| उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. सविता लेले |
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थना आणि श्री गणेशाच्या श्लोकाने करण्यात
आला. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने जिज्ञासू, हितचिंतक यांच्याशी स्नेह
वाढवण्याकरता स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले. त्यानंतर सौ.
सविता लेले यांनी `मकरसंक्रांत' आणि `प्रजासत्ताकदिन' या विषयावर
उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि `सत्संगाचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि
स्थानिक सत्संगांविषयी माहिती सांगून त्यांना सत्संगाला उपस्थित रहाण्याचे
आवाहन केले. या प्रसंगी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे
प्रदर्शन लावण्यात आले होते. सर्वांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन संस्थेच्या कु. स्नेहल निब्रे यांनी केले, तर कार्यक्रमाची
सांगता श्रीगुरूंच्या श्लोकाने करण्यात आली.
क्षणचित्र
१. श्री. भरत राणे या धर्माभिमान्याने या कार्यक्रमाचे फलक स्वत:हून लिहून दिले.
क्षणचित्र
१. श्री. भरत राणे या धर्माभिमान्याने या कार्यक्रमाचे फलक स्वत:हून लिहून दिले.