Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.९.२०१५)

हैद्राबाद (भाग्यनगर) मुक्तीदिन साजरा करणार्‍याला अटक करणार !

वाहनफेरीद्वारे करण्यात येणारी जनजागृती
एम्.आय.एम्.च्या दबावाखाली तेलंगण शासनाचा देशद्रोही निर्णय 
हिंदूंनो, संघटितपणे भाग्यनगर मुक्तीदिन साजरा करण्यासाठी तेलंगण शासनाला संयत मार्गाने भाग पाडा !
आम्ही भाग्यनगर मुक्तीदिन साजरा करणारच ! - भाजपचे आमदार टी. राजासिंह
      भाग्यनगर (हैद्राबाद) - आंध्रप्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी हैद्राबाद (भाग्यनगर) मुक्तीदिन साजरा करावा, यासाठी तत्कालीन काँग्रेस शासनावर दबाव आणणारे के. चंद्रशेखर राव तेलंगणचे मुख्यमंत्री झाल्यावर मात्र हा दिवस साजरा करण्यास विरोध करत आहेत. शासन स्वतः हा दिवस साजरा करणार नाही आणि राज्यात जर कुणी हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अटक करण्यात येईल, असा देशद्रोही निर्णय तेलंगणच्या शासनाने घेतला असल्याचा आरोप येथील प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे. निझामचे वंशज असणार्‍या एम्.आय.एम्. पक्षाचा हा दिवस साजरा करण्यास विरोध असून मुसलमानांची मते डोळ्यांसमोर ठेवून तेलंगण शासन हा देशद्रोह करत असल्याचे राजासिंह यांनी सांगितले. दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थिनींना हातांवरील मेंदी दगडाने घासून पुसण्यास भाग पाडले !

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेचा हिंदुद्वेष ! 
हिंदू संघटित नसल्यामुळे ख्रिस्ती शाळा हिंदु विद्यार्थ्यांवर दबाव
आणून त्यांच्या धर्माचरणाला विरोध करतात; परंतु अन्य धर्मीय विद्यार्थ्यांच्या
धर्माचरणाच्या विरोधात साधे बोलण्याचेही धाडस दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • हातांवरील राख्या तोडून फेकल्या
  • विद्यार्थिनींना अनेक घंटे उन्हात उभे रहाण्याची शिक्षा दिली
विद्यार्थिनीच्या मेंदीला विरोध, म्हणजे शाळेकडून धर्मांतराचा
प्रयत्न !
- केंद्रीय राज्यमंत्री आणि स्थानिक खासदार साध्वी निरंजन ज्योती
      शाळेचे काम हे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आहे. मात्र विद्यार्थिनींच्या हातावरील मेंदी काढायला सांगणे, हा ख्रिस्ती धर्माचा प्रसार आहे, तसेच हे हिंदु धर्मावरील आक्रमण असून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न आहे.
      कानपूर - शाळेत मेंदी लावून गेल्यामुळे फतेहपूर येथील सेंट मेेरी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिकेने हिंदु विद्यार्थिनींना त्यांच्या हातावरील मेंदी दगडाने घासून काढून टाकण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या हातांवरील राख्या तोडून फेकून दिल्या आणि काही घंटे उन्हात उभे रहाण्याची शिक्षा दिली. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास केल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

देहली पोलिसांकडून चर्च आणि मंदिर यांच्या सुरक्षेत भेदभाव

केंद्रीय गृहमंत्रालय आणि देहली पोलीस दोन्ही केंद्रशासनाच्या अखत्यारित
असतांना हिंदूंच्या प्रती त्यांच्यात समन्वय नसणे, हे बहुसंख्य हिंदूंसाठी लज्जास्पद !
केंद्रीय गृहमंत्रालयाचा हिंदुद्वेष्ट्या देहली पोलिसांवर आरोप
     नवी देहली - देहली पोलिसांनी चर्च आणि मिशनरी यांच्या चालवण्यात येणार्‍या अन्य संस्था यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कार्यवाही चालू केली आहे; परंतु मंदिरे आणि गुरुद्वारा यांसारख्या अन्य स्थळांच्या सुरक्षेविषयी मात्र मौन पाळले आहे, असे केंद्रशासनाच्या गृहमंत्रालयाने २ सप्टेंबर या दिवशी देहली उच्च न्यायालयासमोर सांगितले.
      देहलीत काही चर्चवर कथित आक्रमणे करण्यात आल्यानंतर देहली उच्च न्यायालयात ख्रिस्त्यांच्या धार्मिक अधिकारांच्या प्रकरणी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि नागरिक यांनी व्यक्त केला तीव्र संताप : १३ सप्टेंबरला पर्वणीच्या वेळी जनतेला कोणताही त्रास होणार नाही, असे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन

पहिल्या राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी पोलिसांकडून
झालेल्या सुरक्षेच्या अतिरेकाचे पालकमंत्र्यांच्या बैठकीत तीव्र पडसाद !
      नाशिक, ३ सप्टेंबर (वार्ता.) - २९ ऑगस्ट या दिवशी झालेल्या सिंहस्थपर्वाच्या पहिल्या राजयोगी (शाही) स्नानाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करत भाविक आणि स्थानिक जनतेचे प्रचंड हाल केल्याने ३ सप्टेंबरला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पुरोहित संघ, व्यापारी, पत्रकार आणि जनता यांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाची चांगली खरडपट्टी काढली. या वेळी नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, नाशिक महापालिका आयुक्त, महसूल आयुक्त, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे आणि अन्य पोलीस अधिकारी यांचे चेहरे अक्षरश: पडले होते.

मुलायमसिंह यांची जनता परिवाराला सोडचिठ्ठी !

बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - नुकत्याच स्थापन झालेल्या जनता परिवारातून समाजवादी पक्ष बाहेर पडला आहे. महायुतीत अपमान झाल्याने पक्षाच्या संसदीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी सांगितले. बिहार विधानसभा निवडणुकीत सपा स्वबळ पहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

युएईने दोन भारतियांना माघारी पाठवले

आय.एस्.आय.एस्.विषयी सहानुभूतीचा आरोप
      नवी देहली - युनायटेड अरब अमिरातने (युएईने) जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.च्या विचारधारेकडे आकर्षित झाल्याचा आरोप करत दोन भारतियांना परत भारतात पाठवले आहे. हे दोघेही भारतीय केरळ राज्यातील आहेत.

दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणार्‍या मुसलमानावर गुन्हा नोंद करा ! - डॉ. तोगाडिया

विहिंपने केवळ मतप्रदर्शित न करता असा कायदा करण्यास शासनाला भाग पाडावे, हीच हिंदूंची अपेक्षा !
      नवी देहली - दोनपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालणार्‍या मुसलमानांना रेशन, रोजगार आणि शैक्षणिक आदींमध्ये मिळणार्‍या सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा बंद करण्यात याव्यात, तसेच त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात यावा, असे परखड मत विश्‍व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रविण तोगाडिया यांनी मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रात एका लेखाच्या माध्यमातून त्यांनी हे मत मांडले. शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार मुसलमानांच्या लोकंसंख्येतील वाढीचा दर अधिक असल्याचे उघड झाले होते. यालाच डॉ. तोगाडिया यांनी लोकसंख्या जिहाद (पॉप्युलेशन जिहाद) असे नाव दिले. हा जिहाद वेळीच रोखणे आवश्यक असून सध्या हीच वेळ आल्याचे त्यांनी या लेखात म्हटले आहे.

तलाक पद्धतीत कुठलाही पालट करण्याची आवश्यकता नाही ! - ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

'हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान आहे', असा कांगावा करून 
 हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या तथाकथित स्त्रीमुक्तीवादी आता गप्प का ? 
  • मुसलमानांमध्ये दोन मतप्रवाह ! 
  •  चिघळण्याची शक्यता !

तलाकसंबंधीच्या जाचक निर्बंधामुळे पती-पत्नीची ताटातूट ! - हाजी महंमद सलिस 
      हाजी महंमद सलिस म्हणाले, "या झटपट 'तलाक'मुळे ९० टक्के पुरुषांवर पश्‍चात्ताप करण्याची वेळ आली आहे. घटस्फोटानंतर मुसलमान पुरुषाला इच्छा असूनही त्याची पत्नी आणि मुले यांंकडे जाता येत नाही, तसेच धर्मातील जाचक निर्बंधांमुळे पती-पत्नीची ताटातूट होते. त्यामुळे तोंडी तलाकविषयी पुनर्विचार करण्यात यावा."

न्यायालयीन सुनावणीच्या वेळी कुख्यात गुंडाला बुटांची खरेदी करण्यासाठी नेणारे ११ पोलीस निलंबित !

गुंडांची बडदास्त राखणार्‍या पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना कारागृहात डांबा ! 
निरपराध नागरिकांवर
दंडुके उगारणारे आणि गुंडांचा
बडदास्त राखणारे गुंडप्रेमी पोलीस !
 

    देहली - सध्या तिहार कारागृहात असणारा कुख्यात गुंड मनोज बक्करवाला याला न्यायालयीन सुनावणीनंतर परत कारागृहात नेतांना बुटांची खरेदी करण्यासाठी नेणार्‍या ११ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये देहली सशस्त्र पोलीसदलातील ६ आणि आग्रा पोलीसदलातील ५ पोलिसांचा समावेश आहे. (असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? गुंडांच्या दावणीला बांधलेले हे पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक होय ! - संपादक) 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ८३० लाचखोर अटकेत


लाचखोरांना कठोरात कठोर शासन करणे आणि धर्मशिक्षण देणे, हाच भ्रष्टाचार थांबवण्याचा सर्वोत्तम उपाय !
      पुणे, ३ सप्टेंबर - राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या ९ मासांमध्ये ८३० जणांना अटक केली आहे. मागील वर्षी ऑगस्ट २०१४ मध्ये ५२, तर या वर्षी आतापर्यंत ८१ गुन्ह्यांत लाचखोरांना शिक्षा झाली आहे. लाच घेण्याच्या घटनांमध्ये महसूल आणि पोलीस विभाग आघाडीवर आहेत. राज्यातील विविध न्यायालयांत ३ सहस्र ७५६ खटले अद्याप प्रलंबित आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित राहिल्यामुळे लाचखोरांना शिक्षेचे भय राहिलेले नाही. तरी भाजप शासनाने लवकरात लवकर प्रलंबित खटले काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. - संपादक)

सनदी लेखापालांच्या माध्यमातून गणेश मंडळांनी हिशोबपत्रक सादर करावे !

धर्मादाय आयुक्तांनी अल्पसंख्याकांच्या मशिदी किंवा चर्च
यांच्याकडून अशा प्रकारे हिशोबपत्रक सादर करण्यासंबंधी आदेश दिले आहेत का ?
बीड येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे आदेश
      बुलढाणा, ३ सप्टेंबर - सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक कार्यासाठी जमा केलेल्या वर्गणीचा सदुपयोग होत नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने यंदाच्या गणेशोत्सवापासून गणेश मंडळाचे हिशोबपत्रक सनदी लेखापालांच्या माध्यमातून सादर करावे, असे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या अवास्तव व्ययाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार धर्मदाय आयुक्तांकडे मंडळाच्या नोंदणीप्रसंगी अध्यक्ष आणि सचिव यांनी त्यांचे स्थायी खाते क्रमांक (पॅनकार्ड), तसेच अन्य ओळखपत्र देणे बंधनकारक केले आहे.

शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करण्यापेक्षा एका पात्रात दूध ओतण्याचा आग्रह

शिवमंदिरातील पुजार्‍याकडूनच धर्मशास्त्रविरोधी कृती !
      पुणे, ३ सप्टेंबर (वार्ता.) - येथील धनकवडी भागात असणार्‍या एका शिवमंदिरातील पुजार्‍यांकडूनच धर्मशास्त्रविरोधी संकल्पना उचलून धरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करतात. तेथील पुजारी मात्र अभिषेकाचे दुधाचे पाट वाया जातात, असे सांगत भाविकांना एका पात्रात दूध काढून ठेवण्याचा आग्रह करत आहेत. या संदर्भात पुजार्‍यांना त्यांची कृती अयोग्य असल्याचे एका धर्मप्रेमीने लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले, पात्रातील दूध आम्ही सायंकाळी हरिपाठ म्हणण्यासाठी येणार्‍या भाविकांना देतो. हे दूध कोणाच्या तरी मुखात जात असल्याने वाया जात नाही. (शिवपिंडीवर दूध घालण्यामागे धर्मशास्त्र आहे. ते जाणून न घेता अयोग्य संकल्पना सुचवणार्‍या पुजार्‍यांवरूनच समाजाला धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होेते. - संपादक)

(म्हणे) महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दिकचे साहाय्य घेऊ !

राष्ट्र आणि धर्म द्रोही पुरुषोत्तम खेडेकरांचे हार्दिकशी
मेतकूट हे हिंदूंना विघटित करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्रच !
      मुंबई - राष्ट्र आणि धर्म द्रोही पुरुषोत्तम खेडेकर यांनी गुजरातमध्ये पटेल समूहाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या आणि त्यासाठी मोदींना आव्हान देणार्‍या हार्दिक पटेलला १ सप्टेंबर या दिवशी पाठिंबा घोषित केला. मी त्याच्या संपर्कात असून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठीही त्याचे साहाय्य घेता येईल का, हे पाहिले जात आहे, असे त्यांनी सांगितले. (हिंदूंमध्ये जातीजातींत फूट पाडण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांकडून पैसे मिळतात, हे पोलिसांनाही माहीत असलेले उघड गुपित आहे. यावरून मोदींना अडचणीत आणण्यासाठी हार्दिक यांनी केलेले आंदोलनही या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचाच भाग असल्याचे कुणाला वाटल्यास नवल ते काय ? - संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदने

महापौरांना निवेदन देतांना कार्यकर्ते
अकोला येथे महापौरांना निवेदन
      अकोला - श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापौर सौ. उज्ज्वला देशमुख यांना २ सप्टेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. त्यांनी स्वीय साहाय्यकाला या संदर्भात पुढील उपाययोजना करण्यास सांगितले.

गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोेतातच विसर्जन व्हावे !

पत्रकार परिषदेत बोलतांना डावीकडून श्री. धर्माधिकारी आणि श्री. तांदळे
हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेत मागणी
      पुणे, ३ सप्टेंबर (वार्ता.) - प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच महापालिका प्रशासन आणि ढोंगी पर्यावरणवादी वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणास उत्तरदायी ठरवतात. गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे.

शान-ए-पाकिस्तान कार्यक्रम रहित करा - पलूस येथे तहसीलदारांना निवेदन

पलूस येथे तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     पलूस (जिल्हा सांगली), ३ सप्टेंबर (वार्ता.) - १० ते १२ सप्टेंबर या काळात देहली येथे आयोजित केलेला शान-ए-पाकिस्तान हे प्रदर्शन आणि एक शाम पाकिस्तान के नाम ही कव्वाली रहित करावी, या मागणीसाठी येथे तहसीलदार श्री. मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री रवींद्र यादव, गणेश मानुगडे, आेंकार पाटील, रोहित माने, आनंदराव साळुंखे, चेतन गायकवाड, संतोष पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शशिकांत जोशी, गणेश बुचडे, रवी कुंभार यांसह अन्य उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी संपूर्ण चातुर्मासात एकदाच जेवण घेतात !

पंतप्रधान मोदी यांचे धर्मपालन ! 
     नवी देहली - सध्या चातुर्मास असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपवास चालू असून ते दिवसातून एकदाच जेवण घेतात. मराठी मासांप्रमाणे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो. यावर्षी हा मास २७ जुलै पासून प्रारंभ झाला आहे आणि २२ नोव्हेंबर पर्यंत रहाणार आहे. त्यामुळे हे चार मास मोदी उपवास पाळतात. मिळालेल्या माहितीनुसार या मासाच्या शेवटी ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. त्या काळातही ते उपवास चालूच ठेवणार आहेत. मोदी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रातही उपवास करतात. चातुर्मास हा आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक काळ असल्यामुळे हिंदूंकडून या काळात अधिक प्रमाणात आध्यात्मिक कार्य केले जाते.

श्री पद्मनाभस्वामी मंदिरात धार्मिक विधींना १० ऑक्टोबरपासून प्रारंभ

     थिरूवनंतपुरम् (केरळ) - येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात अल्पासी सणाला १० ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून त्यानिमित्त होणारा 'मान्नुनिरुकोराल' हा तांत्रिक विधी ७ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवस 'प्राकारशुद्धी', 'बिम्बाशुद्धी', 'होमकलशम्', 'तत्त्वहोमम्', 'तत्त्व कलशम्', आणि 'ब्रह्म कलशम्' हे विधी होणार आहेत. मुराजपाम् या विधीच्या वेळी काही दिवस मंदिराच्या भोवताली मिरवणुकीने प्रदक्षिणा घालून 'सिवेली' हा विधी करण्यात येणार आहे. या वेळी मंदिरातील मूर्ती सोन्या-चांदीने मढवलेल्या रथात बसवून मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी १३ ते २२ ऑक्टोबर, असे १० दिवस निश्‍चित करण्यात आले आहेत.

केरळ राज्यातील मंदिराच्या संवर्धनासाठी भारताला युनेस्कोचे पारितोषिक !

शासनाने एका मंदिरासाठी पारितोषिक मिळाले; म्हणून पाठ थोपटून 
घेऊ नये, तर असे प्रयत्न शासनाच्या कह्यात असलेल्या सर्वच मंदिरांसाठी करावेत ! 
     कोची - केरळ राज्यातील थ्रीसूर येथे असलेल्या श्री वडक्कूनाथन् या मंदिराच्या संवर्धनासाठी अत्युत्तम प्रयत्न केल्याविषयी भारत शासनाला युनेस्कोकडून वर्ष २०१५ चे 'सर्वोत्कृष्ट पारितोषिक' मिळाले आहे. या मंदिराची आशिया-प्रशांत वारसा पारितोषिकासाठी निवड झाली आहे. 

कोलाथूर (तमिळनाडू) येथील मंदिरात ग्रंथालयाचे उद्घाटन !

     चेन्नई - कोलाथूर येथील सेल्वा विनयगर मंदिरात अलीकडेच ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ग्रंथालयात सनातन संस्थेचे तमिळ आणि इंग्रजी या भाषांतील अध्यात्म विषयावरील ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी यांनी मंदिराच्या विश्‍वस्तांना ग्रंथ सोपवले. यावेळी मंदिराच्या विश्‍वस्तांनी ग्रंथालयाचे दायित्व योग्यरित्या सांभाळण्याचे आश्‍वासन दिले. या प्रसंगी मंदिरात अनेक भाविकांची उपस्थिती होती.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईची बारकाईने स्वच्छता करण्याचे आयुक्तांचे आदेश

असे आदेश का द्यावे लागतात ? अधिकारी नियमित काम नीट करत नाहीत का ?
      मुंबई - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईचे केवळ रस्तेच नव्हे, तर गल्लीबोळही लख्ख करा, असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी १ सप्टेंबर या दिवशी पालिका अधिकार्‍यांना दिले. मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून मुंबईकरांना समान वाटप होईल, या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असेही आदेश त्यांनी दिले. पालिकेचे उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुख यांच्यासमवेतच्या बैठकीत मुंबईत लागू करण्यात आलेली पाणीकपात, साफसफाई, रस्त्यांची स्थिती आदींविषयी मेहता यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली. फेरीवाल्यांविषयी ते म्हणाले की, फेरीवाले मुंबईकरांना त्रासदायक ठरत असतील, तर कोणाचीही गय करू नका. फेरीवाल्यांविरुद्ध चालू असलेली कारवाई अधिक तीव्र करा, असे अजोय मेहता यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

पिंपरी येथील राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नगरसेवकांची हत्या

      पिंपरी - येथील राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्यावर ३ सप्टेंबरला दुपारी दोन अज्ञातांनी चाकूने भोसकून आक्रमण करत हत्येचा प्रयत्न केला; मात्र कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला. रुग्णालयात उपचारांच्या कालावधीत टेकवडे यांचा मृत्यू झाला. हे आक्रमण गुन्हेगारी संबंधांतून करण्यात आले, अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर ८ घंट्यांतच शेतकर्‍याची आत्महत्या

काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यातही शेतकर्‍यांच्या आत्महत्या चालूच !
ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      उस्मानाबाद - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे दौर्‍याच्या काळात येथे येऊन गेल्यानंतर ८ घंट्यांतच लक्ष्मण पाटील या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. त्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री दौर्‍यावर आहेत. या आत्महत्येच्या घटनेवरून दुष्काळाची दाहकता किती भीषण आहे, हे लक्षात येते.

गुन्हेगार आणि अभिनेता संजय दत्तने घेतली खोटे कारण सांगून संचित रजा

कारागृह प्रशासनाची दायित्वशून्यता कि भ्रष्ट कारभार ?
      मुंबई, ३ सप्टेंबर - कारागृह प्रशासनाच्या दायित्वशून्यपणामुळे गुन्हेगार आणि अभिनेता संजय दत्त याला संचित रजा मिळाली असल्याची गोष्ट समोर आली आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या वार्तेनुसार मागील आठवड्यात अभिनेता संजय दत्त याला त्याचा मुलीच्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी १ मासाची संचित रजा दिली आहे; पण प्रत्यक्षात तिची शस्त्रक्रिया ४ मासांपूर्वीच झाली असल्याचा उल्लेख त्या वार्तेमध्ये करण्यात आला आहे.

इस्लामपूरचे नामकरण ईश्‍वरपूर करण्यासाठी ठराव करा, अन्यथा जनआंदोलन ! - शिवसेनेचे निवेदन

     ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), ३ सप्टेंबर (वार्ता.) - औरंगाबाद शहराच्या धर्तीवर इस्लामपूरचे नामकरण ईश्‍वरपूर करण्याविषयी नगरपालिकेच्या सभेत ठराव करावा, अन्यथा जनआंदोलन करावे लागेल, असे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक श्री. आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना देण्यात आले. याचप्रकारचे निवेदन शिवसेना मिरज शहरच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री चंद्रकांत मैगुरे, किशोर भोरावत, आेंकार जोशी, दिलीप नाईक, रवी नाईक, चंद्रकांत पाटील, तात्या परदेशी उपस्थित होते. (इस्लामपूरचे नामकरण ईश्‍वरपूर करण्यासाठी आंदोलनाची चेतावणी देणार्‍या शिवसेनेचे अभिनंदन ! - संपादक)

रशियामध्ये नवीन मशीद उभारण्यावर कायद्याने बंदी

भाजप शासन रशियाकडून बोध घेईल का ? 
रशियात मशीद उभारण्यावर बंदी घातली जाते, तर भारतात 
अनधिकृत मशिदींनाही हात लावण्याचे धाडस शासनाकडून होत नाही ! 
     मॉस्को (रशिया) - मॉस्को नगरपरिषदेने नवीन मशीद उभारण्यावर कायद्याने बंदी आहे, तसेच इस्लामशी संबंधित इमारतींच्या बांधकामावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे, असे मॉस्को शहराचे महापौर सेरजे सोब्यनीन यांनी सांगितले. 

चीनमध्ये 'क्रॉस हटवा' मोहिमेला प्रारंभ

'क्रॉस हटाव' मोहिमेवरून चीन शासनाची 
सतर्कता लक्षात येते. भारतातील साम्यवादी 
आणि ख्रिस्ती मिशनरी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
अशी मोहीम भारतातचालवण्याचा विचार तरी कोणी करू शकतो का ?
  बीजिंग - साम्यवादी चीनच्या वेनजाव शहरातील सर्व चर्चच्या छतांवरील क्रॉस काढण्यासाठी येथील प्रशासनाकडून 'क्रॉस हटवा' मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. याकरता येथील चर्चला समयमर्यादा देण्यात आली आहे. 

आय.एस्.आय.एस्.कडून २ सहस्र वर्षांपूर्वीचे जुने मंदिर उद्ध्वस्त

हिंदूंनो, आपला धर्म आणि संस्कृती यांचे आय.एस्.आय.एस्.च्या 
संकटापासून रक्षण करण्यासाठी संघटित होऊन आताच प्रयत्न करा ! 
सिरियातील ऐतिहासिक पालमिरा शहरातील घटना 
     दमास्कस - सिरियातील ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पालमिरा शहरातील २ सहस्र वर्षांपूर्वीचे जुने 'टेम्पल ऑफ बेल' हे प्राचीन मंदिर आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेने पूर्णत: उद्ध्वस्त केल्याचे उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रांमधून स्पष्ट झाले आहे. 

पाकव्याप्त काश्मीरमधील ९९ टक्केे लोकांना 'भारतीय' व्हायचे आहे !

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या भावना लक्षात 
घेता हा भाग भारतात घेण्यासाठी मोदी शासन प्रयत्न करील का ? 
पाकव्याप्त काश्मीरमधील मौलाना सैयद अथर दहलवी यांचे प्रतिपादन 
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतात सत्ता आल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरच्या ९९ टक्के लोकांना पाकिस्तानपासून वेगळे होऊन भारतात विलीन व्हायचे आहे, असे प्रतिपादन पाकव्याप्त काश्मीरच्या अंजुमन मिनहास ए रसूल या संघटनेचे अध्यक्ष मौलाना सैयद अथर दहलवी यांनी केले आहे. 

वर्ष १९५६ पासून श्रीलंकेत १ लक्ष ४७ सहस्र तमिळी हिंदूंचा वंशविच्छेद

ज्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी भारतातील जम्मू-काश्मीर, पाक, 
बांगलादेश येथील हिंदूंचा नरसंहार रोखला नाही, ते श्रीलंकेतील तमिळींचा
 नरसंहार काय रोखणार ? भारतासह जगभरात होणारा हिंदूंचा नरसंहार 
रोखण्यासाठी कठोर पावले उचलून मोदी शासन राष्ट्र आणि धर्म प्रेम दाखवणार का ? 
     कोलंबो - श्रीलंकेला १९४८ मध्ये ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्ष १९५६, १९५८, १९७१, १९७८ आणि २००७ ते २००९ या काळात श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली नागरिक आणि सिंहली सैन्य यांनी १ लक्ष ४७ सहस्र तमिळी हिंदूंचा वंशविच्छेद केला, असे कॅनडामध्ये वास्तव्य करणारे श्रीलंकेतील तमिळींचे प्रतिनिधी कुमार रसिंगम् यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

नेपाळमध्ये नवीन घटनेच्या संदर्भातील आंदोलनाच्या वेळी झालेल्या पोलीस गोळीबारात १ ठार, ४ घायाळ

     बिरगंज (नेपाळ) - तराई मधेस या जमातीने नेपाळची नवीन घटना आणि त्यातील राज्यशासन पद्धत याविरुद्ध पुकारलेल्या अनिश्‍चित बंदच्या १६ व्या दिवशी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात युनायटेड डेमोक्रॅटीक मधेसी फ्रंट या पक्षाचा कार्यकर्ता दिलीप चौरासिया ठार झाला, तर इतर चौघे घायाळ झाले आहेत. 

नेपाळमध्ये जनाई (जानवे) पौर्णिमा उत्साहात साजरी !

     
     काठमांडू - २६ ऑगस्ट या दिवशी नेपाळमध्ये जनाई (जानवे) पौर्णिमा, म्हणजे रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ज्यांचा व्रतबंध झाला आहे, अशा हिंदु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे जानवे पालटण्यात येते आणि त्यांच्या उजव्या मनगटावर पवित्र धागा बांधण्यात येतो. 'या पवित्र धाग्याने भाग्योदय होतो', अशी हिंदूंची श्रद्धा आहे. हा धागा दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढण्यात येतो. या प्रसंगी ललितपूर जिल्ह्यातील कुंभेश्‍वर येथे आणि रासुवा जिल्ह्यात गोसाविकुंड येथे मोठ्या यात्रा भरतात.

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील होकायंत्र न चालणारे ठिकाण असणार्‍या प्राचीन कातळशिल्पांचे संशोधन होणार !

प्राचीन हिंदु संस्कृतीतील विज्ञान म्हणजे तथाकथित विज्ञाननिष्ठांना चपराक !
     राजापूर - तालुक्यात समुद्रकिनार्‍यांना समांतर अशी अनेक प्राचीन कातळशिल्पे आहेत. देवाचे गोठण्यातील रावणाचा माळ येथे असलेल्या एका कातळशिल्पाच्या परिसरात होकायंत्र लावले असता ते चालत नाही, असेही आढळून आले आहे. येथे विखुरलेल्या दोनशेहून अधिक कातळशिल्पांनी आणि त्यावरील अज्ञात लिपीने संशोधकांना अस्वस्थ केले आहे. जानेवारी २०१५ मध्ये शहापूर येथे झालेल्या कोकण इतिहास परिषदेमध्ये वैज्ञानिक पद्धतीने कातळशिल्पांचे सर्वेक्षण करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. त्याप्रमाणे आता या कामी काहींनी पुढाकार घेऊन काम चालू केले आहे. तालुक्यातील अनेक कातळशिल्पे काळाच्या ओघात गावांतील रस्त्यांमध्ये विरली आहेत, तर काही आंब्याच्या बागांनी उद्ध्वस्त झाली आहेत. काही शिल्पांना धक्के बसले आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, तुमच्या धर्माचरणाच्या आड येण्याचे धाडस कुणी करणार नाही, असे संघटन उभारा !
      शाळेत मेंदी लावून गेल्यामुळे फतेहपूर येथील सेंट मेेरी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिकेने हिंदु विद्यार्थिनींना त्यांच्या हातावरील मेंदी दगडाने घासून काढून टाकण्यास भाग पाडले, त्यांच्या हातांवरील राख्या तोडून फेकल्या.

हिंदु धर्मजागृतीच्या महान कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा ! - खासदार श्री. हेमंत गोडसे

डावीकडून प्रदर्शन सांगतांना श्री. विनय पानवळकर, त्यांचे
शेजारी नाशिकचे खासदार श्री. हेमंत गोडसे, मागे अन्य व्यक्ती
     नाशिक, ३ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु धर्मजागृतीचे हे महान कार्य आपण दायित्वाने करत आहात. तुमचे कार्य आणि उपक्रम यांना मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. या कार्याला केव्हाही आणि कोणतेही साहाय्य करू करू शकतो, असे आश्‍वासक उद्गार नाशिक शहराचे खासदार श्री. हेमंत खोडसे यांनी काढले. सिंहस्थ पर्वानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथे लावलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या भव्य प्रदर्शनास त्यांनी सहकार्‍यांसमवेत भेट दिली. या वेळी ते बोलत होते. आधुनिक जगताच्या आणि विज्ञानाच्या मागे धावतांना आपण आपली महान संस्कृती आणि धर्म यांना विसरत आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या वेळी सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. 

दाभोलकरांचे मारेकरी शोधण्याचे काम संतांचे नसून शासकीय यंत्रणांचे ! - महंत डॉ. बिंदूजी महाराज

महंत शिवानी दुर्गा यांनी दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यासाठी तांत्रिक अनुष्ठान प्रारंभ केल्याचे प्रकरण !
    
     नाशिक, ३ सप्टेंबर (वार्ता.) - नरेंद्र दाभोलकर हे धर्मविरोधी आणि साधू-संतांना त्रास देणारे होते. त्यामुळे त्यांना साहाय्य करण्याचा प्रश्‍नच येत नाही. दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांचे अधिकारी शासनाचे वेतन घेत आहेत. त्यामुळे मारेकरी शोधण्याचे काम शासकीय अन्वेषण यंत्रणांचे असून संतांचे नाही, असे अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ता तथा पीठाधिश्‍वर महंत डॉ. बिंदूजी महाराज यांनी सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी गेली दोन वर्षे झाले, तरी सापडत नसल्याने त्र्यंबकेश्‍वर येथील शैव संप्रदायातील महंत साध्वी शिवानी दुर्गा या डॉ. दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यासाठी पहिल्या पर्वणीस्नानानंतर तांत्रिक अनुष्ठान प्रारंभ करणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. याविषयी महंत डॉ. बिंदूजी महाराज बोलत होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Fatehpurke Christi conventme Hindu ladkiyonko
mehandi laganese mili saja.
kya aisi himmat anya dharmiyonke bareme ye shalae dikhaegi ?
जागो !
फतेहपूर के ख्रिस्ती कॉन्वेंट में हिंदु लडकियों को मेहंदी लगाने से मिली सजा !
क्या ऐसी हिंमत अन्य धर्मियों के बारे में ये शालांए दिखाएगी ?

प्रदर्शन पाहून मन प्रसन्न झाले ! - नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम

आयुक्त श्री. गेडाम यांचा सत्कार करतांना पू. (कु). स्वाती खाडये
      नाशिक - कुंभनगरीत सिंहस्थपर्वा निमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री. प्रवीण गेडाम यांनी २ सप्टेंबर या दिवशी भेट दिली. हे प्रदर्शन अत्यंत चांगले असून ते पाहिल्यावर मन प्रसन्न झाले, असा अभिप्राय श्री. गेडाम यांनी प्रदर्शन पाहून झाल्यावर दिला.

तीर्थक्षेत्रांपेक्षा संत महत्त्वाचे असणे

आजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे साधू-संतांचे महत्त्वही 
कळत नाही. त्यांच्यासाठी हे विशेष सदर !
१. तीर्थयात्रा - साधू-संतांची आणि इतरांची तीर्थांना पावित्र्य देण्यासाठी संत तीर्थयात्रा करतात आणि तीर्थांचे पावित्र्य मिळवण्यासाठी इतर तीर्थयात्रा करतात.
१ अ. संत-महापुरुषांचे चरणच खरे महातीर्थ ! - माता राजराजेश्‍वरी देवी 
१ आ. तीर्थक्षेत्रांपेक्षा संत अधिक महत्त्वाचे आहेत; कारण ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतात आणि साधनाही सांगतात. 
१ इ. तीर्थक्षेत्री स्नान करणे, संतांचे दर्शन आणि सद्गुरुप्राप्ती
    तीरथ नहाये एक फल, संत मिले फल चार । सद्गुरु मिले अनंत फल, कहत कबीर विचार ॥
अर्थ : तीर्थात स्नान केले तर एक पट फळ, संतांचे दर्शन झाले तर चार पट फळ आणि सद्गुरु मिळाले तर अनंत पटींनी फळ मिळते, असे संत कबीरदास म्हणतात.

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरील लक्षवेधी कार्यक्रमात धर्मद्रोही विधानांना डॉ. उदय धुरी यांचे परखड प्रत्युत्तर !

डॉ. उदय धुरी
घटनेची अंमलबजावणी न करणारे शासनच हिंदूंच्या घुसमटीस उत्तरदायी ! - डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती
     मुंबई - धार्मिक भावना दुखावल्या जाऊनही घटनेची अंमलबजावणी न करणारे शासनच हिंदूंच्या घुसमटीस उत्तरदायी आहे. दायित्व असूनही गुन्हेगारांना, धर्मद्रोह्यांना शासन न करणार्‍या शासनालाच फाशीची शिक्षा द्यायला हवी, असे स्पष्ट मत हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले. ३१ ऑगस्ट या दिवशी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरील लक्षवेधी या कार्यक्रमात डॉ. कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात विवेक या नियतकालिकाचे ममाजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार तथा विश्‍लेषक श्री. सुनील तांबे आणि कॉ. अजित अभ्यंकर हे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी केले.

चूक आणि सुधारणा

      ३ सप्टेंबर २०१५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या दैनिकाच्या पृष्ठ ७ वर रामनाथी आश्रमात पू. (सौ.) माई नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ..... अनमोल संत संग! या लेखातील ५ आ. या सूत्रातील आता पू. मेनरायकाका यांचे हृदयाचे ठोके मिनिटाला ७० एवढे असून हिमोग्लोबिनचे प्रमाण १३ एकक झाले आहे. हे वाक्य आता पू. मेनरायकाका यांचे हृदयाचे ठोके मिनिटाला ५७ एवढे असून हिमोग्लोबिनचे प्रमाण १३ एकक झाले आहे., असे वाचावे. चुकीबद्दल क्षमस्व ! या चुकीसाठी उत्तरदायी साधक प्रायश्‍चित्त घेत आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या अन्याय्य वागणुकीविषयी पालकमंत्र्यांच्या बैठकीत दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने मांडले परखड मत !

श्री. अरविंद पानसरे
    पत्रकाराची भूमिका जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी दुसरी बैठक बोलावली होती. त्या वेळी दैनिक सनातन प्रभात आणि हिंदु वार्ता ही इंटरनेट वाहिनी यांच्या प्रतिनिधींना सिंहस्थपर्वाचे पास (ओळखपत्र) देतांना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या अन्यायाविषयी मुंबई येथील मंत्रालयातील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. अरविंद पानसरे यांनी सांगितले, मी दैनिक सनातन प्रभातचा पत्रकार असून सिंहस्थपर्वाचे वृत्तसंकलन करण्यासाठी मुंबईहून येथे आलो आहे. माझ्याकडे महाराष्ट्र शासानाने दिलेले अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून परिचयपत्र आहे. दैनिक सनातन प्रभात जिल्हास्तरीय वृत्तपत्र नसून राज्यस्तरीय वृत्तपत्र आहे.

काँग्रेस आणि भाजप शासनामध्ये भेद नाही. अल्पसंख्यांकांना दिलेल्या पैशातून जिहादी पोसले जाणार नाहीत, तर देशभक्त पोसले जातील, याची खात्री भाजप शासन देणार का ?

      अल्पसंख्यांकांसाठी असलेली आर्थिक तरतूद दुप्पट करण्याचा निर्णय १०.२.२०१५ या दिवशी केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला. राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि वित्त महामंडळासाठी पूर्वी १ सहस्र ५०० कोटी रुपयांची तरतूद होती. ही तरतूद वाढवून ती ३ सहस्र कोटी रुपये करण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणारे सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये संगणक अन् भ्रमणसंगणक यांची आवश्यकता !

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात यथाशक्ती हातभार लावण्याची अमूल्य संधी !
     हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय शीघ्रतेने साकार होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, तसेच उत्पादने आणि सनातन प्रभात नियतकालिके या माध्यमांतून जनसामान्यांमध्ये राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भात जागृती केली जाते. राष्ट्र-धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले संगणक आणि भ्रमणसंगणक यांचा वापर केला जातो.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
     हिंदु राष्ट्राची स्थापना स्वार्थी नेत्यांनी भरलेले राजकीय पक्ष नाही, तर सर्वस्वाचा त्याग करणारे साधकवृत्तीचे राष्ट्र आणि धर्म प्रेमीच करू शकतात. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

कारागृहांची सुरक्षा धोक्यात !

     महाराष्ट्रातील कारागृहांच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांची १ सहस्र ३६६ पदे भरण्यातच आलेली नाहीत, तसेच कारागृह सुरक्षेसाठी पोलिसांच्या वतीने २०१३-१४ मध्ये करण्यात आलेल्या सुरक्षेच्या तपासणीतील सूत्रांचीही (सिक्युरिटी ऑडीट) अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. चालू वर्षात नव्याने कारागृहांचे सिक्युरिटी ऑडीट करण्याचे केवळ आदेश जारी करण्यात आले आहेत. काही कुप्रसिद्ध गुंडांच्या टोळ्यांचे गुंड कारागृहात आहेत. असे असतांना कारागृहांची सुरक्षा किती जय्यत असायला हवी, हे राज्याच्या गृहविभागाला वेगळे सांगायला नको. तरीही विशेष कृती पथकाची स्थापना करण्याची गेल्या दोन वर्षांपासूनची मागणी अजूनही विचाराधीन आहे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ पुरवण्याच्या उद्देशाने प.पू. श्रीराम महाराज यांनी प.पू. दास महाराज यांना दिलेल्या जपमाळेची पिप या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

साधकांनो, संतांनी दिलेल्या वस्तूंचे वैज्ञानिक उपकरणाद्वारे सिद्ध 
झालेले महत्त्व जाणून त्यांच्याप्रती कृतज्ञ रहा !
प.पू. दास महाराज
     राजस्थान येथील प.पू. श्रीराम महाराज यांनी महाराष्ट्रातील प.पू. दास महाराज यांना हिंदु राष्ट्र लवकर यावे, यासाठी करावयाच्या नामजपासाठी १०८० मण्यांची माळ दिली आहे. या माळेचा तिच्या सभोवतालच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. या चाचणीतून संतांनी दिलेल्या वस्तूंचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येईल. 
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश 
   एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दमप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

प.पू. दास महाराज यांची जपमाळ हातात घेतल्यावर व्यक्तीवर होणारे सूक्ष्मातील परिणाम

सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता : ८० टक्के
सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : १० टक्केे- (प.पू.) डॉ. जयंत आठवले
सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण 
चांगली स्पंदने : ५ टक्के 

प.पू. दास महाराज नामजपासाठी वापरत असलेल्या जपमाळेची एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

पू. (सौ.) योया वाले
      हे सूक्ष्म-परीक्षण करतांना जपमाळ प.पू. दास महाराजांची आहे, हेपू. (सौ.) योया वाले यांना ठाऊक नव्हते. यामुळे सर्वत्र एक संत असा उल्लेख आहे. 
सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता : ८० टक्के
सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : १० टक्केे - (प.पू.) डॉ. जयंत आठवले

आनंदी आणि हसतमुख असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुडाळ येथील चि. मोक्षदा मिलिंद पारकर (वय ९ मास) !

चि. मोक्षदा पारकर
१. जन्मापूर्वी 
     प्रसूतीगृहात बाळाच्या जन्माआधी भुंगे असणे; पण बाळाच्या जन्मानंतर फुलपाखरे येणे : चि. मोक्षदाच्या जन्माच्या एक दिवस आधी तिची आई सौ. मधुरा हिला प्रसूतीगृहात दाखल केले होते. तेव्हा तेथे भुंगे आणि इतर कीटक होते; पण मोक्षदाच्या जन्मानंतर तेथे ४ - ५ फुलपाखरे आली आणि ती दुसर्‍या दिवशीही येत होती. - सौ. भक्ती उपेंद्र महाजन (मोक्षदाची आत्या), कल्याण, ठाणे.
२. जन्मानंतर 
२ अ. सहनशीलता : चि. मोक्षदा हिच्यासाठी तिच्या जन्माच्या अकराव्या दिवशी उदकशांत विधी करण्यात आला. तेव्हा घरात यज्ञाचा पुष्कळ धूर कोंडला होता. आम्हाला धुरात रहाणे जमत नव्हते. मोक्षदाला धुराचा त्रास होऊ नये, यासाठी आम्ही इकडून तिकडे हलवत होतो; मात्र उदकशांत पूर्ण होईपर्यंत ती पूर्ण शांत होती. एरव्ही तिने शी केली, तर ती लगेच रडायची; परंतु विधीच्या कालावधीत शी करूनही ती शांत राहिली. विधी पूर्ण झाल्यानंतर तिने शी झाल्याची रडून आम्हाला जाणीव करून दिली. - सौ. भक्ती उपेंद्र महाजन

दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. डॉक्टरांची चौकट वाचल्यावर सनातनच्या व्यापक कुटुंबाविषयी विश्‍वास वाटणे आणि प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मरूपात सदैव आधार देणे

श्रीमती सौदामिनी कैमल
      २८.९.२०१४ या दिवशी दैनिकात प.पू. डॉक्टरांची सनातनचे व्यापक कुटुंब या संदर्भातील चौकट वाचल्यावर मला तसा अनुभव आला असल्याने भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझा मुलगा श्री. नंदकुमार (श्री. नंदकुमार कैमल) प्रसारानिमित्त सतत वेगवेगळ्या ठिकाणी जातो. गेले वर्षभर तो कोचीन सेवाकेंद्रात आहे. सेवाकेंद्रातील सर्व साधक माझी काळजी घेतात. गेली ८ वर्षे मी त्रिचूरला घरी राहून प.पू. गुरुदेवांना अपेक्षित साधना करण्याचा प्रयत्न करत होते. प.पू. डॉक्टर मला सूक्ष्मरूपात सदैव आधार देतात. नंदकुमार उपायांसाठी रामनाथीला जातो, तेव्हा सेवाकेंद्रातील सर्व साधक माझी माझ्या मुलाप्रमाणेच काळजी घेतात. प.पू. डॉक्टरांचे एक वाक्य नेहमी माझ्या मनात येते की, तुम्ही या सर्व साधकांची आई आहात. आता एकटे रहायचे नाही. शेवटपर्यंत आश्रमातच रहायचे आहे. मला आता कसलीच अपेक्षा नाही. सनातनचे साधक मला आणि माझ्या मुलाला अंतर देणार नसून आम्हाला संाभाळणार, असा विश्‍वास मला वाटतो. गुरुदेवंाना मी शरणागत भावाने त्यांच्या चरणी अर्पण करते.
     प.पू. डॉक्टरांची चौकट वाचून मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. यासाठी ईश्‍वर चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
- श्रीमती सौदामिनी कैमल, केरळ (३०.९.२०१४)

सौ. विमल माळी यांना गुरुकृपेने सुचलेल्या कृष्णमय कविता

सौ. विमल माळी
     जळगाव येथील सौ. विमल माळी (रामनाथी आश्रमातील कु. संध्या आणि कु. कुशावर्ता माळी यांची आई) यांचा श्रावण कृष्ण पक्ष सप्तमी (४.०९.२०१५) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना सुचलेल्या कविता येथे देत आहोत.
सौ. विमल माळी यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
                                          गुरुकृपेने सारी 
                                    सृष्टी कृष्णमय झाली ।
            कृष्णा, तुझी बासरी किती सुरीली ।
             मोहिनी हिने मज घातली ॥ १ ॥

व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या जोडीने अधिकाधिक धर्मकार्य करणारे शिबिरात सहभागी झालेले धर्माभिमानी !

     वर्ष २०१५मध्ये प्रथमच खालील धर्माभिमानी रामनाथी आश्रमात झालेल्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी सर्वांचा परिचय चालू असतांना सर्व आपले पूर्व परिचितच आहेत, असे वाटून सार्‍यांची भावजागृती होत होती. सार्‍यांमध्ये सेवाभावी वृत्ती आणि प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ श्रद्धा जाणवली. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. धर्मप्रसाराची तळमळ असलेले श्री. सुनील पांडे, तेलंगण !
१ अ. धर्मप्रसाराची तळमळ : धर्मप्रसार व्हायला हवा, गुरुदेवांनी सांगितल्यानुसार पुष्कळ लोकांपर्यंत समितीचे कार्य पोचायला हवे, अशी त्यांना तळमळ आहे. ते वैयक्तिक कामानिमित्त गुजरातमधील इडर येथे गेले होते. तेथे त्यांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा प्रसार व्हावा, या तळमळीने ठिकठिकाणी संपर्क केले. त्यामुळे तेथील अनेक चांगल्या धर्मप्रेमींशी यांचा परिचय झाला.

गुरुप्रसादापुढे अमृतही भासे मज फिके ।

२६ जुलै या दिनी तू पाठवलेला खाऊ (प्रसाद) पोहोचला ।
आभाळाएवढा आनंद होता त्या प्रसादात ।
नेत्र अन् रसना तृप्त झाली प्रसाद चाखण्यात ॥ १ ॥
सांग ना राणा, या कृपा-प्रीतीचे कारण ।
कर ना देवा, आमच्या प्रश्‍नाचे निवारण ॥ २ ॥
गुरुपौर्णिमेच्या आधीच झाली कशी
स्वानंदाची बरसात ।
देवाच्या मागोमाग भक्ताची
पावले पडावीत सात ॥ ३ ॥

मराठी व्याकरणाच्या अभ्यासवर्गात मराठी भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास कसा करावा ?, हे शिकतांना साधिकेच्या मनाच्या स्थितीविषयी झालेले चिंतन

      मी २७.३.२०१५ या दिवशी मराठी व्याकरणाच्या अभ्यासवर्गात बसले होते. त्या वेळी मराठी भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास कसाकरावा ?, यासंदर्भात कु. सुप्रिया नवरंगे मार्गदर्शन करत असतांना कोणते वाक्य उच्चारल्यावर अधिक चांगले वाटते ?, याविषयी प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी माझ्या मनात हे मला ठाऊक आहे, असा अहंयुक्त विचार आला. नेमके त्याच वेळी कु. सुप्रिया नवरंगे म्हणाली, प.पू. डॉक्टर आपल्याला नम्र आणि सौम्य भाषेत लिहायला शिकवतात. लेखनाच्या माध्यमातून ईश्‍वराच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी संस्कृतमधून आलेल्या शब्दांचा वापर करायला हवा. भाषेमध्येेच ईश्‍वर असतो. आपले लिखाण ईश्‍वराला आवडायला हवे., ते ऐकल्यावर माझा अहं पूर्णपणे गळून गेला.
      भाषेविषयी साधनेच्या दृष्टीने असा विचार करता येतो, याची जाणीवही मनाला कधी झाली नव्हती. ती जाणीव प.पू. डॉक्टरांनी करून दिल्यामुळे भावजागृती झाली आणि माझे मन हलके होऊन आनंदी झाले. नवीन विचार मिळाल्याने माझे मन आनंदाने भारावून प.पू. डॉक्टरांप्रती आपोआप कृतज्ञता वाटली, तसेच कु. सुप्रियाताई भावपूर्ण सांगत असल्याने तिच्याविषयीही कृतज्ञता वाटली. प.पू. डॉक्टरांनी अनुभूती देऊन मन आनंदी केल्यामुळे त्यांच्या चरणी अनंत कोटीकृतज्ञ आहे.
- सौ. मनीषा केळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०१५)

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणार्‍या धर्मद्रोह्यांचे
बेगडी पर्यावरणप्रेम उघड करणारे हस्तपत्रक उपलब्ध !
      श्री गणेशमूर्ती विसर्जनातील काही अशास्त्रीय प्रथांच्या विरोधात प्रबोधन करण्यासाठी बनवलेले ए-५ आकारातील गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणार्‍या धर्मद्रोह्यांनो, सांडपाण्यामुळे वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे लक्ष द्या ! हे हस्तपत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. या हस्तपत्रकाचा पुढील कारणांसाठी वापर करू शकतो.
१. श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या संदर्भातील विविध स्तरांवरील बैठकांत सांडपाणी आणि पशूवधगृह (कत्तलखाने) यांद्वारे होणार्‍या जलप्रदूषणाचे भीषण वास्तव समोर आणणे
२. धर्मशिक्षणाअभावी मूर्तीदान करण्याच्या कांगाव्याला बळी पडणार्‍या हिंदूंचे प्रबोधन करणे
सदर हस्तपत्रकासाठी प्रायोजक मिळवून त्याचे सुयोग्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात वितरण करावे.
महत्त्वाची सूचना
      सदर हस्तपत्रके ही मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांसाठी निरनिराळ्या तीन प्रकारांत बनवण्यात आली आहेत. हे हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणी त्या-त्या विभागाच्या नावाने उपलब्ध आहे. सदर हस्तपत्रकात आपल्या आणि आपल्या जवळच्या जिल्ह्यांचे नाव आहे ना, याची निश्‍चिती करून आपल्या जिल्ह्याशी संबंधित हस्तपत्रकाच्या मुद्रणाचे नियोजन करावे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे
एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर
होतो आणि घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.
     भावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो ... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमरझालेला असतो.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनुष्याची बलवान शस्त्रे !
      जीवनसंग्राम यशस्वी करण्याकरता अनेक शस्त्रांची आवश्यकता असते; पण सर्वांत बलवान शस्त्रे म्हणजे धैर्य आणि योग्य वेळ हीच होत !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदूंचे विघटन आणि मणीपूर दंगल !

     ३१ऑगस्टला मणीपूरमधील चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेल्या दंगलीत पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार, तर ३१ जण घायाळ झाले. जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. या दंगलीत ५ आमदारांचीही घरे जाळण्यात आली. मणीपूर दंगलीची माहिती पसरू नये, यासाठी शासनाने १ सप्टेंबरपासून इंटरनेट सेवा बंद केली. येथील मूळ नागरिकांना तेथे बाहेरून येणार्‍यांपासून संरक्षण मिळावे, या संदर्भातील ३ विधेयके येथील विधानसभेत पारीत करण्यात आली. त्यावरून ही दंगल उसळली. वरवर पहाता हे काहीतरी स्थानिक कारण आहे, असे कोणालाही वाटू शकते; परंतु भारतात सर्वत्र होणार्‍या दंगलींप्रमाणेच मणीपूरची ही दंगलही एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग असल्याचे सिद्ध होण्यास पुरेसा वाव आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn