Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक जतींद्रनाथ दास यांचा आज स्मृतीदिन

श्रीनगरच्या काही भागांत संचारबंदी !

काश्मिरात गोमांसविक्री बंदीच्या विरोधात फुटीरतावाद्यांची जम्मू-काश्मीर बंदची हाक
धर्मांध फुटीरतावाद्यांचा वाढता हिंसाचार पहाता, जम्मू-काश्मीरमध्ये शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्न  पडतो ! प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी हिंसा करणार्याच या देशद्रोही धर्मांधांना 
वठणीवर आणण्यासाठी जम्मू-काश्मीरचे भाजप-पीडीपी युतीशासन काही कृती करणार का ? 
श्रीनगर - राज्यात गोमांसविक्रीवरील बंदीच्या जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात देशद्रोही धर्मांधांनी थयथयाट केला. धर्मांधांनी हिंसक निदर्शने करून पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या वेळी काही युवकांनी पाकिस्तान आणि आय.एस्.आय.एस्. यांचे झेंडे फडकवले. फुटीरतावाद्यांनी जम्मू-काश्मीर बंदची घोषणा केल्याने १२ सप्टेंबर या दिवशी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. काश्मीर खोर्यातील ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

महाविद्यालयांत रामायण, महाभारत आणि गीता शिकवण्यासमवेत विद्यार्थ्यांकडून साधनाही करून घेणे आवश्यक, हे भाजप शासनाने लक्षात घेणे आवश्यक !

  'केंद्रातील भाजप शासनाचे सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा १०.९.२०१५ या दिवशी म्हणाले, "महाविद्यालयांत रामायण, महाभारत आणि गीता शिकवणार !" त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, हे विषय केवळ तात्त्विकदृष्ट्या न शिकवता विद्यार्थ्यांकडून व्यायाम करून घेतात, तशी साधनाही करून घेणे आवश्यक आहे. ग्रंथांचा अभ्यास नाही, तर साधनेचे संस्कार त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.९.२०१५)

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी श्री गणेशाला साकडे घाला !

पू. संदीप आळशी
'श्री गणेश सर्वांना ज्ञान आणि मंगलता प्रदान करण्यासह देवान्तक, नरान्तक यांसारख्या असुरांचा संहारही करतो. श्री गणेशाचा आदर्श समोर ठेवून आपणही हिंदु धर्मप्रसार करून सर्वांना धर्मज्ञान देऊया आणि साधनेने स्वतः सात्त्विक बनून इतरांना मंगलता प्रदान करूया. त्याचसह हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी निधर्मी (अधर्मी) राज्यकर्ते, राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही आदींविरुद्ध क्षात्रवृत्तीने धर्मलढा उभारूया. साधनेचा पाया नसेल, तर केवळ क्षात्रवृत्तीच्या बळावर आपण धर्मलढ्यात विजयी होऊ शकणार नाही. यासाठी आपल्यात साधनेचे बळ (ब्राह्मतेज) आणि क्षात्रतेज निर्माण होण्यासाठी श्री गणरायाला भावपूर्ण साकडे घालूया !'
- (पू.) श्री. संदीप आळशी (१७.८.२०१५)   


पर्युषण पर्वकाळात मांसबंदीविषयीचा सनातनचा दृष्टीकोन !

  'जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वकाळात राज्यशासन आणि मुंबई महापालिका यांनी अनुक्रमे २ दिवस अन् ४ दिवस मांसविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविषयी शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांनी तीव्र विरोध केला, तर या निर्णयविषयी न्यायालयानेही राज्यशासन आणि महापालिका यांना जाब विचारला. त्यानंतर हा कालावधी अल्प करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यावर जैन संघटना आक्रमक झाल्या आहेत. 'या सर्व प्रकरणांविषयी सनातनची भूमिका काय', अशी विचारणा काही वाचकांनी आणि हिंदुत्ववाद्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सनातनचा दृष्टीकोन प्रसिद्ध करत आहोत. 

धर्मांध महिलेला भाग्यनगरमध्ये अटक

 • अशा आतंकवादी महिलेला केवळ पोसू नका, तर त्वरित फासावर लटकवा !
 • आय.एस्.आय.एस्.मध्ये भरती होण्यासाठी तरुणांना लावली फूस !
     भाग्यनगर (हैदराबाद) - जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.मध्ये भरती होण्यासाठी तरुणांना फूस लावल्याच्या आरोपावरून संयुक्त अरब अमिरातने अफशां जबी उपाख्य निकी जोसेफ या ३७ वर्षीय भारतीय महिलेला देशाबाहेर काढले. त्यानंतर मायदेशी परतताच तिला ११ सप्टेंबर या दिवशी हैदराबाद विमानतळावर अटक करण्यात आली. ती भाग्यनगर येथील रहाणारी आहे.

गुजरातमधील दोन न्यायाधिशांना लाच घेतल्याप्रकरणी अटक !

 • भ्रष्टाचाराने पोखरलेली न्यायप्रणाली जनतेला काय न्याय देणार ?
 • गुजरातमध्ये भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी मोदींनी केलेले प्रयत्न अल्प झाले कि तेथील भ्रष्टाचार आटोक्यात आल्याची वृत्ते खोटी होती ?
     अहमदाबाद - खटल्याच्या निपटार्‍यासाठी आणि अनुकूल निर्णयासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात निलंबित झालेल्या दोन न्यायाधिशांना गुजरात उच्च न्यायालयाच्या दक्षता पथकाने चौकशीअंती लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत शुक्रवारी अटक केली. वलसाडच्या न्यायालयाने ए.डी. आचार्य आणि पी.डी. इनामदार या दोघाही न्यायाधिशांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवणी केली.

म्हणे, हिंदु-मुसलमान ऐक्य होत असतांना ओवैसी वातावरण बिघडवू पहातात !

 • जे कधीही होणे शक्य नाही, त्याची स्वप्ने पहाणारे भाजपचे सिद्दीकी !
 • मतांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणारा भाजप दुसरी काँग्रेसच होत आहे !
     सोलापूर - ओवैसी म्हणजे पाकिस्तानचे निर्माते बॅ. मोहम्मद अली जिना यांचा दलाल आहे. देशात बर्‍याच कालावधीनंतर हिंदु-मुसलमान ऐक्य होत असतांना ओवैसी वातावरण बिघडवू पहात आहेत. (नुकत्याच पुणे, नंदुरबार इत्यादी ठिकाणी झालेल्या दंगली हे काय हिंदु- मुसलमान ऐक्याचे प्रतीक आहेत का ? सर्वत्र अजूनही मोठ्या प्रमाणात होत असलेल्या लव्ह जिहादच्या आणि लॅण्ड जिहादच्या घटना या त्यांना हिंदु-मुसलमान ऐक्याचे प्रतीक वाटतात का ? - संपादक) भ्रष्टाचारी काँग्रेसशी एकेकाळी हातमिळवणी करणार्‍या ओवीसींना आता मात्र मुसलमानांचा पुळका आला आहे, अशी टीका भाजप अल्पसंख्याक मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली. सोलापूर शहरात भाजपच्या वतीने समाजकल्याण केंद्र येथे भाजप अल्पसंख्याक मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरून ३ जणांचा मृत्यू

शांतताकाळात वारंवार रेल्वेचा अपघात होणारा जगातील एकमेव देश भारत !
     मुंबई - सिकंदराबादहून कुर्ला येथे येणार्‍या दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे मरतुर स्थानकाजवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याने घसरले. यात ३ जण मृत्यूमुखी पडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातात ६ जण घायाळ झाले आहेत.

देशभरातून आलेल्या भाविकांनी पिठोरी आणि श्रावणी अमावास्येनिमित्त केले कुशावर्तावर पवित्र स्नान !

आज पर्वणीतील दुसरे राजयोगी (शाही) स्नान !
नाशिक - १२ सप्टेंबर या दिवशी पिठोरी अमावास्या आणि श्रावणी अमावास्या असा दुर्मिळ योग आल्याने देशभरातून आलेल्या भाविकांनी कुशावर्त क्षेत्री स्नान करून पुण्यप्राप्तीचा योग साधला. १३ सप्टेंबर या दिवशी पर्वणीतील दुसरे राजयोगी (शाही) स्नान आहे; परंतु या दिवशी असणारी ग्रहस्थिती ही काही प्रमाणात १२ सप्टेंबर या दिवशीही असल्याने भाविकांनी १२ सप्टेंबर या दिवशी स्नानासाठी नाशिकमधील कुडांवर सकाळपासूनच गर्दी केली. चंद्र, सूर्य आणि गुरु सिंह राशीत येण्याचा या दुर्मिळ योगाच्या वेळी स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. पहिल्या शाहीस्नानाच्या वेळी होता, त्याप्रमाणे कडक पोलीस बंदोबस्त नसल्याने सहस्रो भाविक मोकळेपणाने स्नान करून समाधान पावले. ११ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच भाविकांची नाशिकक्षेत्री गर्दी होण्यास प्रारंभ झाला होता.

मक्का मशिदीवर क्रेन पडल्याने दुर्घटना

 • १०७ जण ठार, तर २३८ घायाळ
 • मृतांमध्ये २ आणि घायाळांमध्ये ९ भारतियांचा समावेश
     मक्का - सौदी अरबमध्ये मक्केतील अल हरम या मुख्य मशिदीवर क्रेन कोसळून १०७ जणांचा मृत्यू झाला असून २३८ घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये २, तर घायाळांमध्ये ९ भारतियांचा समावेश आहे. ११ सप्टेंबरच्या रात्री आलेल्या प्रचंड वादळामुळे ही दुर्घटना घडली.
     मक्केत वर्ष २०११ पासून या मशिदीच्या विस्ताराचे काम चालू आहे. त्यासाठी ही प्रंचंड मोठी क्रेन लावण्यात आली होती. ही क्रेन पडल्यामुळे मशिदीच्या छताचा काही भाग कोसळला. त्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला. २१ ते २६ सप्टेंबरदरच्या काळात हज चालू होणार आहे. त्यासाठी भारतातून ५२ सहस्र लोक मक्केत दाखल झाला.

झाबुआ (मध्यप्रदेश) येथे सिलेंडरच्या स्फोटात ७५ ठार, १२० घायाळ

     झाबुआ (मध्यप्रदेश) - येथील पेटलावद बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये १२ सप्टेंबरला सकाळी ८.३० च्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलचे छत कोसळल्याने ७५ जण ठार, तर १२० जण घायाळ झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, १०० मीटर परिसरातील अनेक इमारतींवरही त्याचा परिणाम झाला. या परिसरातील काही घरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. हॉटेलच्या छताचा ढिगारा उचलण्यासाठी ४ क्रेन बोलवाव्या लागल्या.

भाईंदर (ठाणे) येथे जैनांचे आंदोलन !

पर्युषणकाळातील मांसविक्रीबंदीच्या विरोधातील प्रकरण
हिंदूंनो, जैनांकडून धर्मप्रेम शिका ! 
मुंबई - पर्युषणकाळातील मांसविक्रीबंदीच्या संदर्भात गेले दोन-तीन दिवस जैन धर्मियांवर होत असलेल्या टीका-टिप्पण्यांच्या निषेधार्थ १२ सप्टेंबर या दिवशी भाईंदर (ठाणे) येथे जवळपास १० सहस्र जैन बांधवांनी आंदोलन करून शक्तीप्रदर्शन केले. या वेळी त्यांनी भजने म्हटली.
जैन बांधवांच्या पर्युषणकाळात मांसविक्री ४ दिवस बंद ठेवावी, असा निर्णय मीरा-भाईंदर आणि मुंबई महापालिका यांनी दिल्यानंतर शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांनी या निर्णयाला विरोध केला. शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून जैनांची तुलना मुसलमानांशी करून जैनांनी मुसलमानांसारखा आतंकवाद करू नये. मुसलमानांना जायला पाकिस्तान आहे, जैन कुठे जाणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. राज ठाकरे म्हणाले, उद्या रमजानमध्ये मुसलमान उपाहारगृहे दिवसभर बंद ठेवा म्हणतील, तर ते चालेल का ? 
भाजपचे शेलार यांनी या संदर्भात म्हटले आहे की, नालेसफाईच्या कामात मोठे घोटाळे आणि भ्रष्टाचार झाला आहे. त्याकडे जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी हा वाद उकरून काढण्यात आला आहे.
मुंबईच्या विकासात जैन बांधवांचा मोठा वाटा आहे, असे विधान ११ सप्टेंबर या दिवशी जैन धर्मगुरु आचार्य सागरचंद्र सागर सुरेशवर्जी यांनी केले होते.

सिंहस्थपर्वाच्या गर्दीचे नियोजन करतांना अनाठायी व्यय! - खासदार सदाशिव लोखंडे

     शिर्डी - सिंहस्थपर्वात होणार्‍या गर्दीचे नियोजन करतांना प्रशासनाने शिर्डीच्या ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन काम करावे. या गर्दीचे नियोजन करतांना प्रशासनाकडून अनाठायी व्यय (खर्च) करण्यात आला आहे. या खर्चाची चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. सिंहस्थपर्वाच्या नियोजनाच्या संदर्भात शिर्डी नगरपंचायतीमध्ये प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार लोखंडे पुढे म्हणाले, शिडी ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेऊन प्रशासनाने सिंहस्थपर्वाच्या काळात गर्दीचे नियोजन करावे. साईभक्तांना लांबवरून पायपीट करावी लागू नये, यासाठी छोट्या बसची संख्या वाढवावी. कामे करतांना राजकारण करू नये. सिंहस्थपर्वाच्या वेळी नियोजन चुकल्याने भक्तांची शिर्डीत येण्याची इच्छा राहिलेली नाही.

फलक प्रसिद्धीकरता

अशा जिहादींना कारागृहात केवळ पोसू नका, तर फासावर लटकवा !
     जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.मध्ये भरती होण्यासाठी तरुणांना फूस लावल्याच्या आरोपावरून संयुक्त अरब अमिरातने अफशां जबी उपाख्य निकी जोसेफ या भारतीय महिलेला देशाबाहेर काढले. त्यानंतर मायदेशी परतल्यावर तिला अटक करण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
ISIS me Bhartiya yuvaonko dakhil karneke aaropme dharmand mahila giraftar.
kya ab bhi hamare rajneta dharmandonko rashtrapremi kahenge ?
जागो !
आय.एस्.आय.एस्.में भारतीय युवाआेंको दाखील करनेके आरोपमें धर्मांध महिला गिरफ्तार.
क्या अबभी हमारे राजनेता धर्मांधोंको राष्ट्रप्रेमी कहेंगे ?

चातुर्बाहुं त्रिनेत्रं च गजास्यं रक्तवर्णकम् ।
पाशाड्.कुशादिसंयुक्तं मायायुक्तं प्रचिन्तयेत् ॥
अर्थ : चार हात आणि तीन नेत्र असलेल्या, रक्तवर्णी, पाश, अंकुश इत्यादी आयुधे धारण केलेल्या, मायेने युक्त अशा गजाननाचे ध्यान करावे.

एक वाक्य उच्चारून बंगालच्या फाळणीच्या विरोधात भारतभर चळवळ उभी करणारे लोकमान्य टिळक आणि रवींद्रनाथांच्या 'हा तर शिवाजी' या शब्दांतील जादू !

१. लॉर्ड कर्झनने हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी बंगालच्या फाळणीची घोषणा करणे आणि त्याविरुद्ध लोकमान्यांनी उच्चारलेल्या एका वाक्याने संपूर्ण भारतात आंदोलन उभे रहाणे अन् बंगालमधील प्रत्येक माणूस शहारणे : ख्रिस्ताब्द १९०४ मध्ये लॉर्ड कर्झनने हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी बंगालची फाळणी घोषित केली. बंगालमध्ये संतापाची लाट उसळली. त्या चळवळीला राष्ट्रीय रूप देण्याचे काम लोकमान्य टिळकांच्या एका वाक्याने केले. लोेकमान्य म्हणाले, 'हा वंगभंग नाही, हा भारत भंग आहे !'
    लोकमान्यांच्या वाक्यामुळे बंगालमधील चळवळीला प्रथम महाराष्ट्रातून आणि नंतर प्रत्येक प्रांतातून प्रतिसाद मिळाला. पंजाबपासून मद्रासपर्यंत (आताच्या चेन्नईपर्यंत) बंगालच्या फाळणीच्या विरोधात आंदोलन उभे राहिले. त्यामुळे बंगालमधील प्रत्येक माणूस शहारला.
२. आंदोलनाच्या परिणामस्वरूप आयोजित स्वागत समारंभासाठी लोकमान्य सभास्थळाकडे येतांना पाहून रवींद्रनाथांनी 'हा तर शिवाजी !' असे प्रभावी उद्गार काढणे आणि पुढे स्वातंत्र्य चळवळीत भारतातील प्रत्येक प्रांत सहभागी होणे : त्याचाच परिणाम म्हणजे, काही दिवसांनंतर लोकमान्यांच्या स्वागताचा प्रचंड मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या प्रचंड सभेत लोकमान्य येत असतांना रवींद्रनाथ टागोर यांनीही प्रभावी शब्दांत त्यांचे वर्णन केले. सहस्रो लोकांमधून टिळक सभास्थानाकडे जात होते. त्यावर रवींद्रनाथ एवढेच म्हणाले, 'हा तर शिवाजी !' या एका जादुई शब्दाचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत प्रत्येक प्रांतातील नागरिक सहभागी झाले.
- श्री. मोरेश्वेर जोशी (संदर्भ : आध्यात्मिक ॐ चैतन्य, गुरुपौर्णिमा विशेषांक २०१५)

अनावृष्टीचे कारण सांगून धर्मविरोधी मूर्तीदान प्रथेचे समर्थन करणार्‍यांना धर्माचरणाचे महत्त्व सांगा !

     महाराष्ट्रात प्रतिवर्षीप्रमाणे काही धर्मद्रोही संघटना श्रीगणेशमूर्तीदान चळवळ राबवू शकतात. प्रतिवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प झाल्यामुळे नद्या, तलाव यांत पुरेशा प्रमाणात पाणी नाही. श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या कालावधीत नद्या, तलाव यांत पुरेसे पाणी नाही. त्यामुळे मूर्तीचे विसर्जन नको, मूर्तीदानच करा, असा आग्रह धर्मद्रोही करतील. धर्मशास्त्र माहीत नसलेल्या गणेशभक्तांनाही हे आवाहन मूर्तीदान करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आहे. आपत्कालातही धर्मशास्त्रानुसार कृती करणे आवश्यक आहे. याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१. हिंदूंनी धर्मपालन केले, तरच राष्ट्रावरील आपत्तींचे निराकरण होईल !
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषकाः शुकाः ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥
- कौशिकपद्धति
अर्थ : (राजा अधर्मी असेल, तर प्रजाही अधर्मी होते. दोघेही धर्मपालन करत नसल्यामुळे) अतीवृष्टी (पूर), अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे राष्ट्रावर येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

    
कानाचे पडदे फाडणारे, निरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेशचतुर्थी, दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील

गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले प्रयत्न

१. अपप्रकार रोखण्यासंबंधीची भित्तीपत्रके आणि फलक लावणे
२. गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन अपप्रकार रोखण्याविषयी सांगणे
३. वर्ष २०१२ मध्ये गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत ६४१ ठिकाणी फलक लिहिण्याचे नियोजन करण्यात आले.
४. वर्ष २०१२ मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि देहली या राज्यांत १५० ठिकाणी असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
५. सामाजिक संघटना, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना अपप्रकारांविरुद्ध कृती करण्याची विनंती करणे

कैक जन्मांचे पुण्य फळाले, अष्टविनायक भूवरी आले ।

कु. मधुरा भोसले
कैक जन्मांचे पुण्य फळा आलेे, सौभाग्य दारी चालत आले ।
श्री गजानन प्रसन्न झाले, भक्तांसाठी भूवरी अवतरले ॥ १ ॥
अष्टसिद्धींसह श्री गणेश विराजले, अष्टविनायक प्रसिद्ध झाले ।
भक्तांच्या नवसाला पावले, सर्वांचे आराध्यदैवत झाले ॥ २ ॥
मयूरेश्‍वर मोरगावला आले, पालीला बल्लाळेश्‍वर गेले ।
महडला वरदविनायक झाले, थेऊरला चिंतामणि पावले ॥ ३ ॥
गिरिजात्मज लेण्याद्रीत वसले, विघ्नेश्‍वर ओझरचे झाले ।
रांजणगावी महागणपति गेले, सिद्धटेकला गजमुख आले ॥ ४ ॥
आत्मज्ञानाचे दीप लावले, ज्ञानसागराचे अमृत पाजले ।
अज्ञानाला जाळून टाकले, दुर्मतीला पळवून लावले ॥ ५ ॥
धरणीवर पडली सोनपावले, पदस्पर्शाने पावन केले ।
जेथे त्यांचे पाऊल पडले, त्या भूमीचे सोने झाले ॥ ६ ॥
पाषाणाला पाझर फुटले, खडकावरही फूल उमलले ।
पतितांचे पाप धुतले, सर्वांचे कल्याण केले ॥ ७ ॥
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०१४)

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !

      श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना

गणपतीचा मुखवटा घालून मुलगा नाचतांना बघ्याची भूमिका घेणारे गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस अन् पाठपुरावा करून ते विडंबन थांबवणारा धर्माभिमानी !

   'निपाणी (कर्नाटक) येथे विसर्जन मिरवणुकीत गणपतीचा मुखवटा घालून एक मुलगा नाचत असल्याचे धर्माभिमानी श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांच्या लक्षात आले. त्यांनी गणेशमंडळाच्या सदस्यांना भेटून नाचणे थांबवण्याची विनंती केली; मात्र त्यांनीही मागणीला जुमानले नाही. त्यामुळे श्री. पट्टणशेट्टी यांना पोलिसांकडूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा मंडळाच्या अध्यक्षांना होणार्या विटंबनेविषयी सांगितल्यावर संबंधित मुलाचे नाचणे थांबवून त्याला तेथेच बसवले.' (१२.९.२०१४)

देवतांचे विडंबन असे रोखा !

 •  नग्न किंवा अश्‍लील चित्रे काढून त्यांची उघडपणे विक्री करणारे हिंदुद्वेष्टे आणि अशी चित्र-प्रदर्शने यांचा निषेध करावा !
 • विडंबन करणारी विज्ञापने (जाहिराती) असणारी उत्पादने, वृत्तपत्रे आणि कार्यक्रम, उदा. नाटक यांच्यावर बहिष्कार टाकावा !  
 • विडंबनामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून पोलिसांत गार्‍हाणे (तक्रार) मांडावे !

सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध का करतात ?

     पितृपक्षातील (भाद्रपद मासातील) अमावास्येला हे नाव आहे. या तिथीला कुळातील सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करतात. वर्षभरात नेहमी आणि पितृपक्षातील इतर तिथींना श्राद्ध करणे जमले नाही, तरी या तिथीला सर्वांनी श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे,

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात का करू नये ?

    प्रदूषणमुक्त विसर्जनाच्या नावाखाली महापालिकेकडून ठिकठिकाणी पाण्याचे हौद बांधले जातात. हौदांत श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे; कारण कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पालिकेचे कर्मचारी गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यापूर्वीच ती हौदातून काढून बाहेर ठेवतात. असे करणे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे.
हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती पालिकेच्या कचर्‍याच्या गाडीतून नेल्या जातात. तसेच गणेशमूर्ती काढून घेतल्यानंतर पालिका हौद बुजवण्यापूर्वी त्यातील पाणी गटारात सोडून देते. हीसुद्धा एकप्रकारे श्री गणेशाची विटंबनाच आहे.

गणेशोत्सव : हिंदूसंघटनासाठीच

   
भाद्रपद मास चालू झाला की, सार्या महाराष्ट्राला चाहूल लागते, ती श्री गणरायांच्या आगमनाची ! महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणार्या या उत्सवाची प्रत्येक हिंदु मनापासून वाट पहात असतो. जिथे सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला, त्या पुण्यासारख्या नगरीत तर गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व असते; पण हिंदूंनो, क्षणभर आपल्या आजूबाजूच्या स्थितीचा आणि देशाचा विचार करून पहा ! सध्याची हिंदु समाजाची आणि आपल्या राष्ट्राची स्थिती राष्ट्रातील नागरिकांनी उत्सवात मग्न रहाण्याची आहे का ? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे.

दहाव्या दिवशी कावळा पिंडाला शिवणे

दहाव्या दिवशी कावळा पिंडाला शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ? 
     (पिंडदानाच्या वेळी लिंगदेहाने कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्न भक्षण करणे) : काकगती ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते. तसेच कावळ्याचा काळा रंग हा रज-तमदर्शक असल्याने, तो पिंडदान या रज-तमात्मक कार्याशी संबंधित विधीशी साधर्म्य दर्शवतो. कावळ्याभोवती असलेल्या सूक्ष्म कोषातही लिंगदेहाभोवती असलेल्या कोषासारखेच आपकणांचे प्राबल्य अधिक असल्याने लिंगदेहाला कावळ्याच्या देहात प्रवेश करणे सोपे जाते.

श्राद्धविधीत पितरांना अन्न निवेदन करणे

पितरांना अन्न निवेदन करण्याची पद्धत आणि त्यामागील शास्त्र
१. कृती : पितरांना (पितर-ब्राह्मणांना) वाढलेले पान त्यांच्या दिशेने ठेवून त्याच्या विरुद्ध दिशेला पानासमोर बसून डावा गुडघा खाली टेकवावा. डावा हात पानाच्या वरती आणि उजवा हात पानाच्या खाली, अशा प्रकारे पान पकडून पितरांना अन्न निवेदन करावे.
२. शास्त्र : डावा गुडघा खाली टेकवून उजवा गुडघा पोटाशी घेतल्याने सूर्य नाडी कार्यरत होऊन

श्री गणेशपूजनाला आरंभ करतांना करावयाच्या प्रार्थना

अ. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे.
आ. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला ग्रहण करता येऊ दे.

श्री गणपति अथर्वशीर्षात वर्णिलेले श्री गणेशाचे मूर्तीविज्ञान

    श्री गणपति अथर्वशीर्षात गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे - एकदन्तं चतुर्हस्तं...। म्हणजे एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकुश धारण करणारा, एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आणि दुसर्‍या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे असा, रक्त (लाल) वर्ण, लंबोदर, सुपासारखे कान असलेला, रक्त (लाल) वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त (लाल) पुष्पांनी पूजन केलेला.

जनहो, गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही !

    माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार गणेशमूर्ती विसर्जनानंतर तेथील पाण्यातील प्रदूषणाचा स्तर न्यून झाला असल्याची माहिती उपलब्ध आहे ! गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे ! पर्यावरणतज्ञांनी मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचे निष्कर्ष अभ्यासाद्वारे मांडलेले आहेत. कागदाच्या लगद्याची गणपतीमूर्ती धर्मविरोधी असून लगदा विसर्जित झाल्यावर जलचरप्रकरणी आणि मासे मरतात तसेच प्रदूषण वाढते !

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी श्री गणेशाची आराधना करा !

     लोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी ? त्यावर बुवांनी त्यांना सांगितले श्री गणपतीची पार्थिव पूजा चालू करा ! त्यानुसार लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला.
हिंदूंनो, सद्यस्थितीत तुम्हीही गणेशोत्सवाचा उपयोग हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करा !
     भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. लहानपणी तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्याला जपणार्‍या आपल्या माता-पित्यांचा मृत्योत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा,
पूजाकार्यात निषिद्ध मानलेल्या चांदीतील रजोगुण आणि वायूतत्त्व यांमुळे पितरांना नैवेद्य लवकर ग्रहण करता येत असल्यामुळे चांदीच्या वस्तू श्राद्धात वापरतात.
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सर्वसाधारणतः श्राद्धकर्म कसे असते ?

१. अपसव्य करणे : देशकालाचा उच्चार करून अपसव्य करावे, म्हणजे जानवे डाव्या खांद्याऐवजी उजव्या खांद्यावर घ्यावे.
२. श्राद्धसंकल्प करणे : श्राद्धाला योग्य जे पितर त्यांची षष्ठी विभक्ती योजून अमुकश्राद्धं सदैवं सपिण्डं पार्वणविधीना एकोद्दिष्टेन वा अन्नेन वा आमेन वा हिरण्येन सद्यः करिष्ये, असा संकल्प श्राद्धकर्त्याने करावा.
३. यवोदक आणि तिलोदक तयार

श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र जाणून त्यानुसार कृती करा !

  सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेशपूजनाशी संबंधित काही कृती आणि त्यांमागील शास्त्र पुढे सांगितले आहे. तसेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने सध्या चालू झालेल्या अनिष्ट प्रथांविषयी दिलेले धर्मशास्त्रीय दृष्टीकोन जाणून भक्तांनी धर्माचरण करावे  !
श्री गणेशचतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ?
    चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी ! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या तुलनेत अधिक लाभ होतो. त्यासाठी बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या !

हास्यास्पद विधान ! परंपरागत मूर्ती दगड, लाकूड यांपासून बनवतात ! प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या साच्यांचा वापर करून बनवतात ! त्याला परंपरागत मूर्तीकला कसे म्हणता येईल ?

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्तीकार मूर्ती बनवतात. त्यापासून मूर्ती बनवण्यास बंदी आणल्यास मूर्तीकारांचा परंपरागत व्यवसाय बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. - अधिवक्ता प्रसन्न कुट्टी, संभाजीनगर (१६.५.२०१३)

ईश्‍वरी साहाय्यावाचून कोणतेही कार्य शेवटास जात नाही, हे ओळखून सार्वजनिक गणेशोत्सव चालू करणारे लोकमान्य टिळक !

     लोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, मी स्वराज्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे; पण ईश्‍वरी साहाय्यावाचून कोणतेही कार्य शेवटास जात नाही, तेव्हा या स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी ?
बुवा म्हणाले, तुम्ही श्री गणपतीची पार्थिव पूजा चालू करा, म्हणजे तुमचे सर्व हेतू सिद्धीस जातील.
त्यावर लोकमान्य टिळक म्हणाले, मी एकट्याने अशी पूजा करून भागणार नाही. राष्ट्रभर ती सर्वांनी केली पाहिजे. आपल्याकडे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस घरोघर पार्थिव गणपतीची पूजा करायचा पूर्वीचा प्रघात आहेच. तो आता राष्ट्रभर चालू करूया.

देवतांचे विडंबन म्हणजे धर्महानी !

स्पायडरमॅनच्या रूपातील गणेशमूर्ती
मल्हारदेवाच्या रूपातील गणेशमूर्ती
देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. वरील प्रकारे गणेशमूर्ती सिद्ध करून काही गणेशमंडळांनी गणेशाचे विडंबनच केले आहे. त्यामुळे धर्महानी रोखणे, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे. ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे. ही उपासना केल्याविना देवतेची उपासना पूर्ण होऊच शकत नाही. यास्तव गणेशभक्तांनीही याविषयी जागरूक होऊन धर्महानी रोखायला हवी.

श्राद्धाचा परिणाम

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळण्याची प्रक्रिया : श्राद्ध हे लिंगदेहावर करावयाच्या संस्कारकर्माशी संबंधित असते. श्राद्ध करणे म्हणजे, पितरांच्या लिंगदेहाला गती देण्यासाठी ब्रह्मांडातील ऊर्जात्मक यमलहरींना आवाहन करणे होय. या प्रार्थनारूपी आवाहनामुळे ब्रह्मांडातील दत्ततत्त्वाशी संबंधित इच्छालहरी कार्यरत होऊन पितरांच्या लिंगदेहाशी संबंधित यमलहरींना आपल्या आकर्षणशक्तीच्या बळावर खेचून पृथ्वीच्या कक्षेत आणतात.

पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व

     पितृपक्षात श्राद्धविधी करण्यासह दत्ताचा नामजप केल्यास पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यास आणखी साहाय्य होते. यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप प्रतिदिन कमीतकमी १ ते २ घंटे (१२ ते २४ माळा) आणि जास्तीतजास्त म्हणजे सतत करावा.

श्राद्ध

श्राद्ध या शब्दाच्या संदर्भातील माहिती
१. व्युत्पत्ती आणि अर्थ      श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते, ते श्राद्ध होय.
२. व्याख्या
ब्रह्मपुराणाच्या श्राद्ध या प्रकरणात श्राद्धाची पुढील

गणपतीची मूर्ती शाडूमातीचीच का हवी ? अन्य वस्तूंपासून गणेशमूर्ती का बनवू नये, याचे धर्मशास्त्रीय विवेचन

आक्षेप : धर्मसिंधूमध्ये गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती कशी असावी, याविषयी पुढील नियम दिला आहे.
तत्र मृण्मयादिमूर्तौ प्राणप्रतिष्ठापूर्वकं विनायकं
षोडशोपचारैः सम्पूज्य...। - धर्मसिन्धु, परिच्छेद २
अर्थ : या दिवशी मृण्मय इत्यादी मूर्तीचे ठिकाणी प्राणप्रतिष्ठापूर्वक विनायकाची षोडशोपचारांनी पूजा करून...
येथे मृण्मय इत्यादी असा शब्द असल्याने इत्यादी या शब्दाच्या आधारे कोणी नारळांपासून, पैशांच्या नाण्यांपासून अथवा अन्य गोष्टींपासून मूर्ती बनवल्यास त्याला सनातनचा आक्षेप का ?
खंडण : धर्मसिंधु हा ग्रंथ विविध स्मृतिग्रंथांचे संकलन करून बनवलेला आहे. कोणत्याही ग्रंथामध्ये आदी, इत्यादी यांसारखे शब्द एखादी माहिती संक्षेपाने सांगण्यास वापरतात. या आदी, इत्यादी यांसारख्या शब्दांचा अर्थ योग्य संदर्भ पाहून लावावा लागतो. धर्मसिंधूच्या वरील उद्धरणातील आदी या शब्दाचा अर्थ नारळ, पैशांची नाणी इत्यादी होऊच शकत नाही. याचे कारण पुढीलप्रमाणे आहे.
स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धीविनायक व्रत करण्यास सांगितले आहे. या वेळी मूर्ती कशी असावी ? याचे सविस्तर वर्णन आले आहे.

गणेशोत्सवकाळात जनतेचे नैतिक अधःपतन करू पहाणारी नीतीहीन गणेशोत्सव मंडळे

   ख्रिस्ताब्द २०११ मध्ये गोव्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी मंडळाच्या सोडतींवर मोठमोठ्या रकमेची बक्षिसे ठेवली होती. अनेक मंडळांचा केवळ बक्षिसांवरील खर्च ४० लक्षांहून अधिक होता. ट्रक, विविध प्रकारच्या चारचाकी गाड्या, दुचाकी वाहने, सोने, रोख रक्कम, अशी बक्षिसांची खैरात करण्यात आली होती.

श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

     श्राद्धातून उत्पन्न झालेली ऊर्जा ही मृताच्या लिंगदेहामध्ये सामावलेल्या त्रिगुणांच्या ऊर्जेशी साम्य दाखवते; म्हणून अल्प कालावधीत श्राद्धातून उत्पन्न झालेल्या ऊर्जेवर लिंगदेह मर्त्यलोक पार करतो. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) मर्त्यलोक पार केलेला लिंगदेह परत पृथ्वीवरील सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणकक्षेत

पद्मपुराणात देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ आहे, असे का सांगितले आहे ?

     साधना न करणार्‍या एखाद्या व्यक्तीने पितरांच्या संबंधित कार्य केले असता तिच्यावर पितरांची कृपा होऊन तिचे जीवन सुखी होते. त्यानंतर ती व्यक्ती साधनेकडे वळू शकते आणि चांगल्या प्रकारे देवकार्य करू शकते. त्यामुळे देवकार्यापेक्षा पितरांशी संबंधित

श्री गणपतीच्या चित्राला लाल गुलाब किंवा फिकट गुलाबी जास्वंद वाहण्यापेक्षा धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे लाल जास्वंद वाहणे उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते, हे दर्शवणारी पिप छायाचित्रे !

साधकांनो, श्री गणपतीला लाल जास्वंद वाहण्याचे वैज्ञानिक उपकरणाद्वारे
 सिद्ध झालेले महत्त्व जाणून श्री गणपतीच्या पूजनातील अन्य उपचारही धर्मशास्त्रानुसारच करा !
सूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूलभूत प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १) करतांना छायाचित्रातील पटल, तसेच चित्र यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सातव्या-आठव्या शतकांत झालेले कुंभपर्व आणि वर्ष २०१५ मधील कुंभपर्व यांत साधू किंवा भाविक यांनी राजयोगी (शाही) स्नान करणे, याची एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

पू. (सौ.) योया वाले
सातव्या-आठव्या शतकांत झालेल्या कुंभपर्वांत साधू किंवा 
भाविक यांनी राजयोगी (शाही) स्नान करणे, याची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !
कुंभपर्व म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेवर-नाशिक येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो, तसेच पापक्षालन होते. म्हणूनच कोट्यवधी भाविक आणि साधूसंत या ठिकाणी जमतात. या कुंभपर्वाला सहस्रो वर्षांची परंपरा लाभली आहे.
पर्वणीच्या दिवशी विविध साधूसंतांनी ठरवून घेतलेल्या क्रमाने आखाड्यातील सहसंत आणि शिष्य यांच्यासह स्नान करणे, याला राजयोगी स्नान (शाही स्नान) म्हणतात. सातव्या-आठव्या शतकांत झालेले कुंभपर्व आणि २०१५ मधील कुंभपर्व यांतील स्नानाविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

श्री गणपतीच्या चित्राला लाल गुलाब, फिकट गुलाबी जास्वंद आणि लाल जास्वंद ही फुले वाहिल्यानंतर चित्राभोवतीच्या वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

साधकांनो, श्री गणपतीला लाल जास्वंद वहाण्याचे वैज्ञानिक उपकरणाद्वारे सिद्ध 
झालेले महत्त्व जाणून श्री गणपतीच्या पूजनातील अन्य उपचारही धर्मशास्त्रानुसारच करा !
श्री गणपतीला लाल जास्वंद वाहावे, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. लाल जास्वंदी व्यतिरिक्त जास्वंदीचे अन्यही अनेक प्रकार असतात. सध्या पूजेत लाल गुलाबाचाही वापर सर्रास केला जातो. त्यामुळे लाल जास्वंद, फिकट गुलाबी जास्वंद आणि गुलाब ही फुले श्री गणपतीच्या चित्राला वाहिल्यावर त्यांचा त्या चित्राभोवतीच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. या चाचणीद्वारे सूक्ष्म-दृष्टी असणार्‍या धर्मशास्त्रकारांचे ज्ञान किती १०० टक्के सत्य आहे, हे लक्षात येईल आणि धर्मशास्त्राचे पालन काटेकोरपणे करण्याचे महत्त्वही वाचकांच्या ध्यानी येईल.
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्द प्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

धर्माभिमानी हिंदूंना आवाहन

गणेशोत्सवकाळात होणारे श्री गणेशाचे विडंबन थांबवण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !
श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून श्री गणेशाचे विज्ञापनफलक लावण्यात येतात. यातील बहुतांश विज्ञापन फलकांवरील श्री गणेशाचे चित्र विडंबनात्मरित्या काढलेले असते, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि संकेतस्थळे यांवरील विज्ञापनांमधूनही श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास त्याविषयी संंबंधित आस्थापनांच्या प्रमुखांना संपर्क करून त्यांचे प्रबोधन करावे आणि श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करावे. याविषयाची माहिती नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयातही कळवावी.
संपर्क क्रमांक : ९४०४९५६०८७
इ-मेल पत्ता : panveldainik@gmail.com

धार्मिक उत्सवांच्या वेळी बळजबरीने वर्गणी मागणार्यांविरुद्ध आजच कृती करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री गणेशोत्सवातील निधीसंकलनाच्या वेळी करण्यात येणार्याल जबरदस्तीविरुद्ध कृती करणे, हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे, तसेच पोलिसांचे कर्तव्य आहे. आज धार्मिक उत्सवाची वर्गणी जमा करतांना बळाचा वापर करणार्यां मधून पुढे खंडणीबहाद्दर निर्माण होतात, हे लक्षात घ्या. अशा जबरदस्तीविरुद्ध पोलिसांकडे 
तक्रार नोंदवा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (वर्ष २००२)
श्रमपरिहार, रात्रभर मंडपात राखण करावी लागते, अशी विविध कारणे सांगत गणेशोत्सवस्थळी जुगार खेळणे वा मद्यपान करणे, या गोष्टी धर्माविरुद्ध आहेत. गणेशोत्सवात अशी कृत्ये करून उत्सवाचे पावित्र्य घालवणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (वर्ष २००२)  

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
विश्‍वास आणि विकल्प
     परमेश्‍वरावर नितांत विश्‍वास असू द्या. तो मला देईलच, असे वाटू द्या; मात्र तो मला देईल का, हे शक्य होईल का, असे विकल्प मनात आले की, विकल्पच काम करतील ! तुमच्या मिळण्यात अडथळे निर्माण होतील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्वरावरील श्रद्धा !
    परमेश्वरावरील श्रद्धा म्हणते, 'हे कार्य देवच करू शकतो.' त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, 'देव हे करीलच !'; पण परमेश्वरावरील परमश्रद्धा म्हणते, 'हे काम झालेच आहे !' 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विघ्नहर्त्या गणेशाला शरण जा !

गणेश चतुर्थी हा विघ्नहर्त्या देवतेचा सण ! योजिलेले कोणतेही कार्य विघ्नांच्या अडथळ्यांविना पार पडण्यासाठी श्री गणपतीला आळवण्याची प्रथा हिंदूंमध्ये प्रचलित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वराज्य स्थापन करण्यासाठी जनजागृती करणारे युगपुरुष लोकमान्य टिळक यांनी या सणाचे उत्सवात रूपांतर केले. प्रत्येक हिंदूच्या हृदयात या सणाविषयी अत्यंत आदर आणि धार्मिक ओलावा असतो. लोकमान्यांनी ही गोष्ट चांगल्या पद्धतीने जाणली होती. इंग्रजांच्या विरोधात लढा देण्यासाठी हिंदूंचे संघटन असणे आवश्यक आहे, असा विचार करून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. या उत्सवाच्या निमित्ताने हिंदू सहस्रोंच्या संख्येने एकत्र येऊ लागले. आजही ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात. हिंदू मोठ्या संख्येने गणेशोत्सवाच्या मंडपात एकत्र येतात. या प्रक्रियेत त्यांचे संघटन कुठपर्यंत सशक्त होत जाते, हा प्रश्न् मात्र अनुत्तरित रहातो. किंबहुना लोकमान्यांचा उद्देश पूर्ण झाला, असे म्हणता येत नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn