कूर्मगतीने चालणारे प्रशासन !
मुंबई, २७ फेबु्रवारी (वार्ता.) - राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये मिळून राज्यात एकूण ४० सहस्र ३५ गावे असून ८५ सहस्र ४२७ अंगणवाडी केंद्रे आहेत. १४ नोव्हेंबर २०११ पासून राबवण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियाना’मुळे आतापर्यंत २ सहस्र १६३ गावे, ४ सहस्र ९२८ अंगणवाड्या आणि २ लक्ष ४१ सहस्र ८८ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत, अशी माहिती राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
(स्वातंत्र्याच्या ६४ वर्षांनंतर आणि स्वत:च्या हातात सर्व यंत्रणा असतांनाही राज्यातील ४० सहस्र गावांपैकी केवळ २ सहस्र गावे कुपोषणमुक्त करू शकणार्या राज्यशासनाचा कारभार किती कूर्मगतीने चालतो, याचे हे उत्तम उदाहरण ! - संपादक) शाश्वत कुपोषणमुक्तीसाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक खबरदारी घेण्यात येत असून शासनाच्या २३ विभागांच्या समन्वयातून पावसाळ्यात मुलांचे कुपोषण होणार नाही, यासाठी पावसाळ्यापूर्वी आराखडाही सिद्ध करण्यात आला आहे, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.मुंबई, २७ फेबु्रवारी (वार्ता.) - राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये मिळून राज्यात एकूण ४० सहस्र ३५ गावे असून ८५ सहस्र ४२७ अंगणवाडी केंद्रे आहेत. १४ नोव्हेंबर २०११ पासून राबवण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियाना’मुळे आतापर्यंत २ सहस्र १६३ गावे, ४ सहस्र ९२८ अंगणवाड्या आणि २ लक्ष ४१ सहस्र ८८ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत, अशी माहिती राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.