सत्तेवर आहे, असे म्हणतो; पण प्रत्यक्षात आजही हिंदूंची मंदिरे शासनाच्या कह्यात आहेत. धर्मांतराचे प्रकार होत आहेत, 'लव्ह जिहाद'ची प्रकरणे वाढत आहेत. अशा वेळी अधिवक्ते हिंदु समाजासाठी मोठे योगदान देऊ शकतात. समाजातील अनेक हिंदूंना हिंदुत्वाचे काम करत असतांना न्याय मिळत नाही. त्यामुळे हिंदु धर्मासाठी कृती करण्यात पुढाकार घ्या, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. खरे मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या अधिवक्ता संघटन मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यानंतर झालेल्या गटचर्चेत सर्वांनीच एकमेकांमधील वैचारिक देवाण-घेवाण वाढवण्याचा, तसेच हिंदुत्वावर होणार्‍या आघातांच्या विरोधात 'अधिवक्ता' या नात्याने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

(म्हणे) 'विज्ञानाच्या कसोटीवर न टिकणारी हिंदु धर्मातील अशास्त्रीय मूल्ये सोडून द्या ! '

सरसंघचालक मोहन भागवत यांचे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य 
जयपूर - हिंदु धर्मातील रूढ नीतीमूल्यांचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता असून विज्ञानाच्या कसोटीवर न टिकणारी मूल्ये सोडून द्यायला हवीत, असे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथील स्तंभलेखक परिषदेत केले. (सनातन हिंदु धर्मातील मूल्ये अजरामर आणि अढळ आहेत. जीवनातील प्रत्येक समस्येला उत्तर असणारी ही मूल्ये आहेत. जीवन जगण्यात अर्थ सापडत नाही, म्हणून सहस्त्रावधी पाश्‍चिमात्य लोक हिंदु धर्माचा अभ्यास करायला लागले आहेत. हिंदु धर्म स्वीकारून ते हिंदु जीवनशैली जगत आहेत. हिंदु धर्मात त्यजण्यासारखे काहीच नाही. असे असतांना सरसंघचालक म्हणतात त्याप्रमाणे हिंदु धर्मातील मूल्यांची उपयुक्तता ठरवण्यासाठी विज्ञान नव्हे, तर साधना आवश्यक आहे - संपादक) 
सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले, "कालबाह्य ते फेकून देऊन जगभरातील शाश्‍वत आणि चांगली मूल्ये स्वीकारण्याची भारतीय समाजाची परंपरा राहिली आहे. त्यामुळेच जीवनातील विविध समस्यांवर हिंदु तत्त्वज्ञानाच्या दृष्टीकोनातूनच पाहिले पाहिजे." 

हिंदूंना गणेशोत्सव मोकळेपणाने साजरे करू द्या ! श्री. दत्ता पोवार, शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
     मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) - हिंदूंच्या गणेशोत्सवाच्या काळात प्रशासनाद्वारे घातले जाणारे जाचक नियम अन् अटी दूर कराव्यात आणि हिंदूंना गणेशोत्सव मोकळेपणाने साजरा करू द्यावा, अन्यथा त्याविरुद्धच्या लढ्यात शिवसेना हिंदूंच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख श्री. दत्ता पोवार यांनी केले. येथील सुभाष चौकात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनास ५५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली.

पुणे येथील 'नांदेड सिटी'ला खडकवासला धरणातील 'व्हॉल्व्ह'मधून २४ घंटे पाणीपुरवठा, शिवसेनेकडून चौकशीची मागणी

पुणे, १४ सप्टेंबर - खडकवासला धरण प्रकल्पात यंदा पाण्याचा तुटवडा असल्याने पुणेकरांना ३० प्रतिशत पाणीकपात केली आहे. असे असतांना 'नांदेड सिटी' या खाजगी वस्तीला (टाऊनशीप) थेट धरणाच्या तळाशी असलेल्या 'व्हॉल्व्ह'मधून २४ घंटे पाणी दिले जात आहे. जलसंपदा खात्याने कोणत्या अधिकारात अशी अनुमती दिली, याची चौकशी करण्याची मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी कृष्णा खोरे महामंडळाच्या सिंचन भवन येथे निदर्शनांद्वारे करण्यात आली. शहर शिवसेनेच्या वतीने शहर संघटक अजय भोसले, श्याम देशपांडे, सचिन तावरे यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवनावर ही निषेध निदर्शने करण्यात आली. (यापूर्वीही 'लवासा' या खाजगी वस्तीला वरसगाव येथील धरणातून पाणी देण्यात आणि अडवण्यात आले होते. आताही 'नांदेड सिटी' या खाजगी वस्तीसाठी पाणी दिले जात आहे. असे करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असून हीसुद्धा एक प्रकारे चोरी आहे. या संपूर्ण प्रकरणाची जलसंपदा विभागाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला हवी. - संपादक)

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

      धुळे - समान नागरी कायदा करावा, आयएस्आयएस्चे झेंडे फडकवणार्‍यांवर कठोर कार्यवाही करावी, नेपाळला हिंदु राष्ट्र होण्यासाठी भारताने साहाय्य करावे आणि धुळे महानगरपालिकेने कृत्रिम तलाव न बनवता वाहत्या पाण्यात गणपति विसर्जन करू द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने येथील श्री महाराणा प्रताप पुतळ्याजवळ आणि महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुलवळे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

'सरल' या उपक्रमाच्या अंतर्गत शाळांनी चुकीची माहिती दिल्यास मुख्याध्यापकांवर आता 'कलम ४२०' नाही

यामुळे चुकीची माहिती देणार्‍यांना एकप्रकारे 
चुका करण्यास रान मोकळे केल्यासारखेच होईल !
पुणे, १४ सप्टेंबर - शाळासंबंधीची चुकीची माहिती जाऊ नये, विद्यार्थी-शिक्षकांचे प्रमाण, शिक्षकांची पदोन्नती, त्यांचे वेतन आदी माहिती संकलित करण्यासाठी 'सरल' ही प्रणाली शिक्षण विभागाने सिद्ध केली आहे. ही माहिती भरतांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, असे परिपत्रक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना आले होते. त्यात विद्यार्थ्यांची अथवा शाळेची माहिती भरतांना चूक झाल्यास कलम ४२० अन्वये कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला होता. 

राजस्थान शासनाकडून बकरी ईदच्या दिवशी शासकीय आणि अशासकीय शाळा-महाविद्यालयांची सुट्टी रहित !

मानवाधिकाराच्या नावाखाली मुसलमानांचा थयथयाट ! 
  • दीनदयाल उपाध्यय यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर 
  •  मुसलमान संघटनांचा विरोध 

     जयपूर - २५ सप्टेंबर या दिवशी ईद-उल-जूहा (बकरी ईद) आहे. त्यामुळे शासकीय सुट्टी आहे. याच दिवशी थोर तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे (आताच्या भारतीय जनता पक्षाचे) दिवंगत नेते दीनदयाल उपाध्यय यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राजस्थान शासनाच्या वतीने सर्व शासकीय आणि अशासकीय शाळा, तसेच महाविद्यालये यांठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यशासनाने २ सप्टेंबर या दिवशी काढलेल्या आदेशानुसार शासकीय आणि अशासकीय शाळा आणि महाविद्यालयाच्या शिक्षक तसेच कर्मचार्‍यांना सुट्टी न देण्याचा आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुसलमान संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. 

अभिनेता रजनीकांत याने टिपू सुलतानची चित्रपट भूमिका स्वीकारू नये ! - हिंदुत्ववादी संघटना

हिंदूंवर अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानची 
भूमिका करू नये, असे हिंदु अभिनेत्यांना सांगावे का लागते ? 
पैशासाठी लाचारी पत्करणार्‍या अशा अभिनेत्यांवर बहिष्कार टाका ! 
     चेन्नई - कर्नाटकातील निर्माता आशिक खेनी याने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानाचा गौरव करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांना घेऊन त्याच्यावर एक चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले आहे. या पार्श्‍वभूमीवर टिपू सुलतान याची प्रमुख भूमिका दक्षिणेतील प्रख्यात अभिनेता रजनीकांत याने स्वीकारू नये, असे आवाहन तमिळनाडूतील भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटना यांनी केले आहे. 

खुलताबाद (जिल्हा संभाजीनगर) येथील श्री गिरिजादेवीच्या मंदिरात चोरी

काँग्रेसप्रमाणे भाजप शासनाच्या काळातही असुरक्षित मंदिरे !
     संभाजीनगर - येथील खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील श्री गिरिजादेवी मंदिरात ९ सप्टेंबरच्या रात्री चोरी झाली. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने, चांदीचा मुकुट, चांदीचे छत्र, पितळी पादुका, काही रोख रक्कम चोरली, तसेच २ दानपेट्या उचलून नेल्या. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पुजारी राजू भारती यांच्यासह शेजार्‍यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या. पुजारी लघुशंकेसाठी घराबाहेर येत असतांना त्यांना कडी असल्याचे लक्षात आले. आरडाओरड केल्यावर उपहारगृह चालकांनी कड्या उघडल्या. मंदिरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. १० सप्टेंबरला एका टेकडीवर गुराख्याला २ दानपेट्या आणि पितळी पादुका दिसल्या. पोलिसांनी दानपेट्या शासनाधीन केल्या असून त्या फोडून त्यातील रक्कम मोजण्यात आली.

धर्म, गुरु, देश आणि शास्त्र यांच्या रक्षणासाठी धर्मयुद्धाचे आवाहन करण्यासाठी आज हिंदू संमेलन !

धर्माचार्य महामंडलेश्‍वर शिवानी दुर्गा
धर्माचार्य शिवानी दुर्गा सिंह वाहिनी सरस्वती यांच्या वतीने आयोजन
      त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १४ सप्टेंबर (वार्ता.) - आज हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या धर्माचा मुलाधार असलेले वेदशास्त्र उखडण्याचा प्रयत्न होत आहे. दुर्दैवाने आपलेच लोक स्वार्थासाठी धर्माला नष्ट करण्यासाठी संस्था उघडून बसले आहेत. याला विरोध करण्यासाठी हिंदूंनी धर्मयुद्ध करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. यासाठी १५ सप्टेंबरला सर्वेश्‍वरी आश्रम, प्लॉट क्रमांक ४, पेगलवाडी, साधूग्राम त्र्यंबकेश्‍वर येथे एका हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे धर्माचार्य महामंडलेश्‍वर शिवानी दुर्गा यांनी दिली आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडला बैठकीचा सोपस्कार

गणेशमूर्ती विसर्जनामागील धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उदासीनता !
प्रशासकीय बैठकीतील अन्य सूत्रे
१. गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांकडून उद्भवणार्‍या अडचणींच्या संदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र कोणीही वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते. (ही आहे पोलीस प्रशासनाची उत्सवाप्रतीची कळकळ ! - संपादक)
२. दुपारी ३ वाजताची बैठक ४ वाजता चालू झाली. २ पोलीस अधिकारी ४.४५ वाजता बैठकीसाठी आले. पोलिसांनी दुपारी ४ वाजता त्यांना या बैठकीला जाण्याचे आदेश मिळाल्याचे सांगितले. (पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार ! - संपादक)
३. गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दिल्या जाणार्‍या त्रासाचा पाढा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून वाचण्यात आल्यानंतर बैठकीत पोलिसांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतात पाकिस्तान, आय.एस्.आय.एस्चे झेंडे फडकवणे, हा देशद्रोह ठरवून तसे करणार्‍यांवर कारवाई करा ! - हिंदु जनजागृती समिती

     शाहूवाडी, १४ सप्टेंबर (वार्ता.) - वाढत्या लोकसंख्येमुळे भारताच्या साधनसंपत्तीवर निर्माण होणारा ताण दूर करण्यासाठी शासनाने समान नागरी कायदा करण्यासारख्या ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवणे, हे राष्ट्रद्रोहाचे गंभीर कृत्य ठरवून त्यात सहभागी होणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाहूवाडी येथील तहसीलदार श्री. हृषिकेश शेळके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. दत्ता पोवार, श्री. विक्रांत पाटील, संजय पोवार, आनंदा अलेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रसाद कुलकर्णी, सुधाकर मिरजकर उपस्थित होते.

शिवसैनिक आनंद रजपूत यांच्या प्रखर भूमिकेमुळे आदर्श शिक्षण मंडळाकडून चूक मान्य !

आदर्श शिक्षण मंडळाने श्री गणेशमूर्तीविषयी धर्मशास्त्राच्या विरोधात पत्रक काढल्याचे प्रकरण
      मिरज, १४ सप्टेंबर (वार्ता.) - श्री गणेशमूर्ती शाडूची अथवी कागदाची करा, ती पाण्यात विसर्जित न करता महापालिकेने केलेल्या हौदात, तसेच घरात बालदीत, अथवा पातेल्यात करा, निर्माल्य पाण्यात न सोडता ते निर्माल्य कुंडात सोडा, असे हिंदु धर्मशास्त्रविरोधी आवाहन आदर्श शिक्षण मंडळाने केले होते. तशी पत्रके विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यावर शिवसेनेचे उत्सव समितीप्रमुख श्री. आनंद रजपूत यांनी आदर्श शिक्षण मंदिरात जाऊन याविषयी खडसवले. श्री. राजपूत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शाळेचे मुख्याध्यापक, तसेच अन्य शिक्षक यांनी हे पत्रक काढण्यात आमची चूक झाली.

कृष्णा घाटावरील निर्माल्य कलशाची दुरावस्था !

सांगली, १४ सप्टेंबर (वार्ता.) - कृष्णा नदीत शेरीनाल्यामुळे आणि नदीत सोडल्या जाणार्‍या साखर कारखान्यांच्या मळीमुळे नाही, तर निर्माल्यामुळे प्रदूषण होते, असे समज असलेल्या सांगली महापालिकेने निर्माल्यासाठी कृष्णा नदीच्या काठावर भाविकांनी निर्माल्य नदीत न सोडता ते कुंडात टाकावे म्हणून 'निर्माल्य कलश' ठेवले. या कलशांची नेहमीच दुरावस्था असते. कलशातील निर्माल्य नेहमीच इस्तत: पडलेले असते. कलशातील फुले शेळी खाते, तसेच मध्ये-मध्ये कुत्रीही या निर्माल्य कुंडात जाऊन बसतात. त्यामुळे हे कलश सध्यातरी कचराकुंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने ज्या उद्देशाने हे कलश ठेवले आहेत, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने निर्माल्य किमान नदीत विसर्जन केल्यास त्याची योग्य विल्हेवाट तरी लागेल, असे भाविकांचे म्हणणे आहे !

भाजपच्या मुसलमान नेत्याकडून गोमांस मेजवानी

राज्यातील एका सूत्रावर एकवाक्यता नसणारा भाजप कारभारात सुसूत्रता काय आणणार ?
     श्रीनगर - जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्यात गोमांस विक्रीवर बंदी घातल्यानंतर भाजप नेते खुर्शीद अहमद मलिक यांनी गोमांस मेजवानी देण्याची घोषणा केली होती. या मेजवानीला हिंदु आणि मुसलमान यांना आमंत्रित केले होते. या मेजवानीला मुसलमानांना गोमांस आणि हिंदूंना शाकाहारी भोजन देण्याचा त्यांनी बेत आखला होता. 'मी माझ्या धाार्मिक विश्‍वासाशी कोणतीही तडजोड करू शकत नाही', असेही मलिक म्हणाले होते. (मुसलमान हा प्रथम मुसलमान असतो, मग तो पक्षाचा कार्यकर्ता असतो. असे गोद्रोही आणि कायदाद्रोही मुसलमान कधीतरी देशभक्त असू शकतात का ? अशा नेत्यावर भाजप कारवाई करणार कि लांगूलचालनापोटी त्याला पाठीशी घालणार ? - संपादक)

जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस बंदीचे पोलिसांनी कठोर पालन करावे ! - भाजप

न्यायालयीन निर्णयाचे पालन करण्याचा आदेश शासनात
 घटकपक्ष असलेल्या भाजपला पोलिसांना द्यावे लागतात, हे लज्जास्पद ! 
     राज्यातील एका सूत्रावर एकवाक्यता नसणारा भाजप कारभारात सुसूत्रता काय आणणार ? 
     जम्मू - उच्च न्यायालयाने गोमांस विक्री आणि खरेदी यांवर काश्मीरमध्ये घातलेल्या बंदीचे पोलीस प्रशासनाने कठोरतेने पालन करावे, असे आवाहन जम्मू-काश्मीर राज्यातील भाजपने पोलिसांना केले आहे. भाजपचे राज्य उपाध्यक्ष आणि आमदार रमेश अरोरा म्हणाले, "न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. अशा लोकांविरुद्ध दयामाया न दाखवता त्यांच्याविरुद्ध जनतेच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात गुन्हे नोंदवावेत. ज्या कृतीमुळे राज्यातील जातीय सलोखा नष्ट करण्याचे प्रयत्न होतील, त्यावर आळा बसवावा आणि राज्यातील शांतीचे वातावरण कायम राहील, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी."

लडाखमध्ये चीनचा अवैध टेहळणी मनोरा जमीनदोस्त

चिनी सैनिकांकडून भारताच्या हद्दीत १५० वेळा घुसखोरी 
भारतीय सैनिकांची कठोर कारवाई 
     नवी देहली - लडाखमधील नियंत्रणरेषेवर चीनने उभारलेला अवैध टेहळणी मनोरा (वॉच टॉवर) भारतीय सैनिकांनी जमीनदोस्त केला. भारतीय सैन्याने केलेल्या या कठोर कारवाईनंतर सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. 

हिंदूंनो, धर्माचरण करा आणि धर्मरक्षणासाठी संघटित व्हा !

     राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ 
     'राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे.' - समर्थ रामदास स्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु) (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटी रुपये !

भाविकांनी अर्पण केलेल्या देवधनाचा योग्य वापर होण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
या निधीचा योग्य विनियोग होईल, याचे दायित्व कुणाचे ?
      मुंबई - पंढरपूरच्या सुप्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कारभार पहाणारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटी रुपये देणार आहे. (मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! - संपादक) १३ सप्टेंबर या दिवशी मंदिर समितीने जिल्हाधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घोषित केला. आयबीएन् लोकमत या वृत्तवाहिनीने दुष्काळग्रस्तांना साहाय्य करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील मंदिरांना नुकतेच केले होते. गेल्या वर्षीही मंदिराने दुष्काळग्रस्तांना १ कोटी रुपयांचे साहाय्य केले होते.

नालासोपारा येथील हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेशाचे विडंबन रोखले !

असे हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !
      नालासोपारा - येथील ट्री हाउस या आस्थापनाने श्री गणेशाचे विडंबनकारक मुखवटा असलेले चित्र आपल्या विज्ञापनाच्या होर्डिंगवर लावल्याचे हिंदू गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आस्थापनाचे मालक श्री. विशाल शहा यांना संपर्क करून त्यांच्याकडे निषेध व्यक्त करत त्यांचे प्रबोधन केले. मालकांनी हिंदू गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बोलावले. त्या वेळी तेथे बारिया बिल्डर्सचे संचालक श्री. उपेश बारिया हेही होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर ते म्हणाले, तुम्ही करत असलेले कार्य अभिनंदनीय आहे. आम्ही विज्ञापनाच्या होर्डिंगवर गणेशाचे होणारे विडंबन काढून टाकतो. प्रत्यक्षातही त्यांनी ते विडंबन काढले असल्याचे दुसर्‍या दिवशी लक्षात आले. प्रबोधन करण्यासाठी हिंदू गोवंश रक्षा समितीचे सर्वश्री कुंदन राऊत, दिप्तेश पाटील, वैभव राऊत हे उपस्थित होते.

सनातनच्या साधिका सौ. नम्रता कुलकर्णी बी.एड्.मध्ये शिवाजी विद्यापिठात प्रथम !

मिरज, १४ सप्टेंबर (वार्ता.) - येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. नम्रता नितीन कुलकर्णी (वय ३२ वर्षे) या बी.एड्.मध्ये शिवाजी विद्यापिठात प्रथम आल्या आहेत. त्या कै. (सौ.) मालतीदेवी वसंतराव पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. आपल्या यशाविषयी सौ. नम्रता म्हणाल्या, "घरातील कामे आणि लहान मुलांना सांभाळत अभ्यास केला. अभ्यास करतांना, तसेच घरातील कामे करतांनाही नामजप-प्रार्थना होत असे. सनातनच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक कृती परिपूर्णच करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अभ्यास अथवा परीक्षा यांना कधी ताण आला नाही. यापुढे शिक्षकी पेशाकडे काम म्हणून न पहाता हिंदु राष्ट्रासाठी अपेक्षित विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नरत राहीन. "

कारंजा (वाशिम जिल्हा) येथील २० गणेशोत्सव मंडळांनी घेतला आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय

      कारंजा (जिल्हा वाशिम) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १० सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम मंदिर (पोहावेश) येथे कारंज्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली. त्याला उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कार्यकर्त्यांनी एकमताने या वर्षी गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. या बैठकीला ९० गणेशभक्त उपस्थित होते. समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी गणेशोत्सव आदर्श आणि आध्यात्मिक पद्धतीने साजरा केल्यास त्याचे होणारे लाभ आणि त्यातून होणारी आपली साधना यांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मूर्तीदान करू नका, गणपति विसर्जन वाहत्या पाण्यात करा आणि देवतांची विटंबना थांबवा, या विषयाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. यानंतर सर्वश्री राजेश ढोके, नंदलाल गुप्ता, मंगेश मेटकर, हेमंत फुलाडी यांनी आपले विचार मांडले.

रेल्वेतील साखळी बाँम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल

      मुंबई - ११ जुलै २००६ या दिवशी मुंबईत रेल्वेत झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे. साखळी स्फोटांच्या प्रकरणी न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरवले आहे, तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. १२ जणांना १२० (ब), ३०२ आणि ३११ या कलमांच्या अंतर्गत दोषी धरण्यात आले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

 किती भारतीय सैनिक ठार झाल्यावर भारतीय शासन पाकला धडा शिकवणार ?
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला प्रथम गोळी न चालवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर केवळ दोन दिवसांतच जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सोहन लाल हा भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी हुतात्मा झाला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
jammu-Kashmirme pak ki golibarime yek sainyadhikari hutatma.
Kitne sainik mare janeke bad ham pak ko path padhayenge ? 
जागो ! 
जम्मू-कश्मीर में पाक की गोलीबारीमें एक सैन्याधिकारी हुतात्मा !
कितने सैनिक मारे जानेके बाद हम पाकको पाठ पढायेंगे ?

दुष्काळाच्या नावाखाली विसर्जनासाठी पाणी सोडण्यास नकार देणारी मंडळी शीतपेय आस्थापनांचे पाणी अडवण्याची मागणी का करत नाहीत ?

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नैसर्गिक आपत्तींचा थेट परिणाम धर्माचरणविषयीच्या कृतींवर होत असल्याचे आढळून येते. वृक्षांची तोड नको; म्हणून होळीला कचर्‍याची होळी करण्याची मागणी केली जाणे अथवा दुष्काळाच्या नावाखाली विसर्जनासाठी नदीत पाणी सोडण्यास विरोध करणे, हा त्याचाच एक भाग ! खरे तर पृथ्वीवर वाढलेल्या अधर्मामुळेच पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवत असतात. आताही दुष्काळ असल्याची ओरड करत काही जण गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नदीला पाणी सोडण्यास विरोध दर्शवत आहे; मात्र ही मंडळी जीवनावश्यक नसलेल्या आणि सहस्रो लिटर पाणी प्रतिदिन वापरण्यात येणार्‍या शीतपेये बनवणार्‍या आस्थापनांचे पाणी काही दिवसांसाठी बंद करण्याची मागणी करतांना दिसत नाहीत. यातूनच धर्माला किती दुय्यम स्थान दिले जात आहे, ते आपल्या लक्षात येते. धर्माचरणाचे लाभ ठाऊक नसल्याचा आणि ते अनुभवले नसल्याचा हा परिणाम आहे. लोकांना धर्मशिक्षण देऊन साधनेकडे वळवणे आणि संघटित होऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच यावरील उपाय आहे !

आता भ्रष्टाचार्‍यांची नावे छापण्याऐवजी भ्रष्टाचार न करणार्‍यांची नावे छापण्याची वेळ आली आहे. नाहीतर इतर बातम्यांना दैनिकात जागा उरणार नाही !

१. 'महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती महेश सारंग यांना एका प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी देत या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी २ लक्ष रुपयांची लाच मागणारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र राजाराम शेलार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले.' 
२. 'गोव्यात पारपत्र (पासपोर्ट) खात्यातील अधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्या विरोधात लाच घेऊन आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून पारपत्र देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सीबीआयच्या अधिकार्‍यांनी किरभाट-नुवे येथील त्यांच्या बंगल्यावर, तसेच पणजी येथील पारपत्र कार्यालयावर
छापे टाकले.'

संथारा (सल्लेखणा) ही आत्महत्या कशी ?

      संथारा (सल्लेखणा) म्हणजे काय ? हे समजल्याशिवाय ती आत्महत्या आहे, असे विधान करणे म्हणजे त्याविषयीचे अज्ञान प्रकट केल्यासारखेच आहे. मृत्यू हा कितीही वाईट असला, तरी तो कोणालाच चुकलेला नाही आणि चुकणारही नाही. त्यामुळे संथारा कशी घेतली जाते, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
१. संथारासारख्या पवित्र क्रियेला आत्महत्या म्हणणे, ही शोकांतिका !
     जैन धर्मात श्रावकाला बारा व्रते पाळण्याचा उपदेश आहे; परंतु त्या व्रताचे शिखर म्हणजे संथारा होय ! त्याशिवाय मुनीधर्माची किंवा श्रावक धर्माची पूर्तता होत नाही. सल्लेखणा यात दोन शब्द आहेत. सत्+लेखणा अर्थात विधीपूर्वक शरीर आणि कषायाचा त्याग करणे आहे.
      आदरणीय समंतभद्राचार्यांनी रत्नकरंड श्रावकाचार या ग्रंथात म्हटले आहे की,
उपसर्गे दुर्भिक्षे जरसि सजायांच निष्प्रतिकारे !
धर्माय तनुविमोचन माहु: सल्लेखन मार्या: !!
अर्थ : धर्माकरिता शरीराचा त्याग करतांना त्याची योग्य वेळ पाहावी लागते. ज्या वेळी उपसर्गापासून बचाव होत नाही, ज्यावर उपायाची मात्रा चालत नाही, असे म्हातारपण किंवा रोगी असेल त्यांनाच समाधीमरण साधण्याकरिता योग्य वेळ सांगितली आहे.

राजकीय पक्ष आणि संत

हिंदु समाजाला साधू-संतांचे महत्त्व कळण्यासाठी हे विशेष सदर !
हिंदु संतांच्या संदर्भात जे घडते, तसे एका तरी इतर धर्मियांच्या संताच्या 
संदर्भात एका तरी राजकीय पक्षाने केले आहे का ? 
       संतांवरील अन्याय कायमचा दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! यासाठीच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समविचारी संस्थांसह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करत आहेत.
- (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२३.१.२०१५)
अ. सर्वपक्षीय राजकारणी आणि संत
अ १. अधर्माचरणास धर्मनिरपेक्ष शासनपद्धतीच कारणीभूत आहे ! - पश्‍चिमाम्नाय द्वारका शारदापीठ एवं उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाचे पूज्य स्वामी श्री स्वरूपानन्द सरस्वतीजी महाराज
अ २. माओवाद्यांचे अराजक रोखण्यासाठी संतांना मध्यस्थी करावी लागत असेल, तर शासन नावाचा डोलारा हवा कशाला ? : माओवाद्यांनी वेढा घातलेल्या लालगड परिसरातील माओवाद्यांचे नेतृत्व करणारा चंद्रधर महतो याच्याशी श्री श्री रविशंकरजी यांची चर्चा झाली असून ११८ माओवादी शस्त्रे खाली ठेवून चर्चेसाठी सिद्ध (तयार) आहेत. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम्, तसेच बंगालचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत श्री श्री रविशंकरजी यांनी माओवाद्यांच्या मागण्या पोहोचवल्या आहेत. 
अ ३. वीरमरण पत्करणार्‍यांची प्रतारणा या देशातील राजकारण्यांकडून केली जात आहे. - योगऋषी रामदेवबाबा 

पुरोगामी, विज्ञानवादी नव्हे, तर सुसंस्कृत व्हा !

श्री. वीरेंद्र मराठे
      जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वकाळात मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महानगरपालिकांनी मांसविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला काही राजकीय पक्षांनी विरोध केला. हा विरोध एवढा तीव्र होता की, एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी यांनी हिंदु धर्मशास्त्रानुसार मांसाहारावर किंवा मांसविक्रीवर कायमचीच बंदी हवी, असे सांगितले. त्यावर एखाद्या सावजावर हिंस्र श्‍वापदांनी तुटून पडावे, त्याप्रमाणे चर्चासत्रातील सर्वजण डॉ. धुरी यांच्यावर तुटून पडले. का ? तर डॉ. उदय धुरी शाकाहारी ! प्राणी जगतातही असेच आहे. मांसाहारी वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा हे हिंस्र प्राणी शाकाहारी बकरी, गाय, हरीण, यांसारख्यांवर तुटून पडतात.

उघड गुन्हे न दिसणार्‍या पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !

'वर्ष २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याविषयी नियम आखून दिले असतांना आणि एका रिक्शामध्ये ३ विद्यार्थी बसण्याची क्षमता असतांना ८ ते १० विद्यार्थी भरले जातात. अधिकाधिक १० जणांची क्षमता असलेल्या एका चारचाकी गाडीमध्ये १५ ते २५ विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते.'

निसर्गनियमांनुसार मानवप्राणी शाकाहारीच !

१. मानवाची शरीररचना शाकाहाराला अनुकूल
     शरीररचनेचा विचार केला, तर माणूस हा केवळ शाकाहारी प्राणी आहे. आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी माणसाने निर्दयी रितीने पशूंची हत्या करणे चालू केले. गाय, बैल, हरीण, हत्ती, गेंडा, ससा, गाढव इत्यादी प्राणी शाकाहारी या गटात मोडतात. वाघ, सिंह, कोल्हा, तरस, रानकुत्रा इत्यादी प्राणी मांसाहारी आहेत. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी त्यांची जीवनपद्धत कधीही पालटत नाहीत; म्हणजे वाघाला कितीही उपाशी ठेवले, तरी तो गवताला तोंडही लावणार नाही. गायीला कितीही उपाशी ठेवले, तरी ती मांस कदापी खाणार नाही.

राजकारण्यांची (अ)नीतीमत्ता !

      पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात झालेल्या विद्यार्थी परिषदेत राज्याचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यार्थ्यांसमोर भाषण करतांना मीही रात्री त्या क्लिप पहातो, असे बापट म्हणाले. बापट हे संघाच्या संस्कारात वाढलेले. त्यामुळे नैतिकतेचा धडा गिरवणार्‍या आणि काँग्रेसच्या अनैतिकतेवर नेहमीच टीका करत आलेल्या भाजपच्या मंत्र्याने असे वक्तव्य विद्यार्थ्यांसमोर केल्यावर विरोधकांचे लक्ष्य होणे साहजिकच आहे. वक्त्याने विशेषत: सार्वजनिक जीवन जगणार्‍या आणि त्यात शासनाचे प्रतिनिधी असणार्‍या एका मंत्र्याने कुठे काय बोलावे, याचे भान नक्कीच ठेवायला हवे. बापट यांच्यासारख्या नेत्याला हे ज्ञात नाही, असे म्हणता येणार नाही. असो. बापटांनी जे केले तेच ते सर्वांसमोर बोलले. आज तरुण पिढीला सामाजिक संकेतस्थळांमुळे लैंगिक विषयाचे ज्ञान इतके झाले आहे की, त्यांच्याशी मोकळेपणे बोलण्यात आता कोणताही आडपडदा राहिलेला नाही, असे बापटांना कदाचित तसे वाटले असेल आणि ते आत एक आणि बाहेर एक असे न ठेवता स्पष्टपणे अन् प्रामाणिकपणे बोलून गेले.

शिक्षणक्षेत्रातील अत्युच्च पदावरील चोर !

      आज देशात स्वच्छ आणि शुद्ध अशी कुठलीही गोष्ट मिळणे दुरापास्त झाले आहे. देशावर राज्य करणार्‍या लोकप्रतिनिधींचे राजकारण असो अथवा लोकांच्या जिवाशी संबंधित असे आरोग्य क्षेत्र असो. सर्वच क्षेत्रांना भ्रष्टाचाराच्या वाळवीने ग्रासले आहे. या स्थितीत देशाची पुढील पिढी निर्माण करणारे शिक्षणक्षेत्रही याला अपवाद कसे काय असणार ? सध्या परीक्षांमध्ये होणारी कॉपी आणि पेपरफुटीच्या बातम्या तर सामान्य झाल्या आहेत; पण एखाद्या विद्यापिठाच्या कुलगुरु या अत्युच्च पदावरील व्यक्तीने चोरी केल्याचे वृत्त कधी ऐकले आहे का ? याच अनुषंगाने दैनिक लोकसत्तामध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते.

बिलिव्हर्स पंथियांचे स्टिकर काढण्यासाठी वाहनचालकाचे प्रबोधन करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सविता देसाई !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते अन्य पंथियांच्या भूलथापांना बळी पडतात ! हिंदूंनो, धर्मशिक्षण 
घेऊन स्वधर्माभिमानी व्हा आणि महान हिंदु धर्माचा जगभर प्रसार करा !
      हिंदु जनजागृती समितीच्या काणकोण येथील कार्यकर्त्या सौ. सविता देसाई या एका हिंदु कुटुंबियांबरोबर एका कामानिमित्त काणकोण येथून मडगावला चालल्या होत्या. त्या वेळी वाहनचालकाने वाहनाच्या काचेवर बिलिव्हर्सपंथियांचा प्रसार करणारे स्टिकर लावले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे चित्र अगोदर बघितले असते, तर या गाडीत मी चढलेच नसते. आता आपण जेथे थांबणार, त्या ठिकाणीच हे चित्र काढा अन्यथा येतांना या गाडीत पुन्हा बसणार नाही, असे सौ. सविता देसाई यांनी हिंदु वाहनचालकाला निक्षून सांगितले. त्यानंतर चालकाने ते स्टिकर काढले. (वाहनचालकाचे क्षात्रवृत्तीने प्रबोधन करणार्‍या सौ. सविता देसाई यांचे अभिनंदन ! अन्यत्रच्या हिंदूंनीही यातून बोध घ्यावा ! - संपादक)
     त्यानंतर परत येतांना सौ. देसाई यांनी वाहनातील सर्वांना साधनेसंदर्भात माहिती दिली. नामजप आणि हिंदु देवता यांचे महत्त्वही स्पष्ट केले. इतर धर्मियांच्या भूलथापांना बळी न पडता राणी लक्ष्मीबाई, छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श बाळगावा, तरच आपली भावी पिढी चांगली होईल, असे सांगितले.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल एक वर्ष राखून ठेवण्यामागे योग्य कारण नसल्यास उत्तरदायींना फाशी द्या !

'मुंबईच्या उपनगरीय लोकलगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट मालिकेच्या प्रकरणाचे ऑगस्ट २०१४ मध्येच युक्तीवाद संपले होते; मात्र १ वर्ष हा निकाल राखून ठेवण्यात आला होता.'  

आता आश्‍वासने नको, आश्‍वासनपूर्ती हवी ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

       काँग्रेसने सातत्याने हिंदुविरोधी धोरणे राबवल्याने हिंदूंनी देशभरात भाजपचे श्री. नरेंद्र मोदी यांना एकहाती सत्ता प्राप्त करून दिली; मात्र भाजपकडून देशभरात गोहत्याबंदी कायदा लागू करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, बांगलादेशी घुसखोरी रोखणे, श्रीराम मंदिर बांधणे, ३७० वे कलम रहित करणे यांसह अन्य सर्व सूत्रांना बगल दिल्याचे दिसून आले. त्यामुळे जनतेने कौल आपच्या पारड्यात टाकला. या निकालाने आतातरी भाजपने धडा घ्यावा आणि पूर्वी हिंदूंना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करावी, हीच सर्वसामान्य हिंदूंची मागणी आहे. भाजपची स्थिती आजच्या काँग्रेससारखी होऊ नये; म्हणून मोदी शासनाला ही आज वेळीच मिळालेली चेतावणी आहे.

असे राजकारणी राष्ट्र आणि धर्म यांचे हित कधी साधतील का ? त्यांना हाकलून लावा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

      जो नगरसेवक आहे, त्याला आमदारपद मिळाले नाही म्हणून; आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून; मंत्र्याला चांगले खाते मिळाले नाही म्हणून; चांगले खाते असणार्‍याला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून आणि मुख्यमंत्र्याला विविध प्रश्‍न आहेत म्हणून येथे प्रत्येक जण दुःखी आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळणमंत्री
      हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.
- श्री श्री गुरुनागभूषण शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक

वितरकांना सूचना

      १८ सप्टेंबरच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकाची छपाई काही अपरिहार्य कारणास्तव लवकर करावी लागणार असल्याने त्या अंकाची वाढीव मागणी १६ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० पर्यंत वितरकांनी ईआर्पी प्रणालीत भरावी आणि १७ सप्टेंबरच्या दैनिकाची मागणीही १६ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० पर्यंत वितरकांनी ईआर्पी प्रणालीत भरावी.

शिबिरात आल्यामुळे स्वतःत पालट अनुभवणारे आणि गुरुदेवांच्या भेटीने आनंदविभोर झालेले पुणे येथील श्री. नीलेश गोरे !

श्री. नीलेश गोरे
     मी माझ्या वडिलांमुळे सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. माझे वडील धाराशिव येथे सेवा करतात. पूर्वी मी केवळ व्यष्टी साधनाच करत होतो. वर्ष २०१३ मध्ये धाराशिव येथे झालेल्या धर्मजागृती सभेनंतर मी समष्टी सेवेला आरंभ केला. नंतर हळूहळू स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न करू लागलो. जून २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरात येण्याची मला संधी मिळाली. त्या वेळी स्वतःत जाणवलेले पालट आणि गुरुदेवांशी झालेली भेट यांविषयीची माहिती पुढे देत आहे. 
१. शिबिरात आल्यावर झालेले त्रास
     शिबिरात झोप येणे, विषयांचे आकलन न होणे, मनाची एकाग्रता न होणे आदी त्रास झाले. 

नाशिक येथे सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य करत असतांना साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती !

       नाशिक येथील सिंहस्थ पर्वानिमित्त राष्ट्र-धर्माचा प्रसार होऊन जनजागृती व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती आणि सनातन संस्था अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यासाठी अनेक साधक आणि समितीचे कार्यकर्ते नाशिक क्षेत्री जाऊन तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करत आहे. धर्माचे कार्य हे प्रत्यक्ष ईश्‍वराचेच कार्य असल्याने त्यांना प्रत्येक क्षणी देव साहाय्य करत असल्याच्या अनुभूती येत आहेत. साधकांच्या काही निवडक अनुभूती पुढे दिल्या आहेत. 
१. राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी धर्मशिक्षण फलकाद्वारे 
धर्मप्रसार करत असतांना समोरच्या घरातील 
अपरिचित व्यक्तींनी वेळोवेळी काळजी घेणे
       सिंहस्थ पर्वानिमित्त निघणार्‍या प्रथम राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी आम्ही धर्मप्रसारार्थ एका पत्र्यावर फलक धरून बसलो होतो. आमच्यासमोर श्री. बैरागी यांचे घर होते. आमचा काहीही परिचय नसतांना केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे ते आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आम्हाला वेळोवेळी चहा-पाणी देत होते. त्यांच्या घरात रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालू असतांना त्यांनी आम्हालाही राखी बांधली. तेथे श्री. बैरागीकाकांच्या बहिणीला नामजपाचे महत्त्व सांगण्याची संधीही मिळाली. त्यांनी नियमित नामजप करणार, असे सांगितले. या वेळी आमचाही नामजप होऊन भाव दाटून आला. - श्री. सौरभ पंडीत, नंदुरबार

अमरावती आणि ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील साधकांना पू. नकातेकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. महादेव नकाते
अमरावती 
१. सौ. छाया टवलारे 
१ अ. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ १. अहवाल पडताळणीच्या वेळी वेळ आणि शक्ती वाचण्यासाठी आवश्यक तेवढेच शब्द वापरण्यास सांगणे : साप्ताहिक सनातन प्रभातचे अहवाल पडताळतांना अर्ज क्रमांक आणि अकाऊंट क्रमांक हे दोन शब्द न उच्चारता केवळ वर्गणीदारांचे नाव, अंक क्रमांक, आरंभ आणि शेवट एवढेच उच्चारल्याने वेळ आणि शक्ती दोन्हीही वाचेल, असे पू. काकांनी सांगितले. 
१ अ २. गुरूंचे पैसे वाचवण्यासाठी पू. काकांनी तात्काळमध्ये तिकीट न काढणे : पू. काकांचे अमरावतीहून मुंबईपर्यंतचे आगगाडीचे तिकीट निश्‍चित (कन्फर्म) झालेले नव्हते. साधकांनी तात्काळमध्ये तिकीट काढायचे का ?, असे पू. काकांना विचारल्यावर काका म्हणाले, नको. प.पू. डॉक्टरांचे पैसे जपून वापरायचे. तात्काळमध्ये तिकीट काढायचे असल्यास ४९० रूपये लागणार होते; तिकीट निश्‍चित झाल्यामुळे तात्काळ मधील तिकीट काढावे लागले नाही आणि तात्काळपेक्षा अर्ध्या किमतीत पू. काकांनी प्रवास केला.

साधकांच्या नामजपातील अडथळे दूर होण्यासाठी पू. अशोक पात्रीकर यांनी सांगितलेल्या विविध उपाययोजना

पू. अशोक पात्रीकर
    उपायांच्या वेळी किंवा अन्य वेळी नामजप करतांना झोप येते, नामजप आठवत नाही, निरर्थक विचार मनात येतात, नामजप एकाग्रतेने होत नाही, अशा अनेक अडचणी बर्‍याच साधकांना असतात. यावर पुढीलप्रमाणे उपाययोजनांचा अवलंब करू शकतात.
१. नामजप करतांना झोप येणे
१ अ. पाणी शिंपडणे : तोेंडवळ्यावर आणि कानांत हलकेसे पाणी शिंपडावे. प.पू. डॉक्टरही सेवा करतांना त्यांना झोप आल्यास मधेमधे उठून तोंड धुवून येतात. त्यांचा आदर्श समोर ठेवावा.
१ आ. कापूर, अत्तर आणि न पेटवलेली उदबत्ती यांचे उपाय सतत करत रहावे.

अनेक शारीरिक त्रास असूनही त्याविषयी न बोलता साधनेविषयी बोलणारे आणि सकारात्मक राहून साधकांना प्रोत्साहन देणारे श्री. देसाईकाका !

    काकांना मधुमेह आहे. डोळ्यांचा पुष्कळ त्रास आहे. त्यांना पुष्कळ औषधे आणि पथ्यही आहे. याविषयी ते कधीच बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यातून आश्रमात रहायला मिळते, याविषयी अपार कृतज्ञता जाणवते. ते कधीही आणि कुठेही दिसले, तरी हसून साधनेच्या प्रयत्नांविषयी बोलतात आणि विचारपूस करतात, तसेच ते नेहमी सकारात्मक बोलतात. त्यामुळे त्यांच्यविषयी आदर वाटतो.
- सौ. अनघा पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०१५)

प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेले आणि स्वतःमध्ये लवकर पालट व्हावेत, अशी तळमळ असलेले श्री. रंजन देसाईकाका !

     गेले काही मास (महिने) श्री. रंजन देसाईकाका रामनाथी आश्रमात आहेत. ते वाहन विभागातील गाड्यांची खरेदी-विक्री करणे, वेळोवेळी त्यांची दुरुस्ती करवून घेणे, अशी सेवा करतात. त्यांच्यासमवेत सेवा करतांना त्यांच्याविषयीची जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
१. प्रेमभाव : काका सर्वांशी प्रेमाने वागतात. त्यांचे बोलणे मनापासून आहे, असे वाटते. त्यांना प्रत्येक साधकाविषयी आदर वाटतो.
२. साधकांना साधनेत साहाय्य करणे : काकांना सर्व जुन्या साधकांनी लवकर लवकर प्रगती करावी, असे वाटते. त्यासाठी ते उत्तरदायी साधकांना विचारून घेऊन त्यांना साहाय्य करण्यासही तत्पर असतात.

प.पू. डॉक्टरांच्या कृपेने प्रक्रियेसंबंधी वाटणारी भीती नष्ट होऊन जोे पालट होण्यासाठी आपण साधना करतो, तो पालट प्रक्रिया राबवल्यानेच होऊ शकतो, असा विश्‍वास देणारी दोष-अहं निर्मूलन प्रक्रिया !

    मी देवद आश्रमात रहात असून वाहनांच्या संबंधातील सेवा करतो. ही सेवा करत असतांना वर्ष २०१४ मध्ये अहं आणि स्वभावदोष यांमुळे माझ्याकडून काही चुका झाल्या. या चुकांमागील लक्षात आलेले स्वभावदोष आणि अहंचे पैलू लिहून मी रामनाथी आश्रमात पू. बिंदाताईंना पाठवले होते. नंतर मार्च २०१५ मध्ये मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात आलो. तेव्हा पू. बिंदाताईंनी काही दिवस मला आश्रमातच रहाण्यास सांगितले.
      ३ - ४ दिवसांनी मला प.पू. गुरुदेवांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी मला प्रतिदिन चार घंटे उपाय करायला सांगितले. त्यामुळे आवरण न्यून झाल्याने स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या प्रक्रियेला आरंभ करता आला.

निर्मळता, शिकण्याची वृत्ती आणि प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा यांमुळे अल्पावधीत स्वतःत आमूलाग्र पालट करणारे श्री. रंजन देसाई !

श्री. रंजन देसाई
    श्री. रंजन देसाई मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते सनातनच्या देवद आश्रमात वास्तव्याला असतात. गेल्या ४ मासांपासून ते व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी रामनाथी आश्रमात आहेत. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. निर्मळता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे
    मागील १ ते दीड वर्षापासून मी सेवेच्या निमित्ताने श्री. देसाई यांच्या संपर्कात आहे. अगोदर ते मनातील विचार मोकळेपणाने मांडत नव्हते. रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांनी या दोषाच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्याने त्यांना मनातील विचार मोकळेपणाने सांगता येऊ लागले. आता त्यांच्या मनाची निर्मळता वाढल्याचे लक्षात आले.
२. व्यष्टी साधनेसाठी तळमळीने प्रयत्न करून स्वतःत पालट करणे
    एवढी वर्षे साधना करूनही आपण आध्यात्मिक प्रगती करू शकलो नाही, गुरुधनाची हानी करून आपण स्वतःच्या साधनेची हानी केली, याविषयी आता त्यांच्यात खंत निर्माण होत असल्याचे जाणवतेे. आपल्याला लवकरात लवकर गुरुचरणांशी जायचे आहे, हा ध्यास ठेवून आणि अंतरी श्रद्धा बाळगून त्यांनी दोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवली. यामुळे आता त्यांच्या अंतरात भाव निर्माण होत आहे.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !
'वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
माया आणि परमेश्‍वर
अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
भावार्थ : 'माया समजून घेऊन' म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.                                          
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      एखादी सुसंधी हातातून निसटली, तर परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवून याची निश्‍चिती बाळगा की, याहीपेक्षा चांगली संधी मला मिळणार आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जनहित साधणारे सिंहस्थपर्व !

संपादकीय
       हाहा म्हणता सिंहस्थपर्वातील दुसरे राजयोगी स्नान उत्साहात पार पडले. २५ सप्टेंबरला शेवटचे राजयोगी स्नान झाल्यावर हे सिंहस्थपर्व समाप्त होईल. त्यानंतर वेध लागतील, ते पुढील वर्षी उज्जैन येथे होणार्‍या कुंभमेळ्याचे ! या कुंभमेळ्याची आतापासूनच सिद्धता चालू झाली आहे. प्रयाग कुंभमेळ्याचे आयोजन ब्राझिलमधील विश्‍वचषक फूटबॉल स्पर्धेपेक्षाही सरस होते, असा प्रख्यात हॉवर्ड विद्यापिठाने निष्कर्ष काढल्याचे समोर आले. त्यामुळे सिहंस्थपर्वाचा आनंद आणखीनच द्विगुणित झाला. समस्त हिंदूंसाठी ही अभिमानाची बाब आहे. एवढे सगळे होत असतांना भारतातील पुरोगामी आणि सुधारणावादी यांना मात्र सिंहस्थपर्वामुळे उठलेला पोटशूळ अजूनही शमतांना दिसत नाही. या सिंहस्थाच्या आयोजनासाठी २ सहस्र ३६७ कोटी रुपयांचा निधी शासनाने व्यय करणे, हे या महाभागांना रूचलेले नाही. भारतात अर्धपोटी, गरीब, बेघर लोक असतांना त्यांच्यासाठी काहीही न करता हिंदूंच्या एका उत्सवासाठी इतका निधी व्यय केला जात असल्यामुळे त्यांचे पित्त खवळले आहे. दुसर्‍या बाजूने विचार केला, तर याच उपटसुंभांकडून कुंभसाठी येणार्‍या नग्न साधूंची हेटाळणी केली जाते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn