'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

सनातन-निर्मित चैतन्यदायी ग्रंथ प्रत्येक ग्रंथालयात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वर्धा येथील कु. शर्वरी पाध्ये !

ग्रंथालयांत सनातन-निर्मित सात्त्विक ग्रंथांच्या माध्यमातून परिणामकारक प्रसार होईल, या उद्देशाने विदर्भातील प्रसारसेविका कु. शर्वरी पाध्ये यांनी विदर्भातील ग्रंथालयांचा अभ्यास केला. येथील विविध जिल्ह्यांतील ग्रंथालयांना संपर्क करून त्यांनी मोठ्या प्रमाणात विविध विषयांवरील सनातननिर्मित ग्रंथ वितरीत करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे आपणही आपल्या जिल्ह्यातील ग्रंथालयांचा अभ्यास करून ग्रंथ वितरण करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यालाही अल्पावधीत गुरुकृपेने ग्रंथांचे मोठ्या प्रमाणात वितरण करणे शक्य होईल अन् समाजात परिणामकारक प्रसार करता येईल.
कु. शर्वरी पाध्ये

१. ग्रंथालयाच्या माध्यमातून सहस्रावधी जिज्ञासूंपर्यंत पोहोचण्याची अनमोल संधी : ग्रंथालयात वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात आणि सहज उपलब्ध होत असतो. त्यामुळे ग्रंथालय व्यवस्थापनाने सनातन-निर्मित ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयात ठेवल्यास या ग्रंथांचा लाभ समाजातील विविध स्तरांतील सहस्रावधी लोकांना होतो, तसेच या माध्यमातून अध्यात्माचा म्हणजेच साधनेचा आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्याचा परिणामकारक प्रसारही होतो. ग्रंथालयात नियमित येणारे बहुतांश वाचक उच्चशिक्षित आणि जिज्ञासू असतात. सनातन-निर्मित ग्रंथांमधील चैतन्यामुळे आणि ज्ञानामुळे ते साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यांकडे वळू शकतात.
२. ग्रंथालयांचे विविध स्तर (ग्रेड) आणि त्यांना मिळणारे अनुदान : महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी शासकीय साहाय्यावर अथवा एखाद्या न्यासाच्या माध्यमातून चालणारी लक्षावधी ग्रंथालये आहेत. या शासनमान्य ग्रंथालयांबरोबरच अनेक ठिकाणी खासगी ग्रंथालयेही आहेत. यांतील शासनमान्य ग्रंथालयांना शासनाकडून मार्च आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत ग्रंथ खरेदीसाठी अनुदान मिळते. आपल्या जिल्ह्यात किती ग्रंथालये आहेत, त्यांचा स्तर (ग्रेड) काय आहे हे समजून घ्यावे. साधारणपणे ग्रंथालयाच्या ग्रेड पुढीलप्रमाणे असतात.
      जिल्ह्यांच्या ठिकाणी असणारे ‘जिल्हा ए ग्रेडचे ग्रंथालय’, तालुक्याच्या ठिकाणी असणारे ‘तालुका ए ग्रेडचे ग्रंथालय’ आणि तालुका अथवा जिल्हा सोडून अन्य नगरात अथवा गावात असलेले ए ग्रेडचे ग्रंथालय. या तीन ग्रेड नंतर बी, सी, डी या ग्रेडचीही ग्रंथालये असतात. या ग्रंथालयांना अनुदान किती मिळते, ही माहिती जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा ग्रंथालयात मिळणार्‍या सूचीतून आपल्याला मिळू शकते. 
३. प्राधान्यक्रम ठरवून ग्रंथालयांना संपर्क करा : साधकांनो, वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या केवळ तीन लक्ष आहे. या छोट्याशा जिल्ह्यात शासनमान्य १०४ ग्रंथालये आहेत. मोठ्या जिल्ह्यांमध्ये यापेक्षा अधिक ग्रंथालये असतात. संपर्कासाठी आता आपल्याकडे थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. (मार्च महिन्यात अनुदान मिळाल्यानंतर ग्रंथालयांतून ग्रंथखरेदी चालू होते. त्यापूर्वी आपण संपर्क करणे आवश्यक आहे.) प्रथम जिल्हा ग्रंथालयाकडून जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांची सूची घ्यावी. त्यानंतर अनुदान प्राप्त ग्रंथालयांचे ए आणि बी असे वर्गीकरण करून संपर्कासाठीची आपली सूची बनवावी. या सूचीमध्येच काही ग्रंथालयांचे संपर्क क्रमांकही असतात. या संपर्क क्रमांकावरून संबंधित ग्रंथालयांच्या सचिवांना अथवा संबंधित व्यक्तींना थेट संपर्क करून सनातन-निर्मित ग्रंथांविषयी थोडक्यात माहिती सांगून संपर्कासाठी त्यांची वेळ निश्चित करावी. अशा संपर्कांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच वेळ निश्चित करून घेतल्याने संपर्काचीही निश्चिती होते. प्रत्येक ग्रंथालयाची एक समिती असते. या समितीमधील एखादी व्यक्ती जर आपल्या परिचयाची असेल अथवा एखाद्या व्यक्तीला धर्म, अध्यात्म आणि राष्ट्र यांपैकी एखाद्या विषयाची आवड असल्यास त्यांच्याशी प्राधान्याने संपर्क करावा. अनेक ग्रंथालयांतून काही वाचक वर्षानुवर्षांचे सदस्य असतात. त्यांचे ग्रंथालयातील कर्मचारी, तसेच समिती सदस्यांशीही चांगले संबंध असतात. अशा एखाद्या वाचकाच्या माध्यमातूनही आपण प्रयत्न करू शकतो.
४. संपर्काची सिद्धता कशी कराल ?
४. अ. संपर्कासाठी ग्रंथ घेऊनच जा : साधक ग्रंथालयांना संपर्क करतांना अनेकदा केवळ ग्रंथांची सूचीच घेऊन जातात; परंतु संपर्कासाठी ग्रंथ नेल्यास अधिक लाभ होतो. प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक ग्रंथांचे मुखपृष्ठ सात्त्विक आणि चैतन्यदायी बनवलेले आहे. ग्रंथांतील माहितीही दुर्मिळ आणि चैतन्यदायी आहे. त्यामुळे जिज्ञासूने ग्रंथ हातात घेताच त्यातील चैतन्याने तो त्याला हवासाच वाटतो. आपण केवळ सूची नेल्यास परिणाम अल्प होतो, असे लक्षात आले आहे.
४. आ. ग्रंथालयात ग्रंथ दाखवतांना त्यांतील माहितीही सांगा : पहिल्यांदा एवढे सगळे ग्रंथ आपण कसे नेऊ शकतो, असे आपल्याला वाटू शकते. त्या वेळी आपणास साहाय्यासाठी दुसरा साधक उपलब्ध नसल्यास ‘आपल्यासमवेत भगवान श्रीकृष्ण आहे’, असा भाव ठेवल्यावर शंभर-दीडशे ग्रंथ आपल्यालासमवेत असूनसुद्धा त्यांचे आपल्याला वजन जाणवत नाही, अशी अनुभूती गुरुकृपेने येते. संपर्क करतांना आपण अधिकाधिक सकारात्मक राहून ग्रंथांची माहिती सांगितली, श्रीकृष्णचरणी शरणागत भाव ठेवला आणि ग्रंथालयात ज्यांना आपण संपर्क करतो, ते ग्रंथ पहात असतांना त्यांना त्यातील माहिती सांगितली, तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. कोठेही नकार मिळत नाही.
५. वितरीत केलेल्या ग्रंथांच्या रकमेची वसुली करण्याची पद्धत : ग्रंथालयाला सप्टेंबर महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये असे दोन वेळा अनुदान मिळते. सप्टेंबर महिन्यामध्ये मिळालेले अनुदान शिल्लक असेल, तर त्या ग्रंथालयाकडून तात्काळ पैसे मिळू शकतात. ग्रंथालयाकडे रक्कम शिल्लक नसेल आणि त्यांना मार्च महिन्यात ग्रंथ खरेदी करायचे असतील, तर त्यांना त्या महिन्याचे अनुदान मिळाल्यानंतर सदर ग्रंथालयाकडून रक्कम मिळू शकते. रक्कम अधिक प्रमाणात असल्यास ग्रंथालयाकडून आपल्याला रकमेचा धनादेश मिळतो. ग्रंथालय धनादेश देत असेल, तर आपण ग्रंथालयाच्या नावे स्थानिक वितरकाचा शिक्का असलेले देयक तयार करून त्यांना द्यावे. जेणेकरून तो धनादेश आपल्याला स्थानिक वितरकाच्या नावे मिळेल.
    ही सर्व माहिती सार्वजनिक ग्रंथालयांच्या संदर्भात आहे. आता आपण महाविद्यालयीन ग्रंथालयांच्या संदर्भातील माहिती पाहूया !
६. महाविद्यालयातील ग्रंथालयांना कसा संपर्क कराल ?
    महाविद्यालयांतील ग्रंथालयांनाही चांगले अनुदान मिळत असते. तसेच या ग्रंथालयांचा प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी असा सर्वांगाने चांगला आणि संख्येने मोठा हक्काचा वाचकवर्गही असतो. या ग्रंथालयांनाही शासनाकडून अनुदान मिळते. या ग्रंथालयांतूनही आपण आपले ग्रंथ देऊ शकतो.
६. अ. कोणत्याही महाविद्यालयात संपर्कासाठी जातांना स्वभावदोष निर्मूलन, अहंनिर्मूलन आदी ग्रंथ प्राधान्याने दाखवा : महाविद्यालयीन ग्रंथालयातील अधिकारी व्यक्तीला ग्रंथ दाखवतांना मुलांच्या, युवा वर्गाच्या लाभाच्या दृष्टीने काय आवश्यक आहे, याची सूची जर आपण दाखवू शकलो, तर अधिक लाभ मिळतो. उदा. स्वभावदोष निर्मूलन, अहंनिर्मूलन इत्यादी विविध प्रकारचे ग्रंथ आपण त्यांना दाखवू शकतो.
६. आ. आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेदाचे ग्रंथ प्राधान्याने दाखवा : आपले आयुर्वेद या विषयावर विविध प्रकारचे ग्रंथ आहेत. आयुर्वेद महाविद्यालयांतून आपण आपले हे आयुर्वेदाचे ग्रंथ देऊ शकतो. या ग्रंथांतील लिखाण सोपे आणि विषयाची मांडणी चांगली असल्याने ते पहाणार्‍यांना भावतात.
६. इ. कला शाखांतील महाविद्यालयांत प्राधान्याने भाषाविषयक आणि अध्यात्मविषयक ग्रंथ दाखवा : कला शाखा (बॅचलर ऑफ आर्ट्स ) महाविद्यालयांत आपले मराठी आणि हिंदी भाषाविषयक ग्रंथही दाखवू शकतो. महाविद्यालयात प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र विभाग असतो. या ठिकाणी भाषेशी संबंधित सर्व प्रकारचे म्हणजेच वेगवेगळ्या मतप्रणालीचे, तसेच भाषेचे संवर्धन आणि संरक्षण या विषयांवरील ग्रंथ ते ठेवत असतात.
६. ई. महाविद्यालयात संपर्कासाठी जातांना ग्रंथ सोबत घेऊनच जा : मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू येथे एका महाविद्यालयात परीक्षा चालू होती. ग्रंथपाल पर्यवेक्षण करत होते. संपर्काच्या वेळी प्राचार्यांनी ‘ग्रंथपाल महत्त्वपूर्ण कामात व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही’, असे सांगितले. तेव्हा आम्ही प्राचार्यांनाच ग्रंथ दाखवू लागलो. त्यांनी चार-पाच ग्रंथ पाहिले. प्राचार्य प्रभावीत होऊन, त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथपालांना पर्यवेक्षण सोडून ग्रंथ पहायला येण्याचा निरोप दिला. ग्रंथपालांनी ग्रंथ पाहिल्यावर तेही खूपच प्रभावित झाले. त्यांनी आपल्या ग्रंथांची प्रशंसा करत मराठी भाषेतील सर्व ग्रंथांचा पूर्ण संचच खरेदी केला. यावरून संपर्कासाठी जातांना ग्रंथ सोबत घेऊन जाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल.
७. विदर्भात प्रकाशन संस्थांशी आणि पुस्तक विक्रेत्यांशी केलेल्या संपर्काचा सकारात्मक परिणाम
७. अ. सनातनच्या ग्रंथांचा प्रसार समाजात होणे आवश्यक, अशी प्रतिक्रिया एका प्रकाशनसंस्थेच्या प्रतिनिधाने व्यक्त करणे म्हणजे ईश्वराने त्याचे कार्य चालू केल्याची अनुभूती : उत्तरदायी साधकांनी प्रकाशन संस्थांशीही ग्रंथ वितरणासाठी संपर्क करू शकतो, असे सांगितल्यावर आम्ही तसे प्रयत्न चालू केले. नागपूर येथील साहित्य प्रसार केंद्र प्रकाशन संस्थेशी आम्ही संपर्क केला, तेव्हा त्या संस्थेचे श्री. मकरंद कुलकर्णी यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त झाली ती बोलकी आणि साधकांचा उत्साह वाढवणारी आहे. ते म्हणाले, ‘हे ग्रंथ साधना करणार्‍यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे या ग्रंथांचा समाजात व्यापक प्रसार होण्याची खूपच आवश्यकता आहे.’ श्री. कुलकर्णी यांनी आपले मोठे गं्रथ १२९ आणि लघुग्रंथ ९० असे २१९ ग्रंथ खरेदी केले.
६. आ. सनातनच्या ग्रंथाचे वितरण करून आनंद मिळवणार्‍या नागपूर येथील विदर्भ बूक डेपोच्या सौ. भोंडवे ! : नागपूरस्थित सौ. भोंडवे यांच्या विदर्भ बूक डेपोने आपल्या पंधरा मोठ्या ग्रंथांच्या प्रत्येकी दहा प्रती घेतल्या. ४० लघुग्रंथांच्या प्रत्येकी ३ प्रती घेतल्या. सगळे मिळून २७० मोठे ग्रंथ आणि १०० लघुग्रंथ त्यांनी घेतले. नागपूर मोठे शहर आहे. धरमपेठसारख्या महत्त्वपूर्ण परिसरात हा डेपो आहे. त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर हे सगळे ग्रंथ अतिशय आकर्षक प्रकारे मांडले आहेत. सौ. भोंडवे यांंची प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी आहे, सौ. भोंडवे म्हणाल्या, ‘‘सनातनचे ग्रंथ वितरीत करतांना मला खूप आनंद मिळतो. ग्रंथ खूपच चैतन्यदायी आहेत’’
    यावरून प्रकाशन संस्था आणि पुस्तक विक्रेते यांना देखील आपल्या ग्रंथांचा प्रसार व्हावा, असे आता वाटू लागले आहे.
७. साधकांचे नियोजन 
आपण व्यवस्थित नियोजन केले, तर ही सेवा जिल्हास्तरावर दोन ते चार साधक व्यवस्थित करू शकतात. जिल्हा छोटा असल्यास दोन साधक पुरेसे ठरतात. विदर्भात काही जिल्ह्यात अशा प्रकारच्या संपर्काला कधी कधी एकच साधक असायचा. श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टरांच्या कृपेने कधी त्रास झाला नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi