- ठाणे दिवाणी न्यायालय ठाणे, २१ फेब्रुवारी - एखादी व्यक्ती कोणत्याच धर्म किंवा जातीची नाही, अशी मान्यता न्यायालयाने दिल्यास त्याची व्यक्तीगत मते इतरांवर लादल्यासारखे होईल. तसेच त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये वारसा अधिकार आणि त्यांचा धर्म यावरून समस्या निर्माण होऊ शकतात, असे मत ठाणे येथील न्यायालयाने एका याचिकेवर निकाल देतांना व्यक्त केले आहे.
(जात ही मनुष्यनिर्मित आहे. त्यामुळे ती रहित करता येऊ शकते; मात्र वर्ण हे ईश्वरनिर्मित असल्याने ते प्रत्येक मनुष्याच्या गुणकर्मानुसार ठरले जातात. त्यामुळे ते नष्ट होऊ शकत नाहीत. - संपादक)
ठाणे दिवाणी न्यायालयात अधिवक्ता श्रीरंग बळवंत खांबेटे यांनी जुलै २००९ मध्ये यांनी याचिका दाखल केली होती. जातीधर्माच्या नावाखाली होणार्या राजकारणाला कंटाळल्यामुळे आपल्याला हिंदु धर्माचा त्याग करायचा आहे. (हिंदूंमध्ये असलेल्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु अशा प्रकारचा विचार करत आहेत. हिंदूंना योग्य धर्मशिक्षण मिळाल्यास हिंदु धर्म किती महान आहे, याची प्रचीती त्यांना येईल. निधर्मी राष्ट्रामुळे झालेली हिंदूंची ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! - संपादक) आपल्याला दुसरा कोणताच धर्म स्वीकारायचा नाही. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला धर्म आणि जात विरहीत घोषित करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. आधार म्हणून इस्त्रायल येथील एका न्यायालयाने दिलेल्या अशा स्वरूपाच्या निकालाचा दाखला त्यांनी दिला होता.