'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

ऋषीमुनींच्या शोधांकडे भारतीयांचे दुर्लक्ष ! - डॉ. प.वि. वर्तक

   नेरूळ -  अलीकडे बोलबाला झालेल्या क्लोनिंग, टेस्ट ट्यूब बेबी, गुणसूत्रे आदी शोधांचे मूळ वेद आणि महाभारतकालीन संशोधनात सापडते. त्याकाळातील या शोधांकडे भारतीयांचे दुर्लक्ष झाले, अशी खंत डॉ. प.वि. वर्तक यांनी व्यक्त केली. नेरूळमधील सेक्टर ३८ मधील ‘केंद्रीय विहार’मध्ये कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
    ‘वेदातील विज्ञान’ या विषयावर बोलतांना डॉ. वर्तक म्हणाले की, आपण स्वाभिमान आणि अस्मिता गमावून बसलो आहोत. त्यामुळे वेदकालीन विज्ञानातील प्रगतीकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. आपल्या ऋषीमुनींनी गणित, जीवशास्त्र, कालमापन, शस्त्रास्त्रविद्या, पंचांगशास्त्र, आदींचा प्रचंड संशोधन करून शोध लावला. कार्यक्रमाचा प्रारंभ कविवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हांस भाग्य’ या गीताने झाला. मुग्धा करमरकर आणि सुनीता पाठक यांनी हे गीत सादर केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ललित पाठक, नारायण केळसकर आदी उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi