'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

मुसलमानांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईत काँग्रेसचा पराभव - खासदार हुसेन दलवाई

हिंदूंनो, काँग्रेसचे मुसलमानप्रेम जाणा !
मुंबई, २१ फेब्रुवारी (वार्ता.) - नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. मुसलमान आणि दलित मतदारांकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले. त्यांच्यासाठी केंद्रशासनाच्या अनेक योजना असूनही त्या योग्य पद्धतीने राबवल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडे मुसलमान आणि दलित मतदारांनी पाठ फिरवली, असे वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी आज मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केले.
(मुंबईत बहुसंख्येने असलेल्या हिंदूंची मते न मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला, हे उघड असतांना मुसलमानांच्या मतांमुळे पराभव झाल्याचे सांगून हिंदुद्वेष्टे दलवाई काँग्रेस शासनाला एक प्रकारे मुसलमानांचे लांगूलचालन करण्यास भाग पाडत आहेत ! - संपादक) यासाठी दलवाई यांनी थेट काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांना दोषी धरले आहे; मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोषी धरता येणार नाही, असे सांगून त्यांची पाठराखणही केली आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi