'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

आंध्रप्रदेशमधील श्रीशैलम देवस्थानाच्या सभोवताली उभारलेल्या दुकानांवर मुसलमानांचे अतीक्रमण

दुसरी मोगलाई !
भूमी अतीक्रमणाद्वारे हिंदूंच्या देवस्थानांत जिहादी कारवाया करण्याची आधुनिक गझनींची चाल !

    करनूल (आंध्रप्रदेश), २५ फेब्रुवारी (वृत्तसंस्था) - श्रीशैलम देवस्थानाच्या सभोवतालची दुकाने आणि रोजगाराच्या इतर संधी यांमध्ये मुसलमानांना शिरकाव करण्यास देऊ नये, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे.
(बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनेकडून अशी मागणी करणे नव्हे, तर असे अतिक्रमण करणार्‍या जिहाद्यांना वठणीवर आणणे अपेक्षित आहे ! - संपादक) या देवस्थानाच्या सभोवतालच्या दुकानांवर मुसलमानांनी अतीक्रमण केले आहे. (हिंदूंच्या देवस्थानाच्या परिसरात अतीक्रमण करून मंदिरांचे पावित्र्य नष्ट करण्याचा हा जिहाद्यांचा कट आहे. भविष्यात या मंदिराची विटंबना झाली, अथवा मूर्ती तोडफोडीचे प्रकार घडल्यास आश्चर्य वाटायला नको ! - संपादक) ‘राज्य हिंदु धार्मिक मंदिरे आणि धर्मादाय संस्था कायदा, १९८७’ या कायद्यानुसार मंदिराच्या परिसरातील व्यापारी आस्थापने आणि रोजगाराच्या संधी या केवळ हिंदूंनांच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. (कायद्याचा भंग होत असतांना देवस्थान समिती झोपा काढत आहे का ? - संपादक) या कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करण्यात यावी, अशी मागणी विहिंपने केली आहे. (मशिदीच्या परिसरात शिरकाव करण्याचे धारिष्ट्य हिंदूंनी केले असते का ? हिंदू निद्रिस्त असल्याचे हे फलित आहे ! - संपादक) हे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
हिंदूंची नावे धारण करून दुकानांवर अतिक्रमण
१. श्रीशैलम देवस्थानाच्या वतीने दुकानांचा लिलाव होत असतांना मुसलमान हिंदूंची नावे धारण करून त्यात सहभागी होतात, असा आरोप विश्व हिंदु परिषदेचे करनूल जिल्हाध्यक्ष पी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केला. (जिहादी कारवाया करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवणार्‍या कावेबाज मुसलमानांचा सामना करण्यासाठी हिंदू सिद्ध आहेत का ? - संपादक)
२. पुढे येणार्‍या ब्रह्मोत्सवासाठी दुकानांचे वाटप करण्यात आले असता त्यांतील ३० टक्के दुकाने मुसलमानांनी मिळवली.
३. या ठिकाणी ४०० कायमस्वरूपी दुकाने असून त्यांतील ४० टक्के दुकानांवर मुसलमानांनी कब्जा केला आहे.
४. मंदिराच्या परिसरात काम करणार्‍या नोकरवर्गापैकी २० टक्के नोकर मुसलमान आहेत, असेही श्री. रेड्डी यांनी सांगितले. (नोकरभरती करतांना देवस्थान मंडळ उमेदवारांची सखोल चौकशी करत नाहीत का ? मुसलमानांची अशी नियुक्ती करून देवस्थानाचे पावित्र्य भंग करणारे देवस्थान मंडळावरही कठोर कारवाई व्हायला हवी ! - संपादक)
    श्रीशैलम देवस्थानचे अध्यक्ष इम्मिदीसेट्टी कोटेश्वर राव यांनी ते कायद्याचे कठोरपणे पालन करत असल्याचे पत्रकारांना सांगितले. (असे आहे, तर श्री. रेड्डी यांनी केलेल्या आरोपांचे राव यांनी खंडन करावे आणि नंतरच बोलावे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi