![]() |
| कु. तृप्ती गावडे |
साधना करतांना साधकात भाव निर्माण होणे महत्त्वाचे असते. तोच प्रगतीचा पहिला टप्पा असतो; कारण देव भावाचा भुकेला आहे. भाव निर्माण होऊ लागल्यावर पुढे प्रगती होण्यासाठी सतत देवाच्या अनुसंधानात रहाणे, त्यासाठी त्याला प्रार्थना करणे, त्याला विचारून आणि सांगून प्रत्येक कृती करणे अन् ‘तूच माझ्याकडून कृती करवून घे’, असे त्याला विनवणे, असे प्रयत्न करावे लागतात.
स्वयंपाकघरात सेवेला असलेली बेळगाव जिल्ह्यातील रामनगरची साधिका कु. तृप्ती गावडे (वय २३ वर्षे) हिच्यामध्ये भाव उपजतच आहे. तिचे सातत्याने देवाशी बोलणे, देवाला विचारून करणे असे चालू असते.
तसेच तिच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प असून आज्ञापालन, सेवाभाव, मनाची निर्मळता, प्रेमभाव, साधनेतील सातत्य, असे अनेक गुण आहेत; म्äहणूनच तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे. एवढेच नव्हे, तर ती केवळ ७ वीपर्यंत शिकलेली असूनही तिचे साधनेतील दृष्टीकोनही चांगले आहेत. यावरून व्यावहारिक शिक्षण आणि अध्यात्म यांचा काहीएक संबंध नसतो, हेही लक्षात येते. तिच्याविषयीच्या पुढील लेखातून तिचे सर्व पैलू उलगडतीलच शिवाय तो लेख वाचतांना आपणही भावावस्थेत गुंग झाल्याशिवाय रहाणार नाही.
तसेच तिच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प असून आज्ञापालन, सेवाभाव, मनाची निर्मळता, प्रेमभाव, साधनेतील सातत्य, असे अनेक गुण आहेत; म्äहणूनच तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे. एवढेच नव्हे, तर ती केवळ ७ वीपर्यंत शिकलेली असूनही तिचे साधनेतील दृष्टीकोनही चांगले आहेत. यावरून व्यावहारिक शिक्षण आणि अध्यात्म यांचा काहीएक संबंध नसतो, हेही लक्षात येते. तिच्याविषयीच्या पुढील लेखातून तिचे सर्व पैलू उलगडतीलच शिवाय तो लेख वाचतांना आपणही भावावस्थेत गुंग झाल्याशिवाय रहाणार नाही.
१. सेवेतून लक्षात आलेले पैलू
१ अ. पहिल्यांदाच एक सेवा करतांना त्यातील अडचणी दूर होण्यासाठी देवाला हाका मारणे
१ अ १. प.पू. डॉक्टरांनी सदर्याला इस्त्री करायला शिकवणे, नवीन सदरा इस्त्री करायला दिल्यावर भीती वाटणे, इस्त्री करतांना पाण्याचा फवारा बिघडला असल्याने देवाला हाका मारणे आणि पू. राजेंद्रदादांच्या माध्यमातून देवच साहाय्याला आल्याचे वाटणे : ‘श्रावण पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११३ (१३.८.२०११) या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या सदर्याला इस्त्री करायची राहिली होती. त्या वेळी मी अल्पाहार घेऊन गेले असतांना प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘तुला इस्त्री करायला येते ?’’ मी ‘‘हो’’ म्हणाले. त्यानंतर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘सदर्याला इस्त्री करायची राहिली आहे. करून आणशील ?’’ तेव्हा मला फार भीती वाटली की, मी नीट इस्त्री करीन का ? मग देवाला प्रार्थना केली आणि इस्त्री करायला गेले. तेव्हा तिथे एक ताई होती. त्या ताईच्या साहाय्याने मी सदर्याला इस्त्री केली. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘कोणाचे साहाय्य घेतलेस का ?’’ मी ‘‘हो’’ म्हणाले. मी प.पू. डॉक्टरांना सांगितले, ‘‘मला पोशाखाला इस्त्री करायला येते. सदर्याला येत नाही.’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘सोपं आहे.’’ मी म्हणाले, ‘‘आज संध्याकाळी दादा करतांना बघते आणि नंतर करते.’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘मी तुला इस्त्री करायला शिकवतो.’’ प.पू. डॉक्टरांनी पलंगावर सदरा पसरून कुठल्या बाजूने पहिल्यांदा आणि कशी करायची, ते शिकवले आणि संध्याकाळी एकदा करून बघ म्हणाले. मी संध्याकाळी दुसरा सदरा घेऊन गेले आणि इस्त्री करून प.पू. डॉक्टरांना दाखवला. ते म्हणाले, ‘‘सदर्याला इस्त्री चांगली केलीr. तुला दुसरापण सदरा देतो.’’ त्यांनी आणखी एक नवीन सदरा इस्त्री करायला दिला. तेव्हा मला भीती वाटत होती. नवीन सदरा असल्याने ‘नीट करीन का’, असे वाटले. देवाला प्रार्थना केली, ‘देवा, तूच ये आणि हा सदरा इस्त्री करून घे.’ इस्त्री करतांना पाण्याचा फवारा (स्प्रे) मारावा लागतो, तो बिघडला होता. मी सारखी देवाला हाका मारत होते. तेव्हा तेथे पू. राजेंद्रदादा आले आणि म्हणाले, ‘‘कोणाचा सदरा ?’’ मी म्हटले, ‘‘प.पू. डॉक्टरांचा.’’ तेव्हा त्यांनी मला फवारा नीट करून दिला. त्यामुळे इस्त्री करता आली. पू. राजेंद्रदादांच्या माध्यमातून देवच आला. आपल्याला जरी काही कळत नसले आणि आपण देवाला हाका मारल्या की, लगेच देव येतो आणि साहाय्य करतो, याची देवाने अनुभूती दिली.’
१ आ. प.पू. डॉक्टरांनी चूक दाखवून दिल्यावर ‘देवानेच चूक दाखवली’, असा भाव असणे
१ आ १. देवतांना दाटीदाटीने बसवल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितल्यावर आता पूजा झाल्याने उद्या नीट रचना करणार असल्याचे त्यांना सांगणे, लहानपणी खेळतांना देवांची पूजा करत असणे आणि गावाला गेल्यावर समवेत देवाचे चित्र नेत असणे अन् आता प्रत्यक्षात देवानेच जवळ ठेवले असणे : भाद्रपद कृ. अष्टमी, कलियुग वर्ष ५११३ (२१.९.२०११) या दिवशी सकाळी मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत प.पू. भक्तराज महाराज आणि इतर देवतांची पूजा करत होते. तेव्हा देवांची रचना गोल आकारात केली होती. मी पूजा करतांना देवतांना फुले वाहिली. देवतांना दाटीदाटीने बसवले असल्याचे माझ्या लक्षात न आल्याने प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘देवतांना दाटीदाटीने का बसवले ?’’ त्यावर मी त्यांना उत्तर दिले, ‘‘आता मी देवांची पूजा करून त्यांना आसनावर ठेवले आहे. मी उद्या त्यांची पूजा करतांना नीट फुले वाहून चांगली रचना करीन.’’ तेव्हा प.पू. डॉक्टर ‘‘बरं’’ म्हणाले. मी लहानपणी खेळतांना देवांची पूजा करायचे आणि कुठेही गावाला गेले की, देवाचे चित्र घेऊन जायचे. आता प्रत्यक्षात देवाची पूजा करायला मिळते आणि त्यामध्ये काही चुकले, तरी देवच (प.पू. डॉक्टरच) सांगतो. आता मी माझ्यासमवेत देवाचे चित्र न घेता देवानेच मला त्याच्या जवळ ठेवले आहे.
१ इ. चुकांतून शिकणे
१ इ १. चुका केल्यावर देवाला मार्ग काढावा लागत असल्याने प्रत्येक कृती त्याला विचारून करणे आवश्यक : ‘मार्गशीर्ष कृ. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (१२.१२.२०११) या दिवशी सकाळी मी अल्पाहार आणि दूध घेऊन प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेले. त्यांना उष्णतेचा त्रास होत असल्याने थंड दूध हवे; म्हणून मी ते शीतकपाटात ठेवले होते; पण ते पुष्कळ थंड झाले होते. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘दूध फार थंड असल्याने ते थोड्या वेळाने प्यावे लागेल.’’ ते ‘बरं’ म्हणाले. तेव्हा दुधाचा पेला पटलावर ठेवल्यावर २ मिनिटांतच ऊन आले आणि ते नेमके त्या पेल्यावर पडले. हे प.पू. डॉक्टरांच्या लक्षात आले आणि ते म्हणाले, ‘‘जेथे ऊन येते, तेथेच तू पेला ठेवलास.’’ मी म्हटले, ‘‘देवालाच काळजी आहे. थंड दूध प्यायल्याने दातांना त्रास होतो; म्हणून देवानेच पेल्यावर ऊन पाडले आणि देवानेच (प.पू. डॉक्टरांनी) मला दाखवले.’’
आपण चुका केल्यावर देवाला त्यातून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे ‘चूक होऊ नये; म्हणून प्रत्येक कृती देवालाच विचारून केली पाहिजे’, हे शिकायला मिळाले.’
१ इ २. मनात येणारा देवाचा विचार ग्रहण न केल्याने देवाला चूक सांगावी लागणे : ‘मार्गशीर्ष कृ. तृतीया, कलियुग वर्ष ५११३ (१३.१२.२०११) या दिवशी प.पू. डॉक्टरांची औषधे संपली होती. त्यांनी मला गोळ्या आणायला सांगितले. आधुनिक वैद्य (डॉ.) पिंगळेकाकांनी मला चिकित्सालयातून ६० गोळ्या उलट-सुलट बांधून दिल्या. दोन्ही बाहेरच्या बाजूंना गोळ्या असल्याने ‘गोळ्यांच्या पट्टीवर पाठच्या बाजूला लिहिलेले गोळ्यांचे नाव प.पू. डॉक्टरांना व्यवस्थित वाचता येणार नाही’, हे माझ्या लक्षात आले; परंतु मी त्या तशाच त्यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘दोन्ही बाजूंनी गोळ्यांची दिशा बाहेर असल्यामुळे गोळ्यांचे नाव वाचण्यास अडचण येते.’’ यावरून ‘माझ्या मनात आलेला विचार देवाचा होता आणि तो विचार ग्रहण करून सुधारणा केली असती, तर देवाला हे सांगावे लागले नसते’, हे माझ्या लक्षात आले.’
१ ई. सेवेची पद्धत - श्रीकृष्णाचे नामस्मरण करत आणि त्याला सांगून सेवा करणे
१ ई १. श्रीकृष्णाचा नामजप करत प्रसाद बनवल्याने तो चांगला होत असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे : मार्गशीर्ष शु. दशमी, कलियुग वर्ष ५११३ (४.१२.२०११) या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता मी सेवेनिमित्त प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेले. तेव्हा त्यांच्या खोलीत कु. पूनम साळुंखे त्यांना प्रसादाविषयी विचारत होती. थोड्या वेळाने आमच्यामध्ये पुढील संभाषण झाले.
प.पू. डॉक्टर : तू बनवलेला प्रसाद पूनमताईला आवडतो.
मी : तो तुमचा प्रसाद आहे; म्हणून ताईला आवडतो.
प.पू. डॉक्टर : बोलायला हुशार आहे ना !
त्यावर आम्ही तिघेही हसायला लागलो. नंतर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘ती श्रीकृष्णाचा नामजप करत प्रसाद बनवते ना; म्हणून तो चांगला होतो.’’
जेव्हा चांगले काही घडते, तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणतात, ‘‘श्रीकृष्णाने केले’’ आणि मी सांगते, ‘‘प.पू. डॉक्टरांनी केले.’’
१ ई २. साधकांनी सांगितलेले निरोप श्रीकृष्णाला सांगितल्यामुळे तो योग्य वेळी त्याची आठवण करून देत असणे : मार्गशीर्ष कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (११.१२.२०११) या दिवशी मी आणि प.पू. डॉक्टर यांच्यामध्ये पुढील संभाषण झाले.
प.पू. डॉक्टर : तुला सगळे लक्षात रहाते का ?
मी : हो. श्रीकृष्ण मला आठवण करून देतो; म्हणून माझ्या लक्षात रहाते. कोणी काही निरोप किंवा कोणती गोष्ट सांगितली, तर मी लगेचच श्रीकृष्णाला सांगते. त्यामुळे देव मला योग्य वेळी आठवण करून देतो.
एकदा एका ताईला निरोप द्यायचा होता. त्यासंदर्भात प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘तूही तिला सांग आणि मीही सांगतो. तुला श्रीकृष्ण आठवण करून देतो आणि मला कागदावर लिहिलेला मजकूर आठवण करून देतो. ’’
१ उ. सेवा करतांना देवाशी आणि सेवेतील घटकांशी मनातून बोलणे अन् प.पू. डॉक्टरांनी ते मनातील बोलणे ओळखणे
१ उ १. देवाला लिखाण केले नसल्याचे मनातून सांगताच प.पू. डॉक्टरांनी नेमके त्याविषयीच विचारून साधिकेचे साहाय्य घेण्यास सांगणे आणि देव स्थुलातून जरी बघत नसला, तरी त्याला सूक्ष्मातून सर्व कळत असल्याची अनुभूती येणे : आश्विन शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२८.९.२०११) या दिवशी प.पू. डॉक्टरांनी शिकायला मिळालेली सूत्रे लगेच लिहून द्यायला सांगितली होती. माझ्याकडून लगेच लिहून देणे झाले नाही. लिहिले नव्हते; म्हणून मला त्याचा ताण आला होता. मी देवाला सांगत होते, ‘देवा, मी काहीच लिखाण केले नाही.’ दुसर्या दिवशी मी प.पू. डॉक्टरांकडे गेल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुझे पुष्कळ लिखाण राहिले आहे ना ?’’ मी ‘‘हो’’ म्हणाले. प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘ताईचे साहाय्य घे आणि लिखाण पूर्र्ण कर.’’ तेव्हा मी ‘‘हो’’ म्हटले. दुसर्या दिवसापासून लिखाण चालू केले. देव स्थुलातून जरी आपल्याला बघत नसला, तरी देवाला सूक्ष्मातून सर्व कळते, याची अनुभूती आली.
१ उ २. प.पू. डॉक्टरांसाठी जेवण घेऊन जातांना ‘श्रीकृष्णालाच ते घेऊन जात आहे’, असा भाव ठेवून त्याच्याशी प्रतिदिन बोलत असणे आणि प.पू. डॉक्टरांना ते स्थुलातून न सांगता सूक्ष्मातून कळल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे : मी प्रतिदिन प.पू. डॉक्टरांना जेवण घेऊन जातांना श्रीकृष्णाशी बोलत जाते. प.पू. डॉक्टर मला त्यांच्याकडे गेल्यावर म्हणाले, ‘‘तू वरून खाली येतांना श्रीकृष्णाशी बोलत येतेस का ?’’ मी ‘‘हो’’ म्हणाले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तू श्रीकृष्णाशी काय बोलतेस, ते लिहून दे.’’ मी प.पू. डॉक्टरांकडे जेवण घेऊन जातांना असा भाव ठेवते की, मी श्रीकृष्णाला जेवण घेऊन जात आहे. तेव्हा त्याला म्हणते, ‘हे श्रीकृष्णा, तुझ्याजवळ मला व्यवस्थित जेवण घेऊन येता येऊ दे. वाटेत काही अडथळे येऊ देऊ नकोस. मी तुझ्या खोलीत येऊन जेवण वाढतांना मला खोलीतील चैतन्य, आनंद मिळेल. तू माझ्याशी बोलशील, हसशील आणि हा आनंद मग मी इतरांना देईन.’ प्रत्यक्षात तशीच कृती घडते आणि इतरांना आनंद देता येतो. हे सगळे प.पू. डॉक्टरांना स्थुलातून न सांगता सूक्ष्मातून कळल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचते.’
१ उ ३. लादीशी सूक्ष्मातून झालेला संवाद
प.पू. डॉक्टरांना कळणे, त्यांनी लादी हसत असल्याचे तुझ्यामुळे कळल्याचे गमतीने सांगणे आणि प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील निर्जीव वस्तूंकडून पुष्कळ आनंद मिळत असल्याचे जाणवणे : भाद्रपद शु. चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११३ (११.९.२०११) या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या खोलीची स्वच्छता राहिली होती. मी त्यांच्या खोलीची स्वच्छता करायला गेल्यावर तेथील वस्तू फारच आनंदित दिसल्या. मलाही त्यांना स्वच्छ करतांना पुष्कळ आनंद होत होता. मी केर काढून लादी पुसायला घेतली. मी लादीला म्हटले, ‘मी तुला स्वच्छ पुसते आणि तुझ्यावर पाय ठेवते. तुला काहीच वाटत नाही का ?’ त्यावर लादी म्हणाली, ‘तुम्ही माझ्यावर पाय ठेवणे, हाच आमचा आनंद आहे.’ त्यानंतर मला आणि लादीला आनंद झाला. हा आमचा सूक्ष्मातील आनंद प.पू. डॉक्टरांना कळला. त्यांनी स्थुलातून सांगितले, ‘‘तू लादी पुसलीस; म्हणून लादीपण हसते.’’ प.पू. डॉक्टर गमतीने म्हणाले, ‘‘मला ठाऊक नव्हते, लादीपण हसते. ते तुझ्यामुळे कळले.’’ त्यानंतर ते हसायला लागले. यावरून लक्षात येते की, प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील निर्जीव वस्तूंकडून पुष्कळ आनंद मिळतो. याचे कारण म्हणजे देवाने वापरलेल्या प्रत्येक वस्तूतून आनंद मिळतो. प.पू. डॉक्टर साक्षात श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे असे जाणवते.
१ उ ४. थकवा असतांना प.पू. डॉक्टरांच्या खोलीत सेवेला गेल्यावर त्यांचे बोलणे आणि हसणे यातून पुष्कळ शक्ती अन् चैतन्य मिळणे आणि देवालाच सर्व कळत असल्याचा विचार मनात येताच प.पू. डॉक्टरांनी थकव्याची चौकशी केल्याने थकवा दूर होणे : आश्विन शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२८.९.२०११) या दिवशी मी पहाटे ५.३० वाजता उठले. तेव्हा मला फारच थकवा आला होता. त्या थकव्यामुळे मला सेवा मनापासून करता येत नव्हती. मी एका साधिकेला सांगितले, ‘‘मला आज सेवा होत नाही.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आता सेवा कर, संध्याकाळी कोणालातरी सांगूया.’’ मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत सेवेला गेले. प.पू. डॉक्टरांनी माझ्याशी बोलायला आरंभ केला. त्यांच्याशी बोलत असतांना स्वतःला काय होते, हे मी विसरून गेले. त्यांचे बोलणे आणि हसणे यांतून पुष्कळ शक्ती अन् चैतन्य मिळत होते. नंतर मी मनातल्या मनात देवाला म्हटले, ‘देवा, मला काय होत आहे, हे केवळ तूच जाणून घेऊ शकतोस.’ मी स्नानगृहात कपडे धुवायला लागले. तेव्हा प.पू. डॉक्टर बाजूच्या खोलीतून आले आणि म्हणाले, ‘‘तू थकत नाहीस का गं ?’’ त्यांच्या बोलण्याने माझा थकवा दूर झाला. (क्रमश:)
- कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
