१. ‘पूर्वी प.पू. बाबा म्हणायचे, ‘‘केवळ डॉक्टर (डॉ. आठवले) बोलतील.’’ (इतर साधकांनी मार्गदर्शन करू नये.)
२. पूर्वी प.पू. बाबा म्हणायचे ‘नाम घ्या.’ १०.३.१९९३ या दिवशी दुपारी ३ ते ४ च्या या कालावधीत इस्लामपूर येथे गोव्यातील साधकांना सांगितले, ‘‘भारतभर (नामाचा) प्रचार करा.’’
३. १७ एप्रिलला १९९४, रात्री ९ वाजता पुण्यातील साधकांना प.पू. बाबा म्हणाले,२. पूर्वी प.पू. बाबा म्हणायचे ‘नाम घ्या.’ १०.३.१९९३ या दिवशी दुपारी ३ ते ४ च्या या कालावधीत इस्लामपूर येथे गोव्यातील साधकांना सांगितले, ‘‘भारतभर (नामाचा) प्रचार करा.’’
अ. ‘‘प्रसारकार्यात साहाय्य करतील, त्यांचीच प्रगती होईल.
आ. सत्संगाला येणार्या ३० पैकी १ च साधना करील, तरी निराश होऊ नका.’’
४. रामनवमी १९९४ या दिवशी कांदळीला प.पू. बाबांनी सांगितले, ‘‘आता जगभर प्रसार करा.’’
बाबांच्या संकल्पामुळेच सनातनचे कार्य आता जगभर पसरले आहे.’
- डॉ. आठवले (कार्तिक शु. ६, कलियुग वर्ष ५११३ (१.११.२०११))