हिंदूंच्या दुःस्थितीविषयी एका ख्रिस्त्याला सांगावे लागणे, हे बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांना लज्जास्पद !
डॉ. रिचर्ड बेनकिन यांच्याविषयी थोडक्यात
डॉ. रिचर्ड बेनकिन हे ‘फोर्सफिल्ड’ या मानवाधिकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंचा होणार नरसंहार थांबवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. तेथील हिंदूंच्या होत असलेल्या समूळ उच्चाटनावर प्रकाश टाकणारे ‘A Quiet case of Ethnic cleansing - The Murder of Bangladeshi Hindus’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
पुणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) - गेली अनेक वर्षे बांगलादेशमध्ये हिंदूंचा
चालू असलेला भीषण नरसंहार थांबवायचा असेल, तर माझ्या सोबत कोणी तरी येईल
आणि नंतर मी कार्याला प्रारंभ करेन, ही मानसिकता सोडून द्यायला हवी.
हिंदूंची झालेली दुःस्थिती पालटायची असेल, तर सर्वांनी आता एकांड्या
शिलेदाराप्रमाणे लढा देण्याची वृत्ती बनवून प्रयत्न करायला हवेत, असे
कळकळीचे प्रतिपादन मानवाधिकार कार्यकर्ते आणि बांगलादेशातील हिंदूंच्या
न्याय्य हक्कांसाठी लढणारे डॉ. रिचर्ड बेनकिन यांनी केले. डॉ. रिचर्ड बेनकिन हे ‘फोर्सफिल्ड’ या मानवाधिकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंचा होणार नरसंहार थांबवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. तेथील हिंदूंच्या होत असलेल्या समूळ उच्चाटनावर प्रकाश टाकणारे ‘A Quiet case of Ethnic cleansing - The Murder of Bangladeshi Hindus’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
‘प्रबोधन मंच’ या संस्थेच्या वतीने येथील भावे माध्यमिक शाळेत ‘बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदु समाजाची सद्यस्थिती’ या विषयावर डॉ. बेनकिन यांचे व्याख्यान आयोजिक करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. बेनकिन यांनी ‘फोरम फॉर हिंदु अवेकनिंग’च्या ( एफएच्ए) परदेशांतील सभांमध्येही मार्गदर्शन केले आहे.
बांगलादेशमधील हिंदूंची झालेली दयनीय स्थिती विषद करतांना ते म्हणाले, ‘‘तेथील शासनाच्या छत्रछायेने चालणार्या अल्पवयीन हिंदू मुलींवर सामुदायिक बलात्कार, हिंदूंचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदूंचा वांशिक नरसंहार आदींमुळे तेथील हिंदू नामशेष होण्याच्या वाटेवर उभे आहेत. खिस्ताब्द १९४७ मध्ये २० टक्के असणारे बांगलादेशमधील हिंदू आज ८ टक्क्यांहून अल्प आहेत. दुर्दैवाने मानवाधिकार संघटना आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी याविषयी मौन धारण करण्यातच धन्यता मानली. हिंदूंचे प्रभावशाली संघटन हेच या समस्येवरील उत्तर आहे.’’
भारत शासनाची निष्क्रियता दुर्दैवी !
डॉ. बेनकिन म्हणाले, ‘‘शिकागो येथील विधिज्ञ श्री. राबर्ट डोल्ड यांनी पुढाकार घेऊन अमेरिकन संसदेत बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी सांगितले. एक अमेरिकन व्यक्ती बांगलदेशमधील हिंदूंवरील अत्याचारांविषयी आवाज उठवते, पण भारत शासन मात्र याविषयी काही करत नाही.’’
हिंदुत्ववाद्यांच्या कार्यावर पोलिसांची करडी नजर !
या कार्यक्रमाला पोलिसांच्या विशेष शाखेचे एक अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी हिंदुत्ववाद्यांचे संपर्क क्रमांक टिपून घेतले. एकंदरीतच ते हिंदुत्ववादी आणि त्यांचे कार्यालय यांची माहिती जमवत होते. (पोलिसांनी राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या मागे शक्ती खर्च करण्याऐवजी जिहादी आतंकवाद्यांच्या मागे लावली असती, तर एव्हाना देशातील जिहादी आतंकवाद नष्ट झाला असता ! - संपादक)
