पुणे, २६ जानेवारी - देवाचे नाव असणार्या आस्थापनांची २००९ ते २०११ या तीन वर्षांच्या काळात इतर आस्थापनांच्या तुलनेत व्यवसायात भरभराट झाल्याचे एका पाहणीअंती स्पष्ट झाले आहे. दैनिक ‘पुढारी’ने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
१. मुंबई शेअर बाजारातील सर्व ‘अ’ आणि ‘ब’ गटाच्या आस्थापनांच्या कामगिरीचा अभ्यास केला असता, हे निष्कर्ष समोर आले आहेत.२. ‘सन फार्मा’, ‘मारुति-सुझुकी’ या आस्थापनांच्या भांडवलात अनुक्रमे २९ सहस्र ७०० कोटी आणि ११ सहस्र ५०० कोटी रुपयांची लक्षणीय वाढ झाली आहे.
३. या कालावधीत आस्थापनांच्या भांडवलात ७७ टक्के वाढ झाली.
४. या काळात प्रत्यक्ष ‘सेन्सेक्स’ ६० टक्क्यांनी वाढला.
५. या पाहणीत ९५ आस्थापनांच्या कामगिरीचा अभ्यास करण्यात आला.
६. अनेक अधिकार्यांनी हा केवळ योगायोग असल्याचे आणि त्याचा देवाच्या नावाशी संबंध नसल्याचे सांगितले आहे.