गेल्या दोन वर्षांपासून मडगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणा सनातनच्या साधकांची नाहक छळवणूक करत आहेत. बाँबस्फोटांच्या प्रकरणी कोणताही साधक दोषी आढळल्यास त्याला जरूर शिक्षा करावी; मात्र साधक निर्दोष असतांना त्यांची नाहक छळवणूक होत असेल, तर ते अन्यायकारक आहे. साधकांची नाहक छळवणूक करणार्या आरक्षकांना हिंदु राष्ट्रात कडक शासन करण्यात येईल.