![]() |
| पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार गुप्ता यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते |
होळीच्या निमित्ताने होणारी वाटमारी, इतरांच्या मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे अपप्रकार हे धर्महानीस कारणीभूत ठरतात. ते होऊ न देणे आणि त्यासाठी संबंधितांचे प्रबोधन करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. ‘होळीला वृक्षतोड होते’, या नावाखाली धर्मद्रोही संघटना आणि निधर्मी राजकारणी ‘वृक्ष तोडून होळी करण्याऐवजी वाईट विचारांची वा कचर्याची होळी करा’, अशी आवाहने करतात. यांना जनतेन भुलू नये.
धुलीवंदनाच्या दिवशी अनैसर्गिक रंगांचा वापर, रंगीत पाण्याचे फुगे मारणे, जबरदस्तीने रंग लावणे, मद्यधुंद अवस्थेत एकमेकांचे कपडे फाडणे, अंगविक्षेप करत बीभत्स नृत्य करणे, पाण्याच्या टाकीत रंग टाकून त्यामध्ये आपल्या मित्रांना बुडवणे, असे अपप्रकार होतात. हे अपप्रकार बंद व्हावेत यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. रेखा उंबरकर, सौ. संगीता ठाकरे, सौ. नीता देशमुख, सौ. सुनीता देशमुख, सौ. कडुकार, श्री. अभय कडुकार आणि श्री. विजय उंबरकर उपस्थित होते.
