'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

मुरबाड येथे हरिनाम सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

    मुरबाड, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील भागवत वारकरी सांप्रदायिक समाज सेवा मंडळाच्या वतीने आयोजित हरिनाम सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. प्रसाद वडके यांचे व्याख्यान झाले. याचा लाभ ७०० धर्माभिमान्यांनी घेतला. वैकुंठवासी प.पू. रामदादा जोशी यांनी हा सप्ताह चालू केला. प्रमुख आयोजक प.पू. श्री गुरुवर्य श्री प्रमोद महाराज जगताप यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याने प्रभावित होऊन समितीला आमंत्रित केले़

    विषय मांडतांना श्री. प्रसाद वडके यांनी हिंदु धर्माची महती सांगितली, तसेच व्यष्टी साधनेसोबत आता समष्टी साधनेचीही खूप आवश्यकता आहे, असे सांगितले. नुसतेच ‘रामनाम’ न घेता आता रामाचे कार्य करणे आवश्यक आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आज हिंदु संस्कृती नष्ट होत आहे. यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी श्री. वडके यांचा सत्कार करण्यात आला.
क्षणचित्र : सप्ताहाला शिवळा येथून आलेल्या धर्माभिमान्यांनी श्री. प्रसाद वडके यांना शिवजयंतीला वक्ता म्हणून येण्यासाठी आमंत्रित केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi