श्री. विनयकुमार आणि श्री. उदयकुमार यांच्या चौकशीनंतर सनातनच्या एका साधिकेशी बोलतांना अधिकार्यांनी तुम्ही आमची ‘छायाचित्रे दैनिकात छापू नका. आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते अयोग्य आहे’, असे सांगितले. या अधिकार्यांच्या या बोलण्याला मान देऊन आजपासून आम्ही या अधिकार्यांची छायाचित्रे दैनिकात छापण्याचे थांबवत आहोत. ही छायाचित्रे संकेतस्थळावरूनही काढून टाकावीत अशी विनंतीही आम्ही संकेतस्थळांना करत आहोत; मात्र या अधिकार्यांना आमचे काही प्रश्नही आहेत. - संपादक
१. या अधिकार्यांनी सनातनच्या साधकांची चौकशी करतांना त्यांना अमानुष मारहाण केली, त्यांना धमक्या दिल्या, तेव्हा साधकांची सुरक्षा धोक्यात आली नाही का ?२. अधिकार्यांनी कोणतीही पोच न देता साधकांच्या घरी जाऊन महत्त्वाची कागदपत्रे आणि छायाचित्रे कुटुंबियांना धमकावून पोलीस ठाण्यात आणली, हा साधकांच्या व्यक्तीगत जीवनावर घाला नाही का ?
३. साधकांना, तसेच त्यांच्या नातेवाइकांना कोणतीही कल्पना न देता त्यांना चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेणे, सकाळी बोलावून चौकशी संध्याकाळी चालू करणे, हा साधकांच्या सुरक्षेशी खेळ नाही का ?
४. आजारी साधकांची अमानुषपणे चौकशी करणे, त्यांना उपाशी ठेवणे, हा त्यांच्या आरोग्याशी खेळ नाही का ?
५. साधकांना बुटांनी लाथा घालणे, त्यांचे केस ओढणे आणि कानासारख्या नाजूक भागावर फटके मारणे, हा साधकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार नाही का ?