'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

निवडणूक आयुक्तांकडून कार्यप्रणाली उल्लंघणार्‍या शासनाला समज

मुंबई मनपा आयुक्त सुबोधकुमार यांच्या मुदतवाढीचे प्रकरण
    मुंबई, २ फेब्रुवारी (वार्ता.) - मुंबई महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देतांना कार्यप्रणालीचे पालन न करण्यात आल्याने राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना राज्य निवडणूक आयोगाकडून समज देण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    मुंबई मनपा आयुक्त सुबोधकुमार हे ३१ जानेवारी या दिवशी सेवानिवृत्त होणार होते. राज्यशासनाकडून त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून केंद्राकडे विनंती करण्यात आली आणि केंद्रानेही या मुदतवाढीस मान्यता दिली; परंतु निवडणुकीच्या कालखंडात अशा प्रकारे मुदतवाढ देण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांना कळवून त्यांची मान्यता घेण्याची कार्यप्रणाली पार पाडण्यास बाकी शासनाला विसर पडला. परिणामी राज्य निवडणूक आयुक्तांनी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते; मात्र त्यांचे हे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयुक्तांनी भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी स्पष्ट समज मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi