रविवारी चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मेगाब्लॉक
मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते अंधेरी या स्थानकांच्या दरम्यान येत्या रविवारी (५ फेबु्रवारी) सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या कालावधीत महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम होणार आहे. त्यामुळे या कालावधीत उपनगरीय गाड्यांच्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी एकही गाडी धावणार नाही, असे रेल्वेच्या अधिकार्यांनी घोषित केले आहे. या स्थानकांच्या दरम्यान महत्त्वपूर्ण भागांत अन्य वेळी १८३ बसगाड्या धावतात; मात्र मेगाब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी बेस्टच्या वतीने अतिरिक्त ८० बसगाड्यांची सुविधा करण्यात येणार आहे. या गाड्या अंधेरी बसस्थानक, वांद्रे पश्चिम बसस्थानक, आगरकर चौक, कलानगर, मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक आणि हुतात्मा चौक या ठिकाणांहून सुटतील.