'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

शिवसेनेची सर्वाधिक तरुण उमेदवार कु. अनुशा हिला धारावी स्वच्छ बनवायची आहे !

मुंबई महापालिका निवडणूक २०१२
    मुंबई, ५ फेब्रुवारी - मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता रंग घेऊ लागली आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू लागले असतांना यात धारावी येथील शिवसेनेची सर्वाधिक तरुण उमेदवार कु. अनुशा वालप्दासी हिची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.
भारतीय युवा सेनेकडून उमेदवारी मिळालेली कु. अनुशा अवघ्या २१ वर्षांची असून ती सध्या पनवेल येथील म. गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिकत आहे. धारावी परिसर स्वच्छ बनवण्याची तिची अपेक्षा आहे.
    सकाळी महाविद्यालयात जाऊन लेखी परीक्षेच्या पूर्वी होणार्‍या अन्य प्रायोगिक परीक्षांना उपस्थित रहाणे आणि सायंकाळपासून निवडणुकीचा प्रचार करणे, असा सध्या तिचा दिनक्रम चालू आहे. धारावीच्या ट्रान्झिस्ट कॅम्प, विभाग क्र. १७६ मधून तिला उमेदवारी देण्यात आली आहे. कु. अनुशा म्हणते, ‘‘शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी दिल्याने मी त्याचे सार्थक करणार आहे. शिवसेनेला विजय मिळवून देणे, हाच माझा उद्देश असणार आहे. निवडून आल्यावर मी प्रथम धारावी परिसर स्वच्छ बनवण्यावर भर देणार आहे. सध्या येथे काँग्रेस पक्षाचा नगरसेवक आहे. नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी आरोग्य देण्याविषयी त्यांनी या भागात काहीच काम केले नाही. मी विद्यार्थीदशेमध्ये असल्यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे मला चांगले ठाऊक आहे. त्यादृष्टीनेही मी कार्यरत असणार आहे.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi