'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर करणारे लबाड खिस्ती

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवण्याचे कुकृत्य खिस्ती नेहमीच करत असतात. बेंगळुरूमध्ये तर एका हिंदूंच्या दृष्टीदोषाचा गैरफायदा घेऊन त्याचे खिस्ती धर्मात धर्मांतर केले आणि त्याला पाद्री बनवून त्याच्याकडून ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर केले; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याने त्या धर्मांतरित हिंदूचे प्रबोधन केल्यानंतर त्याने पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. हिंदु धर्मावर भयंकर आघात करणार्‍या खिस्त्यांची आणखी काही कारस्थाने जाणून घेऊया.
धूर्त ख्रिस्त्यांच्या षड्यंत्राला बळी पडून ख्रिस्ती पाद्री झालेल्या व्यक्तीला केवळ धर्मप्रबोधनाने स्वधर्मात परत आणणारा हिंदु जनजागृती समितीचा कार्यकर्ता !
श्री. मोहन गौडा
१. अंध व्यक्तीचा गैरफायदा उठवून त्यांचे  धर्मांतर करणारे लबाड खिस्ती
     ‘बेंगळुरूचे रहिवासी श्री. एम्.एस्. मनोजकुमार हे बेंगळुरू शहरातील हेब्बगुडी येथे रहातात. त्यांना जन्मापासूनच अंधत्व असल्याने ते शहरातील अंधांच्या शासकीय वसतीगृहात रहायचे. त्यांच्या या दृष्टीदोषाचा धूर्त खिस्त्यांनी गैरफायदा उठवला. त्यांना खिस्ती होण्यासाठी आमिष दाखवून लबाडीने त्यांचे खिस्ती धर्मात धर्मांतर केले. खिस्ती धर्मात प्रवेश केल्यानंतर काही दिवस खिस्ती पाद्री म्हणूनही त्यांनी काम केले आणि ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर केले.
२. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. जयंत यांनी खिस्त्यांची कुटिल कारस्थाने अन् हिंदु धर्माचे महत्त्व सातत्याने सांगितल्यावर मनोजकुमार यांनी खिस्ती धर्माचा त्याग करून आता ते हिंदु धर्मानुसार आचरण करत असणे
     मध्यंतरीच्या काळात त्यांचे नातेवाईक श्री. जयंत यांच्या हे लक्षात आले. श्री. जयंत हे रिक्शाचालक असून ते हिंदु जनजागृती समितीचेही कार्य करतात. श्री. जयंत यांनी खिस्त्यांची कुटिल कारस्थाने आणि हिंदु धर्माचे महत्त्व त्यांना सातत्याने सांगितले. तसेच खिस्ती धर्मात अनुत्तरित असलेल्या त्यांच्या  प्रश्नांची उत्तरेही दिली. श्री. जयंत यांनी खिस्त्यांविषयी सांगितलेली माहिती आणि त्यांनी अनुभवलेले खिस्ती जीवनाचे स्वरूप त्यांच्या लक्षात आले. तसेच ते खिस्त्यांच्या दुर्जनतेलाही कंटाळले होते. त्यामुळे श्री. जयंत यांनी दिलेल्या धर्मशिक्षणाने समाधानी होऊन त्यांनी खिस्ती धर्माचा संपूर्णपणे त्याग केला. आता ते हिंदु धर्मानुसार आचरण करतात. तसेच अन्य अंध हिंदूंनीसुद्धा खिस्त्यांच्या कुटिल कारवायांना बळी न पडता हिंदु धर्माचे महत्त्व समजून घ्यावे; म्हणून ते आता `समर्पणा हिंदु सेवाकेंद्र' या संस्थेला सोडचिठ्ठी देऊन सनातन संस्थेचे हिंदु धर्माचरणाविषयीचे ग्रंथ अंध भाषेत रूपांतरित करून त्यांना हिंदु धर्माचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.
३. हिंदु धर्मावर भयंकर आघात करणार्‍या खिस्त्यांच्या कारस्थानी बुद्धीविषयीचे काही अनुभव
३ अ. हिंदु देवता आणि प्रसाद यांच्या संदर्भात चुकीची माहिती सांगून धर्मांतर करणे :
हिंदूंच्या पवित्र सणांच्या दिवशी धूर्त खिस्ती खायचा प्रसाद अंधांच्या शाळेत घेऊन येतात. एके दिवशी त्यांनी हिंदु देवतांचा प्रसाद आणला आणि सर्व अंधांना एकत्रित करून त्यांना कुंकवाचा प्रसाद दिला. तेव्हा तेथील अंध हिंदूंनी तो कुंकवाचा प्रसाद कपाळाला लावला. तेव्हा तेथे जमलेले खिस्ती धर्म-प्रचारक कुत्सितपणे हसत सर्व अंधांची हेटाळणी करत म्हणाले, ‘`तुम्हाला हा प्रसाद हिंदु देवाचा आहे कि देवीचा आहे, हेही समजत नाही. आता आम्ही तुम्हाला खायचा प्रसाद दिला, तरी तुम्ही तो कपाळाला लावत आहात. अशा प्रकारे तुमच्या देवाचा प्रसाद असल्यामुळेच तुमचा अपमान झाला; पण आमच्या देवाचा प्रसाद घेतल्यास, प्रार्थना केल्यास तुमचा कुठलाही अपमान होणार नाही. चर्चमधे तुम्ही कसाही, कुठेही प्रसाद खाऊ शकता, प्रार्थना करू शकता. आमच्याकडे साधे नियम आहेत.’’
३ आ. ‘आमचा येशू दीन-दलितांचा, बुद्धीवाद्यांचा देव आहे; पण तुमचा हिंदु देव केवळ श्रीमंतांचा, पैसेवाल्यांचाच देव आहे’, असा अपप्रचार करणारे आणि त्यांना विविध आमिषे दाखवून नंतर चर्चमधे नेऊन खिस्ती धर्माची दीक्षा देणारे खिस्ती ! : पुढे ते म्हणाले, ‘‘आमचा येशू दीन-दलितांचा, बुद्धीवाद्यांचा देव आहे; पण तुमचा हिंदु देव केवळ श्रीमंतांचा, पैसेवाल्यांचाच देव आहे. तो निश्चितच गरीब लोकांचा देव नाही. आता तुम्हीच बघा, तुम्ही अंध असल्याने तुमच्या पालकांनी तुम्हाला घराबाहेर काढले; पण तुमची बहीण-भावंडे देहयष्टीने चांगले असतात; म्हणून त्यांना तुमचे पालक चांगली शिक्षण, चांगली नोकरी देऊन आणि सुंदर मुलगी पाहून त्यांचा विवाह करून देतात. तुम्ही दृष्टीहीन असल्यामुळेच तुमचा देवही तुम्हाला साहाय्य करत नाही; पण आमचा येशू तुम्हाला साहाय्य करील. तुम्हाला कपडे, साबण, पैसे, नोकरी, शिक्षण, एवढेच नाही, तर चांगली मुलगी पाहून विवाहही करून देईल.’’ असे गोड गोड बोलून त्यांना ‘तुम्हीही खिस्ती धर्मात या’, असे म्हणून अंधांच्या वसतीगृहात धर्मांतर करण्यासाठी त्यांचे मनःपरिवर्तन करतात.
     त्यांनी ते मान्य केल्यानंतर त्यांना चर्चमधे नेऊन खिस्ती धर्माची दीक्षा देऊन पुढे प्रत्येक रविवारी चर्चमधे न चुकता यायला सांगतात. एखादे वेळेस चर्चमधे येण्यास चुकल्यास, लगेच दुसर्‍या दिवशी खिस्त्यांचा घोळका त्यांच्या वसतीगृहात जाऊन ‘तुम्ही एक दिवस जरी चर्चमधे आला नाहीत, तर तुम्हाला आठवडाभर त्रास होईल’, अशा प्रकारची भीती आणि अनेक कारणे सांगतात. तसेच त्यांची बुद्धी भ्रष्ट करतात. (ब्रेनवॉश करतात.) एकदा ते चर्चमधे येऊ लागले की, महिन्यातून एकदा शिकवण्याचा कार्यक्रम असतो. इथे अशा अनेक अंधांच्या वसतीगृहांतील हिंदूंना एकत्रित करून त्यांना खिस्ती धर्माचे सामूहिकरित्या प्रबोधन करतात.
४. धर्मांतरासाठी अश्लीलता आणि लैंगिकता या हीन अस्त्रांचा वापर करणारे खिस्ती !
    बेंगळुरूच्या एका चर्चमध्ये महिन्यातून एकदा खिस्ती धर्मावर प्रेम करणार्‍या तरुणांना विशेष प्रार्थना करण्यासाठी बोलावतात. असे तरुण त्या चर्चमधे प्रवेश करतांना तेथील काही तरुणी त्या युवकांना धावत येऊन पाश्चात्त्यांप्रमाणे मिठी मारून, चुंबन देऊन प्रवेशद्वारात त्यांचे स्वागत करतात. अशा आकर्षणांना बळी पडून बरेचसे हिंदू तरुण अशा प्रार्थनांमधे सहभागी होतात. या प्रार्थनांमध्ये सहभागी होणार्‍यांना विशेष बिर्याणीचे जेवण नियमितपणे दिले जाते.
५. हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदुद्वेषाचे बीज रोवणे
     खिस्ती पाद्री हिंदूंचे सण नागपंचमी, गणेश चतुर्थी, कृष्णाष्टमी, रामनवमी, दिवाळी यांसारख्या सणांच्या वेळी खिस्त्यांच्या चर्चमधे येशूविषयी सांगायचे सोडून त्या वेळचा हिंदूंचा सण, देवता यांच्याविषयी खालच्या थराला जाऊन वाईट पद्धतीने बोलतात. देवांना शिव्या घालतात, तसेच त्यांचा उपहास इत्यादी करतात, उदा. गणेश चतुर्थी आली असता ‘हत्तीचे तोंड असलेल्याची, मोठ्या पोटवाल्याची हे पूजा करतात. हे किती मूर्खपणाचे आहे. हत्ती कधीतरी देव होणे शक्य आहे का ? गणेश सैतान आहे. सोळा सहस्र बायकांचे अपहरण करणार्‍या श्रीकृष्णासारख्या नीच व्यक्तीला हिंदू देव म्हणून पूजतात, हे योग्य आहे का ?’ (हे वाचून ज्यांचे रक्त सळसळत नाही, ते हिंदूच नव्हेत. हिंदूंनो, आणखी किती दिवस खिस्त्यांकडून होणारा हिंदु धर्म आणि देवता यांचा अपमान सहन करणार आहात ? - संकलक)
६. खिस्ती करत असलेले हिंदूंचे धर्मांतर हा त्यांचा पैसे कमवण्याचा एक धंदा !
६ अ. एका चर्चमधे एका पाद्र्याला एका वर्षात न्यूनतम १६ लोकांचे धर्मांतर करण्याचे ध्येय देत असणे :
विशेषतः एका चर्चमध्ये एका पाद्र्याला एका वर्षात न्यूनतम १६ लोकांचे धर्मांतर करण्याचे ध्येय देतात. या ध्येयापर्यंत पोहोचता न आल्यास त्याला पालटतात. या उद्देशासाठी सर्व ठिकाणची चर्च डोके वर काढत आहेत. सध्याच हुबळीतील एक खिस्ती नूतन नगरात एक चर्च उघडण्यासाठी प्रतिदिन महानगर पालिकेत महापौरांकडे जाऊन बसत असे; पण महापौर हिंदुत्ववादी असल्याने त्यांनी अनुमती दिली नाही. नंतर या खिस्त्याने पाच लाख रुपयांचे प्रलोभनही दाखवले, तरीही महापौरांनी अनुमती नाकारली.    
     (पाद्र्याला चर्च उघडण्यासाठी अनुमती नाकारणार्‍या महापौरांचे अभिनंदन ! त्यांचा आदर्श सर्वच शासकीय अधिकारी आणि मंत्री यांनी घेणे आवश्यक आहे. - संकलक)
६ आ. एका कार्यक्रमात लोकांना एकत्रित करून खिस्ती पंथाचा प्रसार करून त्यात भाग घेणार्‍या प्रत्येक व्यक्तीमागे चर्चकडून पैसे मिळवणारे पाद्री ! : सध्या बेंगळुरूच्या एका नगरात चर्चचा एक वरिष्ठ पाद्री येणार होता. तेव्हा तेथील स्थानिक पाद्र्याने आजूबाजूच्या तरुणांना बोलावले आणि विशेष पार्टीच्या नावाखाली त्या पाद्र्याचे खिस्ती धर्माचे भाषण ठेवले. याला तेथील स्थानिक हिंदूंनी विरोध केल्याने तो  कार्यक्रम रहित करण्यात आला. (खिस्त्यांचा धर्मांतराचा डाव ओळखून त्यांच्या कार्यक्रमाला विरोध करणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! असा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घेणे आवश्यक आहे. असे झाल्यासच खिस्त्यांचा धर्मांतराचा डाव हिंदूंना उधळता येईल. - संकलक) अशा कार्यक्रमात लोकांना एकत्रित करून खिस्ती पंथाचा प्रसार केल्यास त्या पाद्र्याला त्यात भाग घेणार्‍या प्रत्येक व्यक्तीमागे पैशांचा हिशोब करून एका मोठ्या रकमेची पावती चर्च देते.
७. हिंदूंच्या रिक्शात बसून हिंदु देवतांवर टीका करणारे आणि खिस्ती पंथात येण्यासाठी हिंदूंना विविध आमिषे दाखवणारे खिस्ती !
     बेंगळुरू शहरातील अनेक रिक्शाचालक आम्हाला भेटून सांगतात, ‘‘खिस्ती प्रवासी रिक्शात बसतात किंवा जास्त खिस्ती प्रवासी असतील, तेव्हा ते हिंदु देवतांवर टीका करतात आणि खिस्ती पंथात येण्यासाठी आमिष दाखवतात.’’ एके दिवशी एक टॅक्सी-चालक शहरातील एका खिस्ती कुटुंबाला दुसर्‍या गावी घेऊन गेला होता. सतत दोन दिवसांच्या प्रवासात त्या खिस्त्यांनी त्या हिंदु चालकाला ‘तू आमच्या पंथात ये, तुला वरदक्षिणा मिळेल, (विवाहासाठी) सुंदर मुलगी मिळेल, चांगली नोकरी तुला मिळवून देऊ’, असे बरेचसे आमिष दाखवले. अशा प्रकारे सध्या हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी लाखो खिस्त्यांचे जाळे कर्नाटकात पसरले असून ते व्यवस्थितपणे आणि बिनबोभाट धर्मांतराचे कार्य करत आहेत. हा उद्योग खोटेनाटे सांगून, फसवून, आमिष दाखवून चालला आहे. अनेक निरुद्योगी युवक या व्यवहारात पोटार्थी म्हणून काम करत आहेत.
१०. भोळ्या-भाबड्या हिंदूंना फसवण्यासाठी बेंगळुरूमधे अनेक चर्च पूर्वींची नावे पालटून आता ‘खिस्ती देऊळ, `ॐ खिस्ताय नमः ।' अशी नावे ठेवत आहेत आणि ती भिंतींवर लावत आहेत.
     हे सर्व थांबवण्यासाठी, खिस्त्यांच्या प्रत्येक हिंदूविरोधी कृत्याला सामोरे जाण्यासाठी हिंदूंनी `धर्मशिक्षण' घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्यांच्या या कट-कारस्थानांना शह देण्यासाठी अन् ती हाणून पाडण्यासाठी आता राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक असून हा कायदा आणण्यासाठी, संमत होण्यासाठी सर्वांनी नेटाने प्रयत्न करून शासनाला तो करण्यास भाग पाडले पाहिजे.’
 - श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi