कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) - खिस्ताब्द २००९ झालेल्या लोकसभा निवडणुकीत मते मिळण्यासाठी ५४ लक्ष रुपये घेतल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी लवकरच कामगारमंत्री हसन मुश्रीफ, संभाजीराजे छत्रपती आणि माजी आमदार संजय घाटगे यांचे जबाब घेण्यात येतील. त्यानंतर गुन्ह्याची पुढील पडताळणी केली जाईल, असे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रचारासाठी माजी आमदार संजय घाटगे यांनी ५४ लक्ष रुपये घेतले होते, असा आरोप कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.