'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षांच्या पारदर्शकतेविषयी जनमानसांत उदासीनता

    मुंबई, ५ फेब्रुवारी - राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अधिकाधिक पारदर्शक व्हाव्यात, याकरता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सूचना मागितल्या होत्या. मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ सात जणांनी सूचना पाठवल्याने मंडळाची घोर निराशा झाली आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ञ, अधिकारी, तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संघटना या सर्वांना हे आवाहन करण्यात आले होते. मंडळाच्या परीक्षांमध्ये होणारे अपप्रकार कसे थांबवावेत, या विषयी विशेषतः या सूचना मागवण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने कोणालाही या विषयी स्वारस्य वाटले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (यातून आदर्श विद्यार्थी घडवण्याविषयी शिक्षणक्षेत्रातील सर्वच व्यक्ती, स्वत: विद्यार्थी आणि पालक किती उदासीन आहेत, हे स्पष्ट होते. शिक्षणतज्ञांची ही उदासीनता देशासाठी घातकच म्हणावी लागेल ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi