'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

मंदिरात हिंदूंकडून सामूहिक आरती आणि घंटानाद

भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथील श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात घंटा न वाजवण्याच्या औरंगजेबी फतव्याच्या विरोधात हिंदू एकटवले !
    भाग्यनगर, ३० जानेवारी - भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथील भाग्यलक्ष्मी मंदिरात घंटा न वाजवण्याच्या विरोधात हिंदूंनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंदिरात सामूहिक आरती आणि घंटानाद केला. तसेच या महाआरतीच्यावेळी श्री भाग्यलक्ष्मी देवीचा जयजयकार केला.
१. भाग्यनगरचा चारमिनार हा भाग ‘छोटा पाकिस्तान’ म्हणून ओळखला जातो. या भागात सर्वत्र मुसलमानच दृष्टीस पडतात. अशा ठिकाणी हिंदू मोठ्या संख्येने एकत्र आल्याने पोलीस आणि स्थानिक मुसलमान आश्चर्यचकित झाले.
२. हिंदू एकत्र आल्याचे लक्षात येताच स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात केले. आरती संपताच पोलिसांनी दुपारी १ वाजता ‘मुसलमानांना नमाज पडायचे आहे’, असे कारण सांगून हिंदूंना तेथून तातडीने निघून जाण्यास सांगितले. (पोलिसांना हिंदूंपेक्षा मुसलमानांची चिंता जास्त वाटते, हे यातून स्पष्ट होते. यावरून आपण भारतात आहोत कि पाकिस्तानात, असा प्रश्न निर्माण होतो ! - संपादक)
३. हिंदूंनी तीव्र विरोध केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आरतीनंतर देवदर्शन घेण्याची अनुमती दिली. शेवटी पोलिसांनी चारमिनारच्या सभोवती बंदी आदेश जारी केला. (यावरून पोलीस मुसलमानांच्या समोर नेहमी गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! - संपादक)
४. सामूहिक आरतीचे नियोजन करणार्‍या श्री राजा सिंह यांना पोलिसांनी सकाळपासूनच वैâदेत ठेवले होते. (समाजविघातक कृत्ये करणार्‍या मुसलमानांना नव्हे, तर स्वतःच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणार्‍या हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारणारे मुसलमानधार्जिणे पोलीस ! - संपादक) या महाआरतीची चर्चा संपूर्ण शहरात चालू होती. या महाआरतीला महिला, पुरुष आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने आली होती. हे सर्व जण श्री भाग्यलक्ष्मीदेवीचा मोठ्याने जयजयकार करत होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi