'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

धुळे येथे क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

धर्मांधांकडे मतभेद मिटवण्यासाठी शाब्दिक सामर्थ्य नाही. ते केवळ आक्रमण आणि हत्या जाणतात. हिंदूंचे रक्षण आणि सामाजिक शांती यांसाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
धुळे, ३ फेब्रुवारी - पाण्याच्या टँकरवर मुसलमान टँकर चालकासोबत काम करणार्‍या आपल्या भावाबरोबरच्या
भांडणाचा जाब विचारायला गेलेल्या अंकुश किसन हजारे याला मुसलमान टँकरचालकाने बेदम मारहाण करून त्याची हत्या केली.
१. टँकरचालक शकील पिंजारी आणि मृत तरुणाचा भाऊ लखन हजारे नंदुरबार येथून परत येत असतांना जेवायला एका ठिकाणी थांबले.
२. त्या ठिकाणी काहीतरी क्षुल्लक कारणावरून या दोघांमध्ये भांडण झाले.
३. तेव्हा शकीलने लखनला आई-बहिणीवरून शिविगाळ केली.
४. ही गोष्ट लखनने त्याचा भाऊ अंकुश हजारे याला सांगितली.
५. अंकुश शकील याला जाब विचारायला त्याच्या घरी गेला असता शकीलने अंकुशला बेदम मारहाण केली.
६. त्यामुळे अंकुश बेशुद्ध पडला.
७. त्याला रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.
८. पोलिसांकडे तक्रार केल्यावर शकीलला अटक करण्यात आली.




धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi