'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

साधकांनो, निधर्मी राज्यकर्ते आणि सुरक्षायंत्रणा यांच्या छळाला सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !

सनातनची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पुनर्चौकशी चालू !
कर्नाटकात साप्ताहिक सनातन प्रभातच्या कार्यालयात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी

मंगळुरू - मंगळुरू येथील साप्ताहिक सनातन प्रभातच्या कार्यालयात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या दोन अधिकार्‍यांनी चौकशी केली. हे अधिकारी सकाळी ११ वाजता दोन स्थानिक पोलीस अधिकार्‍यांसह आले होते. हे अधिकारी मडगाव स्फोट प्रकरणातील एका संशयिताची चौकशी करून संस्थेला पैसा कोठून मिळतो, तुमचे नेमके कार्य काय चालते, तुमचे प्रमुख कोण असे प्रश्न विचारले.
(खिस्ताब्द २००८ पासून सनातन संस्थेची आणि साधकांची आतंकवादविरोधी पथक, स्थानिक पोलीस, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या माध्यमांतून चौकशी चालू आहे. अनेकदा या यंत्रणांनी सनातनच्या आश्रमांची झडती घेतली आहे. या वारंवार होणार्‍या झडत्या आणि चौकशा यांमध्ये सनातनला आतंकवादी ठरवून बंदी घालण्यासारखे काहीच त्यांना मिळालेले नाही. हे अधिकारी आणि पोलीस विचारत असलेली माहिती अनेकदा त्यांना दिली आहे. असे असतांना पुन्हा पुन्हा ही माहिती विचारून वेळ का वाया घालवत आहेत. या सुरक्षा यंत्रणांनी इतक्या चिकाटीने आणि सातत्याने आतंकवादी संघटनांची चौकशी केली असती, तर भारत आतंवादमुक्त झाला असता ! - संपादक) सकाळी ११ वाजता आलेले हे अधिकारी ‘आम्ही उद्या पुन्हा चौकशीसाठी येऊ’, असे सांगून सायंकाळी ५.२० वाजता परत गेले. अशी चौकशी सनातनच्या इतरत्रच्या साधकांची आणि आश्रमांची केली जाणार आहे, असे सनातनला विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.
    गेले काही दिवस सनातनच्या पाठीमागे असलेला चौकशीचा ससेमिरा बंद होता. आता पुन्हा नव्याने तो चालू करण्यात आला आहे.
साधकांनो, पोलिसांच्या चौकशीला धीराने आणि संयमाने सामोरे जा !
सुरक्षायंत्रणा पुन्हा नव्याने चौकशी करत आहेत. या यंत्रणांची चौकशी म्हणजे एक प्रकारे मानसिक, शरीरिक छळच होय. त्यांच्या या चौकशांमुळे साधकांचा सेवेचा बहुमोल वेळ वाया जातो. असे असले तरी जेथे कोठे हे अधिकारी चौकशी करतील त्या ठिकाणी साधकांनी या चौकशीला धीराने आणि संयमाने सामोरे जावे. सनातन ही आध्यात्मिक संस्था आहे. संस्थेचे सर्व कार्य सनदशीर मार्गाने आणि शांततेनेच चालते. अनेकदा चौकशांमधून या यंत्रणांना संस्थेच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. आतंकवादविरोधी पथकाने सनातनला गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणात अडकवण्यासाठी खोटे पुरावे न्यायालयात सादर केल्याविषयी विशेष न्यायालयाने पथकावर ताशेरे ओढले आहेत. ही गोष्ट सत्याचा जय होतो, हेच स्पष्ट करणारी आहे.
    त्यामुळे साधकांनो, श्रीकृष्णचरणी शरण जाऊन आपण सर्व जण साधना वाढवूया. लक्षात घ्या सर्वसाक्षी आणि सर्व शक्तीमान श्रीकृष्णाचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी आहेत. देशातील काही राज्यांत आणि महाराष्ट्रात चालू असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर सनातनची चौकशी पुन्हा चालू करून राज्यकर्ते काय साध्य करू पहात आहेत ?
    काही दिवसांपूर्वीच जिहाद्यांचे कट्टर समर्थक असलेले समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी सनातनसह हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर सुरक्षायंत्रणानिही चौकशी चालू केली आहे. त्यामुळे जिहादी आणि त्यांच्या समर्थकांना खूश करण्यासाठीच ही चौकशी चालू केली आहे का, अशी शंका कोणी घेतल्यास नवल ते काय ?

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi