Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मेरठमध्ये जन्माष्टमीच्या देखाव्यावरून धर्मांधांची हिंदूंना मारहाण

धर्मांधांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
हिंदूंनो, या देशात केवळ तुमच्या धार्मिक सणांनाच विरोध केला जातो, हे लक्षात घ्या आणि शांततापूर्ण 
अन् धार्मिक वातावरणात सण साजरे करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
        मेरठ (उत्तरप्रदेश) - येथील हंडिया भागातील बडा बाजारमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त देखावा सिद्ध करणार्‍या हिंदूंना पोलीस अधिकारी राहुल कुमार यांच्या समक्ष इरशाद, माजिद, सन्नी, माजी आमदार अजमल कमाल, पपल आदी धर्मांधांनी मारहाण केली, तसेच देखावा लावण्यासाठी ठेवण्यात आलेले पटल आणि खुर्च्यांची नासधूस केली. मारहाण करणार्‍यांनी या वेळी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणाही दिल्या. या घटनेनंतर संतप्त हिंदूंनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. (हिंदूंनो, उत्तरप्रदेशचे दुसरे पाकिस्तान होण्यापासून वाचवण्यासाठी मोदी शासनाला समाजवादी पक्षाचे हिंदुद्वेष्टे शासन हटवण्याची मागणी करा ! - संपादक)

पोथीनिष्ठ मार्क्सवादी पुरोगाम्यांकडून भारतातील वैचारिकतेचे पुरते वाटोळे !

प्रा. शेषराव मोरे यांचा पुरोगाम्यांना दणका 
     पोर्ट ब्लेअर (अंदमान) - 'हिंदूविरोधी अधिकाधिक बरळायचे, म्हणजे आपण पुरोगामी ! अशी एक नवीनच प्रथा आजकाल स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्यांनी भारतात रूढ केली आहे. खरेतर या पोथीनिष्ठ मार्क्सवादी पुरोगाम्यांनी भारतातील वैचारिकतेचे पुरते वाटोळे केले आहे', या शब्दांत चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी पुरोगाम्यांचा चौफेर समाचार घेतला. पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि ऑफबीट डेस्टिनेशन्स यांच्या वतीने आयोजित चौथ्या विश्वे साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ५ सप्टेंबरला झाले; या प्रसंगी प्रा. मोरे बोलत होते. 

(म्हणे) 'देवींचे पूजन करणे, हे शिक्षणाच्या मागासलेपणाचे लक्षण !' बनारस हिंदु विद्यापिठाच्या प्राध्यापिका डॉ. चौधरी यांची गरळओक

डॉ. इंदू चौधरी अशा प्रकारे इतर धर्मियांच्या भावना दुखावू शकतात का ? 
     आग्रा - 'एक दिवस तुमच्या पत्नीने तुमच्यावर लाटणे उगारले, तर तुम्ही तिला दोन लावणार कि नाही ? पत्नीचे लाटणे तुम्हाला नको; परंतु देवी एका हातात तलवार, त्रिशूळ, भाला, गदा घेऊन स्वार होऊन असते आणि आम्ही म्हणतो, 'बोलो शेरावाली माता की जय'. काय तुम्हाला अशा प्रकारच्या महिलांना आपल्या घरी आणणे आवडणार आहे ? या देवीचे पूजन हे तर आमच्या शिक्षणाच्या मागसलेपणाचे सर्वांत मोठे लक्षण आहे', असे धर्मद्रोही वक्तव्य बनारस हिंदु विद्यापिठाच्या प्राध्यपिका डॉ. इंदू चौधरी यांनी आग्रा येथील डॉ. आंबेडकर विद्यापिठात एका कार्यक्रमात केले. (देवीने वेळोवेळी शस्त्रे धारण करून वेगवेगळ्या राक्षसांचा वध केला आणि भक्त, तसेच सामान्य जनता यांचे रक्षण केले. ते रूप म्हणजे देवीचे शस्त्रधारी रूप होय; परंतु दोनचार पदव्या मिळवल्या, म्हणजे आम्ही कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यास मोकळे आहोत, असे ज्यांना वाटते ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्याचे लक्षण आहे ! - संपादक) 

१० आतंकवाद्यांना ठार करून मोहननाथ गोस्वामी यांना वीरमरण

भारतीय सैनिकांचे प्राण घेणार्याा आतंकवाद्यांना पोसणार्याा पाकला कायमचा धडा शिकवा !
     श्रीनगर - जम्मू काश्मिरच्या हंडवारा भागात १० आतंकवाद्यांना ठार मारून वीरमरण पत्करणारे विशेष दलांचे कमांडो लांस नायक मोहननाथ गोस्वामी यांना ५ सप्टेंबर या दिवशी नैनीतालमध्ये शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या शेकडो लोकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोेषणा दिल्या. गोस्वामी हे मूळचे उत्तराखंडमधील हल्दवानी येथील इंदिरानगर गावातील होते. 

यंदा गणेशोत्सवावर आतंकवादी हल्ल्याचे सावट ! - नवी मुंबई पोलीस आयुक्त

हिंदूंच्या प्रत्येक सणावर आतंकवादी हल्ल्याचे सावट तसेच असणे, 
हेच का भाजपचे चांगले दिवस आहेत ?
       नवी मुंबई - नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांच्या कार्यकर्त्यांना देशावर गणेशोत्सवाच्या कालावधीत आतंकवादी आक्रमण होण्याचे संकेत मिळाल्याची माहिती जाहीर करून जनतेला धार्मिक एकोपा जपण्याचा सल्ला दिला. देश आतंकवादी संकटात असून नागरिकांनी एकत्रितपणे या संकटाला तोंड देण्याचे भावनिक आवाहन आयुक्त रंजन यांनी गणेशभक्तांना केले. 
      न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करा, अशा सूचनावजा कारवाईची चेतावणी मंडळांच्या प्रतिनिधींना या वेळी दिली. नवी मुंबई पोलिसांनी चालू केलेल्या २०१४ विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पनवेल येथील फडके नाट्यगृहात ४ सप्टेंबर या दिवशी झाला. नवी मुंबईमध्ये पाचशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे रस्ता अडवून गणेशोत्सव साजरा करतात. पोलिसांनी या वेळी गणेशभक्तांना रस्ते अडवण्याऐवजी जवळच्या पटांगणात अनुमती घेऊन गणेशोत्सव साजरा करा, अशी विनंती केली आहे.

भारतात एक वर्षात ७५ सहस्र तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू

संपतकाळात अपघातांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जीव गमवावा लागणारा जगातील एकमेव देश भारत ! 
     नवी देहली - 'भारतात वर्ष २०१४ मध्ये १५ ते ३४ या वयोगटातील तब्बल ७५ सहस्र जणांना केवळ रस्त्यांवरील अपघातांमध्ये जीव गमवावा लागला असून या मृतांमध्ये ८२ टक्के पुरुषांचा समावेश आहे', असे परिवहन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे. 
१. परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील वर्षी रस्त्यांवरील अपघातांमध्ये एकूण १ लाख ४० सहस्र जणांचा मृत्यू झाला. त्यांपैकी १५ ते ३४ वयोगटांमधील मृतांची संख्या ५३.८ टक्के, तर ३५ ते ६४ वयोगटातील मृतांची संख्या ३५.७ टक्के एवढी आहे. 

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात श्रीकृष्ण जयंतीचा सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा

श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करतांना
श्री. सिद्धेश करंदीकर
     रामनाथी, ६ सप्टेंबर (वार्ता.) - रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात ५ सप्टेंबर या दिवशी श्रीकृष्ण जयंतीचा सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आश्रमातील ध्यानमंदिरात रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विधीवत् पूजन करण्यात आले. सनातन साधक-पुरोहित पाठशाळतील विद्यार्थी श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. मंदार मणेरीकर यांनी केले. या वेळी ध्वनीवर्धकावर पाळणागीत लावण्यात आले होते. साधकांनी या पाळगीताचे भावपूर्णरितीने श्रवण करून कृष्णाष्टमीच्या सोहळ्याचा आनंद अनुभवला. या प्रसंगी राजस्थान येथील संत पू. आैंकारानंद महाराज, पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, सनातनचे पू. भगवंतकुमार मेनराय आणि त्यांच्या धर्मपत्नी 
      पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे (एस्.एस्.आर्.एफ्.चे) पू. सिरीयाक वाले आणि पू. (सौ.) योया वाले यांची वंदनीय उपस्थित होती.

नेपाळ येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी प्रारंभ केलेल्या आमरण उपोषणास हिंदु जनजागृती समितीचा पाठिंबा

     काठमांडू - 'नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करावे' या मागणीसाठी नेपाळच्या ५ हिंदु तरुणांनी प्रारंभ केलेल्या आमरण उपोषणाला हिंदु जनजागृती समितीने संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. या आशयाचे एक पत्र हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपोषणकर्त्या तरुणांना पाठवले आहे. 
     या पत्रात पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी लिहिले आहे, 'नेपाळच्या प्रचलित राज्यघटनेत तिला धर्मनिरपेक्षतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे नेपाळमधील हिंदु धर्माला धर्मांतर, गोहत्या आदींचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळमध्ये हिंदूंची लोकसंख्या ८२ टक्के असल्याने ते हिंदु राष्ट्र झालेच पाहिजे. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती नैतिक, राजकीय आणि इतर सर्व शक्य त्या मार्गाने हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी कार्यरत असलेल्या हिंदूंना पाठिंबा व्यक्त करत आहे. नेपाळमधील हिंदूंच्या हिंदु राष्ट्रासाठीच्या लढ्यात धर्मनिरपेक्ष भारताने कुठल्याही तर्हेदने हस्तक्षेप केल्यास समिती भारत शासनाकडे पत्रव्यवहार करील. नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करावे या मागणीसाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळो, अशी ईश्वषरचरणी प्रार्थना !'

आतंकवादी आक्रमणात देशाच्या संपत्तीची हानी होण्यात मुंबई जगातील सर्वाधिक धोकादायक शहर !

'लॉयड्स' या विमा आस्थापनाची पाहणी 
     मुंबई - जगप्रसिद्ध आणि सर्वांत जुन्या 'लॉयड्स' या विमा आस्थापनाने केलेल्या पाहणीनुसार मुंबईवर २६/११ सारखे आतंकवादी आक्रमण झाले, तर देशाच्या सकल उत्पन्नाची (जी.डी.पी.) एकूण हानी ५ सहस्र कोटींच्या घरात पोहोचण्याचा धोका आहे. या दृष्टीने मुंबई हे जगातील न्यूयॉर्कपेक्षाही धोकादायक शहर गणले जाते. त्या खालोखाल अफगाणिस्तानातील काबुल (४ सहस्र कोटी) शहराचा क्रमांक लागतो. विद्युतपुरवठा बंद झाल्यास होणार्या हानीतही मुंबईचा जगात चौथा, तर देहलीचा पाचवा क्रमांक लागतो. 

धर्मांतरितांचा विदेशी धर्मावर विश्वाएस नसल्यामुळे त्यांच्याकडून हिंदु नावांचा वापर ! - धर्माभिमानी श्री. मेनन

     कोची - धर्मांतरित ख्रिस्त्यांना अमला, विमला, निर्मला, विमलज्योती, अमालज्योती, महेश, परमेश्वलर अशा नावांची आवड आहे. त्यावरून धर्मांतरितांना विदेशी धर्माशी जुळवून घेता आले नाही, हे लक्षात येते. ख्रिस्ती मिशनरी सर्रास वेद, ख्रिस्त चालीसा, येशू सहस्रनाम असे शब्द वापरून हिंदु धर्मावर आघात करतात. हिंदु रूढी, परंपरांना अंधश्रद्धा म्हणतात. तरीही या परंपरांची ते नक्कल करतात. भजने म्हणतात. एका दूरचित्रवाणीच्या वाहिनीवर हिंदूंवर टीका करणार्याच मिशनर्यांचे नाव श्रीनिवासन होते. हे सर्व कसे चालते ? या धर्मांतरितांचा त्यांच्या विदेशी धर्मावर विश्वावस नसल्यामुळेच ते अजूनही हिंदु नावांना चिकटून आहेत. 

पाक आतंकवाद्यांकडून ड्रोन्स् आणि पॅराग्लायडर्स यांच्या मार्फत आक्रमण होण्याची शक्यता

केंद्र शासनाकडून देशात ड्रोन्स् उडवण्यासंदर्भात कठोर नियम 
भारतीय राज्यकर्ते पाकिस्तानला कायमचा धडा शिकवतील का ? 
      नवी देहली - पाक आतंकवादी अनमॅन्ड् एरिअल व्हेहिकल्स् ड्रोन्स् आणि पॅराग्लायडर्स यांच्या साहाय्याने आक्रमण करण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून देशात ड्रोन्स् उडवण्यावर कठोर नियम करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये यूएव्ही शिवाय पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून, रिमोटद्वारे उडणारी उपकरणे आणि कमी वजनाची विमाने यांचा समावेश आहे. लवकरच हे नियम लागू होऊ शकतात. ड्रोन्स्च्या माध्यमातून आक्रमण करण्याचे षड्यंत्र पाक आतंकवादी रचत असल्याचा संशय भारतीय गुप्तचर संस्थांनी व्यक्त केला होता. 
     भारतात जवळपास ३२५ एअरस्ट्रिप (संकटाच्या वेळी विमान उतरवण्याचे ठिकाण) आहेत. या एअरस्ट्रिपचा अल्प वजनाचे ग्लायडर्स आणि ड्रोन्स् यांचे उड्डाण करण्यासाठी वापर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन भारतीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 'हिंदु संघटनदिन' उत्साहात साजरा !

     न्यूयॉर्क - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहणदिनाच्या निमित्ताने ३० ऑगस्ट या दिवशी येथे २० वा हिंदु संघटनदिन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, गयाना आणि त्रिनिदाद येथील न्यूयॉर्क शहरात रहाणारे हिंदु नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. 
     या कार्यक्रमास प्रसिद्ध हिंदुत्ववादी लेखक आणि इन्फिनिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राजीव मल्होत्रा, सुदर्शन दूरचित्रवाहिनीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री. सुरेश चव्हाणके, जागतिक आर्थिक सल्लागार अदिती बॅनर्जी, अमेरिकेतील हिंदु टेम्पल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. उमा म्हैसूरकर, 'ब्लर' या कादंबरीचे लेखक श्री. विजय शेरतुकडे, उद्योजक विभूती झा, हिंदी यु.एस्.ए.चे संस्थापक देवेंद्र सिंह, भाजपच्या विदेशी मैत्र संघटनेचे डॉ. राजीव शुक्ला, आदी उपस्थित होते. 

वन रँक वन पेन्शन योजना स्वेच्छानिवृत्ती घेणार्‍यांनाही लागू - पंतप्रधान मोदी

सैनिकांचे उपोषण मागे 
      फरीदाबाद - वन रँक वन पेन्शन (एक श्रेणी एक निवृत्तीवेतन) या योजनेचा लाभ १५ वर्षे सैन्यात नोकरी केलेल्या प्रत्येक सैनिकाला (त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांनाही) मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. यानंतर सैनिकांनी गेले ३ मास चालू असलेले उपोषण मागे घेतले.

रा.स्व. संघ शासन चालवत नाही ! - गृहमंत्री राजनाथ सिंह

      पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी, दोघेही जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलो, तरी याचा अर्थ संघ शासन चालवतो असा होत नाही, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. नुकत्याच देहलीत झालेल्या भाजप आणि संघ यांच्यातील समन्वय बैठकीवर विरोधकांनी टीका केली आहे.

हिंदूंच्या लोकसंख्येची पडझड रोखण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेचा कृती कार्यक्रम घोषित

श्रीराम जन्मभूमीविषयी ठराव पारित
डावीकडून बोलतांना विहिंपचे डॉ. प्रवीण तोगाडिया
आणि अन्य संत महंत
   नाशिक, ६ सप्टेंबर (वार्ता.) - भारताच्या जनगणनेची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात घटली असून मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे. हिंदूंची लोकसंख्या घटते अन् मुसलमानांची लोकसंख्या मात्र ११ टक्क्यांनी वाढते. त्यामुळे हिंदूंच्या लोकसंख्येची पडझड रोखण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने १० कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. विहिंपच्या सुवर्ण जयंती वर्ष समाप्ती समारंभाच्या निमित्त नाशिक येथील सिंहस्थपर्वात ६ सप्टेंबर या दिवशी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ही घोषणा करण्यात आली. या संमेलनात देशपातळीवर गोरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली; तसेच मोदी शासनाने वर्ष २०१९ पर्यंत श्रीराम मंदिर उभारावे.

मुसलमानांच्या आगमनाने युरोपातील मूळ ख्रिस्ती संस्कृती संकटात !

हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबन यांची चेतावणी
आय.एस्.आय.एस्.च्या भीतीने सिरियातील सहस्रो नागरिक युरोपच्या आश्रयाला
      हंगेरी - युरोपमध्ये येणारे बहुतांश प्रवासी मुसलमान आहेत आणि त्यांच्या येण्यामुळे युरोपातील मूळ ख्रिस्ती संस्कृती कमकुवत होण्याचे संकट आहे, अशी चेतावणी हंगेरी या युरोपीय देशाचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबन यांनी दिली. आय.एस्.आय.एस्.या आतंकवादी संघटनेच्या क्रूर अत्याचारांच्या भीतीने सिरियातील सहस्रो नागरिक युरोपच्या आश्रयाला जात आहेत. एका जर्मन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हंगेरीचे पंतप्रधान पुढे म्हणाले, आम्हाला हे विसरता कामा नये की, युरोपात जे येत आहेत, ते एका वेगळ्या धर्माचे असून त्यांची संस्कृतीही पूर्णत: वेगळ्या स्वरूपाची आहे. युरोप किंवा युरोपीय संस्कृती यांचे मूळ ख्रिस्ती आहे. युरोपची ख्रिस्ती संस्कृती तिच्या ख्रिस्ती मूल्यांना टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे ही स्थिती आमच्यासाठी भयावह नाही का ?

केवळ शीना बोरा हत्याप्रकरणालाच अवास्तव महत्त्व देऊ नका ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांची कानउघाडणी

     मुंबई - उच्चभ्रू समाजातील शीना बोरा या मुलीच्या हत्येच्या बातम्यांनी गेली १५-२० दिवस प्रसारमाध्यमांचे रकानेच्या रकाने भरून येत आहेत. त्यासोबतच कित्येक पोलीस अधिकारीही स्वत:ची नावे आणि छयाचित्रे प्रकाशित करून प्रसिद्धीची हौस भागवून घेत आहेत. या सर्व प्रकरणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी केवळ शीना बोरा हत्या प्रकरणासच अवास्तव महत्त्व न देता सर्वसामान्य जनतेशी संबंधित अन्य घडामोडींवरही लक्ष द्यावे, या शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली. यासमवेतच मुख्यमंत्र्यांनी शीना बोरा हत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या अन्वेषणाचे कौतुकही केले.

अमेरिकेपासूून वाचण्यासाठी पाकने आतंकवादी संघटना हरकत-उल्शी संबंध तोडले

अमेरिकी गुप्तहेर संस्था सीआयएच्या अहवालात खुलासा 
     वॉशिंग्टन - अमेरिका वर्ष १९९० मध्ये पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करणार होती; मात्र पाकिस्तानने प्रमुख आतंकवादी संघटना हरकत-उल्-अन्सारशी असलेले संबंध संपुष्टात आणले आणि स्वत:ला सुरक्षित केले, असा खुलासा अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संस्थेच्या गोपनीय दस्तऐवजामध्ये करण्यात आला आहे. ऑगस्ट १९९६ मध्ये सिद्ध केलेला हा अहवाल नुकताच सार्वजनिक करण्यात आला आहे. 

मुंबई आणि ठाणे येथे दहीहंडी उत्सवाचे बाजारीकरण आणि विकृतीकरण !

हिंदूंनो, खरे धार्मिक उत्सव आणि सण हिंदु राष्ट्रातच साजरे होतील !
  • गोविंदाचा मृत्यू 
  • गोविंदा घायाळ 
  • आणि विकृत नाच अन् गाणी 
  • न्यायालयाची बंधने झुगारली !
        ठाणे - मुंबई आणि ठाणे येथे राजकीय नेत्यांनी पुरस्कृत केलेल्या आणि खाजगी दहीहंडी उत्सव मंडळातील दहीहंड्यांतून प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही अपप्रकारांना उधाण आले. (धर्मशिक्षणाच्या अभावाचे दुष्परिणाम ! - संपादक) गोविंदा जखमी होण्यासमवेतच उत्सवात दहीहंडी बाजूला राहून बीभत्स आणि विकृत नाच-गाण्यांचे कार्यक्रम दिवसभर चालू ठेवून उत्सवाचे बाजारीकरण आणि विकृतीकरण करण्यात आले. दुष्काळाच्या जनजागृतीमुळे पाण्याचा वापर अत्यल्प करण्यात आला. 

पुणे शहर आणि पिंपरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे धर्माभिमान्यांची एकमुखी मागणी !

श्री गणेश मूर्तीदान आणि कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन या कृती बंद करा ! 
पुणे येथे आंदोलन करतांना धर्माभिमानी
    पुणे, ६ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण, असे समीकरण जुळवणारे तथाकथित पर्यावरणवादी गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात करण्याच्या परंपरागत विसर्जनाला विरोध करत आहेत. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार श्री गणेशमूर्ती कचरा भरण्याच्या गाडीतून वाहून नेल्या जातात आणि त्या कचर्‍याप्रमाणे खाणी आणि नदी यांमध्ये फेकल्या जातात. त्यामुळे गणेशमूर्तींची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या कारणास्तव श्री गणेश मूर्तीदान आणि तिचे कृत्रिम तलावात विसर्जन या कृती बंद कराव्यात, तसेच धर्मशास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, अशी मागणी पुणे आणि पिंपरी येथे करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी धर्माभिमान्यांकडून करण्यात आली. 

शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांमुळे लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीची सुटका

हिंदूंनो, लव्ह जिहादच्या भीषण विळख्यातून आपल्या मुलींचे 
रक्षण करण्यासाठी आतातरी संघटित व्हा ! 
      नांदेड - येथे लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या एका तरुणीची शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुटका करून तिला पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश मिळवून दिला. (धर्मरक्षणासाठी तत्पर असणार्‍या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! - संपादक) 
१. भाग्यनगर येथील एका हिंदु मुलीला रहीम या धर्मांधाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनी २२ तोळे सोने आणि २ लाख रुपये घेऊन ती घरातून पळाली.
२. भाग्यनगर येथील नारायणगुडा भागातील ऑल इंडिया मजलीस तामिर ए मिल्लत या संघटनेने तिचे धर्मांतर करून तिचे नाव शमशाद ठेवले. रहीमपासून तिला एक मुलगी झाली. 
३. त्यानंतर मात्र तो शमशादला छळू लागला. तिला प्रतिदिन मारहाण करायचा. मुलगी झाल्यावर काही दिवसांनी त्याने तिला पोत्यात बांधून तिची हत्या केली. (हिंदु तरुणींनो, धर्मांधांची क्रूरता जाणा ! - संपादक) 

श्रीक्षेत्र कावनई (जिल्हा नाशिक) येथील कपिलधारा तीर्थात साधू-संतांचे उत्साहात राजयोगी (शाही) स्नान

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने व्यापक प्रसार
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग !
कपिलतीर्थाच्या ठिकाणी
असलेले गोमुख
       श्रीक्षेत्र कावनई (जिल्हा नाशिक) ६ सप्टेंबर (वार्ता.) - सत्य युगापासून १७७० या वर्षापर्यंत नियमितपणे सिंहस्थ कुंभपर्व भरणारे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील श्रीक्षेत्र कावनई येथे विविध आखाड्यांचे जगद्गुरु, महंत, महामंडलेश्‍वर आणि साधू-संत यांनी अत्यंत उत्साहाने अन् भावपूर्णरित्या कपिलधारा तीर्थात राजयोगी (शाही) स्नान केले. या वेळी श्री दिगंबर पंचायती अनी आखाडा, श्री निर्वाणी पंचायती अनी आखाडा आणि श्री निर्मोही पंचायती अनी आखाडा हे आखाडे सहभागी झाले होते. या वेळी सहस्रोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

गणेशमूर्तीचे विडंबन होणार नाही, अशी काळजी घेऊ - सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष

      बारामती (जिल्हा पुणे) - गणेशोत्सवाच्या कालावधीत कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान मोहीम राबवू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे नगराध्यक्ष श्री. सुभाष सोमाणी यांना निवेदन देण्यात आले. नगराध्यक्ष श्री. सोमाणी म्हणाले, मीही हिंदु आहे माझी गणपतीवर श्रद्धा आहे. आम्ही विधीवत पूजन करून मूर्ती विसर्जित करतो. असे विडंबन होणार नाही, अशी काळजी घेऊ. या वेळी समितीच्या सौ. सुधा घाटगे, सौ. गौरी जोशी, सौ. प्राजक्ता सांगळूदकर, दिनेश नायक उपस्थित होते.

हिंदूंनो, उत्तरप्रदेशसारखी स्थिती संपूर्ण देशात होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापा !

फलक प्रसिद्धीकरता
       उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे जन्माष्टमीचा देखावा सिद्ध करणार्‍या हिंदूंना धर्मांधांनी पोलीस अधिकार्‍याच्या समक्ष मारहाण केली, तसेच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत देखाव्याची नासधूसही केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
      UPke Meerutme janmashtami ke din Policeke samne dharmandhone Hinduonko marpit ki !
Hinduo, kya aisi Police aapki raksha kar payegi ?
जागो ! 
उत्तरप्रदेश के मेरठ में जन्माष्टमी के दिन पुलिस के सामने धर्मान्धों ने हिन्दुआें को मारपीट कि !
हिन्दुओ, क्या ऐसी पुलिस आप की रक्षा कर पाएगी ?

राज्यकर्ते जगण्यापेक्षा त्यांच्या मरणाची वाट पहाणारी जनता राज्यकर्त्यांची लायकीच दर्शवते !

     वर्ष २००१ मध्ये संसदेवर आक्रमण झाले. ही घटना म्हणजे आमच्या अस्मितेवर आघात होता, हे जरी खरे असले, तरी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणात ५-५० राज्यकर्ते ठार झाले असते, तर भारताच्या बर्याहचशा समस्या सुटल्या असत्या, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली.

साध्वी प्रज्ञा सिंह यांची सुटका होण्यासाठी शासनाला पत्र पाठवण्याचे श्रीराम सेनेचे आवाहन !

साध्वी प्रज्ञा सिंह यांना काँग्रेस शासनाने भगव्या आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली ऑक्टोबर २००८ मध्ये अटक केली. मुसलमानांच्या मतांसाठी हिंदू आतंकवादाच्या नावाखाली खोटा प्रचार काँग्रेस शासनाकडून केला गेला. या अटकेला ६ वर्षे होऊन गेली, तरी त्या खटल्यातील आरोप अजून निश्‍चित केलेले नाहीत. साध्वींना जामीन देत नाहीत आणि खटलाही चालवत नाहीत, केवळ वेळ काढणे चालू आहे. असे का ? हिंदु साध्वीच्या माथी हिंदू आतंकवादी असा ठपका का ठेवण्यात आला ? एकही पुरावा नसतांना खोट्या आरोपांद्वारे कारागृहात डांबून त्रास दिल्यामुळे सात्त्विक साध्वीचा शाप लागल्यामुळे काँग्रेसचा देशात सत्यानाश झाला. महाराष्ट्र आणि केंद्रात दोन्हीकडे भाजप आता सत्तेत आहे. त्यामुळे एक कोटी निषेधपत्रे लिहून सर्व हिंदूंनी शासनावर दबाव आणायला हवा, असे आवाहन श्रीराम सेनेने एका पत्रकाद्वारे केले आहे !
कायदा दोघांना वेगळा का ?
१. तमिळनाडूमधील कोईम्बतूर येथे बॉम्बस्फोट करून ११७ लोकांच्या आणि बंगळुरू (कर्नाटक) येथे साखळी बाँबस्फोट करून एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, तसेच आरोप सिद्ध होऊन शिक्षा देण्यात आलेल्या केरळचा अब्दुल नझीर मदनी याला जामीन सुलभ झाला. या देशद्रोह्याला बंगळुरूच्या अतीप्रगत तंत्रज्ञानाच्या रुग्णालयात उपचार देण्यात आले.

हिंदूंसाठी...केवळ अन् केवळ दैनिक सनातन प्रभातच !

श्री. अनिल कुलकर्णी
हजसाठी मुसलमानांना भेट सूटकेस, हिंदूंच्या यात्रांवर मात्र कर बसवणार ।
हिंदूंनी भक्तीभावाने देवाला अर्पण केलेला पैसा धर्मांधांसाठी वापरणार ॥
हिंदूंच्या या दुःस्थितीला नाही कोणते वृत्तपत्र प्रसिद्धी देणार ।
हिंदूंसाठी पोटतिडकीने फक्त दैनिक सनातन प्रभातच मांडत रहाणार ॥   
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 

आरक्षणाची वाळवी !

   २६ ऑगस्टला गुजरातमधील पटेल समाजाने आरक्षणासाठी संपूर्ण गुजरातला वेठीस धरले. त्या वेळी उसळलेल्या हिंसाचारात सात जण ठार झाले. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधील गुर्जर समाजाने आरक्षणासाठी रेल्वेच्या रूळावर ८-१० दिवस मुक्काम ठोकला होता. महाराष्ट्रातही धनगर समाजाने आरक्षणासाठी संपूर्ण राज्य बंद ठेवले होते. मराठा, मातंग, जाट, इतर अनुसूचित जातीजमाती, तसेच मुसलमान आरक्षणासाठी अधून-मधून राज्य, तसेच केंद्रशासनाला वेठीस धरतात. आजकाल आरक्षण हे सूत्र इतके ऐरणीवर आहे की, एखाद्या पक्षाला शासनाला वेठीस धरण्यास कुठलेही सूत्र मिळाले नाही की, समाजातील एखाद्या घटकाला चिथवण्यासाठी चपखलपणे आरक्षणाची मागणी केली जाते.
   राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केवळ १० वर्षांसाठीच असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे, तरी अद्यापही ही तरतूद अजून तशीच आहे; किंबहुना ही समस्या अधिक जटील झाली आहे. कुठलीही आणि कुणालाही दिलेली सवलत ही एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठीची तरतूद असते. त्याची सवय होऊन मनुष्य स्वाभाविकरित्या धडपडणे सोडून निष्क्रीय होऊ शकतो. त्याचसमवेत ज्यांना अशा प्रकारची सवलत मिळत नाही, अशा समाजातील घटकांवर अन्याय होतो. हे सूत्र विसरून आरक्षणाचे सूत्र सोयीस्कररित्या वापरल्याने प्रदीर्घ काळ ही सवलत उपभोगून अजूनही समाजाला केवळ हक्काचीच जाणीव आहे, कर्तव्याची नाही. 
   आरक्षण म्हणजे कुठल्याही पदासाठी योग्य उमेदवाराला डावलून अयोग्य उमेदवाराला नेमणे ! अशाने का भारत महासत्ता बनणार आहे ? याचा अजून एक तोटा असा होतो की, आरक्षण व्यवस्थेमुळे भारताचे तरुण, योग्य उमेदवार त्यांच्या मेहनतीला, बुद्धीमत्तेला योग्य न्याय नाही मिळत म्हणून परदेशाचा रस्ता पकडतात. नेमका याचाच अपलाभ घेऊन इतर देशांनी भारतियांचे कौशल्य, बुद्धीमत्ता वापरून त्यांचा देश आज महासत्ता बनवून घेतला. मागील पन्नास वर्षांतील याच कारणासाठी स्थलांतरीत झालेल्या भारतियांचा आकडा केंद्रात उपलब्ध आहे आणि तो नक्कीच सुखावह नाही. जगातील इतर देशांच्या गेल्या १०० वर्षांतील आर्थिक, राजकीय परिस्तिथीचा अभ्यास केला, तर लक्षात येते की त्या देशातील नागरिकाचा 'मला देशाकडून काय मिळते, यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो', हा विचार प्रबळ असतो. तेथील शासन आणि समाज आरक्षणाच्या वाळवीने पोखरलेला नाही. त्यामुळे दुसर्यास महायुद्धात बेचिराख झालेले जपान, रशिया हे देश, केवळ २०० वर्षांचा इतिहास असलेली अमेरिका आज पूर्ण दिमाखात महासत्ता म्हणून मिरवत आहे आणि आपण विपुल नैसर्गिक साधनसंपत्ता, सक्षम आणि कतृत्ववान मनुष्यबळ, लाखो वर्षांचा दैदिप्यमान इतिहास गाठीस असूनही अंधारात चाचपडत आहोत. आपले सव्वाशे कोटी हात जर खर्यां अर्थाने श्रमजिवी, देशप्रेमी, आरक्षणभ्रष्टाचार मुक्त बनले, तर येणार्याू काळात आपण महासत्ता बनू आणि विश्वाशचे नेतृत्व आपल्याकडे असेल, यात शंका नाही. - सौ. श्रद्धा जोशी, पुणे.

मुलांना देवतांच्या चित्रांची पापी न घेता देवाला हात जोडून किंवा मस्तक टेकवून नमस्कार करण्यास शिकवा !

एक वाचक म्हणतात, त्यांची लेक श्रीकृष्ण आणि गणपति यांची चित्रे बघून त्यांची पापी घेते. त्यांना सांगावे, देवाला हात जोडून किंवा मस्तक टेकवून नमस्कार करायला शिकवावे (वळण लावावे) ! आपण ख्रिश्‍चन नाही, हिंदु आहोत ! हिंदु रहावे, हिंदु म्हणून मरावे आणि हिंदु धर्मातच पुन्हा जन्मावे, तरच मोक्ष मिळतो. हाच आपला धर्म जागवावा  !
- पुष्पांजली (२९.७.२०१५)

बंगालमध्ये हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात कार्य करणारे आणि 'भवानी सेना' या संघटनेचे नेतृत्व करणारे श्री. प्रताप हाजरा !

रामनाथी आश्रमात जून २०१५ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ठिकठिकाणचे ३५ हिंंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. त्यांच्याविषयी समितीच्या कार्यकर्त्यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहे. 
१. धाडसी आणि क्षात्रवृत्ती असलेले श्री. हाजरा आणि त्यांचे युवादल ! 
श्री. प्रताप हाजरा हे बंगालमध्ये हिंदूंवर होणार्याह अत्याचारांच्या विरोधात तेथील युवकांना सतत जागृत करत असतात. सध्या ते १५० युवकांच्या संघटनेचे नेतृत्व करतात. जेथे जेथे हिंदूंवर अत्याचार होतो, तेथे ते आपल्या 'भवानी सेने'च्या युवकांसह साहाय्यासाठी जातात. श्री. हाजरा अन् त्यांचे युवादल हे धाडसी आणि क्षात्रवृत्तीचे आहे.

संतांची योग्यता न जाणणारे बुद्धीप्रामाण्यवादी,पोलीस, प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्ष

आजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे साधू-संतांचे 
महत्त्वही कळत नाही. त्यांच्यासाठी हे विशेष सदर !
१. बुद्धीप्रामाण्यवादी (अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि संत)
१ अ. हे आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केवळ हिंदु साधू-संतांच्या मागे लागलेल्या अंनिसचे खरे स्वरूप ! : अंनिसचा एक कार्यकर्ता आणि एका संप्रदायातील स्वामी यांच्यातील संवाद येथे देत आहोत.
अंनिसचा कार्यकर्ता : स्वामी, समाजात जी अंधश्रद्धा बोकाळली आहे आणि स्वतःला साधू-संत म्हणवणार्‍या महाभागांकडून त्या अंधश्रद्धेचा जो लाभ उठवला जात आहे, त्याच्या विरोधात आमची विज्ञानवादी संघटना आवाज उठवणार आहे.
स्वामी : म्हणजे तथाकथित साधू-संतांचे बुरखे फाडण्याचे काम आपली संघटना करणार आहे.
१ अ १. अंनिसवाल्यांनी लोकशिक्षणाच्या नावाखाली कार्य करतांना स्वतःभोवती बुरखा गुंडाळला जात नाही ना, हेही पहावे !

रायगड येथील साधिका सौ. वंदना आपटे यांना राष्ट्रीय शिबिरात आलेल्या अनुभूती

१८ ते ३० जून २०१५ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे 
पार पडलेले हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय शिबीर
१. रामनाथी आश्रमात येण्यापूर्वीची मनःस्थिती 
अ. 'रामनाथी आश्रमात येण्याआधी 'देवाने माझ्या मनातील प्रत्येक विचार ओळखला', असे जाणवले. दोन दिवसांपूर्वीच मला रामनाथी आश्रमात कधी जायला मिळणार ?', असा विचार आला होता. लगेच 'आश्रमात जायचे आहे', असा निरोप मिळाला.

आ. आश्रमात येत असतांना गाडीत बसल्यावर सारखी भावजागृती होत होती. प्रत्येक वेळी ईश्वरी चैतन्य अनुभवता येत होते. 

इ. आश्रमात आल्यावर सतत भावजागृती होऊन रडायला येत होते. यापूर्वी 'चैतन्य, भावजागृती, ईश्वराचे अस्तित्व इतके आनंददायी असते', हे अनुभवले नव्हते. प्रार्थना करतांना ती केवळ वरवरची असायची; परंतु आश्रमात प्रत्येक क्षणी ईश्वराचा आनंद अनुभवायला मिळाला. 'देव आपल्यासाठी काय काय करतो ?' याचीही अनुभूती आली. 

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत गणेशोत्सव-पितृपक्ष विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ सप्टेंबर 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ सप्टेंबरच्या 
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक जोडप्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी !
       पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक जोडप्याची आवश्यकता आहे. जे सेवक जोडपे या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 
भ्रमणभाष : ८४५१००६०७० 
इ-मेल : hinducoordination@gmail.com 

भारतातील पीत पत्रकारिता : निरपराध हिंदूंवर दोषारोपण करणारी यंत्रणा !

भारताची महानता जी एका पाश्‍चात्त्य पत्रकाराला समजते, 
ती भारतीय पत्रकारांना समजू नये, हे भारतीय लोकांचे दुर्दैव !
१. भारत हा अनेक बुद्धीवंतांचा देश असणे
फ्रान्सुआ गोतिए
अगा नवल वर्तले अशा अद्भुत लोकांचा हा अद्भुत देश आहे. पाहुण्यांचे मनःपूर्वक अतिथ्य करणारा, पराकोटीचा सहनशील ! देहली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू येथील बुद्धीवंत उच्चभ्रू पाश्‍चात्त्यांचे चांगले मित्र होऊ शकतात आणि त्यांच्याशी ते पुष्कळच सौहार्दाने आणि खेळीमेळीने वागतात. बौद्धिकदृष्ट्या या देशातील साहित्यिक आणि पत्रकार चतुर कोटीक्रम करणारे, चमकदार आणि उत्कृष्ट इंग्रजी बोलणारे अन् त्याहूनही उत्कृष्ट इंग्रजी लिहिणारे आहेत.
२. हिंदू पत्रकारच भारतातील हिंदुत्ववादी
 संघटनांची प्रतिमा मलिन करणारे लिखाण करत असणे
अलीकडेच कुरिअर इंटरनॅशनल या प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित फ्रेंच मासिकाने हिंदू मूलतत्त्ववाद या विषयावर विशेष अंक काढला. त्या अंकाच्या मुखपृष्ठावर चित्र होते ते लाठी, कवायत करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही स्वयंसेवकांचे ! ते पाहून अजाण पाश्‍चात्त्य वाचकांचा नक्कीच असा अपसमज होईल की, भारत खरोखरच हिंदु मूलतत्त्ववाद्यांच्या (फॅसिस्टांच्या) कचाट्यात सापडला आहे आणि हे मूलतत्त्ववादी (फॅसिस्ट) हिंदू संघ नाझींसारखे असून ते नागरी स्वातंत्र्याची मुस्कटदाबी या देशात करत आहेत. त्या अंकाच्या संपादकांना याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले की, या अंकातील बहुतेक लिखाण हिंदू पत्रकारांनी भारतीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखांमधून भाषांतरित करून घेतला आहे. हिंदुस्थानाविषयी मी अजाण असतो, तर निश्‍चितपणे मीही पाश्‍चात्त्य वृत्तपत्रांमधून हिंदुस्थानाविषयी जे लिहिले जाते, त्यावर विश्‍वास ठेवला असता. जसे जातीभेद, दारिद्य्र, भ्रष्टाचार, हिंदू जहालवाद आणि नैसर्गिक आपत्तींनी पछाडलेला देश; पण या देशातील माझ्या तीस वर्षांच्या वास्तव्यात मला आलेले अनुभव अगदी वेगळ्या प्रकारचे आहेत.

अकोला जिल्ह्यातील धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांची रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

'अकोला जिल्ह्यातील धर्मशिक्षण वर्गातील काही धर्माभिमानी डिसेंबर २०१४ मध्ये सनातनचा रामनाथी आश्रम पहाण्यासाठी आले होते. आश्रमातील अनुशासन, शांतता आणि साधकांचे प्रेम या गोष्टींनी ते सारे जण प्रभावित झाले. काहींना अनुभूतीही आल्या. आश्रमात गेल्यावर त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे. 
१. शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१ अ. श्री. राहुल चुटके : 'रामनाथी आश्रमात गेल्यावर 'आयुष्यात आपल्याला ही पुष्कळ मोठी संधी मिळाली आहे', असे वाटले. येथील साधक नम्र आणि सूत्रबद्ध बोलतात. साधक वेळ वाया न घालवता सेवारत असतात. साधकांना प्रार्थना आणि नामजप यांची आठवण करून दिली जाते. स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारून ते फलकावर लिहितात. हे सर्व शिकायला मिळाल्यामुळे मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.'

साधकांना आनंद मिळण्यासाठी धडपडणारे पू. जयराम जोशीआबा !

१. हसतमुख आणि सकारात्मक
    मिरज आश्रमात वास्तव्यास असणारे पू. जोशीआबा सतत हसतमुख आणि सकारात्मक विचार देणारे असल्याने प्रत्येकाला त्यांच्याशी बोलावे वाटते, तसेच तेही स्वतःहून प्रत्येकाची विचारपूस करतात. त्यांच्यात मुळातच प्रेमभाव असल्याने ते कधी रागावत असतील, असे वाटत नाही. ते प्रत्येकाशी तेवढ्याच प्रेमाने बोलतात. अनेकांना निराशाजनक प्रसंगात साहाय्य करतात.

अल्प कालावधीत सार्‍यांशी जवळीक साधून मिरज आश्रमाचा आधारस्तंभ बनलेले पू. जयराम जोशी !

१. अनेक गुणांचा समुच्चय असलेले पू. जोशीआबा !
१ अ. काटकसर, नीटनेटकेपणा, उत्तम रचना करणे आदी गुणांचा संगम !

    कु. मेधा सहस्रबुद्धे हिच्याकडे असलेल्या साप्ताहिक सनातन प्रभातच्या सेवेतील ९० टक्के सेवा जोशीआबा तळमळीने, भावपूर्ण आणि परिपूर्ण रितीने करतात. या सेवेतून त्यांच्यातील काटकसर, नीटनेटकेपणा, उत्तम रचना करणे इत्यादी गुण लक्षात येतात.
१ आ. जोशीआजोबा मिरज आश्रमाशी एकरूप झाल्याचे जाणवणे
    मी लेखा विभागातील सेवेच्या माध्यमातून मिरज आश्रमात रहाण्यास आले. तेव्हा जोशीआबाही मिरज आश्रमातच रहात होते. त्यांना भेटल्यानंतर ते आश्रमाशी एकरूप झाले आहेत, असेे मला जाणवले.

कोल्हापूर येथील सौ. सुधा बिलावर यांनी गाठली ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी !

कृष्णाष्टमीस सनातन गोकुुळी आनंद जाहला । आणखी एक साधक कृष्णमय जाहला ॥
सौ. बिलावरकाकूंचा सत्कार करतांना
पू. (कु.) स्वाती खाडये
     नाशिक, ६ सप्टेंबर (वार्ता.) - नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्वाच्या ठिकाणी कोल्हापूर येथून सेवेसाठी आलेल्या सौ. सुधा बिलावर (वय ४७ वर्षे) यांनी ६१ प्रतिशत पातळी गाठल्याचे सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी घोषित केले. हे कळताच उपस्थित २०० साधक भावविभोर झाले. ही आनंदवार्ता ऐकून सौ. बिलावरकाकू यांचाही भाव दाटून आला. सौ. बिलावरकाकूंचा पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते श्रीकृष्णाचे चित्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सनातनचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, पू. नंदकुमार जाधव, पू. महेंद्र क्षत्रिय या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. 

देवद आश्रमातील ४ साधकांनी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेतला असल्याचे घोषित !

श्रीकृष्णजयंतीदिनीच मिळाली भेट उच्च लोकातील जिवांची ।
देवद आश्रमातील साधकांना लाभली पर्वणी आनंदाची । 
पू. राजेंद्र शिंदे (बसलेले) यांच्यासमवेत (उभे) 
डावीकडून श्री. सचिन हाके, कु. भाग्यश्री जाधव, 
कु. अदिती पवार, कु. पूजा जठार 
      देवद (पनवेल), ६ सप्टेंबर (वार्ता.) - देवद आश्रमात सेवा करणार्‍या ४ साधकांनी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेतला असून त्यांची पातळी ५१ टक्के आहे, ही आनंदवार्ता ५ सप्टेंबर या दिवशी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांच्या माध्यमातून देऊन श्रीकृष्णाने सर्वांवर चैतन्याची पखरण केली. हे वृत्त ऐकताच आश्रमातील सर्व साधक भावविभोर झाले. या वेळी सनातनचे पू. राजेंद्र शिंदे यांनी चौघांचा सत्कार केला. 
     आश्रमातील स्वयंपाक विभागासह पू. नेनेआजींची सेवा करणार्‍या सातारा येथील कु. भाग्यश्री जाधव (वय १९ वर्षे), व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या अकलूज (सोलापूर) येथील कु. पूजा जठार (वय २५ वर्षे), मागणी-पुरवठा विभागातील बोरीवली, मुंबईच्या कु. अदिती पवार (वय २५ वर्षे) आणि स्वयंपाक विभागासह प.पू. पांडे महाराजांची सेवा करणारे म्हाळुंग (सोलापूर) येथील श्री. सचिन हाके या चौघांची नावे उच्च स्वर्गलोकातून जन्मलेले जीव म्हणून घोषित करण्यात आली.

मिरज आश्रमाला एका परिवाराचे रूप आणणारे आणि सर्व लहान-थोर साधकांवर प्रेमाचे छत्र धरून आत्मीयतेने वडीलकीचे नाते निभावणारे आमचे पू. जयराम जोशी !

पू. जयराम जोशी
    सर्व साधकांनाच नाही, तर सनातनच्या काही संतांनाही पू. जोशीआबांकडून अनेक गुण शिकून साधनेतील पुढील टप्पा गाठता येईल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. सर्वांशी नम्रतेने बोलणे
    पू. जयराम जोशीआबा वयाने, मानाने आणि सर्वच गोष्टींत मोठे आहेत; पण ते प्रत्येक साधकाशी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोलतात. कोणाशी कधीच अधिकाराने, ओरडून किंवा रागावून बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यात पुष्कळ प्रेम असते.
२. आश्रमातील लहान लहान गोष्टींकडे लक्ष देऊन साधकांना साहाय्य करणे
    आश्रमातील लहान लहान गोष्टींकडे पू. आबांचे लक्ष असते, उदा. आश्रमात सोलरचे ऊन पाणी अंघोळीसाठी वापरले जातेे; पण पाऊस असेल, तर सोलरचे पाणी ऊन होत नाही. ते आदल्या दिवशीच साधकांना आठवण करतात, उद्या सोलरला ऊन पाणी येणार नाही, तर मग बंब पेटवायचा का ? किंवा गॅस-गीझर लावायचा असेल, तर सिलेंडर आहे का ? अशा सर्व गोष्टींकडे त्यांचेे बारीक लक्ष असते. त्यामुळे साधकांची धावपळ होत नाही आणि आधीच नियोजन होते.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमातील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून व्यक्त केलेले अभिप्राय !

    सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरून जातांना गेली ८ वर्षे काही समाजद्रोही सनातन बॉम्ब, असे ओरडत जातात. काहीजण शिव्या देत जातात, काहीजण दगड फेकतात, तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकतात. विविध संप्रदायांच्या भक्तांना, हिंदुत्ववाद्यांना आणि संतांना येणारे पुढील अनुभव वाचले की, लक्षात येईल की, सनातनविरोधी अशी कृत्ये करणारे असुरांच्या कह्यात आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांचा नाश केला जाईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१५)                                    
वाईट शक्तींच्या आक्रमणांतून साधना करणाराच टिकाव धरू शकतो, याचीही जाणीव होणे
    सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पहातांना साक्षात् परमेश्‍वरावरही अनिष्ट छाया पडू शकते, याची प्रचीती झाली; परंतु त्याचबरोबर या वाईट छायेतून केवळ साधना करणाराच टिकाव धरू शकतो, हेही लक्षात आले. - श्री. स्वप्निल दत्तात्रय वाघमारे, जिल्हा-युवा अधिकारी, ग्रामीण विभाग, शिवसेना-युवासेना, सोलापूर, महाराष्ट्र. (११.६.२०१५)

राखीचा आध्यात्मिक अर्थ सामावलेली वैशिष्ट्यपूर्ण काव्यमय प्रार्थना

कु. सिद्धी क्षत्रीय
अंतरी ईश्‍वरी नाम राखी (टीप १) ।
भावाचा सुगंध श्‍वासात
सदैव राखी ॥ १ ॥
हीच प्रार्थना ईश्‍वरचरणी ।
माझ्या भावाला सदैव अनुसंधानात राखी ॥ २ ॥
टीप १ - या कवितेत राखी या शब्दाचे दोन अर्थ दिलेले आहेत. राखी म्हणजे रक्षाबंधनाच्या हातात बांधायचा धागा आणि राखी म्हणजे ठेवणे.
(ही प्रार्थना मला रक्षाबंधनाच्या दिवशी सुचली. - संकलक)
- कु. सिद्धी महेंद्र क्षत्रीय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०१५)

संतांच्या सेवेचे अनन्यसाधारण महत्त्व !

इतर खोल्यांची स्वच्छता करतांना मी किती छान लादी पुसली ! असा कर्तेपणाचा विचार येणे; पण पू. राजेंद्रदादा यांच्या खोलीतील लादी पुसतांना कर्तेपणाचे विचार न येणे : पाहुण्यांच्या खोल्यांची स्वच्छता करतांना अथवा इतर कोणतीही स्वच्छता करतांना माझ्या मनात मी किती छान लादी पुसली !, असा कर्तेपणाचा विचार नेहमी येतो. २.७.२०१५ या दिवशी पू. राजेंद्र शिंदे यांच्या नियमित खोलीस्वच्छतेला जाणार्‍या साधकाला तातडीची सेवा असल्याने त्या साधकाऐवजी मी पू. दादांच्या खोलीच्या स्वच्छतेसाठी गेलो. स्वच्छता चालू केल्यावर पहिल्यांदा पटल पुसून, केर काढून, मग लादी पुसून घेतली. (तेथील लादी कापड घेऊन हाताने पुसावी लागते.) तेथील लादी गुळगुळीत झाल्याने पू. दादांच्या चैतन्याने फरशी किती गुळगुळीत झाली आहे, असा विचार माझ्या मनात आला. प्रसाधनगृहातील लादी घासतांनाही पू. दादांच्या चैतन्याने प्रसाधनगृहातील लादी किती गुळगुळीत झाली आहे, असा विचार माझ्या मनात आला. पू. दादांच्या खोलीत सेवा करतांना मनात कर्तेपणाचे विचार आले नाहीत. त्या प्रसंगानंतर सेवेतील कर्तेपणाचे विचार न्यून झाले. कर्तेपणाचे विचार मनात आल्यास पू. दादांच्या खोलीतील प्रसंग आठवतो आणि त्यावर मात होण्यासाठी प्रयत्न होतात.

स्वत:ला पालटण्याची तळमळ असलेल्या, मनापासून सेवा करणार्‍या आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी रहाणार्‍या कुडाळ, सिंधुदुर्ग येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अंजली हेमंत मणेरीकर (वय ४३ वर्षे) !

सौ. अंजली मणेरीकर
     संपूर्ण कुटुंबच साधनेत असलेल्या सौ. अंजली मणेरीकर यांच्यात सेवेची पुष्कळ तळमळ आहे. त्यांचे सासरे कै. दत्तात्रय मणेरीकर पुष्कळ रुग्णाईत असतांना ते आपले वडीलच आहेत, या भावाने त्यांनी मनापासून सेवा केली. घरातील अडचणींमुळे त्यांना समष्टी सेवा करण्यास प्राधान्य देता आले नाही. गेल्या तीन मासांपासून त्या एका केंद्राचे दायित्व पहात आहेत. त्यांना कुठलीही सेवा सांगितली, तरी देवच करून घेणार, हा त्यांचा भाव असतो. व्यष्टी साधनेप्रतीही त्यांच्यात पुष्कळ गांभीर्य असून त्यात त्या खंड पडू देत नाहीत. त्यांच्यातील अन्य गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहे.
१. सेवाभावी वृत्ती
१ अ. परिपूर्ण सेवा करणे : काही वर्षांपासून मणेरीकरकाकूंंकडे हिंदु धर्मजागृती सभा आणि गुरुपौर्णिमा या कार्यक्रमांमध्ये संत आणि वक्ते यांची सेवा करणे, तसेच सत्कार समिती, दीपप्रज्वलन, रांगोळी काढणे आदी सेवांचे दायित्व असते. काकूंनी या समित्यांच्या सेवांची घडी पुष्कळ चांगल्या प्रकारे बसवली आहे. त्यांनी केलेल्या सेवेत उत्तरदायी साधकांना लक्ष द्यावे लागत नाही. या समित्यांसाठी लागणारे आवश्यक ते सर्व साहित्य त्यांच्याकडे व्यवस्थित ठेवलेले असते.

पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांची एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक
पू. (सौ.) योया वाले
सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता : ८० टक्के
सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : १० टक्के
- (प.पू.) डॉ. जयंत आठवले


सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

भक्ती
१. भक्तीचे वलय अनाहत चक्रस्थानी निर्माण होऊन ते कार्यरत होणे
देवतातत्त्व
२. देवतातत्त्वाचा प्रवाह आज्ञाचक्रस्थानी आकृष्ट होणे : पू. माई ईश्‍वराची अखंड भक्ती करत असल्याने असे होते. 
२ अ. देवतातत्त्वाचे वलय आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांच्या स्थानी निर्माण होऊन ते कार्यरत होणे : पू. माई सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असून ईश्‍वराला आत्मनिवेदन करत असल्याने असे होते. 
२ आ. देवतातत्त्वाच्या लहरी सप्तचक्रांतून प्रवाहित होणे : त्यामुळे त्यांची सप्तचक्रे कार्यरत होतात.
आनंद
३. आनंदाचे वलय प्रकाशमान स्वरूपात पू. माईंच्या तोंडवळ्याभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होणे : पू. माई सतत ईश्‍वराची भक्ती करत असून त्यांच्यात प्रेमभाव असल्याने, तसेच त्यांची उच्च आध्यात्मिक पातळी (पू. माईंनी संतपद प्राप्त केले आहे.) असल्याने असे होते.
चैतन्य
४. चैतन्याचे वलय निर्माण होऊन ते कार्यरत होणे
प्रेमभाव
५. प्रेमभावाचे वलय अनाहत चक्रस्थानी निर्माण होऊन ते कार्यरत होणे
५ अ. प्रेमभावाचे कण वातावरणात प्रक्षेपित होणे : याचे कारण पू. माई सतत इतरांचा विचार करत असून त्या सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करतात.
६. इतर सूत्रे
अ. पू. माईंचा तोंडवळा अतिशय मृदू असल्याप्रमाणे जाणवते. त्यांच्या तोंडवळ्यावर भाव आणि प्रेमभाव जाणवतो, तसेच तोंडवळ्यातून पुष्कळ प्रमाणात तेज प्रक्षेपित होत आहे, असे जाणवते. 
आ. पू. माईंमध्ये भावनाशीलता नाही, तसेच त्यांचा अहं अल्प असून त्यांना स्वतःविषयी काही वाटत नाही.
इ. त्यांच्यात पुष्कळ गुण आहेत. त्यांची भक्ती उच्च प्रतीची असून त्या सतत भावाच्या स्थितीत असतात.
ई. प.पू. दास महाराज (यजमान) हे माझे गुरु आणि प.पू. डॉक्टर परात्पर गुरु आहेत, असा त्यांचा भाव आहे.
उ. पू. माई प्रत्येक कृती सेवा म्हणून करतात, तसेच त्या सतत शिकण्याच्या स्थितीत असतात आणि साधनेचा दृष्टीकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
ऊ. प्रत्येक गोष्टीकडे त्या साक्षीभावाने पहात असल्याने शांत असतात. त्या आवश्यक तेवढेच बोलतात. एखादी व्यक्ती त्यांच्याशी बोलत असतांना व्यक्तीमध्ये त्या ईश्‍वराला पहात असल्याने तिच्याशी मोकळेपणाने आणि प्रेमाने बोलतात.  
ए. त्यांच्यासमवेत असतांना स्वतःचा नामजप चालू झाल्याची अनुभूती येते.
७. आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

- (पू.) सौ. योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्., युरोप (३१.८.२०१५)

प.पू. दास महाराजांनी प.पू. श्रीराम महाराज यांनी दिलेल्या १०८० मण्यांच्या जपमाळेवर नामजप करतांना तिचे मणी एकमेकांत न गुंतणे; मात्र अन्य कोणीही माळेने नामजप केल्यास ती गुंतणे

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी जप करतांनाची
प.पू. दास महाराज यांची भावमुद्रा
    राजस्थान येथील संत प.पू. श्रीराम महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी जप करण्यासाठी प.पू. दास महाराजांना ३३ कोटी श्रीरामाचा जप केलेली १०८० मण्यांची जपमाळ पाठवली आहे. प.पू. दास महाराज गेल्या ४ मासांपासून या माळेवर नामजप करतात. ही जपमाळ मोठी असूनही महाराज नामजप करत असतांना त्यांच्यातील चैतन्यामुळे तिच्यातील मणी एकमेकांत गुंतत नाहीत; मात्र याच माळेवर अन्य कोणत्याही साधकाने नामजप केल्यास मणी एकमेकांत गुंततात आणि माळेचा गुंता सोडवणे कठीण जाते. काही साधकांनी ३ - ४ वेळा ही जपमाळ घेऊन नामजप करून पाहिला; परंतु प्रत्येक वेळी माळेतील मणी गुंतत असल्याचे लक्षात आले.

अनेक गुणाचा संगम जिच्या ठायी, ती असे आमुची प्रियांकाताई ।

कु. प्रियांका लोटलीकर
      श्रावण कृष्ण पक्ष नवमी (६.९.२०१५) या दिवशी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सनातनच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने दैनिक विभागातील साधकांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छापत्रावरील कविता येथे प्रसिद्ध करत आहोत. 
परिपूर्ण नियोजन करण्यास शिकावे तुझ्याकडे ।
निरोपांचा समन्वय आणि पाठपुरावाही अल्प न पडे ॥ १ ॥

चांगलेच समाजाला देण्याचा विचार उणा न पडे ।
त्यामुळेच सुचते तुला जे देवालाही आवडे ॥ २ ॥

ताई, परिपूर्णतेचे धडे घेतो आम्ही तुझ्याकडे ।
बरे झाले देवाने संशोधनाचे लेख दिले दैनिकाकडे ॥ ३ ॥

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

असत्याचा विजय तात्पुरताच !
     सत्य हे स्वयंप्रकाशी असते. कलियुगात असत्याचा विजय होतो, असे वाटले, तरी नित्य हे लक्षात ठेवावे की, हा विजय तात्पुरता असतो !  
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
      मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही; 
कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विधाने किती अयोग्य आहेत, हे दर्शवणारे प्रश्‍न !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन, इंटरनॅशनल बुद्धीस्ट फेडरेशन आणि टोकियो फाऊंडेशन यांच्या वतीने ५ सप्टेंबर २०१५ या दिवशी बोधगया येथे आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विधाने आणि त्या विधानांच्या अनुषंगाने उपस्थित झालेले प्रश्‍न
१. पंतप्रधान मोदी : भगवान बुद्धांनी जगाला पुष्कळ काही दिले आहे. 
प्रश्‍न : असे आहे, तर बुद्धाच्या देशातच बौद्ध धर्माचा र्‍हास का झाला ? 
२. पंतप्रधान मोदी : बौद्ध धर्माने सांगितलेला अहिंसेचा संदेश अनेकांनी स्वीकारला आहे. त्यातूनच जगात शांतता नांदू शकेल. बौद्ध धर्मात मानवता श्रेष्ठ आहे.

शीना बोरा प्रकरण आणि प्रसारमाध्यमांची असंवेदनशीलता !

गेले अनेक दिवस प्रसिद्धीमाध्यमांमध्ये शीना बोरा प्रकरण अक्षरश: रवंथ करून चघळलेे जात आहे. इंद्राणी मुखर्जीला अटक केल्यापासून जणूकाही देशातील सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना असल्यासारखी दूरचित्रवाहिन्या प्रत्येक मिनिटामिनिटाचे वृत्त दाखवत आहेत. माध्यमे हेच याच प्रकरणातील सर्वांत मोठे आव्हान आहे. प्रसिद्धीमाध्यमे पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. पोलीस ठाण्यातील कैद आरोपीला प्रसिद्धीमाध्यमांकडून घेरले जात आहे. न्यायालयाच्या भूमिकेत जाऊन निष्कर्ष काढत आहेत. त्यामुळे आम्हाला पुरावे गोळा करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, असे उद्गार या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी काढले आहेत. एका वृत्तवाहिनीने तर एका मुख्य साक्षीदाराची मुलाखत पोलीस तिथे पोहोचण्याच्या अगोदरच थेट प्रक्षेपित केली. यामुळे पोलीसही बुचकळ्यात पडले आहेत.

दुष्काळाच्या उंबरठ्यावर !

राज्यातील सुमारे आठ सहस्र गावांमध्ये भीषण दुष्काळ पडला असून येणार्‍या काळात ही संख्या दुप्पट होऊ शकते, अशी शक्यता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांची पावसाची आकडेवारी पाहिल्यास प्रतिवर्षी पाऊस गतवर्षीपेक्षा अल्पच होत आहे. आज केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर पंजाब, हरियाणा यांसह निम्मा भारत दुष्काळाच्या छायेत आहे. पावसाअभावी राज्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा निम्म्याहून अधिक अल्प झाला आहे. महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारीपासून कमी-अधिक प्रमाणात विदर्भ, मराठवाडा यांसह अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. यंदा ही परिस्थिती सप्टेंबरमध्येच निर्माण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. धरणांमधील पाणीसाठा अल्प होत चालल्याने आतापासून अनेक जिल्ह्यांत पाणीकपात चालू झाली आहे. जालन्याला दहा दिवसांतून, तर अन्य काही जिल्ह्यांत २० दिवसांतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढील काळात पाण्याचा प्रश्‍न आणखी जटील होईल तेव्हा गुरांना पाणी आणि चारा कुठून आणायचे हाही एक महत्त्वाचा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे निर्माण होणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn