Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनच्या साधकाला अटक होताच प्रसारमाध्यमांच्या सनातनद्वेषाला उधाण !

       कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात संशियत असल्याचे सांगत पोलिसांनी १६ सप्टेंबर या दिवशी सनातनचे सांगली येथील साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केली. या अटकेचे वृत्त पोलिसांनीच प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर लगेचच सर्व प्रसारमाध्यमांनी सनातनच्या विरोधात मोहीम उघडली. प्रसारमाध्यमांकडून सनातनला झोडपण्याचा जो अश्‍लाघ्य प्रयत्न झाला, त्याविषयी काही उदाहरणे येथे देत आहोत. 
१. वृत्तपत्रे 
१ अ. दैनिक लोकमत
१. १८ सप्टेंबरच्या कोल्हापूर आवृत्तीत पृष्ठ १ वर समीरनेच गोळ्या झाडल्याचा संशय अशा मथळ्याखाली वृत्त दिले आहे, तर संकेतस्थळावर समीरनेच गोळ्या झाडल्या, असे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (याला म्हणतात पीतपत्रकारिता! पोलिसांच्या अन्वेषणात काय स्पष्ट झाले, ते पोलिसांनी अधिकृतरित्या सांगण्यापूर्वीच जनतेला खोटी माहिती देणारे लोकमत ! - संपादक)
२. १८ सप्टेंबरच्या पृष्ठ ८ वर तू एक दिवस साहसपूर्ण काम करशील, असे विधान एका ज्योतिषाने समीर यांची कुंडली पाहून केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 
(१. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे छापून स्वतःचे वितरण वाढवण्यासाठी लोकमतने दिलेली ब्रेकिंग न्यूज ! 
२. आता लोकमतवाल्यांनी श्री. गायकवाड यांची कुंडली त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली, याची माहितीही वाचकांना द्यावी . 
३. एकीकडे ज्योतिष थोतांड आहे, असे म्हणणार्‍यांच्या बातम्या छापून स्वतःला पुरोगामी वृत्तपत्र म्हणवून घ्यायचे आणि दुसर्‍या बाजूने असे वृत्त छापायचे हा दुटप्पीपणा झाला ! 
४. लोकमतवाल्यांना कॉम्रेड पानसरे यांची हत्या हे साहसपूर्ण काम वाटते का ? पानसरे यांच्या अनुयायांनी याविषयी लोकमतवाल्यांना जाब विचारावा ! - संपादक) 
१ आ. दैनिक दिव्य मराठी 
१. १७ सप्टेंबरच्या अंकात श्री. गायकवाड यांच्या अटकेच्या वृत्ताला पहिल्या पानावर स्थान देतांना पानसरे हत्येमागे सनातन असा सनातनद्वेषी मथळा दिला. प्रत्यक्षात पोलिसांनी कोणत्याही प्रकारे सनातन संस्थेचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगितलेले नव्हते. (यावरून केवळ सनातनची अपकीर्ती करण्यासाठीच हा खोडसाळपणा करण्यात आल्याचे स्पष्ट होते. - संपादक)
१ इ. दैनिक पुढारी 
१. १७ सप्टेंबरच्या अंकात पनवेलमधील सनातन संस्थेवर छापा या मथळ्याखाली सनातन आश्रमाच्या छायाचित्रासह खोटे वृत्त प्रसिद्ध केले. (प्रत्यक्षात अशा प्रकारचा कोणताही छापा टाकण्यात आलेला नाही. - संपादक)
२. न्यायालयात आणल्यानंतर समीर गायकवाड निर्विकार चेहर्‍याने बसून होता, अशा आशयाची चौकट वृत्तपत्राने पृष्ठ १ वर प्रसिद्ध केली. (ज्या संशयितास अधिवक्ताही मिळू दिलेला नाही, ज्याला एखाद्या प्रकरणात गोवले गेले आहे, तो निर्विकार चेहर्‍याने बसेल कि हसत-खिदळत बसेल ? साध्या गोष्टींचा अभ्यास नसतांना शब्दच्छल करून केवळ सनातनविषयी समाजमन कलुषित करणारी अशी वृत्तपत्रे लोकजागृती काय करणार ? - संपादक)
३. १८ सप्टेंबरच्या अंकात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हत्येमागे एकच सूत्रधार असा मथळा देऊन वाचकांची दिशाभूल करण्यात आली होती.
४. १८ सप्टेंबरला समीरची पत्नी, मैत्रिणीसह चौघेजण ताब्यात अशा आशयाचे खोटे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (प्रत्यक्षात पोलिसांनी श्री. समीर गायकवाड यांच्या पत्नीची केवळ चौकशी करून रात्री त्यांना सोडून दिले. - संपादक)
१ ई. दैनिक जनप्रवास
१. १७ सप्टेंबरच्या अंकात या वृत्तपत्रात मिरज येथील सनातनच्या आश्रमाचे छायाचित्र छापून त्याला कुलूप होते. बाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता., असे वृत्त दिले. प्रत्यक्ष आश्रम उघडाच होता. (असे खोटे वृत्त प्रसारित करणारी वृत्तपत्रे समाजद्रोहीच ! - संपादक)
२. या अंकात हा आहे समीर गायकवाडचा इतिहास ! अशा प्रकारचा मथळा छापून सांगलीत गोडसे ते गायकवाड कट्टर हिंदुत्ववाद्यांची परंपरा ! अशा आशयाचे विपर्यस्त लिखाणही केले आहे.
१ उ. दैनिक तरुण भारत 
१. १७ सप्टेंबरच्या अंकात पृष्ठ १ वर सनातन संस्थेचा उल्लेख सनातन प्रभात संस्था असा चुकीचा करण्यात आला. 
२. पोलिसांनी पत्रकार परिषदेत श्री. गायकवाड यांच्या पत्नीचा प्रकरणाशी काही संबंध नसल्याने तिला कह्यात घेण्याचा किंवा तिची माहिती देण्याचा संबंध नाही, असे सांगितले होते. प्रत्यक्षात तरुण भारतच्या पृष्ठ ८ वर मात्र श्री. गायकवाड यांच्या वैयक्तिक गोष्टींना अनावश्यक प्रसिद्धी दिली होती. (उद्या श्री. गायकवाड निर्दोष ठरल्यास त्यांच्या झालेल्या अपकीर्तीचा भरपाई दैनिक तरुण भारत करून देणार का ? - संपादक)
१ ऊ. सामाईक सूत्रे 
१. अनेक वृत्तपत्रांनी अनेक धर्मद्रोह्यांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. 
२. काही वृत्तपत्रांकडून पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये अनावश्यक माहिती घुसडून आणि सनातनचे साधक निर्दोष सुटलेल्या स्फोटांचा उल्लेख करून सनातनची अपकीर्ती केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn