'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

सनातनच्या साधकांची, म्हणजेच हिंदु धर्मियांची हेतूपुरस्सर अपकीर्ती करणारे जिहादी वृत्तीचे इंग्रजी नियतकालिक ‘आफ्टरनून’

म्हणे, मालेगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या दोन साधकांना मंगळुरू येथे अटक
खोटे वृत्त देऊन मानहानी केल्याच्या प्रकरणी ‘आफ्टरनून’ या नियतकालिकावर सनातन दावा दाखल करणार आहे.
    मंगळुरू - मालेगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या दोन साधकांना मंगळुरू येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मालेगांव स्फोटाचा कट रचणार्‍यांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने नव्याने चालू केले आहे. या प्रकरणी रामजी कलसांग्रा, संदीप डांगे आणि सुरेश नायर यांची नावे पुढे आली आहेत, असे धादांत खोटे वृत्त इंग्रजी नियतकालिक ‘आफ्टरनून’ने प्रसिद्ध केले आहे. 
(गेली तीन वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच सुरक्षा यंत्रणांनी गडकरी रंगायतन आणि मडगाव बाँबस्फोटांत हेतूपुरस्सर सनातनला गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे. गडकरी रंगायतन खटल्यात तर विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीच आतंकवादविरोधी पथकाने खोटी कागदपत्रे आणि खोटे पुरावे सादर केल्याविषयी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. असे असतांना आतंकवादविरोधी पथकाच्या पावलावर पावले ठेवून त्याच पद्धतीने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (हिंदूंचा छळ करणारी यंत्रणा) सनातनला आतंकवादी ठरवण्यासाठी सनातनच्या साधकांना आता मालेगाव स्फोट प्रकरणात गोवण्याच्या अश्लाघ्य प्रयत्न करत आहे. या अन्वेषण यंत्रणेने मालेगाव स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुसलमानांना मात्र जामिनावर सोडतांना न्यायालयात काहीही विरोध केलेला नाही, हे विशेष ! - संपादक)
    चौकशी पथकाच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी मालेगाव स्फोट प्रकरणी बेल्तंगडी, मंगळुरू येथील दोन व्यक्तींना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे विनय आणि उदय अशी आहेत. हे दोघे जण सनातन संस्थेचे क्रियाशील सदस्य आहेत; मात्र इतर सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.
    ठाणे नाट्यगृह आणि वाशी येथे स्फोट घडवून आणल्याच्या प्रकरणी राज्य आतंकवादविरोधी पथकाने ६ संशयितांना अटक केली होती, असे वृत्तही ‘आफ्टरनून’ने प्रसारित केले. (हिंदूंनो, ठाणे स्फोटप्रकरणी सहा जणांना अटक केल्याचे वृत्त देणार्‍या या नियतकालिकाने या प्रकरणाचा निकाल लागून न्यायालयाने चार जणांना निर्दोष सोडल्याचे आणि ही घटना आतंकवादी कृत्य नसल्याचे सांगितल्याचे वृत्त दिलेले नाही, हे लक्षात घ्या ! यातून या वृत्तपत्राचा वृत्त देणे हा उद्देश नसून केवळ सनातनची अपकीर्ती करणे, हाच उद्देश आहे, हेच स्पष्ट होते आहे. - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi