सनातनच्या दोन साधकांच्या झालेल्या चौकशीनंतर कर्नाटकातील कन्नड दैनिक ‘भारती’ची गरळओक
बेंगळुरू, २१ फेब्रुवारी (वार्ता.) - गोव्यातील मडगावमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात कर्नाटकातील बेळ्तंगडी येथील नरीय ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असणार्या अणीयुर गावातील सनातनचे साधक श्री. शन्मुगन यांच्या श्री. उदय आणि श्री. विनय या साधक मुलांची चौकशी करण्यात आली. मडगाव स्फोटाच्या प्रकरणातील एक आरोपी हे श्री. शन्मुगन यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात येत आहे.
चौकशीसाठी बोलावल्या जाणार्या साधकांचा जणू या स्फोटाच्या प्रकरणात हात आहे, अशा आशयाचे वृत्त कन्नड दैनिक ‘भारती’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘भगव्या आतंकवादाचे मूळ दक्षिण कन्नड जिल्ह्यात आहे’, असा जावईशोधही लावून हे वृत्तपत्र मोकळे झाले आहे. (अस्तित्वात नसलेल्या हिंदु आतंकवादाला ‘भगवा आतंकवाद’ असे नाव देऊन या वृत्तपत्राने हिंदुद्वेष्टेपणाचा कळस केला आहे. कर्नाटकातीलच भटकळ हे शहर हिरव्या आतंकवादासाठी कुप्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणच्या रियाझ आणि यासीन भटकळ यांनी केलेल्या भीषण स्फोटांमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत, तर अनेक जण गंभीर घायाळ झाले आहेत. ‘भटकळमध्ये हिरव्या आतंकवादाचे मूळ आहे’, असे नियतकालिकाने सांगितल्याचे कधीच वाचनात आलेले नाही. असे नियतकालिक जनतेचे प्रबोधन काय करणार ? तसेच ज्या पद्धतीने मडगाव स्फोटातील आरोपीच्या शोधासाठी चिंदबरम यांच्या तालावर नाचणार्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आकाश-पाताळ एक केले आहे, त्या पद्धतीने कधी भटकळ बंधूंच्या शोधासाठी त्यांच्या नातेवाइकांना धमकावले आहे ? त्यांच्या आजारी नातेवाइकांना कपडे काढून भर थंडीत फरशीवर बसवले आहे ? त्यांना अल्पाहाराच्या ताटावरून उठवले आहे ? शिवीगाळ केली आहे ? असे कधीच झालेले नाही. हिंदूंनो, सनातनवरील हे काँग्रेसी राज्यकर्त्यांचे मोगलाई आक्रमण म्हणजे हिंदु धर्मावरील आक्रमण आहे. आज सनातनचे साधक जात्यात आहे, उद्या तुम्हीही या हिंदुद्रोह्यांचा बळी ठरू शकता, हे लक्षात घ्या आणि संघटित होऊन या हिंदुद्रोला सनदशीर मार्गाने विरोध करा ! - संपादक)
साधकांविषयी जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचा दैनिक ‘भारती’चा प्रयत्न !
वृत्त वाचतांना ‘ज्या साधकांची चौकशी होत आहेत’, ते या प्रकरणात गोवले गेले आहेत, असा संशय मनात निर्माण होतो. वाक्यरचना खालील प्रमाणे आहे.
१. ‘स्फोटाच्या प्रकरणातील आरोपीबरोबर श्री. उदय आणि श्री. विनय हे वास्तव्य करत होते.
(स्फोटाच्या प्रकरणातील संशयिताबरोबर पूर्वी कधीतरी वास्तव्य केले आहे, एवढ्यावरून एखादी व्यक्ती गुन्हेगार कशी काय ठरते ? चिदंबरम यांच्या या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने याच न्यायाने रोमेश शर्मा या कुख्यात डॉनला संरक्षणदलाच्या विमानातून घेऊन जाणारे, २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी शाहीद बलवा याच्याबरोबर प्रवास करणारे, पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी पद्मसिंह पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शरद पवार यांचेही अन्वेषण करायला हवे. दुसरे म्हणजे अब्दुल करीम तेलगी याने मुद्रांक घोटाळ्यात शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे नाव घेतले होते. त्याचीही चौकशी व्हायला हवी. ‘भारती’ नियकालिकाने हे सूत्र कधी उचलून धरल्याचे ऐकिवात नाही. - संपादक) यातील उदय हा गोव्यातून काही दिवसांपूर्वी बेळ्तंगडीतील अणीयुर या गावी आला होता’, असे सांगण्यात आले.
२. स्फोट प्रकरणातील फरारी आरोपी हा कडब या गावचा असून त्याचे उदय आणि विनय यांच्या नात्यातील मुलीशी विवाह झाला आहे. त्याच्याबरोबर हे दोघे गोव्याला गेले होते, असे लक्षात आले आहे. (एखाद्या प्रकरणातील संशयिताबरोबर कोणी प्रवास केला अथवा तो नात्यातील आहे, या सूत्राचा आधार घ्यायचा म्हटले, तर देशातील सार्या राजकारण्यांना कारागृहात टाकावे लागेल. आज १६२ गुन्हेगार लोकप्रतिनिधी संसदेतच आहेत. या गुन्हेगार लोकप्रनिधींच्या मांडीला मांडी लावून देशाच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्री आणि खासदार बसतात. यातील अनेक जणांचे एकमेकांशी नातेही आहे. या सर्वांना मग गुन्हेगारच म्हणायचे का ? - संपादक)
३. आता हे दोघे स्फोटाच्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी होते कि फरारी आरोपीला शोधण्यासाठी त्यांची चौकशी होत आहे, हे स्पष्ट झालेले नाही. (आधी संशय निर्माण करायचा, भगव्या आतंकवादाचा आरोप करायचा आणि नंतर एखादे-दुसरे वाक्य लिहून समतोल बातमी लिहिल्याचा आव आणायचा, हीच पीतपत्रकारिता करणार्यांची पद्धत असते. हिंदूंनो, पत्रकारितेला काळिमा फासणार्या या वृत्तपत्रावर बहिष्कार घाला ! - संपादक)
हिंदूंनो तुम्हाला आतंकवादी ठरवणार्या दैनिक ‘भारती’ या नियतकालिकावर बहिष्कार टाका !
१. या चौकशीचे मूळ कुठपर्यंत जाऊ शकते, लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.
२. यापूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रेणेचे अधिकारी ज्या वेळी जिल्ह्यात आले होते, त्या वेळी चौकशीअंती स्फोटाची काही माहिती त्यांना मिळाली होती.
३. भगव्या आतंकवादाचे मूळ दक्षिण कन्नड जिल्ह्यात असल्याचे उघड झाले असल्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी हे स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने चौकशी करत आहेत. (हिंदुद्वेष्टे पी. चिदंबरम आणि त्यांच्या केंद्रीय टोळीतील त्यांचे हिंदुद्रोही साथीदार यांना काहीही करून सनातनला आतंकवादी ठरवून तिच्यावर बंदी घालायचीच आहे, त्यातच अशा बिनबुडाच्या बातम्या देऊन दैनिक ‘भारती’सारखी नियतकालिके त्यांच्या या हिंदुद्रोहाला साथ देत आहेत. अन्वेषण यंत्रणांना पुरावे सापडत नसल्यामुळे त्या वारंवार या प्रकरणाची चौकशी करून सनातनच्या विरोधात खोटे पुरावे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयी जाणून न घेता थेट ‘भगवा आतंकवाद’ हा शब्दप्रयोग करून समस्त हिंदूंना अवमानित करणार्या या दैनिकावर आता हिंदूंनी बहिष्कार टाकावा ! - संपादक)