'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

८५ व्या साहित्य संमेलनाला चंद्रपूर येथे प्रारंभ

    चंद्रपूर, ३ फेब्रुवारी - ग्रंथ डोक्यावर घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी आणि वाद्यांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांच्या सुरांनी आज सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीने ८५ व्या साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. आझाद बाग चौकातून संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत डहाके यांच्या हस्ते या दिंडीचा प्रारंभ झाला.
संमेलनाचे मुख्य उद्घाटन सायंकाळी झाले. ग्रंथदिंडीमध्ये अग्रस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा. डहाके, त्यांच्या अर्धांगिनी डॉ. प्रभा, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे इत्यादी मान्यवर होते. तसेच चित्रपट अभिनेते पंढरीनाथ कांबळे, सुबोध भावे आणि रमेश भाटकर यांनीही त्यांच्या उपस्थितीने दिंडीत उत्साह निर्माण केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi