साहित्य संमेलानाच्या निमित्ताने...
१. समाजाला जागृत करण्याचे आणि समाजाच्या संवेदनांना शब्दरूप देण्याचे काम लेखकाचे असून हेच त्याचे समाजाशी असलेले नाते असणे : ‘कितीही ‘पत्रकार दिवस’ किंवा ‘साहित्य संमेलने’ साजरी केली, तरी सत्य हेच आहे की, साहित्यिक किंवा पत्रकार यांच्या भावना संवेदनशील प्रश्नांसाठी मृत झाल्या आहेत. वास्तविक विचार केला, तर त्यांचे लिखाण समाजाला जागृत करणारे असायला हवे.
समाजाच्या संवेदनांना शब्दरूप देण्याचे काम लेखकाचे आहे आणि हेच त्याचे अन् समाजाचे आणि समाजाचे अन् त्याचे नाते असते.१. समाजाला जागृत करण्याचे आणि समाजाच्या संवेदनांना शब्दरूप देण्याचे काम लेखकाचे असून हेच त्याचे समाजाशी असलेले नाते असणे : ‘कितीही ‘पत्रकार दिवस’ किंवा ‘साहित्य संमेलने’ साजरी केली, तरी सत्य हेच आहे की, साहित्यिक किंवा पत्रकार यांच्या भावना संवेदनशील प्रश्नांसाठी मृत झाल्या आहेत. वास्तविक विचार केला, तर त्यांचे लिखाण समाजाला जागृत करणारे असायला हवे.
२. आजचे लेखक, साहित्यिक आणि पत्रकार स्वार्थी अन् भित्रे झाले असून विकले गेले असल्याने समाजात जीवनशक्ती, संवेदना आणि आपुलकी यांचा भीषण दुष्काळ पडला असणे : वास्तविक सत्य हे आहे की, आज लेखक, साहित्यिक आणि पत्रकार स्वार्थी अन् भित्रे झाले आहेत. तसेच ते विकले गेले आहेत. सध्या देश आणि समाज यांची झालेली दुर्दशा साहित्य किंवा लेखन यांत कुठेही उल्लेखित होत नाही किंवा केली जात नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे या देशाचा सामान्य नागरिक आजच्या तथाकथित साहित्यिक, लेखक आणि पत्रकार यांचा केंद्रबिंदू राहिलेला नाही. आजचे लेखक, साहित्यिक आणि पत्रकार राजकारण, भाषा, संस्कृती, राष्ट्रीयता आणि शासन-प्रणाली या सर्वांच्या संदर्भात पूर्णपणे उदासीन झाले आहेत. यांपैकी कोणी आपली लेखणी चालवली, तर ते केवळ स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःच्या वर्तुळाच्या मर्यादेत राहून काहीतरी काटछाट करून लिहून मोकळा होतो. याच कारणांमुळेच आज भारतात लेखक, साहित्यिक यांची परंपरा नष्ट झाली आहे. आज देश आणि समाज यांमध्ये जी उदासीनता दिसते, जी पोकळी आणि शून्यता निर्माण झाली आहे, समाजामध्ये जीवनशक्ती, संवेदना अन् आपुलकी यांचा जो भीषण दुष्काळ पडलेला दिसत आहे, त्यात या तथाकथित लेखकांचा फार मोठा वाटा आहे.
३. समाजात वैचारिक क्रांती निर्माण करणारे लेखणीचे शिपाई निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत या देशाचे भविष्य अंधारातच असेल ! : या देशाला तथाकथित स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली; परंतु अजूनही आपण भारताची घटना सिद्ध करू शकलो नाही. आपली राष्ट्रभाषा निश्चित होऊ शकली नाही. कुठल्याही राष्ट्रचेतनेचा जन्म झाला नाही, कुठलीही रचनात्मक सामाजिक क्रांती होऊ शकली नाही. जोपर्यंत समाजात वैचारिक क्रांती निर्माण करणारे लेखणीचे शिपाई निर्माण होणार नाहीत, जन्म घेणार नाहीत, तोपर्यंत या देशाचे भविष्य अंधारातच आहे.
४. ‘लेखक जिवंत असल्याची जाणीव समाजाला नसेल, तर असे लेखक केवळ प्रेतवत आहेत’, हे लेखकांनी लक्षात ठेवले पाहिजे.’
- डॉ. रामसेवक शुक्ल (ठेंगेपर सब मार दिया, मे-जून २०११)