'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

इराणने ब्रिटन आणि फ्रान्स यांची तेलविक्री थांबवली

    लंडन / तेहरान, २० फेब्रुवारी - इराणने त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादून कोंडी करणार्‍या ब्रिटन आणि फ्रान्स यांचा तेलपुरवठा बंद केला आहे. तसेच या देशांबरोबर युद्ध करण्याची सिद्धताही चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनने म्हटले आहे की, इस्रायलने आततायीपणे इराणवर आक्रमण केल्यास त्याचा तोटाच अधिक होईल. त्यापेक्षा आर्थिक निर्बंध आणि दडपण, अशी दुहेरी व्यूहरचनाच योग्य आहे.
    अमेरिका आणि ब्रिटनसह युरोपीय समुदायाने येत्या १ जुलैपासून इराणकडून कच्च्या तेलाची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वीच इराणने तेलविक्री बंद केली. आम्ही आता नवीन ग्राहकांना तेल विकणार असल्याचे इराण शासनाच्या पेट्रोलियम खात्याच्या संकेतस्थळावर म्हटल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.
    इराणने त्यांच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या लष्करी कवायती आजपासून चालू केल्या आहेत. दोन दिवसांचा हा युद्ध सराव आहे. इस्रायलकडून आक्रमणाचा धोका असल्याने सैन्याने युद्धाचा सराव चालू केला आहे. रिव्होल्युशनरी गार्डस् म्हणजे इराणी लष्करातील सर्वात शक्तीशाली पथक समजले जाते.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi