डेहराडून (उत्तराखंड) - काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या सभेमध्ये जोडा फेकण्याचा प्रकार आज घडला आहे. एका व्यक्तीने व्यासपिठाच्या दिशेने जोडा फेकला. त्यावेळी राहुल गांधी व्यासपिठावर होते. हा प्रकार घडल्यानंतर राहुल गांधी यांनी जोडा फेकण्याला भीत नसल्याचे सांगितले.