Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज श्रीकृष्ण जयंती !
    कुठे गायींचे पालन-पोषण करणारा गोपाळकृष्ण, तर कुठे सर्वत्र पशुवधगृहे (कत्तलखाने) उभारून प्रतिदिन ५० सहस्र गायींची कत्तल करणारे राज्यकर्ते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.१.२०१२)


संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची आज जयंती !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे हिंदी भाषेतील फेसबूकचे पान बंद !

  • फेसबूककडून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची मुस्कटदाबी करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !
  • ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही का ? कि हिंदूंना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही अधिकार नाही ?
    मुंबई, ४ सप्टेंबर (वार्ता.) - राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती हे कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे हिंदी भाषेतील फेसबूक पान (www.facebook.com/hjshindi) ४ सप्टेंबर या दिवशी फेसबूकने तडकाफडकी बंद केले. या पानावर करण्यात येणार्‍या पोस्ट फेसबूकच्या धोरणात (पॉलिसी) बसत नसल्याचा कांगावा करत हे पान बंद करण्यात आले. राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसाठी अव्याहतपणे कार्य करणारे हे पान बंद करून फेसबूकने राष्ट्र आणि धर्म प्रेमींची मुस्कटदाबी करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला आहे.
१. देशद्रोही याकूबला फाशी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असतांना त्या निर्णयाला विरोध करणार्‍यांवर आणि देशद्रोही याकूबचे उघड समर्थन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी या पानावर ठेवण्यात आलेल्या पोस्टवर फेसबूकने आक्षेप घेतला होता. त्यानुसार ती पोस्ट बाजूला काढण्यात आली होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     क्वचित् एखादाच सात्त्विक, पापभिरू हल्लीच्या राजकारणात राहू शकतो. बाकीचे सर्व राजकारणापासून चार हात दूर रहातात. इतके हल्लीचे राजकारण गलिच्छ झाले आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.९.२०१५)

संयुक्त अरब अमिरातमध्ये ११ भारतियांना अटक

संयुक्त अरब अमिरातची सतर्कता
आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात असल्याचा आरोप
    अबूधाबी - आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी  प्रयत्न करत असतांना इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या आरोपाखाली संयुक्त अरब अमिरातच्या पोलिसांनी ११ भारतियांना अटक केली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अन्नछत्रांवर २ सहस्र १०० रुपये कर

     उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाची मोगलाई ! अन्य धर्मियांच्या धार्मिक यांत्रांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करणारे शासन मात्र श्रीकृष्ण जयंतीसारख्या हिंदूंच्या पवित्र सोहळ्यावर जिझिया कराप्रमाणे कर आकारते !
    मथुरा - भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने लावण्यात येत असलेल्या अन्नछत्रांवर मथुरा प्रशासनाने २ सहस्र १०० रुपयांचा कर आकारण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम अन्नछत्रांच्या आजूबाजूला होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाला अन्नछत्रे लावण्यास इच्छुक असलेल्यांनी विरोध करणे चालू केले आहे.

धर्मांधांकडून हिंदु तरुणाला फासावर लटकवण्याचा प्रयत्न

उत्तरप्रदेशात महंमद पैगंबरावरील कथित टिपणीचे प्रकरण
     आय.एस्.आय.एस्.च्या अतिरेक्यांप्रमाणे कृती करणारे धर्मांध देशात निर्माण झाले आहेत, हे यातून स्पष्ट होते. यावरून देशात शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न निर्माण होतो !
    आग्रा - येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या शमशाबाद भागात आकाश गुप्ता याने व्हॉट्सअ‍ॅप वरून महंमद पैगंबर यांच्यावर कथिक टिपणी केल्यावरून ३ सप्टेंबर या दिवशी धर्मांधांनी त्याला भर रस्त्यात फाशी देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच वेळी तेथे हिंदूचा जमाव येऊन पोहोचल्यामुळे त्यांचा धर्मांधांशी संघर्ष उडाला. या संघर्षात आकाशची धर्मांधांच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी नेपाळमध्ये ४ हिंदु तरुणांचे आमरण उपोषण !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आमरण उपोषण करतांना नेपाळी तरुण
नेपाळमधील तरुणांचा आदर्श घेऊन भारतातही हिंदु तरुणांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सिद्ध व्हावे !
      काठमांडू - नेपाळला सनातन हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी ४ नेपाळी हिंदु तरुणांनी येथील खुलामंच येथे संत आणि धर्मगुरु यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण करण्यास प्रारंभ केला आहे. या उपोषणाला २७ हिंदु संघटनांनी समर्थन दिले आहे. या उपोषणाच्या वेळी हे युवक केवळ पाणी ग्रहण करणार आहेत. नेपाळला सनातन हिंदु राष्ट्र घोषित करावे, गोहत्या बंद करावी आणि धर्मांतराला आळा घालावा, अशा मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत. बाणेश्‍वर येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी नेपाळी काँग्रेसचे नेते खुम बहादूर खडका यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा निघाला.

चेन्नई-मंगळुरू एक्स्प्रेस रुळावरून घसरली !

३८ प्रवासी घायाळ
संपतकाळात वारंवार रेल्वे अपघात होणारा जगातील एकमेव देश भारत !
    चेन्नई - तमिळनाडूच्या विल्लपुरम् येथे चेन्नई-मंगळुरू एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरले. या अपघातात ३८ प्रवासी घायाळ झाले. त्यात २५ महिलांचा समावेश आहे.

इचलकरंजी येथील सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम ही रिंगण नाटिका रहित !

कागलनंतर हिंदुद्रोह्यांना इचलकरंजी येथे दुसरा दणका !
वारकरी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !
     इचलकरंजी, ४ सप्टेंबर (वार्ता.) - रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची अनुमती नसणे, संत तुकाराम महाराज यांचा खून झाला आहे, यांसह अनेक गोष्टींचे खोटे चित्रण सादर करणे, कार्यक्रमास अनुमती नसणे, अशा अनेक नियमबाह्य गोष्टी असल्याने इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार्‍या सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम या नाटिकेस हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी यांनी संघटितपणे विरोध केला. या विरोधामुळे पोलीस प्रशासनास ही नाटिका रहित करणे भाग पाडले. (हिंदूंनो, हिंदु धर्मावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी प्रयत्नरत हिंदुत्ववादी, हिंदु धर्माभिमानी आणि वारकरी यांच्याकडून आदर्श घ्या ! हिंदूंनो, तुमची एकजूट हिंदुद्रोह्यांचा प्रत्येक कार्यक्रम सनदशीर मार्गाने रोखू शकते, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करा ! - संपादक)

मलेशियामध्ये श्री राधाकृष्ण मंदिराची स्थापना

      कुवालालंपूर - पेनांग, मलेशिया येथे इस्कॉनच्या वतीने श्री राधाकृष्ण मंदिर स्थापण्यात आले आहे. हे मंदिर २९ ऑगस्ट या दिवशी भाविकांसाठी खुले करण्यात आले. भारतातील दोन प्रसिद्ध मंदिरांच्या धर्तीवर या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराची सजावट भारतातील कारागिरांकडून करवून घेण्यात आली आहे.
     या मंदिरात प्रतिदिन पूजा-अर्चा करण्याबरोबरच नामजप, योग, आध्यात्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात श्री प्रभुपाद दालन आणि शैक्षणिक केंद्र उभारण्यात आले आहे. इस्कॉनचे संस्थापक पूज्य भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी वर्ष १९७१ मध्ये मलेशियाला भेट दिली होती. त्यानंतर वर्ष १९८० मध्ये मलेशियामध्ये इस्कॉनची स्थापना करण्यात आली होती.

आय.एस्.आय.एस्.कडून नवीन चलनाची निर्मिती चलनात सोने, चांदी आणि तांबे यांचा वापर

      बगदाद (इराक) - आय.एस्.आय.एस्.ने खलिफाचा उदय आणि सुवर्ण दिनाराचे पुनरागमन असे शीर्षक असलेली एका घंट्याची ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध केली आहे. यात सोने, चांदी आणि तांबे या धातूंचा वापर करून वेगवेगळ्या किमतीचे चलन सिद्ध करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.
     सध्या इराक आणि सिरिया या देशांतील मोठा भूभाग आय.एस्.आय.एस्.च्या कह्यात आहे. या चलनाचा वापर करून गुलामगिरीचे आणि अन्यायाचे प्रतीक असलेली अमेरिकेची भांडवलशाही यंत्रणा मोडून काढण्याचा दावाही या चित्रफितीत करण्यात आला आहे. सध्या संघटनेचे सर्व व्यवहार डॉलरमध्येच होत आहेत. शिवाय स्थानिक व्यापारही स्थानिक चलनातच चालू आहे.

नक्षलवाद्यांकडून विद्यार्थ्यांना विखारी शिकवण (म्हणे) आमच्यासारखे बना ! ज्याच्या हाती शस्त्र, तोच खरा मालक !

अनेक दशकांपासून चालू असलेली नक्षलवादी समस्या न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय
राज्यकर्ते उत्तरदायी आहेत ! असे राज्यकर्ते देणारे लोकराज्य पुरे, आता हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
      रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमध्ये नक्षलप्रभावित भागातील शाळांमध्ये नक्षलवादी विद्यार्थ्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे एका ध्वनीचित्रफितीतून उघड झाले आहे. या चित्रफितीत कलेक्टर आणि इंजिनियर बनून काही लाभ होत नाही, ती नोकरी असते. त्यामुळे आमच्यासारखे बना, असे नक्षलवादी शाळकरी मुलांना सांगत असल्याचे दिसून येत आहे. ही चित्रफित येथील एका हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळाला प्राप्त झाली आहे. (नक्षलवादी एका शाळेत घुसून मुलांना असे आवाहन करतात, यावरून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच दिसून येते ! - संपादक)

६ सप्टेंबर या दिवशी कावनई (जिल्हा नाशिक) येथे होणार्‍या राजयोगी (शाही) स्नानाच्या निमित्ताने...

कपिलतीर्थाच्या ठिकाणी असलेले गोमुख
सिंहस्थपर्वाचे मुख्य स्थान असलेेले नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कावनई !
      नाशिकपासून सुमारे ४७ कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र कावनई हे अतीप्राचीन गाव वसले आहे. या पवित्र क्षेत्रास अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. मुख्य म्हणजे सत्ययुगापासून वर्ष १७७० पर्यंत याच ठिकाणी सिंहस्थपर्व भरवले जात होते. कावनई येथील श्री फलाहारीबाबा यांनी दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. शैलेश पोटे यांना ही माहिती दिली. कावनईविषयी त्यांनी अन्यही उपयुक्त माहिती दिली. सिंहस्थपर्वकाळातील ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी येथे राजयोगी (शाही) स्नान होणार आहे. या राजयोगी स्नानानिमित्त साधू-महंत यांची मिरवणूक निघणार असून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधू-महंतांचे कृतज्ञताभावाने स्वागत करण्यात येणार आहे. राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर या पुण्यभू क्षेत्राची महती आणि माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

हिंदु धर्माप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रदर्शनाद्वारे मिळणारे मार्गदर्शन उल्लेखनीय ! - महंत रामगोपालदास महाराज

महंत रामगोपालदास महाराज (हातात ग्रंथ घेतलेले) आणि
त्यांचे पदाधिकारी यांना माहिती सांगतांना आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे
सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला संत-महंतांनी दिली भेट !
      नाशिक, ४ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु धर्म प्राचीन आहे. धर्माची व्यवस्था अत्यंत योग्य होती; मात्र काळाच्या प्रभावामुळे आणि पालटलेल्या परिस्थितीमुळे सध्या हिंदु धर्म आणि धर्माचरणात पालट झाला आहे; मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामुळे हिंदु धर्मातील आचार-विचार कसे असावे, कशी कृती करावी, या विषयी मार्गदर्शन मिळत आहे. लहान, तरुण आणि वयोवृद्ध यांनाही या प्रदर्शनातून धर्माप्रमाणे आचरणासाठी मार्गदर्शन मिळत आहे. हे कार्य खूपच प्रशंसनीय कार्य आहे. त्यामुळे माझी देवाजवळ प्रार्थना आहे की, आपण करत असलेल्या कार्यात आपल्याला यश मिळो.

धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे समुद्र, नदी वा वाहत्या पाण्यात विसर्जन करावे ! - डॉ. मानसिंग शिंदे

पत्रकार परिषदेत डावीकडून सुधाकर सुतार, शिवाजीराव ससे,
मधुकर नाझरे, राजन बुणगे आणि डॉ. मानसिंग शिंदे
      कोल्हापूर, ४ सप्टेंबर (वार्ता.) - अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. मृत मानवाचे अंतिमसंस्कारही सन्मानाने केले जातात; येथे मात्र श्री गणेशाला देव म्हणून पुजूनही या गणेशमूर्ती घाणेरड्या खाणींमध्ये, पडक्या विहिरींमध्ये, खड्ड्यांमध्ये अथवा निर्जनस्थळी टाकल्या जातात. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार त्या मूर्ती कचरा भरण्याच्या गाडीतून वाहून नेल्या जातात.

नगरपालिका आयुक्त आणि महापौर यांना भेटून कृत्रिम हौद करू नयेत असे सांगणार - मनोज मोरे, नगरसेवक

डावीकडून श्री. गौतम पारेराव, नूरखान पठाण,
श्री. लक्ष्मण, श्री. पंकज बागुल, श्री. मनोज मोरे आणि श्री. विलास राजपूत
     धुळे - नगरपालिका आयुक्त आणि महापौर यांना भेटून कृत्रिम हौद ठेवू नये, असे सांगू आणि विसर्जनाची पर्यायी व्यवस्था मोठ्या तलावात नगरपालिकेच्या वतीने करता येईल का, याचा विचार करू, असे आश्‍वासन धुळे येथील नगरसेवक मनोज मोरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. ३ सप्टेंबर या दिवशी दुपारी कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्तीदान यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव श्री. गौतम पारेराव, पत्रकार संघाचे अध्यक्ष नूरखान पठाण, मूर्तीकार श्री. लक्ष्मण चव्हाण, स्वदेशी जागरण मंचाचे श्री. विलास राजपूत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल उपस्थित होते.

नाशिक येथील सिंहस्थपर्वात कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील साधिका सौ. अंजली मणेरीकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

सौ. अंजली मणेरीकर यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वाती खाडये (डावीकडे)
      नाशिक - नाशिक येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सेवेसाठी आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबुळी, कुडाळ येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अंजली हेमंत मणेरीकर या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जीवनमुक्त झाल्या. निर्माण उपवन संकुल, काळाराम मंदिराजवळ, पंचवटी येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्र आणि धर्मविषयक प्रदर्शन लावण्यात आले आहे. या ठिकाणी झालेल्या भावसोहळ्यात पू. (कु.) स्वाती खाडये यांनी ३ सप्टेंबर या दिवशी ही आनंददायी वार्ता सर्वांना सांगितली. त्यानंतर पू. (कु.) स्वाती खाडये यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन सौ. मणेरीकर यांचा सत्कार केला. या वेळी त्यांचे दीर श्री. शरद मणेरीकर आणि पुतणी कु. श्रद्धा शरद मणेरीकर तसेच अन्य साधक उपस्थित होते. साधकांनी या वेळी सौ. मणेरीकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

बकरी ईदच्या दिवशी बैलांची हत्या न करण्याचा माणगाव येथील मुसलमानांचा निर्णय

      माणगाव (जिल्हा रायगड) - शासनाने केलेल्या गोवंशहत्या बंदी कायद्याचे पालन व्हावे, या हेतूने येथील ४० मुसलमानांनी बकरी ईदच्या दिवशी बैलांची हत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. माणगाव तालुका अमन कमिटीने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतल्याचे समजते. (सर्वत्रचेच मुसलमान माणगाव (जिल्हा रायगड) येथील मुसलमानांकडून बोध घेतील का ? - संपादक)

जळगाव येथील दैनिकाचे वाचक श्री. मुरलीधर कुलकर्णीआजोबा यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री. मुरलीधर कुलकर्णीआजोबा यांचा सत्कार करतांना श्री. वाघुळदे (डावीकडे)
     जळगाव - येथील दैनिक सनातन प्रभातचे रविवारचे वाचक श्री. मुरलीधर कुलकर्णीआजोबा यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ४ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय वाघुळदे यांनी श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.
कुणाविषयी द्वेष वाटला नाही ! - मुरलीधर कुलकर्णीआजोबा
     मनोगत व्यक्त करतांना श्री. मुरलीधर कुलकर्णीआजोबा म्हणाले, हे जग भ्रामक आहे. जसा आपण पडद्यावर चित्रपट पहातो, तसेच हे जीवन आहे. आपल्याला सत्य वाटते; पण ते सत्य नाही. मला कोणाविषयी कधीच द्वेष वाटला नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या अन्य संघटनांसमवेत गणेशमूर्तीदान आणि कृत्रिम हौद यांविरोधी ठिकठिकाणी पत्रकार परिषदा !

डावीकडून सौ. नाईक, वैद्य उदय धुरी आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान नकोच ! - हिंदु जनजागृती समिती
      मुंबई - प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण, असे समीकरण जुळवून गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे हिंदू जनजागृती समितेचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात कृत्रिम तलाव आणि मूर्तीदानाच्या संदर्भात बोलतांना पत्रकार परिषदेत सांगितले.

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान न करता गणेशमूर्तीचे विसर्जन करणे आवश्यक ! - श्री. अनिल कदम, आमदार, शिवसेना.

श्री. अनिल कदम (उजववीकडे) यांना सनातनच्या
ग्रंथांविषयी माहिती सांगतांना श्री. सुनील घनवट
      नाशिक, ४ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु धर्माने एक संस्कृती जपली आहे. या संस्कृतीला बाधा पोहोचवणारे अधर्मी आहेत. त्यांना थांबवण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीदानाच्या नावाखाली मूर्ती फेकल्या जातात. धर्मशास्त्रानुसार मूर्तींचे विसर्जन पाण्यात झाले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार श्री. अनिल कदम यांनी केले.
      नाशिक येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेले राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण प्रदर्शनाला श्री. कदम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना गणेशमूर्तींचे दान न करता धर्मशास्त्रानुसार विसर्जन करावे, या विषयावरील ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

मुंब्रा (ठाणे) येथे अनधिकृत इमारतीवर कारवाई करू नये; म्हणून ४० मुसलमान महिलांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले !

  • सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुसलमानांना डोक्यावर चढवून ठेवल्याचे परिणाम !
  • अवैध कृत्ये करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारे राज्यकर्ते मिळण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! अनधिकृत इमारती बांधून होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
    ठाणे - मुंब्रा येथील नूरजहाँ ही सहा मजल्याची अनधिकृत इमारत तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. इमारतीवर कारवाई करू नये; म्हणून तेथे रहाणार्‍या चाळीस मुसलमान महिलांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे येथे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर रहिवाशांचा आक्रमक पवित्रा बघून कर्मचार्‍यांना पूर्ण कारवाई न करताच माघारी परतावे लागले. (मुसलमानांचा कावेबाजपणा ओळखा ! आता ही अनधिकृत इमारत अधिकृत करण्यासाठी स्वतःच्या जीवाचे भय दाखवणार्‍या मुसलमानांवर काय कायदेशीर कारवाई केली जाणार ? - संपादक)

एका रुग्णालयातील रुग्णांना त्रासदायक ठरणारा मोकाट प्राण्यांचा सुळसुळाट !

      एका शहरातील एका रुग्णालयाच्या परिसरात आणि रुग्णालयात काही कुत्री मोकाट फिरतांना दिसतात. १४.६.२०१५ या दिवशी मी एका शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात भरती झालो होतो. दुसर्‍या दिवशी मला एका वार्डमधून दुसरीकडे चाकांच्या आसंदीवरून नेत होते. त्या वेळी वाटेत दोन कुत्री बसली होती. सुदैवाने कुत्र्यांनी आम्हाला बघून आमची जाण्याची वाट मोकळी करून दिली. काही कुत्री एका कडेला झोपली होती. रुग्णालयात भरती असतांना मध्यरात्री मला मोठे उंदीर फिरतांना दिसले. एकदा कार्डिओलॉजीच्या वातानुकूलित विभागात एक कोंबडी २ घंटे फिरत होती.
     हे वेळीच न रोखल्यास रुग्णाला अन्य प्राण्यांमुळे येणार्‍या अडचणींना प्रथम सामोरे जावे लागून त्यानंतर स्वतःला झालेल्या आजाराच्या औषधोपचाराकडे लक्ष द्यावे लागेल.
- एक साधक
(वाचकांनो, आपल्याला असे कुठे आढळून आल्यास उत्तरदायींकडे तक्रार करा आणि त्याची एक प्रत सनातन प्रभातला पाठवा. - संपादक) 

फलक प्रसिद्धीकरता

नग्न अन् अश्‍लील चित्रे चालणार्‍या फेसबूकला
सत्य आणि वास्तववादी वृत्तांचे वावडे का ?
     राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसाठी अव्याहतपणे कार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे हिंदी भाषेतील फेसबूक पान (www.facebook. com/hjshindi) ४ सप्टेंबर या दिवशी फेसबूकने तडकाफडकी बंद केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Hindu Janajagruti Samitike Hindi facebook pannepar facebook ne lai bandi !
Hinduo, facebook ka yah Hindudroha Jano !
जागो !
हिंदु जनजागृती समिती के हिंदी फेसबूक पन्नेपर फेसबूकने लाई बंदी !
हिंदूओ, फेेसबुक का यह हिंदुद्रोह जानो !

हिंदु संस्कृतीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे काम सनातन संस्था करीत आहे ! - संत श्री रसियाबाबा

प्रदर्शनस्थळी डावीकडून आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे,
श्री. प्रकाश मालोंडकर, संत श्री रसियाबाबा, श्री राकेशबाबा
भावी पिढी घडवण्यासाठी गावागावांतही हे प्रदर्शन उभारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन
      नाशिक, ४ सप्टेंबर (वार्ता.) - पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे हिंदू स्वत:ची मूूळ संस्कृती विसरत चालले आहेत. ज्या पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या मागे हिंदू लागले आहेत, ती त्यांना शाश्‍वत आनंद देऊ शकत नाही. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे काम सनातन संस्था करीत आहे, असे गौरवोद्गार वृंदावन येथील शरणागती आश्रमाचे संत श्री रसियाबाबा यांनी येथे काढले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या काळानुसार करायच्या नामजपाची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV) या उपकरणाच्या साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार करावयास सांगितलेला नामजप उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने असणार्‍या कक्षात बसून केल्यास तो किती परिणामकारक ठरतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी १७.१.२०१५ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे बायो-वेल जी.डी.व्ही. उपकरणाच्या (Bio-well GDV Device च्या) द्वारे चाचणी घेण्यात आली. अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी ही चाचणी सिक्स सिग्मा अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स्ड कंट्रोल्स या अमेरिकेतील जगप्रसिद्ध आस्थापनाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रदीप देशपांडे यांनी घेतली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. यातून पुढील गोष्टी वाचकांच्या लक्षात येतील. 

गोपींच्या जन्माचे रहस्य आणि आत्मारामी मधुराभक्ती !

१. श्रीकृष्णाच्या अनेक सहस्र गोपींमध्ये राधाराणी श्रेष्ठ ! 
    भगवान श्रीकृष्णाच्या अनेक सहस्र गोपींमध्ये सोळा सहस्र गोपी प्रमुख आहेत. या सोळा सहस्रांपैकी १०८ विशेषकरून विख्यात आहेत. या १०८ पैकी ८ प्रधान आहेत आणि या ८ प्रधान गोपींमध्ये राधाराणी अन् चंद्रावली नावाच्या प्रमुख आहेत आणि या दोन गोपींमध्ये राधाराणी श्रेष्ठ आहे. (संदर्भ : स्कंदपुराण)
२. गोपींचे जन्मरहस्य ! 
     त्रेतायुगात याच सर्व गोपी वेदशास्त्रपारंगत विद्वान, ऋषी होत्या आणि त्यांनी माधुर्य-प्रेमभक्तीतून प्रभु रामचंद्राच्या सान्निध्याची कामना केली होती. तेव्हा रामरायाने त्यांना वरदान दिले होते की, द्वापरयुगात श्रीकृष्णजन्मात त्यांची ही इच्छा गोपालकृष्ण पूर्ण करेल. त्या वरदानानुसार या सर्व वैदिक विद्वानांनी श्रीकृष्ण अवतारात वृंदावनात गोपींच्या रूपाने जन्म घेतला आणि श्रीकृष्णाचे सान्निध्य मिळवले होते. त्यांची निर्दोष कामना साधनेतून सफल झाली होती. असे गोपींचे जन्मरहस्य आहे.

चातुर्मासातील भगवान विष्णूचा नामजप करण्याचा महिमा !

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ...
प्रा. श्रीकांत भट
१. भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि भक्ती यांप्रमाणे 
भगवंत भक्ताला दर्शन देतो ! 
     भगवंताची अनेक नावे आणि रूपे आहेत. मुळात भगवंत हा निर्गुण आणि निराकार आहे अन् म्हणूनच तो निरनिराळ्या रूपांत, तसेच नामांत प्रगट होतो. भक्तांच्या मनात जशी श्रद्धा आणि भक्ती असेल, तशाच रूपात भगवंत भक्ताला दर्शन देत असतो. ध्रुवबाळाने तपःसाधना चालू करण्यापूर्वी स्वतःच्या देवघरातील विष्णूच्या मूर्तीचे रूप डोळ्यांसमोर ठेवून साधनेला आरंभ केला होता. साक्षात् भगवान विष्णु समोर अवतरल्यावरही तो त्यांना ओळखू शकला नाही. देवाने त्याला पुष्कळ सांगून पाहिले, अरे, तू ज्या विष्णूची भक्ती करत आहेस, तोच विष्णु मी आहे. तरीसुद्धा ध्रुव मानत नव्हता. तेव्हा भक्ताच्या अंतरंगातील रूप विष्णूला शोधावेच लागले आणि त्या रूपात देव आल्यावर ध्रुवाची निश्‍चिती पटली. विष्णूने आपला शंख त्याच्या गालाला लावला, त्या वेळी त्याच्या तोंडून विष्णुस्तुती बाहेर पडली. 
रात्रीच्या गर्भात असतो उषःकाल उद्याचा । 
एकच नारा आता जयतु जयतु हिन्दुराष्ट्राचा ॥
- पुष्पांजली (१५.८.२०१४)

जगावर येणारी संकटे देव झोपला नसून धर्मसंस्थापना करण्यासाठी तो प्रकट होणार आहे, याची पूर्वसूचना असणे

     आज जगावर येणारी संकटे पाहून लोक म्हणतात, देव झोपला आहे का ? पण आम्ही म्हणतो, देव प्रगट होत आहे. हे तर त्याचे एक-एक पाऊल आहे. लवकरच तो प्रकट होईल. आपले रूप आणि कार्य प्रकट करून धर्मसंस्थापना करून देईल. त्याच्या पावलांची ही चाहूल आहे. तो येत आहे. तो येत आहे. तो येत आहे ! - पुष्पांजली

अजूनही स्थिती बिकटच...!

झारखंड येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यात तिला गंभीर इजा झाली. तिच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वडिलांना आठवड्याला ४ किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. हा प्रकार गेल्या २ मासांपासून चालू आहे. बलात्काराच्या वेळी मुलीच्या आतड्याला पुष्कळ जखमा झालेल्या असल्याने तिला उचलून घेऊन रुग्णालयात न्यावे लागते. या मुलीला आतापर्यंत ५६-६० सलाईनच्या बाटल्या, तसेच अनेक इंजेक्शने देण्यात आली आहेत. प्रत्येक आठवड्याला तपासणीसाठी आणल्यास तिची प्रकृती सुधारू शकणार असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले; मात्र तसे करणे कुटुंबियांसाठी कठीण आहे. साधी सायकलही नसल्याने या कुटुंबाची उच्च न्यायालयाने नोंद घेऊन त्यांना १ लाख रुपयांची हानी भरपाई देण्याचे आदेश, तसेच सायकल आणि तिच्या वडिलांना नोकरीचे आश्‍वासन दिले. या घटनेतील दोन महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे तिच्यावर झालेला अत्याचार अन् तिच्यावरील उपचारांसाठी वडिलांना करावी लागणारी पायपीट ! दोन्ही गोष्टींत मोदी शासनाची चांगल्या दिवसांची संकल्पना कुठे तरी बसते का ? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

साटेलोटे करणारे राजकीय पक्ष आणि संघटना !

पूर्वी बहीण स्वत:च्या मुलाचे भावाच्या मुलीशी किंवा भाऊ स्वत:च्या मुलाचे बहिणीच्या मुलीशी लग्न लावून देत असे. यामुळे त्यांची संपत्ती आणि हक्क आपापसातील नात्यातच वाटले जायचे, तसेच एकमेकांच्या चुका, हेवेदावे आणि भांडणे यांवरही पांघरूण टाकले जात असे. राष्ट्र आणि समाज यांकडून संघटितपणे लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात असे. त्यानंतर मोगली आणि ख्रिस्ती संस्कृतीने पछाडलेल्या काँग्रेसी पक्षाने या प्रवृत्तीचा अतिरेक केला. काँग्रेस आणि मुसलमान, तसेच काँग्रेस आणि ख्रिस्ती यांचे साटेलोटे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालूच आहे. त्यांनी राष्ट्र आणि समाज यांना लुटून आपापसात लाभ करून घेतला. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाऊन हिंदु धर्म कसा नष्ट होईल, याची पराकाष्ठा केली.

चौकटी


श्रीकृष्णाने विविध अनुभूती देऊन त्याच्या अस्तित्वाची दिलेली प्रचीती !

कु. उषा पोखरे
१. श्रीकृष्णाकडे साधनेसाठी उत्साह मागितल्यावर एका क्षणात मरगळ 
आणि निरुत्साह निघून जाणे अन् आतून वेगळाच उत्साह जाणवणे 
     माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नव्हते. त्यामुळे मी श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला माझ्या मनाची स्थिती सांगितली आणि त्याच्याकडेच साधनेसाठी उत्साह मागितला. त्याच्या कृपेमुळेच एका क्षणात मरगळ आणि निरुत्साह निघून गेला. तोच मला वेगवेगळया स्थितीत प्रार्थना सुचवतो. व्यष्टी साधना करायला उत्साह देतो आणि करवून घेतो, असे मला वाटले. त्यामुळे आतून सतत वेगळाच उत्साह जाणवत होता.

निर्मळ मनाची, निरपेक्ष प्रीतीचे मूर्तीमंत रूप आणि अनेक गुणांचा सुरेख संगम असलेली, संतपदाकडे वाटचाल करणारी (६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली) पहिली गोपी - कु. तृप्ती गावडे !

कु. तृप्ती गावडे 
     सध्या कुंभमेळ्याच्या सेवेसाठी आम्ही नाशिक येथे कु. तृप्ती गावडे हिच्यासमवेत रहात आहोत. या कालावधीत तृप्तीताईतील प्रीती, निर्मळपणा, साधकांची साधना व्हावी, याची तळमळ आणि तिच्या अंतरंगातील संतांप्रती असलेला भाव तिच्या प्रत्येक कृतीतून लक्षात येतो. या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत. 
सनातन गोकुळातील पहिली गोपी - तृप्ती हिला 
सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! 
१. प्रेमभाव
१ अ. सर्व साधकांचे जेवण झाल्यावर स्वतः जेवणे : तृप्तीताईकडे येथील सेवाकेंद्राच्या स्वयंपाक विभागाचे दायित्व आहे. साधकांची जेवणे झाल्याविना ताई स्वतः जेवत नाही. सर्व साधकांना वेळेत आणि पोटभर जेवण मिळावे, अशी तिची तीव्र तळमळ असते. काही वेळा बाहेरून जेवण येते. (काही हितचिंतक साधकांच्या भोजनाची व्यवस्था करून धर्मकार्यात सेवेची संधी घेतात.) काही कारणांमुळे हे जेवण उशिरा आले, तर साधकांना जेवायला उशीर होईल, याची ताईला पुष्कळ खंत वाटते. - कु. वैभवी भोवर आणि कु. वैदेही पिंगळे
मानवता आणि धर्महित यांच्या हिताच्या या लढाईत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावरच आम्हाला हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य होणार आहे.
- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

मोदी शासन मुसलमानांसाठी काय करत नाही ?

    मुसलमान संघटनांकडून इस्लाम खतरे में है, असे बरेचदा वाचायला मिळते. २४ जून २०१५ या दिवशी तसे वृत्त वाचायला मिळाले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला एकच विचारावेसे वाटते की, मोदी शासन तुमच्यासाठी सदैव तत्पर असतांना तुम्हाला खतरा कसला वाटतो ? आज मोदी शासन तुमच्यासाठी काय करत नाही, ते सांगा !
१. शासनाने तुमच्यासाठी योगासनांमधून ॐ काढला, सूर्यनमस्कार वगळले.
२. मराठी शाळांमधून उर्दू शिकवण्याची घोषणा केली.
३. कलम ३७०, समान नागरी कायदा आणि राममंदिर यांविषयी मौन बाळगले.
४. हिंदू आणि मुसलमान यांच्यात भांडणे झाल्यास पोलीस हिंदूंनाच आरोपी करतात. मुसलमानांना सवलत देतात.

हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यानंतर जाणवलेले पालट !

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय शिबिरांतर्गत साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे 
१. समितीच्या संपर्कात आल्यानंतर चिडचीड होणे, राग येणेे आणि 
मोठ्याने बोलणे, हे दोष न्यून झाल्याने घरच्यांना आश्‍चर्य वाटून आनंद होणे
मी समितीच्या धर्मशिक्षणवर्गात जायला लागलो. नियमित धर्मशिक्षणवर्गात गेल्यामुळे मला धर्माचरण करण्याची सवय लागली. मला धर्माविषयी आवड निर्माण झाली. धर्मशिक्षणामुळे धर्मावर होणारे आघात लक्षात आले. माझे चिडचीड करणे, घरी कोणाचे न ऐकणे, राग येणे आणि मोठ्याने बोलणे हे दोष समितीच्या संपर्कात आल्यामुळे न्यून झाले. त्यामुळे घरच्यांनाही आश्‍चर्य वाटून आनंद झाला. माझ्या रहाण्यात व्यवस्थितपणा आला. मी प्रार्थना करतांना श्रीकृष्णाचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागले. रात्री झोपतांना प्रार्थना केल्यानंतर मला झोप चांगली लागू लागली, तसेच इतरांविषयी वाईट विचार येणे बंद झाले. समितीच्या संपर्कात आल्यामुळे माझ्यात चांगले वैयक्तिक आणि आध्यात्मिक पालट झाले.

बागलकोट येथील श्री. व्यंकटरमण नाईक यांना राष्ट्रीय शिबिरात शिकायला मिळालेली सूत्रे

१. शिबिरासाठी आल्यावर आरंभी भावजागृतीसाठी प्रयत्न होत नव्हते. शिबिरात भावजागृतीसाठी काही वेळानंतर प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न यांविषयी पुनःपुन्हा सांगितले जात होते. त्या वेळी भावजागृती होत होती.
२. धर्मविरांविषयीची ध्वनीचित्र-चकती पाहिल्यानंतर हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे महत्त्व समजले. साधकांकडून मला प्रेमभाव आणि शिस्त या गोष्टी शिकायला मिळाल्या. सतत वर्तमानकाळात रहाणे आणि वेळेचे पालन करणे यांसाठीचे प्रयत्न चांगल्या प्रकारे होत होते. सभागृहातून फार चैतन्य मिळत होते.
३. तुलना करणे या दोषाविषयी अनेक प्रसंगांत शिकता आले. इतर आध्यात्मिक संस्था आणि इतर संत यांची तुलना केल्यामुळे आपल्याच साधनेची हानी कशी होते ?, हे शिकायला मिळाले.
४. बहिर्मुख वृत्तीने बोलल्यामुळे आपल्या साधनेची हानी होते.

कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने


सर्वत्र श्रीकृष्णच श्रीकृष्ण !

रखरखत्या उन्हातील थंडगार हवेची झुळूक, म्हणजे श्रीकृष्ण ।
कर्णकर्कश आवाजाच्या रणधुमाळीतील नीरव शांतता, म्हणजे श्रीकृष्ण ।
तृष्णेने व्याकुळ झालेल्या जिवासाठी शुद्ध पाण्याचा घोट, म्हणजे श्रीकृष्ण ।
क्षुधेने तडफडणार्‍या जिवाच्या मुखातील अन्नाचा घास, म्हणजे श्रीकृष्ण ।
जनी, मनी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र श्रीकृष्णच श्रीकृष्ण ॥ 
- सौ. अंजली विभूते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.६.२०१५)

हिंदु राष्ट्र स्थापण्या धाव घेई रे कृष्णा ।

सौ. कमलिनी कुंडले
     ९.४.२०१४ या दिवशी उठल्यापासून भगवंताच्या मुरलीची तीव्रतेने आठवण येऊन ती वाजवण्यासाठी त्याला आळवत होते; परंतु कृष्णा वाजवी आता तुझी मुरली या एका ओळीच्या पुढे काहीच शब्द येत नव्हते. त्यामुळे दुसरे दिवशी दुपारपर्यंत त्या एका ओळीनेच त्याची आळवणी चालू होती. १०.४.२०१४ दुपारी श्रीकृष्णाने सध्या आपत्काळ चालू असल्याने मुरलीच्या नादाने वेडावण्यापेक्षा शंखनादाची आवश्यकता आहे, हे लक्षात आणून दिले आणि आपोआपच पुढील काही क्षणांतच ही रचना सिद्ध झाली. हे श्रीकृष्णा, ही तुझी रचना तुझ्याच चरणी समर्पित... 
कृष्णा वाजवी आता तुझा शंख रे । तुझा शंख रे, पांचजन्य रे ॥ १ ॥
तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या प्रीतीसाठी । तुझ्या प्राप्तीसाठी, जीव व्याकुळला रे ।

चित्रकलेचे उपजत ज्ञान असणारी आणि कृष्णाची भावपूर्ण, सुंदर चित्रे रेखाटणारी रत्नागिरी येथील कु. मानसी मोहन वाडेकर (वय २० वर्षे) !

                                              कु. मानसी वाडेकर यांनी भावपूर्ण काढलेली चित्रे


१. उत्साही : कु. मानसी नेहमी उत्साही आणि आनंदी असते. तिच्याकडे पाहिल्यावर चांगले वाटते. तिच्यामध्ये क्षात्रवृत्तीही जाणवते.
२. सुंदर चित्रे रेखाटणे : मानसीला चित्रकला शिकवली नसूनही तिची चित्रकला छान आहे. तिने राधाकृष्ण आणि कृष्ण यांची चित्रेही भावपूर्णरित्या काढली आहेत. तिने काढलेल्या चित्रांमध्ये जिवंतपणा जाणवतो.

श्रीकृष्ण प्रिय का वाटतो ?

     वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
     देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ 
अर्थ : वसुदेवाचा पुत्र; कंस, चाणूर इत्यादींचा निःपात करणार्‍या, देवकीला परमानंद देणार्‍या आणि संपूर्ण जगताला गुरुस्थानी असणार्‍या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.
१. केवळ यांमुळेच श्रीकृष्ण प्रिय आहे, असे नसणे
हे श्रीकृष्णा, 
  • तू वसुदेवाचा लाडका पुत्र, म्हणून किंवा नंदाचा प्रिय कान्हा आहेस, म्हणून तू आम्हाला प्रिय नाहीस,
  • देवकीचा आठवा पुत्र किंवा यशोदेचा लाडका कृष्ण, म्हणून तू आम्हाला प्रिय नाहीस,
  • राधेचा जीवलग, बाळ-गोपाळांचा सखा, म्हणूनही तू आम्हा प्रिय नाहीस,

नाम तुझे घेता देवा ।

कु. शकुंतला दहीवलकर
       २६.६.२०१५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता श्रीकृष्णाचा नामजप करतांना मला पुढील ओळी सुचल्या. 
नाम तुझे घेता देवा ।
मन आनंदी होत आहे ।
नाम तुझे देता देवा ।
तन आनंदी होत आहे ॥ १ ॥

नाम तुझे श्रवण करता देवा । कर्ण आनंदी होत आहे ।
नाम तुझे घेता देवा । वाचा आनंदी होत आहे ॥ २ ॥

करू तुझ्या नामाचा जागर ।

प्रिय प.पू. जयंतकृष्णा, 
नमस्कार देवा, त्रिवार नमस्कार ।
कृतज्ञतेचा शतवार नमस्कार ।
शरणागतीचा सहस्र वेळा नमस्कार ।
तुझ्या चरणी आमचा (ची) हार (पुष्पांचा)। 
एकेक शब्दाची गुंफिली हारात सुगंधी पुष्पे ।
सजविलीस रामनाथीची द्वारका त्या प्रीतपुष्पे ॥ १ ॥

गोकुलसे मोहन मथुरा चला !

कु. मधुरा भोसले
धर्मके रथपर बैठकर चला,
कर्मके पथपर अकेले चला,
राधाको किशन छोडकर चला ।
गोकुलसे मोहन मथुरा
चला ॥ १ ॥

राधाका दिल तोडकर चला,
वचनोंको अधूरा छोडकर चला ।
विरहका मीठा दर्द दे चला,
भक्तिको मुक्तिका उपहार दे चला ॥ २ ॥

हे केवळ देव-भक्तातच राहू दे ।

हे केवळ देव-भक्तातच राहू दे ।
नको ना करू प्रसिद्ध ॥ १ ॥

शप्पथ देवा ।
साधक करतील हेवा ॥ २ ॥

लागेल दृष्ट । तुला होतील कष्ट ।
म्हणून बोलते स्पष्ट ॥ ३ ॥

नकोस रागवू ना । केवळ कपाटातच याची जागा ।
त्यालाच होऊ दे आनंद ॥ ४ ॥
- एक साधिका

असा कसा हा भक्त ?

धरशील ना धीर ।
होऊ नकोस अधीर ॥ १ ॥

तुझा प्रत्येक क्षण अमूल्य ।
त्या क्षणांचे नकोस देऊ मूल्य ॥ २ ॥

म्हणू नकोस देवा, असा कसा हा भक्त ।
तूच केलेस त्याला सर्वांतून रिक्त ॥ ३ ॥

केवळ दे थोडासा वक्त ।
मगच आनंद कर व्यक्त ॥ ४ ॥
- पुष्पांजली (१५.८.२०१४)

प्रेमळ स्वभावाचा, संतांच्या सहवासाची ओढ असणारा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा जामनेर, जळगाव येथील चि. अथर्व प्रमोद पाटील (वय ३ वर्षे) !

चि. अथर्व पाटील
    आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (५ सप्टेंबर २०१५) या दिवशी चि. अथर्व पाटील याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
तृतीय वाढदिवसानिमित्त चि. अथर्व प्रमोद पाटील
याला सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीष !
१. गर्भधारणा होण्यापूर्वी श्रीरामाचा पाळणा म्हणावासा वाटणे : अथर्वच्या वेळेस गर्भधारणा होण्यापूर्वी २ - ३ मास आधीपासून मला श्रीरामाचा पाळणा म्हणावा, असे वाटायचे. मी घरातील कामे करत असतांनाही पाळणाच म्हणत असे. त्या वेळी एकाएकी मला श्रीरामाचा पाळणा का म्हणावासा वाटतो आहे ?, असा विचार मनात येई.

जळगाव सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर सुचलेले काव्यपुष्प !

     कविता सुचण्यापूर्वी मनाची स्थिती - सासुरवाशीण गोपिका श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आतूर झाली आहे; परंतु ती घरच्यांच्या धाकामुळे त्याला भेटू शकत नाही. त्यामुळे तिच्या मनाची घालमेल होते. ही घालमेल शांत करण्यासाठी ती श्रीकृष्णाला शरण जाऊन उपाय विचारते.
              प्रभु तारी आता मज शरणागतासी ।
कृष्णा, नको वाजवू तू बासरीची धून ।
तिने माझे देहभान जाते हरपून ॥ १ ॥

कृष्णा, नको जाऊ तू गायी चाराया ।
उशीर होतो तुज मग घरी परताया ॥ २ ॥

कर्तव्यतत्पर, उद्यमशील वृत्ती असलेले आणि स्वतःचा विचार न करता सतत दुसर्‍यांसाठी झटणारे श्री. मुरलीधर यशवंत कुलकर्णी (वय ८१ वर्षे) !

    जळगाव येथील श्री. मुरलीधर यशवंत कुलकर्णी हे दैनिक सनातन प्रभातचे वाचक आहेत. आज कृष्णाष्टमीच्या दिवशी त्यांचा ८१ वा जन्मदिवस आहे. यानिमित्त त्यांची मुलगी सौ. पूर्णिमा किरण राव आणि जळगावचे प्रसारसेवक ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. दत्तात्रेय वाघुळदे यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
श्री. मुरलीधर कुलकर्णी यांना सनातन
परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त नमस्कार !
१. सौ. पूर्णिमा किरण राव, जळगाव (श्री. कुलकर्णीकाकांची मुलगी)
१ अ. स्वभाव : त्यांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ, समजूतदार आणि जिज्ञासू आहे.
१ आ. आदर्श दिनचर्या : बाबा उत्तररात्री २.३० वाजता उठतात आणि पहाटे ३ - ४ पर्यंत प्राणायाम, तसेच व्यायाम करतात. नंतर स्नान आणि पूजा करून सकाळी ६.३० वाजता कॉफी घेतात. त्यानंतर दुपारी १२ नंतर जेवणात थोडासा वरणभात घेतात. नंतर दिवसभर काहीही खात नाहीत. रात्री वाटले, तर कॉफी किंवा एखादे फळ घेतात. त्यांचा असा दिनक्रम मागील १० वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. त्यांनी कधीच बाहेरचे अन्न (परान्न) घेतले नाही, तसेच मांस-मद्याला कधी स्पर्शही केला नाही. इतरांनाही ते हेच सांगतात. रामदेव बाबांनी सांगितलेली योगसाधना करून आजही त्यांनी त्यांची प्रकृती उत्तम राखली आहे.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक यांना नम्र विनंती !

आश्रमस्तरावरील शिलाईसंदर्भातील विविध प्रकारच्या
सेवा करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना सेवेची सुवर्णसंधी !
    सनातनच्या विविध आश्रमांमध्ये पडदे, नेटलॉन, पायपोस, गोधड्या, आसंद्यांसाठी कव्हर आदी शिवण्याची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यासमवेतच पूर्णवेळ आश्रमात रहाणार्‍या साधकांसाठी सात्त्विक पद्धतीचे पोशाख शिवू इच्छिणार्‍या साधकांचीही आवश्यकता आहे. वरील सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी रामनाथी आश्रमात सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. साधक या सेवा आश्रमात राहून करू शकतात किंवा काही दिवस आश्रमात राहून नंतर घरी जाऊन सेवा चालू ठेवू शकतात.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.२.२०१४)

विद्यार्थ्यांनो, शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करा !

पूर्वीच्या काळी शिक्षकांना गुरु वा आचार्य असे संबोधत असत. गुरु-शिष्य परंपरा हे हिंदु संस्कृतीचे अनमोल वैशिष्ट्य आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु जसे शिष्यांना ब्रह्मज्ञान देतात, तसे शिक्षक मुलांना त्यांच्याकडे असलेले विद्यारूपी अमूल्य धन देतात; म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करा. गुरुपौर्णिमेला शिक्षकदिन साजरा केल्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन होईल.

बोधचित्र


कृष्ण आणि (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांतील एक साम्य !

     माझ्यातील काही वैशिष्ट्यांमुळे माझ्यात आणि कृष्णात साम्य असल्याचे काही साधकांना वाटते. आज एक साम्य माझ्या लक्षात आले. ते म्हणजे कृष्ण बालपणी लोणी खायचा, तर मी म्हातारपणी वैद्यांनी सांगितल्यामुळे प्रतिदिन सकाळी दोन चमचे लोणी खातो !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.७.२०१५)

हिंदु राष्ट्रात खर्‍या संतांच्या परीक्षा असतील !

शिष्याला साधनेविषयी मार्गदर्शन
आजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे 
साधू-संतांचे महत्त्वही कळत नाही. त्यांच्यासाठी
 हे विशेष सदर !
५. भावी हिंदु राष्ट्रात खर्‍या संतांनाच स्वतःला साधू, महाराज, स्वामी इत्यादी म्हणवून घेण्याचा अधिकार असेल !
अ. सांप्रतकाळी साधू-संतांपैकी केवळ ५ टक्केच खरे साधू-संत असतात ! - (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२५.१२.२०१४) 
आ. सांप्रतकाळी भोंदू महाराज, स्वामी इत्यादींचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्यांच्यामुळे खर्‍या संतांपर्यंत बहुतेक व्यक्ती पोहोचू शकत नाहीत. भोंदू महाराज आणि स्वामी यांचे पितळ काही काळाने उघड होतेच. असा अनुभव आला की, सर्वसाधारण जनतेचा खर्‍या संतांवरचाही विश्‍वास डळमळीत होतो. त्यामुळे त्यांचा साधना, अध्यात्म आदी विषयांवरचाही विश्‍वास उडतो. अशा व्यक्ती बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या जाळ्यात सापडतात आणि धर्मद्वेष्ट्या होतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रात संतांच्या परीक्षा असतील. खर्‍या संतांनाच स्वतःला महाराज, स्वामी इत्यादी म्हणवून घेण्याचा अधिकार असेल ! - (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२०.६.२०१४) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ साधू-संतांचे महत्त्व आणि कार्य) (क्रमश:)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दिशा
माझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.
भावार्थ अ : दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन
सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण चित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

या निश्‍चयाला शुभेच्छा द्या !

     १७ सप्टेंबर हा हैद्राबाद (भाग्यनगर) मुक्तीदिन आहे. फाळणीपूर्वी हैद्राबाद हे संस्थान होते आणि निजाम तेथील संस्थानिक होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशभरातील शेकडो संस्थाने भारतीय शासनामध्ये विलीन झाली; मात्र निजामाला अखेरपर्यंत भारतीय शासनात विलीन होण्याची इच्छा नव्हती. त्याची ओढ पाकिस्तानकडे होती. निजामाने त्याच्या राजवटीत हिंदूंवर केलेले अत्याचार पहावयास गेल्यास वेगळे प्रकरण सिद्ध होईल. त्यामुळे येथे एवढेच नमूद केले तरी पुरेसे आहे की, निजामाने राज्यातील हिंदूंवर अतोनात अत्याचार केले होते. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, यांनी हैद्राबाद येथे भारतीय सैन्य पाठवून निजामाच्या रझाकारी सैन्याचा पाडाव केला आणि निजामही शरण आला. याप्रमाणे हैद्राबाद निजामाच्या अत्याचारी राजवटीतून मुक्त झाले. हिंदूंच्या दृष्टीने ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे.

आता चेंडू शासनाच्या आवारात !

शाळेत मेंदी लावून गेल्यामुळे उत्तरप्रदेशातील फतेहपूर येथील सेंट मेेरी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिकेने हिंदु विद्यार्थिनींना त्यांच्या हातावरील मेंदी दगडाने घासून काढून टाकण्यास भाग पाडले. मुलांच्या हातांवरील राख्या तोडून फेकून दिल्या आणि त्यांना काही घंटे उन्हात उभे रहाण्याची शिक्षा दिली. कसे वाटते हे वृत्त वाचून ? शाळकरी मुलींनी त्यांच्या सणावारी हौसेने मेंदी लावली, रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलांनी राख्या बांधल्या यांसाठी त्यांना दोष द्यायला आधार काय ? हा हिंदु संस्कृतीचा दुस्वास नाही तर काय ? इंग्रज आता नाहीत, ते कधीच गेले. त्यांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला. स्वतःची शिक्षण पद्धत भारतियांवर लादली. तेच पुढे चालू ठेवायचे आहे का ? हिंदु विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतःच्या संस्कृतीला जागायचे नाही का ? या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तपास केल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी नेहमीचे साचेबद्ध उत्तर दिले. पोलिसांकडून हिंदु पालकांना अपेक्षित उत्तर मिळणे शक्य नाही, असे म्हणण्याचे कारण एवढेच की, ते चाकरीचे गुलाम झालेले असतात. त्यांना धर्माचरण आणि संस्कृती यांच्याशी काही देणेघेणे नसते. इंग्रजांनी करून ठेवलेली ही व्यवस्था आहे. हिंदूंच्या संस्कृतीवर घाला घालण्याचे इंग्रजांचे ध्येय सफल झाले आहे, याविषयी पोलिसांना काहीही जाण नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn