'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

साधकांना सूचना : सनातनच्या कला-विभागात प्रसारसाहित्य, सूक्ष्म-चित्र आणि ग्रंथ मुखचित्र यांच्या निर्मितीसाठी आपल्या साहाय्याची आवश्यकता !

सनातन संस्थेच्या उपक्रमांसाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या कलाकृती बनवण्याची सेवा सनातनच्या रामनाथी आश्रमातील कला विभागामध्ये करण्यात येते. या कलाकृती बनवण्यासाठी संगणकीय ज्ञान असलेल्या साधकांची आवश्यकता आहे. कला विभागात उपलब्ध असलेल्या सेवा आणि त्या सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये कोणते संगणकीय कौशल्य असणे आवश्यक आहे, ते पुढे कंसात दिले आहे. तसेच त्या सेवेसाठी कोणाला संपर्क साधावा, हेही त्या सेवेखालीच नमुद केले आहे. 
१. ग्रंथ मुखपृष्ठ आणि संकेतस्थळ कलाकृती यांची निर्मिती 
१. पुढील सहस्रो वर्षे मानवजातीला धर्मशास्त्राचे ज्ञान देणार्‍या ग्रंथांच्या मुखचित्रांची निर्मिती या विभागात करण्यात येते. ग्रंथांसाठी त्यांच्या विषयांनुसार मुखपृष्ठांची संकल्पना सुचवणे आणि ती प्रत्यक्षात ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालीत बनवणे अशी सेवा या विभागात करण्यात येते. 
२. अध्यात्मप्रसार करणार्‍या विविध संकेतस्थळांसाठी लागणारी चित्रे, संकेतस्थळांचे बॅनर आणि अन्य कलाकृती फोटोशॉप आणि ‘फ्लॅश प्लेअर’ या संगणकीय प्रणालींच्या साहाय्याने करण्यात येते.
२. सूक्ष्म-चित्र निर्मिती 
सूक्ष्म-चित्रे हे सनातनचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म-चित्रांच्या माध्यमातून दैवी शिक्षण मिळते आणि त्यातून परिणामकारक अध्यात्मप्रसार होतो. सनातनच्या सूक्ष्म-चित्रकार साधकांनी काढलेली आचारपालन, धार्मिक कृती, सण, साधना, देवता, संत, वाईट शक्ती आदी विषयांवरील ३ सहस्रांहून अधिक सूक्ष्म-चित्रे आहेत. ही सूक्ष्म-चित्रे ग्रंथ, ध्वनीचित्र-चकत्या आणि संकेतस्थळ यांवर घेण्यासाठी ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालीत बनवायची आहेत.
ग्रंथ मुखपृष्ठ आणि सूक्ष्म-चित्र निर्मिती यांसाठी संपर्क -
सौ. अवनी आळशी, 
भ्रमणध्वनी क्रमांक : ९४०४१४५१८०
इ-मेल पत्ता : granthseva@gmail.com
३. प्रसारसाहित्य निर्मिती 
सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य गतीमान करणारे प्रभावी माध्यम म्हणजे संस्थेचे प्रसारसाहित्य. हे प्रसारसाहित्य, तसेच सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची वेष्टने यांच्या कलाकृती बनवण्याची सेवा या विभागात चालते.
अ. पंचांग, वही, फ्लेक्स फलक, पत्रके, भित्तीपत्रके यांसारख्या प्रसारसाहित्याची संगणकीय संरचना कोरल ड्रॉ, पेजमेकर आणि फोटोशॉप या संगणकीय प्रणालींच्या साहाय्याने करण्यात येते. 
आ. कोरल ड्रॉ संगणकीय प्रणालीद्वारे जाहिरातींची संरचना करण्यात येते.
इ. कलाकृती बनवण्यासाठी आवश्यक असणारे लिखाण करण्याची सेवाही या विभागात होते. त्यासाठी मजकूर संकलन आणि भाषाविषयक ज्ञान आवश्यक आहे. 
कु. अंजली क्षीरसागर,
भ्रमणध्वनी क्रमांक : ८०८७९६४२७१
इ-मेल पत्ता : kalavibhag@gmail.com
जे साधक या सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करणे आवश्यक आहे. ज्या साधकांना वरीलपैकी कोणतीही संगणकीय प्रणाली हाताळण्याचे ज्ञान आणि रामनाथी आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करण्यास इच्छुक असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांच्या मार्फत संपर्क करावा.
ही सेवा करण्यास इच्छुक असलेल्या साधकांनी स्वतः बनवलेली एखादी कोणत्याही विषयावरची कलाकृती (आर्टवर्क) इ-मेलद्वारे पाठवून द्यावी.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi