चैत्र शु. प्रतिपदा कलियुग वर्षे ५११४ (२३ मार्च २०१२) या दिवशी हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत आहे. या शुभदिनी समस्त हिंदूंनी एकमेकांना हिंदु धर्माची महती सांगणारी आणि धर्मप्रेम वृद्धीगंत करणारे विचार प्रसुत करणारी शुभेच्छापत्रके पाठवल्यास हिंदूंची ही कृती हिंदुराष्ट्राच्या उभारणीस साहाय्यभूत अशी होऊ शकते.
यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, हिंदी आणि कन्नड या तीन भारतीय भाषांमध्ये शुभेच्छापत्रके उपलब्ध करण्यात येणार आहेत. राष्ट्र अन् धर्म यांबद्दलची गौरवास्पद चित्रे, माहिती आणि धर्माप्रति स्वाभिमान जागवणारी सुवचने असणारी ही शुभेच्छापत्रके रंगीत आहेत. मंडलांतील मुख्य वितरकांनी शुभेच्छापत्रकांची मागणी माघ कृ. २, कलियुग वर्ष ५११३ (८ फेब्रुवारी) या दिवशीपर्यंत नेहमीच्या पद्धतीने पाठवावी.
हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्थेच्या सर्व सेवकांनी या शुभेच्छापत्रकांची माहिती सत्संगातील साधक, धर्मशिक्षण वर्गातील हिंदु धर्माभिमानी, विज्ञापनदाते, प्रायोजक, हितचिंतक यांना देऊन, त्यांना ही शुभेच्छापत्रके उपलब्ध होतील, असे पहावे. खालील दोन प्रकारांत शुभेच्छापत्रके उपलब्ध असणार आहेत. तरी कृपया याप्रमाणे मागणी करावी.
प्रकार १ - सनातन संस्था
प्रकार २ - हिंदु जनजागृति समिती
आकार : ९ इंर्च x६ इंच,
अर्पण मूल्य : रु. ८/-
प्रकार १ - सनातन संस्था
प्रकार २ - हिंदु जनजागृति समिती
आकार : ९ इंर्च x६ इंच,
अर्पण मूल्य : रु. ८/-
घाऊक खरेदीसाठीचे दर
टीप : वितरकांना वरील सवलतीपेक्षा ५% सवलत अधिक होईल. तसेच ३५०० पेक्षा अधिक शुभेच्छापत्रकांची मागणी नोंदवणार्या वितरकांना ४० प्रतिशत सवलत देण्यात येईल.
मागणी कशी नोंदवावी ? : वितरकांनी ‘धर्मसेवा प्रतिष्ठान’ या न्यासाच्या ईआर्पीमध्ये मागणी नोंदवावी.
- श्री. निरंजन दाते, मागणी-पुरवठा विभाग
मागणी कशी नोंदवावी ? : वितरकांनी ‘धर्मसेवा प्रतिष्ठान’ या न्यासाच्या ईआर्पीमध्ये मागणी नोंदवावी.
- श्री. निरंजन दाते, मागणी-पुरवठा विभाग
