'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर द्या !

       ‘गुजरात शासनाने जनतेला धार्मिक स्वातंत्र्य द्यावे’, असा प्रस्ताव भारतातील कुठल्या तरी विधानसभेत नव्हे, तर अमेरिकेच्या संसदेत मांडला गेला आहे. गुजरात आणि गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर कुठेही आरोप-प्रत्यारोप झाल्यावर काँग्रेस शासनाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. अमेरिकी संसदेत हा प्रस्ताव ठेवून भारताचे नव्हे, तर श्री. मोदी यांचे नाक कापले गेले, असे काँग्रेसला वाटत आहे.
त्यामुळे या प्रस्तावावर काँग्रेस शासनाने काहीच भाष्य केलेले नाही. श्री. मोदी यांना कलंकित करणे, म्हणजेच हिंदुत्ववाद्यांना कलंकित करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर चिखलफेक करणार्‍या अमेरिकेच्या विरोधात आघाडी उघडणे हिंदूंसाठी क्रमप्राप्त आहे. वास्तविक धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार यांवर अमेरिकेने काहीतरी भाष्य करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय ! अमेरिकेने लोकशाही प्रस्थापित करण्याच्या नावाखाली व्हिएतनाम, अफगाणिस्तान आदी देशांमधील जनतेच्या मानवाधिकारांची पायमल्ली केली. या प्रकरणांत ओबामा यांना अमेरिकी नागरिकांच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अमेरिकेने ज्या देशांशी युद्ध केले, तेथे पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी गौत्तानामो येथे कारागृह उभारले; मात्र त्या कारागृहात डांबलेल्या गुन्हेगारांवर लैंगिक, मानसिक आणि शारीरिक अत्याचारांची जी प्रकरणे उघड झाली, ती पाहून ते कारागृह नसून छळछावणीच होती, असे म्हणायला वाव आहे. दुसर्‍या बाजूने विचार केल्यास भारतातील एका राज्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत असतांना अमेरिकेच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? अमेरिकेने भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये चमचा ढवळण्यापेक्षा स्वतः मानवाधिकाराचे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे धडे गिरवले, तर त्याचाच लाभ अधिक आहे. अमेरिकेला भारताविषयी खरोखरंच कळवळा असेल, तर त्याने भोपाळमधील वायूगळती दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या अमेरिकी कंपनीच्या प्रमुखांवर कारवाई करण्याचा मोठेपणा दाखवावा. दुसरी बाब म्हणजे अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर म्हणून भारतीय संसदेत अमेरिकेच्या विरोधात प्रस्ताव सादर करणे, आवश्यक आहे. असे केले, तरच अमेरिकेच्या हिटलरशाहीला आळा बसेल.
हिंदु बांधवांना न्याय देण्याचे दायित्व हिंदूंचेच !
    अमेरिकी संसदेतील कीथ एलिसन नावाच्या एका महाभागाने हा प्रस्ताव संसदेसमोर ठेवला आहे. आता एलिसन यांना मुसलमानांविषयी एवढा कळवळा का, हे शोधण्याचा आरंभ केल्यावर एलिसन हे अमेरिकी संसदेमध्ये निवडून आलेले पहिले मुसलमान असल्याची माहिती पुढे आली. नाव खिस्ती; मात्र धर्म मुसलमान असा हा प्रकार आहे. या माहितीवरून हा प्रस्ताव सादर करण्यामागील त्यांचा कुटील हेतू हिंदूंच्या लक्षात येईल. गुजरात दंगलींचे भांडवल करून श्री. नरेंद्र मोदी यांची आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलीन करण्याचे काम अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’ , ‘कोअलिशन अगेन्स्ट जीनोसाईड’ (वंशविच्छेदाच्या विरोधात उघडलेली आघाडी) यांसारख्या संस्था गेली कित्येक वर्षे अमेरिकेत कार्यरत आहेत. २००५ साली अमेरिकेतील गुजराती समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्री. मोदी उपस्थित रहाणार होते; मात्र अमेरिकेत कार्यरत असलेल्या मुसलमानांच्या ‘लॉबी’मुळे त्यांना प्रवेश परवाना नाकारण्यात आला. असे एकदा नाही, तर दोनदा घडले. मुसलमानांच्या हितासाठी तेथील एक बाटगा मुसलमान संसदपटू त्याच्या संसदीय अधिकारांचा वापर करतो. या उलट अमेरिकेतील राजकीय वर्तुळात कार्यरत असलेले किती हिंदू गोध्रामधील त्यांच्या बांधवांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या अधिकारांचा वापर करतात ? बॉबी (पियूष) जिंदाल हे अमेरिकेतील पहिले भारतीय वंशाचे ‘गव्हर्नर’ आहेत. अमेरिकेतील राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्यांनी धर्मांतर केल्याचे ऐकिवात आहे. अमेरिकेतील हिंदु राजकारण्यांना स्वतःचे ‘हिंदु’पण नकोसे वाटते. गोध्रा हत्याकांड काय किंवा ओरिसा येथील दंगली काय, अमेरिकेत हिंदूंचे दुखणे समर्थपणे मांडणारा एकही मायेचा लाल तेथे नाही, हीच हिंदूंची शोकांतिका आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi