'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयाकडून ‘आधुनिक रामायणा’चे प्रदर्शन रहित

हिंदूंनो, या यशाबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचे परिणाम !
    ठाणे, ५ फेब्रुवारी - येथील ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात ‘आधुनिक रामायण’ हे नाटक सादर करण्यात येणार होते. हिंदु जनजागृती समतीच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रबोधनानंतर हे नाटक रहित करण्यात आले.
    येथील ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात ‘आधुनिक रामायण’ हे नाटक सादर करण्यात येणार होते. याची माहिती हिंदु जनजागृती समितीला समजताच समितीच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. लीना अंजिश यांची भेट घेऊन त्यांचे प्रबोधन केले, तसेच ही नाटिका वगळण्याची मागणी केली. समितीच्या विनंतीचा आदर करून महाविद्यालयाचे अध्यक्ष बी.डी. पाटील, तसेच प्राचार्या सौ. लीना अंजिश यांनी हे नाटक रहित करत असल्याचे लेखी पत्र समितीला दिले आहे. या वेळी शिष्टमंडळात श्री. अजय संभूस, अधिवक्त्या वर्षा पाटील, सौ. धनश्री केळशीकर, प्रिया वाईकर, वर्षा पालवे, श्री. जगदीश वैभंदिक, श्री. विपूल शेवाळे यांचा समावेश होता.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi